TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
नवश्राद्ध

त्तृतीय परिच्छेद - नवश्राद्ध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


नवश्राद्ध

आतां नवश्राद्ध सांगतो -

अथनवश्राद्धंपृथ्वीचंद्रोदयेंगिराः प्रथमेह्नितृतीयेचपंचमेसप्तमेतथा नवमैकादशेचैवतन्नवश्राद्धमुच्यते शिवस्वामी नवश्राद्धानिपंचाहुराश्वलायनशाखिनः आपस्तंबाः षडित्याहुर्विभाषात्वितरेषुहि पंचएकादशाहिकंविना मरणाद्विषमेषुदिनेष्वेकैकंनवश्राद्धंकुर्यादानवमाद्यदिनवमंविच्छिद्येतैकादशेतत्कुर्यादिति मदनरत्नेबौधायनोक्तेः भविष्ये नवसप्तविशांराज्ञांनवश्राद्धान्यनुक्रमात् आद्यंतयोर्वर्णयोस्तुषडित्याहुर्महर्षयः हेमाद्रौवृद्धवसिष्ठः अलब्ध्वातुनवश्राद्धंप्रेतत्वानैवमुच्यते अर्वाक्तुद्वादशाहस्यलब्ध्वातरतिदुष्कृतं अतः षडेव एतान्येवविषमश्राद्धानीत्युच्यंते नागरखंडेतु पंचमेसप्तमेतद्वदष्टमेनवमेतथा दशमैकादशेचैवनवश्राद्धानितानिचेत्युक्तं कात्यायनस्तु चतुर्थेपंचमेचैवनवमैकादशेतथा यदत्रदीयतेजंतोस्तन्नवश्राद्धमुच्यते प्रथमेसप्तमेचैवेत्याद्यपादेव्यासपाठः बह्वृचानांतु नवश्राद्धंदशाहानिनवमिश्रंतुषडऋतूनित्युक्तं नारायणवृत्तौ दीपिकायां अथतनुयादाद्येचतुर्थेदिनेश्राद्धंपंचमसप्तमाष्टनवदिग्रुद्रेषुयुग्मद्विजैः प्रथमेह्नितृतीयेह्निपंचसप्तनवस्वपि द्वौद्वौपिंडौप्रदातव्यौशेषेष्वेकंतुविन्यसेत् एकोविषमश्राद्धेवयवपिंडश्चैकइतिद्वावित्यर्थः अत्रशाखाभेदाद्व्यवस्था ।

पृथ्वीचंद्रोदयांत अंगिरा - " पहिल्या दिवशीं , तिसर्‍या , पांचव्या , सातव्या , नवव्या आणि अकराव्या दिवशीं करावयाचें श्राद्ध तें नवश्राद्ध म्हटलें आहे . " शिवस्वामी - " आश्वलायनशाखी नवश्राद्धें पांच सांगतात . आपस्तंबशाखी नवश्राद्धें सहा सांगतात . इतर शाखीयांना पांच किंवा सहा असा विकल्प समजावा . " पांच सांगितलीं तीं अकराव्या दिवसाचें वर्ज्य करुन समजावीं . कारण , " मरणदिवसापासून नवव्या दिवसापर्यंत विषम दिवसांचेठायीं एक एक नवश्राद्ध करावें , जर नवव्या दिवशीं श्राद्ध होणार नाहीं तर तें अकराव्या दिवशीं करावें " असें मदनरत्नांत बौधायनवचन आहे . भविष्यांत - " वैश्यांची नवश्राद्धें नऊ होतात . क्षत्रियांचीं सात होतात . ब्राह्मणांचीं व शूद्रांचीं नवश्राद्धें सहा होतात , असें महर्षि सांगतात . " हेमाद्रींत वृद्धवसिष्ठ - " प्रेताला नवश्राद्ध मिळालें नाहीं तर तो प्रेतत्वापासून मुक्त होत नाहीं . बाराव्या दिवसाचे आंत नवश्राद्ध मिळालें म्हणजे तो प्राणी दुष्कृत तरुन जातो . " ह्या वचनावरुन सहाच नवश्राद्धें होतात . हींच विषमश्राद्धें म्हटलीं आहेत . नागरखंडांत तर - " पांचव्या , सातव्या , आठव्या , नवव्या , दहाव्या आणि अकराव्या दिवशीं होतात तीं नवश्राद्धें होत " असें सांगितलें आहे . कात्यायन तर - " चवथ्या , पांचव्या , नवव्या , अकराव्या दिवशीं जें प्राण्याला दिलें जातें तें नवश्राद्ध म्हटलें आहे . " या वचनांतील प्रथमपादांत ‘ प्रथमे सप्तमे चैव ’ असा व्यासाचा पाठ आहे . बह्वृचांना तर - " दशाहांतील श्राद्धें नवश्राद्धें , सहा ऋतूंतील ( एका वर्षांतील ) तीं नवमिश्र श्राद्धें " असें नारायणवृत्तींत सांगितलें आहे . दीपिकेंत - " नंतर पहिल्या दिवशीं , चवथ्या दिवशीं , पांचव्या , सातव्या , आठव्या , नवव्या , दहाव्या , अकराव्या या दिवशीं युग्म ब्राह्मण सांगून श्राद्ध करावें . पहिल्या , तिसर्‍या , पांचव्या , सातव्या आणि नवव्या दिवशीं दोन दोन पिंड द्यावे . इतर दिवशीं एक एक पिंड द्यावा . " विषमश्राद्धाचा एक पिंड आणि अवयवपिंड एक असे मिळून दोन पिंड विषमदिवशीं समजावे , असा भाव . ह्या नवश्राद्धांविषयीं अशीं अनेक मतें आहेत त्यांची शाखाभेदानें व्यवस्था समजावी .

अपरार्केभविष्ये नवश्राद्धंत्रिपक्षंचषण्मासंमासिकानिच नकरोतिसुतोयस्तुतस्याधः पितरोगताः वाराहे गतोसिदिव्यलोकंत्वंकृतांतविहितात्पथः मनसावायुभूतेनविप्रेत्वाहंनियोजये पूजयिष्यामिभोगैस्त्वामेवंविप्रंनिमंत्रयेत् ‍ आवाहनेपितत्रैव इहलोकंपरित्यज्यगतोसिपरमांगतिं मनसावायुभूतेनविप्रेत्वाहंनियोजयइति तत्रैवबह्वृचपरिशिष्टे अनूदकमधूपंचगंधमाल्यविवर्जितं नवश्राद्धममंत्रंचपिंडोदकविवर्जितं उदकमर्घ्यः पिंडोदकंशुंधंतांपितरइत्यवनेजनादि एकोद्दिष्टेषुसर्वेषुनस्वधानाभिरम्यतां नाग्नौकरणमंत्रश्चएकंवाथतिलोदकं अनपत्येषुसर्वेषुनस्वधानाभिरम्यतां स्वस्त्यस्तुविसृजेदेवंसकृत्प्रणववर्जितं एकोद्दिष्टस्यपिंडेतुअनुशब्दोनविद्यते पितृशब्दंनकुर्वीतपितृहाचोपजायते सपिंडनात्प्रागितिहेमाद्रिः तेन नचस्वधांप्रयुंजीतप्रेतश्राद्धेदशाहिके इतिऋष्यश्रृंगोक्तौ दशाहिकोक्तेरेकादशाहेस्वधाप्रयोगएवेतिहारलतापरास्ता ।

अपरार्कांत भविष्यांत - " नवश्राद्धें , त्रैपक्षिक , ऊनषाण्मासिक , आणि मासिकें हीं जो पुत्र करीत नाहीं त्याचे पितर अधोलोकीं जातात . " वाराहांत - " गतोसि दिव्यलोकं त्वं कृतांतविहितात्पथः । मनसा वायुभूतेन विप्रे त्वाहं नियोजये । पूजयिष्यामि भोगैस्त्वां ’ असें म्हणून ब्राह्मणाला निमंत्रण द्यावें . " आवाहनाविषयींही तेथेंच सांगतो - " इहलोकं परित्यज्य गतोसि परमांगतिं । मनसा वायुभूतेन विप्रेत्वाहं नियोजये । ’ असें म्हणून आवाहन करावें . " तेथेंच बह्वृचपरिशिष्टांत - " अर्घ्यरहित , धूपरहित , गंधपुष्पवर्जित , मंत्ररहित आणि पिंडोदक ( शुधंतां पितर इत्यादि ) वर्जित असें नवश्राद्ध होतें . सर्व एकोद्दिष्टांत विसर्जनाचा स्वधाशब्द आणि ‘ अभिरम्यतां ’ आणि अग्नौकरणाचा मंत्र हीं नाहींत . एक तिलोदक आहे . अपत्यरहित मृत असतील त्यांच्या श्राद्धाचे ठायीं ‘ स्वधा ’ आणि ‘ अभिरम्यतां ’ हे शब्द नाहींत . प्रवणरहित एकवार ‘ स्वस्त्यस्तु ’ असें म्हणून विसर्जन करावें . एकोद्दिष्ट श्राद्धाचे पिंडप्रदानांत ‘ अनु ’ हा शब्द नाहीं . आणि ‘ पितृ ’ ह्या शब्दाचा उच्चार करुं नये . या वरील शब्दांचा उच्चार करील तर पितृघातक होतो . " हा स्वधाशब्दादिकांचा निषेध सपिंडीकरणाचे पूर्वीं आहे , असें हेमाद्रि सांगतो . तेणेंकरुन ( सपिंडीच्या पूर्वीं निषेध असल्यामुळें ) " दहा दिवसांचे आंतील प्रेतश्राद्धांत ‘ स्वधा ’ शब्दाचा प्रयोग करुं नये " ह्या ऋष्यश्रृंगाचे वचनांत ‘ दशाहिके ’ म्ह० दहा दिवसांचे आंतील असें म्हटलें आहे , म्हणून अकराव्या दिवशीं ‘ स्वधा ’ याचा प्रयोग ( उच्चार ) आहेच , असा जो हारलताग्रंथ तो खंडित झाला .

रत्नावल्यां आशिषोद्विगुणादर्भाजयाशीः स्वस्तिवाचनं पितृशब्दः स्वसंबद्धः शर्मशब्दस्तथैवच पात्रालंभोवगाहश्चउल्मुकोल्लेखनादिकं तृप्तिप्रश्नश्चविकिरः शेषप्रश्नस्तथैवच प्रदक्षिणाविसर्गश्चसीमांतगमनंतथा अष्टादशपदार्थांश्चप्रेतश्राद्धेविवर्जयेत् अत्रस्वधापितृनमः शब्दानांतिलोसीतिमंत्रेप्रेतशब्दोहेनतूष्णींवातिला वपनम् तूष्णीमर्घ्यदानं अमुष्मैस्वाहेतिप्रेतनाम्नापाणिहोमः नाम्नाएकः पिंडः निनयनमंत्रेऊहः अनुमंत्रणादित्वमंत्रकं अभिरम्यतामितिविसर्जनं एवंनवश्राद्धवर्जैकोद्दिष्टेषु नवश्राद्धेत्वमंत्रकंसर्वमितिनारायणवृत्तिः क्रियानिबंधे उत्तानंस्थापयेत्पात्रमेकोद्दिष्टेसदाबुधः न्युब्जंतुपार्वणेकुर्यात्तस्योपरिकुशान्न्यसेत् नवश्राद्धंगृहेकुर्याद्भार्यायत्राग्नयोपिवा सपिंडीकरणांतानिप्रेतश्राद्धानियानिवै तानिस्युर्लौकिकेवह्नावित्याहत्वाश्वलायनः इदंसंभवेन्नेनकार्यं नवश्राद्धेषुयच्छिष्टंगृहपर्युषितंचयत् दंपत्योर्भुक्तशेषंचनतद्भुंजीतकर्हिचिदित्यंगिरोवचनलिंगात् द्वाभ्यांतदातुकृच्छ्राभ्यांशुद्धिः स्यात्तुविवेकिनामितिब्राह्मेउक्तं विघ्नेतुनिर्णयामृतेकण्वः नवश्राद्धंमासिकंचयद्यदंतरितंभवेत् तत्तदुत्तरसातंत्र्यादनुष्ठेयंप्रचक्षते हेमाद्रौगालवः शावेतुसूतकंचेत्स्यान्निशायांचमृतौतथा नवश्राद्धानिदेयानियथाकालंयथाक्रमं निशायामाशौचांतेद्व्यहवृद्धौ अन्वारोहणेतु नवश्राद्धानिसर्वाणिसपिंडीकरणंपृथक् एकएववृषोत्सर्गोगौरेकातत्रदीयते ।

रत्नावलींत - " आशीर्वाद ( आयुः प्रजां० इत्यादि ), द्विगुणभुग्न ( मोडलेले ) दर्भ , जयाशीः ( दातारोवो० इत्यादि ), ब्राह्मणाकडून ‘ स्वस्ति ’ शब्द म्हणविणें , पितृशब्द ( स्वधा , पितृ , नमः हे शब्द ), आपल्या संबंधाचा शब्द , शर्मन् शब्द , अन्ननिवेदनसंबंधी पात्रस्पर्श , अन्नांत अंगुष्ठमूलनिवेशन , औपासनाग्नींतून प्रदीप्त उल्मुक आग्नेय दिशेस नेणें व त्या दोन अग्नींच्या मध्यें आग्नेयाभिमुख रेखा काढणें वगैरे अग्नौकरणतंत्र , तृप्तिप्रश्न , विकिर , शेषान्नाचा प्रश्न , प्रदक्षिणा , विसर्जन , आणि ब्राह्मणाला सीमेपर्यंत पोंचविणें , हे अठरा पदार्थ प्रेतश्राद्धांत वर्ज्य करावे . " या प्रेतश्राद्धांत स्वधापितृनमः शब्दांनीं युक्त जो ‘ तिलोसिसोम० ’ मंत्र त्यांत त्या शब्दांचा उच्चार न करितां प्रेतशब्दाचा ऊह करुन तिल टाकावे . अथवा मंत्रावांचून तिल टाकावे . अर्ध्यदानही अमंत्रक करावें . ‘ अमुष्मैस्वाहा ’ या मंत्रेंकरुन प्रेताचे नांवानें ब्राह्मणाचे हातावर अग्नौकरणहोम करावा . प्रेताचे नांवानें एक पिंड द्यावा . निनयनमंत्रांत ऊह करावा . अनुमंत्रण इत्यादिक सर्व अमंत्रक होतें . ‘ अभिरम्यतां ’ असें म्हणून विसर्जन करावें . याप्रमाणें नवश्राद्धभिन्न एकोद्दिष्टांत समजावें . नवश्राद्धांत तर सारें अमंत्रक होतें असें नारायणवृत्तिकार सांगतो . क्रियानिबंधांत - " एकोद्दिष्टांत सर्वदा पात्र उताणें स्थापन करावें . पार्वणश्राद्धांत पात्र उपडें ठेवावें . आणि त्याजवर कुश ठेवावे . ज्या ठिकाणीं भार्या किंवा अग्नि आहेत त्या ठिकाणीं घरीं नवश्राद्ध करावें . सपिंडीकरणापर्यंत जीं प्रेतश्राद्धें तीं लौकिकाग्नीवर होतात , असें आश्वलायन सांगतो . " हें नवश्राद्ध अन्नानें होण्याचा संभव असेल तर अन्नानें करावें . कारण , " नवश्राद्धांत शेष राहिलेलें , घरांत पर्युषित ( शिळें ) असलेलें , व स्त्रीपुरुषांनीं भोजन करुन शेष राहिलेलें असें अन्न कधींही भक्षण करुं नये " हें अंगिराचें वचन अन्नानें करण्याविषयीं बोधक आहे . " त्या नवश्राद्धांतील भोजन केलें असतां दोन कृच्छ्रांनीं विवेक्यांची शुद्धि होते " असें ब्राह्मांत सांगितलें आहे . नवश्राद्धाला विघ्न आलें असेल तर सांगतो निर्णयामृतांत कण्व - " नवश्राद्ध आणि मासिक जें जें अंतरित होईल तें तें पुढच्या श्राद्धाच्या सहतंत्रानें करावें , असें सांगतात . " हेमाद्रींत गालव - " मृताशौचांत जननाशौच असलें तरी आणि आशौचाचे शेवटचे रात्रीं मृत असतां दोन दिवसांची आशौचवृद्धि असतां नवश्राद्धें आपापल्याकालीं अनुक्रमानें करावीं . " स्त्रियेचें अनुगमन असेल तर " सारीं नवश्राद्धें आणि सपिंडीकरण हीं वेगवेगळीं होतात . त्या ठिकाणीं वृषोत्सर्ग एकच होतो . गाई एक द्यावी . "

आशौचांत्यदिनेकार्यमुक्तं ब्राह्मे यस्ययस्यतुवर्णस्ययद्यत्स्यात्पश्चिमंत्वहः सतत्रवस्त्रशुद्धिंचगृहशुद्धिंकरोत्यपि समाप्यदशमंपिडंप्रेतस्पृष्टेवाससी अंत्यानामाश्रितानांचत्यक्त्वास्नानंकरोतिच श्मश्रुलोमनखानांच यत्त्याज्यंतज्जहात्यपि गौरसर्षपकल्केनतिलकल्केनसंयुतं शिरः स्नानंततः कृत्वातोयेनाचम्यवाग्यतः वृषभंगांसुवर्णचस्पृष्ट्वाशुद्धोभवेन्नरः क्रियानिबंधेगृह्यकारिकायां अत्रपिंडत्रयंदद्युस्तत्सखिभ्यस्तथादिमं प्रेतायमध्यमंतद्वत्तृतीयंचयमायवै तथा कर्त्रात्रप्रार्थिताः संतोज्ञातिसंबंधिबांधवाः दद्युरभ्यंगतः पूर्वंत्रींस्त्रीन्धर्मोदकाञ्जलीन् पूर्ववन्नामगोत्राभ्यांनियमोनेहकश्चन मदनरत्नेविष्णुहारीतौ आशौचांतेकृतश्मश्रुकर्माणस्तिलकल्कैः सर्षपकल्कैर्वास्नाताः शुक्लवाससोगृहंप्रविशेयुस्तत्रशांतिकंकृत्वाब्राह्मणपूजनंकुर्युरिति ।

आशौचसमाप्तिदिवशीं कृत्य सांगतो - ब्राह्मांत - " ज्या ज्या ब्राह्मणादि वर्णाचा जो जो आशौचसमाप्तीचा दिवस असेल त्या दिवशीं वस्त्रांची शुद्धि आणि घराची शुद्धि त्यानें करावी . दहावा पिंड समाप्त केल्यावर प्रेताला स्पर्श केलेलीं वस्त्रें आणि अंत्यकर्माचे ठायीं धारण केलेलीं वस्त्रें टाकून स्नान करावें . श्मश्रु , लोम , नखें जीं काढावयाचीं तीं काढून टाकावी . तदनंतर पांढरे सर्षप व तिळ वाटून अंगास व मस्तकास लावून मस्तकावरुन स्वच्छ स्नान करुन आचमन करुन वाणीचें नियमन करुन वृषभ , गाई , सुवर्ण यांना स्पर्श करुन मनुष्यानें शुद्ध व्हावें . " क्रियानिबंधांत गृह्यकारिकेंत - " या दिवशीं तीन पिंड द्यावे , ते असे - प्रेतसखींना प्रथम पिंड द्यावा . दुसरा पिंड प्रेताला द्यावा . तिसरा पिंड यमाला द्यावा . " तसेंच - कर्त्यानें ज्ञाति , संबंधी , बांधव यांना प्रार्थनापूर्वक सांगितल्याकरुन त्यांनीं अभ्यंग करण्याच्या पूर्वीं धर्मोदकाचे तीन तीन अंजलि द्यावे . पूर्वींप्रमाणें ( प्रथमदिवसाप्रमाणें ) नामगोत्राचा उच्चार करुन द्यावे . या ठिकाणीं कोणताही नियम नाहीं . " मदनरत्नांत विष्णु हारीत - ‘‘ आशौच समाप्त झाल्यावर श्मश्रुकर्म करुन तिळ वाटून किंवा सर्षप वाटून अंगास लावून स्नान करुन शुभ्र वस्त्रें नेसून घरांत जावें आणि त्या ठिकाणीं शांतिकर्म करुन ब्राह्मणाचें पूजन करावें . "

देवलः दशमेहनिसंप्राप्तेस्नानंग्रामाद्बहिर्भवेत् तत्रत्याज्यानिवासांसिकेशश्मश्रुनखानिच अपरार्के बृहस्पतिः नवमेवाससांत्यागोनखरोम्णांतथांतिमै तत्रैवव्यासः आशौचांत्यदिनेक्षौरंजनन्यांचगुरौमृते एतत्प्रेताल्पवयसामित्याहापस्तंबः अनुभाविनांचपरिवपनमिति अनुभाविनः कनिष्ठाइति विज्ञानेश्वररत्नाकरादयः आशौचमनुभवतांपुंसांसर्वाशौचेतुमुंडनं आज्ञयानरपतेर्द्विजन्मनांदारकर्ममृतसूतकेषुच बंधमोक्षमखदीक्षणेष्वपिक्षौरमिष्टमखिलेषुचोडुषु इतिरत्नमालोक्तेर्जननाशौचेपीतिशुद्धितत्त्वादयः अत्रदेशाचारतोव्यवस्था परि शिखावर्जं केशश्मश्रुनखलोमानिवापयीतशिखावर्जमितिगोभिलोक्तेः यत्त्वापस्तंबः नसमावृत्तावपेयुरन्यत्रविहारादित्येके विहारोदर्शादियागः तेनविनासमावृत्तागृहस्थानवपेयुरित्यर्थः यच्च वृथाछिनत्तियः केशान्तमाहुर्ब्रह्मघातिनमिति तत् केशश्मश्रुधारयतामग्र्याभवतिसंततिरितिदानधर्मोक्तकाम्यपरं अनुभाविनः पुत्रादयइत्येके पुत्रः पत्नीचवपनंकुर्यादंतेयथाविधि पिंडदानोचितोन्योपिकुर्यादित्थंसमाहित इत्यपरार्केव्यासोक्तेः यत्तुमिताक्षरायां द्वितीयेहनिकर्तव्यंक्षुरकर्मप्रयत्नतः तृतीयेपंचमेवापिदशमेवाप्रदानत इति आप्रदानतइतिचतुर्थादीनि तत्प्रथमदिनेसंभवेज्ञेयं अलुप्तकेशोयः पूर्वंसोत्रकेशान्प्रवापयेत् ‍ द्वितीयेह्नितृतीयेह्निपंचमेसप्तमेपिवा यावच्छ्राद्धंप्रदीयेततावदित्यपरंमतमितिमाधवीये मदनरत्नेचबौधायनोक्तेः मदनपारिजातेतु दशमेप्रथमेचसमुच्चयउक्तः यत्तु दशमंपिंडमुत्सृज्यरात्रिशेषेशुचिर्भवेदिति तदेकादशाहश्राद्धांगविप्रनिमंत्रणार्थंज्ञेयं ।

देवल - " दहावा दिवस प्राप्त असतां गांवाच्या बाहेर स्नान करावें . त्या ठिकाणीं वस्त्रें टाकून द्यावीं . आणि केश , श्मश्रु , नखें हीं काढून टाकावीं . " अपरार्कांत बृहस्पति - " नवव्या दिवशीं वस्त्रें टाकावीं . नखें , केश हे शेवटच्या दिवशीं टाकावे . " तेथेंच व्यास - " आशौचाचे शेवटच्या दिवशीं क्षौर करावें . आणि माता व पिता मृत असतां क्षौर करावें . " हें क्षौर प्रेताहून अल्पवयाचे असतील त्यांना आहे , असें सांगतो आपस्तंब - " अनुभावींना परि शिखा वर्ज्य वपन आहे . " अनुभावि म्हणजे प्रेताहून कनिष्ठ , असें विज्ञानेश्वर , रत्नाकर - इत्यादि सांगतात . " आशौच अनुभविणार्‍या पुरुषाला सर्व आशौचांत मुंडन आहे . राजाची क्षौराविषयीं आज्ञा असेल त्या वेळीं , विवाह कर्तव्य असतां त्या वेळीं , मृताशौचांत , जननाशौचांत , बंदींतून मुक्तसमयीं , यज्ञादि दीक्षेच्या वेळीं सर्व नक्षत्रांवर ब्राह्मणादिकांना क्षौर इष्ट आहे " रत्नमालेच्या वचनावरुन जननाशौचांतही क्षौर करावें , असें शुद्धितत्त्वादिग्रंथकार सांगतात . ह्या क्षौराविषयीं देशाचारावरुन व्यवस्था जाणावी . वरील आपस्तंबवचनांत ‘ परि ’ याचा - शिखावर्ज्य , असा अर्थ आहे . कारण , " शिखा वर्ज्य करुन केश , श्मश्रु , नखें , लोम यांचें वपन करवावें . " असें गोभिलाचें वचन आहे . आतां जें आपस्तंब - " समावर्तन केलेल्यांनीं ( गृहस्थांनीं ) विहाराहून इतर दिवशीं वपन करुं नये , असें कितीएक सांगतात . " विहार म्हणजे दर्शादियाग त्यावांचून समावर्तन केलेल्या गृहस्थांनीं वपन करुं नये ; असा अर्थ होय . आणि जें - " वृथा केशांचें छेदन करितो त्याला ब्रह्मघातक म्हणतात " असें सांगितलें आहे , तें " केश , श्मश्रु धारण करणार्‍यांची संतति श्रेष्ठ होते ’’ असें दानधर्मांत सांगितलेल्या काम्य केशादिधारणाविषयीं आहे , असें समजावें . वरील आपस्तंबवचनांत ‘ अनुभावी ’ म्हणजे पुत्रादिक असें कितीएक सांगतात . कारण , " पुत्र व पत्नी यांनीं आशौचांतीं यथाविधि वपन करावें . पिंडदान करण्याविषयीं इतर जो कोणी योग्य असेल त्यानेंही असें करावें . " असें अपरार्कांत व्यासवचन आहे . आतां जें मिताक्षरेंत - " दुसर्‍या दिवशीं प्रयत्नानें क्षौर करावें . तिसर्‍या दिवशीं , पांचव्या दिवशीं अथवा दहाव्या दिवशीं करावें . " असे चार इत्यादिक क्षौरदिवस सांगितले ते प्रथम दिवशीं असंभव असेल तर जाणावे . कारण , " ज्यानें पहिल्या दिवशीं केशवपन केलें नसेल त्यानें ह्या ‘ पुढच्या ’ दिवशीं केशवपन करावें . दुसर्‍या दिवशीं , तिसर्‍या दिवशीं , पांचव्या दिवशीं अथवा सातव्या दिवशीं जोंपर्यंत श्राद्ध देत आहे तोंपर्यंत क्षौर करावें , असें दुसरें मत आहे " असें माधवीयांत आणि मदनरत्नांत बौधायनवचन आहे . मदनपारिजातांत तर - दहाव्या दिवशीं आणि प्रथम दिवशीं दोन्ही दिवशीं क्षौर करावें , असें सांगितलें आहे . आतां जें " दहावा पिंड देऊन त्या रात्रीं शुचि व्हावें " असें सांगितलें आहे , यावरुन दहाव्या दिवशीं शुद्धि होते , असें कोणी म्हणूं नये . कारण , ती शुद्धि अकराव्या दिवशीं करावयाचें जें श्राद्ध त्याचें अंगभूत जें ब्राह्मणनिमंत्रण त्याच्यापुरतीच आहे , असें जाणावें .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:25.1770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

monophyletism

  • न. Gen. एकोद्भवन 
  • = monophylety 
RANDOM WORD

Did you know?

कांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.