TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
चांद्रायण

तृतीय परिच्छेद - चांद्रायण


निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

चांद्रायण

आतां चांद्रायण सांगतो .
अथचांद्रायणम् गौतमः अथातश्चांद्रायणंतस्योक्तोविधिः कृच्छ्रइति कृच्छ्रेप्राजापत्यकृच्छ्रेइत्यर्थः तद्यथा तिष्ठेदहनिरात्रावासीतक्षिप्रकामः सत्यंवदेदनार्यैर्नसंभाषेतरौरवयोधाजयेनित्यंप्रयुंजीतअनुसवनमुदकोपस्पर्शनमापोहिष्ठेतिचतसृभिः पवित्रवतीभिर्मार्जयेत् हिरण्यवर्णाः शुचयइत्यष्टाभिः अथोदकतर्पणम् नमोहमायमंहमायधून्वनेतापसायपुनर्वसवेनमोमौंज्यायौर्म्यायवसुविंदायसर्वविंदायनमः पारायसुपारायमहापारायपारयिष्णवेनमो रुद्रायपशुपतयेमहतेदेवायत्र्यंबकायैकचरायाधिपतयेहरायशर्वायेशानायोग्रायवज्रिणेघृणिनेकपर्दिनेनमः सूर्यादित्यायनमोनीलग्रीवायशितिकंठायनमः कृष्णायपिंगलायनमोज्येष्ठायश्रेष्ठायवृद्धायेंद्रायहरिकेशायोर्ध्वरेतसेनमः सत्यायपावकायपावकवर्णायकामायकामरुपिणेनमोदीप्तायदीप्तरुपिणेनमस्तीर्णायतीर्णरुपिणेनमः सौम्यायपशुपुरुषायमहापुरुषायमध्यमपुरुषायोत्तम- पुरुषायब्रह्मचारिणेनमश्चंद्रललाटायकृत्तिवाससेनमइत्येतदेवादित्योपस्थानमेताएवाज्याहुतयइत्यादि अस्यार्थः तिष्ठेदहनिरात्रावासीतक्षिप्रकाम इति यस्तुप्राजापत्यादिकृच्छ्रद्वयापनोद्यात्पापात्क्षिप्रमेकेनैवकृच्छ्रेणविमुक्तोभविष्यामीत्येवंकामयते अयमहन्यावश्यककर्माविरुद्धेषुकालेषुतिष्ठेत् । रात्रावासीत । तथा रौरवयोधाजयेसामनीनित्यकर्माविरोधिकालेषुप्रयुंजीत पठेत् । पुनानः सोमधारयेत्यस्यामृचिदुहानऊधइत्यस्यामृचिचतृचत्वेनगीयमानेसामनीरौरवयोधाजयेअभिधीयेते अनुसवनमुदकोपस्पर्शनम् संध्यात्रयेस्नानंत्रिषवणस्नानमित्यर्थः हिरण्यवर्णाइत्यष्टाभिरपिमार्जनमेव एतच्चमार्जनंस्नानानंतरम् अथोदकतर्पणम् उदकतर्पणमित्यनेनअत्रजलएवतर्पणंनस्थलइतिगम्यते तत्रमंत्राः नमोहमायेत्येवमादयः कृत्तिवाससेनमइत्येतदंताः अत्रमंत्रसंदर्भस्यादावंतेचनमः शब्दश्रवणान्मंत्रादौमंत्रांतेचनमः शब्दोभवतितथाचैवंमंत्रप्रयोगः नमोहमायमंहमायधून्वनेतापसायपुनर्वसवेनमइतिएवंनमोमौंजायेत्यारभ्यसर्वविंदायनमइत्येकोमंत्रः एवमुत्तरत्रापिद्र्ष्टव्यम् । एतैस्ययोदशमंत्रैस्तर्पणंकुर्यात् । ततश्चएतदेवादित्योपस्थानमितिएतदेवमंत्रजातमादित्योपस्थानंआदित्योपस्थानसाधनम् कार्यकारणयोरभेदोपचारः तर्पणानंतरमेतैरेवमंत्रैरादित्योपस्थानंकुर्यादित्यर्थः एताएवाज्याहुतयइतिएतैरेवमंत्रैराज्यहोमः कर्तव्यइत्यर्थः अयंचहोमोलौकिकाग्निंप्रतिष्ठाप्यकार्यः ।

गौतम - " आतां चांद्रायणव्रत सांगतो - त्याचा विधि करावयाचा तो प्राजापत्यकृच्छ्रांत सांगितला आहे . तो असा - जो मनुष्य , प्राजापत्यादिक दोन कृच्छ्रांनीं घालवावयाचें पाप प्राजापत्यादिक एकाच कृच्छ्रानें घालविण्याविषयीं इच्छीत असेल त्या मनुष्यानें तो कृच्छ्र असा करावा कीं , स्नानसंध्यादिक नित्य कृत्यें व कृच्छ्राचीं अंगभूत होमादिकृत्यें वेळच्यावेळीं करुन बाकीच्या राहिलेल्या कालीं दिवसा उभें राहावें , आणि रात्रीं बसून राहावें , सत्य भाषण करावें , असत्य बोलूं नये , अनार्यांबरोबर भाषण करुं नये , आणि नित्यकर्मै होऊन अवशेष राहिलेल्या काळीं रौरव आणि योधाजय ह्या दोन सामांचा पाठ करावा . ‘ पुनानः सोमधारया० ’ ह्या ऋचेचे ठायीं आणि ‘ दुहानऊध० ’ ह्या ऋचेचे ठायीं तीन ऋचांनीं गान करावयाचीं जीं सामें तीं रौरव व योधाजय म्हटलीं आहेत . त्रिकाळ स्नान करावें . ‘ आपोहिष्ठा० ’ ह्या चार ऋचांनीं आणि ‘ हिरण्यवर्णाः शुचयः० ’ ह्या आठ ऋचांनीं मार्जन करावें . आतां उदकतर्पण सांगतो - उदकतर्पण तें उदकांत राहून तर्पण करावें . त्या तर्पणाचे मंत्र सांगतो - मंत्राच्या आदीं व अंतीं नमः शब्दाचा प्रयोग करावा . तो असा - ‘ नमोहमाय मंहमाय धून्वने तापसाय पुनर्वसवे नमः ’ ‘ नमो मौंज्यायौर्म्याय वसुविंदाय सर्वविंदाय नमः ’ ‘ नमः पाराय सुपाराय महापाराय पारयिष्णवे नमः ’ ‘ नमो रुद्राय पशुपतये महते देवाय त्र्यंबकायैकचरायाधिपतये हराय शर्वायेशानायोग्राय वज्रिणे घृणिने कपर्दिने नमः ’ ‘ नमः सूर्यायादित्याय नमः ’ ‘ नमो नीलग्रीवाय शितिकंठाय नमः ’ ‘ नमः कृष्णाय पिंगलाय नमः ’ ‘ नमो ज्येष्ठाय श्रेष्ठाय वृद्धायेंद्राय हरिकेशायोर्ध्वरेतसे नमः ’ ‘ नमः सत्याय पावकाय पावकवर्णाय कामाय कामरुपिणे नमः ’ ‘ नमो दीप्ताय दीप्तरुपिणे नमः ’ ‘ नमस्तीर्णाय तीर्णरुपिणे नमः ’ ‘ नमः सौम्याय पशुपुरुषाय महापुरुषाय मध्यमपुरुषायोत्तमपुरुषाय ब्रह्मचारिणे नमः ’ ‘ नमश्चंद्रललाटाय कृत्तिवाससे नमः ’ ह्या तेरा मंत्रांनीं तर्पण करावें . तर्पणानंतर ह्याच तेरा मंत्रांनीं आदित्याचें उपस्थान करावें . नंतर ह्याच मंत्रांनीं आज्यहोम करावा . हा होम लौकिकाग्नीची स्थापना करुन त्याजवर करावा .
एवमथातश्चांद्रायणंतस्योक्तोविधिः कृच्छ्र इत्यनेनसाधारणधर्मानतिदिश्यचांद्रायणेविशेषधर्मानाह । तपनंव्रतंचरेच्छ्वोभूतांपौर्णमासीमुपवसेदाप्यायस्वसंतेपयांसिनवोनव-इत्येताभिस्तर्पणमाज्यहोमोहविषश्चानुमंत्रणमुपस्थानंचंद्रमसोयद्देवादेवहेडनमितिचतसृभिर्जुहुयात् देवकृतस्येतिचांतेसमिद्भिरोंभूर्भुवः स्वर्महर्जनस्तपः सत्यंयशः श्रीरुर्जिडोजः पुरुषोधर्मः शिवइत्येतैर्ग्रासानुमंत्रणंप्रतिमंत्रंनमः स्वाहेतिवासर्वान् ग्रासप्रमाणमास्याविक्रारेणभैक्षसक्तुकणयावकशाकपयोदधिघृतमूलफलोदकानिहवींष्युत्तरोत्तरं-प्रशस्तानिपौर्णमास्यांपंचदशग्रासान् भुक्त्वाएकापचयेनापरपक्षमश्नीयात् अमावास्यामुपोष्यैकोपचयेनपूर्वपक्षंविपरीतमेकेषामेषचांद्रायणोमास-एतदाप्त्वातिपापोविपाप्मासर्वमेनोहंतिद्वितीयमाप्त्वादशपूर्वान्दशाप-रानात्मानंचपंक्तिंपुनातिसंवत्सरंचंद्रमसः सलोकतामाप्नोतीति । अस्यार्थः तपनंव्रतंचरेत् तापयतिपापमितितपनं वपनंव्रतंचरेदितिपाठेव्रतंचांद्रायणंवपनपूर्वकं अयमर्थः यदाप्रायश्चित्तनिमित्तंचांद्रायणंतदावपनपूर्वकंचरेदिति । एतेननिमित्तमंतरेणसुकृतार्थंचांद्रायणाचरणेवपनंनास्तीत्युक्तंभवति श्वोभूतांपौर्णमासींव्रतोपक्रमतिथिंश्वोभूतांनिरीक्ष्यपूर्वतिथौचतुर्दश्यामुपवसेदित्यर्थः आप्यायस्वेत्यादिभिर्नवोनवइत्यंतैर्मंत्रैस्तर्पणंचंद्रमसः कृत्वैतैरेवत्रिभिर्मंत्रैराज्यहोमंविधायततोहविरनुमंत्र्यैतैरेवमंत्रैः पश्चादेतैरवचंद्रमसउपस्थानंकुर्वीत ततोयद्देवादेवहेडनमितिचतसृभिर्देवकृतस्येतिचेत्यनयाचसमिद्भिर्यज्ञियकाष्ठोद्भवाभिर्जुहुयात् कदाअंतेपूर्वोक्तोपस्थानांते । अथानंतरंतिथिसंख्याकान् ग्रासान् कृत्वातान् ॐ भूर्भुवः स्वरित्यादिमंत्रैरभिमंत्रयीत ॐ भूः । भुवः । स्वः । महः । जनः । तपः । सत्यं । यशः । श्रीः । ऊर्क् । इट् । ओजः । पुरुषः । धर्मः । शिवः । इतिमंत्रविभागः अत्रप्रतिमंत्रंमंत्रांतेनमः स्वाहेतिवाप्रयुंजीत । प्रणवादिस्वः पर्यंतानामव्ययत्वेननमः स्वाहायोगेपिनचतुर्थीविभक्तिश्रवणम् । महाप्रभृतिषुचतुर्थीश्रवणंभवति महसेनमः महसेस्वाहैतिवा । एवमन्यत्रापि । जनाय । तपसे । सत्याय । यशसे । श्रियै । ऊर्जे । इषे । ओजसे । पुरुषाय । धर्माय । शिवायेति । ग्रासप्रमाणमास्याविकारेणआस्यस्यमुखस्यव्यादानेनयावदन्नंमुखंप्रविशतितावदन्नंग्रासप्रमाणंभवतीत्यर्थः चतुर्दश्यामुपोषितस्यपौर्णमास्यादितिथिषुग्रामसंख्यानियममाह पौर्णमास्यांपंचदशग्रासानित्यादिनापूर्वपक्षमित्यंतेन । एतच्च पिपीलिकामध्यंचांद्रायणम् ।

याप्रमाणें हे प्राजापत्य कृच्छ्रांत सांगितलेले धर्म चांद्रायणांत करावे , असे साधारण धर्म सांगून चांद्रायणाचे विशेष धर्म सांगतो - ‘ तपनं व्रतं चरेत् ’ म्हणजे पापाला तापविणारें असें व्रत चांद्रायण करावें . ’ ‘ वपनं व्रतं चरेत् ’ असा पाठ आहे , त्या वेळीं वपनपूर्वक व्रत म्हणजे चांद्रायण करावें , असा अर्थ होतो . म्हणजे ज्या वेळीं प्रायश्चित्तनिमित्तानें चांद्रायण करावयाचें याचें असेल त्या वेळीं वपन करुन तें करावें . आणि निमित्तावांचून सुकृतासाठीं करावयाचें असेल त्या वेळीं वपन करुं नये , असा भाव . व्रताचे आरंभाची तिथि पौर्णिमा उद्यां आहे , असें पाहून पूर्वदिवशीं चतुर्दशीस उपवास करावा . ‘ आप्यायस्व० ’ ‘ संतेपयांसि० ’ ‘ नवोनवो० ’ ह्या तीन मंत्रांनीं चंद्राचें तर्पण करुन ह्याच तीन मंत्रांनीं आज्यहोम करुन तदनंतर ह्याच तीन मंत्रांनीं हवीचें अभिमंत्रण करुन ह्याच तीन मंत्रांनीं चंद्राचें उपस्थान करावें . तदनंतर ‘ यद्देवादेवहेडनं० ’ ह्या चार ऋचांनीं आणि ‘ देवकृतस्य० ’ ह्या ऋचेनें यज्ञियवृक्षाच्या समिधांचा होम करावा . हा समिधांचा होम पूर्वोक्त उपस्थान झाल्यावर करावा . नंतर जी तिथि असेल तिच्या संख्येइतके ग्रास करुन पुढील मंत्रांनीं त्यांचें अभिमंत्रण करावें . ते मंत्र येणेंप्रमाणें - ॐ भूः । ॐ भुवः । ॐ स्वः । ॐ महः । ॐ जनः । ॐ तपः । ॐ सत्यं । ॐ यशः । ॐ श्रीः । ॐ ऊर्क् । ॐ इट् । ॐ ओजः । ॐ पुरुषः । ॐ धर्मः । ॐ शिवः । ह्या प्रत्येक मंत्राच्या शेवटीं ‘ नमः ’ किंवा ‘ स्वाहा ’ याचा प्रयोग करावा . यावरुन असे मंत्र म्हणावे कीं , ‘ ॐ भूः स्वाहा ’ ‘ ॐ भुवः स्वाहा ’ ‘ ॐ स्वः स्वाहा ’ ‘ ॐ महसे स्वाहा ’ ‘ ॐ जनाय स्वाहा ’ ‘ ॐ तपसे स्वाहा ’ ‘ ॐ सत्याय स्वाहा ’ ‘ ॐ यशसे स्वाहा ’ ‘ ॐ श्रियैअ स्वाहा ’ ‘ ॐ ऊर्जे स्वाहा ’ ‘ ॐ इषे स्वाहा ’ ‘ ॐ ओजसे स्वाहा ’ ‘ ॐ पुरुषाय स्वाहा ’ ‘ ॐ धर्माय स्वाहा ’ ‘ ॐ शिवाय स्वाहा ’. ग्रासांचे प्रमाण - मुख पसरुन जितकें अन्न अयासावांचून तोंडांत जाईल तितक्या अन्नाचा एक ग्रास होतो . ग्रासांचीं द्रव्यें सांगतो - भिक्षान्न , सातू , कण्या , यवान्न , शाक , दूध , दहीं , घृत , मुळें , फळें , उदक हीं हविष्यानें उत्तरोत्तर प्रशस्त आहेत . यांतून कोणत्या द्रव्याचे घ्यावयाचे असतील त्याचे पौर्णिमेस पंधरा ग्रास भक्षण करावेत . प्रतिपदेस चवदा , द्वितीयेस तेरा , याप्रमाणें प्रत्येक तिथीस एक एक कमी करुन कृष्णपक्ष घालवावा . आणि अमावास्येस उपवास करुन शुद्धप्रतिपदेस एक , द्वितीयेस दोन , याप्रमाणें एक एक वाढवून पौर्णिमेस पंधरा ग्रास भक्षण करावेत . हें पिपीलिकामध्य चांद्रायण होय .
आतां यवमध्य चांद्रायण सांगतो .
अथयवमध्यमाह - विपरीतमेकेषामिति । अस्मिन् यवमध्यचांद्रायणेअमावास्यायामुपवासः प्रतिपदादितिथिषुएकैकग्रासोपचयः पौर्णमासीमभिव्याप्य पुनः कृष्णपक्षदितिथिष्वमावास्यावधिकासुएकैकग्रासापचयः अमावास्यायामुपवासइतिक्रमः अत्रग्रासग्रहणकालश्चंद्रोदयः । अभिमंत्रणमंत्रविकल्पादयश्चाग्रेकृच्छ्रसाधारणेतिकर्तव्यताकथनसमयेनिरुपयिष्यंते । याज्ञवल्क्यः तिथिवृद्ध्याचरेत्पिंडान् शुक्लेशिख्यंडसंमितान् । एकैकंह्नासयेत्कृष्णेपिंडंचांद्रायणंचरेत् । इंदुक्षयेनभुंजीतएषचांद्रायणोविधिः । तिथिवृद्ध्या प्रथमद्वितीयादि चंद्रकलायुक्तप्रतिपद्दितीयादितिथिवृद्ध्या चरेत् भक्षयेत् । शुक्लेशुक्लपक्षे । शिख्यंडसंमितान् मयूरांडप्रमाणान् । चांद्रायणंह्नासवृद्धिभ्यांचंद्रस्यायनंचरणमिवचरणंयस्मिन् कर्मणितच्चांद्रायणम् संज्ञायांदीर्घः इतिपिपीलिकामध्ययवमध्यचांद्रायणलक्षणम् ।

" कित्येकांच्या मतीं हें चांद्रायण विपरीत करावें , म्हणजे अमावास्येस उपवास करुन शुक्लप्रतिपदादि तिथीचे ठायीं एक एक तिथीला एक एक ग्रास वाढवीत जावा , ते पौर्णिमेपर्यंत वाढवून पुनः कृष्णप्रतिपदेपासून प्रत्येक तिथीला एक एक ग्रास कमी करीत यावा , आणि अमावास्येस उपवास करावा , म्हणजे हें यवमध्यचांद्रायण होतें . ग्रासभक्षणाचा काल चंद्रोदय आहे . ग्रासांच्या अभिमंत्रणाचे दुसरे मंत्रही आहेत . तो प्रकार पुढें कृच्छ्रसाधारणेतिकर्तव्यता सांगावयाच्या प्रसंगीं सांगूं . अतिपापी असेल त्यानें हें चांद्रायणव्रत केलें असतां पापरहित होऊन सर्व पातकांचा नाश होतो . दुसरें चांद्रायण केलें असतां दहा पूर्वींचे व दहा पुढचे पुरुष , आपणासह आणि पंक्ति यांना पवित्र करितो . आणि एकवर्षपर्यंत केलें असतां त्याला चंद्राचें सालोक्य प्राप्त होतें . " याज्ञवल्क्य - " चांद्रायण करणारानें शुक्ल पक्षांत चंद्राची एक एक कला जसजशी वाढत जाते तसतशा प्रतिपदाद्वितीयादि तिथींचे ठायीं एकएका वृद्धीनें ग्रास भक्षण करावे . ते ग्रास मोराच्या अंड्याएवढे असावे , त्याचप्रमाणें कृष्णपक्षांत चंद्राच्या कलेप्रमाणें एक एक ग्रास उतरीत यावा . आणि चंद्रक्षयदिवशीं ( अमावास्येस ) उपवास करावा . हा चांद्रायणाचा विधि होय . " ज्या कर्मांत चंद्राच्या अयना ( चरणा , संचारा ) प्रमाणें चरण म्हणजे भक्षण आहे तें कर्म चांद्रायण म्हटलें आहे . इति पिपीलिकामध्ययवमध्यचांद्रायणम् .
आतां यतिचांद्रायणादिक सांगतो .
अथयतिचांद्रायणादीनि । याज्ञवल्क्यः । यथाकथंचित्पिंडानांचत्वारिंशच्छतद्वयम् ।
मासेनैवोपभुंजीतचांद्रायणमथापरम् । पिंडानांचत्वारिंशदधिकशतद्वयंमासेनोपभुंजीत कथं यथाकथंचित् । अत्रायंक्रमः । दिनेदिनेअष्टौग्रासान् भुंजीत अथवानक्तंचतुरोदिवाचतुरइतिअथवैकस्मिन्दिनेचतुरोऽपरस्मिन्द्वादश । उतैकरात्रमुपोष्यापरस्मिन् षोडश । यद्वादिनद्वयमुपोष्यतृतीयदिनेचतुर्विंशतिः इत्यादिप्रकाराणांमध्येशक्त्यपेक्षयाभुंजीतेति । अत्रतिथ्यपेक्षयाग्रासनियमोनास्ति । उपक्रमस्तुशुक्लकृष्णप्रतिपदोरन्यत्र । यस्तुनैरंतर्येणैवंबिधचांद्रायणानुष्ठानंकरोतितस्यतिथिवृद्धिह्नासवशेनकदाचित् द्वितीयादिष्वारंभोभवतितत्रनदोषः चंद्रगत्यनुसरणमंतरेणत्रिंशद्दिनात्मकसावनमासानुष्ठेयत्वात् । अस्मिंश्चांद्रायणेपूर्वप्रक्रांतमेकादश्युपवासादिनलुप्यते तिथिनियमेनग्रासनियमाभावात् । अस्मिंश्चांद्रायणेपूर्वप्रक्रांतमेकादश्युपवासादिनलुप्यते एष्वेयप्रकारेषुक्कचनमनुनाविशेषसंज्ञादर्शिता । अष्टावष्टौसमश्नीयात्पिंडान् मध्यंदिनेस्थिते । नियतात्माहविष्यस्ययतिचांद्रायणंचरन् । चतुरः प्रातरश्नीयात्पिंडान् विप्रः समाहितः । चतुरोस्तमितेसूर्येशिशुचांद्रायणंचरन् । चतुरः प्रातरश्नीयात्पिंडान् विप्रः समाहितः । चतुरोस्तमितेसूर्येशिशुचांद्रायणंचरेत् । यथाकथंचित् पिंडानांतिस्त्रोशीतीः समाहितः । मासेनाश्नन् हविष्यस्यचंद्रस्यैतिसलोकतामिति । यमः त्रींस्त्रीन् पिंडान् समश्नीयान्नियतात्मादृढव्रतः । हविष्यान्नस्यवैमासमृषिचांद्रायणंस्मृतमिति । इतियतिचांद्रायणादीनि ॥

याज्ञवल्क्य - " जसे कसेतरी एका महिन्यांत दोनशें चाळीस ( २४० ) ग्रास भक्षण करावे , म्हणजे दुसरें एक प्रकारचें चांद्रायण होतें . " याचा क्रम असा - प्रतिदिवशीं आठ आठ ग्रास भक्षण करावे ; अथवा रात्रीं चार आणि दिवसा चार ग्रास भक्षण करावे ; अथवा एक दिवशीं चार आणि दुसर्‍या दिवशीं बारा ; किंवा एक दिवस उपवास करुन दुसर्‍या दिवशीं सोळा ; अथवा दोन दिवस उपवास करुन तिसर्‍या दिवशीं चोवीस इत्यादि प्रकारांमध्यें आपल्या शक्तीप्रमाणें ग्रास भक्षण करावे . या चांद्रायणाचे ठायीं तिथींवर ग्रासांचा नियम नाहीं . आरंभ करणें तो शुक्ल प्रतिपदेस किंवा कृष्णप्रतिपदेस करावा . जो मनुष्य निरंतर याप्रमाणें चांद्रायण करतो त्याचा आरंभ , तिथीची वृद्धि किंवा क्षय होऊन एकादेवेळी द्वितीयादि तिथींचे ठायीं होतो , त्या विषयीं दोष नाहीं . कारण , चंद्राच्या गतीप्रमाणें दिवस न धरितां तीस दिवसांचा जो सावन मास तो धरुन त्याप्रमाणें या चांद्रायणाचें अनुष्ठान करावयाचें आहे . पूर्वीं आरंभिलेला एकादश्यादिव्रतोपवास ह्या यतिचांद्रायणादिकांचे ठायीं मोडत नाहीं . कारण , या ठिकाणीं तिथींना अनुसरुन ग्रासाचा नियम नाहीं . ज्या ठिकाणीं ( पिपीलिकामध्यादिकांच्या ठायीं ) तिथीच्या नियमानें ग्रासांचा नियम सांगितला आहे त्या ठिकाणीं पूर्वीं आरंभिलेलें दुसरें उपवासादि व्रत दुसर्‍या कडून करवावें . हे वर सांगितलेले जे चांद्रायणाचे प्रकार त्यांच्या विषयींच कित्येकांना मनूनें विशेष संज्ञा सांगितली आहे , ती अशी - " दोनप्रहरीं हविष्याचे आठ आठ ग्रास भक्षण करावे , म्हणजे यतिचांद्रायण होतें . ब्राह्मणानें समाधानपूर्वक दिवसा चार ग्रास आणि रात्रीं चार ग्रास भक्षण करावे , म्हणजे शिशुचांद्रायण होतें . एका महिन्यांत जसे कसेंतरी २४० ग्रास भक्षण करावे , म्हणजे चंद्राचें सालोक्य प्राप्त होतें . " यम - " इंद्रियें जिंकून , दृढ व्रत धारण करुन एक मासपर्यंत हविष्यान्नाचे तीन तीन ग्रास भक्षण करावे , म्हणजे ऋषिचांद्रायण होतें . " इति यतिचांद्रायणादि .
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:27.1000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सुगंधित

  • a  Sweet-scented. 
  • Sweet-scented, imbued or affected with fragrance. 
RANDOM WORD

Did you know?

देवक म्हणजे काय ? त्याचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.