मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
नरसिंह

देवताविषयक पदे - नरसिंह

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११४९
( राग-केदार; ताल-दादरा )
जय जय नरसिंहा । जय जय नरसिंहा ।
अकळ न कळे तुझा पार ॥ध्रु०॥
भक्तभूषण दीन वत्सल हरी । दीनव० ।
प्रल्हादासी रक्षिले नानापरी ॥१॥
भावार्थे स्तंभी प्रगट जाला ॥२॥
हरिजनाचा द्वेषी सारियेला ॥ द्वे० ।
दास प्रल्हाद देवे रक्षियेला ॥३॥

११५०
( राग-केदार; ताल-दादरा )
जयजय शामराजा । नाम जेथे । नित्य० ।
भूत पिशाच्च काय करील तेथे ॥१॥
उग्र बहुत नृसिंहउपासना । नृसिंह० ।
लोभे सांभाळी देव भक्तजनां ॥२॥
भक्तां गांजितां साहवेना अंतरी । साह० ।
आडलियां कोंवसा देव धांवणी करी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP