मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| उपदेशपर विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - उपदेशपर श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथाभूपाळीसमर्थ उपदेशपर Translation - भाषांतर ६१०.नमन योगीराया स्वामी दत्तात्रया । गाईन ओंवीया संसारीच्या ॥१॥संसारीचे दुःख आठवले मनी । मागे नाना योगी भोगीलिया ॥२॥भोगीलीया परी नाही आठवण । दुःख ते कठीण विसरलो ॥३॥विसरलो राम चित्ती दृढ काम । तेणे गुणे श्रम थोर जाला ॥४॥जालो कासावीस थोर गर्भवासी । नको त्या दुःखासी सांगवेना ॥५॥सांगवेना सीण अत्यंत कठीण । रामा तुजवीण दुःख जाले ॥६॥दुःख जाले भारी मातेचे उदरी । नव मास वरी कोंडियेले ॥७॥कोंडियेले मज अत्यंत सांकडी । रामा कोण सोडी तुजवीण ॥८॥तुजविणे मज जाहाले बंधन । जठरी शयन जननीचे ॥९॥जननीजठर संकोचित थोर । विष्ठा आणि मूत्र नाकी तोंडी ॥१०॥नाकी तोंडी जंत वांति आणि पित्त । निर्बुजले वित्त वायो नाही ॥११॥वायो नाही तेथे वन्हीचा उबारा । तेणे या शरीरा दुःख होय ॥१२॥दुःख होय थोर सर्वांग आहाळे । तेणे गुणे पोळे अस्थि मांस ॥१३॥अस्थींचा पंजर सिरी वेटाळीला । नाडी गुंडाळीला मेद मांसे ॥१४॥मेद मांस कृमी कुश्चिळ कातडी । गळती आंतडी लवथवीत ॥१५॥ऐसे अमंगळ अत्यंत कुश्चीळ । प्राण हा व्याकूळ होय दुःख ॥१६॥दुःखे आला त्रास तेणे कोंडि श्वास । कोंडिले उमस घेतां नये ॥१७॥नये नये येतां सर्वथा बाहेरी । ऐसिये दाथरी उकडीले ॥१८॥उकडितां प्राणी करी तळमळ । तंव जन्मकाळ आला पुढे ॥१९॥आले पुढे अंतःकाळाचे संकट । कष्टांवरी कष्ट थोर जाले ॥२०॥थोर जाले कष्ट मातेच्या उदरी । सीणलो श्रीहरी दास तुझा ॥२१॥दास्य मी करीन ऐसे होते ध्यान । जन्मकाळी प्राण गेला माझा ॥२२॥गेला माझा प्राण जाले विस्मरण । स्वामीचे चरण विसरलो ॥२३॥विसरलो सोहं मग म्हणे कोहं । जन्म काळी बहु दुःख जाले ॥२४॥दुःखे दुखवलो मग म्हणे आहो । जन म्हणे टाहो फोडियेला ॥२५॥फोडियेला टाहो पडतां भूमीवरी । दिवसेंदिवस हरी विसरलो ॥२६॥विसरलो बुद्धि स्वहिताची शुद्धि । अज्ञानाची वृद्धि होत आहे ॥२७॥होत आहे वृद्धि दृढ देहेबुद्धि । तुज कृपानिधी अंतरलो ॥२८॥अंतरलो सुख तुज विसरतां । विषयो भोगितां दुःख जाले ॥२९॥दुःख जाले फार ऐसा हा संसार । पुढे षड विकार उद्भवले ॥३०॥उद्भवले तेणे सुख दुःख कळे । प्राण हा आंदोळे दुःख होतां ॥३१॥दुःख होय देही माता नेणे कांही । मज वाचा नाही काय करुं ॥३२॥काय करुं दुःखे पोळे अभ्यंतर । मातेसी अंतर जाणवेना ॥३३॥जाणवेना माझे दुःख मी अज्ञान । मग मी रुदन करी देवा ॥३४॥करीं देवा आतां माझी सोडवण । दुःख हे दारुण भोगवेना ॥३५॥भोगवेना दुःख संसारीचे आतां । धांवे बा अनंता पावे वेगी ॥३६॥पावे वेगी दास सोडवी आपुले । लोभे वाहावले मायाजाळी ॥३७॥मायाजाळी दृढ झाले माझे माझे । रामा नाम तुझे आठवेना ॥३८॥आठवेना चित्ती स्वहिताचे ज्ञान । मायबापी लग्न केले लोभे ॥३९॥लोभे लग्न केले मानिली आवडी । पायी वोली बेडी बंधनाची ॥४०॥बंधनाची बेडी प्रबळला कम । मग कैंचा राम आठवेल ॥४१॥आठवेना राम स्वामी त्रैलोक्याचा । जालो कुंटुंबाचा भारवाही ॥४२॥भारवाही जालो रामा अंतरलो । बंधनी पडलो काय करुं ॥४३॥काय करुं मज कामाचे सांकडे । संसाराचे कोडे उगवेना ॥४४॥उगवेना मन आठवे कांचन । सर्वकाळ ध्यान प्रपंचाचे ॥४५॥प्रपंचाचे ध्यान लागले मानसी । चित्त अहर्निशी दुश्चंचळ ॥४६॥चंचळ मानस संसारउद्वेगे । क्षणक्षणा भंगे चित्तवृत्ती ॥४७॥वृत्ती कांता धन पाहे जनमान । इच्छेचे बंधन दृढावले ॥४८॥दृढावले ओझे प्रपंचाचे माथां । तेणे गुणे वेथा थोर होय ॥४९॥थोर होय वेथा तारुण्याच्या भरे । कामाचे कावीरे आवरेना ॥५०॥आवरेना क्रोध तेणे होय खेद । वृत्तींचा उच्छेद करुं पाहे ॥५१॥करुं पाहे घात थोर पुढिलांचा । मार्ग स्वहिताचा अंतरलो ॥५२॥अंतरलो भक्ती ठाकेना विरक्ती । देवा तुझी प्राप्ति केंवी घडे ॥५३॥केंवी घडे प्राप्ति पतितासी । जाल्या पापराशी सांगो किती ॥५४॥सांगो किती दोष जाले लक्ष कोटी । पुण्य माझे गांठी आढळेना ॥५५॥आढळेना पुण्य पापाचे डोंगर । करिती संसार माझे माझे ॥५६॥माझी माता पिता माझे बंधुजन । पुत्र कांता धन सर्व माझे ॥५७॥सर्व माझे ऐसे मानिला भर्वंसा । तुज जगदीशा विसरलो ॥५८॥विसरलो तुज वैभवाकरितां । सेखी मातापिता राम जाली ॥५९॥राम जाली माता देखत देखतां । तरी म्हणे कांता पुत्र माझे ॥६०॥माझे पुत्र माझे स्वजन सोईरे । दृढ देही भरे अहंभाव ॥६१॥अहंभाव मनी दुःख आच्छादुनी । वर्ततसे जनी अभिमाने ॥६२॥अभिमान माथां वाहे कुटुंबाचा । अंतरी सुखाचा लेश नाही ॥६३॥नाही नाही सुख संसारी पाहतां । पुरे देवा आतां जन्म नको ॥६४॥नको नको आतां घालूं या संसारी । पोळलो अंतरी काय करुं ॥६५॥काय करुं माझे नेणती स्वहित । आपुलाले हित पाहतील ॥६६॥पाहतील हित वैभवाची सखी । कोणी मज सेखी कामा नये ॥६७॥कामा नये कोणी तुजवीणे रामा । नेई निजधामा माहियेरा ॥६८॥माहियेर माझे अंतरले दूरी । लोभे दुराचारी गोवियेले ॥६९॥गोवियेले मज आपुलाल्या हिता । माझी कोणी चिंता केली नाही ॥७०॥केली नाही चिंता लोभे गुंडाळीले । पिळुन घेतले सर्व माझे ॥७१॥सर्व माझे गेले जालो नि कारण । स्वामीचे चरण अंतरलो ॥७२॥अंतरलो देवा आयुष्य वेंचले । अंतर पडिले काय करुं ॥७३॥काय करुं आतां शरीर खंगले । मज ओसंडिले जिवलगी ॥७४॥जिवलगी मज ओसंडिले देवा । काय करुं ठेवा प्रालब्धाचा ॥७५॥प्रालब्धाचा ठेवा प्रपंची रंगला । देह ही खंगला वृद्धपणी ॥७६॥वृध्दपणी माझे चळले शरीर । श्रवण बधीर नेत्र गेले ॥७७॥नेत्र गेले मज पाहतां दिसेना । स्वये उठवेना पाय गेले ॥७८॥पाय गेले तेणे दुःख होय भारी । तेथेंचि बाहेरी जाववेना ॥७९॥जाववेना तेणे जाले अमंगळ । अत्यंत कुश्चीळ वांती पित्त ॥८०॥वांति पित्त जन देखोनि पळती । दुर्गंधी गळती नवनाळी ॥८१॥नवनाळी वाहे दुर्गंधी न साहे । वांति होऊं पाहे देखतांचि ॥८२॥देखते सकळ सुटले पाझर । मळमूत्री धर धरवेना ॥८३॥धरवेना तृषा क्षुधा आणि दिशा । पराधेन आशा प्रबळली ॥८४॥प्रबळली आशा जाली अनावर । चित्ती तृष्णातुर सर्वकाळ ॥८५॥सर्वकाळ चित्ती थोर लोलंगता । खायासी मागतां नेदी कोणी ॥८६॥नेदी कोणी कांही क्षीण जालो देही । जिवलगी तेही ओसंडीले ॥८७॥ओसंडीले मज वैभव गेलियां । देह खंगलीयां दुःख जाले ॥८८॥दुःख जाले थोर क्षुधा आवरेना । अन्न हि जिरेना वांती होय ॥८९॥वांती होय तेणे निर्बुजे वासना । स्वादिष्ट चाववेना दांत गेले ॥९०॥दांत गेले तेणे जिव्हेची बोबडी । कंठ गडगडी बोलवेना ॥९१॥बोलवेना अंतःकाळीच्या विपत्ती । सर्वही म्हणती मरेना कां ॥९२॥मरेना कां आतां कासयां वाचलां । देव विसरला नेणो यासी ॥९३॥नेणो याची नाही मर्यादा खुंटली । सकळां लागली चिंता मनी ॥९४॥चिंता मनी वाटे मृत्युची सकळां । सर्वांसी कंटाळा आला थोर ॥९५॥आला थोर त्रास जिवलग बोलती । देवा याची माती उचलावी ॥९६॥उचलावी माती सर्वांचे अंतरी । सुखाची सोईरी दूरी ठेली ॥९७॥दूरी ठेली सर्व सुखाची चोरटी । कोणीच सेवटी सोडवीना ॥९८॥सोडवीना कोणी श्रीरामावांचूनि । संकटी धांवणी राम करी ॥९९॥राम करीतसे दासांचा सांभाळ । भक्तांचा स्नेहाळ राम येक ॥१००॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP