मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धवस्तु

तृतीयपरिच्छेद - श्राद्धवस्तु

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां श्राद्धवस्तु सांगतो -

अथश्राद्धवस्तूनि तत्रादौकुशाः पृथ्वीचंद्रोदयेदक्षः समित्पुष्पकुशादीनांद्वितीयः परिकीर्तितः अष्टधाभक्तेदिनेद्वितीयोभागइत्यर्थः तत्रैवयमः समूलस्तुभवेद्दर्भः पितृणांश्राद्धकर्मणि मूलेनलोकान् ‍ जयतिशक्रस्यसुमहात्मनः व्यासः तर्पणादीनिकर्माणिपितृणांयानिकानिचित् ‍ तानिस्युर्द्विगुणैर्दर्भैः सप्तपत्रैर्विशेषतः शालंकायनः सपिंडीकरणंयावदृजुदर्भैः पितृक्रिया सपिंडीकरणादूर्ध्वंद्विगुणैर्विधिवद्भवेत् ‍ शंखः अनंतर्गर्भिणंसाग्रंकौशंद्विदलमेवच प्रादेशमात्रंविज्ञेयंपवित्रंयत्रकुत्रचित् ‍ हारीतः पवित्रंब्राह्मणस्यैवचतुर्भिर्दर्भपिंजुलैः एकैकंन्यूनमुद्दिष्टंवर्णेवर्णेयथाक्रमम् ‍ स्मृत्यर्थसारे सर्वेषांवाभवेद्दाभ्यांपवित्रंग्रंथितंनवम् ‍ रत्नावल्याम् ‍ द्वयोस्तुपर्वणोर्मध्येपवित्रंधारयेद्बुधः हेमाद्रौस्कांदे अनामिकाधृतादर्भाह्येकानामिकयापिवा द्वाभ्यामनामिकाभ्यांतुधार्येदर्भपवित्रके पवित्राभावेतुतत्रैवसुमंतुः समूलाग्रौविगर्भौतुकुशौद्वैदक्षिणेकरे सव्येचैवतथात्रीन्वैबिभृयात्सर्वकर्मसु बौधायनः हस्तयोरुभयोर्द्वौद्वावासनेपितथैवच दर्भग्रहणेमंत्रमाहशंखः विरिंचिनासहोत्पन्नपरमेष्ठिनिसर्गज नुदसर्वाणिपापानिदर्भस्वस्तिकरोभव स्मृत्यर्थसारे हुंफट्‍कारेणमंत्रेणसकृच्छित्वासमुद्धरेत् ‍ भारद्वाजः प्रेतक्रियार्थंपित्रर्थमभिचारार्थमेवच दक्षिणाभिमुखश्छिंद्यात्प्राचीनावीतिकोद्विजः कुशाभावेऽपरार्केसुमंतुः कुशाः काशाः शरोगुंद्रोयवादूर्वाथबल्वजाः गोकेशमुंजकुंदाश्चपूर्वाभावेपरः परः काशादौविशेषमाहशंखः काशहस्तस्तुनाचामेत्कदाचिद्विधिशंकया प्रायश्चित्तेनयुज्येतदूर्वाहस्तस्तथैवच पृथ्वीचंद्रोदयेयमः मासिमास्युद्धृतादर्भामासिमास्येवचोदिताः षटत्रिंशन्मते मासेनस्यादमावास्यादर्भोग्राह्योनवः स्मृतः गृह्यपरिशिष्टे येचपिंडाश्रितादर्भायैः कृतंपितृतर्पणं अमेध्याशुचिलिप्तायेतेषांत्यागोविधीयते लघुहारीतः पथिदर्भाश्चितौदर्भायेदर्भायज्ञभूमिषु स्तरणासनपिंडेषुषट्‍कुशान् ‍ परिवर्जयेत् ‍ ब्रह्मयज्ञेचयेदर्भायेदर्भाः पितृतर्पणे हतामूत्रपुरीषाभ्यांतेषांत्यागोविधीयते हेमाद्रौ अन्यानिचपवित्राणिकुशदूर्वात्मकानिच हेमात्मकपवित्रस्यह्येकांनार्हंतिवैकलाम् ‍ ।

त्यांमध्यें आधीं कुश सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत दक्ष - " समिधा , फुलें , कुश इत्यादिक आणावयाचा काल दिवसाचा दुसरा भाग सांगितला आहे . " दिवसाचे आठ भाग करुन त्यांतील दुसरा भाग समजावा . तेथेंच यम - " पितरांच्या श्राद्धकर्माविषयीं समूल दर्भ असावा . दर्भमूलाच्या योगानें महात्मा जो इंद्र त्याचे लोक प्राप्त होतात . " व्यास - पितरांचीं जीं कांहीं तर्पणादिक कार्यै तीं द्विगुण दर्भांनीं करावीं , त्यांत विशेषतः सात पानांचे दर्भ असावे . " शालंकायन - " सपिंडीकरणापर्यंत पितृक्रिया ऋजुदर्भांनीं करावी , सपिंडीकरणानंतर द्विगुण दर्भांनीं पितृक्रिया यथाविधि होते . " शंख - " जेथें कोठें पवित्र घ्यावयाचें तेथें आंत दर्भरहित साग्र प्रादेशमात्र अशा दोन दर्भांचें पवित्र समजावें . " हारीत - " चार दर्भांचें पवित्र ब्राह्मणासच सांगितलें आहे . क्षत्रियादि वर्णांना अनुक्रमानें एक एक दर्भानें न्यून पवित्र सांगितलें आहे . " स्मृत्यर्थसारांत - " अथवा ब्राह्मणादि सर्व वर्णांना दोन दर्भांचें गांठ दिलेलें नवें पवित्र असावें . " रत्नावलींत - " विद्वानानें दोन पेरांच्या मध्यभागीं पवित्र धारण करावें . " हेमाद्रींत स्कांदांत - अनामिका म्हणजे कनिष्ठेजवळची अंगुली तींत दर्भपवित्र धारण करावें . एका अनामिकेंत धारण करावें किंवा दोन अनामिकांत दोन दर्भपवित्रें धारण करावीं . " पवित्रांच्या अभाव असेल तर तेथेंच सुमंतु - " सर्व कर्मांत मूळ व अग्र यांनीं युक्त गर्भरहित असे दोन कुश उजव्या हातांत धारण करावे आणि डाव्या हातांत तसेच तीन कुश धारण करावे . " बौधायन - " दोन हातांमध्यें दोन दोन व तसेच आसनाचेठायींही दोन दर्भ धारण करावे . " दर्भग्रहणाविषयीं मंत्र सांगतो शंख - " विरिंचिना सहोत्पन्न परमेष्ठिनिसर्गज ॥ नुद सर्वाणि पापानि दर्भ स्वस्तिकरो भव . " स्मृत्यर्थसारांत - " हुंफट् ‍, या मंत्रानें एकवार कापून दर्भ घ्यावे . " भारद्वाज - " प्रेतक्रियेसाठीं , पितृकर्मासाठीं व अभिचारा ( जारणमारणा ) करितां ब्राह्मणानें प्राचीनावीती करुन दक्षिणेकडे मुख करुन दर्भ कापावे . " कुशांचा अभाव असतां अपरार्कांत सुमंतु - " कुश , काश ( कसई ), शर ( बाणतृण ), गुंद्र ( गोंदणी गवत ), जव , दूर्वा , लव्हाळा , गोकेश , मोळ आणि कुंद यांमध्यें पूर्वींच्या अभावीं पुढचे पुढचे घ्यावे . " काशादिकांविषयीं विशेष सांगतो शंख - " हातांत काश ( कसई ) असतां आचमन करुं नये ; कुशांप्रमाणें काश हातांत ठेऊन आचमनाचा विधि आहे अशा शंकेनें जर कधींही आचमन करील तर प्रायश्चित्ती होईल . तशाच दूर्वा हातांत असून आचमन करुं नये . " पृथ्वीचंद्रोदयांत यम - " ज्या ज्या महिन्यांत दर्भ काढले असतील त्या त्या महिन्यांतच त्यांचा उपयोग सांगितला आहे . " षटत्रिंशन्मतांत - " महिन्यानें अमावस्येस नवे दर्भ काढावे , असें सांगितलें आहे . " गृह्यपरिशिष्टांत - " जे दर्भ पिंडास लागले असतील , ज्या दर्भांनीं पितरांचें तर्पण केलें , ज्या दर्भांस अपवित्र अशुद्ध पदार्थ लागला असेल त्यांचा त्याग करावा . " लघुहारीत - " मार्गांत पडलेले दर्भ , स्मशानांतील दर्भ , यज्ञभूमीवरचे दर्भ , आस्तरणाचे दर्भ , आसनाचे दर्भ , आणि पिंडाचे दर्भ हे सहा प्रकारचे दर्भ वर्ज्य करावे . ब्रह्मयज्ञाचे दर्भ , पितृतर्पणाचे दर्भ आणि मूत्रपुरीषांनीं दूषित दर्भ या सर्व दर्भांचा त्याग करावा . " हेमाद्रींत - " कुश , दूर्वा इत्यादिकांचीं इतर पवित्रें सुवर्णपवित्राच्या षोडशांशाची बरोबरी करीत नाहींत . "

आतां श्राद्धाविषयीं हवि सांगतो -

अथहविः हेमाद्रौप्रचेताः कृष्णमाषास्तिलाश्चैवश्रेष्ठाः स्युर्यवशालयः महायवाव्रीहियवास्तथैवचमधूलिकाः कृष्णाः श्वेताश्चलोहाश्चग्राह्याः स्युः श्राद्धकर्मणि महायवावेणुबीजं मधूलिकायावंनालाइतिहेमाद्रिः कल्पतरुश्च भारते वर्धमानतिलंश्राद्धमक्षय्यंमनुरब्रवीत् ‍ सर्वकामैः सयजतेयस्तिलैर्यजतेपितृन् ‍ चंद्रिकायांदेवलः इष्टापूर्तेमृताहेचदर्शवृद्ध्यष्टकासुच पात्रेभ्यस्तेषुकालेषुदेयंनैवकुभोजनं सायणीये अगोधूमंचयच्छ्राद्धंमाषमुद्गविवर्जितं तैलपक्केनरहितंकृतमप्यकृतंभवेत् ‍ हेमाद्रावत्रिः अगोधूमंचयच्छ्राद्धंकृतमप्यकृतंभवेत् ‍ तत्रैवब्राह्मे यवैर्व्रीहितिलैर्माषैर्गोधूमैश्चणकैस्तथा संतर्पयेत्पितृन् ‍ मुद्गैः श्यामाकैः सर्षपद्रवैः नीवारैर्हरिश्यामाकैः प्रियंगुभिरथार्चयेत् ‍ हेमाद्रौकार्ष्णाजिनिः यदिष्टंजीवतश्चासीत्तदद्यात्तस्ययत्नतः सतृप्तोदुस्तरंमार्गंततोयातिनसंशयः कलिकायामाश्वलायनः कदल्यादिफलैः शस्तैर्मूलैरार्द्रादिकैरपि गोरसैर्मधुनादध्नाश्राद्धेसंतर्पयेत्पितृन् ‍ कदल्याम्रफलादीनिश्राद्धेसंपादयेत्सुधीः ।

हेमाद्रींत प्रचेता - काळे उडीद , तीळ , जव , तांदूळ , महायव ( वेळूंचे बीज ), व्रीहियव तसेच काळे पांढरे लोहवर्णाचे मधूलिक हे सर्व श्राद्धकर्माविषयीं श्रेष्ठ आहेत . " मधूलिक म्हणजे यावनाल ( जोंधळे ) असें हेमाद्रि कल्पतरु सांगतो . भारतांत - " ज्या श्राद्धांत तीळ वाढत्या प्रमाणांत असतात तें श्राद्ध अक्षय्य होतें , असें मनूनें सांगितलें आहे . ज्यानें तिलांनीं पितरांचा याग ( पूजा ) केला त्यानें इच्छिलेले सारे याग केले असें होतें . " चंद्रिकेंत देवल - " इष्ट ( यज्ञकर्म ), पूर्त ( वापी , कूप , आराम , देवालय इत्यादि कर्म ), मृतदिवस , दर्श , वृद्धि ( विवाहादि ), अष्टका , ह्या कालांचे ठायीं ब्राह्मणांना कुभोजन ( निंद्यभोजन ) देऊं नये . " सायणीयांत - " ज्या श्राद्धांत गव्हांचा पदार्थ नाहीं , उडीद व मूग नाहींत आणि तैलपक्क नाहीं तें श्राद्ध केलें तरी न केल्यासारखें होतें . " हेमाद्रींत अत्रि - " ज्या श्राद्धांत गोधूम ( गहूं ) नाहींत तें श्राद्ध केलें असून न केल्यासारखें होय . " तेथेंच ब्राह्मांत - ‘‘ जव , व्रीहि ( भात ), तीळ , उडीद , गोधूम , चणे , मूग , सांवे , मोहरीचा कल्क यांनीं पितरांना तृप्त करावें ; आणि देवभात , हरिसांवे , राळे यांनींही पितरांस तृप्त करावें . " हेमाद्रींत कार्ष्णाजिनि - " जीवंत असतां पित्रादिकांला जो पदार्थ आवडता असेल तो पदार्थ मेल्यानंतर प्रयत्नानें त्याला द्यावा . तो प्राणी तृप्त झाला म्हणजे दुस्तर मार्गाचें उल्लंघन करुन जातो , यांत संशय नाहीं . " कलिकेंत आश्वलायन - " केळीं वगैरे प्रशस्त फळें , आलें इत्यादिक मुळें , गोरस , मध , दहीं यांनीं श्राद्धांत पितरांस तृप्त करावें ; श्राद्धाचे ठायीं केळीं , आंबे इत्यादि फळें अवश्य मिळवावीं . "

हेमाद्रौपृथ्वीचंद्रोदयेचमार्कंडेयः गोधूमैरिक्षुभिर्मुद्गैः सतीनैश्चणकैरपि श्राद्धेषुदत्तैः प्रीयंतेमासमेकंपितामहाः विदार्याचभरुंडैश्चतिलैः शृंगाटकैस्तथा कंचुकैश्चतथाकंदैः कर्कंधूबदरैरपि पालेवतैरारुकैश्चाप्य क्षोटैः पनसैस्तथा काकोल्याक्षीरकाकोल्यातथापिंडालकैः शुभैः लाजाभिश्चसधानाभिस्त्रपुसैर्वारुचिर्भटैः सर्षपाराजशाकाभ्यामिंगुदैराजजंबुभिः प्रियालामलकैर्मुख्यैः फल्गुभिश्चतिलंटकैः वेत्रांकुरैस्तालकंदैश्चक्रिकाक्षीरिकावचैः लोचैः समोचैर्लकुचैस्तथावैबीजपूरकैः मुंजातकैः पद्मफलैर्भक्ष्यभोज्यैश्चसंस्कृतैः रागखांडवचोष्यैश्चत्रिजातकसमन्वितैः दत्तैस्तुमासंप्रीयंतेश्राद्धेषुपितरोनृणाम् ‍ एषांकोशहेमाद्यादिव्याख्या वैद्यकाद्यनुसारेण मध्यदेशभाषयानामान्युच्यंते सतीनैः कलायैः कलायस्तुसतीनकइत्यमरः बटुरीतिप्रसिद्धैः विदार्यातत्कंदेन भरुंडं जलजं मकाणाइतिश्राद्धमंजर्यां भूकूष्मांडमित्यन्ये शृंगाटकंसिंघाडा कंचुकः कंचनारः कंदः सूरणः अर्शोघ्नः सूरणः कंदइत्यमरः कर्कंधूः वन्यंसूक्ष्मंबदरं पालेवतंकोशातकी आरुकंअरुई अक्षोटंअखरोटः काकोलीक्षीरकाकोल्यौगौडेषुप्रसिद्धौ पिंडालकंसुथनी महाराष्ट्राणांमोहलकंदइतिप्रसिद्धं त्रपुसादयस्त्रयः कर्कटीभेदाः चिर्भटंखर्बुजम् ‍ सर्षपाइतिदीर्घश्छांदसः प्रियालंचिरौंजी फल्गुउदुंबरं तिलंटकंपटोलकं तालकंदः कंदविशेषः चक्रिकातिंतिणीबिंबा क्षीरिकाखीरिणी मोचंकदलीफलं लकुचंवडहरम् ‍ मुंजातकंगौडदेशेप्रसिद्धं पद्मफलंगट्टा रागखांडवः पिप्पलीशुंठियुक्तस्तुमुद्गयूषस्तुखांडवः रागखांडवतांयातिशर्करासंयुतंतुतत् ‍ इत्युक्तः पानविशेषः त्रिजातंलवंगैलापत्रकाणि मदनरत्नेकौर्मे कालशाकंचवास्तूकंमूलकंकृष्णनालिका प्रशस्तानीतिशेषः ।

हेमाद्रींत व पृथ्वीचंद्रोदयांत मार्कंडेय - " गहूं , उंसाचे पदार्थ ( गूळ साखर ), मूग , वाटाणे , चणे , हे श्राद्धांत दिले असतां एक महिनाभर पितामह तृप्त होतात . विदारीकंद , भरुंड ( मकाणा किंवा भुईकोंहाळा ), शिंगाडे , कंचनारकंद , सूरण , मोठें बोर , सूक्ष्मबोर , घोंसाळें , आरुक ( अरुइ ), अक्रोड , फणस , काकोली व क्षीरकाकोली ह्या गौडांत प्रसिद्ध , पिंडालक ( महाराष्ट्रांत मोहलकंद म्हणून प्रसिद्ध ), लाह्या , धाना ( भर्जितयव ), त्रपुस ( कांकडी ), एर्वारु ( कर्कटीविशेष ), चिर्भट ( खर्बुज ), मोहरी , राजशाक , हिंगणबेट , मोठीं जांभळें , प्रियाल ( चिरोंजी , चारोळी ), आंवळे , फल्गु ( उदुंबर ), तिलंटक ( पटोल ), वेताचे अंकुर , तालकंद ( कंदविशेष ), चुक्रिका ( चिंच किंवा तोंडलीं ), क्षीरिका ( खिरणी ), वच , लोच , मोच ( केळें ), लकुच ( वडहर , ओंट ), महाळुंग , मुंजातक ( गौडदेशांत प्रसिद्ध ), पद्मफल ( गट्टा ), भक्ष्य ( लाडू वगैरे ), भोज्य ( अन्नादिक ) हे सारे घृत तैल इत्यादिकांनीं संस्कार केलेले , रागखांडव ( पिंपळी सुंठ यांनीं युक्त मुगांचा यूष ( कढण ) तो खांडव आणि तोच शर्करायुक्त रागखांडव होय ), चोष्य ( चोखून खाण्याचे पदार्थ ), दालचिनी , तमालपत्र , वेलची , हे पदार्थ दिले असतां एक महिनापर्यंत पितरांची तृप्ति होते . " मदनरत्नांत कौर्मांत - " कालशाक , वास्तूक ( चंदनबटुवा ), मुळा , कृष्णनालिका हीं प्रशस्त आहेत . "

हेमाद्रौपृथ्वीचंद्रोदयेचवायुपुराणे कालशाकंमहाशाकंद्रोणशाकंतथार्द्रकं बिल्वामलकमृद्वीकापनसाम्रातदाडिमं चव्यंपालिवताक्षोटंखर्जूरंचकसेरुकं कोविदारश्चकंदश्चपटोलंबृहतीफलं पिप्पलीमरिचं चैवएलाशुंठीचसैंधवं शर्करागुडकर्पूरबदरीद्रोणपत्रकं तथा मधुकंरामठंचैवकर्पूरंगुडमेवच श्राद्धकर्मणि शस्तानिसैंधवंत्रपुसंतथा रामठंहिंगु कसेरुः कोविदारश्चतालकंदस्तथाबिसम् ‍ तमालंशतकंदश्चमध्वालुः शीतकंदकं कालेयंकालशाकंचसुनिषण्णंसुवर्चलं मांसंशाकंदधिक्षीरंचांबुवेत्रांकुरस्तथा कट् ‍ फलंकौंकणीद्राक्षातिंदुकंमोचमेवच अलाबुंग्रीवकंचारंकर्कंधुर्मधुसाह्वयम् ‍ वैकंकतंनारिकेलंशृंगाटकपरुषकं पिप्पलीमरिचेचैवपटोलंबृहतीफलं एवमादीनिचान्यानिस्वादूनिमधुराणिच नागरंचार्द्रकंदेयंदीर्घमूलकमेवचेति तथा शर्करा क्षीरसंयुक्ताः पृथुकानित्यमक्षयाः द्रोणशाकंगूमइतिप्रसिद्धम् ‍ मृद्वीकाद्राक्षा आम्रातंआंबाडाइतिप्रसिद्धोवृक्षः तत्फलंच पालिवतंजंबीरं पालिआलमितिगौडप्रसिद्धंवा खर्जूरंखजूर इतिप्रसिद्धम् ‍ कसेरुः जलजः कंदः कोविदारः कंचनारसदृशः तालकंदः तालमूली बिसंभसीडं शतकंदः शतावरी शालुकंसेरुकीतिप्रसिद्धम् ‍ कालेयंकरालसंज्ञः शाकः दारुहरिद्रावेति पृथ्वीचंद्रोदयः सुनिषण्णंकर्कटीसदृशंसुलटियाइतिगौडप्रसिद्धं सुवर्चलंशाकविशेषः कट् ‍ फलंश्रीपर्णीवृक्षफलं कौंकणीअम्लरसाद्राक्षा तिंदुकंडिडिसमितिकैदेवः तिंदुफलंवाग्रीवकंफलविशेषः चारंक्षुद्रतालं मधुसाह्वयंमधुकपुष्पंफलंवा वैकंकतंचैंचीतिगौडख्यातम् ‍ परुषकंपरुसमितिप्रसिद्धम् ‍ नागरंशुंठी पृथ्वीचंद्रोदयेब्राह्मे आम्रमाम्रातकंबिल्वंदाडिमंबीजपूरकं प्राचीनामलकंक्षीरंनारिकेरंपरुषकं नारंगकंचखर्जूरंद्राक्षानीलकपित्थकम् ‍ एतानिफलजातानिश्राद्धेदेयानियत्नतः मात्स्ये अन्नंतुसदधिक्षीरंगोघृतंशर्करान्वितम् ‍ मासंप्रीणातिसर्वान्वैपितृनित्याहकेशवः ।

हेमाद्रींत व पृथ्वीचंद्रोदयांत वायुपुराणांत - " कालशाक , महाशाक , द्रोणशाक , ( गूम असें प्रसिद्ध ), आलें , बेलफळ , आंवळा , द्राक्ष , फणस , आंबाडा , डाळिंब , चवक , पालिवत ( जंबीर किंवा पलिआल गौडप्रसिद्ध ), अक्रोड , खारीक , कसेरुक ( जलजकंद ), कोविदार , सुरण , पडवळ , डोलींफळ , पिंपळी , मिर्‍यें , वेलची , सुंठ , सैंधव , साखर , गूळ , कापूर , बोर , द्रोणपत्रक , तसेंच ज्येष्ठमध , हिंग , कापूर , गूळ , सैंधव , त्रपुस हीं श्राद्धकर्माविषयीं प्रशस्त आहेत . कसेरु , कोविदार ( कंचनारसदृश ), तालकंद ( तालमूली ), कमळाचा देंठ , तमालपत्र , शतकंद ( शतावरी ), मध्वालु , शीतकंदक ( शालूक , सेरुकी असा प्रसिद्ध ), कालेय ( कराल नांवाचा शाक किंवा दारुहळद ), कालशाक , सुनिषण्ण ( कांकडीसारखें सुलटिया म्हणून गौडप्रसिद्ध ), सुवर्चल ( शाकविशेष ), मांस , शाक , दहीं , दूध , उदक , वेत्रांकुर , कट् ‍ फल ( श्रीपर्णीवृक्षफळ ), कौंकणी ( आंबट द्राक्ष ), तिंदुक ( डिंडिस किंवा तिंदुफळ ), केळें , द्राक्ष , भोंपळा , ग्रीवक ( फलविशेष ), चारोळी , बोर , मधुसाव्हय ( मोहाचें फूल ), विकंकतफळ ( चैंची असें गौडप्रसिद्ध ), नारळ , शिंगाडे , परुषक ( फालसा ), पिंपळी , मिर्‍यें , पडवळ , डोलींफळ हीं व दुसरीं जीं स्वादिष्ट मधुर असतील तीं श्राद्धांत प्रशस्त आहेत . सुंठ , आलें , लांबटमुळा हीं देखील प्रशस्त आहेत . दूध साखर घालून पोहे द्यावें . " पृथ्वीचंद्रोदयांत ब्राह्मांत - " आंबा , आंबाडा , बेलफळ , डाळिंब , महाळुंग , प्राचीनामलक , क्षीर , नारळ , फालसा , नारिंग , खारीक , द्राक्ष , नील , कंवठ , हीं सारीं फलें श्राद्धांत मोठ्या यत्नानें द्यावीं . " मात्स्यांत - " अन्न , दहीं , दूध , गोघृत , शर्करा हीं दिल्यानें सर्व पितरांना एक महिना तृप्त करितात , असें केशव सांगतो . "

याज्ञवल्क्यः हविष्यान्नेनवैमासंपायसेनतुवत्सरम् ‍ मात्स्यहारिणकौरभ्रशाकुनच्छागपार्षतैः ऐणरौरववाराहशाशैर्मांसैर्यथाक्रमं मासवृद्ध्याभितृप्यंतिदत्तैरिहपितामहाः खड्गामिषंमहाशल्कंमधुमुन्यन्नमेवच लोहामिषंकालशाकंमांसंवार्ध्रीणसस्यच ( निगमः त्रिः पिबंत्विंद्रियक्षीणंश्वेतंवृद्धमजापतिम् ‍ वार्ध्रीणसंतुतंप्राहुर्याज्ञिकाः श्राद्धकर्मणि वार्ध्रीणसोजरच्छागइतिमेधातिथिः कात्यायनः छागोस्रमेषानालभ्यशेषाणिक्रीत्वालब्ध्वावास्वयंमृतानांवाह्रत्यपचेत् ‍ कौर्मे क्रीत्वालब्ध्वास्वयंवाथमृतानाह्रत्यवाद्विजः दद्याच्छ्राद्धेप्रयत्नेनतदस्याक्षय्यमुच्यते ) श्राद्धेदत्तस्यमांसस्याभक्षणेदोषमाहमनुः नियुक्तस्तुयथान्यायंयोमांसंनात्तिमानवः सप्रेत्यपशुतांयातिसंभवानेकविंशतिं अत्रबहुषुवचनेषुश्राद्धेमांसमधुनोः प्राशस्त्योक्तेः विनामांसेनयच्छ्राद्धंकृतमप्यकृतंभवेदितिहेमाद्रौदेवलोक्तेः यच्छ्राद्धंमधुनाहीनंतद्रसैः सकलैरपि मिष्टान्नैरपिसंयुक्तंपितृणांनैवतृप्तये अणुमात्रमपिश्राद्धेयदिनस्याच्चमाक्षिकम् ‍ नामापिकीर्तनीयंस्यात्पितृणांप्रीतयेततइति हेमाद्रौब्राह्मोक्तेश्च मांसमधुनोः श्राद्धेनियतत्वंगम्यते गौडनिबंधेमात्स्यसुमंतू मध्वभावेगुडोदेयः क्षीरस्यचतथादधि न लभ्यतेघृतंयत्रकुर्याद्धृतवतीजपं श्राद्धकलिकायांनागरखंडे कथंचिद्यदिविप्रेभ्योनदत्तंभोजनेमधु पिंडास्तुनैवदातव्याः कदाचिन्मधुनाविना बृहत्पराशरस्तुमांसंनिषेधति यस्तुप्राणिवधंकृत्वामांसैस्तर्पयते पितृन् ‍ सविद्वान् ‍ चंदनंदग्ध्वाकुर्यादंगारविक्रयम् ‍ क्षिप्त्वाकूपेयथाकिंचिद्वाल आदातुमिच्छति पतत्यज्ञानतः सोपिमांसेनश्राद्धकृत्तथा सएव सर्वथान्न्नंयदानस्यात्तदैवामिषमाश्रयेत् ‍ ब्राह्मणश्चस्वयंनाद्यात्तच्चश्वादिहतंयदि भागवतेपि नदद्यादामिषंश्राद्धेनचाद्याद्धर्मतत्त्ववित् ‍ मुन्यन्नैः स्यात्पराप्रीतिर्यथानपशुहिंसया तथेतिशेषः अत्रकेचित् ‍ मुन्यन्नंब्राह्मणस्योक्तंमांसंक्षत्रियवैश्ययोः मधुप्रदानंशूद्रस्यसर्वेषांवाविरोधियदितिहेमाद्रौपुलस्त्योक्त्याव्यवस्थामाहुः ।

याज्ञवल्क्य - " श्राद्धांत हविष्यान्न दिल्यानें एक मासपर्यंत पितर तृप्त होतात . पायस दिल्यानें एक संवत्सरपर्यंत तृप्त होतात . मत्स्य , हरण , मेंढा , पक्षी , बोकड , पृषत , एण , रुरु , डुकर , ससा यांचें मांस श्राद्धांत दिल्यानें अनुक्रमानें एक एक महिना अधिक पितामहांची तृप्ति होते . खड्गामिष ( गेंड्याचें मांस ), महाशल्य ( साळई ), मध , मुनीचें अन्न ( नीवारादि ), लोहामिष , कालीं उत्पन्न शाक आणि वार्ध्रीणसाचें मांस हीं श्राद्धांत उक्त आहेत . " ( निगम - " तीन अवयवांनीं उदक पिणारा इंद्रियें क्षीण झालेला श्वेतवर्ण वृद्ध असा जो बोकड त्याला याज्ञिक , श्राद्धकर्माविषयीं वार्ध्रीणस म्हणतात . " वार्ध्रीणस म्हणजे जीर्ण झालेला छाग असें मेधातिथि सांगतो . कात्यायन - " छाग , मेष यांना मारुन मांस घ्यावें , इतरांचें विकत घ्यावें किंवा स्वतः मिळवावें अथवा मृतांचें आणावें आणि पचन करावें . " कौर्मांत - " द्विजानें विकत घेऊन किंवा स्वतः मिळवून अथवा मृतांचें आणून श्राद्धाचे ठायीं प्रयत्नानें मांस द्यावें , तें दिलें असतां अक्षय होतें . " ) श्राद्धांत दिलेलें मांस ब्राह्मणानें भक्षण केलें नाहीं तर दोष सांगतो मनु - " यथान्यायानें दिलेलें मांस जो मनुष्य भक्षण करीत नाहीं तो मेल्यानंतर एकवीस जन्मपर्यंत पशु होतो . " येथें बहुत वचनांमध्यें श्राद्धांत मांसाला व मधाला प्राशस्त्य सांगितलें आहे ; आणि " मांसावांचून जें श्राद्ध तें केलें तरी न केल्यासारखें होतें " असें हेमाद्रींत देवलवचन आहे . तसेंच " जें श्राद्ध मधानें रहित तें सकल रसांनीं व मिष्टान्नांनीं जरी युक्त असलें तरी पितरांच्या तृप्तीकरितां होत नाहीं ; म्हणून श्राद्धांत जर अल्पही मध नसेल तर पितरांच्या तृप्तीसाठीं मधाचें नांव तरी घ्यावें " असें हेमाद्रींत ब्राह्मवचनही आहे . यावरुन श्राद्धांत मांस व मध हे नियमानें असावे असें सूचित होतें . गौडनिबंधांत मात्स्य व सुमंतु - " मधाच्या अभावीं गुड द्यावा , दुधाचे अभावीं दहीं द्यावें , जेथें घृत मिळत नाहीं तेथें घृतवती ऋचेचा जप करावा . " श्राद्धकलिकेंत नागरखंडांत - " ब्राह्मणांना भोजनाविषयीं कसेंहीकरुन जर मध दिला नाहीं तर पिंड तरी मधावांचून कधींही देऊं नयेत . " बृहत्पराशर तर मांसाचा निषेध्ब करितो . - " जो मनुष्य प्राणिवध करुन मांसानें पितरांस तृप्त करितो तो शहाणा चंदन जाळून कोळसे विकतो . जसा बालक कांहीं वस्तु विहिरींत टाकून ती काढण्याविषयीं इच्छितो आणि न जाणतां विहिरींत पडतो , तसा मांसानें श्राद्ध करणारा समजावा . " तोच सांगतो - " ज्या वेळीं सर्वथा अन्न मिळावयाचें नाहीं त्या वेळींच मांस घ्यावें , तें मांस कुत्रा इत्यादिकानें मारलेलें असेल तर ब्राह्मणानें स्वतः भक्षण करुं नये . " भागवतांतही - " श्राद्धांत आमिष देऊं नये , व धर्मतत्त्ववेत्यानें तें मांस भक्षणही करुं नये . जशी ऋषींच्या अन्नांनीं पितरांची परमप्रीति होते तशी पशुहिंसेनें होत नाहीं " असें आहे . ह्या मांसाविषयीं केचित् ‍ ग्रंथकार - " ब्राह्मणाला ऋष्यन्न सांगितलें , क्षत्रियवैश्यांना मांस सांगितलें आहे , मध हा शूद्राला सांगितला , अथवा जें विरुद्ध नसेल तें सर्वांना उक्त आहे , " अशी हेमाद्रिस्थ पुलस्त्यवचनावरुन व्यवस्था सांगतात .

पृथ्वीचंद्रोदयस्तु अक्षतागोपशुश्चैवश्राद्धेमांसंतथामधु देवराच्चसुतोत्पत्तिः कलौपंचविवर्जयेदितिनिगमोक्तेः वरातिथिपितृभ्यश्चपशूपाकरणक्रियेति कलिवर्ज्येषुहेमाद्रावादिपुराणात् ‍ मांसदानंतथाश्राद्धेवानप्रस्थाश्रमस्तथेत्युक्त्वा इमान् ‍ धर्मान् ‍ कलियुगेवर्ज्यानाहुर्मनीषिणइति बृहन्नारदीयेभिधानाच्चमांसविधिः कलिव्यतिरिक्तविषयः कलौमांसनिषेधानांचदेशाचाराव्द्यवस्था तथाचबृहन्नारदीये श्राद्धंप्रकृत्य यथाचारंप्रदेयंतुमधुमांसादिकंतथा देशाचाराः परिग्राह्यास्तत्तद्देशीयजैर्नरैः अन्यथापतितोज्ञेयः सर्वधर्मबहिष्कृतइति यस्मिन् ‍ देशेपुरेग्रामेत्रैविद्यैर्नगरेपिवा योयत्रविहितोधर्मस्तंधर्मंनविचालयेदितिभृगूक्तेश्चेत्याह तन्न होलाकाधिकरणन्यायेनदेशविशेषव्यवस्थापकपदकल्पनायोगात् ‍ निरुपितंचैतत् ‍ पितामहचरणैर्मांसमीमांसायामितिदिक् ‍ ।

पृथ्वीचंद्रोदय तर - " अभुक्त कन्येचा पुनरुद्वाह , मधुपर्कांत गोवध , श्राद्धांत मांस , तसाच मध व दिरापासून पुत्रोत्पत्ति हीं पांच कर्मै कलियुगांत वर्ज्य करावीं " असें निगमवचन आहे म्हणून आणि ‘ वर , अतिथि , पितर यांच्याकरितां पशुहिंसा ’ हें कलिवर्ज्यांत हेमाद्रींत आदिपुराणवचन आहे म्हणून आणि ‘ श्राद्धांत मांसदान , तसाच वानप्रस्थाश्रम ’ असें सांगून नंतर ‘ हे धर्म कलियुगांत वर्ज्य आहेत असें विद्वान् ‍ सांगतात ’ असें बृहन्नारदीयांतही सांगितलें आहे म्हणून मांसविधि कलिव्यतिरिक्तविषयक आहे . कलियुगांत मांसनिषेधक वचनें आहेत त्यांची देशाचारावरुन व्यवस्था समजावी ; कारण , तेंच बृहन्नारदीयांत श्राद्धाचा उपक्रम करुन सांगतो - " मधु , मांस इत्यादिक जसा आचार असेल तसें द्यावें , त्या त्या देशांतील मनुष्यांनीं त्या त्या देशाचे आचार ग्रहण करावे , देशाचाराविरुद्ध जो आचरण करितो तो पतित सर्वधर्मबहिष्कृत असा समजावा . " आणि " ज्या देशांत , ज्या गांवांत अथवा ज्या नगरांत विद्वानांनीं जो धर्म विहित केला त्या धर्माचें उल्लंघन करुं नये " असें भृगुवचनही आहे , अशी पृथ्वीचंद्रोदय मांसनिषेधाची व्यवस्था सांगतो . तें बरोबर नाहीं . कारण , होलाकाधिकरणन्यायानें मांस अमुकदेशीं द्यावें व अमुकदेशीं देऊं नये अशी व्यवस्था करणार्‍या पदाची कल्पना होत नाहीं . अर्थात् ‍ सर्वदेशविषयक निषेध समजावा . ह्याचें निरुपण पितामहचरणांनीं ( नारायणभट्टांनीं ) मांसमीमांसेंत केलें आहे . मीं ही दिशा दाखविली आही .

मनुः संवत्सरंतुगव्येनपयसापायसेनच वार्ध्रीणसस्यमांसेनतृप्तिर्द्वादशवार्षिकी त्रिः पिबंत्विंद्रयक्षीणंश्वेतं वृद्धमजापतिं वार्ध्रीणसंतुतंप्राहुर्याज्ञिकाः श्राद्धकर्मणि क्षीरादौविशेषमाहहेमाद्रौसुमंतुः पयोदधिघृतंचैवगवांश्राद्धेषुपावनम् ‍ महिषीणांघृतंप्राहुः श्रेष्ठंनतुपयः क्कचित् ‍ याज्ञवल्क्यः संधिन्यनिर्दशावत्सागोपयः परिवर्जयेत् ‍ औष्ट्रमैकशफंस्त्रैणमारण्यकमथाविकम् ‍ हेमाद्रौहारीतः नवसूतायाः सप्तरात्रादित्येके दशरात्रादित्यपरे मासेनोपेयुषंभवतीतिधर्मविदः एतद्रजोभावपरं देवलः अजाविमहिषीणांतुपयः श्राद्धेषुवर्जयेत् ‍ विकारान् ‍ पयसश्चैवमाहिषंतुघृतंहितम् ‍ तत्रैवब्राह्मे माहिषंचामरंमार्गमाविकैकशफोद्भवम् ‍ स्त्रैणमौष्ट्रंपाचितंचदधिक्षीरंत्यजेद्धृतम् ‍ सगुडंमरिचाक्तंतुतथापर्युषितंदधि जीर्णंतक्रमपेतंचनष्टास्वादंचफेनवत् ‍ माहिषापवादोपरार्केब्राह्मे देयंतक्रंतुसद्यस्कंनवनीतादनुद्धृतम् ‍ आरण्यमहिषीक्षीरंशर्करास्रुतिसंयुतम् ‍ मध्वक्तंतुहितंचैवदद्यात्तदमृतंयतः स्रुतिः क्षीरशरः श्राद्धकौमुद्यांचैवम् ‍ यद्यपि याज्ञवल्क्येन अन्नंपर्युषितंभोज्यंस्नेहाक्तंचिरसंस्थितम् ‍ अस्नेहाअपिगोधूमयवगोरसविक्रियाइति पर्युषितंदध्यादिभोज्यमुक्तम् ‍ तथापिगुडमरीचाक्तस्यपर्युषितदोषोत्रोच्यतइतिहेमाद्रिः तत्रैवब्राह्मे कालशाकंतंदुलीयंवास्तुकंमूलकंतथा शाकमारण्यकंचैवदद्याच्छ्राद्धेषुनित्यशः तंदुलीयंसूक्ष्मपत्रमितिहेमाद्रिः महाराष्ट्राणांमाठइतिप्रसिद्धम् ‍ अरण्यकंफांजीचूचादितत्रैव दाडिमंमागधीचैवनागरार्द्रकतिंतिणी आम्रातकंजीरकंचकुबरंचैवयोजयेत् ‍ मागधीपिप्पली नागरंशुंठी कुबरंकुस्तुंबरंधणियाइतिप्रसिद्धम् ‍ वायवीये अगस्त्यस्यशिखास्ताम्राः काषायाः सर्वएवच शिखानवपल्लवाः प्रभासखंडे आरामस्यतुसीमंताः कलायाः सर्वएवच सीमंताः नवपल्लवाः कौर्मे तमालंशतकंदंचमध्वालुः शीतकंदली मध्वालुः मोहलकंदः शीतकंदली राताळू इतिप्रसिद्धम् ‍ ।

मनु - " गाईचें दूध , पायस दिल्यानें एक वर्षपर्यंत पितरांची तृप्ति होते . वार्ध्रीणसाच्या मांसानें बारावर्षैपर्यंत पितरांची तृप्ति होते . तीन अवयवांनीं पिणारा ( उदक पीत असतां दोन कान पाण्यास लागतात तो ), इंद्रियक्षीण श्वेत वृद्ध असा बोकड त्यास याज्ञिक श्राद्धकर्माविषयीं वार्ध्रीणस म्हणतात . " क्षीरादिकांविषयीं विशेष सांगतो हेमाद्रींत सुमंतु - " श्राद्धाचे ठायीं दूध , दहीं , तूप हीं गाईंचीं पवित्र आहेत . महिषींचें घृत श्रेष्ठ आहे असें सांगतात , दूध श्रेष्ठ आहे असें कोठें नाहीं . " याज्ञवल्क्य - " गर्भास जाणारी , व्याल्यावर दहा दिवस न झालेली , वत्सरहित अशा गाईचें दूध वर्ज्य करावें . उंटी , एकशफा ( घोडी इत्यादिक ) स्त्रिया , अरण्यांतील पशू , मेंढी यांचें दूध वर्ज्य करावें . " हेमाद्रींत हारीत - " नवीन प्रसूत झालेलीस सात दिवस झाल्यावर ग्रहण करावें , असें कोणी म्हणतात . दहा दिवसांनंतर घ्यावें , असें दुसरे सांगतात . " एक मासानंतर ग्रहण करण्यास योग्य असें धर्मवेत्ते सांगतात . हें रज असेल तर तद्विषयक आहे . देवल - " बकरी मेंढी आणि महिषी यांचें दूध श्राद्धांत वर्ज्य करावें आणि दुधाचे विकार ( दहीं , तक इत्यादिक ) तेही वर्ज्य करावे . महिषीचें घृत योग्य आहे . " तेथेंच ब्राह्मांत - " महिषी , चमरी ( मृगविशेष ), मृगी , मेंढी , घोडी इत्यादिक एकशफी , स्त्रिया , उंटी , या सर्वांचें व याचना केलेलें असें दहीं , दूध , घृत हें वर्ज्य करावें . तसेंच गूळ मिर्‍यें घालून पर्युषित ( शिळें ) झालेलें दहीं टाकावें . फुटून निवळी झालेलें , स्वाद नष्ट झालेलें व फेंसयुक्त असें तक टाकावें . " महिषीदुग्धादिविषयीं अपवाद सांगतो अपरार्कांत ब्राह्मांत - " सद्यः त्या वेळीं केलेलें ताक लोणी काढल्याशिवाय द्यावें . अरण्यांतील महिषीचें दूध वरची साय , साखर व मध हे मिश्र करुन उत्तम झालेलें तें दूध द्यावें ; कारण , तें अमृतासारखें आहे . " श्राद्धकौमुदींतही असेंच सांगितलें आहे . जरी याज्ञवल्क्यानें - " तैलादिक स्नेहांनीं मिश्रित असें अन्न फार वेळ राहून पर्युषित झालें तरी तें भोज्य ( भक्षणाला योग्य ) आहे आणि गहूं , जव , गोरस यांचे विकार पर्युषित ( शिळे ) असून स्नेहरहित असले तरी ते भोज्य आहेत . " ह्या वचनानें पर्युषित दहीं वगैरें भोज्य आहे असें सांगितलें , तथापि गूळ मिर्‍यें यांनीं युक्त जें दहीं त्याला पर्युषितत्व ( शिळेपणाचा ) दोष येथें सांगितला आहे असें हेमाद्रि सांगतो . तेथेंच ब्राह्मांत - " कालशाक ( उन्हाळी ), तांदुळजा ( माठ वास्तुक ( चंदनबटुवा ), मुळा , आरण्यक शाक ( फांजीचूचादि ), हीं शाकें श्राद्धांत नित्य द्यावीं . " तांदुळजा सूक्ष्मपानाचा घ्यावा असें हेमाद्रि सांगतो . तेथेंच - " डाळिंब , पिंपळी , सुंठ , आलें , चिंच , आंबाडा , जिरें , कोथिंबिर ( धणे ) हीं श्राद्धांत द्यावीं . " वायवीयांत - " अगस्त्याचे तांबडे नवपल्लव , काषायरंगाचे सारे पल्लव श्राद्धास उक्त आहेत . " प्रभासखंडांत - " उपवनांतील नवपल्लव , आणि गंडदूर्वा उक्त आहेत . " कौर्मांत - " तमालपत्र , शतावरी , मध्वालु ( मोहलकंद ), शीतकंदली ( राताळू ), हीं श्राद्धास उक्त आहेत . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP