मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
प्रेताचे पिंड

तृतीय परिच्छेद - प्रेताचे पिंड

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां प्रेताचे पिंड सांगतो -

अथप्रेतपिंडः यद्यपिहेमाद्रौपारस्करेण ब्राह्मणेदशपिंडास्तुक्षत्रियेद्वादशस्मृताः वैश्येपंचदशप्रोक्ताः शूद्रेत्रिंशत्प्रकीर्तिताइत्युक्तं तथापि प्रेतेभ्यः सर्ववर्णेभ्यः पिंडान्दद्याद्दशैवत्वितितेनैवोक्तेः सर्वेषांदशैवज्ञेयाः मदनरत्नेप्येवं तथाचहेमाद्रौब्राह्मपाद्मयोः जात्युक्ताशौचतुल्यांस्तुवर्णानांक्कचिदेवहि देशधर्मान्पुरस्कृत्यप्रेतपिंडान्वपंत्यपीत्युक्त्वाविप्रान्येषुदशमपिंडोत्कर्षउक्तः देयस्तुदशमः पिंडोराज्ञांवैद्वादशेहनि वैश्यानांवैपंचदशेदेयस्तुदशमस्तथा शूद्रस्यदशमः पिंडोमासेपूर्णेह्निदीयतेइति युद्धमृतादेः सद्यः शौचेत्र्यहादौचतेनैवोक्तं सद्यः शौचेप्रदातव्याः सर्वेपियुगपत्तथा त्र्यहाशौचेप्रदातव्यः प्रथमेह्नयेकएवहि द्वितीयेहनिचत्वारस्तृतीयेपंचचैवहि त्र्यहेप्रकारांतरंप्रागुक्तं शातातपः आशौचस्यचह्नासेपिपिंडान्दद्याद्दशैवतु तत्रैकपात्रेसकृत्पक्त्वादशपिंडान्दद्यात् उत्तरीयशिलापात्रकर्तृद्रव्यविपर्यये पूर्वदत्ताञ्जलीन्दद्यात्पूर्वपिंडांस्तथैवचेति गृह्यकारिकायांपात्रविपर्ययेदोषोक्तेः शिलाविपर्ययेघटस्फोटादेर्नावृत्तिः अक्षाभ्यंजनादिपदकर्मणः एकहायनीनयनवदप्रयोजकत्वात् तद्वच्चात्रलौकिकग्रहणं केचित्तु नवान्यादायभांडानिआरुकंचरुकंतथेतिप्रचेतसोक्तेः पात्रानेकत्वमाहुः क्रियाकर्तुर्नाशेन्येनशेषः समापनीयः एवंक्रियाप्रवृत्तानांयदिकश्चिद्विपद्यते तद्वंधुनाक्रियाकार्यासर्वैर्वासहकारिभिरितिशुद्धितत्त्वेबृहस्पतिस्मृतेः पत्न्याः कर्तृत्वेरजोदर्शनेचतदंतेकुर्यात् शावाद्दिगुणमार्तवमित्युक्तेः आशौचांतेआर्तवेकर्तुरस्वास्थ्येवान्येनक्रियासर्वावर्तनीया कर्तुर्विपर्ययात् कालातिक्रमयोगाच्च ।

जरी हेमाद्रींत पारस्करानें - " ब्राह्मणाला दहा पिंड , क्षत्रियाला बारा , वैश्याला पंधरा आणि शूद्राला तीस पिंड सांगितले आहेत " असें सांगितलें तरी - " सर्व जातीच्या प्रेतांना दहाच पिंड द्यावे " असें त्यानेंच ( पारस्करानें ) सांगितल्यावरुन सर्वांना दहाच पिंड समजावे . मदनरत्नांतही असेंच आहे . तसेंच हेमाद्रींत ब्राह्मांत पाद्मांत - " जातीला सांगितलेल्या आशौचदिवसाइतके पिंड क्षत्रियादिकांना क्वचितच ठिकाणीं देतात . देशधर्मांना अनुसरुनही प्रेतपिंड देतात " असें सांगून ब्राह्मणव्यतिरिक्तांना दहावा पिंड शेवटच्या दिवशीं सांगितला तो असा - " क्षत्रियांना दहावा पिंड बाराव्या दिवशीं द्यावा . वैश्यांना दहावा पिंड पंधराव्या दिवशीं द्यावा . शूद्रांना दहावा पिंड महिना पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशीं द्यावा . " युद्धांत मृताचें वगैरे सद्यः शौच असतां व तीन दिवसांचें वगैरे आशौच असतांही त्यानेंच सांगितलें आहे - " सद्यः शौचांत सारे पिंड एकदम द्यावे . तीन दिवसांचे आशौचांत पहिल्या दिवशीं एकच पिंड द्यावा . दुसर्‍या दिवशीं चार द्यावे . तिसर्‍या दिवशीं पांच द्यावे . " तीन दिवसांचे आशौचांत दुसरा प्रकार पूर्वीं ( अनुपनीताशौचप्रकरणीं ) सांगितला आहे . शातातप - " आशौच कमी असलें तरी पिंड दहाच द्यावे . " त्या ठिकाणीं एका पात्रांत एकवार पाक करुन दहा पिंड द्यावे . कारण , " उत्तरीयवस्त्र , उदकदान , शिला , पात्र , कर्ता , द्रव्य ( तांदूळ वगैरे ) यांचा विपर्यास ( बदल ) झाला असतां पूर्वीं दिलेले उदकांजलि , व पूर्वीं दिलेले पिंड द्यावे . " असा गृह्यकारिकेंत पाकपात्राच्या विपर्यासाविषयीं दोष सांगितला आहे . शिलेचा विपर्यय झाला तरी घटस्फोटादिकाची आवृत्ति नाहीं . कारण , जसें - ज्योतिष्टोमांत सोमक्रयाविषयीं सांगितलें आहे - ‘ एकहायन्या क्रीणाति ’ म्हणजे एक वर्षाच्या गाईनें सोम विकत घ्यावा . सोम विकत घेण्यासाठीं एक वर्षाची ती गाई आणतेवेळीं अध्वर्यूनें तिच्या मागांहून जाऊन तिचें सातवें पद अंजलीनें धरुन तत्संबंधी धूळ घेऊन ती अंजनांत मिश्र करुन सोम आणण्याच्या शकटाचे आंखांत तें अंजन घालावें , असें सांगितलें आहे . तेथें सोमक्रमाकरितां जसें गाईचें आनयन तसें आंखांचें अंजनरुप जें पदकर्म त्याकरितांही गाईचें आनयन आहे , म्हणून तें पदकर्म आनयनाचें प्रयोजक झालें , असें पूर्वपक्षी ( शंकाकार ) म्हणतो . सिद्धांतकर्ता असें सांगतो - ‘ एकहायन्या क्रीणाति ’ या वरील वचनांत ‘ एकहायन्या ’ या तृतीयाविभक्तीनें सोम विकत घेण्याकरितांच गाईचें आनयन सूचित झालें आहे , म्हणून आनयनाचा प्रयोजक सोमक्रयच आहे . गाईचें आनयन ( आणणें ) पदकर्माकरितां कोठेंही वेदांत नाहीं , म्हणून तें पदकर्म अप्रयोजक आहे . तसा - येथें घटस्फोट शिलेचा अप्रयोजक आहे , म्हणून लौकिकशिला ग्रहण करावी . केचित् ग्रंथकार तर - " आरुक व चरुक अशीं नवीं भांडीं ग्रहण करुन " ह्या प्रचेतसाचे वचनावरुन पात्रें अनेक असावीं , असें सांगतात . क्रियाकर्त्याचा नाश झाला असतां अन्यानें शेषक्रिया समाप्त करावी . कारण , " याप्रमाणें क्रियेविषयीं प्रवृत्त झालेल्यामध्यें जर कोणी मृत होईल तर त्याच्या बंधूनें क्रिया करावी . अथवा सहकारी जे सर्व त्यांनीं क्रिया करावी " अशी शुद्धितत्त्वांत बृहस्पतिस्मृति आहे . स्त्री कर्त्री असून ती रजस्वला झाली असतां शुद्ध झाल्यावर तिनें क्रिया करावी . कारण , ‘ मृताशौचाहून आर्तवदोष दुप्पट आहे ’ असें पूर्वीं सांगितलें आहे . आशौचसमाप्तीच्या दिवशीं स्त्री कर्त्री असून तिला आर्तव असतां अथवा कर्त्याची प्रकृति बिघडली असतां इतरानें सर्व क्रियेची आवृत्ति करावी . कारण , कर्त्याचा विपर्यय ( बदल ) झाला आहे . शुद्ध झाल्यावर किंवा प्रकृति स्वस्थ झाल्यावर क्रिया करावी , असें म्हटलें तर क्रियेच्या कालाचा अतिक्रमही होईल .

वाराहे स्थंडिलेप्रेतभागंतुदद्यात्पूर्वाह्णएवतु कृत्वातुपिंडसंकल्पंनामगोत्रेणसुंदरि मरीचिः प्रेतपिंडंबहिर्दद्याद्दर्भमंत्रविवर्जितं प्रागुदीच्यांचरुंकृत्वास्नातः प्रयतमानसः दर्भवर्जनमनुपनीतपरं असंस्कृतानांभूमौपिंडं दद्यात्संस्कृतानांकुशेष्वितिप्रचेतसोक्तेः मिताक्षरायांस्मृत्यंतरे भूमौमाल्यंपिंडंपानीयमुपलेवादद्युः हारीतः अक्लृप्तचूडायेबालायेचगर्भाद्विनिः सृताः मृताअनुपनीतायेअनूढाअपिकन्यकाः येमृताश्चाप्य संस्कारास्तेभ्योभूमौप्रदीयते पैठीनसिः शालीनांसक्तुभिर्वापिपिण्याकैर्वापिनिर्वपेत् शुनः पुच्छः फलमूलैश्चपयसाशाकेनचगुडेनच तिलमिश्रंतुदर्भेषुपिंडंदक्षिणतोहरेत् तूष्णींप्रसेकंपुष्पंचधूपंदीपंतथैवच शालीनांसक्तुभिर्वापिशाकैर्वाप्यथनिर्वपेत् प्रथमेहनियद्द्रव्यंतदेवस्याद्दशाहिकं मदनरत्नेमात्स्ये तैजसंमृन्मयं वाथपात्रंसंशोध्ययत्नतः लौकिकाग्नावधिश्रित्यपचेदन्नंघृतप्लुतं स्नात्वाथतिलसंमिश्रंप्रदद्याद्दर्भसंस्तरे ।

वाराहांत - " प्रेताच्या नामगोत्रानें पिंडाचा संकल्प करुन पूर्वाह्णींच स्थंडिलाचे ठायीं प्रेताला भाग ( पिंड ) द्यावा . " मरीचि - " स्नान करुन स्वच्छ होऊन ईशान्यदिशेस चरु शिजवून दर्भ व मंत्रवर्जित असा प्रेतपिंड बाहेर द्यावा . " दर्भवर्जित सांगितला तो मौंजी न झालेल्याविषयीं समजावा . कारण , " मौंजीसंस्कार न झालेल्यांस भूमीवर पिंड द्यावा . संस्कार झालेल्यांस कुशांवर पिंड द्यावा " असें प्रचेतसाचें वचन आहे . मिताक्षरेंत स्मृत्यंतरांत - " भूमीवर किंवा दगडावर पुष्प , पिंड व पाणी द्यावें . " हारीत - " चूडाकरण न झालेले बालक , गर्भापासून गळालेले , मुंज झाल्यावांचून मृत , विवाह न झालेल्या कन्या , व जे संस्कार झाल्यावांचून मृत त्यांना भूमीवर पिंडादि देतात . " पैठीनसि - " तांदुळांचे पिठाचे किंवा पिण्याकाचे ( तिलकुटाचे ही ) पिंड द्यावे . " शुनः पुच्छ - " फलें , मुलें , दूध , शाक , गूळ यांचा पिंड तिलमिश्र करुन दक्षिणेकडे दर्भांवर द्यावा . उदक , पुष्प , धूप , दीप हे मंत्ररहित द्यावे . शालींच्या पिठाचे अथवा शाकांचे पिंड द्यावे . प्रथम दिवशीं पिंडांचें जें द्रव्य असेल तेंच द्रव्य दहा दिवस असावें . " मदनरत्नांत मात्स्यांत - " ताम्रादि धातूंचें किंवा मातीचें पात्र उत्तम शुद्ध करुन लौकिकाग्नीवर चढवून त्यांत अन्न पचन करुन त्यांत घृत घालून नंतर स्नान करुन त्याचा तिलमिश्र पिंड दर्भमुष्टीवर द्यावा . "

शुद्धितत्त्वेदेवजानीयेच ब्राह्मे प्रथमेहनियोदद्यात्प्रेतायान्नंसमाहितः अन्नंनवसुचान्येषुसएवप्रददात्यपि मृन्मयंभांडमादायनवंस्नातः सुसंयतः तंडुलप्रसृतिंतत्रत्रिः प्रक्षाल्यपचेत्स्वयं सपवित्रैस्तिलैर्मिश्रंकृमिकेशविवर्जितं द्वारोपांतेततः क्षिप्त्वाशुद्धांवागौरमृत्तिकां भूपृष्ठेसंस्तरेदर्भान्याम्याग्रान्देशसंभवान् ततोऽवनेजनं दद्यात्संस्मरन्गोत्रनामनी तिलसर्पिर्मधुक्षीरैः संसिक्तंतप्तमेवहि दद्यात्प्रेतायपिंडंतुदक्षिणाभिमुखः स्थितः अर्घ्यैः पुष्पैस्तथाधूपैर्दीपैस्तोयैश्चशीतलैः ऊर्णातंतुमयैः शुद्धैर्वासोभिः पिंडमर्चयेत् दिवसेदिवसेदेयः पिंडएवंक्रमेणतु सद्यः शौचेप्रदातव्याः सर्वेपियुगपत्तथा त्र्यहाशौचेपिदातव्यास्त्रयः पिंडाः समाहितैः द्वितीयेचतुरोदद्यादस्थिसंचयनंतथा त्रींस्तुदद्यात्तृतीयेह्निवस्त्रादिक्षालयेत्ततः दशाहेपिचदातव्यः प्रथमेत्वेकएवहि एकस्तोयांजलिस्त्वेवंपात्रमेकंचदीयते द्वितीयेद्वौतृतीयेत्रीनित्याद्युक्त्वा एवंस्युः पंचपंचाशत्तोयस्यांजलयः क्रमात् तोयपात्राणितावंतिसंयुक्तानितिलादिभिरिति पात्रंकुंभः अत्राहः पदमहोरात्रपरं तेनरात्रावपिदेयइतिगौडाः दिवसपदाद्रात्रौनेतिमैथिलाः सएवेत्युक्तेः सपिंडेनदशपिंडेप्रक्रांतेपुत्रागमेपिसनदद्यात् असगोत्रः सगोत्रोवेतिप्रागुक्तेः दाहकर्तैवदशाहंकुर्यादितिमिताक्षरायां शुद्धितत्त्वेवायवीयेपि असगोत्रः सगोत्रोवायदिस्त्री यदिवापुमान् यश्चाग्निदाताप्रेतस्यपिंडंदद्यात्सएवहीति तत्रैव पूरकेणतुपिंडेनदेहोनिष्पद्यतेयतः कृतस्यकरणा योगात्पुनर्नावर्ततेक्रिया शुद्धिप्रकाशेवायवीयेपि निवर्तयतियोमोहात्क्रियामन्यनिवर्तिताम् विधिघ्नस्तेनभवतिपितृहाचोपजायते तस्मात्प्रेतक्रियायेनकेनापिचकृतायदि नतांनिवर्तयेत्प्राज्ञः सतांधर्ममनुस्मरन्निति आदिपुराणे पितृशब्दंस्वधांचैवनप्रयुंजीतकर्हिचित् अनुशब्दंतथाचेहप्रयत्नेनविवर्जयेत् उपतिष्ठतामयंपिंडः प्रेतायेतिसमुच्चरेत् क्रियानिबंधे व्यासः प्रेतायपिंडंदत्वातुततोश्नीयाद्दिनात्यये भविष्ये ओदनामिषसक्तूनांशाकमूलफलादिषु प्रथमेहनियद्दद्यात्तद्दद्यादुत्तरेहनि गृहद्वारिश्मशानेवातीर्थेदेवगृहेपिवा यत्राद्येदीयतेपिंडस्तत्रसर्वंसमापयेत् ।

शुद्धितत्त्वांत देवजानीयांत ब्राह्मांत - " प्रथम दिवशीं प्रेताला जो मनुष्य अन्न देईल त्यानेंच इतर नऊ दिवस अन्न ( पिंडादि ) द्यावें . स्नान करुन नियमित होऊन मातीचें भांडें नवें घेऊन त्यांत एक पसा तांदूळ तीन वेळां धुवून स्वतः ( कर्त्यानें ) शिजवावे . त्यांत कृमि व केश असूं नयेत . व पवित्रकें आणि तिल असावेत . तदनंतर घराच्या द्वारदेशांत शुद्ध माती किंवा गौर माती ( गोपीचंदन ) भुईवर ठेऊन तिजवर दक्षिणेकडे अग्रें केलेले आपल्या देशांत उत्पन्न असे दर्भ ठेऊन नंतर मृताचे गोत्रनांवांचें स्मरण करुन दक्षिणदिशेच्या समोर राहून पाद्योदक द्यावें . तिल , तूप , मध व दूध यांनीं मिश्रित असा ऊनऊन पिंड करुन तो प्रेताला द्यावा . नंतर अर्घ्यै , पुष्पें , धूप , दीप , शीत उदक , आणि शुद्ध अशीं ऊर्णावस्त्रें यांनीं पिंडाची पूजा करावी . या क्रमानें प्रतिदिवशीं पिंड द्यावा . सद्यः शौचांत सारेही पिंड एकदम द्यावे . तीन दिवसांचे आशौचांत पहिल्या दिवशीं तीन पिंड द्यावे . दुसर्‍या दिवशीं चार द्यावे . आणि अस्थिसंचयन श्राद्धही करावें . तिसर्‍या दिवशीं तीन पिंड द्यावे . नंतर वस्त्रादिकांचें क्षालन करावें . दहा दिवसांचे आशौचांत प्रथमदिवशीं एकच पिंड द्यावा . तसाच एक उदकांजलि द्यावा . व एक पात्र द्यावें . दुसर्‍या दिवशीं दोन उदकांजलि , तिसर्‍या दिवशीं तीन उदकांजलि , ‘ असें सांगून ’ अनुक्रमानें उदकांजलि एकंदर पंचावन्न होतात . तितकींच उदकाचीं पात्रें तिलादिकांनीं युक्त अशीं द्यावीं . " येथें पात्रें म्हणजे कुंभ समजावे . ह्या वरील वचनांत ‘ अहः ’ हें पद दिवसरात्रीचें बोधक आहे , म्हणून रात्रीं देखील द्यावा , असें गौड सांगतात . वरील वचनांत ‘ दिवसे दिवसे ’ असें आहे , म्हणून रात्रीं देऊं नये , असें मैथिल सांगतात . ह्या वरील वचनांत ‘ पहिल्या दिवशीं देईल त्यानेंच इतर नऊदिवस द्यावें ’ असें सांगितल्यावरुन सपिंड पुरुषानें दशाह पिंड देण्यास आरंभ केला असतां नंतर पुत्र आला तरी त्या पुत्रानें देऊं नये . कारण , ‘ असगोत्र किंवा सगोत्र असेल त्यानेंच द्यावे ’ असें पूर्वीं ( अंत्यकर्मारंभीं गृह्यपरिशिष्टवचन ) सांगितलें आहे . दाहकर्त्यानेंच दशाहकर्म करावें , असें मिताक्षरेंत सांगितलें आहे . शुद्धितत्त्वांत वायवीयांतही - " असगोत्रांतील किंवा सगोत्रांतील , स्त्री असो किंवा पुरुष असो जो प्रेताला अग्नि देईल त्यानेंच प्रेताला पिंडही द्यावे . " तेथेंच - " ज्या कारणास्तव पूरकपिंडानें देह निष्पन्न होतो , एकदां केलेलें पुनः करणें होत नाहीं , म्हणून क्रियेची आवृत्ति होत नाहीं . " शुद्धिप्रकाशांत वायवीयांतही - " जो मनुष्य अन्यानें केलेली क्रिया अविचारानें पुनः करितो त्या करण्यानें तो विधिघातक होतो व पितृघातकही होतो . तस्मात् कारणात् कोणीही क्रिया केली असली तरी संतांचा धर्म स्मरन करुन ती क्रिया पुनः करुं नये . " आदिपुराणांत - " येथें ‘ पितृ ’ शब्द आणि ‘ स्वधा ’ शब्द यांचा कधींही उच्चार करुं नये . आणि ‘ अनु ’ शब्द प्रयत्नानें वर्ज्य करावा . ‘ प्रेताय अयं पिंड उपतिष्ठतां ’ असा उच्चार करावां . " क्रियानिबंधांत व्यास - " प्रेताला पिंड देऊन नंतर दिवसाचे अंतीं भोजन करावें . " भविष्यांत - " भात , आमिष , सातू , शाक , मूळें , फलें , यांतील पहिल्या दिवशीं जे देईल तें पुढच्या दिवसांत द्यावें . घराच्या द्वारांत , अथवा श्मशानांत , किंवा तीर्थाचे ठिकाणीं किंवा देवालयांत ज्या ठिकाणीं प्रथम दिवशीं पिंड दिला असेल त्या ठिकाणीं सर्व दशाहकृत्य समाप्त करावें . "

ब्राह्मे शिरस्त्वाद्येनपिंडेनप्रेतस्यक्रियतेसदा द्वितीयेनतुकर्णाक्षिनासिकाश्चसमासतः गलांसभुजवक्षांसितृतीयेनयथाक्रमं चतुर्थेनतुपिंडेननाभिलिंगगुदानिच जानुजंघेतथापादौपंचमेनतुसर्वदा सर्वमर्माणिषष्ठेनसप्तमेनतुनाडयः दंतलोमान्यष्टमेनवीर्यंतुनवमेनच दशमेनतुपूर्णत्वंतृप्तताक्षुद्विपर्ययइति याज्ञवल्क्येनतु पिंडयज्ञावृतादेयंप्रेतायान्नंदिनत्रयमित्युक्तं अत्रफलतारतम्यंज्ञेयमितिविज्ञानेश्वरः तेनत्र्यहाशौचपरत्वंदेवयाज्ञिकोक्तंचिंत्यं आशौचस्यचहासेपिपिंडान्दद्याद्दशैवत्वितिवचनाच्च दिनत्रयावश्यकत्वार्थमितिहारलतादयः ।

ब्राह्मांत - " पहिल्या पिंडानें प्रेताचें मस्तक उत्पन्न होतें . दुसर्‍या पिंडानें कान , डोळे , व नाक हीं नियमानें होतात . तिसर्‍या पिंडानें गळा , स्कंध , भुज , आणि वक्षस्थळ हीं उत्पन्न होतात . चवथ्या पिंडानें नाभि , लिंग व गुद हीं होतात . पांचव्या पिंडानें गुडघे , जांघा आणि पाय हे होतात . सहाव्या पिंडानें शरीरांतील सारीं मर्मै उत्पन्न होतात . सातव्या पिंडानें नाडी होतात . आठव्या पिंडानें दांत व लोम होतात . नवव्या पिंडानें वीर्य ( शुक्र ) उत्पन्न होतें . दहाव्या पिंडानें सर्व परिपूर्णता , तृप्ति , क्षुधा व क्षुधानाश हीं होतात . " याज्ञवल्क्यानें तर - " पिंडयज्ञाच्या रीतीनें प्रेताला तीन दिवस अन्न द्यावें " असें सांगितलें आहे . ह्या वचनांत फलाचें तारतम्य जाणावें , म्हणजे अधिक दिवस दिलें असतां अधिक फल अल्पदिवस दिलें असतां अल्पफल , असें विज्ञानेश्वर सांगतो . अर्थात् हें वचन पिंडातिरिक्त अन्नविषयक आहे . तेणेंकरुन , तीन दिवसांचे आशौचाविषयीं हें वचन आहे , असें देवयाज्ञिकानें सांगितलें तें चिंत्य ( युक्तिशून्य ) आहे . आणि " आशौच कमी झालें तरी पिंड दहाच द्यावे " असेंही वचन आहे . याज्ञवल्क्यवचनांत दहा पिंड द्यावे , असें नाहीं , म्हणून दशाहाशौच विषयक म्हणतां येत नाहीं . तीन दिवस अन्न अवश्य द्यावें , असें सांगण्याकरितां हें वचन आहे , असें हारलता इत्यादि ग्रंथकार सांगतात .

शातातपः जलमेकाहमाकाशेस्थाप्यंक्षीरंचमृन्मये पारस्करः मृन्मयेतांरात्रिंक्षीरोदकेविहायसिनिदध्युः प्रेतात्रस्नाहीत्युदकंपिबचेदमितिक्षीरं इदंरात्रावेवेतिगौडाः गारुडेतु अपक्केमृन्मयेपात्रेदुग्धंदद्याद्दिनत्रयमित्युक्तं हेमाद्रौपाद्मेतुदशाहमुक्तं तस्मान्निधेयमाकाशेदशरात्रंपयोजलं सर्वतापोपशांत्यर्थमध्वश्रमविनाशनं देवजानीयेकारिकायां तत्रप्रेतोपकृतयेदशरात्रमखंडितं कुर्यात्प्रदीपंतैलेनवारिपात्रंच मार्तिकं भोज्याद्भोजनकालेतुभक्तमुष्टिंचनिर्वपेत् नामगोत्रेणसंबुद्ध्याधरित्र्यांपितृयज्ञवत् शातातपः भूलोकात्प्रेतलोकंतुगंतुंश्राद्धंसमाचरेत् तत्पाथेयंहिभवतिमृतस्यमनुजस्यतु ।

शातातप - " एक दिवस उदक आकाशांत ठेवावें , आणि दूध मातीच्या भांड्यांत ठेवावें . " पारस्कर - त्या पहिल्या रात्रीं मातीच्या पात्रांत दूध व पाणी आकाशांत ठेवावें . तें असें - ‘ प्रेत , अत्र स्नाहि ’ असें म्हणून उद्क ठेवावें . ‘ पिब चेदं ’ असें म्हणून दूध ठेवावें . " हें रात्रींच ठेवावें , असें गौड सांगतात . गरुडपुराणांत तर - " अपक्व अशा मातीच्या पात्रांत तीन दिवस दूध द्यावें " असें सांगितलें आहे . हेमाद्रींत पाद्मांत तर दहा दिवस ठेवावें , असें सांगितलें आहे - " तस्मात् कारणात् सर्व तापाच्या शांतीकरितां व मार्गश्रमनाशाकरितां दहा दिवस आकाशांत दूध व पाणी ठेवावें . " देवजानीयांत कारिकेंत - " त्या ठिकाणीं प्रेताला उपकार होण्याकरितां दहा दिवस अखंडित तेलाचा दीप करावा . आणि उदकपात्र मातीचें ठेवावें . आणि भोजनकालीं अन्नांतून मूठभर भात घेऊन त्या प्रेताचे नामगोत्राचा संबुद्धीनें उच्चार करुन भूमीवर पितृयज्ञाप्रमाणें द्यावा . " शातातप - " मृत झालेल्या मनुष्याला भूलोकापासून प्रेतलोकास जाण्याकरितां श्राद्ध करावें , तें त्यास पाथेय ( मार्गांत प्राप्त ) होतें . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP