TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
उदकुंभ

तृतीय परिच्छेद - उदकुंभ

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


उदकुंभ

आतां उदकुंभ सांगतो -

अथोदकुंभः हेमाद्रौस्मृतिसमुच्चये एकादशाहात्प्रभृतिघटस्तोयान्नसंयुतः दिनेदिनेप्रदातव्योयावत्संवत्सरंसुतैः लौगाक्षिः यस्यसंवत्सरादर्वाक्सपिंडीकरणंभवेत् मासिकंचोदकुंभंचदेयंतस्यापिवत्सरं उत्तरार्धे तस्याप्यन्नंसोदकुंभंदद्यात्संवत्सरंद्विजे इतियाज्ञवल्क्यपाठः सपिंडनापकर्षेस्यापकर्षप्राप्तेबाधकमिदमितिशूलपाणिः तन्न प्रकृतिविकाराभावेनतदंतन्यायाविषयत्वात् मात्स्ये यावदब्दंचयोदद्यादुदकुंभंविमत्सरः प्रेतायान्नसमायुक्तंसोश्वमेधफलंलभेत् केचित्र्त्रयोदशाहमारभ्याहुस्तन्निर्मूलं देवयाज्ञिकः सपिंडनापकर्षेसंवत्सरंयावदुदकुंभंअर्वागेवदद्यान्नोर्ध्वं प्रेतलोकगतस्यान्नंसोदकुंभंप्रयच्छतेतिगोविंदराजधृतविष्णूक्तेः अन्नंचैवस्वशक्त्यातुसंख्यांकृत्वाब्दिकावधि दातव्यंब्राह्मणेस्कंदघटादौनिष्क्रयंतुवा अपिश्राद्धशतैर्दत्तैरुदकुंभंविनानराः दरिद्रादुः खिनस्तातभ्रमंतिचभवार्णवे तेनापकृष्यदातव्यंप्रेतस्याप्युदकुंभकमितिगोभिलभाष्येस्कांदाच्च सपिंडनात्प्रागेवतस्यविधानादूर्ध्वंनिषेधादित्याह तन्न उदकुंभेपार्वणविधानानुपपत्तेरेवंव्याख्यायांमानाभावान्मिताक्षरादिविरोधाच्च वचनंयदिसमूलंतदावृद्धावपकर्षंविधत्ते प्रेतश्राद्धानिसर्वाणिसपिंडीकरणंतथेति हेमाद्रौशाठ्यायनोक्तेः तस्याप्यन्नंसोदकुंभमितियाज्ञवल्क्यविरोधाच्च ।

हेमाद्रींत स्मृतिसमुच्चयांत - " पुत्रांनीं अकराव्या दिवसापासून संवत्सरपर्यंत दररोज उदक व अन्न यांनीं युक्त घट द्यावा . " लौगाक्षि - ज्याचें सपिंडीकरण वर्षाचे आंत होईल त्याला देखील मासिक आणि उदकुंभश्राद्ध वर्षपर्यंत द्यावें . " या वचनाचे उत्तरार्धांत ‘ तस्याप्यन्नं सोदकुंभं दद्यात्संवत्सरं द्विजे ’ असा याज्ञवल्क्याचा पाठ आहे . अर्थ - त्याला देखील उदकुंभसहित अन्न संवत्सरपर्यंत ब्राह्मणांच्या ठिकाणीं द्यावें . वर्षांतीं करावयाचे सपिंडीकरणाचा अपकर्ष करुन वर्षाचे आंत केलें असतां उदकुंभाचा अपकर्ष प्राप्त झाला , त्याचें बाधक हें वचन आहे असें शूलपाणि सांगतो . तें बरोबर नाहीं . कारण , ‘ तदंतमपकर्षे स्यात् ’ म्हणजे ज्याचा अपकर्ष सांगितला असेल तदंत जीं कर्मै त्यांचा अपकर्ष करावा , हा जैमिनीचा सूत्रन्याय प्रकृतींत सांगितलेल्या कर्मांचा विकृतींत अपकर्ष करण्याकरितां आहे . या ठिकाणीं प्रकृतिकर्म आणि विकृतिकर्म नसल्यामुळें त्या न्यायाचा येथें विषय नाहीं . मात्स्यांत - " जो पुरुष मत्सररहित होऊन वर्षपर्यंत प्रेताला अन्नसहित उदक देईल त्याला अश्वमेधाचें फल प्राप्त होईल . " केचित् ग्रंथकार - तेराव्या दिवसापासून उदकुंभ द्यावा , असें सांगतात , तें मूलरहित आहे . देवयाज्ञिक - सपिंडीकरणाचा अपकर्ष असतां संवत्सरपर्यंत द्यावयाचे उदकुंभ ते सपिंडीकरणाच्या पूर्वींच द्यावे ; सपिंडीकरणानंतर देऊं नयेत . कारण , " प्रेतलोकास गेलेल्या प्राण्यास उदकुंभसहित अन्न द्यावें . " असें गोविंदराजानें धरलेलें विष्णुवचन आहे . आणि " आपल्या शक्तीप्रमाणें एकवर्षपर्यंत लागणार्‍या अन्नाची संख्या करुन ब्राह्मणाला द्यावें . घटादिक द्यावें . तें घटादिक देण्याविषयीं अशक्य असेल तर निष्क्रय द्रव्य द्यावें . शेंकडों श्राद्धें केलीं तरी उदकुंभावांचून प्राणी दरिद्री व दुःखी होऊन भवसागरांत भ्रमण करितात , त्यामुळें प्रेताला अपकर्ष करुनही उदकुंभ द्यावा . " असें गोभिलभाष्यांत स्कांदवचनही आहे , म्हणून सपिंडीकरणाच्या पूर्वींच उदकुंभाचें विधान आहे , सपिंडीकरणानंतर निषेध आहे , असें सांगतो . तें बरोबर नाहीं . कारण , उदकुंभाचे ठायीं पार्वणाचें विधान केलें आहे त्याची उपपत्ति होणार नाहीं . वरील वचनाची - सपिंडीच्या पूर्वींच विधान व नंतर निषेध - अशी व्याख्या करण्याविषयीं प्रमाण नाहीं . आणि तसें म्हटलें तर मिताक्षरा इत्यादि ग्रंथांचा विरोधही येतो . तें स्कांदादिवचन जर समूल असेल तर , वृद्धिश्राद्ध कर्तव्य असतां उदकुंभांचा अपकर्ष करावा , असें सांगतें . कारण , " सारीं प्रेतश्राद्धें आणि सपिंडीकरण यांचा अपकर्ष करावा " असें हेमाद्रींत शाठ्यायनवचन आहे . आणि सपिंडीकरणानंतर करावयाचीं नाहींत असें म्हटले तर ‘ तस्याप्यन्नं सोदकुंभं० ’ ह्या वर सांगितलेल्या याज्ञवल्क्यवचनाशीं विरोधही येतो .

मदनरत्नेगौतमः अदैवंपार्वणंश्राद्धंसोदकुंभमधर्मकं कुर्यात्प्रत्याब्दिकाच्छ्राद्धात्संकल्पविधिनान्वहं अधर्मकंब्रह्मचर्यादिनियमहीनं एतन्मासिकवदेकोद्दिष्टंपार्वणंवाकार्यं अपरार्कस्तु सपिंडीकरणेवृत्तेपृथक्त्वंनोपपद्यते पृथक् त्वेतुकृतेपश्चात्पुनः कार्यासपिंडतेतिलघुहारीतोक्तावपि तस्याप्यन्नंसोदकुंभंदेयंसंवत्सरंद्विजेइति याज्ञवल्कीयेतस्येत्येकत्वोक्तेः सपिंडनोत्तरमप्येकोद्दिष्टमेवेत्याह अत्रपिंडदानंकृताकृतं अहरहरन्नमस्मैब्राह्मणायोदकुंभंचदद्यात्पिंडमप्येकेनिपृणंतीतिहेमाद्रौपारस्करोक्तेः श्राद्धाशक्तौपिंडमात्रमिति गौडाः तन्न अपिशब्दबाधापत्तेः हारीतः मृतेपितरिवैपुत्रः पिंडमब्दंसमाचरेत् अन्नंकुंभंचविप्रायप्रेतनिर्देशधर्मतः प्रेतशब्दोच्चारणेनेतिहलायुधः यद्वाप्रेतस्यनिर्देशोयत्रतदेकोद्दिष्टंतद्धर्मकमित्यर्थः अत्राशौचांत दिनाद्यब्दांतंयावद्वत्सरापूर्तेः शौचंनाधिकारिविशेषणं तेनमृतिदिनमारभ्यैतत्कार्यमितिकेचित् तन्न हेमाद्रिधृतवचोविरोधात् मध्येआशौचादिनाबाधेतुलोपएवदार्शवत् तथाप्रथमाब्देदीपदानमुक्तंदेवजानीये गारुडे प्रत्यहंदीपकोदेयोमार्गेतुविषमेनरैः यावत्संवत्सरंवापिप्रेतस्यसुखलिप्सया प्राड्मुखोदड्मुखंदीपंदेवागारेद्विजालये कुर्याद्याम्यमुखंपित्र्येअद्भिः संकल्प्यसुस्थितं ।

मदनरत्नांत गौतम - " सांवत्सरिकश्राद्धापर्यंत दररोज उदकुंभश्राद्ध देवरहित पार्वण अधर्मक ( ब्रह्मचर्यादि नियमरहित ) असें संकल्पविधीनें करावें . " हें श्राद्ध मासिकाप्रमाणें एकोद्दिष्ट किंवा पार्वण करावें . अपरार्क तर - " सपिंडीकरण झालें असतां पृथक् करणें योग्य नाहीं . पृथक् ‍ केलें असतां पुनः सपिंडन करावें " असें लघुहारीतानें सांगितलें तरी " त्यालाही वर्षपर्यंत उदकुंभसहित अन्न ब्राह्मणाच्या ठिकाणीं द्यावें . " ह्या याज्ञवल्क्यवचनांत ‘ तस्य ’ त्यालाही , असें एकवचन असल्यामुळें सपिंडीकरणानंतरही एकोद्दिष्टच करावें , असें सांगतो . ह्या उदकुंभश्राद्धांत पिंडदान कृताकृत आहे . कारण , " दररोज प्रेताच्या उद्देशानें ब्राह्मणाला अन्न आणि उदकुंभ द्यावा . कितीएक विद्वान् पिंडही देतात " असें हेमाद्रींत पारस्करवचन आहे . श्राद्धाविषयीं शक्ति नसेल तर पिंडच द्यावे , असें गौड सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , ‘ पिंडमपि ’ ‘ पिंडही ’ ह्या अपिशब्दाचा बाध होईल . हारीत - " पिता मृत असतां पुत्रानें वर्षपर्यंत पिंड द्यावा . प्रेतनिर्देशधर्मानें अन्न आणि उदकुंभ ब्राह्मणाला द्यावा . " प्रेतनिर्देशधर्मतः म्हणजे प्रेतशब्दोच्चारण करुन , असें हलायुध सांगतो . अथवा प्रेताचा निर्देश ज्यांत आहे तें एकोद्दिष्ट होय , त्याच्या धर्मानें करावें , असा अर्थ समजावा . येथें आशौचसमाप्तीच्या दिवसापासून वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत संवत्सराची पूर्तता होत नाहीं म्हणून अधिकारी याला शुद्ध हें विशेषण करावयाचें नाहीं . तेणेंकरुन अशुद्ध असला तरी मृत दिवसापासून आरंभ करुन हें उदकुंभश्राद्ध करावें , असें केचित् म्हणतात . तें बरोबर नाहीं . कारण , वरील हेमाद्रीनें धरलेल्या स्मृतिसमुच्चयवचनाशीं विरोध येतो . मध्यें आशौचादिकानें उदकुंभश्राद्धाचा बाध झाला असतां दर्शादिश्राद्धाप्रमाणें लोपच होतो . तसेंच प्रथमवर्षीं दीपदान सांगितलें आहे - देवजानीयांत गारुडांत - " प्रेताला विषम मार्गांत सुख व्हावें म्हणून दररोज संवत्सरपर्यंत दीप द्यावा . देवालयांत व ब्राह्मणाच्या घरीं उदकानें संकल्प करुन पूर्वेस मुख करुन व उत्तरेस मुख करुन दीप ठेवावा . आणि पित्र्य कर्मामध्यें दक्षिणेस मुख करुन दीप ठेवावा . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:25.4100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

serrated vertical pulse

  • सरीदार उभा स्पंद 
RANDOM WORD

Did you know?

शंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.