मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
कृच्छ्रादिकांचीं लक्षणें

तृतीय परिच्छेद - कृच्छ्रादिकांचीं लक्षणें

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अथ कृच्छ्रादिलक्षणानि - मदनमहार्णवे -

तत्र पादरुपकृच्छ्रस्वरुपापरिज्ञानेप्राजापत्यस्वरुपस्यज्ञातुमशक्यत्वात्प्रथमंपादकृच्छ्रलक्षणमभिधीयते याज्ञवल्क्यः एकभक्तेननक्तेनतथैवायाचितेनच उपवासेनचैवायंपादकृच्छ्रः प्रकीर्तितः एकभक्तंनामदिवैवोदितमध्याह्नकालेउक्तनियमैरेककालकृतभोजनम् नक्तंतु सूर्यास्तमयानंतरमुक्तकालेसकृत्कृतभोजनम् दिवावारात्रौवा अप्रार्थितोपनतस्यसकृद्भोजनमयाचितम् दिवैवाप्रार्थितोपनतभोजनमित्यपरे स्वकीयस्यवापरकीयस्यवान्नस्ययाचनंयस्मिन्नविद्यतेतद्व्रतमयाचितम् । दिवारात्रावप्यभोजनमुपवासः एवंच चतुरहः साध्यः पादकृच्छ्रः एकभक्तादौचग्राससंख्यानियमः पराशरेणोक्तः । सायंतुद्वादशग्रासाः प्रातः पंचदशस्मृताः चतुर्विंशतिरायाच्याः परंनिरशनंस्मृतमिति । सायंनक्ते प्रातरेकभक्ते आपस्तंबस्तु प्रकारांतरेणाह सायंद्वाविंशतिर्ग्रासाः प्रातः षड्विंशतिः स्मृताः । चतुर्विंशतिरायाच्याः परेनिरशनास्त्रयः । कुक्कुटांडप्रमाणाः स्युर्यथावास्यंविशेत्सुखमिति । अनेनानयोश्चपक्षयोः शक्त्यपेक्षयाविकल्पः आपस्तंबस्तु चतुर्धाप्राजापत्यकृच्छ्रंविभज्य वर्णानुक्रमेणपादकृच्छ्रव्यवस्थामाह । त्र्यहंनिरशनंपादः पादश्चायाचितंत्र्यहम् । सायंत्र्यहंतथापादः प्रातः पादस्तथात्र्यहम् । प्रातः पादंचरेच्छूद्रः सायंवैश्यस्यदापयेत् । अयाचितंतुराजन्येत्रिरात्रंब्राह्मणेस्मृतम् । प्रातः पादएकभक्तत्रयं । सायंपादोनक्तत्रयम् । अयाचितं अयाचितत्रयम् । त्रिरात्रंउपवासत्रयं । अयाचितपादउपवासश्चेतिपादद्वयंमिलित्वार्धकृच्छ्रः नक्तपादरहितमवशिष्टंपादत्रयंपादोनकृच्छ्रः अतएवाहापस्तंबः सायंप्रातर्विनार्धंस्यात्पादोनंनक्तवर्जितमिति अर्धकृच्छ्रस्यप्रकारांतरमप्याहसएव सायंप्रातस्तथैकैकंदिनद्वयमयाचितम् । दिनद्वयंचनाश्नीयात्कृच्छ्रार्धंतद्विधीयते । इतिपादकृच्छ्रादिलक्षणम् ।

आतां कृच्छ्रादिकांचीं लक्षणें सांगतो - मदनमहार्णवांत -

त्यांत पादकृच्छ्राचें स्वरुप समजल्याशिवाय प्राजापत्यकृच्छ्राचें स्वरुप ( लक्षण ) समजावयाचें नाही , म्हणून प्रथम पादकृच्छ्राचें लक्षण सांगतो . याज्ञवल्क्य - " पहिल्या दिवशीं एकभक्त , दुसर्‍या दिवशीं नक्त , तिसर्‍या दिवशीं अयाचित , आणि चवथ्या दिवशीं उपवास , याप्रमाणें चार दिवस केलें असतां पादकृच्छ्र होतो . " एकभक्त म्हणजे दिवसासच मध्यान्हीं सांगितलेल्या भोजनकालीं शास्त्रांत सांगितलेल्या नियमांनीं युक्त होऊन अहोरात्रांतून एकवेळां भोजन करणें हें होय . नक्त म्हणजे सूर्यास्तानंतर सांगितलेल्या भोजनकाळीं एकवार भोजन करणें होय . अयाचित म्हणजे मागितल्यावांचून कोणी आणून दिलेल्या अन्नाचें दिवसा किंवा रात्रीं एकवेळां भोजन करणें होय . कोणी आणून दिलेल्या अन्नाचें दिवसाच भोजन करणें हें अयाचित , असें इतर सांगतात . स्वकीय किंवा परकीय अन्नाची याचना ज्यांत नाहीं तें व्रत अयाचित होय . दिवसा आणि रात्रीं देखील भोजन न करणें याचें नांव उपवास . याप्रमाणें चार दिवसांनीं साध्य करावयाचा तो पादकृच्छ्र होतो . एकभक्त , नक्त , अयाचित यांविषयीं ग्रासांची संख्या सांगतो पराशंर - " नक्तास १२ ग्रास सांगितले आहेत , एकभक्तास १५ ग्रास , अयाचितास २४ ग्रास आणि उपवास म्हणजे निरशन होय . " आपस्तंब तर दुसर्‍या प्रकारानें सांगतो - " नक्तास बावीस ग्रास , एकभक्तास सव्वीस ग्रास , अयाचितास चोवीस ग्रास , पुढचे तीन दिवस निरशन . ते ग्रास कोंबड्याच्या अंड्याएवढें असावे , म्हणजे जेवढा ग्रास केला असतां आयासावांचून तोंडांत जाईल तेवढा करावा . " ग्रासांची संख्या पराशरानें वेगळी सांगितली , आणि आपस्तंबानें निराळी सांगितली यांतून कोणती घ्यावी , असें म्हटलें तर व्रत करणारानें शक्ति पाहून त्या शक्तीप्रमाणें योग्य असेल ती घ्यावी . आपस्तंब तर प्राजापत्यकृच्छ्राचे चार भाग करुन ब्राह्मणादि चार वर्णांना अनुक्रमानें एक एक पादकृच्छ्र सांगतो , तो असा - " तीन दिवस निरशन करणें हा एक पाद , तीन दिवस अयाचित करणें हा एक पाद , तीन दिवस नक्त करणें हा एक पाद , तीन दिवस एकभक्त करणें हा एक पाद . एकभक्तपाद शूद्रानें करावा , नक्तपाद वैश्यानें करावा , अयाचितपाद क्षत्रियानें कारावा , आणि निरशनपाद ब्राह्मणानें करावा . अयाचितपाद आणि निरशनपाद हे दोन मिळून अर्धकृच्छ्र होतो . नक्तपाद वेगळून बाकीचे तीन पाद मिळून पादोन ( पाऊण ) कृच्छ्र होतो . म्हणूनच सांगतो आपस्तंब - " नक्त व एकभक्त हे दोन पाद वेगळून बाकीचे दोन पाद अर्धकृच्छ्र होतो . " आणि नक्तपाद वेगळून बाकीचे तीन पाद पादोनकृच्छ्र होतो . " अर्धकृच्छ्राचा दुसरा प्रकार तोच सांगतो - " एक दिवस एकभक्त , एक दिवस नक्त , दोन दिवस अयाचित , आणि दोन दिवस उपवास , मिळून अर्धकृच्छ्र होतो . याप्रमाणें पादकृच्छादिकांचीं लक्षणें समजावीं .

आतां प्राजापत्यकृच्छ्राचें लक्षण सांगतों .

अथप्राजापत्यकृच्छ्रलक्षणम् याज्ञवल्क्यः यथाकथंचित्र्त्रिगुणः प्राजापत्योयमुच्यते । अत्रायमित्यनेनसर्वनाम्ना एकभक्तेननक्तेनतथैवायाचितेनच । उपवासेनचैवायंपादकृच्छ्रः प्रकीर्तितइतिस्वोक्तः पादकृच्छ्रः परामृश्यते । यथाकथंचिदित्यनेनचत्वारः पक्षाउपात्ताः एकभक्तादीनामानुलोम्येनस्वस्थानविवृद्धिरित्येकः पक्षः तद्यथा एकभक्तत्रयंनक्तत्रयमयाचितत्रयमुपवासत्रयंचेतिक्रमेणैकभक्तादीनांत्रयाणांकरणमानुलोम्येनस्वस्थानविवृद्धिरित्युच्यते यदाहमनुः त्र्यहंप्रातस्त्र्यहंसायंत्र्यहमद्यादयाचितम् । त्र्यहंपरंचनाश्नीयात्प्राजापत्यंचरन् द्विजः । प्रातिलोम्येनस्वस्थानविवृद्धिरितिद्वितीयः पक्षः उपवासत्रयमयाचितत्रयंनक्तत्रयमेकभक्तत्रयमितिप्रातिलोम्येनस्वस्थानविवृद्धिः अमुंपक्षमाह वसिष्ठः प्रातिलोम्यंचरेयुरिति । दंडकलितवदावृत्तिरितितृतीयः पक्षः एकभक्तनक्तायाचितोपवासान्क्रमेणैकैकंकृत्वापुनरेकभक्तादीननुक्रमेणावर्तयेत् इयमावृत्तिर्दंडकलितवदावृत्तिरित्युच्यते एवंत्रिरावृत्तौप्राजापत्यकृच्छ्रंभवति अमुमपिपक्षंवसिष्ठएवाह अहः प्रातरहर्नक्तमहरेकमयाचितम् । अहः पराकंतत्रैकमेवंचतुरहौपरौ । पराकशब्दउपवासपरः तथा अनुग्रहार्थंविप्राणांमनुर्धर्मभृतांवरः बालवृद्धातुरेष्वेवंशिशुकृच्छ्रमुवाचहेति पूर्वोक्तपक्षत्रयमध्ये अन्यतमपक्षपक्षीकारेण वक्ष्यमाणजपहोमविवर्जनेनाचरणंचतुर्थः पक्षः एतंपक्षमाहांगिराः तस्माच्छूद्रंसमासाद्य सदाधर्मपथेस्थितम् । प्रायश्चित्तंप्रदातव्यंजपहोमविवर्जितमिति इतिप्राजापत्यकृच्छ्रलक्षणं ।

याज्ञवल्क्य - " हा वर सांगितलेला पादकृच्छ्र कसा तरी तिप्पट केला असतां तो प्राजापत्य होतो . " कसा तरी तिप्पट केला असतां , असें सांगितल्यावरुन चार पक्ष उत्पन्न झाले , ते असे - सांगितलेल्या अनुक्रमानें एकभक्तादिकांची तिप्पट करणें हा एक पक्ष . तो असा - तीन दिवस एकभक्त , तीन दिवस नक्त , तीन दिवस अयाचित , आणि तीन दिवस उपवास , हा एक प्राजापत्य होतो . हा मनु सांगतो - " प्राजापत्य करणारानें तीन दिवस एकभक्त , तीन दिवस नक्त , तीन दिवस अयाचित , आणि तीन दिवस उपवास करावे . " आतां उलट क्रमानें तिप्पट करावी , म्हणजे दुसरा पक्ष होय . तो असा - तीन दिवस उपवास , तीन दिवस अयाचित , तीन दिवस नक्त , तीन दिवस एक भक्त . हा पक्ष सांगतो वसिष्ठ - " प्रतिलोमक्रमानें प्राजापत्य करावा . " दंडकलितवत् आवृत्ति करणें हा तिसरा पक्ष , तो असा - एकभक्त , नक्त , अयाचित्त , उपवास हे एक एक दिवस करुन पुनः त्याच क्रमानें दोन वेळां करावे , या आवृत्तीला दंडकलितवत् आवृत्ति म्हटली आहे . याप्रमाणें या तीन आवृत्ति झाल्या ( म्हणजे १२ दिवस झाले ) म्हणजे प्राजापत्य कृच्छ्र होतो . हाही पक्ष वसिष्ठ सांगतो - " एक दिवस एकभक्त , एक दिवस नक्त , एक दिवस अयाचित , आणि एक दिवस उपवास , असे चार दिवस झाले . याप्रमाणें पुढेंही चार चार दिवस दोन वेळां करावें , धर्म जाणणार्‍या श्रेष्ठ मनूनें ब्राह्मणाच्या अनुग्रहासाठीं बालक , वृद्ध , आतुर यांस हा शिशुकृच्छ्र सांगितला आहे . " कृच्छ्रास उक्त जे जपहोम ते वेगळून वरती सांगितलेल्या तीन पक्षांपैकीं कोणत्याही एक पक्षाचें आचरण करणें तो चवथा पक्ष होय . हा पक्ष सांगतो अंगिरा - " सार्वकाल धर्ममार्गीं वर्तन करणार्‍या अशा शूद्रास कोणत्याही कारणामुळें कृच्छ्रादि प्रायश्चित्त सांगावयाचें तें जपहोमविरहित कृच्छ्रादि सांगावें . " याप्रमाणें प्राजापत्याचें लक्षण समजावें .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP