TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धाचे अधिकारी

तृतीयपरिच्छेद - श्राद्धाचे अधिकारी

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


श्राद्धाचे अधिकारी

आतां श्राद्धाचे अधिकारी ( कर्ते ) सांगतो -

अथश्राद्धाधिकारिणः चंद्रिकायांसुमंतुः मातुः पितुः प्रकुर्वीतसंस्थितस्यौरसः सुतः पैतृमेधिक संस्कारंमंत्रपूर्वकमादृतः तत्रैवहेमाद्रौशंखः पितुः पुत्रेणकर्तव्यापिंडदानोदकक्रिया पुत्राभावेतुपत्नीस्यात्तदभावेतुसोदरः अत्रयद्यपिपुत्रपदंक्षेत्रजादिद्वादशविधपुत्रपरम् ‍ तेचद्वादशपुत्रायाज्ञवल्क्येनोक्ताः औरसोधर्मपत्नीजस्तत्समः पुत्रिकासुतः क्षेत्रजः क्षेत्रजातस्तुसगोत्रेणेतरेणवा गृहेप्रच्छन्नउत्पन्नोगूढजस्तुसुतः स्मृतः कानीनः कन्यकाजातोमातामहसुतः स्मृतः अक्षतायांक्षतायांवाजातः पौनर्भवस्तथा दद्यान्मातापितावायंसपुत्रोदत्तकोभवेत् ‍ क्रीतश्चताभ्यांविक्रीतः कृत्रिमः स्यात्स्वयंकृतः दत्तात्मातुस्वयंदत्तोगर्भेविन्नः सहोढजः उत्सृष्टोगृह्यतेयस्तुसोपविद्धोभवेत्सुतः पिंडदोंशहरश्चैषांपूर्वाभावेपरः परइति तथापि दत्तौरसेतरेषांतुपुत्रत्वेनपरिग्रहइति हेमाद्रावादित्यपुराणेकलावितरेषांपुत्रत्वनिषेधादौरसदत्तकपरमेव यद्यपि पिंडदोंशहरश्चैषांपूर्वाभावेपरः परइति याज्ञवल्क्योक्तेरौरसाभावेदत्तकप्राप्तिस्तथाप्यौरसाभावेपौत्रः तदभावेप्रपौत्रस्तदभावेदत्तकादयइतिज्ञेयं पुत्रेणलोकान् ‍ जयतिपौत्रेणानंत्यमश्नुते अथपुत्रस्यपौत्रेणब्रध्नस्याप्नोतिविष्टपमितिजीमूतवाहनधृतवसिष्ठहारीतशंखलिखितोक्तेः लोकानंत्यंदिवः प्राप्तिंपुत्रपौत्रप्रपौत्रकैरितियाज्ञवल्क्योक्तेश्च पुत्रः पौत्रश्चतत्पुत्रः पुत्रिकापुत्रएवच पत्नीभ्राताचतज्जश्चपितामातास्नुषातथा भगिनीभागिनेयश्चसपिंडः सोदकस्तथा असन्निधानेपूर्वेषामुत्तरेपिंडदाः स्मृता इतिस्मृतिसंग्रहे प्रपौत्रानंतरंपुत्रिकापुत्रोक्तेस्तत्समत्वाच्च दत्तकस्य यद्यपिबृहस्पतिना पौत्रश्चपुत्रिकापुत्रः स्वर्गप्राप्तिकरावुभौ रिक्थेचपिंडदानेचसमौतौपरिकीर्तितावितिपौत्रसाम्यमुक्तं याज्ञवल्क्येनच औरसोधर्मपत्नीजस्तत्समः पुत्रिकासुतइतिऔरससाम्यम् ‍ तथापि लोकेराजसमोमंत्रीत्यादौकिंचिन्न्यूनेसमशब्दप्रयोगात् ‍ गौणमुख्ययोः साम्यायोगाच्चस्तुत्यर्थंतत् ‍ नतुसमविकल्प इतिभ्रमितव्यं पुत्रः पौत्रः प्रपौत्रोवाभ्रातावाभ्रातृसंततिः सपिंडसंततिर्वापिक्रियार्हानृपजायते तेषामभावेसर्वेषांसमानोदकसंततिः मातृपक्षसपिंडेनसंबंधोयोजलेनवा कुलद्वयेपिचोच्छिन्नेस्त्रीभिः कार्याक्रियानृप तत्संघातगतैर्वापितद्रिक्थात्कारयेन्नृपइतिविष्णुपुराणाच्चेतिप्रपौत्रानंतरंदत्तकादयइति पृथ्वीचंद्रमदनरत्नकालादर्शादयः मदनपारिजातेप्येवम् ‍ ॥

चंद्रिकेंत सुमंतु - " माता , पिता मृत झाले असतां त्यांचा प्रेतसंस्कार औरसपुत्रानें आदरपूर्वक समंत्रक करावा . " त्याचठिकाणीं हेमाद्रींत शंख - " पित्याची पिंडदान - उदकदानादिक सर्वक्रिया पुत्रानें करावी . पुत्र नसेल तर पत्नीनें करावी . पत्नी नसेल तर सहोदर ( सख्या ) भ्रात्यानें करावी . " या वचनांत पुत्रपद बाराप्रकारच्या पुत्रांचें बोधक आहे , व ते बाराप्रकारचे पुत्र याज्ञवल्क्यानें सांगितले आहेत , ते असे - " धर्मपत्नीचे ठिकाणीं उत्पन्न झालेला तो औरस पुत्र . त्याच्या सारखा पुत्रिकापुत्र होय . आपल्या क्षेत्रांत ( स्त्रियेचेठिकाणीं ) सगोत्रापासून अथवा इतरापासून झालेला तो क्षेत्रज होय . घरामध्यें गुप्तपणानें ( कोणास नकळतां ) झालेला तो गूढज पुत्र होय . कन्येला ( विवाहाच्यापूर्वीं ) झालेला तो मातामहपुत्र ( कन्येच्या बापाचा पुत्र ) म्हटला आहे . कन्या , पतीनें भुक्त असो अथवा अभुक्त असो तिला बापाच्या घरीं परपुरुषापासून झालेला पुत्र पौनर्भव होय . हाही कन्येच्या बापाचा पुत्र . आईबापांनीं जो दिला तो दत्तक पुत्र होय . आईबापांनीं जो विकत दिला तो घेणाराचा क्रीत पुत्र होय . आपण पुत्रत्वेंकरुन केलेला तो कृत्रिम पुत्र . आपण आपलें दान केलेला तो दत्त पुत्र . गर्भिणी कन्येचा विवाह झाला असतां विवाहानंतर झालेला पुत्र तो सहोढज होय . टाकून दिलेला घेतला असतां तो अपविद्ध पुत्र होतो . ह्या बारा प्रकारच्या पुत्रांमध्यें पहिला पहिला नसेल तर पुढच्या पुढच्यानें पित्याची पिंडदानादिक क्रिया करावी आणि त्याची जिंदगी घ्यावी . " असें जरी आहे तथापि दत्तकऔरस यावांचून इतरांचा पुत्रत्वेंकरुन परिग्रह ( ग्रहण ) होत नाहीं , असें हेमाद्रींत आदित्यपुराणांत कलियुगांत इतरांला पुत्रत्वाचा निषेध आहे म्हणून ‘‘ पितुः पुत्रेण कर्तव्या० " ह्या वचनांतील पुत्रपद औरस व दत्तक यांचेंच बोधक आहे . आतां जरी पिंडदेणारा व जिनगीचा वारस पहिला पहिला नसेल तर पुढचा आहे , या अर्थाच्या " पिंडदोंशहरश्चैव पूर्वाभावे परः परः " या याज्ञवल्याच्या वचनानें औरस पुत्राच्या अभावीं दत्तक प्राप्त होतो ; तथापि औरसाच्या अभावीं पौत्र व पौत्राच्या अभावीं प्रपौत्र आणि त्या प्रपौत्राच्या अभावीं दत्तकादिक अधिकारी जाणावे . कारण , " पुत्राच्या योगानें स्वर्गादि लोक स्वाधीन करितो , पौत्राच्या योगानें आनंत्य ( अनंतलोक ) पावतो , आणि प्रपौत्राच्या योगानें ब्रह्मलोक प्राप्त होतो . " अशाप्रकारचीं जीमूतवाहनानें ग्रहण केलेलीं वसिष्ठ , हारीत , शंख लिखित यांचीं वचनें आहेत . आणि " पुत्र , पौत्र , प्रपौत्र यांच्यायोगानें अनंतलोक व स्वर्ग यांची प्राप्ति होते " असें याज्ञवल्क्यानेंही सांगितलें आहे . पुत्र , पौत्र , त्याचा पुत्र , पुत्रिकापुत्र , पत्नी , भ्राता , भ्रातृपुत्र , पिता , माता , स्नुषा ( सून ), भगिनी , भागिनेय ( भगिनीपुत्र ), सपिंड , आणि सोदक यांमध्यें पूर्वीच्या अभावीं पुढचे पिंड देणारे ( और्ध्वदेहिक कर्माचे अधिकारी ) होतात . " ह्या स्मृतिसंग्रहांत प्रपौत्रानंतर पुत्रिकापुत्र सांगितला आहे . आणि दत्तक हा त्याच्या सारखा ( पुत्रिकापुत्रासारखा ) आहे व कलियुगांत इतर पुत्रांचा निषेध आहे , म्हणून प्रपौत्रानंतर दत्तक समजावा . आतां यद्यपि बृहस्पतीनें - " पौत्र व पुत्रिकापुत्र हे दोघे स्वर्गप्राप्ति करुन देणारे आहेत , जिंदगी घेण्याविषयीं व पिंडदानाविषयीं ते दोघे सारखे आहेत " या वचनांत पुत्रिकापुत्राला पौत्रसाम्य सांगितलें , आणि याज्ञवल्क्यानें , धर्मपत्नीला झालेला तो औरस व त्याच्या सारखा पुत्रिकापुत्र , या वचनांत औरससाम्य सांगितलें , तथापि लोकांत प्रधान राजासारखा आहे इत्यादि वाक्यांत किंचिन्न्यूनावर समशब्दाचा प्रयोग करितात . आणि गौण व मुख्य ह्यांचें वास्तविक साम्य येत नाहीं , म्हणून पुत्रिकापुत्रावर वरील वचनांनीं जें औरससाम्य किंवा पौत्रसाम्य सांगितलें तें त्याच्या स्तुतीकरितां समजावें . दोघे ( पुत्रिकापुत्र आणि औरसपौत्र ) सम असल्यामुळें विकल्प ( ज्याच्याशीं साम्य सांगितलें त्याच्याशीं पुत्रिकापुत्राला अधिकाराचा वगैरे विकल्प म्हणजे एकवेळा तो व एकवेळा पुत्रिकापुत्र ) असा भ्रम करुं नये . आणि " पुत्र , पौत्र , प्रपौत्र , भ्राता , भ्रातृपुत्र , सपिंडाची संतति , हे क्रियेला योग्य आहेत . त्या सर्वांच्या अभावीं समानोदकाची संतति अधिकारी , अथवा मातृपक्षांतील सपिंड किंवा ज्याचा उदकसंबंध असेल तो अधिकारी . दोन्ही ( पितृ - मातृ ) कुलांचा उच्छेद झाला असतां ( पुरुष नसतां ) स्त्रियांनीं क्रिया करावी . अथवा त्याच्या संघांतील पुरुषांकडून मृताच्या द्रव्यानें राजानें क्रिया करवावी . " असें विष्णुपुराणवचन आहे म्हणून प्रपौत्रानंतर दत्तकादिक अधिकारी होतात , असें पृथ्वीचंद्र , मदनरत्न , कालादर्श , इत्यादिक ग्रंथकार सांगतात . मदनपारिजातांतही , असेंच सांगितलें आहे .

बोपदेवरुद्रधरादयस्तु पुत्रेषुविद्यमानेषुनान्यंवैकारयेत्स्वधामिति सुमंतूक्तौ पितामहः पितुः पश्चात्पंचत्वंयदिगच्छति पौत्रेणैकादशाहादिकर्तव्यंश्राद्धषोडशं नैतत्पौत्रेणकर्तव्यंपुत्रवांश्चेत्पितामहइति छंदोगपरिशिष्टेच पुत्रशब्दस्यद्वादशविधसुतपरत्वात्पूर्वाभावेपरः परइत्यस्यानन्यपरत्वाच्च दत्तकाद्यभावे पौत्रादीनामप्यधिकारइत्याहुः तद्गौणमुख्ययोः साम्यायोगाद्दत्तकेसतिपौत्रस्यांशहरत्वस्याप्यभावापत्तेः पुत्रपदस्यौरसमात्रपरत्वाच्चिंत्यम् ‍ अतएवनिषेधादुपनीतपौत्रसत्त्वेप्यनुपनीतपुत्रस्यैवाधिकारः औरसश्चानुपनीतोपि कुर्यादित्याह पृथ्वीचंद्रोदयेसुमंतुः श्राद्धंकुर्यादवश्यंतुप्रमीतपितृकोद्विजः व्रतस्थोवाव्रतस्थोवाएकएवभवेद्यदि वृद्धमनुः कुर्यादनुपनीतोपिश्राद्धमेकोहियः सुतः पितृयज्ञाहुतिंपाणौजुहुयाद्ब्राह्मणस्यसः एकोमुख्य औरसइत्यर्थः मनुः नह्यस्मिन् ‍ युज्यतेकर्मकिंचिदामौंजिबंधनात् ‍ नाभिव्याहारयेद्ब्रह्मस्वधानिनयनादृते ब्रह्म वेदः सुमंतुरपि नाभिव्याहारयेद्ब्रह्मयावन्मौंजीनबध्यते मंत्राननुपनीतोपिपठेदेवैकऔरसः अयंमंत्रपाठः त्रिवर्षकृतचूडस्यैव अनुपनीतोपिकुर्वीतमंत्रवत् ‍ पैतृमेधिकम् ‍ यद्यसौकृतचूडः स्याद्यदिस्याच्चत्रिवत्सरइति सुमंतूक्तेः यत्तुव्याघ्रः कृतचूडस्तुकुर्वीतउदकंपिंडमेवच स्वधाकारंप्रयुंजीतवेदोच्चारंनकारयेदिति यच्च स्मृतिसंग्रहे कृतचूडोनुपेतश्चपित्रोः श्राद्धंसमाचरेत् ‍ उदाहरेत्स्वधाकारंनतुवेदाक्षराण्यसाविति तत् ‍ प्रथमवर्षचूडाविषयमितिमाधवमदनरत्नपृथ्वीचंद्राः त्रिवर्षोर्ध्वंमंत्रवत्त्वस्यविकल्प इतिचंद्रिकाबोपदेवश्च दत्तकादिपरोनिषेधइतिवयम् ‍ ॥

बोपदेव , रुद्रधर इत्यादिक तर " पुत्र विद्यमान असतां दुसर्‍याकडून स्वधाकार ( और्ध्वदेहिक ) करवूं नये . " ह्या सुमंतुवाक्यांत ; आणि " पित्याच्या मागांहून पितामह मृत झाला असेल तर त्याची एकादशाहादिक सर्व क्रिया व षोडश श्राद्धें पौत्रानें करावीं . परंतु पितामहाला जर पुत्र असेल तर ती और्ध्वदेहिक क्रिया पौत्रानें करुं नये . " ह्या छंदोगपरिशिष्टांतही पुत्रपद द्वादश प्रकारच्या पुत्रांचें बोधक असल्यामुळें आणि पूर्वीचा नसेल तर पुढचा पुढचा अधिकारी अशा अर्थाचें याज्ञवल्क्याचेंही वचन अनन्यपर ( दत्तकाचेंच बोधक ) असल्यामुळें दत्तकादिकांचा अभाव असेल तर पौत्रादिकांचा अधिकार , असें सांगतात . तें त्याचें सांगणें गौण ( दत्तकादिक ) व मुख्य ( औरसपुत्र , पौत्र वगैरे ) यांचें साम्य होत नसल्यामुळें ; आणि दत्तक असतां पौत्राला जिंदगीचा वारसाही मिळणार नाहीं , अशी आपत्ति प्राप्त झाल्यामुळें ; आणि ‘ पुत्रेषु विद्यमानेषु० ’ ह्या वचनांतील पुत्रपद औरसाचेंच केवळ बोधक असल्यामुळें ; ( बोपदेवादिकांचें मत ) चिंत्य आहे . या वरील वाक्यांनीं पुत्र असतां इतरांचा निषेध केला म्हणूनच उपनीत ( मुंज केलेला ) पौत्र असतांही अनुपनीत ( मुंज न केलेला ) पुत्र असला तरी पुत्रालाच अधिकार आहे . औरसपुत्र अनुपनीत असला तरी त्यानें श्राद्ध करावें , अशाविषयीं सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत सुमंतु - " बाप मेला आहे व त्याचा पुत्र जर मुख्य औरसच आहे , मग तो व्रतस्थ ( ब्रह्मचारी ) असो किंवा व्रतस्थ नसो , त्यानें अवश्य श्राद्ध करावें . " वृद्धमनु - " जो मुख्य ( औरस ) पुत्र आहे तो अनुपनीत असला तरी त्यानें श्राद्ध करावें . त्या औरस पुत्रानें ब्राह्मणाच्या हातावर पितृयज्ञाच्या ( अग्नौकरण्याच्या ) आहुतींचा होम करावा . " या वरील दोन वचनांत ‘ एक ’ पद आहे त्याचा अर्थ , मुख्य म्हणजे औरस हा आहे . मनु - " मौंजीबंधन होईपर्यंत ह्या मुलाला कोणतेंही कर्म उक्त नाहीं . स्वधानिनयनावांचून ( श्राद्धावांचून ) यानें वेदाचा उच्चार करुं नये . " सुमंतुही सांगतो - " जोंपर्यंत मुंज बांधली नाहीं , तोंपर्यंत वेदाचा उच्चार करुं नये . परंतु एक औरस पुत्र अनुपनीत असला तरी त्यानें बापाच्या श्राद्धांत मंत्र म्हणावे . " हा जो मंत्रांचा अधिकार सांगितला तो तीन वर्षांचा असून चौलसंस्कार झालेल्यासच आहे . कारण , " अनुपनीत असतांही जर चूडासंस्कार झालेला आहे व तीन वर्षांच्या वयाचा आहे तर त्यानें बापाचें और्ध्वदेहिक कर्म समंत्रक करावें . " असें सुमंतूनें सांगितलें आहे . आतां जें व्याघ्र म्हणतो कीं , " चौलसंस्कार झालेल्या मुलानें उदकदान व पिंडदान करावें , स्वधाशब्दाचा उच्चार करावा , वेदोच्चार करुं नये . " आणि जें स्मृतिसंग्रहांत सांगितलें आहे कीं , " चौल केलेला व अनुपनीत अशा पुत्रानें आईबापांचें श्राद्ध करावें , स्वधा शब्दाचा उच्चार करावा , पण वेदाक्षरांचा उच्चार करुं नये . " असा जो दोन वचनांनीं वेदोच्चाराचा निषेध सांगितला तो निषेध पहिल्यावर्षीं चूडासंस्कार झालेल्या पुत्राविषयीं आहे , असें माधव , मदनरत्न आणि पृथ्वीचंद्र हे सांगतात . तीन वर्षांनंतर मंत्रोच्चाराचा विकल्प ( म्हणजे केला तर ठीकच आहे , न केला तरी दोष नाहीं ), असें चंद्रिका आणि बोपदेव सांगतात . वरील वचनांनीं वेदोच्चाराचा जो निषेध केला तो दत्तकादिकांना आहे , असें आम्हीं सांगतों .

मदनरत्नेस्कांदे यज्ञेषुमंत्रवत् ‍ कर्मपत्नीकुर्याद्यथानृप तथौर्ध्वदेहिकंकर्मकुर्यात्साधर्मसंस्कृता अशक्तौतु कात्यायनः असंस्कृतेतुपत्न्याचह्यग्निदानंसमंत्रकम् ‍ कर्तव्यमितरत्सर्वंकारयेदन्यमेवहि पुत्रश्चनजन्मतोधिकारी किंतु वर्षोत्तरमित्याहकालादर्शः चौलादाद्याब्दिकादर्वाक् ‍ नकुर्यात्पैतृमेधिकम् ‍ मदनरत्नेसुमंतुरपि पुत्रश्चोत्पत्तिमात्रेणसंस्कुर्यादृणमोचनात् ‍ पितरंनाब्दिकाच्चौलात्पैतृमेधेनकर्मणा एतच्चौरसस्यैव दत्तकादीनांतूपनीतानामेवाधिकारइतिकालादर्शः पृथ्वीचंद्रोदयेपिस्कांदे पित्रोरनुपनीतोपिविदध्यादौरसः सुतः और्ध्वदेहिकमन्येतुसंस्कृताः श्राद्धकारिणइति अन्यत्रापिदर्शमहालयादावनुपनीतस्याधिकारोस्माभिः पूर्वमुक्तः प्रपौत्राभावेदत्तकादयएकादशपुत्राः तदभावेभर्तुः पत्नीतस्याश्चसः अपुत्राशयनंभर्तुः पालयंतीव्रतेस्थिता पत्न्येवदद्यात्तत्पिंडंकृत्स्नमंशंलभेतचेति वृद्धमनूक्तेः भार्यापिंडंपतिर्दद्याद्भर्त्रेभार्यातथैवच श्वश्वादेश्चस्नुषाचैवतदभावेसपिंडकाइति पुत्राभावेतुपत्नीस्यात्पत्न्यभावेतुसोदरइतिचहेमाद्रौशंखोक्तेः पृथ्वीचंद्रोदयस्तु कानीनगूढसहजपुनर्भूतनयाश्चये पत्न्यभावेधिकुर्युस्तेअप्रशस्ताः स्मृताहितेइतिस्मृतिसंग्रहात् ‍ पत्न्यभावेकानीनादयइत्याह ॥

मदनरत्नांत स्कांदांत - " धर्मानें विवाहित पत्नी यज्ञामध्यें जसें समंत्रक कर्म करिते , तसेंच तिनें पतीचें और्ध्वदेहिक कर्म समंत्रक करावें . " और्ध्वदेहिकाविषयीं शक्ति नसेल तर सांगतो कात्यायन - " पुत्र असंस्कृत आहे तर पत्नीनें पतीला समंत्रक अग्नि द्यावा , व इतर सारें कर्म दुसर्‍याकडून करवावें . " पुत्र हा जन्मतः अधिकारी नाहीं , तर एक वर्षानंतर अधिकारी , असें कालादर्श सांगतो - " चौल होण्याच्या पूर्वीं व एक वर्ष होण्याच्या पूर्वीं त्यानें पित्याचें और्ध्वदेहिक कर्म करुं नये . " मदनरत्नांत सुमंतुही सांगतो - " पुत्र उत्पन्न झाल्याबरोबर त्यानें बापाला पितृऋणापासून मुक्त केल्यामुळें त्याच्यावर तो एकतर्‍हेचा संस्कार करील , पण एक वर्ष होण्याच्या पूर्वीं व चौलसंस्कार होण्याच्या पूर्वीं और्ध्वदेहिक कर्मानें बापाला संस्कार करणार नाहीं . " ही गोष्ट औरस पुत्रालाच लागू आहे . दत्तकादिकांला तर उपनयन झाल्यावरच अधिकार असें कालादर्श सांगतो . पृथ्वीचंद्रोदयांतही स्कांदांत - " औरसपुत्र अनुपनीत असतांही त्यानें आईबापांचें और्ध्वंदेहिक कर्म करावें , अन्य जे कोणी असतील ते उपनयन संस्कार झाल्यावरच श्राद्धाधिकारी होतात . " दुसर्‍याठिकाणीं देखील दर्श , महालय इत्यादिकांविषयीं अनुपनीताला अधिकार आम्हीं पूर्वीं सांगितला आहे . प्रपौत्राच्या अभावीं दत्तकादिक अकरा प्रकारचे पुत्र अधिकारी होतात . त्यांच्या अभावीं भर्त्याच्या श्राद्धादिकांची अधिकारिणी पत्नी व पत्नीचा श्राद्धाधिकारी पति आहे . कारण , " भर्त्याचें शयन पालन करणारी म्हणजे परपुरुष मनांत न आणणारी व ब्रह्मचर्यव्रतीं राहणारी अशी जी अपुत्र स्त्री तिनेंच पतीला पिंड द्यावा आणि त्याची सारी इस्टेट घ्यावी . " असें वृद्धमनूनें सांगितलें आहे . " भार्येला पिंड पतीनें द्यावा , तसाच भर्त्याला पिंड भार्येनें द्यावा , सासूइत्यादिकांना पिंड सुनेनें द्यावा , त्यांच्या अभावीं सपिंडांनीं द्यावा . पुत्रांच्या अभावीं पत्नी व पत्नीच्या अभावीं सोदर अधिकारी . " असेंही हेमाद्रींत शंखानें सांगितलें आहे . पृथ्वीचंद्रोदय तर - " कानीन , गूढ , सहोढ , आणि पौनर्भव हे जे पुत्र सांगितले ते पत्नीच्या अभावीं अधिकारी आहेत . कारण , ते अप्रशस्त पुत्र म्हटले आहेत . " असें स्मृतिसंग्रहांत सांगितलें आहे , म्हणून पत्नीच्या अभावीं कानीनादिक पुत्र अधिकारी , असें सांगतो .

पत्युरपिसपत्नीपुत्रेसतिनाधिकारः पितृपत्न्यः सर्वामातरः इतिसुमंतूक्तेः विदध्यादौरसः पुत्रोजनन्या और्ध्वदेहिकं तदभावेसपत्नीजः क्षेत्रजाद्यास्तथास्मृताः तेषामभावेतुपतिस्तदभावेसपिंडकाइतिमदनरत्नेकात्यायनोक्तेश्च बह्वीनामेकपत्नीनामेषएवविधिः स्मृतः एकाचेत् ‍ पुत्रिणीतासांसर्वासांपिंडदस्तुसइति बृहस्पतिवचनाच्च अपरार्केप्येवम् ‍ तेनयच्छुद्धिविवेकेउक्तंसत्यपिसपत्नीपुत्रेपत्युरेवाधिकारइति तन्निरस्तम् ‍ यच्चतत्रैवकात्यायनः नभार्यायाः पतिर्दद्यादपुत्रायाअपिक्कचित् ‍ यच्चविष्णुपुराणं कुलद्वयेपिचोत्सन्नेस्त्रीभिः कार्याक्रियानृपेति यच्चमार्कंडेयपुराणम् ‍ सर्वाभावेस्त्रियः कुर्युः स्वभर्तृणाममंत्रकमिति तदासुरादिविवाहोढाविषयम् ‍ धर्मैर्विवाहैरुढायासापत्नीपरिकीर्तिता क्रयक्रीतातुयानारीनसापत्न्यभिधीयते नसादैवेनवापित्र्येदासींतांमुनयोविदुरिति माधवीयेशातातपोक्तेः यत्तुशुद्धिरत्नाकरः शूलपाणिश्च अपुत्रस्यचयापुत्रीसापिपिंडप्रदाभवेत् ‍ तस्यपिडान् ‍ दशैकंवाएकाहेनैवनिक्षिपेदितिजाबालोक्तेः भर्तुर्धनहरापत्नीतांविनादुहितास्मृता अंगादंगात्संभवतिपुत्रवद्दुहितानृणामितिबृहस्पतिनादुहितुर्धनहारित्वोक्तेश्चपुत्राभावेकन्यातदभावेसपत्नीपुत्रइत्याहतुः तत्पूर्वविरोधात् ‍ मातुर्दुहितरः शेषमृणात्ताभ्यऋतेन्वयइतिदुहितुर्मातृधनग्राहित्वेनपुत्रस्यतच्छ्राद्धानधिकारापत्तेश्चोपेक्ष्यम् ‍ वचनंतुभ्रातृपुत्राद्यभावविषयम् ‍ पत्न्यभावेअविभक्तस्यसोदरः पूर्वोक्तशंखवचनात् ‍ विभक्तस्यतुदुहिता धनहारित्वात् ‍ पूर्वोक्तजाबालवचनाच्च तत्राप्यूढानूढसमवायेऊढैव दुहितापुत्रवत्कुर्यान्मातापित्रोस्तुसंस्कृता आशौचमुदकंपिंडमेकोद्दिष्टंसदातयोरितिभरद्वाजोक्तेः तदभावेदौहित्रः धनहारित्वात् ‍ मातापित्रोरुपाध्यायाचार्ययोरौर्ध्वदेहिकं कुर्वन्मातामहस्यापिव्रतीनभ्रश्यतेव्रतादितिचंद्रिकायांवृद्धमनूक्तेः यथाव्रतस्थोपिसुतः पितुः कुर्यात् ‍ क्रियांनृप उदकाद्यांमहाबाहोदौहित्रोपि तथार्हतीत्यपरार्केभविष्योक्तेश्च एतद्धनहारिणआवश्यकंनान्यस्येत्याहतत्रैवस्कंदः श्राद्धंमातामहानांतुअवश्यंधनहारिणा दौहित्रेणार्थनिष्कृत्यैकर्तव्यंपूर्वमुत्तरमिति तेनदौहित्रोऽत्रपुत्रीकृतइतिदेवयाज्ञिकोक्तिः परास्ता अत्रपत्नीदौहित्रसमवायेंशहरत्वात् ‍ पत्न्येवकुर्यात् ‍ ॥

पत्नीच्या श्राद्धाविषयीं सापत्न पुत्र असेल तर पतीला देखील अधिकार नाहीं . कारण , " पित्याच्या सार्‍या स्त्रिया पुत्राच्या माता आहेत . " असें सुमंतूनें सांगितलें आहे . आणि " मातेचें और्ध्वदेहिक कर्म औरसपुत्रानें करावें , त्याच्या अभावीं सापत्न पुत्रानें करावें , त्याच्या अभावीं क्षेत्रजादिक पुत्रांनीं करावें , त्यांच्या अभावीं पतीनें व त्याच्या अभावीं सपिंडांतील पुरुषांनीं करावें " असें मदनरत्नांत कात्यायनानेंही सांगितलें आहे . आणि " एकाच्या अनेक स्त्रिया असतील त्याठिकाणीं हाच विधि आहे . त्यांतून एकीला जर पुत्र असेल तर त्या सर्वांना पिंड देणारा तोच आहे . " असें बृहस्पतिचेंही वचन आहे . अपरार्कांतही असेंच आहे . ह्या सर्व प्रमाणांवरुन ‘ जें शुद्धिविवेकांत सांगितलें कीं , सापत्न पुत्र असला तरी पतीलाच अधिकार आहे ’ त्याचा निरास झाला . आतां जें त्याचठिकाणीं कात्यायन सांगतो किं , " अपुत्र जरी भार्या असेल तरीं तिला पतीनें कधींही पिंड देऊं नये . " आणि जें विष्णुपुराण - " दोन्हीं कुलांचा उच्छेद झाला असतां स्त्रियांनीं क्रिया करावी , अर्थात् ‍ पूर्वीं करुं नये . " आणि जें मार्केडेयपुराण - " सर्वांचा अभाव असेल तर स्त्रियांनीं आपआपल्या पतींच्या क्रिया अमंत्रक कराव्या . " तीं सारीं वचनें आसुरादि विवाहानें विवाहित ज्या स्त्रिया तद्विषयक आहेत . कारण , " धर्मविवाहांनीं विवाहित जी ती पत्नी म्हटली आहे . द्रव्य देऊन विकत घेतलेली जी स्त्री ती पत्नी होत नाहीं , म्हणून ती दैवकर्माविषयीं अथवा पित्र्यकर्माविषयीं अधिकारी होत नाहीं , मुनि तिला दासी असें म्हणतात . " अशी माधवीयांत शातातपाची उक्ति आहे . आतां जें शुद्धिरत्नाकर शूलपाणि - " निपुत्रकाची जी कन्या ती देखील पिंड देणारी आहे ; तिनें त्याचे दहा व एक पिंड एकाच दिवशीं द्यावे अशी जाबालाची उक्ति आहे . आणि " भर्त्याचें धन घेणारी पत्नी आहे , तिच्या अभावीं कन्या वारस . कारण पुत्राप्रमाणें कन्या पुरुषाच्या अंगापासूनच उत्पन्न होते . " याप्रमाणें बृहस्पतीनें कन्येला धनहारित्व ( वारसा ) सांगितलें आहे , म्हणून पुत्राच्या अभावीं कन्या अधिकारी , तिच्या अभावीं सापत्न पुत्र , असें ते दोघे ( शुद्धिरत्नाकर व शूलपाणि ) सांगते झाले . त्याला पूर्वीचा ( ‘ तदभावे सपत्नीजः० ’ ह्या कात्यायनोक्तीचा व एका चेत्पुत्रिणी तासां० ’ ह्या बृहस्पतिवचनाचा वगैरे ) विरोध येतो म्हणून आणि " मातेचें ऋण देऊन शेष उरलेलें द्रव्य कन्यांनीं घ्यावें , त्या नसतील तर इतरांनीं घ्यावें . " या वचनानें कन्येला मातृधनहारित्व सांगितल्यानें पुत्राला मातृश्राद्धाचा अनधिकार येऊं लागेल ! याकरितां त्यांचें ( शुद्धिरत्नाकरादिकांचें ) तें म्हणणें उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे . आतां ‘ अपुत्रस्य च या पुत्री० ’ हें वचन तर भ्रातृपुत्रादिकांच्या अभावविषयक आहे , असें समजावें . पत्नीच्या अभावीं अविभक्त असेल तर सोदर भ्राता अधिकारी . कारण , ‘ पुत्राभावेतु पत्नी स्यात् ‍ पत्न्यभावेतु सोदरः ’ असें शंखवचन पूर्वीं सांगितलें आहे . विभक्त असेल तर कन्या अधिकारी . कारण , ती धनहारिणी आहे , व पूर्वीं " अपुत्रस्यच० " असें जाबालवचन सांगितलें आहे . त्यांत विवाहित व अविवाहित अशा असल्या तर विवाहितच अधिकारी . कारण , " संस्कृत ( विवाहित ) कन्येनें आईबापांचें आशौच , उदकदान व पिंडदान हें सर्व पुत्राप्रमाणें करावें ; पण कन्येनें आईबापांचें श्राद्ध करणें तें सदा एकोद्दिष्ट करावें . " असें भरद्वाजानें सांगितलें आहे . कन्येच्या अभावीं दौहित्र अधिकारी - कारण , तो जिंदगीचा वारस आहे . आणि " ब्रह्मचार्‍यानें आई , बाप , उपाध्याय , आचार्य , आणि मातामह यांचें और्ध्वदेहिक कर्म केलें तरी तो आपल्या व्रतापासून भ्रष्ट होत नाहीं . " अशी चंद्रिकेंत वृद्धमनूची उक्ति आहे . आणि पुत्र व्रतस्थ ( ब्रह्मचारी ) असला तरी त्यानें जशी बापाची क्रिया करावी असें आहे , तशीच दौहित्रानेंही मातामहाची उदकदानादिक सर्व क्रिया करावी " असें अपरार्कांत भविष्यपुराणवचनही आहे . हें मातामहाचें और्ध्वदेहिक कर्म इस्टेट घेणारा असेल त्याला आवश्यक आहे , इतराला आवश्यक नाहीं , असें त्याच ठिकाणीं सांगतो स्कंद - " मातामहाची जिंदगी घेणारा जो दौहित्र त्यानें द्रव्याची निष्कृती ( फेड ) होण्यासाठीं मातामहांचें पूर्व उत्तर ( दहा दिवसांचे आंतलें व बाहेरचें ) श्राद्ध अवश्य करावें . " ह्या वचनावरुन , ‘ श्राद्धाविषयीं पुत्रीकृत दौहित्र अधिकारी ’ असें देवयाज्ञिकानें सांगितलेलें तें परास्त ( खंडित ) झालें . आतां पत्नी व दौहित्र दोन्ही असतील तर धन घेणारी पत्नी असल्यामुळें तिनेंच पतीची क्रिया करावी .

दौहित्रभ्रातृपुत्रसत्त्वेविभक्तस्यदौहित्रः अविभागेभ्रातृपुत्रः भ्रातृतत्पुत्रसत्त्वेकनिष्ठश्चेत् ‍ भ्रातैव ज्येष्ठश्चेत्तत्पुत्रः कुर्यादितिदाक्षिणात्यग्रंथाः हारलतादौतु भ्रातुर्भ्रातास्वयंचक्रेतद्भार्याचेन्नविद्यते तस्यभ्रातृसुतश्चक्रेयस्यनास्तिसहोदरइति ब्राह्मोक्तेः पत्नीकुर्यात्सुताभावेपत्न्यभावेसहोदरइतिकौर्माच्च ज्येष्ठभ्रातैवकुर्यान्नतत्पुत्रः यत्तुनानुजस्यतथाग्रजइतितत् ‍ कनिष्ठभ्रातृसत्त्वविषयम् ‍ यच्चमनुः सर्वेषामेकजातानामेकश्चेत् ‍ पुत्रवान् ‍ भवेत् ‍ सर्वांस्तांस्तेनपुत्रेणपुत्रिणोमनुरब्रवीदिति तत्सहोदराभावविषयमित्युक्तं ‘ एतेनपुत्रत्वातिदेशोयम् ‍ अतस्तस्मिन् ‍ सतिएकादशपुत्राः प्रतिनिधयोनकार्याः सएवपिंडदोंशहरश्चेति वाचस्पतिमनुटीकाकल्पतरुरत्नाकरादयः परास्ताः द्वादशपुत्राभावेपत्नीदुहितरइतियाज्ञवल्क्योक्तेश्च तस्माद्दत्तपुत्रप्रशंसेयमितिविज्ञानेश्वरः अविभक्तविषयंवा ’ मदनरत्नेस्मृतिसंग्रहे पुत्रः कुर्यात्पितुः श्राद्धंपत्नीचतदसन्निधौ धनहार्यथदौहित्रस्ततोभ्राताचतत्सुतः भ्रात्रोः सहोदरोभ्राताकुर्याद्दाहादितत्सुतः ततस्त्वसोदरोभ्रातातदभावेचतत्सुतइति भ्रातृपुत्राभावेक्रमेणपितृमातृस्नुषास्वसृतत्पुत्रादयः धनहारित्वात् ‍ भगिनीतत्सुतयोर्विशेषमाहमदनरत्नेकात्यायनः अनुजाअग्रजावापिभ्रातुः कुर्वीतसंस्क्रियाम् ‍ ततस्त्वसोदरातद्वत्क्रमेणतनयस्तयोः अपरार्केकार्ष्णाजिनिः पुत्रः शिष्योथवापत्नीपिताभ्रातास्नुषागुरुः स्त्रीहारीधनहारीचकुर्यात्पिंडोदकक्रियाम् ‍ मार्कंडेयपुराणे पुत्रोभ्राताचतत्पुत्रः पत्नीमातातथापिता वित्ताभावेतुशिष्यश्चकुर्वीरन्नौर्ध्वदेहिकम् ‍ तेनधनहारीएतद्भिन्नइतिकालादर्शः अत्रपाठक्रमोनविवक्षितः पूर्ववाक्येष्वथततः शब्दादिभिः श्रौतक्रमोक्तेः अथजिह्वाया अथवक्षसइतिवत् ‍ ॥

दौहित्र आणि भ्रातृपुत्र हे दोघे असतील तर विभक्ताची क्रिया दौहित्रानें करावी , आणि अविभक्ताची भ्रातृपुत्रानें करावी . भ्राता आणि भ्रातृपुत्र हे दोघे असतील तर कनिष्ठ भ्राता असल्यास त्यानें करावी , व तो ज्येष्ठ असेल तर त्याच्या पुत्रानें करावी , असे दाक्षिणात्यग्रंथ आहेत . हारलतादिकांत तर - " जर मृताची भार्या नसेल तर भ्रात्याची क्रिया भ्राता स्वतः करितो . ज्याचा सहोदर भ्राता नाहीं त्याची क्रिया भ्रात्याचा पुत्र करितो " ह्या ब्राह्मवचनावरुन आणि " पुत्रांच्या अभावीं पत्नीनें करावी , पत्नीच्या अभावीं सहोदर भ्रात्यानें करावी " ह्या कूर्मपुराणवचनावरुनही कनिष्ठाची सुद्धां क्रिया ज्येष्ठ भ्रात्यानेंच करावी ; त्याच्या पुत्रानें करुं नये असें आहे . आतां जें " कनिष्ठाची क्रिया अग्रजानें ( ज्येष्ठानें ) करुं नये . " तें कनिष्ठ भ्राता असेल तर तद्विषयक समजावें . आतां जें मनु " एकापासून झालेल्या भ्रात्यांमध्यें एक जर पुत्रवान् ‍ होईल तर ते सारे भ्राते त्या पुत्रानें पुत्रवंत होतात , असें मनु सांगता झाला " हें मनूचें म्हणणें सहोदर भ्राता नसेल त्यावेळचें समजावें असें सांगितलें आहे . ह्या वरील वचनांनीं सहोदर भ्राता नसेल तर भ्रातृपुत्र अधिकारी , असें झाल्यामुळें ‘ ह्या मनुवचनानें भ्रातृपुत्राचेठायीं पुत्रत्वाचा अतिदेश ( आरोप ) केला आहे , म्हणून तो भ्रातृपुत्र असतां अकरा प्रकारचे पुत्र प्रतिनिधि करुं नयेत ; कारण , तोच पिंड देण्यास व जिंदगी घेण्यास अधिकारी आहे ’ असें सांगणारे वाचस्पति , मनुटीका , कल्पतरु , रत्नाकर इत्यादिक ग्रंथ परास्त झाले . कारण , " बारा प्रकारच्या पुत्रांच्या अभावीं पत्नी , कन्या अधिकारी " असें याज्ञवल्क्यानेंही सांगितलें आहे . आणि ह्या वरील वचनानेंही दत्तकपुत्राची प्रशंसा केला आहे , असें विज्ञानेश्वर सांगतो . अथवा हें वचन अविभक्ताविषयीं समजावें . मदनरत्नांत स्मृतिसंग्रहांत - " पित्याचें श्राद्ध पुत्रानें करावें . पुत्र जवळ नसेल तर पत्नीनें करावें . पत्नी नसेल तर इस्टेट घेणार्‍या दौहित्रानें करावें . त्याच्या अभावीं भ्रात्यानें व भ्रातृपुत्रानें करावें . त्यांत सहोदर व असहोदर ( सापत्न ) असतील तर सहोदरानें दाहादिक कर्म करावें . सहोदराच्या अभावीं सहोदराच्या पुत्रानें करावें . त्याच्या अभावीं असहोदरानें ( सापत्नभ्रात्यानें ) करावें . त्याच्या अभावीं सापत्नभ्रातृपुत्रानें करावें . " भ्रातृपुत्राच्या अभावीं अनुक्रमानें पिता , माता , स्नुषा , भगिनी , भगिनीपुत्र इत्यादिक अधिकारी होतात . कारण , ते जिंदगीचे वारस आहेत . भगिनी व भगिनीपुत्र यांविषयीं विशेष सांगतो मदनरत्नांत कात्यायन - " भगिनी कनिष्ठ असो किंवा ज्येष्ठ असो तिनें आपल्या भ्रात्याची सत्क्रिया करावी . सोदर भगिनीच्या अभावीं सापत्न भगिनीनें तशीच क्रिया करावी . तिच्या अभावीं त्याच क्रमानें त्या दोन्ही भगिनींच्या पुत्रानें करावी . " अपरार्कांत कार्ष्णाजिनि - " पुत्र , शिष्य , अथवा पत्नी , पिता , भ्राता , स्नुषा , गुरु , स्त्रीसंरक्षण करणारा , इस्टेट घेणारा यानें पिंड - उदकदानादिक क्रिया करावी . " मार्केंडेयपुराणांत - " द्रव्य नसेल तर पुत्र , भ्राता , भ्रातृपुत्र , पत्नी , माता , पिता , आणि शिष्य यांनीं और्ध्वदेहिक कर्म करावें . " या वचनांत ‘ वित्ताभाव असतां ’ असें आहे म्हणून इस्टेट घेऊन क्रिया करणारा तो यांहून वेगळा समजावा , असें कालादर्श सांगतो . या वचनांत पाठक्रम घ्यावयाचा नाहीं , म्हणजे पुत्राच्या अभावीं भ्राता , त्याच्या अभावीं भ्रातृपुत्र असे अधिकारी समजावयाचे नाहींत . कारण , पूर्ववचनांमध्यें ‘ अथ - ततः ’ इत्यादिक पदांनीं श्रौतक्रम सांगितला आहे . जसें - " ह्रदयस्याग्रे अवद्यति अथ जिव्हाया अथ वक्षसः " ह्या वाक्यांत ह्रदयाचें पूर्वीं अवदान सांगितलें , नंतर जिव्हेचें , नंतर वक्षाचें , ह्यांत क्रमबोधक ‘ अथ ’ हा शब्द आहे . त्याप्रमाणें येथें ‘ अथ ’ इत्यादि शब्दांनीं बोधन केलेला क्रम घ्यावा .

पृथ्वीचंद्रोदयेवृद्धमनुः स्नुषास्वस्त्रीयतत्पुत्रज्ञातिसंबंधिबांधवाः पुत्राभावेतुकुर्वीरन् ‍ सपिंडांतंयथाविधि मार्कंडेयपुराणे पुत्राद्युत्सन्नबंधोश्चसखापिश्वशुरस्यच जामातास्नेहवत्कुर्यादखिलंपैतृमेधिकम् ‍ चंद्रिकायांवृद्धशातातपः मातुलोभागिनेयस्यस्वस्त्रीयोमातुलस्यच श्वशुरस्यगुरोश्चैवसख्युर्मातामहस्यच एतेषांचैवभार्याणांस्वसुर्मातुः पितुस्तथा श्राद्धमेषांतुकर्तव्यमितिवेदविदोविदुः शुद्धिविवेकेपृथ्वीचंद्रोदयेचब्राह्मे दत्तानांवाप्यदत्तानांकन्यानांकुरुतेपिता चतुर्थेऽहनितास्तेषांकुर्वीरन् ‍ सुसमाहिताः दत्तावाग्दत्ताः मातामहानांदौहित्राः कुर्वंत्यहनिचापरे तेपितेषांप्रकुर्वंतिद्वितीयेहनिसर्वदा जामातुः श्वशुराश्चक्रुस्तेषांतेपिचसंयताः मित्राणांतदपत्यानांश्रोत्रियाणांगुरोस्तथा भागिनेयसुतानांचसर्वेषांत्वपरेहनि राज्ञोसतिसपिंडेतुनिरपत्येपुरोहितः मंत्रीवातदशौचंतुपुराचीर्त्वाकरोतिसः अत्रद्वितीयाहादौश्राद्धविधानमस्थिसंचयपरम् ‍ कालादर्शे दाहादिमंत्रवत् ‍ पित्रोर्विदध्यादौरसः सुतः तदभावेतुपौत्रश्चप्रपौत्रः पुत्रिकासुतः दौहित्रोधनहारीच भ्रातातत्पुत्रएवच पितामातास्नुषाचैवस्वसातत्पुत्रएवच सपिंडः सोदकोमातुः सपिंडश्चसहोदकः स्त्रीचशिष्यर्त्विगाचार्याजामाताचसखापिच उत्सन्नबंधोरिक्थेनकारयेदवनीपतिः गौतमः पुत्राभावेसपिंडामातृ सपिंडाः शिष्याश्चदद्युस्तदभावेऋत्विगाचार्यौ यत्तुचंद्रिकायांवृद्धशातातपः प्रीत्याश्राद्धंप्रकर्तव्यंसर्वेषां वर्णलिंगिनामितितत्सवर्णविषयम् ‍ ब्राह्मणस्त्वन्यवर्णानांनकुर्यात्कर्मकिंचन कामाल्लोभाद्भयान्मोहात्कृत्वातज्जातितांव्रजेदितिब्राह्मोक्तेः नब्राह्मणेनकर्तव्यंशूद्रस्याप्यौर्ध्वदेहिकं शूद्रेणवाब्राह्मणस्यविनापारशवात्क्कचिदितिपारस्करोक्तेश्च पारशवः ऊढशूद्रापुत्रः ॥

पृथ्वीचंद्रोदयांत वृद्धमनु - " पुत्राच्या अभावीं स्नुषा , भागिनेय , त्याचा पुत्र , ज्ञाति , संबंधी , बांधव ; ह्यांनीं सपिंडांत क्रिया यथाविधि करावी . " मार्केंडेयपुराणांत - पुत्रादिक अधिकारी कोणीही नसतील तर सकल और्ध्वदेहिक कर्म स्नेहानें मित्रानेंही करावें , आणि श्वशुराचें जामातानें करावें . " चंद्रिकेंत वृद्धशातातप - " भागिनेयाचें मातुलानें व मातुलाचें भागिनेयानें , श्वशुराचें जामात्यानें , गुरुचें शिष्यानें , मित्राचें मित्रानें , मातामहाचें दौहित्रानें , याप्रमाणें और्ध्वदेहिक करावें . तसेंच ह्यांच्या भार्याचें , ह्यांच्या भगिनीचें , ह्यांच्या मातेचें आणि ह्यांच्या पित्याचें श्राद्धादिक कर्म त्यानें त्यानें करावें , असें वेदवेत्ते सांगतात . " शुद्धिविवेकांत आणि पृथ्वीचंद्रोदयांत ब्राह्मांत - " दत्ता ( वाग्दान केलेल्या ) अथवा अदत्ता अशा कन्यांचें पित्यानें करावें . आणि त्या कन्यांनीं समाधान अंतः करणपूर्वक पित्रादिकांचें अस्थिसंचयनादिक कर्म चवथ्या दिवशीं करावें . " ह्यांत दत्तापदाचा अर्थ वाग्दत्ता असा आहे . " मातामहांचें श्राद्ध ( अस्थिसंचयन ) दौहित्र दुसर्‍यादिवशीं करितात . ते मातामह देखील दौहित्रांचें ( अस्थिसंचयनादिक ) सर्वदा दुसर्‍या दिवशीं करितात . जामात्याचें श्वशुर व श्वशुरांचें जामाते करितात . मित्र , मित्रांचीं अपत्यें , श्रोत्रिय , गुरु , भागिनेयांचे पुत्र , ह्या सर्वांचें अस्थिसंचयनादिक दुसर्‍यादिवशीं करितात . राजाला अपत्य नसतां सपिंडही कोणी नसेल तर पुरोहित किंवा मंत्री पूर्वी आशौच धरुन नंतर त्याचें और्ध्वदेहिक कर्म करितो . " ह्या वरील वचनांत दुसर्‍या वगैरे दिवशीं श्राद्धविधान केलें तें अस्थिसंचयनबोधक आहे . कालादर्शांत सांगतो - " आईबापांचें दाहादिक कर्म औरसपुत्रानें समंत्रक करावें . त्याच्या अभावीं पौत्र , त्याच्या अभावीं प्रपौत्र , त्याच्या अभावीं पुत्रिकापुत्र अधिकारी . त्याच्या अभावीं इस्टेट घेणारा दौहित्र , भ्राता , भ्रातृपुत्र , पिता , माता , स्नुषा , भगिनी , भगिनीपुत्र , आपला सपिंड , सोदक , मातेचा सपिंड , मातेचा सोदक , स्त्री , शिष्य , ऋत्विक् ‍, आचार्य , जामाता , मित्र , हे अनुक्रमानें अधिकारी होतात . ह्यांपैकीं ज्याचे कोणी नाहींत त्याचें और्ध्वदेहिक कर्म , त्याच्याच द्रव्यानें दुसर्‍याकडून राजानें करवावें . " गौतम - " पुत्राच्या अभावीं आपले सपिंड , मातृसपिंड , शिष्य यांनीं पिंडदानादिक करावें , त्यांच्या अभावीं ऋत्विक् ‍ आणि आचार्य यांनीं पिंडादिक द्यावे . " आतां जें चंद्रिकेंत वृद्धशातातप सांगतो कीं , " ब्राह्मणादिवर्णांच्या ( जातींच्या लक्षणांनीं युक्त असतील त्या सर्वांचें श्राद्ध प्रीतीनं करावें . " हें वचन सवर्णविषयक आहे . म्हणजे मृताच्या जातीचा जो असेल त्यानें करावें . कारण , " ब्राह्मणानें अन्यवर्णांचें कांहीं कर्म करुं नये . कामानें , लोभानें , भयानें , किंवा मोहानें ( अविचारानें ) करील तर तो करणारा त्याच्या जातींत जाईल . " असें ब्राह्मवचन आहे . आणि " शूद्राचें और्ध्वदेहिक कर्म ब्राह्मणानें करुं नये . अथवा पारशवावांचून इतर शूद्रानें ब्राह्मणाचें और्ध्वदेहिक करुं नये . " असें पारस्करवचन आहे . पारशव म्हणजे ब्राह्मणानें विवाहित शूद्रेचा पुत्र होय .

या अधिकाराविषयींचें तत्त्व सांगतों -

अत्रेदंतत्त्वम् ‍ सर्वत्रपुत्रादेः पूर्वस्याभावेपत्न्यादेरधिकारउक्तः तत्राभावोऽसन्निधिर्नाशश्चोच्यते अतएवपूर्वत्र असंनिधानेपूर्वेषामित्युक्तम् ‍ तत्रासन्निधौपत्न्यादेः सर्वाधिकारेप्राप्ते प्रोषितावसितेपुत्रः कालादपिचिरादपि एकादशाद्याः क्रमशोज्येष्ठस्यविधिवत् ‍ क्रियाः ज्येष्ठेनैवतुयत्कृतमित्याद्यैर्देशांतरेपवादात्पुत्रनाशएवपत्न्यादेः सपिंडनादौअधिकारः असन्निधौतुतत्पूर्वमेवनोर्ध्वं अतोऽनधिकारिणाभ्रात्रादिनाकृतमप्यकृतमेवेति पुनरावर्तनीयम् ‍ मासिकापकर्षोप्यावर्तनीयः एकादशाहमासिकानिनावर्तंते तज्ज्यायसापिकर्तव्यंसपिंडीकरणंपुनरितिवदावृत्तिविधानाभावादितिकेचित् ‍ तन्न अस्यनिर्मूलत्वात् ‍ अतस्तदपिकनिष्ठकृतमावर्तते वृद्धिश्रौतपिंडपितृयज्ञार्थंतुकृतंनावर्तते नासपिंड्याग्निमान् ‍ पुत्रः पितृयज्ञंसमाचरेत् ‍ नपार्वणंनाभ्युदयंकुर्वन्नलभतेफलमिति वृद्ध्युत्तरनिषेधनादिति भ्रातावाभ्रातृपुत्रोवेत्यादिहारीतादिवचोभ्यः कनिष्ठादेरप्यधिकारात् ‍ यथात्रज्येष्ठकर्तृकत्वबाधस्तथापुत्रकर्तृकत्वस्यापिबाधः सपिंडनेतुबहुवक्तव्यंतन्निर्णयेवक्ष्यामः ॥

मृताच्या सर्वकर्माविषयीं पुत्रादिकांच्या अभावीं पत्न्यादिकांना अधिकार सांगितला आहे . त्या ठिकाणीं अभाव म्हणजे असंनिधि ( समीप नसणें ) आणि नाश होय . असें आहे म्हणूनच पूर्वोक्तवचनांत पूर्वींच्या अधिकार्‍यांचें सांनिध्य नसतां परांना अधिकार , असें सांगितलें आहे . त्या वाक्यावरुन पुत्रादिकांचें सांनिध्य नसेल त्या ठिकाणीं पत्न्यादिकांना सर्व अधिकार प्राप्त झाला ; परंतु " पिता प्रवासांत मृत झाला असतां चिरकालानें जरी पुत्राला समजलें तरी त्यानें सर्व कर्म करावें . एकादशाहादिक सर्व क्रिया ज्येष्ठपुत्रानें अनुक्रमानें यथाशास्त्र कराव्या . सर्वांच्या मतानें ज्येष्ठपुत्रानें जें केलें तें सर्वांनीं केलें असें होतें . " इत्यादिवचनांनीं देशांतरीं पुत्र असतां ( संनिध नसतां ) पत्न्यादिकांच्या अधिकाराविषयीं अपवाद ( निषेध ) आहे , म्हणून पुत्रांचा नाश असेल तरच पत्न्यादिकांना सपिंडीविषयीं वगैरे अधिकार आहे . आतां पुत्रादिक संनिध नसतील तर पूर्व ( एकादशाहापर्यंत ) क्रियांविषयींच अधिकार . एकादशाहोत्तर क्रियांविषयीं पत्न्यादिकांना अधिकार नाहीं . असें आहे म्हणूनच अनधिकारी असे जे कनिष्ठ भ्रात्रादिक त्यांनीं केलें तरी अकृतच आहे , म्हणून ज्येष्ठ भ्रात्यानें पुनः करावें . त्याचप्रमाणें सपिंडीसाठीं अपकर्षानें करावयाचीं मासिकें त्यांची देखील ज्येष्ठानें पुनरावृत्ति करावी . कोणी म्हणतात - एकादशाहादिक मासिकांची आवृत्ति होत नाहीं ; कारण , " तें सपिंडीकरण कनिष्ठानें केलें असलें तरी पुनः ज्येष्ठानेंही करावें . " ह्या वचनानें सपिंडीकरणाची जशी आवृत्ति सांगितली , तशी मासिकांची आवृत्ति सांगितली नाहीं ; असें जें कोणी म्हणतात , तें बरोबर नाहीं . कारण , त्यांचें तें म्हणणें निर्मूल ( वचनरहित ) आहे . म्हणून तें देखील कनिष्ठानें केलें असलें तरी ज्येष्ठानें पुनः करावें . विवाहादि वृद्धि , श्रौतपार्वणविधि आणि पिंडपितृयज्ञ यांसाठीं केलीं असतील तर त्यांची पुनः आवृत्ति होणार नाहीं . कारण , " साग्निक पुत्रानें सपिंडी केल्यावांचून पिंडपितृयज्ञ , पार्वणविधि आणि आभ्युदयिक ( विवाहादिक मंगल ) कर्म हीं करुं नयेत . केलीं असतां त्यांचें फळ मिळणार नाहीं . " ( ह्या वचनानें पूर्वीं सपिंडी केलीच पाहिजे असें होतें . ) वृद्धिश्राद्धानंतर सपिंडीकरण - मासिकादिकांचा निषेध आहे . ( ह्यावरुन ज्येष्ठानें पुनः करितां कामा नयेत असें होतें ). " भ्राता वा भ्रातृपुत्रो वा " ( ह्या वचनावरुन इतरांनाही अधिकार आहे असें होतें ) इत्यादिक हारीतादिवचनांनीं कनिष्ठादिकांना देखील अधिकार असल्यामुळें जसा ज्येष्ठाचा कर्तृत्वाचा बाध केला , तसा पुत्राच्या कर्तृत्वाचा देखील बाध केला असें होतें . सपिंडीकरणाविषयीं बहुत सांगावयाचें आहे , तें सपिंडीनिर्णयाच्या वेळीं पुढें सांगूं .

आतां अधिकारविशेषानें क्रियाव्यवस्था सांगतो -

अधिकारविशेषेणक्रियाव्यवस्थोक्ताविष्णुपुराणे पूर्वाः क्रियामध्यमाश्चतथाचैघोत्तराः क्रियाः त्रिप्रकाराः क्रियाह्येतास्तासांभेदाञ्छृणुष्वमे आदाहाद्दादशाहाच्चमध्येयाः स्युः क्रियानृप ताः पूर्वामध्यमामासिमास्येकोद्दिष्टसंज्ञिताः प्रेतेपितृत्वमापन्नेसपिंडीकरणादनु क्रियंतेयाः क्रियाः पुत्रैः प्रोच्यंतेतानृपोत्तराः पितृमातृसपिंडैश्चसमानसलिलैस्तथा तत्संघातगतैश्चैवराज्ञावाधनहारिणा पूर्वामध्याश्चकर्तव्याः पुत्राद्यैरेवचोत्तराः दौहित्रैर्वानरश्रेष्ठकार्यास्तत्तनयैस्तथा मृताहनितुकर्तव्याः स्त्रीणामप्युत्तराः क्रियाः दौहित्रतत्पुत्रयोर्धनहारिणोरिदम् ‍ एवमन्यस्यधनहर्तुः यश्चार्थहरः सपिंडदायीत्यापस्तंबोक्तेः प्रेतस्यप्रेतकार्याणिअकृत्वाधनहारकः वर्णानां यद्वधेप्रोक्तंतद्व्रतंप्रयतश्चरेदितिपृथ्वीचंद्रोदयेव्याघ्रपादोक्तेः मदनरत्नेस्कांदेपि मलमेतन्मनुष्याणांद्रविणंयत्प्रकीर्तितमित्युक्त्वा ऋषिभिस्तस्यनिर्दिष्टानिष्कृतिः पावनीपरा आदेहपतनात्तस्यकुर्यात्पिंडोदकक्रियामित्युक्तं क्रियानिबंधेकात्यायनः नचमातानचपिताकुर्यात्पुत्रस्यपैतृकम् ‍ नाग्रजश्चतथाभ्राताभ्रातृणांतुकनीयसां पृथ्वीचंद्रोदयेबौधायनः पित्राश्राद्धंनकर्तव्यंपुत्राणांतुकथंचन भ्रात्राचैवनकर्तव्यंभ्रातृणांचकनीयसाम् ‍ यदिस्नेहेनकुर्यातांसपिंडीकरणंविना गयायांतुविशेषेणज्यायानपिसमाचरेत् ‍ अन्याभावेपित्रादिरपिकुर्यात् ‍ उत्सन्नबांधवंप्रेतंपिताभ्राताथवाग्रजः जननीचापिसंस्कुर्यान्महदेनोन्यथाभवेदितिसुमंतूक्तेः ।

विष्णुपुराणांत - " पूर्वा , मध्यमा आणि उत्तरा , अशा ह्या क्रिया तीन प्रकारच्या आहेत ; त्यांचे भेद सांगतों , श्रवण करा ! प्रेतदाह झाल्यापासून द्वादशाहापर्यंत मध्यें होणार्‍या ज्या क्रिया त्या पूर्वक्रिया होत . महिन्यामहिन्याचे ठायीं होणार्‍या एकोद्दिष्टसंज्ञक क्रिया मध्यम होत . आणि सपिंडीकरणानंतर प्रेताला पितृत्व प्राप्त झालें असतां ज्या क्रिया पुत्र करितात , त्या उत्तरक्रिया म्हटल्या आहेत . पितृसपिंडांनीं , मातृसपिंडांनीं , पितृसमानोदकांनीं , मातृसमानोदकांनीं . अथवा त्यांच्या कुलांतील पुरुषांनीं , किंवा मृताचें द्रव्य घेऊन राजानें , मृताच्या पूर्वक्रिया व मध्यमक्रिया कराव्या . आणि उत्तरक्रिया पुत्रादिकांनींच कराव्या . अथवा दौहित्रांनीं किंवा दौहित्रतनयांनीं कराव्या . याचप्रमाणें स्त्रियांच्या देखील मृतदिवशीं उत्तरक्रिया कराव्या . " दौहित्र व त्याचा पुत्र हे इस्टेट घेणारे असतील त्यांनाच हें सांगितलें आहे . याचप्रमाणें दुसरा कोणी द्रव्य घेईल तर त्यानेंही कराव्या ; कारण , " जो मृताचें द्रव्य घेईल तो पिंड देईल . " अशी आपस्तंबाची उक्ति आहे . आणि " प्रेताचीं प्रेतकार्यै न करितां जो त्याचें धन ग्रहण करितो त्यानें ब्राह्मणादिवर्णांचा वध केला असतां जें प्रायश्चित्त सांगितलें आहे तें प्रायश्चित्त करावें " अशी पृथ्वीचंद्रोदयांत व्याघ्रपादाची उक्ति आहे . मदनरत्नांत स्कांदांतही - " द्रव्य हें मनुष्यांना मळ ( पाप ) सांगितलें आहे " असें सांगून - " ऋषींनीं त्या मळाची अत्यंत पवित्र करणारी निष्कृति ( शुद्धि ) सांगितली आहे , ती अशी - आपला देह आहे तोंपर्यंत त्याची ( ज्याचें द्रव्य घेतलें त्याची ) पिंडोदकदानादि क्रिया करावी . " असें सांगितलें आहे . क्रियानिबंधांत कात्यायन - " माता व पिता यानें पुत्राचें पैतृक ( और्ध्वदेहिक ) कर्म करुं नये . तसेंच ज्येष्ठभ्रात्यानें कनिष्ठभ्रात्यांचें और्ध्वदेहिक करुं नये . " पृथ्वीचंद्रोदयांत बौधायन - " पुत्रांचें श्राद्ध कधींही पित्यानें करुं नये . कनिष्ठभ्रात्यांचें श्राद्ध ज्येष्ठानें करुं नये . जर स्नेहानें ते ( पिता , ज्येष्ठभ्राता ) करितील तर सपिंडीकरणावांचून करावें . गयेमध्यें तर ज्येष्ठानें देखील विशेषतः करावें . " अन्याच्या अभावीं पित्रादिकानें देखील करावें . कारण , " ज्याचा कोणी बांधव ( पुत्रादिक ) नाहीं अशा प्रेताचा , पित्यानें अथवा ज्येष्ठभ्रात्यानें किंवा मातेनें संस्कार करावा , हे त्या प्रेताचा संस्कार न करितील तर त्यांना मोठें पाप लागेल " अशी सुमंतूची उक्ति आहे .

ब्रह्मचारिणांतुशुद्धिविवेकेपृथ्वीचंद्रोदयेचब्राह्मे असमाप्तव्रतस्यापिकर्तव्यंब्रह्मचारिणः श्राद्धं तुमातापितृभिर्नतुतेषांकरोतिसः श्राद्धंमासिकाब्दिकादिसर्वंकार्यमित्यर्थः नत्वितिनिषेधोन्यसत्त्वे यत्तुछंदोगपरिशिष्टे नत्यजेत्सूतकेकर्मब्रह्मचारीस्वयंक्कचित् ‍ नदीक्षणात्परंयज्ञेनकृच्छ्रादितपश्चरन् ‍ पितर्यपिमृतेनैषांदोषोभवतिकर्हिचित् ‍ आशौचंकर्मणोंतेस्यात्र्यहंवाब्रह्मचारिणां यच्चयाज्ञवल्क्यः नब्रह्मचारिणः कुर्युरुदकंपतितास्तथेति तदप्यन्यसत्त्वे अन्याभावेतुब्रह्मचारिणापिकार्यं पूर्वोक्तवृद्धमनुवचनात् ‍ आचार्यपित्रुपाध्यायान्निर्ह्रत्यापिव्रतीव्रती संकटान्नंचनाश्नीयान्नचतैः सहसंवसेदितितेनैवोक्तेः ब्रह्मचारिणः शवकर्मिणोव्रतान्निवृत्तिरन्यत्रमातापित्रोरितिवसिष्ठोक्तेः अत्राशौचमेकाहंवक्ष्यामः प्रागुपनयनान्मृतस्यतुपंचवर्षोत्तरंसपिंडीकरणवर्ज्यंषोडशश्राद्धादिसर्वंकार्यमित्युक्तंदेवजानीये असंस्कृतानांभूमौपिंडंदद्यात्संस्कृतानांकुशेष्वितिप्रचेतोवचनाच्च एतच्चाग्रेवक्ष्यामः ।

ब्रह्मचार्‍यांचें तर शुद्धिविवेकांत आणि पृथ्वीचंद्रोदयांत ब्राह्मांत सांगतो - " ब्रह्मचार्‍याचें व्रत समाप्त झालें नसून तो मृत होईल तर त्याचें श्राद्ध मातापितरांनीं करावें ; पण मातापितरांचें श्राद्ध ( और्ध्वदेहिक ) तो ब्रह्मचारी करणार नाहीं . " या वचनांत श्राद्ध म्हणजे मासिक , आब्दिक वगैरे सर्व समजावें . आतां ब्रह्मचारी करणार नाहीं , हा जो निषेध तो दुसरा अधिकारी असतां समजावा . आतां जें छंदोगपरिशिष्टांत - " सूतकांत ( मृताशौचांत ) ब्रह्मचार्‍यानें आपलें कर्म कधींही टाकूं नये . यज्ञामध्यें दीक्षा घेतल्यावर , तसेंच कृच्छ्रादि तप करीत असतां आशौच नाहीं , पिता जरी मृत झाला असेल तरी यांना कधींही दोष नाहीं . अथवा त्यांचें तें तें कर्म समाप्त झाल्यानंतर त्यांनीं आशौच धरावें . ब्रह्मचार्‍यांनीं ब्रह्मचर्यव्रत समाप्त झाल्यानंतर तीन दिवस आशौच धरावें . " आणि जें याज्ञवल्क्य सांगतो कीं , " ब्रह्मचार्‍यांनीं मृताला उदक देऊं नये , तसेंच पतितांनींही देऊं नये . " हें ह्यांचें ( छंदोगपरिशिष्ट व याज्ञवल्क्य यांचें ) सांगणें अन्य अधिकारी असतां समजावें . दुसरा नसेल तर ब्रह्मचार्‍यानें देखील मातापितरांचें कर्म करावें ; कारण , अशाविषयीं पूर्वीं वृद्धमनूचें वचन सांगितलें आहे . आणि " आचार्य , पिता , उपाध्याय , यांचें प्रेत ब्रह्मचार्‍यानें नेलें तरी तो व्रतापासून भ्रष्ट होत नाहीं , परंतु त्यानें आशौच्यांचें अन्न भक्षण करुं नये व त्यांच्याशीं स्पर्श करुं नये . " असें त्यानेंच ( याज्ञवल्क्यानेंच ) सांगितलें आहे . तसेंच - " ब्रह्मचारी प्रेतकर्म करील तर तो व्रतापासून निवृत्त ( भ्रष्ट ) होतो , ही गोष्ट मातापितरांवांचून अन्य प्रेतकर्माविषयीं समजावी " असें वसिष्ठानें सांगितलें आहे . प्रेतकर्माविषयीं ब्रह्मचार्‍याला आशौच एक दिवस आहे . तें पुढें ( आशौचप्रकरणांत ) सांगूं . पांच वर्षानंतर उपनयनाच्या पूर्वीं मृत झाला असतां त्याचें सपिंडीकरणरहित षोडशश्राद्धादिक सर्व कर्म करावें , असें देवजानीयांत सांगितलें आहे . आणि " ज्यांचा संस्कार झालेला नाहीं त्यांना भूमीवर पिंड द्यावा , संस्कार झालेल्यांना कुशांवर पिंड द्यावा " असें प्रचेताचेंही वचन आहे . हें पुढें ( आशौचप्रकरणीं ) सांगूं .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:20.8030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आण ने

 • स्त्री. 
 • ( एखादी वस्तु ) वारंवार इकडून तिकडे नेणें आणि आणणें . 
 • ( ल . ) उपद्व्याप ; दगदग ; कुतरओढ . तारंबळ [ आणणें + नेणें ] 
RANDOM WORD

Did you know?

नेहमी ’गुणक्षोभिन” ऐकण्यात येते, काय अर्थ असावा?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.