TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
अन्वारोहणा विषयींचा निर्णय

तृतीय परिच्छेद - अन्वारोहणा विषयींचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अन्वारोहणा विषयींचा निर्णय

आतां अन्वारोहणा ( सहगमना ) विषयींचा निर्णय सांगतो -

अथान्वारोहणेनिर्णयः लौगाक्षिः मृताहनिसमासेनपिंडनिर्वपणंपृथक् ‍ नवश्राद्धंचदंपत्योरन्वारोहणएवतु समासेनतंत्रेण द्विपितृकश्राद्धवत् ‍ द्वयोरेकः पिंडोविप्रश्च पिंडशब्दः श्राद्धपरः नवश्राद्धंपृथगितिहेमाद्रिपृथ्वीचंद्रौ अत्रमृताहनीत्येकत्वात् ‍ दिनभेदेदिनैक्येवामृततिथेरेकत्वेकालैक्यंकर्त्रैक्यंपाकैक्यंच एकचित्यधिरोहेतुतिथिरेकैवजायते एकपाकेनपिंडैक्येद्वयोर्गृह्णीतनामनी इतिस्मृत्यंतराच्च अंत्येष्टिपद्धतौभट्टैरप्युदाह्रतं अन्वारोहेतुनारीणांपत्युश्चैकोदकक्रिया पिंडदानक्रियातद्वच्छ्राद्धंप्रत्याब्दिकंतथा नवश्राद्धानिसर्वाणिसपिंडीकरणंपृथक् ‍ एकएववृषोत्सर्गोगौरेकातत्रदीयतेइति तिथिभेदेतुवार्षिकंपृथगेव तथावार्षिकेसमासविधानादन्यत्रसर्वत्रपृथक्त्वेप्राप्ते नवश्राद्धमेवपृथगितिपरिसंख्ययान्यत्रपृथगुक्तेष्वपिवार्षिकषोडशश्राद्धतीर्थसपिंडनान्वष्टक्यादिषुसमासएवेतिमदनपारिजातनिर्णयामृतादयः अतः समासविधिबलात् ‍ ज्येष्ठपुत्रस्यकर्तृत्वेसापत्नमातुरन्वारोहणेतत्पुत्रेसत्यपितद्वार्षिकादिकमविभक्तः सापत्नपुत्रएवज्येष्ठः कुर्यान्नौरसः वक्ष्यमाणपृथ्वीचंद्रादिमतेतु औरसएवमातुः पृथक्कुर्यात् ‍ एवंबह्वीष्वपिमातृषुज्ञेयं त्रिस्थलीसेतौपितामहचरणैरप्येवमुक्तम् ‍ यत्तुगार्ग्यः एकचित्यांसमारुढौदंपतीनिधनंगतौ पृथक् ‍ श्राद्धंतयोः कुर्यादोदनंचपृथक् ‍ पृथक् ‍ ओदनंपिंडः तन्नवश्राद्धविषयं यत्तुभृगुः यासमारोहणंकुर्याद्भुर्तुश्चित्यांपतिव्रता तांमृताहनिसंप्राप्तेपृथक् ‍ पिंडेनियोजयेत् ‍ प्रत्यब्दंचनवश्राद्धंयुगपत्तुसमाचरेत् ‍ तद्येषांवार्षिकमेकोद्दिष्टमुक्तंतद्विषयं प्रत्यब्दंचमृताहनीत्यन्वयः नवश्राद्धंयुगपदिति दर्शेवर्गद्वयवदेकतंत्रेणपृथगित्यर्थमाह हेमाद्रिः एतन्मृततिथेर्भेदविषयमितिपृथ्वीचंद्रनिर्णयामृताद्याः देवयाज्ञिकोप्येवम् ‍ पराशरमाधवस्तुगार्ग्यभृग्वादिवचनात् ‍ लौगाक्षिवाक्येसमासेनपाकादितंत्रैक्येनदर्शेवर्गद्वयवत्पृथक् ‍ श्राद्धंकुर्यात् ‍ नवश्राद्धंचतथेत्याह ।

लौगाक्षि - " अन्वारोहण ( पत्नीचें सहगमन ) असतां दंपतींचें मृतदिवशीं पिंडनिर्वपण म्हणजे श्राद्ध तंत्रानें करावें . जसें - दत्तकादिकाला दोन पित्यांचें श्राद्ध तंत्रानें सांगितलें त्याप्रमाणें येथें दोघांना एक पिंड व एक ब्राह्मण योजून श्राद्ध करावें . या वचनांतील ‘ पिंड ’ शब्दाचा अर्थ श्राद्ध हा आहे . आणि नवश्राद्ध हें दोघांचें पृथक् ‍ करावें , " असा ह्या वचनाचा अर्थ हेमाद्रि पृथ्वीचंद्र करितात . या वचनांत ‘ मृताहनि ’ असें एकवचन आहे त्यावरुन दोघांचा मृतदिवस भिन्न असो किंवा एक असो दोघांची मृततिथि एक असली म्हणजे दोघांच्या श्राद्धाचा काल एक , कर्ता एक आणि पाक एक समजावा . " एका चितीवर दोघांचें अधिरोहण असतां दोहांची मृततिथि एकच होते . एका पाकानें एका पिंडावर दोघांचीं नांवें घ्यावीं . " असें इतर स्मृतीचें वचनही आहे . अंत्येष्टिपद्धतींत नारायणभट्टांनीं देखील सांगितलें आहे , - " सहगमन असतां स्त्रियांची व पतीची उदकदानक्रिया एक व तशीच पिंडदानक्रिया एक . आणि प्रतिवार्षिक श्राद्धही तसेंच होतें . सारीं नवश्राद्धें व सपिंडीकरण हीं पृथक् ‍ होतात . वृषोत्सर्ग एक व त्या ठिकाणीं गोप्रदान एक समजावें . " दोघांची मृततिथि भिन्न असतां वार्षिक श्राद्ध निरनिराळेंच करावें . वरील लौगाक्षिवचनानें वार्षिकाचे ठायीं तंत्राचें विधान केल्यावरुन इतर सर्व श्राद्धांना पृथक्त्व ( वेगळेपणा ) प्राप्त असतां ‘ नवश्राद्धं पृथक् ‍ ’ हें वचन व्यर्थ होऊन ‘ नवश्राद्धच पृथक् ‍ करावें ’ अशा परिसंख्येनें ( नियमानें ), इतर ग्रंथीं पृथक् ‍ सांगितलेल्याही वार्षिक - षोडशश्राद्ध - तीर्थश्राद्ध - सपिंडीकरण - अन्वष्टक्य इत्यादि श्राद्धांत तंत्रच करावें , असें मदनपारिजात , निर्णयामृत इत्यादि ग्रंथकार सांगतात . ह्या तंत्रविधीच्या बलानें ज्येष्ठ पुत्र कर्ता असून त्याच्या सापत्न मातेचें सहगमन असतां तिचा औरस पुत्र असला तरी दोघे अविभक्त असतील तर तिचें वार्षिकादिक श्राद्ध ज्येष्ठ सापत्न पुत्रानेंच करावें , औरस पुत्रानें करुं नये असें झालें . पुढें सांगावयाच्या पृथ्वीचंद्रादिकांच्या मतीं तर औरस पुत्रानेंच मातेचें श्राद्ध पृथक् ‍ करावें . बहुत माता असतांही असेंच जाणावें . त्रिस्थलीसेतूंत पितामहचरणांनीं ( नारायणभट्टांनीं ) देखील असेंच सांगितलें आहे . आतां जें गार्ग्य - " दोघे भार्यापती मृत होऊन एका चितीवर गेले असतां त्यांचें श्राद्ध पृथक् ‍ करावें . पिंडही पृथक् ‍ द्यावा " असें सांगतो , तें वचन नवश्राद्धविषयक आहे . आतां जें भृगु - " जी पतिव्रता स्त्री भर्त्याच्या चितीवर आरोहण करील तिला प्रतिवर्षीं मृतदिवस प्राप्त असतां पृथक् ‍ पिंड द्यावा . आणि नवश्राद्ध दोघांचें एकदम करावें " असें सांगतो , तें ज्यांचें वार्षिकश्राद्ध एकोद्दिष्ट सांगितलें त्यांविषयीं समजावें . या वचनांत ‘ नवश्राद्धं युगपत् ‍ ’ म्हणजे - दर्शाचे ठिकाणीं जसें , पितृवर्ग व मातामहवर्ग या दोन वर्गांचें श्राद्ध एका तंत्रानें पृथक् ‍ होतें तसें - हें नवश्राद्ध एकतंत्रानें पृथक् ‍ करावें , असा अर्थ हेमाद्रि सांगतो . हें वचन दंपतींची मृततिथि भिन्न असतां तद्विषयक आहे , असें पृथ्वीचंद्र , निर्णयामृत इत्यादिक सांगतात . देवयाज्ञिकही असेंच सांगतो . पराशरमाधव तर - गार्ग्य , भृगु इत्यादिकांच्या वचनांवरुन लौगाक्षिवाक्यांतील ‘ समासेन ’ म्हणजे पाकादिकांचें एक तंत्र करुन - जसें दर्शाचे ठायीं दोन वर्गांचें ( पितृवर्ग व मातामहवर्ग यांचें ) पृथक् ‍ श्राद्ध होतें तसें - येथें ( दंपतींचें ) पृथक् ‍ श्राद्ध करावें . नवश्राद्धही तसेंच करावें , असें सांगतो .

पृथ्वीचंद्रचंद्रिकादयस्तु द्वयोरेकपिंडदानंलौगाक्षिवचनंचापद्विषयं पृथक् ‍ पिंडदानंतुमुख्यः कल्पः तदाह वृद्धपराशरः आरुह्यभर्तुश्चितिमंगनायाप्राप्नोतिमृत्युंखलुसत्त्वयुक्ता एकादशाहेतुतयोर्विधेयंश्राद्धंपृथक् ‍ स्वर्गमपेक्ष्यसद्भिः एकत्वमिच्छंतिमतिप्रहीणाएकादशाहादिषुयेनृनार्योः तेस्वर्गमार्गंविनिहत्यकुर्युः स्त्रीसत्त्वघातान्नरकाधिवासं भर्त्रासहमृतायातुनाकलोकमभीप्सती सार्हेच्छ्राद्धंपृथक् ‍ पिंडान् ‍ नैकत्वंतुस्मृतंतयोः पृथगेवहिकर्तव्यंश्राद्धमेकादशाहिकं यानिश्राद्धानिसर्वाणितान्युक्तानिपृथक् ‍ पृथक् ‍ विश्वादर्शेपि मातुर्गयाष्टकावृद्धिमृताहेषुमहालये श्राद्धंकुर्यात्पृथग् ‍ दैवंतंत्रंचानुगतावपि एकचित्यांसमारुह्यमृतयोरेकबर्हिषि पित्रोः पिंडान्पृथग्दद्यात्पिंडंत्वापत्सुतत्सुत इत्यग्निस्मृतेरित्याहुः यत्तुषटत्रिंशन्मते एकत्वंसागताभर्तुः पिंडेगोत्रेचसूतके नपृथक् ‍ पिंडदानंतुतस्मात्पत्नीषुविद्यते इतितद्दर्शादिपरं चंद्रप्रकाशेपि एकचित्यांसमारुढौदंपतीप्रमृतौयदि पृथक् ‍ श्राद्धंप्रकुर्वीतपत्युरेवक्षयेहनि मृतानामपिभृत्यानांभार्याणांपतिनासह पूर्वकस्यमृतस्यादौद्वितीयस्यततः पुनः तंत्रेणश्रपणंकृत्वाश्राद्धंस्वामिक्षयेहनि तृतीयस्यततः कुर्यात्संनिपातेष्वयंक्रमइति ।

पृथ्वीचंद्र , चंद्रिका इत्यादिक तर - दोघांना एक पिंड देणें व त्याविषयीं लौगाक्षीनें सांगितलें तें आपत्तिविषयक आहे . पिंडदान पृथक् ‍ करावें , हा मुख्य कल्प आहे . तें सांगतो वृद्धपराशर - " जी धैर्ययुक्त स्त्री भर्त्याच्या चितीवर आरोहण करुन मृत होते त्या स्त्रीपुरुषांचें अकराव्या दिवशीं श्राद्ध स्वर्गप्राप्ति व्हावी म्हणून पृथक् ‍ करावें . जे मंदमति नर त्या स्त्रीपुरुषांचें एकादशाहादिकांत एक श्राद्ध करितात ते नर तिच्या स्वर्गमार्गाचा विघात करुन स्त्रियेच्या सत्वाचा घात केल्यामुळें नरकवास करितील . जी स्वर्गलोकाची इच्छा करणारी स्त्री भर्त्यासहवर्तमान मृत झाली ती पृथक् ‍ श्राद्धाला व पृथक् ‍ पिंडांना योग्य होते . त्या स्त्रीपुरुषांचें एक श्राद्ध कोठें सांगितलें नाहीं . त्यांचें एकादशाहिक श्राद्ध वेगळेंच करावें . जीं श्राद्धें करावयाचीं तीं सारीं वेगवेगळीं करावीं . " विश्वादर्शांतही - " सहगमन असतांही गया , अष्टका , वृद्धि , मृतदिवस , महालय , यांचे ठिकाणीं मातेचें श्राद्ध पृथक् ‍ करावें व विश्वेदेवांचें तंत्र करावें . एका चितीवर आरोहण करुन मृत झालेल्या मातापितरांना त्यांच्या पुत्रानें पृथक् ‍ पिंड द्यावे . आपत्कालीं एक पिंड द्यावा " अशी अग्निस्मृति आहे , असें सांगतात . आतां जें षटत्रिंशन्मतांत - " स्त्रियेचा विवाह झाल्यावर पिंड , गोत्र व सूतक हें भर्त्याचें व तिचें एक होतें ; म्हणून पत्नींना पृथक् ‍ पिंडदान नाहीं " असें सांगितलें , तें दर्शादिश्राद्धविषयक आहे . चंद्रप्रकाशांतही - " जर एका चितीवर आरोहण करुन जायापती मृत होतील तर पतिमरणदिवशींच दोघांचें पृथक् ‍ श्राद्ध करावें . स्वामीसहवर्तमान दास मृत होतील व पतीसहवर्तमान स्त्रिया मृत होतील तर स्वामीच्या मृतदिवशीं तंत्रानें पाक करुन पूर्वीं मृत असेल त्याला आधीं , पश्चात् ‍ मृत असेल त्याचें नंतर , तिसर्‍याचें त्याच्यानंतर श्राद्ध करावें . एका दिवशीं प्राप्त झालेल्या श्राद्धांविषयीं हा क्रम समजावा . "

सहगमनेसर्वत्रश्राद्धार्थमेकपाकइत्याह मदनरत्नेप्रचेताः एकचित्यांसमारुढौम्रियेतेदंपतीयदि तंत्रेणश्रपणंकुर्यात्पृथक् ‍ पिंडंसमावपेत् ‍ पृथ्वीचंद्रोदयेप्येवं अत्रभर्तुराशौचमध्येऽन्यदिनेस्त्रीमरणेपतिमरणदिनगणनयाशौचपिंडदानैकादशाहादिकार्यं नात्रपक्षिणीवृद्धिः मृतंपतिमनुव्रज्यपत्नीचेदनलंगता नतत्रपक्षिणीकार्यापैतृकादेवशुद्ध्यति पुत्रोन्योवाग्निदस्तस्यास्तावदेवाशुचिस्तयोः नवश्राद्धंसपिंडंचयुगपत्तुसमापयेदिति षडशीतिमतात् ‍ यदानारीविशेदग्निंप्रियस्यप्रियवांछया तदाशौचंविधातव्यंभर्त्राशौचक्रमेणहीतिलघुहारीतोक्तेश्च भर्त्राशौचोत्तरमन्वारोहणेतुत्र्यहमाशौचं ऋग्वेदवादात्साध्वीस्त्रीनभवेदात्मघातिनी त्र्यहाशौचेनिवृत्तेतुश्राद्धंप्राप्नोतिशास्त्रतइतिब्राह्मोक्तेरिति पृथ्वीचंद्रापरार्कौ एतदन्वारोहणेएव नत्वेकचितौ ऋग्वेदवादः इमानारीरविधवेत्यादिः एतदसवर्णापरमित्यन्ये ।

सहगमन असतां सर्वत्र श्राद्धासाठीं एक पाक , असें सांगतो मदनरत्नांत प्रचेता - " जर एका चितीवर आरोहण करुन दंपती मृत होतील तर तंत्रानें पाक करावा , आणि पृथक् ‍ पिंड द्यावा . " पृथ्वीचंद्रोदयांतही असेंच आहे . सहगमन असतां भर्त्याच्या आशौचामध्यें भर्तृमरणाच्या इतर दिवशीं स्त्री मृत झाली असेल तर पति मृत झालेल्या दिवसापासून गणना करुन आशौच , पिंडदान , एकादशाहादि कृत्य करावें . मातेच्या मरणनिमित्तानें पक्षिणी अधिक आशौच धरावें , असें पुढें आशौचप्रकरणीं सांगावयाचें आहे , तें अधिक पक्षिणी आशौच येथें ( सहगमनीं ) नाहीं . कारण , " मृत झालेल्या पतीच्या मागाहून जाऊन पत्नी जर अग्निप्रवेश करील तर तेथें पक्षिणी अधिक आशौच करुं नये . पित्याच्याच आशौचानें पुत्र शुद्ध होतो . तिला अग्नि देणारा पुत्र किंवा दुसरा कोणी असेल तो त्या पतीच्या आशौचापर्यंतच अशुचि होतो . त्या दोघांचें नवश्राद्ध आणि सपिंडीकरण एकदम समाप्त करावें " असें षडशीति स्मृतिवचन आहे . आणि " जेव्हां स्त्री पतीचें प्रिय करावें , अशा इच्छेनें अग्नींत प्रवेश करील तेव्हां भर्त्याच्या आशौचक्रमानें स्त्रियेचें आशौच करावें " असें लघुहारीतवचनही आहे . पतीचें आशौच समाप्त झाल्यावर अनुगमन करील तर तीन दिवस आशौच आहे . कारण , ‘‘ ऋग्वेदाच्या ( इमा नारीरविधवा० इत्यादिका ) वादा वरुन अनुगमन करणारी पतिव्रता स्त्री आत्मघातकी होत नाहीं . तीन दिवस आशौच झाल्यानंतर शास्त्रावरुन ती श्राद्ध पावते . " असें ब्राह्मवचन आहे , असें पृथ्वीचंद्र अपरार्क सांगतात . हें वचन अनुगमनाविषयींच समजावें . एकचितीवर सहगमनाविषयीं समजूं नये . हें वचन असमानवर्णाच्या स्त्रीविषयीं आहे , असें इतर ग्रंथकार सांगतात .

स्मार्तगौडास्तु देशांतरमृतेपत्यौसाध्वीतत्पादुकाद्वयमित्युपक्रम्यब्राह्मे त्र्यहाशौचेतुनिर्वृत्तेइत्युक्तेर्भर्त्राशौचोत्तरमन्वारोहणेत्र्यहः सहगमनेतुपूर्णंदशाहादि पिंडास्तुदशापिसहैव तथाचजनकशूलपाणिशुद्धितत्त्वधृतव्यासः संस्थितंपतिमालिंग्यप्रविशेद्याहुताशनं तस्याः पिंडादिकंज्ञेयंक्रमशः पतिपिंडवत् ‍ अन्वितापिंडदानंतुयथाभर्तुर्दिनेदिने तदन्वारोहिणीयस्मात्सामृतानात्मघातिनीतिविष्णूक्तेश्च पृथक् ‍ चितौतुभर्त्राशौचमध्येतदूर्ध्वंवासत्यांत्र्यहेणदशपिंडाः अन्वितायाः प्रदातव्यादशपिंडास्त्र्यहेणतु स्वाम्याशौचेव्यतीतेतुतस्याः श्राद्धंप्रदीयत इतितत्रैवपैठीनसिस्मृतेः भर्त्राशौचोत्तरंमृतौतुचतुर्थेह्निश्राद्धं शूलपाणिनात्विदमग्निपुराणीयत्वेनोक्तं युद्धहतस्यसद्यः शौचेत्वन्वारोहणेत्रिरात्रं एकचितौतुसंस्थितंपतिमितिप्रागुक्तव्यासोक्तेः सद्यः शौचमित्याहुः अन्यसपिंडाशौचमध्येविदेशमृतान्वारोहणंत्वनाशंक्यमेव शुचितायाअंगत्वात् ‍ अन्येतुरजोवत्याः सूतिकायाश्चानुगमननिषेधादितराशौचस्यानिषेधः अन्यथाप्रत्यक्षभर्तृमरणेकागतिरित्याहुः तन्मूलवचनंविनाचिंत्यमेव स्मृत्यर्थसारेपि सहगमनेसर्वत्रश्राद्धपिंडादौपाकैक्यंकालैक्यंकर्त्रैक्यंचेति यातुपतिमुद्दिश्याऽन्यकालेऽन्यतिथावन्वारुढातस्याः श्राद्धंतत्क्षयतिथौकार्यंनभर्तृतिथौ पारणेमरणेनृणांतिथिस्तात्कालिकीस्मृतेतिस्कांदात् ‍ तिथिरेकैवजायतइत्यादिवचनाच्चेतिमदनरत्नपारिजातपृथ्वीचंद्रादयः अन्येतुतस्याः पतिमरणेनमृतप्रायत्वात् ‍ सहाग्रतः पृष्ठतोवातद्भक्त्याम्रियतेयदि तस्याः श्राद्धंप्रदातव्यं पृथक् ‍ पत्युः क्षयेहनीतिस्मृत्यंतरात् ‍ अग्रतः पृष्ठतोवापितद्भक्त्याम्रियतेयदि तस्याः श्राद्धंसुतैः कार्यंपत्युरेवक्षयेहनीतिपुराणसमुच्चयाच्चभर्तृतिथावेवेत्याहुः अत्रमूलंचिंत्यं अत्रविशेषोहेमाद्रौस्मृत्यंतरे मातामंगलसूत्रेणम्रियतेयदितद्दिने उद्दिश्यविप्रपंक्तौतांभोजयेच्चसुवासिनीम् ‍ ।

स्मार्तगौड तर - " देशांतरीं पति मृत असतां साध्वी स्त्रियेनें पतीच्या दोन पादुका ग्रहण करुन " असा उपक्रम करुन " तीन दिवस आशौच निवृत्त झालें असतां श्राद्ध पावतें " असें ब्राह्मांत सांगितल्यावरुन भर्त्याच्या आशौचानंतर अनुगमन असतां तीन दिवस आशौच . सहगमन असतां संपूर्ण दशाहादि आशौच . पिंड तर दहाही पतीबरोबरच द्यावे . तसेंच सांगतो जनकशूलपाणि शुद्धितत्त्व यांत व्यास - " जी स्त्री मृत झालेल्या पतीस आलिंगन करुन अग्नींत प्रवेश करील तिला पतिपिंडाप्रमाणें अनुक्रमानें पिंडादिक द्यावें . " आणि " सहगमन करणार्‍या स्त्रियेला पिंडदान जसें तिच्या भर्त्याला प्रतिदिवशीं करावयाचें तसें करावें . ती स्त्री पतीच्या बरोबर जाऊन मृत झाली आहे , म्हणून आत्मघातिनी होत नाहीं . " असें विष्णुवचनही आहे . भर्त्याच्या आशौचामध्यें किंवा नंतर स्त्रियेची पृथक् ‍ चिती असेल तर तीन दिवसांत दहा पिंड द्यावे . कारण " अनुगमन करणार्‍या स्त्रियेला तीन दिवसांत दहा पिंड द्यावे . पतीचें आशौच निवृत्त झाल्यानंतर श्राद्ध द्यावें . " असें तेथेंच पैठीनसि स्मृतिवचन आहे . भर्त्याच्या आशौचानंतर मृत असेल तर तिला चवथ्या दिवशीं श्राद्ध द्यावें शूलपाणीनें तर हें वचन अग्निपुराणांतील सांगितलें आहे . युद्धांत मृत झालेल्याचें सद्यः शौच ( तत्काल शुद्धि ) होतें . अन्वारोहण असतां त्रिरात्र आशौच . दंपतींची एकचिती असतां ‘ संस्थितं पतिमालिंग्य० ’ ह्या वर सांगितलेल्या व्यासवचनावरुन स्त्रियेचें सद्यः शौच होतें . असें ( स्मार्तगौड ) सांगतात . विदेशांत मृत झालेल्या पतीशीं अन्वारोहण इतर सपिंडांच्या आशौचामध्यें असेल तर , असें आशंकूं नये ; कारण , अन्वारोहणाविषयीं शुचित्व हें अंग आहे . इतर ग्रंथकार तर - रजस्वला व सूतिका यांना सहगमनाचा निषेध असल्यामुळें इतरांच्या आशौचाचा निषेध नाहीं . इतराशौचाचा निषेध मानला तर प्रत्यक्ष भर्ता मेला असतां आशौचाची गति काय ? असें सांगतात . या इतर ग्रंथकरांच्या मतास मूलवचन नसल्यामुळें तें मत चिंत्य ( उपेक्षणीय ) च आहे . स्मृत्यर्थसारांतही - सहगमन असतां सर्वत्र ठिकाणीं श्राद्ध , पिंड इत्यादिकांत पाक एक , काल एक आणि कर्ताही एकच . जी स्त्री पतीच्या उद्देशानें अन्य कालीं अन्यतिथीस अन्वारुढ झाली ( सती गेली ) तिचें श्राद्ध तिच्या मृततिथीस करावें . पतीच्या मृततिथीस करुं नये . कारण , " उपवासाची पारणा व मरण यांचे ठायीं तत्कालीं तिथि असेल ती घ्यावी " असें स्कंदपुराणवचन आहे . आणि " एकचितीवर आरोहण केलें असतां तिथि एकच होते " इत्यादि वचनही आहे , असें मदनरत्न , पारिजात , पृथ्वीचंद्र इत्यादिक सांगतात . अन्य ग्रंथकार तर - ती स्त्री पति मेल्यानें मृतप्राय झाल्यामुळें " पतीच्या भक्तीनें त्याच्या बरोबर किंवा पूर्वीं अथवा मागाहून जर स्त्री मरेल तर तिचें श्राद्ध पतीच्या मृत दिवशीं पृथक् ‍ करावें . " ह्या स्मृत्यंतरवचनावरुन ; आणि " पतीच्या पूर्वीं किंवा मागाहून पतीच्या भक्तीनें जर स्त्री मरेल तर तिचें श्राद्ध पुत्रांनीं पतीच्याच मृतदिवशीं करावें " ह्या पुराणसमुच्चयवचनावरुनही पतीच्या मृततिथीसच करावें , असें सांगतात . याविषयीं मूलवचन चिंत्य ( अनुपलब्ध ) आहे . येथें विशेष सांगतो हेमाद्रींत स्मृत्यंतरांत - " माता मंगळसूत्रासह ( सुवासिनी ) मृत होईल तर तिच्या मृतदिवशीं श्राद्धीयब्राह्मणांच्या पंक्तींत तिच्या उद्देशानें सुवासिनीला भोजन घालावें . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:23.0830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

thematic apperception

 • प्राबंधिक आसंवेदन 
RANDOM WORD

Did you know?

आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" का म्हणतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.