TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
अग्नौकरण

तृतीयपरिच्छेद - अग्नौकरण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अग्नौकरण

आतां अग्नौकरण सांगतो -

अथाग्नौकरणं हेमाद्रौमार्कंडेयः आहिताग्निस्तुजुहुयाद्दक्षिणाग्नौसमाहितः अनाहिताग्निश्चौपासनेऽग्न्यभावेद्विजेप्सुवा वायवीये आह्रत्यदक्षिणाग्निंतुहोमार्थंवैप्रयत्नतः अग्न्यर्थंलौकिकंवापिजुहुयात्कर्मसिद्धये आहिताग्निः सर्वाधानी अर्धाधानीतुगृह्यएवेतिचंद्रिकापरार्कमिताक्षरामाधवादयः तस्यापिदक्षिणाग्नौ लौकिकोगृह्यइतिहेमाद्रिः कल्पतरुश्च आद्यपक्षएवतुयुक्तः बहुसंमतश्च यद्यपिस्मार्ताग्नौकरणंश्रौतेदक्षिणाग्नौनयुक्तंतथापिवचनाद्भवतीतिहेमाद्रिचंद्रिकादयः इदंदर्शश्राद्धएव आब्दिकादिषुतुसर्वाधानीपाणौ अर्धाधानीगृह्येकुर्यादितिहेमाद्रिर्माधवादयश्च पक्षांतंकर्मनिर्वर्त्यवैश्वदेवंचसाग्निकः पिंडयज्ञंततः कुर्यात्ततोन्वाहायर्कबुंधइतिलौगाक्ष्यादिभिः क्रमोक्तेर्विह्रतदक्षिणाग्निसत्त्वात् ‍ अतएवात्रवचनेसाग्निकः आहिताग्निरुक्तोहेमाद्रिणा एतदापस्तंबादीनामेव आश्वलायनस्याहिताग्नेः पाणावेवेतिवृत्तिः अर्धाधानिनः गृह्येएवव्यतिषंगेणेतिप्रयोगपारिजातेपरिशिष्टेच बोपदेवस्त्वाह होमशब्दः पिंडपितृयज्ञपरः पितृयज्ञेतुजुहुयाद्दक्षिणाग्नौसमाहितः श्राद्धेत्वौपासनाग्नौतुनिरग्निर्लौकिकेनले अनग्निर्दूरभार्यश्चपार्वणेसमुपस्थिते संधायाग्निंततः कुर्याद्धोममग्निंसमुत्सृजेदितित्रिकांडमंडनोक्तेः श्राद्धेगृह्याग्नावेवेति लौकिकाग्न्यादिविधानंचतैत्तिरीयादिविषयं बह्वृचस्यत्वनग्नेरपिपाणिहोमएव अग्निपाणीविनासूत्रेविधानांतरानुक्तेः अग्न्यभावेतुविप्रस्यपाणावेवोपपादयेदितिमनूक्तेश्च वृत्तावप्येवम् ‍ ।

हेमाद्रींत मार्केंडेय - " श्रौताग्नि धारण करणारानें दक्षिणाग्नीवर अग्नौकरणहोम करावा , श्रौताग्निरहितानें गृह्याग्नीवर होम करावा , आणि अग्नीच्या अभावीं ब्राह्मणाच्या हातावर किंवा उदकांत होम करावा . " वायवीयांत - " होमाकरितां प्रयत्नानें दक्षिणाग्नि आहरण करुन अथवा कर्मसिद्धि होण्याकरितां लौकिकाग्नी ( गृह्याग्नी ) वर होम करावा . " वरील मार्कंडेय वचनांत ‘ आहिताग्नि ’ म्हणजे सर्वाधानी समजावा . अर्धाधानीनें गृह्याग्नीवरच अग्नौकरण करावें ; असें चंद्रिका , अपरार्क , मिताक्षरा , माधव इत्यादिक ग्रंथकार सांगतात . अर्धाधानीला देखील दक्षिणाग्नींत होम आणि लौकिक म्हणजे गृह्याग्नि असें हेमाद्रि व कल्पतरु सांगतो . येथें पहिला पक्ष ( अर्धाधानीचा गृह्याग्नीवर होम ) हाच युक्त व बहुतांना संमतही आहे . जरी स्मार्त असें जें अग्नौकरण तें श्रौत अशा दक्षिणाग्नीवर युक्त नाहीं , तरी करावें असें वचन आहे म्हणून होतें , असें हेमाद्रि , चंद्रिका इत्यादिक सांगतात . हें दर्शश्राद्धाविषयींच समजावें . सांवत्सरादिक श्राद्धांत तर सर्वाधानीनें हस्तावर आणि अर्धाधानीनें गृह्याग्नीवर करावें असें हेमाद्रि , माधव इत्यादिक सांगतात . कारण , " साग्निकानें पक्षान्त कर्म ( अन्वाधान ) व वैश्वदेव करुन नंतर पिंडपितृयज्ञ करुन दर्शश्राद्ध करावें " असा लौगाक्षिप्रभृतींनीं क्रम सांगितला आहे म्हणून विहार केलेला दक्षिणाग्नि दर्शाचे ठिकाणीं असतो . म्हणूनच ह्या वचनांत साग्निक म्हणजे आहिताग्नि हेमाद्रीनें सांगितला आहे . हें आपस्तंबादिकांनाच समजावें . आश्वलायनशाखी जो आहिताग्नी त्याचा हातावरच होम , असें वृत्तिकार सांगतो . अर्धाधानीचा गृह्याग्नीवरच व्यतिषंगानें ( सहप्रयोगानें ) होम असें प्रयोगपारिजातांत परिशिष्टांत आहे . बोपदेव तर असें सांगतो कीं , वरील वायवीय वचनांत होम शब्द आहे तो पिंडपितृयज्ञाचा बोधक आहे . कारण , " पिंडपितृयज्ञांतील होम दक्षिणाग्नीवर करावा , श्राद्धांतील होम औपासनाग्नीवर करावा , निरग्निकानें लौकिकाग्नीवर करावा . अग्निरहितानें व ज्याची भार्या दूर आहे त्यानें पार्वणश्राद्ध प्राप्त असतां अग्निसंधान करुन होम करुन नंतर अग्नीचा उत्सर्ग ( त्याग ) करावा " असें त्रिकांडमंडनवचन आहे , म्हणून श्राद्धांत गृह्याग्नीवरच होम सांगितला आहे . निरग्निकाला लौकिकाग्नीचें वगैरे विधान हें तैत्तिरीयादिविषयक आहे . बह्वृचाचा तर निरग्निकाचाही हातावरच होम होतो . कारण , अग्नि व हस्त यांवांचून दुसरें विधान सूत्रांत सांगितलें नाहीं . आणि " अग्नीच्या अभावीं ब्राह्मणाच्या हस्तावर होम करावा " असें मनुवचनही आहे . सूत्रवृत्तींतही असेंच आहे .

क्कचित्साग्नेरपिपाणिहोमउक्तोगृह्यपरिशिष्टे अन्वष्टक्यंचपूर्वेद्युर्मासिमास्यथपार्वणं काम्यमभ्युदयेष्टम्यामेकोद्दिष्टंतथाष्टमं चतुर्ष्वाद्येषुसाग्नीनांवह्नौहोमोविधीयते पित्र्यब्राह्मणहस्तेस्यादुत्तरेषुचतुर्ष्वपीति एकोद्दिष्टंसपिंडीकरणं शुद्धेतन्निषेधात् ‍ बह्वृचभाष्यकारास्तुसर्वैकोद्दिष्टेषुपाणिहोममाहुः इदंबह्वृचानामेव अत्रेदं तत्त्वम् ‍ स्थालीपाकेनसहपिंडार्थमुद्धृत्येतिसूत्रे नात्रापूर्वः स्थालीपाकश्चोद्यते सर्वश्राद्धेषुप्रसंगात्तेनानुवादोयमिति वृत्तिकारोक्तेः पार्वणेआर्थिकस्यानंगस्यव्यतिषंगस्यवार्षिकादिष्वनतिदेशादर्धाधानिनोपिपाणिहोमएवेतिवृत्तिस्वरसः एवंमासिकादावपि षोडशेमासिकेश्राद्धेसपिंडीकरणेतथा पाणावेवतुहोतव्यमन्यत्राग्नौतुहूयतेइतिबोपदेवोदाह्रतवचनाच्च भाष्यकारमतेतु सूत्रेस्थालीपाकेनेतिकरणत्वान्नित्यवच्छ्रवणाच्चपार्वणे सांगं ततः काम्यादिषुतदभावेकार्यस्यपिंडदानस्याप्यभावः एतदेवानुसृत्यविकृतावपिवार्षिकादौव्यतिषंगउक्तः प्रयोगपारिजातेपरिशिष्टेच तेनैतन्मतेऽर्धाधानिनोग्नावेव वस्तुतस्तुस्थालीपाके सहशाखयाप्रस्तरं प्रहरतीतिवत्सहभावमात्रश्रुतेः पत्नीवतेत्वष्टुरुपलक्षणमिवनांगत्वम् ‍ तत्त्वेवानांगानुरोधेनप्रधानभूतपिंडदानत्यागोयुक्तः तेनव्यतिषंगाभावेप्यग्नौहोमोभवतीतिबोपदेवः अनाहिताग्नेर्गृह्याग्निमतस्तुसर्वमतेग्नावेव वार्षिकादौवृत्तिमतेव्यतिषंगोन अन्यमतेत्वस्ति अत्रयथाचारमनुष्ठेयं ।

क्कचित् ‍ श्राद्धांत साग्निकालाही पाणिहोम गृह्यपरिशिष्टांत सांगितला आहे . तो असा - " अन्वष्टक्यश्राद्ध , पूर्वेद्युः श्राद्ध , मासिमासिश्राद्ध , पार्वणश्राद्ध , काम्यश्राद्ध ( पंचमीस पुत्रकामाला इत्यादि ), अभ्युदयश्राद्ध ( वृद्ध्यादिनिमित्त ), अष्टमीश्राद्ध , आणि आठवें एकोद्दिष्ट . याप्रमाणें हीं आठ श्राद्धें आहेत त्यांमध्यें पहिल्या चार श्राद्धांत साग्निकांना अग्नींत होम सांगितला आहे . आणि पुढच्या चार श्राद्धांत ब्राह्मणांच्या हस्तावर होम सांगितला आहे . " येथें एकोद्दिष्ट म्हणजे सपिंडीकरण समजावें . कारण , केवळ एकोद्दिष्टांत पाणिहोमाचा निषेध आहे . बह्वृचभाष्यकार तर सर्व एकोद्दिष्टांत पाणिहोम सांगतात . हें सांगितलेलें बह्वृचांनाच समजावें . येथें खरा प्रकार म्हणजे असा आहे कीं , " स्थालीपाकेन सह पिंडार्थमुद्धृत्य " ह्या आश्वलायन सूत्राचे ठायीं ‘ या ठिकाणीं अपूर्व स्थालीपाक सांगत नाहीं . कारण , जर स्थालीपाक अपूर्व सांगितला तर सर्व श्राद्धांत स्थालीपाकाची पाकाची प्रसक्ति होईल , याकरितां पूर्वी सिद्ध असलेल्या स्थालीपाकाचा येथें सूत्रकारानें अनुवाद केला आहे ’ असें वृत्तिकारानें सांगितलें आहे म्हणून पार्वणाचे ठायीं अंगभूत नसून आर्थिक प्राप्त झालेला जो व्यतिषंग ( उभयोः सहानुष्ठान ) त्याचा वार्षिकादि श्राद्धांत अतिदेश नाहीं म्हणून अर्धाधानीला देखील पाणिहोमच आहे , असें वृत्तीचें स्वारस्य समजावें . याप्रमाणें मासिकादिक श्राद्धांतही पाणिहोम समजावा ; कारण , " षोडश मासिकश्राद्धें , सपिंडीकरण यांचे ठायीं हातावरच होम करावा ; इतरत्र अग्नींत होम " असें बोपदेवानेंही वचन सांगितलें आहे . भाषकाराच्या मतीं तर - सूत्रांत ‘ स्थालीपाकेन ’ असें सांगितलें म्हणून स्थालीपाकाला करणत्व आहे व तो नित्यासारखा श्रुत आहे म्हणून पार्वणश्राद्धांत स्थालीपाक हा अंग आहे . काम्यादिक श्राद्धांत त्या स्थालीपाकाचा अभाव आहे म्हणून त्याचें कार्य जें पिंडदान त्याचाही अभाव आहे . यालाच अनुसरुन पार्वणश्राद्धाची विकृतिरुप जें वार्षिकादिक श्राद्ध त्या ठिकाणीं देखील प्रयोगपारिजातांत परिशिष्टांत व्यतिषंग सांगितला आहे . त्यावरुन भाष्यकाराच्या मतीं अर्धाधानीला अग्नीवरच होम आहे . वास्तविक म्हटलें असतां जसें - ‘ सह शाखया प्रस्तरं प्रहरति ’ ह्या वाक्यानें पलाशशाखेसहवर्तमान प्रस्तराचा त्याग आहवनीय अग्नींत सांगितला आहे , तेथें शाखेला अंगत्व नाहीं , त्याप्रमाणें येथें स्थालीपाकाला सहभावमात्र श्रवण आहे . अंगत्व नाहीं . पात्नीवत म्हणून एक ग्रह ( सोमपात्र ) आहे , त्या ठिकाणीं जसें - सोमपानाविषयीं त्वष्टेचें उपलक्षण होत नाहीं , तसें येथेंही स्थालीपाकाला अंगत्व नाहीं . अथवा स्थालीपाकाला अंगत्व मानलें तरी त्या अंगानुरोधानें ( अंगभूत स्थालीपाकाच्या अभावानें ) श्राद्धांत प्रधानभूत जें पिंडदान त्याचा त्याग करणें योग्य नाहीं . म्हणून व्यतिषंगाच्या अभावीं देखील अग्नींत होम होतो , असें बोपदेव सांगतो . आहिताग्नि नसून गृह्याग्निमान् ‍ त्याचा सर्वमतीं अग्नींतच होम . वार्षिकादिक श्राद्धांत वृत्तिकाराच्या मतीं व्यतिषंग नाहीं , इतरांच्या मतीं आहे . येथें जसा आचार असेल तसें करावें .

आश्वलायनः उद्धृत्यघृताक्तमन्नमनुज्ञापयत्यग्नौकरिष्येकरवैकरवाणीतिवाप्रत्यभ्यनुज्ञाक्रियतांकुरुष्वकुर्वित्यथाग्नौजुहोतियथोक्तंपुरस्तादिति व्यतिषंगपक्षेइदमितिवृत्तिः करवैकरवाणीत्यत्राग्नावित्यनुषंगः पुरस्तात् ‍ पिंडपितृयज्ञे तच्चैवं मेक्षणेनावदायावदानसंपदाजुहुयात्सोमायपितृमतेस्वधानमोग्नयेकव्यवाहनायस्वधानमइति स्वाहाकारेणवाग्निंपूर्वंयज्ञोपवीतीमेक्षणमनुप्रह्रत्येति अवदानसंपदाउपस्तरणाद्यपेक्षयेत्यर्थः व्यतिषंगपक्षे अतिप्रणीतेयंहोमोन्यथामुख्ये अतिप्रणीतेग्नाविध्ममुपसमाधायेतिबह्वृचपरिशिष्टात् ‍ केचित्तस्यरक्षोनिबर्हणार्थत्वान्मुख्येवदंति तदेतद्विरोधाच्चिंत्यम् ‍ प्रयोगपारिजातेप्येवम् ‍ शौनकः स्वाहाकारेणहोमेतुभवेद्यज्ञोपवीतवान् ‍ तत्रप्रागग्नयेहुत्वापश्चात्सोमायहूयते अग्नौयज्ञोपवीत्येवप्रक्षिपेन्मेक्षणंततः छंदोगपरिशिष्टे अग्नौकरणहोमश्चकर्तव्यउपवीतिना अपसव्येनवाकार्योदक्षिणाभिमुखेनच कातीयानांत्वपसव्यमेव पिंडपितृयज्ञवत् ‍ हुत्वेतिसर्वातिदेशात् ‍ सव्यंतुछंदोगपरम् ‍ गोभिलेनैतदुत्तरमेवापसव्योक्तेः छंदोगाजुहुयुः सव्येनापसव्येनयाजुषाइतिवृद्धयाज्ञवल्क्योक्तेश्च ।

आश्वलायन - " भात पात्रावर घेऊन त्याजवर घृत घालून ‘ अग्नौकरिष्ये ’ किंवा ‘ अग्नौकरवै ’ अथवा ‘ अग्नौकरवाणि ’ अशी ब्राह्मणांकडे अनुज्ञा मागावी ; नंतर ब्राह्मणांनीं अनुक्रमानें ‘ क्रियतां ’ किंवा ‘ कुरुष्व ’ अथवा ‘ कुरु ’ अशी अनुज्ञा द्यावी . नंतर पूर्वीं ( पिंडपितृयज्ञांत ) सांगितल्याप्रमाणें अग्नींत होम करावा " व्यतिषंगपक्षीं हें अग्नौकरण , असें वृत्तिकार सांगतो . पूर्वीं सांगितलेलें तें असें - " मेक्षण म्हणजे भात घेण्याचें चमच्यासारखें लांकडाचें पात्र त्यानें अवदान घेऊन अवदानसंबंधी उपस्तरणादिक करुन पुढील मंत्रांनीं होम करावा . ते मंत्र असे - ‘ सोमाय पितृमते स्वधानमः ’ ‘ अग्नये कव्यवाहनाय स्वधानमः ’ या मंत्रांनीं होम करावा . अथवा ‘ स्वधा ’ शब्दाच्या स्थानीं ‘ स्वाहा ’ शब्द उच्चारुन अग्नीला पूर्वीं व सोमाला नंतर होम करावा , त्या वेळीं यज्ञोपवीती असावी आणि मेक्षणाचें अग्नींत अनुप्रहरण ( त्याग ) करावें . " व्यतिषंगपक्षीं अतिप्रणीत अग्नींत हा होम , अतिप्रणीत नसेल तर मुख्याग्नीवर होम ; कारण , " अतिप्रणीत अग्निवर इध्माचें उपसमाधान करुन इत्यादि " असें बह्वृचपरिशिष्टांत आहे . केचित् ‍ ग्रंथकार - तो अतिप्रणीत अग्नि राक्षसांच्या नाशाकरितां आहे म्हणून मुख्याग्नीवर होम , असें सांगतात . तें केचिन्मत ह्या वरील परिशिष्टमतास विरुद्ध आहे . म्हणून चिंत्य ( मूलशून्य ) आहे . प्रयोगपारिजातांतही असेंच आहे . शौनक - " स्वाहाकारानें होम करीत असतां यज्ञोपवीती असावी . व तेथें पूर्वीं अग्नीला होम करुन पश्चात् ‍ सोमाला होम करावा . यज्ञोपवीती असूनच अग्नींत मेक्षणाचा प्रक्षेप करावा . " छंदोगपरिशिष्टांत - " अग्नौकरणहोम उपवीतीनें करावा अथवा दक्षिणाभिमुख होऊन अपसव्यानें करावा . " कातीयांना तर अग्नौकरणाविषयीं अपसव्यच आहे ; कारण , ‘ पिंडपितृयज्ञवत् ‍ हुत्वा ’ ह्या पदानें पिंडपितृयज्ञाच्या सर्व धर्माचा अतिदेश केलेला आहे . वरील वचनांत सव्य जें सांगितलें तें छंदोगविषयक आहे . कारण , गोभिलानें - अग्नौकरणोत्तरच अपसव्य सांगितलें आहे . आणि " छंदोगांनीं सव्यानें होम करावा व याजुषांनीं अपसव्यानें होम करावा " असें वृद्धयाज्ञवल्क्यवचनही आहे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:21.9570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

cognitive judgement

 • न. ज्ञानविधान 
RANDOM WORD

Did you know?

पुष्पे पत्रे, किती काळाने शिळी ( निर्माल्य ) होतात ? पूजेत वापरू नयेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.