मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
देवार्चा

तृतीयपरिच्छेद - देवार्चा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां देवार्चा सांगतो -
अथदेवार्चा तत्रप्रत्युपचारमाद्यंतयोरपोदद्यादित्युक्तंवृत्तौस्मृत्यर्थसारेच हेमाद्रौबाह्मे आसनेष्वासनंदद्याद्वामेवादक्षिणेपिवा पितृकर्मणिवामेचदैवेदद्यात्तुदक्षिणे प्रचेताः आसनेष्वासनंदद्यान्नतुपाणौकदाचन धर्मोसीत्यथमंत्रेणगृह्णीयुस्तेतुतान्‍ कुशान् धर्मोसिविशिराजाप्रतिष्ठितइतिमंत्रः गालवः दर्भानादायहस्ताभ्यांगृहीत्वादक्षिणेकरे दैवेक्षणः क्रियतांतुनिरंगुष्ठंकरंततः ओंतथेतिद्विजाब्रूयुस्तेप्राप्नोतुभवानिति कर्ताब्रूयात्ततोविप्रः प्राप्नवानीतिवैवदेत्‍ पृथ्वीचंद्रोदयेबृहन्नारदीये यवैर्दर्भैश्चविश्वेषांदेवानामिदमासनं दत्वेत्तिभूयोदद्याद्वैदैवेक्षणइतिक्षणं तच्चषष्ठ्याचतुर्थ्यावाकार्यमितिसएव ततोर्घ्यंकल्पयेदितिमन्वादयः शौनकजयंताभ्यामर्घ्यरहितस्यदेवार्चनस्योक्तेः आश्वलायनानांदैवेर्घ्यदानंनेतिबोपदेवः तन्न परिशिष्टप्रयोगपारिजातविरोधात्‍ वृद्धिश्राद्धेतुदैवेऽप्यर्घ्यंदद्यात‍ देवेभ्योपिपृथग्दद्यादिहार्घ्यंश्रुतिचोदनादितिशौनकोक्तेः ।

श्राद्धांत प्रत्येक उपचाराला आदीं व अंतीं उदक द्यावें, असें वृत्तींत व स्मृत्यर्थसारांत सांगितलें आहे. हेमाद्रींत ब्राह्मांत - “ आसनावर वामभागीं किंवा दक्षिणभागीं दर्भरुप आसन द्यावें. पितरांकडे वामभागीं व देवांकडे दक्षिणभागीं द्यावें. ” प्रचेता - “ आसनाचे ठायीं आसन द्यावें, हातांत कधींही देऊं नये. ‘ धर्मोऽसि विशिराजा प्रतिष्ठितः ’ या मंत्रानें ब्राह्मणांनीं ते आसनदर्भ घ्यावे. ” गालव - “ दोन हातांनीं दर्भ घेऊन ब्राह्मणांच्या दक्षिण हस्तांत द्यावे, आणि त्याचा हात अंगुष्ठरहित धरुन कर्त्यानें ‘ दैवे क्षणः क्रियतां ’ असें म्हणावें, ब्राह्मणांनीं ‘ ओंतथा ’ असें म्हणावें. तदनंतर कर्त्यानें ‘ प्राप्नोतु भवान्‍ ’ असें म्हणावें. ब्राह्मणानें ‘ प्राप्नवानि ’ असें म्हणावें. ” पृथ्वीचंद्रोदयांत बृहन्नारदीयांत - “ यव आणि दर्भ यांनीं ‘ विश्वेषां देवानामिदमासनं ’ असें म्हणून आसन देऊन पुनः ‘ दैवे क्षणः क्रियतां ’ असें म्हणून क्षण द्यावा. ” तें क्षण दान षष्ठी किंवा चतुर्थी विभक्तीनें करावें असें तोच सांगतो. नंतर अर्घ्य द्यावें, असें मन्वादिक सांगतात. शौनक आणि जयंत यांनीं अर्घ्यरहित देवार्चन सांगितलें आहे, म्हणून आश्वलायनांना देवांविषयीं अर्घ्यदान नाहीं असें बोपदेव सांगतो. तें बरोबर नाहीं; कारण, परिशिष्ट व प्रयोगपारिजात यांच्याशीं विरोध येतो. वृद्धिश्राद्धांत तर देवांसही अर्घ्य द्यावें. कारण, “ येथें श्रुतीनें सांगितलें म्हणून देवांनाही पृथक्‍ अर्घ्य द्यावें ” असें शौनकवचन आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP