मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
ब्रह्मचारी मृत असतां

तृतीय परिच्छेद - ब्रह्मचारी मृत असतां

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां ब्रह्मचारी मृत असतां सांगतो -
अथब्रह्मचारिमृतौशौनकः ब्रह्मचारिमृतौरीतिंकथयामिसमासतः तत्रावकीर्णदोषस्यप्रायश्चित्तंप्रशांतये द्वादशाब्दंषडब्दंवात्र्यब्दंशक्त्याथवाचरेत् स्नातकोब्रह्मचारीचनिधनंप्राप्नुयाद्यदि संयोज्यचार्कविधिनासंयोज्यौतौततः परं देशकालौस्मृत्वा अमुकगोत्रामुकनाम्नोमृतस्यब्रह्मचारिणोव्रतविसर्गंकरिष्यइत्युक्त्वाहेम्नानांदीश्राद्धंकृत्वाग्निंप्रतिष्ठाप्याघारांतेचतसृभिर्व्याह्रतिभिरग्नयेव्रतपतयेव्रतानुष्ठानसंपादनायविश्वेभ्योदेवेभ्यश्चाज्यंहुत्वास्विष्टकृदादिसमाप्यपुनर्देशकालौस्मृत्वार्कविवाहंकरिष्य इत्युक्त्वाहेम्नानांदीश्राद्धंकृत्वार्कशाखांशवंचहरिद्रयालिप्त्वापीतसूत्रेणवस्त्रयुग्मेनचावेष्टयाग्निंप्रतिष्ठाप्याघारांतेग्नयेबृहस्पतयेविवाहविधियोजकायचयस्मैत्वंकामकामायेतिकामायव्याह्रतिभिश्चाज्यंहुत्वास्विष्टकृदादिसमाप्यार्कशाखांशवंचदहेत् विधानमालायां येषांकुलेब्रह्मचारीनिधनंप्राप्नुयाद्यदि तत् कुलंक्षयमाप्नोतिसोपिदुर्गतिमाप्नुयात् मृतस्यम्रियमाणस्य षडब्दंव्रतमादिशेत् त्रिंशद्भ्योब्रह्मचारिभ्योदद्यात् कौपीनकान्नवान्  हस्तमात्रान्कर्णमात्रान्दद्यात् कृष्णाजिनानिच पादुकाच्छत्रमाल्यानिगोपीचंदनमेवच मणिप्रवालमालाश्चभूषणादिसमर्पयेत् एवंकृतेविधानेचविघ्नः कोपिनजायते अत्रमूलंमृग्यम् ।

शौनक - “ ब्रह्मचारी मृत असतां संक्षेपानें व्यवस्था सांगतो - त्या ठिकाणीं प्रथमतः ब्रह्मचर्यव्रत नष्ट झाल्याबद्दलचें प्रायश्चित्त करावें. तें असें - द्वादशाब्द, षडब्द, त्र्यब्द अथवा आपल्या शक्तीप्रमाणें करावें. स्नातक ( समावर्तन करुन विवाहाला योग्य झालेला ) आणि ब्रह्मचारी हे जर मृत होतील तर त्यांचा अर्कविवाह करुन नंतर त्यांचा दाह करावा. ” त्याचा प्रकार - देशकालांचें संकीर्तन करुन अमुकगोत्रामुकनाम्नो मृतस्य ब्रह्मचारिणो व्रतविसर्गं करिष्ये ’ असा संकल्प करुन हिरण्यद्वारा नांदीश्राद्ध करुन अग्निप्रतिष्ठापन करुन आघारहोमाच्या अंतीं चार व्याह्रतिमंत्रांनीं आज्यहोम करुन व ‘ अग्नये व्रतपतये स्वाहा ’ ‘ अग्नये  व्रतानुष्ठानफलसंपादनाय स्वाहा ’ ‘ विश्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा ’ ह्या मंत्रांनीं तीन आज्याहुतींचा होम करुन स्विष्टकृदादिक सर्व समाप्त करुन पुनः देशकालांचें संकीर्तन करुन ‘ अर्कविवाहं करिष्ये ’ असा संकल्प करुन हिरण्यद्वारा नांदीश्राद्ध करुन रुईची शाखा व प्रेत यांना हळद लावून पिंवळ्या सूत्रानें आणि दोन वस्त्रांनीं गुंडाळून अग्निस्थापन करुन आघारहोमाच्या अंतीं ‘ अग्नये स्वाहा, बृहस्पतये स्वाहा, विवाहविधियोजकाय स्वाहा, यस्मै त्वं कामकामाय० ’ ह्या मंत्रानें, आणि व्यस्तसमस्तव्याह्रतींनीं आज्यहोम करुन स्विष्टकृदादिक सर्व होमकृत्य समाप्त करुन रुईची शाखा व प्रेत यांचा दाह करावा. ” विधानमालेंत - “ ज्यांच्या कुलांत ब्रह्मचारी मरेल तर तें कुल नाश पावतें आणि त्यालाही दुर्गति प्राप्त होते, म्हणून मृत झाल्यावर किंवा मरणार असतां षडब्दव्रत प्रायश्चित्त करावें. तीस ब्रह्मचार्‍यांना नवीं कौपीनें ( लंगोट्या ) द्यावीं, त्या लंगोट्या एक हात लांब किंवा ह्या कानाहून त्या कानाइतक्या लांब द्यावा. कृष्णाजिनें द्यावीं. खडावा, छत्रें व पुष्पें, गोपीचंदन, मणि, पोंवळीं यांच्या माला, आणि भूषणें इत्यादिक द्यावीं, असें विधान केलें असतां कोणतेंही विघ्न ( अरिष्ट ) होत नाहीं. ” याविषयीं मूल वचन सांपडत नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP