मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
शुद्ध श्राद्ध

तृतीय परिच्छेद - शुद्ध श्राद्ध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

आतां शुद्ध श्राद्ध सांगतो -

अथशुद्धश्राद्धं दिवोदासीये सपिंडीकरणादूर्ध्वंयावदब्दत्रयंभवेत् ‍ तावदेवनभोक्तव्यंक्षयेहनिकदाचन वर्षांतसपिंडनेप्येतत्तुल्यं मृताहनितुसंप्राप्तेयावदब्दचतुष्टयं बहिः श्राद्धंप्रकुर्वीतनकुर्याच्छ्राद्धभोजनं प्रथमेस्थीनिमज्जाचद्वितीयेमांसभक्षणं तृतीयेरुधिरंप्रोक्तंश्राद्धंशुद्धंचतुर्थकमितिश्राद्धकारिकोक्तेः शुद्धंकिंचिदितिज्ञेयं स्मृत्यंतरे सप्तत्रिंशच्चयोमासान् ‍ श्राद्धेभुंक्तेतमोहतः सपंक्तिदूषितः पापः प्रेताशीचभवेत्तुसः तत्रप्रथमेब्देवर्षांतसपिंडनपक्षेमृताहात्पूर्वेह्निसपिंडनमब्दपूर्तिश्राद्धंचकृत्वापरेद्युर्वार्षिकंकुर्यादितिस्मृत्यर्थसारेउक्तं हेमाद्रिस्तुमृताहेसपिंडीकरणेनैववार्षिकसिद्धिः पूर्णेसंवत्सरेपिंडः षोडशः परिकीर्तितः तेनैवचसपिंडत्वंतेनैवाब्दिकमिष्यतइतिवचनादित्याह इदमेवयुक्तं ।

दिवोदासीयांत - " सपिंडीकरणानंतर तीन वर्षै होत तोंपर्यंत वार्षिकश्राद्धांत कधींही भोजन करुं नये . " वर्षांतीं सपिंडीकरण असतांही हा निषेध सारखाच ( तीन वर्षै पुढें ) आहे . कारण , " चार वर्षै होतपर्यंत मृतदिवस प्राप्त असतां बाहेर श्राद्ध करावें , व त्या श्राद्धांत भोजन करुं नये . प्रथमवर्षीं अस्थि व मज्जा , दुसर्‍या वर्षीं मांस आणि तिसर्‍या वर्षी रक्त भक्षण केल्यासारखें होतें . चवथें श्राद्ध किंचित् ‍ शुद्ध होय " असें श्राद्धकारिकेंत वचन आहे . इतर स्मृतींत - ‘‘ अज्ञानानें नष्टबुद्धि असलेला जो मनुष्य मृतमासापासून सदतीस मासपर्यंत श्राद्धांचे ठायीं भोजन करितो , तो पापी , प्रेतभक्षी व पंक्तिदूषित होतो . " तेथें प्रथमवर्षीं वर्षांतीं सपिंडीकरण या पक्षीं मृतदिवसाच्या पूर्वदिवशीं सपिंडीकरण आणि अब्दपूर्तिश्राद्ध करुन दुसर्‍या दिवशीं वार्षिक करावें , असें स्मृत्यर्थसारांत उक्त आहे . हेमाद्रि तर - मृतदिवशीं सपिंडीकरणानेंच वार्षिकाची सिद्धि होते ; कारण , " पूर्ण संवत्सर झालें असतां सोळावा पिंड सांगितला त्यानेंच सपिंडत्व ( सपिंडीकरण ) आणि आब्दिक होतें " असें वचन आहे , असें सांगतो . हेंच युक्त आहे .

आतां क्षयाहाचें ( मृत दिवसाचें ) अज्ञान असतां सांगतो -

अथक्षयाहाज्ञानेमरीचिः श्राद्धविघ्नेसमुत्पन्नेअविज्ञातेमृतेहनि एकादश्यांतुकर्तव्यंकृष्णपक्षेविशेषतः इत्युक्तेः शुक्लैकादश्यामपि बृहस्पतिः नज्ञायतेमृताहश्चेत्प्रमीतेप्रोषितेसति मासश्चेत्प्रतिविज्ञातस्तद्दर्शेस्यादथाब्दिकं दिनमासौनविज्ञातौमरणस्ययदापुनः प्रस्थानमासदिवसौग्राह्यौपूर्वोक्तयादिशा मदनरत्नेभविष्ये मृताहंयोनजानातिमानवोविनतात्मज तेनकार्यममावास्यांश्राद्धंसांवत्सरसदा दिनमेवतुजानातिमासंनैवतुयोनरः मार्गशीर्षेतथाभाद्रेमाघेवातद्दिनंभवेत् ‍ निर्णयामृतेतु यदामासोनविज्ञातोविज्ञातंदिनमेवतु तदाचाषाढकेमासिमाघेवातद्दिनंभवेत् ‍ इतिबृहस्पतिस्मृतेराषाढोप्युक्तः कालादर्शेपि मासाज्ञानेदिनज्ञानेकार्यमाषाढमाघयोरित्युक्तं हेमाद्रौप्रभासखंडे मृताहंयोनजानातिमासंवापिकथंचन तेनकार्यममावास्यांश्राद्धंमाघेऽथमार्गके भविष्ये मृतवार्ताश्रुतेर्ग्राह्यौतौपूर्वोक्तक्रमेणतु पूर्वोक्तेतिप्रस्थानदिनाज्ञानेमासज्ञानेचतद्दर्शे मासाज्ञानेदिनज्ञानेचमार्गादावितिवच्छ्रवणदिनेपिज्ञेयमित्यर्थः श्रवणदिनमासाज्ञानेमाघमार्गदर्शेकार्यं पूर्वोक्तप्रभासखंडात् ‍ अतोत्रलोपइतिशूलपाण्युक्तंहेयं तिथितत्त्वेयमः गतस्यनभवेद्वार्तायावद्दादशवार्षिकी प्रेतावधारणंतस्यकर्तव्यंसुतबांधवैः यन्मासियदहर्यातस्तन्मासितदहः क्रिया विनाज्ञानंकुहूस्तस्यआषाढस्याथवाकुहूः ।

मरीचि - " कोणत्याही कारणानें श्राद्धाला विघ्न उत्पन्न झालें असतां आणि मृतदिवसाचें अज्ञान असतां विशेषेंकरुन कृष्णपक्षाच्या

एकादशीस तें श्राद्ध करावें . " या वचनांत विशेषेंकरुन असें म्हटल्यावरुन शुक्लएकादशीसही करावें . बृहस्पति - " प्रवासांत मृत असतां मृतदिवसाचें ज्ञान नसून महिन्याचें ज्ञान असेल तर त्या महिन्याच्या अमावास्येस वार्षिक श्राद्ध करावें . जेव्हां मरणदिवस आणि मरणमास यांचें ज्ञान नसेल तेव्हां त्या मनुष्यानें घरांतून प्रस्थान ज्या मासांत ज्या दिवशीं केलें असेल तो मास व तो दिवस पूर्वोक्त रीतीनें - म्हणजे मासज्ञान असून दिवसाचें अज्ञान असतां दर्श इत्यादि रीतीनें घ्यावा . " मदनरत्नांत भविष्यांत - " ज्या मनुष्यास मृतदिवसाचें ज्ञान नसेल त्यानें सर्वदा अमावास्येस सांवत्सरिक करावें . दिवसाचें ज्ञान असून मासाचें ज्ञान नसेल त्यानें मार्गशीर्ष , भाद्रपद किंवा माघ या मासांत तो दिवस ( तिथि ) घ्यावा . " निर्णयामृतांत तर - जेव्हां मासाचें ज्ञान नाहीं , दिवसाचें मात्र ज्ञान आहे तेव्हां आषाढांत किंवा माघांत तो दिवस घ्यावा . " ह्या बृहस्पतिस्मृतीवरुन आषाढही सांगितला आहे . कालादर्शांतही मासाचें अज्ञान व दिवसाचें ज्ञान असतां आषाढ व माघ यांत करावें " असें सांगितलें आहे . हेमाद्रींत प्रभासखंडांत - " ज्याला मृत दिवसाचें व मासाचें ज्ञान नसेल त्यानें माघांत अथवा मार्गशीर्षांत अमावास्येस श्राद्ध करावें . " भविष्यांत - " मासाचें व दिवसाचें ज्ञान नसतां मृताची वार्ता ज्या मासांत व ज्या दिवशीं ऐकली असेल तो मास व तो दिवस पूर्वोक्त क्रमानें म्हणजे पूर्वी जसें प्रस्थानदिवसाचें अज्ञान असून प्रस्थानमासाचें ज्ञान असतां त्या मासाच्या अमावास्येस , मासाचें अज्ञान असून दिवसाचें ज्ञान असतां मार्गशीर्ष इत्यादिकांत सांगितलें ; तसें - येथें वार्ताश्रवण झालेल्या मासदिवसांचे ठायीं जाणावें , असा इत्यर्थ होय . वार्ताश्रवणाचा दिवस व मास यांचें अज्ञान असतां माघ व मार्गशीर्ष यांच्या अमावास्येस करावें ; कारण , याविषयीं पूर्वीं हेमाद्रींत प्रभासखंडांतील वचन सांगितलें आहे . म्हणून ‘ येथें वार्ताश्रवणदिवसाचें वगैरे ज्ञान नसतां श्राद्धाचा लोप होतो ’ असें शूलपाणीनें सांगितलेलें त्याज्य आहे . तिथितत्त्वांत यम - ‘‘ प्रवासांत गेलेल्याची वार्ता बारा वर्षै समजली नाहीं , म्हणजे त्याचा प्रेतसंस्कार पुत्रांनीं व बांधवांनीं करावा . ज्या महिन्यांत ज्या दिवशीं घरांतून गेलेला असेल त्या मासांत त्या दिवशीं त्याची क्रिया करावी . गेलेल्या दिवसाचें अज्ञान असतां अमावास्या घ्यावी . मासाचें व दिवसाचें अज्ञान असतां आषाढी अमावास्या घ्यावी . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP