TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धाचे काळ

तृतीयपरिच्छेद - श्राद्धाचे काळ

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


श्राद्धाचे काळ

आतां श्राद्धाचे काळ सांगतों -

अथश्राद्धकालाः तेचसंक्रांतियुगादिमहालयादयः प्रायेणपूर्वपरिच्छेदद्वयेउक्ताएव केचित्तूच्यंते पृथ्वीचंद्रोदयेवृद्धपराशरः श्राद्धंवृद्धावचंद्रेभच्छायाग्रहणसंक्रमे नवोदकेनवान्नेचनवच्छन्नेतथागृहे नवैक्षवेषुचेहंतेपितरोहिमघास्वपि पितरः स्पृहयंत्यन्नमष्टकासुमघासुचेतिशातातपपाठः नवोदके नवकूपवाप्यादावितिकेचित् ‍ वर्षोपक्रमेआर्द्राप्रवेशइतिगौडाः नवान्नश्राद्धेविशेषोज्योतिषे ज्येष्ठाशेषार्धगेसूर्येमृग नेत्रानिशात्मके नवान्नैर्भोजनश्राद्धंजन्मचंद्रतिथौनच आश्लेषाकृत्तिकाज्येष्ठामूलाजपदगेषुच गुरुभौमदिनेरिक्तेतिथौनाद्यान्नवोदनं तत्रैव वृश्चिकेशुक्लपक्षेतुनवान्नंशस्यतेबुधैः अतः कृष्णपक्षेनेतिगौडाः मैथिलास्तु अकृताग्रयणंचैवधान्यजातंनरोत्तमइतिवाराहोक्तेः प्रतिधान्यंश्राद्धमाहुः तन्न जातपदस्यश्राद्धयोग्यसमूहपरत्वात् ‍ हेमाद्रौजातूकर्ण्यः ग्रहोपरागेचसुतेचजातेपित्र्येगयायामयनद्वयेच नित्यंचशंखेचतथैवपद्मे दत्तंभवेन्निष्कसहस्रतुल्यम् ‍ शंखंप्राहुरमावास्यांक्षीणचंद्रांद्विजोत्तमाः अष्टकासुभवेत्पद्मंतत्रदत्तंतथाक्षयम् ‍ तत्रैवशंखः यदाविष्टिर्व्यतीपातोभानुवारस्तथैवच पद्मकंनामतत् ‍ प्रोक्तमयनाच्चचतुर्गुणम् ‍ ॥

ते काळ संक्रांति , युगादि , महालय इत्यादिक फार करुन पहिल्या दोन परिच्छेदांत सांगितले आहेतच ; कांहींसे येथें सांगतो - पृथ्वीचंद्रोदयांत वृद्धपराशर - " वृद्धि ( जातकर्म , विवाह वगैरे ), अमावास्या , गजच्छाया , ग्रहण , संक्रांति , नवोदक , नवें अन्न , नवीन घर शाकारणें , नवा गूळ झाला असतां , आणि मघा नक्षत्र आलें असतां , इतक्या वेळीं पितर श्राद्धाची इच्छा करितात . " शातातपानें ‘ नवैक्षवेषु० " या ठिकाणीं ‘ पितरः स्पृहयंत्यन्नं० ’ असा पाठ केलेला आहे . त्याच्या मतीं नवा गूळ वर्ज्य करुन बाकीच्या वेळीं आणि अष्टका प्राप्त झाल्या असतां , पितर अन्नाची इच्छा करितात , असा अर्थ होतो . नवोदक म्हणजे नवा कूप ( विहीर ), नवी वापी वगैरे द्यावी असें कोणी सांगतात . वर्षोपक्रम म्हणजे आर्द्राप्रवेश झाला असतां असें गौड म्हणतात . नवान्नश्राद्धाविषयीं ज्योतिषांत विशेष सांगितला आहे , तो असा - " मृगनक्षत्रावर रात्रि आल्या असतां ( मार्गशीर्षमासीं ) ज्येष्ठा नक्षत्राच्या उत्तरार्धांत सूर्य गेला असतां नवान्नांनीं भोजन व श्राद्ध करुं नये . तसेंच जन्मस्थचंद्र व जन्मतिथि असतां नवान्नभोजन व श्राद्ध करुं नये . आश्लेषा , कृत्तिका , ज्येष्ठा , मूळ , पूर्वाभाद्रपदा , या नक्षत्रांवर ; शुक्र व मंगळ या वारीं ; आणि रिक्तातिथि ( चतुर्थी , नवमी , चतुर्दशी ) या तिथींवर नवान्न भोजन करुं नये . त्याचठिकाणीं " वृश्चिकसंक्रांतींत शुक्लपक्षामध्यें नवान्न विद्वानांनीं प्रशस्त केलें आहे . " असें आहे म्हणून कृष्णपक्षांत प्रशस्त नाहीं , असें गौड सांगतात . मैथिल तर - " आग्रयण केल्यावांचून धान्यजात ( कोणतेंही धान्य ) भक्षण करुं नये . " असें वाराहांत सांगितलें आहे , म्हणून प्रत्येक धान्याला श्राद्ध करावें , असें सांगतात ; त्यांचें ( मैथिलांचें ) तें म्हणणें बरोबर नाहीं . कारण , ‘ धान्यजात ’ यांतील जात पदाचा अर्थ - श्राद्धाला योग्य समुदाय , असा आहे . हेमाद्रींत जातूकर्ण्य - " ग्रहण , पुत्र झाला असतां , पितृपक्ष , गयातीर्थ , दोन अयनें ( मकर व कर्क ह्या दोन संक्रांति ), शंख , पद्म इतक्या ठिकाणीं ब्राह्मणाला दिलें असतां सहस्र निष्क दिल्यासारखें होतें . चंद्राचा क्षय झालेल्या अमावास्येला शंख , असें ब्राह्मण म्हणतात , आणि अष्टकांला पद्म असें म्हणतात , त्या शंख व पद्माचे ठायीं दिलेलें अक्षय होतें . " तेथेंच शंख - " ज्या दिवशीं विष्टि , व्यतीपात आणि रविवार या तिघांचा योग होतो , तेव्हां त्याला पद्मक योग म्हणतात , हा योग अयनाहून ( मकर कर्कसंक्रांतींहून ) चौपट अधिक आहे . "

याज्ञवल्क्यः अमावास्याष्टकावृद्धिः कृष्णपक्षोऽयनद्वयं द्रव्यंब्राह्मणसंपत्तिर्विषुवत्सूर्यसंक्रमः व्यतीपातोगजच्छायाग्रहणंचंद्रसूर्ययोः श्राद्धंप्रतिरुचिश्चैवश्राद्धकालाः प्रकीर्तिताः कृष्णपक्षः सर्वोपि शाकेनाप्यपरपक्षं नातिक्रामेत् ‍ मासिमासिवाशनमितिश्रुतेः ऊर्ध्वंवाचतुर्थ्यायदहः संपद्यतेऋतेचतुर्दशीमितिकात्यायनोक्तेः मासिमासिकार्यमपरपक्षस्यापराह्णः श्रेयानित्यापस्तंबोक्तेश्च वीप्सयासर्वकृष्णपक्षेषुनित्यम् ‍ तेनोपसंहारान्महालयपरत्वंपरास्तं अत्रप्रत्यहंपंचम्यादियदहः संपत्तिर्वेतित्रयः पक्षाः यदैकदिनेश्राद्धंतदादार्शंपृथगेव याज्ञवल्क्येनामावास्यायाः पृथडनिर्देशात् ‍ एतेनकृष्णपक्षेयदहः संपद्यते अमावास्यायांतुविशेषेणेतिनिगमोक्तेर्गुणोपरपक्षश्राद्धस्यामावास्येति शूलपाणिमतमप्यपास्तम् ‍ अशक्तौदर्शेनापिमासिश्राद्धसिद्धिरितिनारायणवृत्तिः निरग्निकानांकस्मिंश्चिद्दिने आहिताग्नेस्तुदर्शेएव नदर्शेनविनाश्राद्धमाहिताग्नेर्द्विजन्मनइतिमनूक्तेः सर्वकृष्णपक्षाशक्तौमात्स्ये अनेनविधिनाश्राद्धंत्रिरब्दस्येहनिर्वपेत् ‍ कन्याकुंभवृषस्थेर्केकृष्णपक्षेचसर्वदा कर्कोपि आहिताग्नेः संवत्सरेत्रिः श्राद्धनियमइति देवलः अनेनविधिनाश्राद्धंकुर्यात्संवत्सरंसकृत् ‍ द्विश्चतुर्वायथाश्राद्धंमासेमासेदिनेदिने कृष्णपक्षेष्वपिमहालयस्यश्रेष्ठत्वम् ‍ तच्चोक्तंप्राक् ‍ व्यतीपातेविशेषमाहहेमाद्रौशंखः फलंलक्षंसमुत्पतौभ्रमणेकोटिरुच्यते पतनेशतकोट्यस्तुपातेवैदत्तमक्षयम् ‍ ज्योतिः शास्त्रे द्वाविंशतिस्तथोत्पत्तौभ्रमणेचैकविंशतिः पतनेदशनाड्यस्तुपतितेसप्तनाडिकाः अंत्यौचद्वौव्यतीपातौप्रागुक्तौ हेमाद्रौमार्कंडेयः यदाचश्रोत्रियोभ्येतिगृहंवेदविदग्निचित् ‍ तेनैकेनापिकर्तव्यंश्राद्धंचविषुवच्छुभे इदंचापिंडंकार्यमितिहेमाद्रिः एतज्जीवत् ‍ पितृकोपिकुर्यात् ‍ उद्वाहेपुत्रजननेपित्र्येष्टयांसौमिकेमखे तीर्थेब्राह्मणआयातेषडेतेजीवतः पितुरितिमैत्रायणीयपरिशिष्टोक्तेः ॥

याज्ञवल्क्य - " अमावास्या , अष्टका , वृद्धि , कृष्णपक्ष , दोन्हीं अयनें , अपूर्वद्रव्यप्राप्ति , उत्तम ब्राह्मणप्राप्ति , विषुवसंक्रांति ( मेष व तुला ), व्यतीपात , गजच्छाया , चंद्रसूर्यांचें ग्रहण , आणि श्राद्धाविषयीं श्रद्धा होणें , हे इतके श्राद्धाचे काळ आहेत . " याज्ञवल्क्यांनीं कृष्णपक्ष जो सांगितला तो बाराही मासांतला कृष्णपक्ष श्राद्धकाळ आहे , म्हणून समजावा ; कारण , " शाकेनें तरी अपरपक्षाचें उल्लंघन करुं नये ; महिन्यामहिन्यांत पितरांस भोजन आहे " अशी श्रुति आहे . " अथवा चतुर्थीच्या पुढें चतुर्दशी वर्ज्य करुन ज्या दिवशीं सामग्रीसंपन्न होईल त्या दिवशीं करावें ." असें कात्यायनानें सांगितलें आहे . " महिन्यामहिन्याचे ठायीं करावें , कृष्णपक्षाचा अपराह्णकाळ श्रेयस्कर आहे . " असें आपस्तंबानेंही सांगितलें आहे . ह्यावरच्या वचनांत " मासिमासि " महिन्यामहिन्याचे ठायीं , अशी वीप्सा केलेली आहे , म्हणून सार्‍या ( बाराही महिन्यांच्या ) कृष्णपक्षांत श्राद्ध नित्य आहे . वरील वचनांनीं सर्व कृष्णपक्षांत श्राद्धाला नित्यत्व प्रतिपादन केल्यानें ; एथें याज्ञवल्क्यवचनांतील कृष्णपक्ष शब्द उपसंहार न्यायानें ( संकोच करुन ) महालयापरपक्षबोधक समजावा , असें कित्येकांचें म्हणणें खंडित झालें . या कृष्णपक्षांत श्राद्धाचे तीन पक्ष आहेत , ते असे - कृष्ण प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत दररोज श्राद्ध करावें हा एक पक्ष पंचमीपासून अमावास्येपर्यंत करावें हा दुसरा , आणि जो दिवस सामग्रीसंपन्न असेल त्या दिवशीं करावें हा तिसरा पक्ष , त्यांतून तिसरा पक्ष घेऊन जेव्हां एक दिवशीं श्राद्ध करावयाचें असेल तेव्हां तें करुन दर्शश्राद्ध वेगळेंच करावें . कारण , वरील याज्ञवल्क्याच्या वचनांत अमावास्या पृथक् ‍ सांगितली आहे . दर्शश्राद्ध पृथक् ‍ सांगितल्यानें ; " कृष्ण पक्षांत जो दिवस संपन्न असेल त्या दिवशीं करावें , अमावास्येला तर विशेषतः करावें " असें निगमानें सांगितलें आहे , म्हणून अमावास्या ही अपरपक्ष श्राद्धाचाच गुण आहे , स्वतंत्र नाहीं , असें जें शूलपाणीचें मत तेंही परास्त ( खंडित ) झालें . सामर्थ्य नसेल तर दर्शश्राद्धानेंच मासिश्राद्धाची ( प्रतिमासांत करावयाच्या श्राद्धाची ) सिद्धि होते , असें नारायणवृत्तिकार सांगतो . निरग्निक ( भार्यारहित ) असतील त्यांनीं कृष्णपक्षांत कोणत्याही दिवशीं करावें . आहिताग्नि ( अग्निहोत्री ) यांनीं दर्शासच करावें ; कारण , " आहिताग्नि ब्राह्मणाला दर्शावांचून श्राद्ध नाहीं " असें मनूनें सांगितलें आहे . सार्‍या ( बारा ) कृष्णपक्षांत श्राद्ध करणें अशक्य असेल तर मात्स्यांत सांगतो - " अशा ( पूर्वोक्त ) विधीनें वर्षांतून तीन वेळां श्राद्ध करावें , तें कन्या , कुंभ आणि वृषभ ह्या तीन संक्रांतींचे ठायीं कृष्णपक्षांत सर्वदा ( प्रतिवर्षीं ) श्राद्ध करावें . " कर्कही सांगतो - आहिताग्नीला संवत्सरांत तीन वेळां श्राद्धाचा नियम ( आवश्यकता ) आहे . देवल - " अशा ( पूर्वोक्त ) विधीनें संवत्सरांत एक वेळां श्राद्ध करावें , अथवा दोन वेळां किंवा चार वेळां , अथवा महिन्यामहिन्याला , किंवा प्रतिदिवशीं करावें . " सार्‍या ( बारा ) ही कृष्णपक्षांत महालय ( भाद्रपद कृष्णपक्ष ) श्रेष्ठ आहे , तें आम्हीं पूर्वीं ( द्वितीयपरिच्छेदांत ) सांगितलें आहे . व्यतीपाताविषयीं विशेष सांगतो - हेमाद्रींत शंख - " उत्पत्तीचे ठायीं दानाचें फळ लक्षपट होतें , भ्रमणाचे ठायीं कोटिपट होतें , पतनाचे ठायीं शतकोटिपट होतें , आणि पाताचे ठायीं दान केलेलें अक्षय होतें . " वरील उत्पत्त्यादि शब्दांचा अर्थ ज्योतिः शास्त्रांत सांगतात - " व्यतीपाताच्या पहिल्या बावीस घटिका उत्पत्ति होय , पुढच्या एकवीस घटिका भ्रमण , त्याच्या पुढें दहा घटिका पतन , पुढें सात घटिका पतित , शेवटच्या दोन घटिका व्यतीपात , ते पूर्वीं सांगितले आहेत . हेमाद्रींत मार्केंडेय - " ज्या दिवशीं आपल्या घरीं वेदवेत्ता अग्निचयन केलेला असा श्रोत्रिय ब्राह्मण येईल त्या एका ब्राह्मणावरही श्राद्ध करावें , तो दिवस विषुवायनसंक्रांतीप्रमाणें शुभकारक आहे . " हें श्राद्ध अपिंडक करावें , असें हेमाद्रि सांगतो . हें श्राद्ध जिवत्पितृकानेंही करावें . कारण , " विवाह , पुत्रोत्पत्ति , पितरांची इष्टि , सोमयाग , गयादि तीर्थ , आणि वेदवेत्ता ब्राह्मण घरीं येणें , हे सहा काळ पिता जीवंत असतां मुलांस श्राद्ध करण्याविषयीं सांगितले आहेत . " असें मैत्रायणीयपरिशिष्टांत सांगितलें आहे .

तिथिविशेषेफलविशेषोयाज्ञवल्क्येनोक्तः कन्यांकन्यावेदिनश्चपशून्वैसत्सुतानपि द्यूतंकृषिंचवाणिज्यंद्विशफैकशफांस्तथा ब्रह्मवर्चस्विनः पुत्रान् ‍ स्वर्णरौप्येसकुप्यके ज्ञातिश्रैष्ठ्यंसर्वकामानाप्नोतिश्राद्धदः सदा प्रतिपत्प्रभृतिष्वेकांवर्जयित्वाचतुर्दशीं एताः कृष्णपक्षस्थाएव महालयेतुफलभूमेतिपृथ्वीचंद्रोदयः पौर्णमास्यांहेमाद्रौपितामहः अमावास्याव्यतीपातपौर्णमास्यष्टकासुच विद्वान् ‍ श्राद्धमकुर्वाणोनरकंप्रतिपद्यते एतन्माघ्यादिपरम् ‍ व्रीहिपाकेचकर्तव्यंयवपाकेचपार्थिव पौर्णमासीतथामाघीश्रावणीचनृपोत्तम प्रौष्ठपद्यामतीतायांतथाकृष्णत्रयोदशी एतांस्तुश्राद्धकालान्वैइनित्यानाहप्रजापतिरितिविष्णुधर्मोक्तेः विष्णुः माघीप्रौष्ठपद्यूर्ध्वंकृष्णात्रयोदशीति अत्रमाघीपौर्णमासीतिकल्पतरुः श्रावण्यूर्ध्वमपिमघायोगसंभवात्रयोदशी विशेषणमितिगौडाः नक्षत्रेष्वपियाज्ञवल्क्यः स्वर्गंह्यपत्यमोजश्चशौर्यंक्षेत्रंबलंतथा पुत्रान् ‍ श्रैष्ठ्यंचसौभाग्यंसमृद्धिंमुख्यतांशुभम् ‍ प्रवृत्तचक्रतांवातिवाणिज्यप्रभृतीनपि अरोगित्वंयशोवीतशोकतांपरमांगतिं धनंवेदान् ‍ भिषक् ‍ सिद्धिंकुप्यंगामप्यजाविकं अश्वानायुश्चविधिवद्यः श्राद्धंसंप्रयच्छति कृत्तिकादिभरण्यंतंसकामान् ‍ प्राप्नुयादिमान् ‍ फलांतराण्यपिमहाभारतकौर्मादेर्ज्ञेयानि माधवीयेमरीचिः कृत्तिकादिषुऋक्षेषुश्राद्धेयत् ‍ फलमीरितम् ‍ विष्कंभादिषुयोगेषुतदेवफलमिष्यते बृहस्पतिः आरोग्यंचैवसौभाग्यंशत्रूणांचपराजितं सर्वान् ‍ कामान् ‍ प्रियांविद्यांधनमायुर्यथाक्रमम् ‍ सूर्यादिदिवसेष्वेतच्छ्राद्धकृल्लभतेफलं बवादिकरणेष्वेतत् ‍ श्राद्धकृल्लभतेफलम् ‍ अन्यानिचषण्णवतिश्राद्धादीनिप्रागुक्तानि मार्कंडेयपुराणे श्राद्धार्हद्रव्यसंपत्तौतथादुः स्वप्नदर्शने जन्मर्क्षेग्रहपीडासुश्राद्धंकुर्वीतचेच्छया ॥

विशेष तिथीला विशेष फल याज्ञवल्क्य सांगतो - " कन्या , कन्यापाणिग्रहण करणारे पशु ( गाई वगैरे ) उत्तम पुत्र , द्यूत कौशल , कृषि ( शेतकी ), व्यापार , द्विशफ ( दोन गेळांचे पशु गोमहिष्यादिक ), एकशफ ( अश्वादिक ), ब्रह्मवर्चस्वी ( वेदाध्ययनसंपन्न ) पुत्र , सोनें , रुपें , सोन्यारुप्यावांचून इतर द्रव्य , ज्ञातींमध्यें श्रेष्ठपणा , आणि इच्छित सर्व काम , हे अनुक्रमानें प्राप्त होतात . एक चतुर्दशी वर्ज्य करुन प्रतिपदेपासून चवदा तिथींच्या श्राद्धांचें वेगवेगळें हें फल समजावें , " ह्या तिथि कृष्णपक्षांतीलच होत . महालयाचें तर फल फार मोठें आहे , असें पृथ्वीचंद्रोदय सांगतो . पौर्णमासीविषयीं हेमाद्रींत पितामह सांगतो - " अमावास्या , व्यतीपात , पौर्णमासी , आणि अष्टका यांचेठायीं श्राद्ध न करणारा विद्वान ( जाणता नरकास जातो . " हें जें पौर्णमासीला श्राद्ध सांगितलें तें माघ्यादि पौर्णमासीला समजावें . कारण , " व्रीहि ( शालि ) पिकले , म्हणजे श्राद्ध करावें . जव पिकले म्हणजे श्राद्ध करावें आणि माघीपौर्णमासी , श्रावणीपौर्णमासी , तशीच प्रौष्ठपदीच्या पुढची कृष्णत्रयोदशी , हे श्राद्धकाल नित्य आहेत , असें प्रजापति सांगतो . " असें विष्णुधर्मांत सांगितलें आहे . विष्णु - " माघी व प्रौष्ठपदीच्या पुढची कृष्णत्रयोदशी , श्राद्धकाल आहे . " या वाक्यांत माघी म्हणजे माघांतील पौर्णमासी समजावी , असें कल्पतरु सांगतो . श्रावणी पौर्णिमेच्या पुढच्याही त्रयोदशीला मघानक्षत्रयोगाचा संभव असल्यामुळें माघी हें त्रयोदशीचें विशेषण करावें , असें गौड सांगतात . नक्षत्रांविषयींही याज्ञवल्क्य सांगतो - " स्वर्ग , अपत्य , ओज ( तेज ), शौर्य क्षेत्र , बळ , पुत्र , श्रेष्ठपणा , सौभाग्य , समृद्धि , मुख्यपणा , कल्याण , अप्रतिहित आज्ञा , व्यापार वगैरे , रोगराहित्य , यश , शोकराहित्य , परमगति , धन , वेद , वैद्यकी , सोन्यारुप्यावांचून इतर द्रव्य , गाई , शेळ्या , मेंढ्या , अश्व , आणि आयुष्य हीं सत्तावीस ; कृत्तिकांपासून भरणीपर्यंत वेगवेगळ्या नक्षत्रावर श्राद्धाचीं अनुक्रमानें फळें समजावींत . " दुसरीं देखील फळें महाभारत , कूर्मपुराण इत्यादिकांतून जाणावीं . माधवीयांत मरीचि - " कृत्तिकादि नक्षत्रांवर श्राद्ध केलें असतां जें फळ सांगितलें , तेंच विष्कंभादि योगांवर श्राद्धाचें फळ समजावें . " बृहस्पति - " आरोग्य , सौभाग्य , शत्रुपराभव , सर्वमनोरथप्राप्ति , आवडती विद्या , धन , आणि आयुष्य , हीं सात ; सूर्यादि वारांचेठायीं श्राद्धकरणाराला अनुक्रमानें फळें प्राप्त होतात . आणि बवादिकरणाचेठायीं श्राद्ध करणारालाही हींच फळें प्राप्त होतात . " दुसरीं षण्णवति ( ९६ ) श्राद्धें वगैरे पूर्वीं सांगितलीं आहेत . मार्केंडेय पुराणांत सांगतो - " श्राद्धाला योग्य द्रव्यें प्राप्त झालीं असतां , दुष्ट स्वप्न पडलें असतां , जन्मनक्षत्र प्राप्त झालें असतां , ग्रहांची पीडा झाली असतां , इतक्यावेळीं आपल्या इच्छेनें ( कोणाच्या अनुज्ञेवांचून ) श्राद्ध करावें . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:20.7400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दैनंदिनी

 • ना. डायरी , दिनदर्शिका , रोजनिशी . 
RANDOM WORD

Did you know?

कापूर जाळण्यामागची संकल्पना काय? कांही फायदे आहेत काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.