मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धाचे अनुकल्प

तृतीय परिच्छेद - श्राद्धाचे अनुकल्प

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां श्राद्धाचे अनुकल्प सांगतो -

अथानुकल्पाः तत्रविप्रालाभे भोजयेदंथवाप्येकंब्राह्मणंपंक्तिपावनं दैवेकृत्वातुनैवेद्यंपश्चात्तस्यतुनिर्वपेदितिशंखोक्तेरेकोविप्रः पूर्वमुक्तः विप्राभावेदर्भबटुः निधायवादर्भबटूनासनेषुसमाहितः प्रेषानुप्रेषसंयुक्तं विधानंप्रतिपादयेदितिदेवलोक्तेः अशक्तावामश्राद्धं आपद्यनग्नौतीर्थेचप्रवासेपुत्रजन्मनि आमश्राद्धंप्रकुर्वीतभार्यारजसिसंक्रमेइति कात्यायनोक्तेः पृथ्वीचंद्रोदयेजमदग्निः यावत्स्यान्नाग्निसंयुक्तउत्सन्नाग्निरथापिवा आमश्राद्धंतदाकुर्याद्धस्तेग्नौकरणंभवेत् ‍ कौर्मे अनग्निरधनोवापितथैवव्यसनान्वितः आमश्राद्धं द्विजः कुर्याद्वृषलस्तुसदैवहि आहिताग्नौप्रवासस्थेतत्पत्नीगृहेदर्शंऋत्विगादिनाकारयेत् ‍ अमावास्यादिनियतं प्रोषितेधर्मचारिणी पत्यौतुकारयेन्नित्यमन्येनाप्यृत्विगादिनेतिलघुहारीतोक्तेरितिपृथ्वीचंद्रोदयः आदिपदमाब्दिकादिसर्वपार्वणपरमितिशूलपाणिः सुमंतुः पाकाभावेधिकारः स्याद्विप्रादीनांनराधिप अपत्नीनांमहाबाहोविदेशगमनादिभिः सदाचैवतुशूद्राणामामश्राद्धंविदुर्बुधाः प्रचेताः स्त्रीशूद्रः स्वपचश्चैवजातकर्मणिचाप्यथ आमश्राद्धंसदाकुर्याद्विधिनापार्वणेनतु स्वयंपचतीतिस्वपचः विष्णूशनसौ आत्मनोदेशकाला भ्यांविप्लवेसमुपस्थिते आपद्यनग्नौतीर्थेचप्रवासेपत्न्यसंभवे चंद्रसूर्यग्रहेचैवदद्यादामंविशेषतः नपक्कंभोजयेद्विद्वान् ‍ सच्छूद्रोपिकदाचन भोजयन्प्रत्यवायीस्यान्नचतस्यफलंलभेत् ‍ अत्रप्रवासतीर्थग्रहणादावामहेमश्राद्धमेव पाकश्राद्धंतुनभवत्येवेतिहेमाद्रिरत्नावल्यादयः अपरार्कविज्ञानेश्वरादयस्तु पाकाभावेद्विजातीनामामश्राद्धंविधीयतइतिसुमंतूक्तेः साग्निकैर्निरग्निकैश्चप्रवासादौसर्वत्रपाकाभावेआमादिकार्यम् ‍ पाकसंभवेत्वन्नेनैवेत्याहुः अतएवपाकश्राद्धमुक्त्वा एतच्चानुपनीतोपिकुर्यात्सर्वेषुकर्मसु भार्याविरहितोप्येतत्प्रवासस्थोपिनित्यशइतिमात्स्येनिरग्नेरपिपाकेनोक्तमितिशूलपाणिकल्पतरु एतच्छब्दः श्राद्धमात्रपरइत्यन्ये एकोद्दिष्टंतुकर्तव्यंपाकेनैवसदास्वयमितिलघुहारीतीयमपिसाग्नेरेव निरग्नेर्महैकोद्दिष्टमप्यामेन शूद्रस्यतुदशाहपिंडाद्यामेनेतिहलायुधः उत्सन्नाग्नीनांत्वामश्राद्धमेव पूर्वोक्तजमदग्निवाक्यात् ‍ मरीचिः श्राद्धविघ्नेद्विजातीनामामश्राद्धंप्रकीर्तितं अमावास्यादिनियतंमाससंवत्सरादृते स्मृतिदर्पणे मृताहंचसपिंडंचगयाश्राद्धंमहालयं आपन्नोपिनकुर्वीतश्राद्धमामेनकर्हिचित् ‍ ।

श्राद्धाचेठायीं ब्राह्मण मिळत नसतील तर " अथवा देवांना नैवेद्य करुन नंतर पंक्तिपावन अशा एका ब्राह्मणाला भोजन घालावें " असें शंखवचन आहे . म्हणून एक ब्राह्मण सांगावा , असें पूर्वीं सांगितलें आहे . ब्राह्मणांच्या अभावीं दर्भबटु ( चट ) करावा . कारण , " समाहित अंतः करणानें आसनाचेठायीं दर्भबटु ठेऊन वचन - प्रतिवचन यांनीं युक्त सर्व श्राद्धाचा विधि करावा " असें देवलवचन आहे . पक्कान्नश्राद्धाविषयीं शक्ति नसतां आमश्राद्ध करावें . कारण , " आपत्कालीं , विवाहाग्नीच्या अभावीं ( भार्याभावीं ), तीर्थांत , प्रवासांत , पुत्रजन्मकालीं , भार्या रजस्वला असतां आणि संक्रांतीस , इतक्या ठिकाणीं आमश्राद्ध करावें " असें कात्यायनवचन आहे . पृथ्वीचंद्रोदयांत जमदग्नि - " जोंपर्यंत अग्नियुक्त झाला नाहीं ( विवाह झाला नाहीं ) तोंपर्यंत अथवा भार्या मृत झाल्यानें अग्नि उच्छिन्न झाला असेल त्या वेळीं आमश्राद्ध करावें , आणि हस्तावर अग्नौकरण करावें . " कूर्मपुराणांत - " अग्निरहित , अथवा द्रव्यरहित , तसाच संकटयुक्त अशा द्विजानें आमश्राद्ध करावें . शूद्रानें तर सर्वदा आमश्राद्धच करावें . " अग्निहोत्री प्रवासांत असतां त्याच्या पत्नीनें घरीं ऋत्विक् ‍ इत्यादिकांकडून दर्शश्राद्ध करवावें . कारण , " पति प्रवासास गेला असतां पत्नीनें नियमित असें अमावास्यादिकश्राद्ध ऋत्विक् ‍ इत्यादिकांकडून सदा करवावें " असें लघुहारीतवचन आहे , असें पृथ्वीचंद्रोदय सांगतो . ह्या वचनांतील ‘ अमावास्यादिया आदिपदानें सांवत्सरिक इत्यादि सारें पार्वण समजावें , असें शूलपाणि सांगतो . सुमंतु - " परदेशगमन इत्यादि कारणांनीं पत्नीरहित अशा ब्राह्मणादिकांस पाकाच्या अभावीं आमश्राद्धाविषयीं अधिकार आहे . शूद्रांना तर विद्वानांनीं सर्वदा आमश्राद्धच सांगितलें आहे . " प्रचेता - " स्त्रिया , शूद्र , व स्वतः पाक करणारा , यांनीं आणि सर्वांनीं जातकर्मसंस्कारांत सर्वदा पार्वणविधीनें आमश्राद्ध करावें . " विष्णु उशना - ‘‘ देशाच्या योगानें व कालाच्या योगानें आपला विनाश झाला असतां , आपत्कालीं , अग्नि नसतां , तीर्थाचेठायीं , प्रवासांत , पत्नीच्या अभावीं , चंद्राच्या व सूर्याच्या ग्रहणांत विशेषेंकरुन आमश्राद्ध करावें . सच्छूद्रानेंही ब्राह्मणांस कधीं पक्कान्नाचें भोजन घालूं नये ; भोजन घालील तर तो दोषी होईल व त्यास भोजनाचें फळ मिळणार नाहीं . " येथें प्रवास , तीर्थ , ग्रहण इत्यादिकांचेठायीं आमश्राद्ध व हिरण्यश्राद्धच होतें . पक्कान्नश्राद्ध तर होतच नाहीं ; असें हेमाद्रि , रत्नावली इत्यादि ग्रंथकार सांगतात . अपरार्क , विज्ञानेश्वर इत्यादिक तर - " पाकाच्या अभावीं ब्राह्मणादिकांना आमश्राद्ध सांगितलें " अशा सुमंतूच्या वचनावरुन साग्निकांनीं व निरग्निकांनीं प्रवासादिकांत सर्वत्र ठिकाणीं पाकाच्या अभावीं आमश्राद्ध वगैरे करावें . पाकाचा संभव असतां अन्नानेंच करावें , असें सांगतात . म्हणूनच पाकश्राद्ध सांगून " अनुपनीतानेंही सर्व कर्मांमध्यें हें ( पाक ) श्राद्ध करावें , आणि भार्यारहितानें व प्रवासांत असणारानेंही हें पाकश्राद्ध सर्वदा करावें " असें मत्स्यपुराणांत निरग्निकाला देखील पाकानें श्राद्ध सांगितलें आहे , असें शूलपाणि कल्पतरु हे सांगतात . वचनांतील ‘ एतत् ‍ ’ या शब्दानें सर्वप्रकारचें श्राद्ध समजावें , असें इतर ग्रंथकार सांगतात . " एकोद्दिष्ट तर सर्वदा स्वतः पाकानेंच करावें " हें लघुहारीतानें सांगितलेलेंही साग्निकालाच आहे . निरग्निकाला महैकोद्दिष्टही आमानेंच समजावें . शूद्राला तर दशाहांतील पिंड वगैरे आमानेंच समजावे , असें हलायुध सांगतो . ज्यांच्या भार्या मृत झाल्यानें अग्नि उच्छिन्न झाला असेल त्यांनीं आमश्राद्धच करावें ; कारण , याविषयीं पूर्वीं ( यावत्स्यान्नाग्नि० ) हें जमदग्नीचें वचन उक्त आहे . मरीचि - " द्विजांना पाकश्राद्धाविषयीं विघ्न प्राप्त असतां आमश्राद्ध सांगितलें आहे . जें श्राद्ध ज्या तिथीस नियमित ( अंतरित झालें असतां लुप्त होतें ) अशा अमावास्यादि श्राद्धाविषयीं हें आमश्राद्ध समजावें . मासिक , सांवत्सरिक यांविषयीं हें आमश्राद्ध समजूं नये . " स्मृतिदर्पणांत - " सांवत्सरिक , सपिंडीकरण , गयाश्राद्ध आणि महालय हीं श्राद्धें आपत्कालीदेखील कधींही आमान्नानें करुं नयेत . "

हेमाद्रौव्यासः आमंददतुकौंतेयदद्यादामंचतुर्गुणं द्विगुणंत्रिगुणंवापिनत्वेकगुणमर्पयेत् ‍ सिद्धान्नेतुविधिर्यः स्यादामश्राद्धेप्यसौविधिः आवाहनादिसर्वंस्यात्पिंडदानंचभारत दद्याद्यच्चद्विजातिभ्यः श्रृतंवाश्रृतमेववा तेनाग्नौकरणंकुर्यात्पिंडांस्तेनैवनिर्वपेत् ‍ पक्षांतरमाह सएव आमंददद्धिकौंतेयतदामंद्विगुणंचरेत् ‍ त्रिगुणंचतुर्गुणंवापिनत्वेकगुणमर्पयेत् ‍ स्मृत्यर्थसारेसममप्युक्तं षटत्रिंशन्मते आमश्राद्धंयदाकुर्यात्पिंडदानंकथंभवेत् ‍ गृहपाकात्समुद्धृत्यसक्तुभिः पायसेनवा पिंडान्दद्याद्यथालाभंतिलैः सहविमत्सरः पृथ्वीचंद्रोदयेव्यासः आमश्राद्धंयदाकुर्याद्विधिज्ञः श्राद्धदः सदा हस्तेग्नौकरणंकुर्याद्ब्राह्मणस्यविधानतः एतत्साग्नेर्निरग्नेः सदातत्सत्त्वात् ‍ यत्तु आमेनपिंडंदद्याच्चेद्विप्रान्पाकेनभोजयेत् ‍ पक्केनकुरुतेपिंडमामान्नंयः प्रयच्छति तावुभौमनुजौप्रोक्तौनरकार्हौनसंशयइति तद्दर्शादिपरं देशाचाराव्द्यवस्थेतियुक्तं मरीचिः आवाहनेस्वधाकारेमंत्राऊह्याविसर्जने अन्यकर्मण्यनूह्याः स्युरामश्राद्धविधिः स्मृतः आवाहने हविषेअत्तवइत्यत्रस्वीकर्तवेइत्यूहः स्वधाकारेनमोवः पितरइषेइत्यत्रइषेपदस्थानेआमद्रव्यायेत्यूहः विसर्जनेवाजेवाजेइत्यत्रतृप्ताइतिस्थानेतर्प्स्यततृप्यतेतिवोहः यद्यपितस्मादृचंनोहेदितिऋच्यूहोनिषिद्धः तथापिवचनाद्भवति तृप्तिप्रश्नोवगाहश्चजुषप्रश्नोयथासुखं आमश्राद्धेभवेन्नैतदपोशानंचपंचमं अयंचानुवादः खलेवाल्यांछेदनादीनामिवार्थाभावाल्लोपसिद्धेः ।

हेमाद्रींत व्यास - " श्राद्धाचे ठायीं आमान्न देऊं द्या , पण तें आमान्न जितकें भोजनाला पाहिजे तितकेंच देऊं नये ; तर चौपट , दुप्पट , अथवा तिप्पट द्यावें . पक्कान्नश्राद्धाविषयीं जो विधि सांगितला आहे ; तोच विधि आमश्राद्धाविषयीं समजावा . आवाहन इत्यादि सर्व विधि व पिंडदान हें आमश्राद्धांत करावें . ब्राह्मणांस जें कांहीं पक्क किंवा अपक्क ( आम ) अन्न दिलें असेल त्यानेंच अग्नौकरण करावें , व पिंडही त्याच अन्नानें द्यावे . " दुसरा पक्ष सांगतो - तोच ( व्यास ) - " आम देणारा जो त्यानें तें दान दुप्पट , तिप्पट किंवा चौपट करावें . एकपट करुं नये . " स्मृत्यर्थसारांत समही ( जितकें भोजनास पाहिजे तितकेंही ) आमदान सांगितलें आहे . षटत्रिंशन्मतांत - " जेव्हां आमश्राद्ध करील तेव्हां पिंडदान कसें होईल ? तर घरांत शिजविलेलें अन्न , पीठ किंवा पायस यांतून जें मिळेल तें घेऊन तिलांसहित त्याचे पिंड करुन ते द्यावे . " पृथ्वीचंद्रोदयांत व्यास - " श्राद्धकर्ता जेव्हां आमश्राद्ध करील तेव्हां त्यानें ब्राह्मणाच्या हातावर यथाविधि अग्नौकरण करावें . " हें साग्निकाला समजावें . निरग्निकाला सर्वदा ( पक्कान्नश्राद्धांतही ) ब्राह्मणांच्या हातावरच अग्नौकरण आहे . आतां जें " जो पक्कान्नानें ब्राह्मणांना भोजन घालील व आमानें पिंड देईल तो , आणि जो आमान्न ब्राह्मणांना देईल व पक्कान्नानें पिंड करील तो , हे दोन्ही मनुष्य नरकास जाण्यास योग्य आहेत , यांत संशय नाहीं . " असें आमान्न ब्राह्मणांस दिल्यावर पक्कान्नपिंड निषेध सांगितला तो दर्श इत्यादि विषयक समजावा . देशाचारावरुन व्यवस्था समजावी . हें योग्य आहे . मरीचि - " आवाहन , स्वधाकार , आणि विसर्जन इतक्या ठिकाणीं आलेल्या मंत्रांचा ऊह करावा . इतर ठिकाणीं ऊह करुं नये , हा आमश्राद्धविधि समजावा . " आवाहनाचे ठिकाणीं ‘ पितृन्हविषे अत्तवे ’ या मंत्रांत ‘ हविषे स्वीकर्तवे ’ असा ऊह समजावा . स्वधाकाराचे ठिकाणीं ‘ नमोवः पितर इषे० ’ या मंत्रांत ‘ इषे ’ या पदाच्या स्थानीं ‘ आमद्रव्याय ’ असा ऊह समजावा . विसर्जनाचे ठिकाणीं ‘ वाजेवाजे० ’ या मंत्रांत ‘ तृप्ता ’ या पदाच्या स्थानीं ‘ तर्प्स्यत ’ किंवा ‘ तृप्यत ’ असा ऊह समजावा . जरी ‘ ऋचेचा ऊह करुं नये ’ ह्या वचनानें ऋचेचे ठायीं ऊह निषिद्ध आहे तरी , या ठिकाणीं करावा , या वचनानें ऊह होतो . " आमश्राद्धाचे ठायीं ‘ तृप्ताः स्थ ’ हा तृप्तिअप्रश्न , अन्नांत अंगुष्ठमूलावगाहन , ‘ जुषध्वं ’ हा जुषप्रश्न ‘ यथासुखं ’ हें वाक्य , आणि आपोशन हीं पांच होत नाहींत . " आमश्राद्धांत पक्कान्न नसल्यामुळें ह्या पांचांचा निषेध हा अपूर्व नाहीं , तर सिद्धाचा अनुवाद आहे . कारण , साद्यस्कनांवाचा एक याग आहे , त्या यागामध्यें खलेवाली यूप ( पशुबंधनस्तंभ ) सांगितला आहे . खलेवाली म्हणजे शेतकरी लोकांनीं खळ्यांत बैल बांधण्याकरितां पुरलेला जो स्तंभ ती खलेवाली होय . तिच्या ठिकाणीं पशुबंधनादिक यूपाचीं कार्यै सांगितलीं आहेत . तो स्तंभ शेतकर्‍यांनीं तासून वगैरे तयार केलेलाच असतो म्हणून त्या ठिकाणीं छेदनादिक कार्यै कर्तव्य नसल्यामुळें जसा त्यांचा लोप ( अभाव ) सिद्ध होतो , तसा येथें भोजन नसल्यामुळें तृप्त्यादिकांचा अभाव असल्यामुळें तृप्तिप्रश्नादिकांचा लोप सिद्ध झाला आहे .

धर्मप्रदीपेतु आमंचतुर्गुणंदद्यादथवाद्विगुणंतथा हेमचाष्टगुणंतद्वदामेहैमेप्यसौविधिः आमेहैमेतथानित्येनांदीश्राद्धेतथैवच व्यतीपातादिकेश्राद्धेनियमान्परिवर्जयेत् ‍ गृहपाकात्समुद्धृत्यसक्तुभिः पायसेनवा पिंडदानंप्रकुर्वीतआमेहैमेकृतेसति आमश्राद्धेचवृद्धौचप्रेतश्राद्धेतथैवच विकिरंनैवकुर्वीतमुनिः कात्यायनोब्रवीत् ‍ आमश्राद्धमनंगुष्ठमग्नौकरणवर्जितं तृप्तिप्रश्नविहीनंतुकर्तव्यंमानवैर्ध्रुवम् ‍ आवाहनाग्नौकरणंविकिरंपात्रपूरणं तृप्तिप्रश्नंनकुर्वीतआमेहैमेकदाचनेत्युक्तं एतच्च आवाहनंभवेत्कार्यमर्घ्यदानंतथैवचेतिहेमाद्रौभविष्यादिविरोधाच्चिंत्यम् ‍ शाखांतरविषयंवास्तु विकिरोप्यामेनेतिहेमाद्रिः शूद्रस्यतुतत्रैवोक्तम् ‍ अग्नौकरणमंत्रश्चनमस्कारोविधीयते अग्नयेकव्यवाहनायनमः सोमायपितृमतेनमइत्ययंमंत्रः मात्स्ये मंत्रवर्जंहिशूद्रस्यसर्वमेवविधीयते एवंशूद्रोपिसामान्यंवृद्धिश्राद्धंचसर्वदा नमस्कारेणमंत्रेणकुर्यादामान्नवद्बुधः तच्चपूर्वाह्णेकार्यम् ‍ आमश्राद्धंतुपूर्वाह्णेएकोद्दिष्टंचमध्यतः पार्वणंचापराह्णेतुप्रातर्वृद्धिनिमित्तकमितिहारीतोक्तेः एतद्दिजविषयं शूद्रकर्तृकंत्वपराह्णएव मध्याह्नात्परतोयस्तुकुतुपः समुदाह्रतः आमश्राद्धंतुतत्रैवपितृणांदत्तमक्षयमितिसुमंतूक्तेरित्यपरार्केहेमाद्रौचोक्तम् ‍ ॥

धर्मप्रदीपांत - " श्राद्धाचे ठायीं आम द्यावयाचें असतां जितकें अन्न भोजनाला लागतें त्याच्या चौपट आमान्न द्यावें , किंवा द्विगुणित द्यावें . हेम ( द्रव्य ) द्यावयाचें असतां तें आठपट द्यावें . आमश्राद्धांत जसा विधि तसा हेमश्राद्धांतही हा सर्व विधि समजावा . आमश्राद्ध , हेमश्राद्ध , नित्यश्राद्ध , नांदीश्राद्ध आणि व्यतीपातादिश्राद्ध यांचे ठिकाणीं नियम वर्ज्य करावे . आमश्राद्ध व हेमश्राद्ध केलें असतां घरांत शिजविलेल्या अन्नानें , पिठानें किंवा पायसानें पिंडप्रदान करावें . आमश्राद्धांत , वृद्धिश्राद्धांत आणि प्रेतश्राद्धांत , विकिर देऊं नये , असें कात्यायनमुनि सांगता झाला . अन्नांत अंगुष्ठनिवेशन , अग्नौकरण , तृप्तिप्रश्न यांनीं विवर्जित असें आमश्राद्ध करावें . आवाहन , अग्नौकरण , विकिर , अर्घ्यपात्रपूरण , आणि तृप्तिप्रश्न हीं आमश्राद्धांत व हेमश्राद्धांत करुं नयेत " असें ( धर्मप्रदीपांत ) सांगितलें आहे . " आवाहन तसेंच अर्घ्यदान करावें " असें हेमाद्रींत भविष्यपुराणादिवचन आहे , त्याच्याशीं विरोध येतो म्हणून हें धर्मप्रदीपकारानें सांगितलेलें चिंत्य ( अनादरणीय ) आहे . अथवा इतर शाखाविषयक असो . आमश्राद्धांत विकिरही आमानें द्यावा , असें हेमाद्रि सांगतो . शूद्राला तर तेथेंच सांगितलें आहे . " शूद्राला अग्नौकरणाचा मंत्र नमस्कार सांगितला आहे " तो असा - ‘ अग्नये कव्यवाहनाय नमः , सोमाय पितृमते नमः ’ हा मंत्र समजावा . मात्स्यांत - " शूद्राला मंत्रवर्जित सर्व श्राद्धविधि सांगितला आहे . इतरांप्रमाणें शूद्रानें देखील सामान्यश्राद्ध व वृद्धिश्राद्ध नमस्कारमंत्रानें आमश्राद्धाप्रमाणें सर्वदा करावें " तें आमश्राद्ध पूर्वाह्णीं करावें . कारण , " आमश्राद्ध पूर्वाह्णीं , एकोद्दिष्ट मध्याह्नीं , पार्वणश्राद्ध अपराह्णीं आणि वृद्धिनिमित्तक ( नांदीश्राद्ध ) प्रातःकालीं करावें , " असें हारीतवचन आहे . हें द्विजांविषयीं समजावें . शूद्रानें करावयाचें श्राद्ध तर अपराह्णींच करावें . कारण , " मध्याह्नाच्या पुढें जो कुतुप मुहूर्त सांगितला आहे , त्या मुहूर्ताचेठायीं आमश्राद्ध करावें . त्या वेळीं पितरांस दिलेलें आमान्न अक्षय होतें " असें सुमंतुवचन आहे , असें अपरार्कांत हेमाद्रींत उक्त आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP