मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
पंचकांत मृताचें विधान

तृतीय परिच्छेद - पंचकांत मृताचें विधान

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


प्रथमतः पंचकांत मृताचें विधान सांगतो .

अथविधानानि तत्रपंचकमृतेमदनरत्नेगारुडे आदौकृत्वाधनिष्ठार्धमेतन्नक्षत्रपंचकं रेवत्यंतंसदादूष्यमशुभंदाहकर्मणि शवस्यचसमीपेतुक्षेप्तव्याः पुत्तलास्तदा दर्भमयास्तुचत्वारऋक्षमंत्राभिमंत्रिताः ततोदाहः प्रकर्तव्यस्तैश्चपुत्तलकैः सह सूतकांतेततः पुत्रैः कार्यंशांतिकपौष्टिकं पंचकेषुमृतोयोवैनगतिंलभतेनरः तिलांश्चैवहिरण्यंचतमुद्दिश्यघृतंददेत् क्रियानिबंधे भाजनोपानहौछत्रंहैममुद्रांचवाससी दक्षिणादीयते विप्रेसर्वपातकमोचनी मदनरत्नेगार्ग्यः यदिभद्रातिथीनांस्याद्भानुभौमशनैश्चरैः त्रिपादर्क्षैश्चसंयोगोद्वयोर्योगेद्विपुष्करः द्वित्रिपुष्करयोगेतुमृतिर्मृत्यंतरावहा दहनेमरणेचैवत्रिगुणंस्यात्र्त्रिपुष्करे खननेप्येवमेवस्यादेतद्दोषोपशांतये तिलपिष्टैर्यवैर्वापिशरीरंकारयेत्ततः शूर्पेनिधायालंकृत्यदाहयेत् पैतृकोपरि तद्दाहेमंत्रमाह बौधायनः अस्मात्त्वमितिमंत्रेणतिलपिष्टंप्रदाहयेत् द्वित्रिपुष्करयोर्दोषस्त्रिभिः कृच्छ्रैर्व्यपोहति वासवेमरणंचेत्स्याद्गृहेवापिपुनर्मृतिः सुवर्णंदक्षिणांदद्यात् कृष्णवस्त्रमथापिवा वासवंधनिष्ठा कुंभमीनस्थितेचंद्रेमरणंयस्यजायते नतस्योर्ध्वगतिर्दृष्टासंततौनशुभंभवेत् नतस्यदाहः कर्तव्योविनाशस्त्वेवजंतुषु अथवातद्दिनेकार्योदाहस्तुविधिपूर्वकं धनिष्ठापंचकेजीवोमृतोयदिकथंचन त्रिपुष्करेयाम्यभेवाकुलजान्मारयेद्ध्रुवं तत्रानिष्टविनाशाथविधानंसमुदीर्यते दर्भाणांप्रतिमाः कार्याः पंचोर्णासूत्रवेष्टिताः यवपिष्टेनानुलिप्तास्ताभिः सहशवंदहेत् प्रेतवाहः प्रेतसखः प्रेतपः प्रेतभूमिपः प्रेतहर्तापंचमस्तुनामान्येतानिचक्रमात् अत्रप्रतिमागंधपुष्पैः पूजयित्वाप्रथमांशिरसि द्वितीयांनेत्रयोः तृतीयांवामकुक्षौ चतुर्थीनाभौ पंचमींपादयोर्न्यस्यतदुपरिनामभिर्घृतंहुत्वायमायसोमंत्र्यंबकमितिमंत्राभ्यांप्रत्येकंतास्वाज्यंहुनेदितिभट्टाः सूतकांतेततः पुत्रः कुर्याच्छांतिकपौष्टिकं कास्यपात्रस्थितंतैलंवीक्ष्यदद्याद्दिजन्मने ब्रह्मविष्णुमहेशेंद्रवरुणप्रीतयेततः माषमुद्गयवव्रीहिप्रियंग्वादिप्रयच्छति स्वर्णदानंरुद्रजाप्यंलक्षहोमोद्विजार्चनं गोभूदानंषडंशेनकुर्याद्दोषोपशांतये ।

मदनरत्नांत गारुडांत - " धनिष्ठा नक्षत्राच्या उत्तरार्धापासून रेवतीपर्यंत जीं पांच नक्षत्रें तीं सदा दुष्ट आहेत व दाहकर्माविषयीं अशुभ आहेत . त्यांजवर मरण आलें असतां दर्भांचे पुत्तलक म्हणजे पुतळे चार करुन त्या नक्षत्रांच्या मंत्रांनीं अभिमंत्रित करुन शवाचे समीप ठेऊन त्या पुतळ्यांसह दाह करावा . तदनंतर सूतकांतीं पुत्रांनीं शांतिक पौष्टिक कर्म करावें . जो मनुष्य पंचकांत मृत असेल त्याला गति प्राप्त होत नाहीं , म्हणून त्याच्या उद्देशानें तिल , सुवर्ण आणि घृत हीं ब्राह्मणांस द्यावीं . " क्रियानिबंधांत - " भाजन , जोडा , छत्र , सुवर्णमुद्रिका , दोन वस्त्रें , आणि दक्षिणा हीं ब्राह्मणांस द्यावीं ; हीं सर्व पातकापासून मुक्त करणारीं आहेत . " मदनरत्नांत गार्ग्य - " भद्रा तिथि ( २।७।१२ ); रवि , भौम व शनि हे वार ; आणि त्रिपाद नक्षत्रें ( कृत्तिका , पुनर्वसु , उत्तरा , विशाखा , उत्तराषाढा , पूर्वाभाद्रपदा ); ह्या तिघांचा ( तिथि वारनक्षत्रांचा ) योग असतां त्रिपुष्करयोग होय . आणि दोघांचा योग असतां द्विपुष्करयोग होय . द्विपुष्कर योगावर किंवा त्रिपुष्कर योगावर मरण झालें असतां दुसरें मरण होतें . त्रिपुष्कर योगावर दहन व मरण असतां उक्त फल त्रिगुणित होतें . खननाविषयींही ( प्रेत पुरण्याविषयींही ) असेंच समजावें . या दोषाच्या शांतीकरितां तिलांच्या पिठाचें किंवा जवांच्या पिठाचें शरीर करुन तें सुपांत ठेऊन त्याला अलंकार करुन प्रेतावर ठेऊन त्याचा दाह करावा . " त्याच्या दाहाविषयीं मंत्र सांगतो बौधायन - " अस्मात्त्वं० " ह्या मंत्रानें त्या तिलपिष्टादिकाचा दाह करावा . द्विपुष्करावर व त्रिपुष्करावर मरणाचा दोष तीन कृच्छ्रांनीं जातो . धनिष्ठा नक्षत्रावर मरण होईल तर त्या घरामध्यें पुनः मरण होतें , याकरितां ब्राह्मणाला दक्षिणासहित सुवर्णदान करावें . किंवा कृष्णवस्त्र द्यावें . कुंभ व मीन राशीस चंद्र असतां ज्याला मरण प्राप्त होतें , त्याला ऊर्ध्वगति दिसत नाहीं व त्याच्या संततीला कल्याण होत नाहीं . त्याचा दाह शास्त्रावांचून करुं नये . अथवा त्या दिवशीं विधिपूर्वक दाह करावा . जर प्राणी धनिष्ठापंचकावर मृत होईल किंवा त्रिपुष्कर योगावर अथवा भरणी नक्षत्रावर मृत होईल तर आपल्या कुलांतील प्राण्यांना तो मारील , असा निश्चय समजावा . त्या ठिकाणीं अनिष्टनाशाकरितां विधान सांगतो - दर्भांच्या पांच प्रतिमा कराव्या त्यांना ऊर्णासूत्रानें वेष्टन करावें . जवांच्या पिठानें त्यांना लेप करावा . त्या प्रतिमांसह प्रेताचा दाह करावा . त्या प्रतिमांचीं अनुक्रमें नांवें सांगतो - प्रेतवाह , प्रेतसख , प्रेतप , प्रेतभूमिप , आणि प्रेतहर्ता अशीं समजावीं . या नांवांनीं गंधपुष्पांनीं त्यांची पूजा करुन प्रेताच्या मस्तकावर पहिली ठेवावी , दुसरी नेत्रांवर , तिसरी वामकुक्षीवर , चवथी नाभीवर , पांचवी पायावर अशा ठेऊन त्यांजवर पूर्वोक्त नाममंत्रांनीं घृताचा होम करुन ‘ यमायसोमं० ’ ‘ त्र्यंबकं० ’ ह्या दोन मंत्रांनीं प्रत्येक त्या प्रतिमांवर आज्याचा होम करावा , असें नारायणभट्ट सांगतात . " तदनंतर सूतकांतीं पुत्रानें शांतिक व पौष्टिक कर्म करावें . कांस्यपात्रांत तिळांचें तेल घेऊन त्यांत आपलें प्रतिबिंब पाहून ब्राह्मणाला तें द्यावें . तदनंतर ब्रह्मा , विष्णु , महेश्वर , इंद्र , वरुण यांच्या प्रीतीकरितां उडीद , मूग , जव , व्रीहि ( भात ), प्रियंगु ( राळे ) इत्यादिकांचें दान करावें . सुवर्णदान , रुद्रजप , लक्षहोम , ब्राह्मणभोजन , गोदान , भूमिदान हीं सहा दोषशांतीकरितां करावीं . "

अपरार्के धनिष्ठापंचकमृतेपंचरत्नानितन्मुखे प्रास्याहुतित्रयंतत्रहुनेद्वहवपामिति ततोनिर्हरणंकुर्यादेषसाग्नेर्विधिः स्मृतः इतरंनिखनेदेवजलेवाप्रतिपादयेत् त्रिपादर्क्षमृतेतद्वद्धिरण्यशकलंमुखे तस्यपिष्टमयंकुर्यात्पुरुषत्रितयंततः होमः प्रतिमुखंकुर्यात्तथावहवपामिति कार्ष्णायसंचकार्पासंकुसुंभंप्रतिपाद्यच निर्यात्यसाग्निंसंस्कुर्याद्भुव्यग्नौवान्यमुत्सृजेत् तत्रैव कनकंहीरकंनीलंपद्मरागंचमौक्तिकं पंचरत्नमिदंप्रोक्तमृषिभिः पूर्वदर्शिभिः रत्नानांचाप्यभावेतुस्वर्णंकर्षार्धमेवच सुवर्णस्याप्यभावेतुआज्यंज्ञेयंविचक्षणैः मदनरत्नेप्येवं तथा एकाशीतिपलंकांस्यंतदर्धंवातदर्धकं नवषट् त्रिपलंवापिदद्याद्विप्रायशक्तितः तथान्यत्र स्वगृह्योक्तविधानेनकृत्वाग्नेः स्थापनंततः अन्वाधानंनिर्वपणंदेवतानांतथाहुतिः यमायधर्मराजायमृत्यवेचांतकायच वैवस्वतायकालायसर्वभूतक्षयायच औदुंबरायदध्नायनीलायपरमेष्ठिने वृकोदरायचित्रायचित्रगुप्तायवैक्रमात् विधिनाश्रपणंकृत्वाएकैकामाहुतिंहुनेत् कृष्णांगांकृष्णवस्त्रंचहैमनिष्कसमन्वितां दद्याद्विप्रायशांतायप्रीतोभवतुमेयमः त्रिपादर्क्षेप्येतदेव अपरार्के पुनर्वसूत्तराषाढाकृत्तिकोत्तरफाल्गुनी पूर्वाभाद्राविशाखाचज्ञेयमेतत्र्त्रिपादभं मयूरचित्रेगर्गः मृतः स्मशानंयोनीतउपजीवतिमानवः गृहेयस्यप्रविष्टोसौतिष्ठेदथकदाचन अचिरान्मृत्युमायातिह्रतदारपरिग्रहः तत्रशांतिंप्रवक्ष्यामिधर्मराजमतंयथा सक्षीराणांघृताक्तानामग्नेर्हुत्वामुखेबुधः औदुंबरीणांविधिवत् ततः शांतिः कृताभवेत् सावित्र्यष्टसहस्त्रेणक्षीरशांतिंचकारयेत् कपिलांतिलकांस्यंचहुतांतेभूरिदक्षिणेति ।

अपरार्कांत - " धनिष्ठापंचकावर मृत असतां प्रेताच्या मुखांत पंचरत्नें घालून ‘ वहवपां० ’ या मंत्रानें तीन आहुति द्याव्या , तदनंतर प्रेत न्यावें , हा अग्निमान् असेल त्याचा विधि समजावा . अग्निरहित असेल तो पंचकावर मृत असतां त्याला भूमींत पुरावा किंवा उदकांत टाकावा . त्रिपाद नक्षत्रावर मृत असेल तरी तसेंच सुवर्णाचा तुकडा मुखांत घालून त्याला तीन प्रतिमा पिठाच्या कराव्या , आणि ‘ वहवपां० ’ या मंत्रानें प्रतिमुखांत तीन आहुतींचा होम करावा . काळें लोखंड , कापूस , कुसुंभ हें ब्राह्मणाला देऊन प्रेताला नेऊन साग्निक प्रेताचा संस्कार करावा . निरग्निकाला भूमींत पुरावा किंवा अग्नींत टाकावा . " तेथेंच - " सुवर्ण , हिरा , नीलमणि , पद्मराग आणि मोतीं यांना पूर्वऋषींनीं पंचरत्नें म्हटलीं आहेत . रत्नाच्या अभावीं अर्धकर्ष ( अर्धतोळा ) सोनें द्यावें . अथवा सोन्याच्या अभावींक घृत द्यावें . " मदनरत्नांतही असेंच आहे . तसेंच - " एक्याऐशीं पलें कांस्य , किंवा त्याच्या अर्धै अथवा चतुर्थांश ( एक्याऐंशीं कर्ष ), किंवा नऊ पलें , सहा पलें अथवा तीन पलें ( बारा कर्ष ), आपल्या शक्तीप्रमाणें ब्राह्मणाला द्यावें . " तसेंच इतर ग्रंथांत - " आपल्या गृह्यसूत्रांत सांगितलेल्या विधीनें अग्निस्थापन करुन यम , धर्मराज , मृत्यु , अंतक , वैवस्वत , काल , सर्वभूतक्षय , औदुंबर , दध्न , नील , परमेष्ठी , वृकोदर , चित्र , चित्रगुप्त ह्या चवदा देवतांचें अनुक्रमानें अन्वाधान करुन चरुद्रव्याचा निर्वाप करुन चरुचें यथाविधि श्रपन ( पचन ) करुन त्या वरील देवतांना ‘ यमाय , धर्मराजाय , मृत्यवे , अंतकाय , वैवस्वताय , कालाय , सर्वभूतक्षयाय , औदुंबराय , दध्नाय , नीलाय , परमेष्ठिने , वृकोदराय , चित्राय , चित्रगुप्ताय , यांच्या पुढें ‘ स्वाहा ’ शब्द लावून एकएक आहुतीचा होम करावा . निष्कपरिमित सुवर्णसहित कृष्ण गाई व कृष्ण वस्त्र शांत अशा ब्राह्मणाला ‘ प्रीतो भवतु मे यमः ’ असें म्हणून द्यावें . " त्रिपाद नक्षत्रावर मृत असतांही हेंच विधान करावें . अपरार्कांत - " पुनर्वसु , उत्तराषाढा , कृत्तिका , उत्तराफल्गुनी , पूर्वाभाद्रपदा , विशाखा हीं त्रिपाद नक्षत्रें जाणावीं . " मयूरचित्रांत गर्ग - " जो मृत मनुष्य श्मशानांत नेलेला जीवंत झाला असेल तो ज्याच्या घरांत प्रवेश करील व राहील त्याचे स्त्री - पुत्र नष्ट होऊन तो लवकर मरेल . त्या ठिकाणीं धर्मराजाचे मताप्रमाणें शांति सांगतो - उंबराच्या समिधा दुधांत व तुपांत भिजवून गायत्रीमंत्रानें आठ हजार होम करावा . म्हणजे शांति होते . होमानंतर कपिला गाई , तिल , कांस्यपात्र आणि पुष्कळ दक्षिणा हीं द्यावीं . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP