मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धाविषयीं ब्राह्मण

तृतीयपरिच्छेद - श्राद्धाविषयीं ब्राह्मण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां श्राद्धाविषयीं ब्राह्मण सांगतो -

अथविप्राः तेचोत्तममध्यमाधमभेदेनत्रिविधाः तत्राद्याः अत्रमदीयाः श्लोकाः त्रिनाचिकेतस्त्रिमधुश्चबह्वृचोप्याथर्वणोयाजुषसामगौच षडंगविच्चत्रिसुपर्णवेत्ताप्यथर्वशीर्ष्णोध्ययनेतरश्च शतायुवेदार्थविदौप्रवक्तास्याद्ब्रह्मचारीचतथाग्निचिच्च सीदद्वृत्तिः सत्यवाक्पूरुषैः स्वैर्मातापित्रोः पंचभिः ख्यातवंशः पत्नीयुक्तोज्येष्ठसामापुराणवेत्तापुत्रीचेतिहासेष्वभिज्ञः योगीभिक्षुः सामगोब्रह्मवेत्तापंचाग्निश्चश्रोत्रियस्तत्सुतोवा शंभुध्यायीश्रीशपादाब्जसेवीपांथश्चैतेतूत्तमाः संप्रदिष्टाः भिक्षुर्योगीपांथएतेत्वलभ्याभाग्याल्लब्धाश्चेत्तदाभोजनीयाः श्राद्धेविप्रेषूपविष्टेषुपश्चात्संप्राप्ताश्चेद्विप्रपंक्तौतुभोज्याः अत्रमूलंहेमाद्रौज्ञेयम् ‍ तत्रैवनारदः योवैयतीननादृत्य भोजयेदितरान् ‍ द्विजान् ‍ विजानन्वसतोग्रामेकव्यंतद्यातिराक्षसान् ‍ दीपकलिकायांदक्षः विनामांसेनमधुनाविनादक्षिणयाशिषा परिपूर्णंभवेच्छ्राद्धंयतिषुश्राद्धभोजिषु एतच्चज्ञानिविषयम् ‍ त्रिनाचिकेतस्त्रिसुपर्णोयजुर्वेदैकदेशौतद्व्रतेनतदध्यायिनौ यस्यसप्तपूर्वेसोमपाः सत्रिसुपर्णइतिबोपदेवः त्रिमधुऋग्वेदैकदेशः तदध्यायी केचिन्नाचिकेतंचयनंत्रिः कृतवानित्यर्थमाहुस्तद्धेमाद्रिविरुद्धम् ‍ हेमाद्रौगौतमः युवभ्योदानंप्रथमंपितृवयसइत्येके मात्स्येमनुः यश्चव्याकुरुतेवाचंयश्चमीमांसतेध्वरम् ‍ सामस्वरविधिज्ञश्चपक्तिपावनपावनाः कौर्मे असमानप्रवरकोह्यसगोत्रस्तथैवच असंबंधीचविज्ञेयोब्राह्मणः श्राद्धसिद्धये गारुडे श्राद्धेषुविनियोज्यास्तेब्राह्मणाब्रह्मवित्तमाः येयोनिगोत्रमंत्रांतेवासिसंबंधवर्जिताः मनुः नमित्रंभोजयेच्छ्राद्धेधनैः कार्योस्यसंग्रहः नारिंनमित्रंयोविद्यात्तंतुश्राद्धेनिमंत्रयेत् ‍ द्वयोर्भ्रात्रोः श्राद्धेभोजनंनिषिद्धं पितृपुत्रौभ्रातरौद्वौनिरग्निंगुर्विणीपतिम् ‍ सगोत्रप्रवरंचैवश्राद्धेषुपरिवर्जयेदितिश्राद्धदीपकलिकायांजातूकर्ण्योक्तेः ॥

ब्राह्मण तीन प्रकारचे - उत्तम , मध्यम , आणि अधम . त्यांत पहिले ( उत्तम ) सांगतों - या ब्राह्मणांविषयीं मी ( कमलाकरभट्टानें ) केलेले श्लोक - " त्रिनाचिकेत व त्रिसुपर्ण ( हे यजुर्वेदांतील भाग आहेत त्यांचें व्रतपूर्वक अध्ययन करणारे ), त्रिमधु ( त्रिमधु म्हणून ऋग्वेदांतील एकदेश त्याचें अध्ययन करणारा ), ऋग्वेदी , अथर्वण वेद म्हटलेला , यजुर्वेद म्हटलेला , सामवेद म्हटलेला , वेदाचीं सहा अंगें जाणणारा , त्रिसुपर्णवेत्ता , अथर्वशीर्षाच्या अध्ययनाविषयीं रत , शतायु ( शंभर वर्षै वांचलेला ), वेदार्थवेत्ता , वेदार्थ सांगणारा , ब्रह्मचारी , अग्निचयन करणारा , उपजीविकारहित , सत्यवक्ता , मातृकुलांतील व पितृकुलांतील पांच पुरुषांनीं ज्याचा वंश प्राख्यात आहे तो , सपत्नीक , ज्येष्ठसामा ( सामवेदांतील ज्येष्ठसामभाग अध्ययन केलेला ), पुराणवेत्ता , पुत्रवान् ‍, भारतादि इतिहास जाणणारा , योगाभ्यासी , संन्यासी , सामगान करणारा , ब्रह्मज्ञानसंपन्न , पांच अग्नि धारण करणारा , श्रोत्रिय ( वेदपारंगत ), श्रोत्रियाचा पुत्र , शंकराचें ध्यान करणारा , विष्णूच्या चरणकमलाची सेवा करणारा , पांथ ( मार्ग चालून आलेला ), हे ब्राह्मण उत्तम म्हणून सांगितले आहेत . भिक्षु , योगी आणि पांथ हे अलभ्य आहेत , भाग्यवशानें प्राप्त झाले तर त्यांना भोजन घालावें . श्राद्धामध्यें ब्राह्मण वसल्यानंतर जर हे प्राप्त झाले तर ब्राह्मणांच्या पंक्तीमध्यें यांना भोजन घालावें . " ह्या श्लोकांचें मूळ हेमाद्रींत पाहावें . तेथेंच नारद सांगतो - " यति गांवांत राहात आहेत असें जाणून त्यांचा अनादर करुन जो मनुष्य श्राद्धांत इतर ब्राह्मणाला भोजन घालतो , त्याचें तें श्राद्ध राक्षसांस प्राप्त होतें . " दीपकलिकेंत दक्ष - " यतींना श्राद्धभोजन घातलें असतां मांसावांचून , मधावांचून , दक्षिणेवांचून व आशीर्वादावांचून श्राद्ध परिपूर्ण होतें . " हें सांगणें यति ज्ञानी असतील तद्विषयक आहे . पूर्वश्लोकांतील त्रिनाचिकेत व त्रिसुपर्ण हे यजुर्वेदाचे एकदेश आहेत त्यांचें व्रतग्रहणपूर्वक अध्ययन करणारे समजावे . ज्याचे सात पूर्वज सोमपान केलेले तो त्रिसुपर्ण असें बोपदेव सांगतो . त्रिमधु म्हणून ऋग्वेदाचा एकदेश तो म्हणणारा . केचित् ‍ ग्रंथकार - नाचिकेताचें चयन त्रिवार करिता झाला तो त्रिनाचिकेत , असें म्हणतात , तें हेमाद्रीविरुद्ध आहे . हेमाद्रींत गौतम - " तरुणांना दान प्रथम करावें . पित्याच्या वयाचा तो ब्राह्मण त्याला प्रथम द्यावें , असें कोणी म्हणतात . " मात्स्यांत मनु - " व्याकरणशास्त्रवेत्ता , यज्ञाची मीमांसा जाणणारा आणि सामवेदाचा स्वरविधि जाणणारा हे तिघे पंक्तिपावनांनाही पवित्र करणारे आहेत . " कौर्मांत - " भिन्नप्रवरी , भिन्नगोत्री व संबंधरहित असे जे ब्राह्मण ते श्राद्धाविषयीं समजावे . " गारुडांत - " योनिसंबंधी ( मातुल , श्वशुर , शालक इत्यादि ), गोत्रसंबंधी ( स्वगोत्रांतील ), मंत्रसंबंधी ( मंत्रदीक्षा दिलेले व घेतलेले ), आणि शिष्यत्वसंबंधी हे वर्ज्य करुन इतर ब्रह्मवेत्ते ब्राह्मण श्राद्धाविषयीं योजावे . " मनु - " मित्राला श्राद्धांत सांगूं नये , द्रव्य देऊन त्याला वश करावा . जो शत्रु नाहीं व मित्र नाहीं त्याला श्राद्धाचें आमंत्रण द्यावें . " एका श्राद्धांत दोन भ्रात्यांना सांगण्याचा निषेध आहे ; कारण , " पितापुत्र , दोन भ्राते , अग्निरहित , गर्भिणीपति , सगोत्र , सप्रवर , हे श्राद्धाविषयीं वर्ज्य करावे . " असें श्राद्धदीपकलिकेंत जातूकर्ण्याचें वचन आहे .

आतां मध्यम ब्राह्मण सांगतो -

अथमध्यमाः हेमाद्रौकौर्मगार्ग्यौ नैकगोत्रेहविर्दद्याद्यथाकन्यातथाहविः अभावेह्यन्यगोत्राणामेकगोत्रांस्तुभोजयेत् ‍ अत्रकेचित्स्वशाखीयान् ‍ मुख्यानाहुः पठंतिच निमंत्रयीतपूर्वेद्युः स्वशाखीयन् ‍ द्विजोत्तमान् ‍ स्वशाखीयद्विजाभावेद्विजानन्यान्निमंत्रयेदिति इदंतुनिर्मूलत्वाद्धेमाद्रिणादूषितत्वाच्चोपेक्ष्यम् ‍ मनुरपि यत्नेनभोजयेच्छ्राद्धेब्राह्मणंवेदपारगं शाखांतगमथाध्वर्युंछंदोगंवासमाप्तिगम् ‍ एषामन्यतमोयस्यभुंजीतश्राद्धमर्चितः पितृणांतस्यतृप्तिः स्याच्छाश्वतीसाप्तपौरुषी अत्रमामकः श्लोकः मातामहोमातुलभागिनेयदौहित्रजामातृगुरुस्वशिष्याः ऋत्विक् ‍ चयाज्यश्वशुरौस्वबंधुश्यालागुणाढ्यास्त्वनुकल्पभूताः बंधवोमातृष्वसृपितृष्वसृमातुलपुत्राइतिबोपदेवः अत्रमूलंहेमाद्रौज्ञेयम् ‍ सगुणस्वस्त्रीयाद्यतिक्रमेदोषएव सप्तपूर्वान् ‍ सप्तपरान् ‍ पुरुषानात्मनासह अतिक्रम्यद्विजानेतान्नरकेपातयेत् ‍ खग संबंधिनस्तथासर्वान् ‍ दौहित्रंविट् ‍ पतिंतथा भागिनेयंविशेषेणतथाबंधुंखगाधिपेतिमदनरत्नेभविष्योक्तेः अतएवयाज्ञवल्क्यो ब्राह्मणप्रातिवेश्यानामेतदेवानिमंत्रणइतिगुण्यतिक्रमेदशपणंदंडमाह आसन्नमात्रपरमिदम् ‍ मूर्खेतुनदोषः ब्राह्मणातिक्रमोनास्तिमूर्खेचैवविवर्जितेज्वलंतमग्निमुत्सृज्यनहिभस्मनिहूयतेइतिकात्यायनोक्तेः विप्रस्यापिदोषः अविद्वान्प्रतिगृह्णानोभस्मीभवतिदारुवदितिमनूक्तेः अपरार्केअत्रिः षडभ्यस्तुपुरुषेभ्योऽर्वागश्राद्धेयास्तुगोत्रिणः षडभ्यस्तुपरतोभोज्याः श्राद्धेस्युर्गोत्रजाअपि एतच्चब्राह्मणालाभे अपिशब्दात् ‍ असंभवेहेमाद्रौगौतमः शिष्यांश्चैकेसगोत्रांश्चभोजयेदूर्ध्वंत्रिभ्योगुणवतः आपस्तंबः ब्राह्मणान् ‍ भोजयेद्योनिगोत्रमंत्रांतेवास्यसंबंधिनः गुणहान्यांतुपरेषांसमुदितः सोदर्योपिभोजयितव्यः एतेनांतेवासिनोव्याख्याताइति अत्रविशेषमाहात्रिः पितापितामहोभ्रातापुत्रोवाथसपिंडकः नपरस्परमर्घ्याः स्युर्नश्राद्धेऋत्विजस्तथा ऋत्विक्पुत्रादयोप्येतेसकुल्याब्राह्मणाः स्मृताः वैश्वदेवेनियोक्तव्यायद्येतेगुणवत्तराः सगोत्राननियोक्तव्याः स्त्रियश्चैवविशेषतइति ।

हेमाद्रींत कौर्म व गार्ग्य - " एकगोत्रांत हवि ( श्राद्धान्न ) देऊं नये ; कारण , जशी कन्या तसें हवि आहे . अन्यगोत्र्यांचा अभाव असेल तर एकगोत्रांनाही भोजन द्यावें . " येथें कोणी आपल्या शाखेचे ब्राह्मण मुख्य आहेत असें म्हणतात व त्याविषयीं वचनही सांगतात - " पूर्वदिवशीं आपल्या शाखेचे उत्तम ब्राह्मण सांगावे , आपल्या शाखेचे न मिळतील तर इतर ब्राह्मण सांगावे . " हें वचन निर्मूल असल्यामुळें व हेमाद्रीनें दूषित केल्यामुळें उपेक्षणीय आहे . मनुही - " श्राद्धाविषयीं प्रयत्नानें वेदपारंगत असा ब्राह्मण सांगावा ; शाखाध्ययन केलेला यजुर्वेदी सांगावा ; किंवा छंदोग समाप्त झालेला असा ब्राह्मण सांगावा . ज्याच्या श्राद्धांत ह्या तिघांपैकीं एक पूजित होऊन भोजन करील त्याच्या पितरांची सात पुरुषपर्यंत शाश्वत तृप्ति होईल . " या ठिकाणीं मी ( कमलाकरानें ) केलेला श्लोक - " मातामह , मातुल , भगिनीपुत्र , कन्यापुत्र , जामाता , गुरु , शिष्य , ऋत्विक् ‍, यज्ञ करणारा , श्वशुर , बंधु , शालक , हे गुणयुक्त असतील तर मध्यम होत . " वरील श्लोकांतील बंधुशब्दानें माउसबंधु , आतेबंधु , व मामेबंधु हे घ्यावे , असें बोपदेव सांगतो . ह्या श्लोकाचें मूळ हेमाद्रींत पाहावें . गुणयुक्त अशा भागिनेयादिकांचा अतिक्रम केला ( न सांगितले ) तर दोषच आहे . कारण , " सारे संबंधी , दौहित्र , जामाता , भागिनेय आणि बंधु ह्या ब्राह्मणांचा अतिक्रम करील तर आपणासहवर्तमान सात पूर्वींच्या व सात पुढच्या पुरुषांस नरकांत पाडील . " असें मदनरत्नांत भविष्यवचन आहे , म्हणूनच याज्ञवल्क्यानें " जवळच्या ब्राह्मणांना निमंत्रण केलें नाहीं तर हाच दंड " ह्या वचनानें गुणी ब्राह्मणाचा अतिक्रम झाला असतां दहा पण ( पैसे ) दंड सांगितला . हा भविष्योक्त दोष गुणवान् ‍ जवळ असतील तद्विषयक आहे . मूर्ख असतील तर दोष नाहीं . कारण , " मूर्ख वेदरहित असा असतां अतिक्रम केला तर दोष नाहीं ; कारण , प्रदीप्त अग्नि टाकून भस्माचे ठिकाणीं होम करावयाचा नाहीं . अर्थात् ‍ वेदरहित तो भस्मासारखा होय . " असें कात्यायनवचन आहे . अविद्वान् ‍ ब्राह्मणालाही दोष आहे . कारण , " अविद्वान् ‍ प्रतिग्रह करील तर काष्ठाप्रमाणें भस्मरुप होतो " असें मनुवचन आहे . अपरार्कांत अत्रि - " सहा पुरुषांच्या अलीकडचे स्वगोत्रज ब्राह्मण श्राद्धाला योग्य नाहींत . सहा पुरुषांच्या पलीकडचे गोत्रज असले तरी ते श्राद्धाला सांगावे . " " गोत्रजा अपि " येथें अपिशब्द आहे त्यावरुन ब्राह्मण न मिळतील तर गोत्रज सांगावे , असें होतें . ब्राह्मणांचा असंभव असतां हेमाद्रींत गौतम - " अन्य आचार्य असें सांगतात कीं , गुणवंत असे तीन पुरुषांच्या पलीकडचे गोत्रज व शिष्य हे श्राद्धाला सांगावे . " आपस्तंब - " योनि , गोत्र , मंत्र , शिष्यत्व या संबंधांनीं रहित अशा ब्राह्मणांस भोजन घालावें ; गुणी ब्राह्मण न मिळेल तर इतर ब्राह्मणांच्या समुदायांत सहोदर भ्रात्यालाही भोजन घालावें . येणेंकरुन अंतेवासी म्हणजे शिष्य यांचे स्पष्टीकरण झालें . " येथें विशेष सांगतो अत्रि - " पिता , पितामह , भ्राता , पुत्र , अथवा सपिंड हे परस्पर पूजेला योग्य होत नाहींत . तसेच श्राद्धामध्यें ऋत्विज योग्य नाहींत . ऋत्विजांचे पुत्रादिक हे सकुल्य ब्राह्मण म्हटले आहेत . जर हे गुणवंत असतील तर यांना वैश्वदेवस्थानीं योजावे , सगोत्र ब्राह्मण सांगूं नयेत व विशेषेंकरुन स्त्रियाही सगोत्र सांगूं नयेत . "

आतां वर्ज्य ब्राह्मण सांगतो -

अथवर्ज्याः अत्रमामकाः श्लोकाः वर्ज्यान् ‍ प्रवक्ष्येत्वथरोगिवैरिहीनाधिकांगान् ‍ कितवान् ‍ कृतघ्नान् ‍ नक्षत्रशास्त्रेणचजीवमानान् ‍ भैषज्यवृत्त्यापिचराजभृत्यान् ‍ संगीतकायस्थकुसीदवृत्त्यावेदत्रयेणापिकवित्ववृत्या देवार्चनेनापिचजीवमानान् ‍ स्वाध्यायदाराग्निसुतोझ्झकाणान् ‍ दुर्वालखल्वाटकुनख्यधर्मिनटांश्चपौनर्भवकृष्णदंतान् ‍ अगारदाहीगरदः समुद्रयायीचकुंडाश्यथकूटकारी बालांश्चयोध्यापयतेस्वपुत्रादवाप्तविद्यस्त्वथकुंडगोलौ अग्रेदिधिष्वाः पतिरस्त्रकर्तासोमक्रयीतैलिककेकराक्षौ युद्धाचार्यः पक्षिणांपोषकश्चस्रोतोभेत्तावृक्षसंरोपकश्च मेषाणांवामाहिषाणांचपुष्ट्यास्वीयस्त्रीषुप्रहितैर्यश्चजारैः जीवत्यध्येतुश्चदत्तानुयोगाद्द्रव्यप्राप्त्यैवेदमुद्धाटयन्तः ग्रामयाजिपशुकेशविक्रयीस्तेनशिल्पिपितृवादकारकान् ‍ अर्थकामरतशूद्रयाजकश्मश्रुहीनजटिमुंडिनिर्घृणान् ‍ यस्यचैवगृहिणीरजस्वलास्वार्थपाकरतशापदायकान् ‍ क्लीबकुष्ठ्यतिविलोहितेक्षणान् ‍ कुब्जवामनमृषाभिशापिनः पुत्रहीनमथकूटसाक्षिणंप्रातिहारिकमयाज्ययाजकं स्वात्मदातृपरिवेत्तृयाजकस्तेनहिंस्त्रकमुखान् ‍ विवर्जयेत् ‍ अत्रमूलंहेमाद्रौपृथ्वीचंद्रोदयेचज्ञेयं भारतेदानधर्मेषुश्राद्धवर्ज्यविप्राधिकारे कितवोभ्रूणहायक्ष्मीपशुपालोनिराकृतिः ग्राम्यप्रेष्योवार्धुषिकोगायकः सर्वविक्रयी सामुद्रिकोराजभृत्यस्तैलिकः कूटकारकः पित्राविवदमानश्चयस्यचोपपतिर्गृहे अभिशस्तस्तथास्तेनः शिल्पंयश्चोपजीवति पर्वकारश्चसूचीचमित्रध्रूक् ‍ पारदारिकः अव्रतानामुपाध्यायः कांडपृष्ठस्तथैवच श्वभिश्चयः परिक्रामेद्यः शुनादष्टएवच परिवित्तिस्तथास्तेनोदुश्चर्मागुरुतल्पगः कुशीलवोदेवलकोनक्षत्रैर्यश्चजीवति ईदृशाब्राह्मणाज्ञेयाअपांक्तेयायुधिष्ठिर तथा ऋणकर्ताचयोराजन् ‍ यश्चवार्धुषिकोनरः कांडपृष्ठः स्वशाखांत्यक्त्वापरशाखयोपनीतः तदध्यायीच क्षत्रियवैश्यवृत्तौ नारदस्तु तस्यामेवतुयोवृत्तौब्राह्मणोवसतेरसान् ‍ कांडपृष्ठश्च्युतोमार्गात्सोपांक्तेयः प्रकीर्तितइत्याह हारीतः शूद्रापुत्राः स्वयंदत्तायेचैतेक्रीतकाः सुताः तेसर्वेमनुनाप्रोक्ताः कांडपृष्ठानसंशयः ।

येथें मी ( कमलाकरभट्टानें ) केलेले श्लोक - " वर्ज्य सांगतों - रोगी ( ज्वर - अतिसार - क्षय इत्यादि रोगयुक्त ), शत्रु , एकादा अवयव नसलेला , एकादा अवयव अधिक असलेला , कपटी , कृतघ्न ( मित्रद्रोही ), ज्योतिषशास्त्रानें जीवन करणारा , वैद्यकीवर जीवन करणारा , राजसेवक , गायक , लेखक , व्याजबट्यानें जीवन करणारा , वेदविक्रय करणारा , कवित्व करुन निर्वाह करणारा , देवपूजा करुन जीवन करणारा , अध्ययनत्याग करणारा , स्त्रीत्याग करणारा , अग्नित्याग करणारा , पुत्रत्याग करणारा , दुष्ट केशांचा , टक्कल पडलेला , कुत्सितनखी , अधर्मी , नट , पौनर्भव , ( द्विवारविवाहित स्त्रीचा पुत्र ), काळ्या दांतांचा , घर जाळणारा , विष घालणारा , समुद्रयान करणारा , कुंडाचें अन्न खाणारा , खोटें करणारा , बालकांस शिकविणारा , आपल्या पुत्रापासून विद्या शिकलेला , कुंड , गोले , अग्रेदिधिषूचा पति , शस्त्रास्त्रें करणारा , सोमविक्रय करणारा , तेल गाळणारा , केकराक्ष , युद्धाचा आचार्य , पक्षिपोषक , जलप्रवाह फोडणारा , वृक्ष लावणारा , मेंढ्यांचा पोषक , महिषांचा पोषक , आपल्या स्त्रियांचे ठिकाणीं जारकर्मानें जीवन करणारा , शिष्यांपासून द्रव्य घेऊन जीवन करणारा , द्रव्यप्राप्तीसाठीं वेदघोष करणारा , गांवाचा उपाध्याय , पशुविक्रयी , केशविक्रयी , चोर , शिल्प करणारा , पित्याशीं वाद करणारा , द्रव्य काम यांत निमग्न असलेला , शूद्राचा याग करणारा , श्मश्रुरहित , जटाधारी , मुंडलेला , निर्दय , ज्याची स्त्री रजस्वला तो , आपल्याकरितांच पाक करणारा , शाप देनारा , नपुंसक कुष्ठरोगी , अत्यंत लाल डोळे असलेला , कुबडा , खुजा , शब्दानें दोषी झालेला , पुत्रहीन , खोटी साक्ष देणारा , द्वारपाल , पतितादिकांचा याग करणारा , आपलें दान करणारा , परिवेत्त्याचा याग करणारा , चोर , हिंसक इत्यादि ब्राह्मण वर्ज्य करावे . " यांचें मूळ हेमाद्रींत पृथ्वीचंद्रोदयांत पाहावें . भारतांत दानधर्मांत श्राद्धवर्ज्य विप्राधिकारी सांगतो - " कपटी , गर्भहत्या करणारा , क्षयरोगी , पशुपालक , स्वशाखाध्ययनरहित , गांवाचा दूत , वाणिज्य करणारा , गायक , सर्व विक्रय करणारा , सामुद्रिक करणारा , राजसेवक , तेल गाळणारा , खोटें करणारा , पित्याशीं विवाद करणारा , ज्याच्या स्त्रियेला दुसरा उपपति आहे तो , सुरापानादि मिथ्या दोष ठेवलेला , चोर , शिल्पकर्मानें जीवन करणारा , पेरें करणारा , सुई करणारा , मित्रद्रोही , परस्त्रीचेठायीं जाणारा , उपनयनरहितांचा उपाध्याय , कांडपृष्ठ , कुत्र्यांबरोबर फिरणारा , कुत्र्यानें दंश केलेला , परिवेत्त्याचा ज्येष्ठ अविवाहित भ्राता , चोर , कुष्ठी , गुरुपत्नीगामी , नर्तक , देवलक , जोशी , अशा प्रकारचे ब्राह्मण अपांक्तेय ( अपवित्र ) आहेत . तसेच ऋणकर्ता , वाणिज्यकारी हे वर्ज्य . कांडपृष्ठ म्हणजे आपली शाखा टाकून परशाखेनें उपनीत व त्या शाखेचें अध्ययन करणारा होय . नारद तर - " जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्यवृत्ति पतकरुन रसांचा व्यवहार करितो , तो मार्गापासून च्युत व अपांक्त असा कांडपृष्ठ होय " असें सांगतो . हारीत - " शूद्रेचे पुत्र आपलें आपण दान केलेले व विकत घेतलेले ते सारे पुत्र कांडपृष्ठ म्हणून मनूनें सांगितले आहेत . "

अन्येपिहेमाद्रौमात्स्ये त्रिशंकून् ‍ बर्बरानांध्रान् ‍ चीनद्रविडकौंकणान् ‍ कर्णाटकांस्तथाभीरान् ‍ कालिंगांश्च विवर्जयेत् ‍ तत्रैवसौरपुराणे अंगवंगकलिंगांश्चसौराष्ट्रान् ‍ गुर्जरांस्तथा आभीरान् ‍ कौंकणांश्चैवद्राविडान् ‍ दाक्षिणायनान् ‍ आवंत्यान् ‍ मागधांश्चैवब्राह्मणांस्तुविवर्जयेत् ‍ चंद्रिकायांयमः काणाः कुब्जाश्चषंढाश्चकृतघ्नागुरुतल्पगाः मानकूटास्तुलाकूटाः शिल्पिनोग्रामयाजकाः राजभृत्यांधबधिरमूकखल्वाटपंगवः वणिजोमधुहर्तारोग रदावनदाहकाः समयानांचभेत्तारः प्रदानेयेनिवारकाः प्रव्रज्योपनिवृत्ताश्चवृथाप्रव्रजिताश्चये यश्चप्रव्रजिताज्जातः प्रव्रज्यावसितश्चयः अवकीर्णीचवीरघ्नोगुरुघ्नः पितृदूषकः श्राद्धकाशिकायांकात्यायनः द्विर्नग्नः कीलदुश्चर्माशुक्लोतिकपिलस्तथा छिन्नोष्ठश्छिन्नलिंगश्चनैवकेतनमर्हति द्विर्नग्नः पित्रोर्वंशेत्रिपुरुषंविच्छिन्नवेदाग्निः हेमाद्रौमरीचिः अविद्धकर्णः कृष्णश्चलंबकर्णस्तथैवच वर्जनीयाः प्रयत्नेनब्राह्मणाः श्राद्धकर्मणि ब्राह्मे मूकश्चपूतिनासश्चछिन्नांगश्चाधिकांगुलिः गलरोगीचगडुमान् ‍ स्फुटितांगश्चसज्वरः षंढतूवरमंदांश्चश्राद्धेष्वेतान्विवर्जयेत् ‍ लंबकर्णंचाहतत्रैवगोभिलः हनुमूलादधः कर्णौलंबौतुपरिकीर्तितौ द्वयंगुलौत्र्यंगुलौशस्तावितिशातातपोब्रवीत् ‍ चंद्रिकायांयमः द्व्यंगुलातीतकर्णस्यभुंजतेपितरोनतु षंढश्चात्रचंद्रिकोक्तः सप्तविधोग्राह्यः यथा षंढकोवातजः षंढः पंडः क्लीबोनपुंसकः कीलकश्चेतिसप्तैवक्लीबभेदाः प्रकीर्तिताः पराशरमाधवीयेतु चतुर्दशविधाउक्ताः तेषांस्वरुपाणितत्रैवज्ञेयानि ।

दुसरेही हेमाद्रींत मात्स्यांत सांगतो - " त्रिशंकूच्या देशांतील , बर्बरदेशांतील , आंध्र , चीन , द्रविड , कोंकणस्थ , कर्णाटकस्थ , आभीर आणि कालिंग हे वर्ज्य करावे . " तेथेंच सौरपुराणांत - " अंग , वंग , कलिंग या देशांतील , सौराष्ट्र , गुर्जर , आभीर , कोंकण , द्राविड , दक्षिणदेशस्थ , आवंत्य , मागध , हे ब्राह्मण वर्ज्य करावे . " चंद्रिकेंत यम - " काणे , कुबडे , षंढ , मित्रद्रोही , गुरुपत्नीगमन करणारे , खोटें माप करणारे , खोटें वजन करणारे , शिल्पकारी , गांवाचे यजन करणारे , राजसेवक , बहिरे , मुके , खल्वाट , पांगळे , वाणिज्य करणारे , मध चोरणारे , विष घालणारे , वन जाळणारे , शास्त्रनियमांचा भंग करणारे , दान करणाराचें निवारण करणारे , संन्यास घेऊन त्याचा त्याग करणारे , दांभिक संन्यासी , संन्याशापासून झालेला , संन्यास समाप्त केलेला , ब्रह्मचर्यव्रत दुष्ट झालेला , वीरहत्यारी , गुरुघातक , पितृदूषक , हे वर्ज्य . " श्राद्धकाशिकेंत कात्यायन - " द्विर्नग्न , अंगावर चर्मकीलकांनीं दुष्ट कातडी झालेला , अति पांढरा , अति कपिलवर्णीं , ओंठ छिन्न झालेला , शिश्न छिन्न झालेला , असा ब्राह्मण निमंत्रणास योग्य नाहीं . " हेमाद्रींत मरीचि - " ज्याचा कान टोंचलेला नाहीं तो , कृष्णवर्ण , ज्याचे कान लांब आहे तो , हे ब्राह्मण श्राद्धकर्माविषयीं यत्नानें वर्ज्य करावे . " ब्राह्मांत - " मुका , पूतिनास ( ज्याच्या नाकांतून सतत पू येतो तों ), अवयव छिन्न झालेला , अधिक अंगुलि असलेला , गलरोगी , गलगंड झालेला , अंग फुटलेला , ज्वरी , षंढ , योग्यकालीं श्मश्रु न आलेला , भाग्यहीन किंवा आळशी , हे ब्राह्मण श्राद्धाविषयीं वर्ज्य करावे . " लंबकर्ण सांगतो तेथेंच गोभिल - " हनुवटीच्या मूळाच्या खाली सुटलेले कर्ण ते लंब होत . दोन किंवा तीन अंगुळें असलेले कर्ण प्रशस्त आहेत , असें शातातप सांगता झाला . " चंद्रिकेंत यम - " ज्याचे कान दोन अंगुलांपेक्षां अधिक खालीं आले त्याला दिलेलें अन्न पितर सेवन करीत नाहींत . " येथे षंढ चंद्रिकेंत सांगितलेला सात प्रकारचा घ्यावा . तो असा - " षंढक , वातज , षंढ , पंड , क्लीब , नपुंसक , आणि कीलक , याप्रमाणें सात प्रकारचे षंढ सांगितले आहेत . " पराशरमाधवीयांत तर चवदा प्रकारचे सांगितले आहेत , त्यांचीं स्वरुपें तेथेंच पाहावीं .

चंद्रिकायांशातातपः अग्निष्टोमादिभिर्यज्ञैर्येयजंत्यल्पदक्षिणैः तेषामन्नंनभोक्तव्यमपांक्तास्तेप्रकीर्तिताः एतच्चशक्तौसत्यां अपरार्केभारते अव्रतीकितवः स्तेनः प्राणिविक्रयकोपिवा पश्चाच्चेत् ‍ पीतवान् ‍ सोमंसोपिकेतनमर्हति श्राद्धदीपकलिकायांयमः अपत्नीकश्चवर्ज्यः स्यात्सपत्नीकोप्यनग्निकः तत्रैवाश्वलायनः प्रतिमाविक्रयंयोवैकरोतिपतितस्तुसः जीवनार्थंपरास्थीनिधृत्वातीर्थंप्रयातियः मातापित्रोर्विनासोपिपतितः परिकीर्तितः तत्रैवजातूकर्ण्यः यत्रमातुलजोद्वाहीयत्रवावृषलीपतिः श्राद्धंनगच्छेत्तद्विप्राः कृतंयच्चनिरामिषं पितृपुत्रौभ्रातरौद्वौनिरग्निंगुर्विणीपतिम् ‍ सगोत्रप्रवरंचैवश्राद्धेषुपरिवर्जयेत् ‍ बृहन्नारदीये शंखंचक्रंमृदांयस्तुकुर्यात्तप्तायसेनवा सशूद्रवद्बहिः कार्यः सर्वस्माद्दिजकर्मणः शंखचक्राद्यंकनंचगीतनृत्यादिकंतथा एकजातेरयंधर्मोनजातुस्याद् ‍ द्विजन्मनः तेनयेतप्तमुद्रादिविधयस्तेशूद्रविषयाइति पृथ्वीचंद्रोदये शिवके शवयोरंकान् ‍ शूलचक्रादिकान् ‍ द्विजः नधारयेतमतिमान् ‍ वैदिकेवर्त्मनिस्थितइत्याश्वलायनोक्तेश्च नृत्यंचोदराद्यर्थंनिषिद्धमितिश्रीधरस्वामी अन्येपिनिषेधानिबंधेषुज्ञेयाइतिदिक् ‍ ।

चंद्रिकेंत शातातप - " अग्निष्टोमादिक यज्ञ अल्प दक्षिणा देऊन जे करितात त्यांचें अन्न खाऊं नये , ते अपांक्त म्हटले आहेत . " हें सांगणें शक्ति असतां समजावें . अपरार्कांत भारतांत - " ब्रह्मचर्यादिव्रतहीन , कपटी , चोर , प्राणिविक्रय करणारा , असा ब्राह्मण असून नंतर जर सोमपान करील तर तोही निमंत्रणास योग्य आहे . " श्राद्धदीपकलिकेंत यम - " अपत्नीक वर्ज्य आहे . सपत्नीक असून अग्निरहित असेल तर तोही वर्ज्य आहे . " तेथेंच आश्वलायन - " जो प्रतिमाविक्रय करितो तो पतित आहे . आपल्या जीविकेसाठीं मातापितरांवांचून दुसर्‍यांच्या अस्थि घेऊन जो तीर्थास जातो तोही पतित म्हटला आहे . " तेथेंच जातूकर्ण्य - " जेथें मातुलकन्याविवाह केलेला आहे , किंवा जेथें शूद्रिणीचा पति आहे , आणि जें श्राद्ध आमिष ( मांस ) रहित आहे त्या श्राद्धांत भोजनास जाऊं नये . पितापुत्र , दोन भ्राते , अग्निरहित , गर्भिणीपति , सगोत्र आणि सप्रवर हे ब्राह्मण श्राद्धीं वर्ज्य करावे . " बृहन्नारदीयांत - " जो ब्राह्मण अंगावर शंख चक्र मातीनें किंवा तापलेल्या लोखंडानें करील त्याला शूद्राप्रमाणें सर्व द्विजकर्मापासून दूर करावा . शंख चक्र इत्यादि चिन्हें करणें ; गायन , नृत्य वगैरे करणें हा शूद्रजातीचा धर्म आहे , ब्राह्मणाचा धर्म नव्हे . " यावरुन तप्तमुद्रादि धारणाचे जे विधि ते शूद्रविषयक आहेत , असें पृथ्वीचंद्रोदयांत आहे . आणि " वैदिकमार्गाचेठायीं राहणार्‍या विद्वान् ‍ ब्राह्मणानें शूल , चक्र इत्यादिक शिव विष्णु यांचीं चिन्हें धारण करुं नयेत " असें आश्वलायनवचनही आहे . नृत्य उदराकरितां निषिद्ध आहे असें श्रीधरस्वामी सांगतो . अन्यही निषेध निबंधांत आहेत ते पाहावे . ही दिशा दाखविली आहे .

अत्रविप्राणांग्राह्यत्वोक्त्यैवतद्वर्ज्यानांनिषेधेसिद्धेपुनर्वर्ज्यपरिगणनंनिषिद्धवर्ज्यनिर्गुणप्राप्त्यर्थमितिविज्ञानेश्वरः कुष्ठिकाणादेरपवादोहेमाद्रौवसिष्ठः अपिचेन्मंत्रविद्युक्तः शारीरैः पंक्तिदूषणैः अदूष्यंतंयमः प्राहपंक्तिपावनएवसः क्कचिद्विप्राणांजातिमात्रेणग्राह्यत्वमुक्तं चंद्रिकायामाग्नेये यदिपुत्रोगयांगच्छेत्कदाचित्कालपर्ययात् ‍ तानेवभोजयेद्विप्रान् ‍ ब्रह्मणायेप्रकल्पिताः ब्रह्मणाकृतसंस्थानाविप्राब्रह्मसमाः स्मृताः अमानुषागयाविप्राब्रह्मणायेप्रकल्पिताः तेषुतुष्टेषुसंतुष्टाः पितृभिः सहदेवताः तत्रैव नविचार्यंकुलंशीलंविद्याचतपएवच पूजितैस्तैस्तुसंतुष्टादेवाः सपितृगुह्यकाः गयायांनिर्गुणाअपितीवभोज्याइतिहेमाद्रौ अक्षय्यवटश्राद्धएवतन्नियमोनान्यत्रेतित्रिस्थलीसेतौपितामहचरणाः पृथ्वीचंद्रोदयेपिपाद्मे तीर्थेषुब्राह्मणंनैवपरीक्षेतकदाचन अन्नार्थिनमनुप्राप्तंभोज्यंतंमनुरब्रवीत् ‍ स्कांदेपि ब्राह्मणान्नपरीक्षेततीर्थेक्षेत्रनिवासिनः मनुः नब्राह्मणंपरीक्षेतदैवेकर्मणिधर्मवित् ‍ पित्र्येकर्मणितुप्राप्तेपरीक्षेतप्रयत्नतः असंभवपरमेतदितिमेधातिथिः हेमाद्रौव्यासः गायत्रीमात्रसारोपिवरंविप्रः सुयंत्रितः नायंत्रितश्चतुर्वेदीसर्वाशीसर्वविक्रयी काणाः कूटाश्चकुब्जाश्चदरिद्राव्याधितास्तथा सर्वेश्राद्धेनियोक्तव्यामिश्रितावेदपारगैः ।

येथें ब्राह्मण ग्राह्य सांगितल्यावरुनच वर्ज्य ब्राह्मणांचा निषेध सिद्ध असतां पुनः वर्ज्य ब्राह्मण कोणते ते सांगितले हे कशाकरितां असें म्हणाल तर जेथें गुणी ब्राह्मण मिळत नाहींत तेथें निषिद्ध वर्ज्य करुन निर्गुण असले तरी घ्यावे , असें समजण्याकरितां आहे , असें विज्ञानेश्वर सांगतो . कुष्ठी ( पांढर्‍या कोडाचा ), काणा इत्यादिकांचा अपवाद सांगतो हेमाद्रींत वसिष्ठ - " मंत्रवेत्ता असून तो जरी शारीरपंक्तिदूषणांनीं युक्त आहे तथापि तो अदूष्य ( दूषणाला अनर्ह ) आहे असें यम सांगतो ; कारण , तो ब्राह्मण पंक्तिपावनच आहे . " क्कचित् ‍ स्थळीं जातीचा ब्राह्मण असला म्हणजे तो ग्राह्य होतो , असें सांगतो चंद्रिकेंत अग्निपुराणांत - " कालवशें कधींही जर पुत्र गयेस जाईल तर तेथें ब्रह्मदेवानें कल्पिलेले जे ब्राह्मण त्यांनाच भोजन घालावें . वेदानें ज्यांचें स्थान करुन दिलें आहे ते ब्राह्मण ब्रह्मसमान आहेत , गयेंत ब्रह्मदेवानें कल्पिलेले जे ब्राह्मण ते अमानुष ( देवजातींतील ) आहेत , ते तुष्ट झाले असतां पितरांसह संपूर्ण देवता संतुष्ट होतात . " तेथेंच सांगतो - " कुल , शील , विद्या व तप यांचा विचार करुं नये , त्यांची पूजा केली म्हणजे देव , पितर , गुह्यक हे संतुष्ट होतात . " गयेंत निर्गुण असले तरी तेच ब्राह्मण श्राद्धास सांगावे , असें हेमाद्रि सांगतो . अक्षय्यवटश्राद्धाविषयींच हा नियम आहे , इतरांविषयीं नाहीं , असें त्रिस्थलीसेतुग्रंथांत पितामह ( नारायणभट्ट ) सांगतात . पृथ्वीचंद्रोदयांतही पाद्मांत - " तीर्थांचेठायीं कधींही ब्राह्मणाची परीक्षा करुं नये , अन्नार्थी प्राप्त झाला असतां त्याला भोजन घालावें , असें मनु सांगता झाला . " स्कांदांतही - तीर्थाचेठायीं क्षेत्रस्थ ब्राह्मणांची परीक्षा करुं नये . " मनु - " धर्मवेत्त्यानें दैवकर्माविषयीं ब्राह्मणाची परीक्षा करुं नये , पित्र्यकर्म प्राप्त असतां प्रयत्नानें ब्राह्मणाची परीक्षा करावी . " ‘ ब्राह्मणाची परीक्षा करुं नये ’ हें सांगणें असंभवविषयक आहे असें मेधातिथि ( मनुटीकाकार ) सांगतो . हेमाद्रींत व्यास - " सुयंत्रित ( नियमानें वागणारा ) असा ब्राह्मण केवळ गायत्रीच म्हटलेला असला तरी तो श्रेष्ठ आहे . नियम सोडून वागणारा सर्व भक्षण करणारा व सर्व विक्रय करणारा असा चतुर्वेदी असला तरी तो योग्य नाहीं . काणे , कूट ( कपटी , अनृतकारी ), कुबडे , दरिद्री , व्याधियुक्त हे सारे ब्राह्मण श्राद्धाचेठायीं वैदिकांत मिश्र करुन बसवावे . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP