मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| अध्यात्म विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव विविध विषय - अध्यात्म श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ अध्यात्म Translation - भाषांतर ७६७.सोहं हंसा म्हणिजे तो मी मी तो ऐसे । हे वाक्ये विश्वासे विवरावे ॥१॥विवरावे अहं ब्रह्मास्मिवचन । ब्रह्म सनातन तूंचि एक ॥२॥तूंचि एक ब्रह्म हेंचि महावाक्य । परब्रम्ही ऐक्य अर्थबोध ॥३॥अर्थबोध रामीरामदासी जाला । निर्गुण जोडला निवेदने ॥४॥७६८.चित्त देउनी ऐका रे । पोहणारा पडिला धारे ॥१॥मन मुळाच्या शेवटे । वाहे जीवन उफराटे ॥२॥उगमासी संगम जाला । रामदासी शब्द निवाला ॥३॥७६९.पूर्वी पाहतां मी कोण । धुंडी आपणा आपण ॥१॥स्वये आपुला उगव । जाणे तोचि महानुभाव ॥२॥कोण कर्म आचरलो । कैसा संसारासी आलो ॥३॥आले वाटे जो मुरडे । देव तयासी सांपडे ॥४॥आली वाट ते कवण । मायेचे जे अधिष्ठान ॥५॥रामदासाची उपमा । ग्राम नाही कैची सीमा ॥६॥७७०.दृश्य हे दिसेना अंधारी पाहतां । परी तया ज्ञाता म्हणो नये ॥१॥म्हणो नये तैसे अज्ञानचि ज्ञान । पूर्ण समाधान वेगळेचि ॥२॥वेगळेचि कळे क्षीरनीर हंसा । दास म्हणे तैसा अनुभव ॥३॥७७१.मर्यादा सागरा आणि दिनकरा । अंतरिक्ष तारा जयाचेनि ॥१॥जयाचेनि मेघ पडे भूमंडळी । पिके यथाकाळी वसुंधरा ॥२॥वसुंधरा बहु रंगे विस्तारली । जीवसृष्टि जाली जयेचेनि ॥३॥जयेचेनि सर्व सृष्टि चालताहे । तयालागी पाहे शोधुनीयां ॥४॥शोधुनियां पाहे देव सर्व कर्ता । तरिजे विवर्ता जयाचेनि ॥५॥जयाचेनि भक्ति जयाचेनि मुक्ति । जयाचेनि युक्ति वाढतसे ॥६॥वाढतसे ज्ञान स्वरुपी पाहतां । जयाचेनि सत्ता चालतसे ॥७॥चालतसे सत्ता ते मायारुपाची । शुद्ध स्वरुपाची मात नव्हे ॥८॥मात नव्हे श्रुत अनुभवेविण । रामदास खूण सांगतसे ॥९॥७७२.तुम्ही आम्ही करुं देवाचा निश्चयो । जया नाही लय तोचि देव ॥१॥देव हा अमर नित्य निरंतर । व्यापुनी अंतर देव आहे ॥२॥देव आहे सदा सबाह्य अंतरी । जीवा क्षणभरि विसंबेना ॥३॥विसंबेना परी देवासी नेणवे । म्हणोनियां धांवे नाना मती ॥४॥नाना मती देव पाहतां दिसेना । जंव ते वसेना ज्ञान देही ॥५॥ज्ञान देही वसे तया देव दिसे । अंतरी प्रकाशे ज्ञानदृष्टि ॥६॥ज्ञानदृष्टि होतां पाविजे अनंता । हा शब्द तत्वतां दास म्हणे ॥७॥७७३.विश्रांतीचे स्थळ स्वरुप केवळ । द्वैत तळमळ जेथे नाही ॥१॥जेथे नाही काया नाही मोह माया । रंका आणि राया सारिखेंचि ॥२॥सारिखेंचि सदा सर्वदा स्वरुप । तेंचि तुझे रुप जाण बापा ॥३॥जाण बापा स्वये तूंचि आपणासी । सोहं स्मरणासी विसरतां ॥४॥विसरतां सोहं स्मरण आपुले । मग गुंडाळले मायाजाळी ॥५॥मायाजाळी तुझा तूंचि गुंतलासी । यातना भोगिसी नेणोनियां ॥६॥म्हणोनियां होई सावध अंतरी । सोहं दृढ धरी दास म्हणे ॥७॥७७४.जीव एकदेशी शीव एकदेशी । याचेनि सायासी कांही नव्हे ॥१॥हित करवेना आपुले आपण । त्यासी कर्तेपण घडे केवी ॥२॥देह त्याचा त्याला न जाय राखीला । निमित्ते भक्षीला अकस्मात ॥३॥काळ अवर्षण पडतां कठीण । तेव्हां पंचप्राण सोडूं पाहे ॥४॥जीवा जीवपण देता नारायण । तयाविणे कोण करुं शके ॥५॥राया करी रंक रंका करी राव । तेथे धरी भाव आलया रे ॥६॥आलया रे जना भावेसी कारण । येर निष्कारण सर्व कांही ॥७॥सर्वही हे देहे देवाचिपासोनी । तयाचे भजनी रामदास ॥८॥७७५.मन हे विवेके विशाळ करावे । मग आठवावे परब्रह्म ॥१॥परब्रह्म मनी तरीच निवळे । जरी बोधे गळे अहंकार ॥२॥अहंकार गळे संताचे संगती । मग आदि अंती समाधान ॥३॥समाधान घडे स्वरुपी राहतां । विवेक पाहतां निःसंगाचा ॥४॥निःसंगाचा संग सदृढ धरावा । संसार तरावा दास म्हणे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 29, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP