TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
तीर्थांत अस्थिप्रक्षेपाचा विधि

तृतीय परिच्छेद - तीर्थांत अस्थिप्रक्षेपाचा विधि

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


तीर्थांत अस्थिप्रक्षेपाचा विधि

आतां तीर्थांत अस्थिप्रक्षेपाचा विधि सांगतो .

अथतीर्थेस्थिक्षेपविधिः तत्रैव तत्स्थानाच्छनकैर्नीत्वाकदाचिज्जाह्नवीजले कश्चित्क्षिपतिसत्पुत्रो दौहित्रोवासहोदरः मातृकुलंपितृकुलंवर्जयित्वानराधमः अस्थीन्यन्यकुलस्थस्यनीत्वाचांद्रायणंचरेत् तत्रैव ब्रह्मांडपुराणे अस्थीनिमातापितृपूर्वजानांनयंतिगंगामपियेकथंचित् सद्बांधवस्यापिदयाभिभूतास्तेषांतुतीर्थानिफलप्रदानि स्नात्वाततः पंचगव्येनसिक्त्वाहिरण्यमध्वाज्यतिलैश्चयोज्य ततस्तुमृत्पिंडपुटेनिधायपश्यन्दिशंप्रेतगणोपरुढां नमोस्तुधर्मायवदेत्प्रविश्यजलंसमेप्रीतइतिक्षिपेच्च उत्थायभास्वंतमवेक्ष्यसूर्यंसदक्षिणांवि प्रमुखायदद्यात् एवंकृतेप्रेतपुरस्थितस्यस्वर्गेगतिः स्यात्तुमहेंद्रतुल्या यमः गंगातोयेषुयस्यास्थिक्षिप्यतेशुभकर्मणः नतस्यपुनरावृत्तिर्ब्रह्मलोकात्सनातनात् तथा अस्तंगतेगुरौशुक्रेतथामासेमलिम्लुचे गंगायामस्थिनिक्षेपंनकुर्यादितिगौतमः दशाहांतर्नदोषः दशाहस्यांतरेयस्यगंगातोयेस्थिमज्जति गंगायांमरणंयादृक्तादृक्फलमवाप्नुयादिति मदनरत्नेवृद्धमनूक्तेः ।

तेथेंच - " कोणी सत्पुत्र किंवा दौहित्र अथवा सहोदर भ्राता यानें त्या अस्थि ठेवलेल्या स्थानापासून घेऊन हळू हळू नेऊन भागीरथीच्या उदकांत कधीं तरी टाकाव्या . मातृकुल व पितृकुल वर्ज्य करुन इतर कुलाच्या अस्थि कोणी मनुष्य नेईल तर त्या अधमानें चांद्रायण प्रायश्चित्त करावें . " तेथेंच ब्रह्मांडपुराणांत - " जे गंगेस माता , पिता व त्यांचे पूर्वज यांच्या अस्थि कशातरी ( मोठ्या यत्नानें ) नेतात , आणि दयायुक्त होऊन उत्तम बांधवांच्याही नेतात , त्यांना तीर्थै फल देणारीं होतात . गंगेजवळ अस्थि नेल्यावर स्नान करुन अस्थींवर पंचगव्य शिंपून सुवर्ण , मध , तूप व तिळ हे त्या अस्थींत मिळवून नंतर मातीचे गोळ्यांत त्या अस्थि ठेऊन दक्षिण दिशेकडे पहात उदकांत प्रवेश करुन ‘ नमोस्तु धर्माय , स मे प्रीतः ’ असें म्हणून उदकांत अस्थि टाकाव्या . नंतर उदकांतून बाहेर येऊन सूर्याला पाहून ब्राह्मणश्रेष्ठाला दक्षिणा द्यावी . याप्रमाणें केलें असतां प्रेतनगरांत राहिलेला जो प्राणी त्याला स्वर्गांत इंद्रतुल्य गति ( स्थान ) मिळतें . " यम - " ज्या पुण्यवान् प्राण्याचे अस्थि गंगेच्या उदकांत टाकतात , त्या प्राण्याची सनातन ब्रह्मलोकापासून पुनः आवृत्ति ( मागें येणें ) होत नाहीं . " तसेंच - " गुरु व शुक्र यांचें अस्त असतां तसेंच मलमासांत गंगेच्या ठायीं अस्थि टाकूं नयेत , असें गौतम सांगतो . " दहा दिवसांचे आंत टाकण्याविषयीं हा गुरुशुक्रास्तादि दोष नाहीं . कारण , " ज्याचें अस्थि दहा दिवसांचे आंत गंगोदकांत पडतें त्याला गंगेचेठायीं मरण आलें असतां जसें फळ तसें फळ मिळतें " असें मदनरत्नांत वृद्धमनूचें वचन आहे .

शौनकः शौनकोहंप्रवक्ष्यामिअस्थिक्षेपविधिंक्रमात् आदौग्रामाद्वहिर्गत्वास्नानंकुर्यात्सचैलकं प्रोक्षयेत्पंचगव्येनभुवंमंत्रैर्विचक्षणः गायत्र्याद्यैः पंचगव्यमंत्रैर्निखातास्थिभूमिंप्रोक्षेदित्यर्थः उपसर्पादिभिर्मंत्रैः प्रार्थनखननंतथा मृत्तिकोद्धरणंचास्थांग्रहणंचयथाक्रमं उपसर्पेतिचतुर्भिर्मंत्रैः क्रमेणप्रार्थनादिज्ञेयं स्नात्वास्थि शुद्धिंकुर्वीतएतोन्विंद्रेतिसूक्ततः स्पृष्ट्वास्पृष्ट्वाततः स्नानंपंचगव्येनशुध्यति दशस्नानानिकुर्वीततत्तन्मंत्रैर्विचक्षणः गोमूत्रंगोमयंक्षीरंदधिसर्पिः कुशोदकं भस्ममृन्मधुवारीणिमंत्रतस्तानिवैदश कुशैः संमार्जयेदस्थीन्यतोदेवेतिमंत्रतः एतोन्विंद्रंशुचीवेतिनतमंहइतीतिच पावमानीर्ममाग्नेचरुद्रसूक्तंयथाक्रमं एतैः कुशैर्मार्जनम् हेमश्राद्धंततः कुर्यात्पितृनुद्दिश्ययत्नतः पिंडदानंप्रकुर्वीतततश्चतिलतर्पणं अस्थिक्षेपांगंचेदं अजिनंकंबलादर्भागोकेशाः शाणमेवच भूर्जपत्रंताडपत्रंसप्तधावेष्टनंस्मृतं हैमंचमौक्तिकंरौप्यंप्रवालंनीलकंतथा निक्षिपेदस्थिमध्येतुशुद्धिर्भवतिनान्यथा ततोहोमंप्रकुर्वीततिलाज्येनविचक्षणः उदीरतेतिसूक्तेनहुनेदष्टोत्तरंशतं ततोगत्वाक्षिपेत्तीर्थेस्पर्शदोषोनविद्यते मूत्रंपुरीषाचमनंकुर्वन्नास्थीनिधारयेत् अत्रदशदानंवैतरणीऋणमोक्षपापधेनुदानमुक्तं दिवोदासीयेकाशीखंडे धनंजयोपिधर्मात्मामातृभक्तिपरायणः आदायास्थीन्यथोमातुर्गंगामार्गस्थितोभवत् पंचगव्येनसंस्नाप्यतथापंचामृतेनवै यक्षकर्दमलेपेनक्षिप्त्वापुष्पैः प्रपूज्यच आवेष्ट्यनेत्रवस्त्रेणततः पट्टांबरेणच ततः सुरसवस्त्रेणततोमांजिष्ठवाससा नेपालकंबलेनाथमृदाचाथविशुद्ध्या ताम्रसंपुटकेकृत्वामातुरंगान्यथोवहेत् व्यासः पट्टवस्त्रंचकौशेयंमांजिष्ठंश्वेतवस्त्रकं कंबलंशाणपट्टंचअजिनंचतथोत्तरं एषांविकल्पः अन्यश्चात्रविशेषस्त्रिस्थलीसेतौदिवोदासीयेचज्ञेयः संचयनोत्तरंश्राद्धमाहाश्वलायनः श्राद्धमस्मैदद्युरिति स्मृत्यर्थसारेसंचयनेकृतेमनुष्यलोकात्प्रेतलोकंगच्छतः पाथेयश्राद्धमामेनकार्यमिति अनुपनीतस्यनसंचयनं ।

शौनक - " मी शौनक अस्थि टाकण्याचा विधि अनुक्रमानें सांगतों - आधीं गांवाचे बाहेर जाऊन वस्त्रसहित स्नान करावे . गायत्री इत्यादिक पंचगव्याच्या मंत्रांनीं पृथक् पंचगव्यानें अस्थि पुरुन ठेवलेल्या भूमीचें प्रोक्षण करावें . ‘ उपसर्प० ’ ह्या चार मंत्रांनीं अनुक्रमानें भूमीची प्रार्थना , खणणें , माती उपसणें , आणि अस्थिग्रहण करणें हीं एक एक मंत्रानें करावीं . नंतर स्नान करुन अस्थींची शुद्धि करावी ती अशी - अस्थींना स्पर्श करुन ‘ एतोन्विंद्रं ’ ह्या सूक्तानें पंचगव्येंकरुन पुनः पुनः स्नान करावें . नंतर पुनः स्पर्श करुन स्पर्श करुनच त्या त्या मंत्रांनीं दशस्नानें करावीं . तीं अशीं - गोमूत्र , गोमय , क्षीर , दहीं , घृत , कुशोदक , भस्म , मृत्तिका , मध व शुद्धोदक यांनीं दहा स्नानें त्या त्या मंत्रानें करावीं . नंतर पुढच्या मंत्रांनीं अस्थींवर कुशांनीं मार्जन करावें . ते मंत्र येणेंप्रमाणें - अतोदेवा . १ ऋचा , एतोन्विंद्र . ३ ऋ० , शुचीवो . ३ ऋ० , नतमंहो० १ सूक्त , इति वा इति मे० १ सूक्त , स्वादिष्ठया . १० ऋ० , ममाग्नेवर्चो . ९ ऋ० , कद्रुदाय . ९ ऋ० , ह्या मंत्रांनीं कुशांनीं मार्जन करावें . तदनंतर ज्याच्या अस्थी असतील त्याच्या उद्देशानें हिरण्यश्राद्ध करावें . पिंडदान करुन तिलतर्पण करावें . " हें श्राद्ध अस्थिप्रक्षेपाचें अंगभूत आहे . " अजिन , कंबल , दर्भ , गोकेश , तागाचें वस्त्र , भूर्जपत्र , ताडपत्र , यांनीं अस्थींवर सात वेष्टनें करावीं . सोनें , मोतीं , रुपें , प्रवाल , नीलमणि हीं अस्थींमध्यें घालावीं , म्हणजे अस्थींची शुद्धि होते , यावांचून शुद्धि होत नाहीं . तदनंतर ‘ उदीरतां ’ . ह्या सूक्तानें तिलघृताहुतींचा अष्टोत्तरशतसंख्याक होम करावा . तदनंतर अस्थि घेऊन जाऊन तीर्थांत टाकाव्या , म्हणजे स्पर्शदोष नाहीं . मूत्र , पुरीष , आचमन करतेवेळीं अस्थि जवळ घेऊं नयेत . " येथें दशदानें , वैतरणी , ऋणधेनु , मोक्षधेनु , पापधेनु यांचीं दानें सांगितलीं आहेत . दिवोदासीयांत काशीखंडांत - " धर्मात्मा असा धनंजयही मातेच्या भक्तीविषयीं तत्पर होत्साता मातेच्या अस्थि घेऊन गंगेच्या मार्गास गेला . त्या वेळीं त्यानें पंचगव्यानें व पंचामृतानें अस्थि धुवून यक्षकर्दमाचा लेप करुन फुलांनीं पूजा करुन सूक्ष्मवस्त्रानें वेष्टन करुन नंतर पट्टवस्त्रानें , नंतर सुरसवस्त्रानें , नंतर मंजिष्ठेनें रंगविलेल्या वस्त्रानें , नंतर शालवस्त्रानें वेष्टन करुन नंतर शुद्ध माती वर लावून तांब्याच्या संपुष्टांत त्या अस्थि ठेवून त्या मातेच्या अस्थि वाहता झाला . " व्यास - " पट्ट्वस्त्र ( पाटाव ), रेशमीवस्त्र , मंजिष्ठेनें रंगविलेलें वस्त्र , शुभ्रवस्त्र , धाबळी , तागाचें वस्त्र , आणि शेवटीं कृष्णाजिन , यांनीं वेष्टन करावें . " यांचा विकल्प समजावा . येथें इतर विशेष त्रिस्थलीसेतूंत आणि दिवोदासीयांत जाणावा . अस्थिसंचयनोत्तर श्राद्ध सांगतो आश्वलायन - " ज्याचें अस्थिसंचयन असेल त्याला श्राद्ध द्यावें . " स्मृत्यर्थसारांत - संचयन केलें असतां मनुष्यलोकापासून प्रेतलोकास जाणार्‍या प्राण्याला पाथेयश्राद्ध आमान्नानें करावें , असें सांगितलें आहे . मुंज न झालेल्याचें संचयन नाहीं .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:25.1300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आवेष्टित (अंगुलि)

  • स्त्री. ( नृत्य ) एका हातानें दुसर्‍या हाताच्या तर्जनीपासून आरंभ करुन त्या हाताच्या तळहाताच्या बाजूनें वेढा घालणें . 
RANDOM WORD

Did you know?

आगमशास्त्राबद्दल माहिती मिळावी.
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.