मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
आमाच्या अभावीं हेमश्राद्ध

तृतीय परिच्छेद - आमाच्या अभावीं हेमश्राद्ध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

आमाच्या अभावीं हेमश्राद्ध सांगतो -

तदभावेहेमश्राद्धमाह हेमाद्रौमरीचिः आमान्नस्याप्यभावेतुश्राद्धंकुर्वीतबुद्धिमान् ‍ धान्याच्चतुर्गुणेनैवहिरण्येनसुरोचिषा धर्मः आमंतुद्विगुणंप्रोक्तंहेमतद्वच्चतुर्गुणं स्मृत्यर्थसारे हिरण्यमष्टगुणंचतुर्गुणंसमंवा दद्यात् ‍ हेमाद्रौभविष्ये अन्नाभावेद्विजाभावेप्रवासेपुत्रजन्मनि हेमश्राद्धंसंग्रहेचतथास्त्रीशूद्रयोरपि षटत्रिंशन्मते तुर्यपादे वर्जयित्वाक्षयेहनीतिपाठः यस्यभार्यारजस्वलेतिव्यासपाठः पुत्रोत्पत्तौतुहेमनियममाह संवर्तः पुत्रजन्मनिकुर्वीतश्राद्धंहेम्नैवबुद्धिमान् ‍ नपक्केननचामेनकल्याणान्यभिकामयन् ‍ भविष्ये गृहपाकात्समुद्धृत्यसक्तुभिः पायसेनवा पिंडदानंप्रकुर्वीतहेमश्राद्धेकृतेसति शूद्रस्तुगृहपाकेननपिंडान्निर्वपेत्तथा सक्तुमूलंफलंतस्यपायसंवाभवेत्स्मृतं हेमश्राद्धेपिंडदानंनेतिदिवोदासः स्मृत्यर्थसारेतुविकल्पउक्तः तदाशयंनविद्मः षटत्रिंशन्मते नामंत्रणाग्नौकरणेविकिरोनैवदीयते तृप्तिप्रश्नोपिनैवात्रकर्तव्यः केनचिद्भवेत् ‍ अत्रमरीचिना आमाभावेहेमविधानेनस्थानापत्त्याधर्मप्राप्तेः पूर्ववन्मंत्रोहः पूर्वाह्णकालताचज्ञेयेतिदिक् ‍ पूर्वोक्तधर्मप्रदीपोक्तेश्च ॥

हेमाद्रींत मरीचि - " आमान्नाचा अभाव असेल तर धान्याच्या किंमतीच्या चौपट अशा उत्तम सुवर्णानें श्राद्ध करावें . " धर्म - " आम दुप्पट व हेम चौपट सांगितलें आहे . " स्मृत्यर्थसारांत - " सुवर्ण आठपट , चौपट , किंवा समान द्यावें . " हेमाद्रींत भविष्यांत - " अन्नाच्या अभावीं , ब्राह्मणांच्या अभावीं , प्रवासांत , पुत्रजन्मकालीं , ग्रहणांत , इतक्या ठिकाणीं हेमश्राद्ध करावें . तसेंच स्त्रिया व शूद्र यांनाही हेमश्राद्ध सांगितलें आहे . " या वचनांत ‘ तथा स्त्रीशूद्रयोरपि ’ या चवथ्या पादांत ‘ वर्जयित्वा क्षयेहनि ’ म्हणजे मृतदिवस वर्ज्य करुन , असा षटत्रिंशन्मतग्रंथांत पाठ आहे . याच ठिकाणीं ‘ यस्य भार्या रजस्वला ’ म्हणजे ज्याची स्त्री रजस्वला आहे , असा व्यासाचा पाठ आहे . पुत्रजन्मकालीं हेमश्राद्धाचा नियम सांगतो संवर्त - " पुत्रजन्मकालीं हेमानेंच श्राद्ध करावें , कल्याण इच्छिणारानें पक्कान्नानें किंवा आमान्नानें श्राद्ध करुं नये . " भविष्यपुराणांत - " हेमश्राद्ध केलें असतां घरांत शिजविलेल्या अन्नानें , पिठानें , किंवा पायसानें पिंडप्रदान करावें . " शूद्रानें तर शिजविलेल्या अन्नानें पिंडप्रदान करुं नये . त्या शूद्रानें पीठ , मुळें , फलें अथवा पायस यांचे पिंड करावे . " हेमश्राद्धांत पिंडदान नाहीं , असें दिवोदास सांगतो . स्मृत्यर्थसारांत तर पिंडांचा विकल्प सांगितला आहे , त्याचा आशय समजत नाहीं . षटत्रिशन्मतांत - " हेमश्राद्धांत आमंत्रण ( क्षण ), अग्नौकरण , विकिर , आणि तृप्तिप्रश्न हे कोणीही करुं नयेत . " मरीचीनें आमाच्या अभावीं हेमाचें विधान केल्यामुळें आमस्थानीं हेम प्राप्त झाल्यानें त्या आमश्राद्धाचे धर्म हेमश्राद्धांत प्राप्त झाल्यामुळें पूर्वींप्रमाणें ( आमश्राद्धाप्रमाणें ) या हेमश्राद्धांत मंत्रांचा ऊह आणि पूर्वाह्णकाल समजावा . ही दिशा दाखविली आहे . पूर्वीं सांगितलेल्या धर्मप्रदीपाच्या वचनावरुनही आमश्राद्धाचे धर्म हेमश्राद्धांत समजावे .

व्यासः हिरण्यमामंश्राद्धीयंलब्धंयत्क्षत्रियादितः यथेष्टंविनियोज्यंस्याद्भुंजीयाद्ब्राह्मणात्स्वयं विप्रलब्धंभुंजीयात् ‍ क्षत्रियादिलब्धेतुयथेष्टविनियोगः तेनापिश्राद्धवैश्वदेवादिनकार्यं देवोद्देशेनत्यक्तस्यदेवतांतरायत्यागायोगादितिदेवयाज्ञिकः शूद्रलब्धेतूक्तंतत्रैवषटत्रिंशन्मते आमंशूद्रस्ययत्किंचिच्छ्रादिकंप्रतिगृह्यते तत्सर्वंभोजनायालंनित्यनैमित्तिकेनचेति शुद्धितत्त्वेंगिराः शूद्रवेश्मनिविप्रेणक्षीरंवायदिवादधि निवृत्तेननभोक्तव्यंशूद्रान्नंतदपिस्मृतं शूद्राद्विप्रगृहेष्वन्नंप्रविष्टंतुसदाशुचि पराशरः तावद्भवतिशूद्रान्नंयावन्नस्पृशतिद्विजः द्विजातिकरसंस्पृष्टंसर्वंतन्नविरुध्यते विष्णुपुराणे संप्रोक्षयित्वागृह्णीयाच्छूद्रान्नंगृहमागतं अंगिराः पात्रांतरगतंग्राह्यंदुग्धंस्वगृहमागतं ।

व्यास - " क्षत्रिय , वैश्य यांपासून श्राद्धसंबंधी जें द्रव्य व आमान्न प्राप्त झालें असेल त्याच्या यथेच्छ विनियोग करावा . आणि ब्राह्मणापासून जें श्राद्धसंबंधी प्राप्त असेल तें स्वतः भक्षण करावें . " ब्राह्मणापासून लब्ध असेल तें खावें , आणि क्षत्रियादिकांपासून लब्धाचा यथेच्छ विनियोग करावा , परंतु त्यानेंही श्राद्ध , वैश्वदेव इत्यादि करुं नये . कारण , देवतेच्या उद्देशानें दिलेल्याचा इतर देवतेला त्याग होत नाहीं , असें देवयाज्ञिक सांगतो . शूद्रापासून प्राप्त असतां तेथेंच षटत्रिंशन्मतातं सांगतो - " शूद्रापासून जें कांहीं श्राद्धसंबंधीं आमान्न ग्रहण करितो तें भोजनाविषयीं उपयोगांत आणावें , नित्यकर्मांत व नैमित्तिकांत त्याचा उपयोग करुं नये . " शुद्धितत्त्वांत अंगिरा - " शूद्राच्या घरीं ब्राह्मणानें कर्म करुन निघाल्यावर दूध किंवा दहीं भक्षण करुं नये . कारण , तेंही शूद्रान्नच म्हटलें आहे . शूद्रापासून ब्राह्मणाच्या घरीं आणलेलें अन्न सर्वदा शुद्ध आहे . " पराशर - " जोंपर्यंत अन्नाला ब्राह्मणानें स्पर्श केला नाहीं तोंपर्यंत तें शूद्रान्न समजावें . ब्राह्मणाच्या हाताचा स्पर्श झाल्यावर सारें तें अन्न भक्षणाला विरुद्ध ( निषिद्ध ) होत नाहीं . " विष्णुपुराणांत - " घरीं प्राप्त झालेलें शूद्रान्न प्रोक्षण करुन ग्रहण करावें . " अंगिरा - " शूद्रानें ब्राह्मणाच्या घरीं आणलेलें दूध ब्राह्मणानें दुसर्‍या पात्रांतून ग्रहण करावें . "

सपिंडक श्राद्धाविषयीं अशक्ति असतां सांगतो -

सपिंडश्राद्धाशक्तावाहहेमाद्रौसंवर्तः समग्रंयस्तुशक्नोतिकर्तुंनैवेहपार्वणं अपिसंकल्पविधिनाकालेतस्य विधीयते पात्रेभोज्यस्यचान्नस्यत्यागः संकल्पउच्यते व्यासः सांकल्पंतुयदाकुर्यान्नकुर्यात् ‍ पात्रपूरणं नावाहनाग्नौकरणेपिंडांश्चैवनदापयेत् ‍ पात्रमर्घ्यस्य समंत्रकावाहनस्यनिषेधः तूष्णींतुभवत्येवेतिहेमाद्रिः स्मृत्यर्थसारे विकिरंतुनदातव्यमितितृतीयपादेपाठः स्मृत्यंतरे त्यजेदावाहनंचार्घ्यमग्नौकरणमेवच पिंडांश्चविकिराक्षय्येश्राद्धेसांकल्पसंज्ञके हेमाद्रौवृद्धशातातपस्तु पिंडनिर्वापरहितंयत्तुश्राद्धंविधीयते स्वधावाचनलोपोत्रविकिरस्तुनलुप्यतइत्याह पृथ्वीचंद्रोदयेवसिष्ठः आवाहनंस्वधाशब्दंपिण्डाग्नौकरणंतथा विकिरंपिंडदानंचसांकल्पेषड्विवर्जयेत् ‍ विकिरेविकल्पः स्मृत्यंतरे अंगानिपितृयज्ञस्ययदाकर्तुंनशक्नुयात् ‍ सतदावाचयेद्विप्रान् ‍ संकल्पात्सिद्द्धिरस्त्विति छागलेयः पिंडोयत्रनिवर्तेतमघादिषुकथंचन सांकल्पंतुतदाकार्यंनियमाद्ब्रह्मवादिभिः कार्ष्णाजिनिः मौंजीबंधाद्वत्सरार्धंवत्सरंपाणिपीडनात् ‍ पिंडान् ‍ सपिंडानोदद्युः प्रेतपिंडंविनात्रतु अस्यापवादः पित्रोराब्दिकादौपूर्वमुक्तः त्यक्ताग्नेरपिसांकल्पमुक्तंषटत्रिंशन्मते अनग्निकोयदाविप्रउत्सन्नाग्निस्तथैवच तथावृद्धिषुसर्वासुसंकल्पश्राद्धमाचरेत् ‍ ।

हेमाद्रींत संवर्त - " जो मनुष्य श्राद्धदिवशीं समग्र श्राद्ध करण्याविषयीं समर्थ होत नाहीं , त्यानें त्या कालीं संकल्पविधीनें श्राद्ध करावें . योग्य ब्राह्मणाला भोजन करण्याचें अन्न देणें , याला संकल्प असें म्हटलें आहे . " व्यास - " जेव्हां मनुष्य संकल्पश्राद्ध करील तेव्हां अर्घ्यपात्रपूरण , आवाहन , अग्नौकरण , आणि पिंडदान हीं करुं नयेत . " समंत्रक आवाहनाचा निषेध , मंत्ररहित आवाहन करावें , असें हेमाद्रि सांगतो . वरील वचनांत ‘ नावाहनाग्नौकरणे ’ या तिसर्‍या पादांत ‘ विकिरंतु न दातव्यं ’ असा स्मृत्यर्थसारांत पाठ आहे . स्मृत्यंतरांत - " सांकल्पिकश्राद्धाचे ठायीं आवाहन , अर्घ्य , अग्नौकरण , पिंडप्रदान , विकिर , अक्षय्योदक हीं वर्ज्य करावीं . " हेमाद्रींत वृद्धशातातप तर - पिंडप्रदानरहित जें श्राद्ध सांगितलें आहे त्या ठिकाणीं स्वधाशब्दोच्चाराचा ( स्वधोच्यतां , याचा ) लोप ( अभाव ) होतो . विकिराचा लोप होत नाहीं " असें सांगतो . पृथ्वीचंद्रोदयांत वसिष्ठ - " आवाहन , स्वधाशब्द , अर्घ्य , अग्नौकरण , विकिर आणि पिंडदान हीं सहा सांकल्पिकश्राद्धांत वर्ज्य करावीं . " विकिराविषयीं विकल्प समजावा . स्मृत्यंतरांत - " जेव्हां श्राद्धाचीं अंगें करण्याविषयीं शक्ति नसेल तेव्हां ‘ संकल्पात्सिद्धिरत्सु ’ असें ब्राह्मणांकडून म्हणवावें . " छागलेय - " जेथें मघादिश्राद्धांत पिंडांची निवृत्ति ( अभाव ) असेल तेथें ब्राह्मणांनीं नियमानें सांकल्पिकश्राद्ध करावें . " कार्ष्णाजिनि - मौंजीबंधापासून सहा महिनेपर्यंत आणि विवाहापासून एक वर्षपर्यंत सपिंडांनीं श्राद्धांत पिंड देऊं नयेत . कोणी मृत असेल तर त्याच्या प्रेतपिंडाविषयीं निषेध नाहीं . " या वचनाचा अपवाद , मातापितरांच्या वार्षिकादिश्राद्धांत पिंड द्यावे असें पूर्वीं सांगितलें आहे . ज्याचा अग्नि नसेल त्यालाही सांकल्पिकश्राद्ध षटत्रिंशन्मतातं सांगितलें आहे तें असें - " अनग्निकानें व ज्याचा अग्नि उच्छिन्न असेल त्यानें , तसेंच सर्व प्रकारच्या वृद्धींत ( विवाहादिकांत ) सांकल्पिक श्राद्ध करावें . "

अशक्तौपृथ्वीचंद्रोदयेबृहन्नारदीये द्रव्याभावेद्विजाभावेअन्नमात्रंतुपाचयेत् ‍ पैतृकेनतुसूक्तेनहोमं कुर्याद्विचक्षणः देवलः पिंडमात्रंप्रदातव्यमभावेद्रव्यविप्रयोः श्राद्धीयाहनिसंप्राप्तेभवेन्निरशनोपिवा वृद्धवसिष्ठः किंचिद्दद्यादशक्तस्तुउदकुंभादिकंद्विजे तृणानिवागवेदद्यात् ‍ पिंडान्वाप्यथनिर्वपेत् ‍ तिलदर्भैः पितृन्वापितर्पयेत्स्नानपूर्वकं हेमाद्रौभविष्ये अग्निनावादहेत् ‍ कक्षंश्राद्धकालेसमागते तस्मिन्वोपवसेदह्निजपेद्वाश्राद्धसंहितां श्राद्धसंहिता समंत्रश्राद्धसंकल्पः विष्णुवराहपुराणयोः असमर्थोन्नदानस्यधान्यंमांसं स्वशक्तितः प्रदास्यतितिलान्वापिस्वल्पांवापिचदक्षिणां सर्वाभावेवनंगत्वाकक्षामूलप्रदर्शकः सूर्यादिलोकपालानामिदमुच्चैः पठिष्यति नमेस्तिवित्तंनधनंनचान्नंश्राद्धोपयोगिस्वपितृन्नतोस्मि तृप्यंतुभक्त्यापितरोमयैतौभुजौकृतौवर्त्मनिमारुतस्य इत्येतत् ‍ पितृभिर्गीतंभावाभावप्रयोजनं यः करोतिकृतंतेनश्राद्धंभवतिभारत प्रभासखंडे गत्वारण्यममानुष्यमूर्ध्वबाहुर्विरौत्यदः निरन्नोनिर्धनोदेवाः पितरोमानृणंकृथाः नमेस्तिवित्तंनधनंनभार्याश्राद्धंकथंवः पितरः करोमि वनंप्रविश्येहतुतन्मयोच्चैर्भुजौकृतौवर्त्मनिमारुतस्य श्राद्धर्णमेतद्भवतांप्रदत्तं मह्यंदयध्वंपितृदेवताद्याः आख्यायचोत्क्षिप्यभुजौततोवैदिवाचरात्रिंसमुपोष्यतिष्ठेत् ‍ भवेत्सवैतेनकृतेनतेषामृणेनमुक्तः पितृदेवतानाम् ‍ इत्यनुकल्पाः ।

शक्ति नसतां पृथ्वीचंद्रोदयांत बृहन्नारदीयांत सांगतो - " द्रव्याच्या अभावीं व ब्राह्मणांच्या अभावीं अन्नमात्र शिजवावें आणि पितृसूक्तानें होम करावा . " देवल - " श्राद्धदिवस प्राप्त झाला असतां द्रव्याच्या व ब्राह्मणाच्या अभावीं पिंड मात्र द्यावे , अथवा उपवास करावा . " वृद्धवसिष्ठ - " श्राद्ध करण्याची शक्ति नसेल त्यानें स्नान करुन कांहीं उदकुंभ वगैरे ब्राह्मणास द्यावा ; अथवा गाईला तृण द्यावें ; किंवा पितरांना पिंड द्यावे ; किंवा तिलांनीं व दर्भांनीं पितरांचें तर्पण करावें . " हेमाद्रींत भविष्यांत - " अथवा श्राद्धकाल प्राप्त असतां गवत रचून त्याला आग लावून तें जाळून टाकावें . किंवा त्या दिवशीं उपवास करावा . अथवा समंत्रक श्राद्धसंकल्पाचा जप करावा . " विष्णुवराहपुराणांत - " अन्नदानाची शक्ति नसेल त्यानें आपल्या शक्तीप्रमाणें धान्य व मांस द्यावें , किंवा तिळ द्यावे अथवा अल्प दक्षिणा द्यावी . सर्वांच्या अभावीं अरण्यांत जाऊन सूर्यादिक लोकपालांना कांखा वर करुन दाखवून हा ( पुढील ) श्लोक मोठ्यानें म्हणावा . ‘ न मेस्ति वित्तं न धनं न चान्नं श्राद्धोपयोगि स्वपितृन्नतोस्मि । तृप्यंतु भक्त्या पितरो मयैतौ भुजौ कृतौ वर्त्मनि मारुतस्य ’ याप्रमाणें हें पूर्वोक्त , द्रव्य असल्याचें व नसल्याचें प्रयोजन पितरांनीं सांगितलें तें जो करितो त्यानें श्राद्ध केलें असें होतें . " प्रभासखंडांत - " मनुष्यरहित अशा अरण्यांत जाऊन बाहु वर करुन असें रडावें कीं ‘ हे देव पितर हो ! मी अन्नरहित निर्धन आहें , मला अनृणी करी ’ ‘ न मेस्ति वित्तं न धनं न भार्या श्राद्धं कथं वः पितरः करोमि । वनं प्रविश्येहतु तन्मयोच्चैर्भुजौ कृतौ वर्त्मनि मारुतस्य ॥ श्राद्धर्णमेतत् ‍ भवतां प्रदत्तं मह्यं दयध्वं पितृदेवताद्याः ’ याप्रमाणें पठण करुन भुजा वर करुन तदनंतर तो दिवस व रात्र उपोषण करुन राहावें . असें केल्यानें तो मनुष्य पितृदेवतांच्या ऋणापासून मुक्त होईल . " याप्रमाणें श्राद्धाचे अनुकल्प समजावे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP