मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| नामस्मरण विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - नामस्मरण श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथाभूपाळीसमर्थ नामस्मरण Translation - भाषांतर ५६१.श्रीराम जयराम नाम दो अक्षरी । सहस्त्र नामांवरि ब्रीद गाजे ॥१॥उफराट्या अक्षरी वाल्मिकवैखरी । वंदिजे सुरवरी ब्रह्मादिकी ॥२॥शुक पढवितां मंदिरी नाम दो अक्षरी । वैकुंठामाझारी ख्याति जाली ॥३॥रामदास म्हणे रामनामघोषे । त्रैलोक्याचे दोष निर्दाळिले ॥४॥५६२.रात्रंदिस मन राघवी असावे । चिंतन नसावे कांचनाचे ॥१॥कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन । जन्मासी कारण हेचि दोन्ही ॥२॥दोन्ही नको धरुं नको निंदा करुं । तेणे हा संसारु तरशील ॥३॥तरशील भवसागरी बुडतां । सत्य या अनंताचेनि नामे ॥४॥नामरुपातीत जाणावा अनंत । दास म्हणे संतसंग धरा ॥५॥५६३.सप्रचीत आणि प्रसिद्ध । सर्वकाळ स्वतःसिद्ध ॥१॥राम अक्षरे ही दोनी । सेवा भावाच्या अनुपानी ॥२॥अक्षरे सार रे सेविली । विषप्रचीतीस आली ॥३॥रामीरामदास म्हणे । मज प्रचीत आली जेणे ॥४॥५६४.विश्वासला जेथे कैलासीचा राव । तेथे एक भाव दृढ धरा ॥१॥दृढ धरा भाव वाल्मिकाचे परी । सर्व ऋषेश्वरी जाणिजे तो ॥२॥जाणिजे वाल्मीकऋषिरामायण । तारिले पाषाण रामनामे ॥३॥रामनामे उद्धरली ते गणिका । नेली दिव्य लोका याच देही ॥४॥याच देही गति पावली कुंटणी । रामनाम वाणी उच्चारिता ॥५॥५६५.राम ऐसे उच्चारणे । शिवपथ्याकार होणे ॥१॥राम सर्वकाळ ध्यावा । यासी आळस न करावा ॥२॥वाल्हाकोळी होता निंद्य । नामे केला जगद्वंद्य ॥३॥रामदास म्हणे सार । दोन्ही अक्षरे उच्चार ॥४॥५६६.नामाचा महिमा जाणे शूळपाणी । रामनाम वाणी उच्चारितां ॥१॥उच्चारितां शिव सर्वांगे निवाला । मग विसावला रामनामी ॥२॥रामनामी रती जाली पशुपति । आवडी पार्वती जपतसे ॥३॥जपतसे विश्व विश्वनाथसंग । रामनाम योग काशीपुरी ॥४॥काशीपुरी विश्वजनांसी पावन । जीवांसि जीवन रामनाम ॥५॥रामनामे गती होत असे अंती । म्हणोनि बोलती वेदशास्त्र ॥६॥वेदशास्त्रश्रुति स्मरति पुराणे । सर्वांसी कारण रामनाम ॥७॥रामनामी भाव न धरी जो नर । जाणावा तो खर पापरुपी ॥८॥५६७.विषे शंकरा जाळिले । रामनामे शीतळ केले ॥१॥रामनामाची औषधि । जेणे तुटे भवव्याधि ॥ध्रु०॥शिवे केली काशीपुरी । विश्व नामे मुक्त करी ॥२॥रामनामे पुरे कोड । न मानी त्यास घाली होड ॥३॥रामदासी दृढभाव । संदेहासि केला वाव ॥४॥५६८.काशीविश्वेश्वर सर्वांसी उद्धरी । त्यासि मनी धरी सर्वकाळ ॥१॥ज्योतिर्लिंगे बारा अंतरी धरावी । मग विवरावी निजरुपे ॥२॥व्यंकटेश ध्यातां संपन्न करितो । जना उद्धरितो नाममात्रे ॥३॥ध्यायी रामेश्वर रामचि ईश्वर । प्रचीत रोकडी विचाराची ॥४॥विचाराचे मूळ शोधावे समूळ । होइजे निर्मळ निःसंदेह ॥५॥५६९.नाना रंग सेखी होताती वोरंग । सर्वदा सुरंग रामरंग ॥१॥रामरंग कदा काळी वोरंगेना । तेथे राहे मना रंगोनियां ॥२॥रंगोनीयां राहे तद्रूप होऊनी । मग जनी वनी समाधान ॥३॥समाधान घडे राघवी मिळतां । मग दुर्मिळता कदा नाही ॥४॥कदा नाही खेद सर्वहि आनंद । सुखाचा संवाद तेथे कैचा ॥५॥संतसंगे जन्म सार्थक जहाला । राम सांपडला जवळीच ॥६॥जवळीच राम असोनि चुकलो । थोर भांबावलो माईकांसी ॥७॥माईकांसी प्राणी सत्यचि मानिती । सत्य ते नेणती जाणपणे ॥८॥जाणपणे मनी अज्ञान थारले । तेंचि विस्तारले ज्ञानरुपे ॥९॥ज्ञानरुपे भ्रांति सामावली चित्ती । संशय निवृत्ती नव्हे जेणे ॥१०॥नव्हे तेणे रुप ठाउके रामाचे । जे का विश्रामाचे माहियेर ॥११॥माहियेर घडे संशयनिवृत्ति । राम सीतापतीचेनी नामे ॥१२॥रामनामरुप सर्वही निरसे । जो कोण्ही विश्वासे रामनामी ॥१३॥रामनामी चित्त ठेवुनी असावे । दुश्चित नसावे सर्वकाळ ॥१४॥सर्वकाळ गेला सार्थकी जयाचा । धन्य तो दैवाचा दास म्हणे ॥१५॥५७०.क्षण एक राम आठवितां चिती । तेणे उद्धरती कोटिकुळे ॥१॥कोटिकुळे वाट पाहती तयाची । आवडी जयाची रामनामी ॥२॥रामनामे तुटे कुळाचे बंधन । पुत्र तो निधान हरिभक्त ॥३॥हरिभक्त एक जाहला प्रल्हाद । जयाचा गोविंद कैवारी ॥४॥कैवारी हरि राखे नानापरी । ऐसा भाव धरी आलया रे ॥५॥आलया रे हित विचारी आपुले । सर्वहि नाथिले मायाजाळ ॥६॥मायाजाळ दिसे दृष्टीचे बंधन । जाणती सज्ञान अनुभवी ॥७॥अनुभवी संतसज्जन देखसी । तेथे राघवासी ठायी पाडी ॥८॥ठायी पाडी राम जीवांचा विश्राम । तेणे सर्व काम पूर्ण होती ॥९॥पूर्ण होती सर्व तुझे मनोरथ । राघवाचा स्वार्थ मनी धरी ॥१०॥मनी धरी सर्व देवांचा कैवारी । ध्यातसे अंतरी महादेव ॥११॥महादेव सर्व जना उपदेसी । रामीरामदासी दृढ भाव ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP