मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धाला देश

तृतीयपरिच्छेद - श्राद्धाला देश

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां श्राद्धाला देश सांगतो -

अथश्राद्धदेशाः मनुः शुचिदेशंविविक्तंतुगोमयेनोपलेपयेत् ‍ दक्षिणाप्रवणंचैवप्रयत्नेनोपपादयेत् ‍ पृथ्वीचंद्रोदयेविष्णुधर्मे दक्षिणाप्रवणेदेशेतीर्थादौचगृहेपिवा भूसंस्कारादिसंयुक्तेश्राद्धंकुर्यात् ‍ प्रयत्नतः तत्रैवप्रभासखंडे तीर्थादष्टगुणंपुण्यंस्वगृहेददतः शुभे भारते तस्यदेशाः कुरुक्षेत्रंगयागंगासरस्वती प्रभासं पुष्करंचेतितेषुश्राद्धंमहाफलं स्कांदे तुलसीकाननच्छायायत्रयत्रभवेद्दिज तत्रश्राद्धंप्रदातव्यंपितृणांतृप्तिहेतवे माधवीयेश्राद्धोपक्रमेव्यासः महोदधौप्रयागेचकाश्यांचकुरुजांगले शंखः गंगायमुनयोस्तीरेपयोष्ण्यमरकंटके नर्मदाबाहुदातीरेभृगुलिंगेहिमालये गंगाद्वारेप्रयागेचनैमिषेपुष्करेतथा सन्निहत्यांगयायांचदत्तमक्षय्यतांव्रजेत् ‍ अपिजायेतसोस्माकंकुलेकश्चिन्नरोत्तमः गयाशीर्षेवटेश्राद्धंयोनोदद्यात्समाहितः एष्टव्याबहवः पुत्रायद्येकोपिगयांव्रजेत् ‍ यजेतवाश्वमेधेननीलंवावृषमुत्सृजेत् ‍ आदित्यपुराणे पंचक्रोशंगयाक्षेत्रंक्रोशमेकंगयाशिरः महानद्याः पश्चिमेनयावद्गृध्रेश्वरोगिरिः उत्तरेब्रह्मयूपस्ययावद्दक्षिणमानसम् ‍ एतद्गयाशिरोनामत्रिषुलोकेषुविश्रुतमिति शूलपाणौबृहस्पतिः गंगायांधर्मपृष्ठेचसरसिब्रह्मणस्तथा गयाशीर्षेक्षयवटेपितृणांदत्तमक्षयम् ‍ धर्मारण्यंधर्मपृष्ठंधेनुकारण्यमेवच दृष्टवैतानिपितृंश्चार्चन् ‍ वंशान्विंशतिमुद्धरेत् ‍ त्रिस्थलीसेतौवायवीये शमीपत्रप्रमाणेनपिंडंदद्याद्गयाशिरे उद्धरेत्सप्तगोत्राणिकुलमेकोत्तरंशतं सप्तगोत्राणितु पितामाताचभार्याचभगिनीदुहितातथा पितृमातृष्वसाचैवसप्तगोत्राणिवैविदुरिति एषांगोत्राणामेकोत्तरंशतंकुलंपुरुषाइत्यर्थः तेचोक्तास्तचैव तत्त्वानिविंशतिनृपाद्वादशैकादशादश अष्टावितिचगोत्राणांकुलमेकोत्तरंशतं तत्त्वानिचतुर्विशतिः तेचद्वादशपूर्वाद्वादशपराः एवमग्रेपि प्रयोगपारिजातेपाद्मे शालग्राममयीमुद्रासंस्थितायत्रकुत्रचित् ‍ वाराणस्यांयवाधिक्यंसमंताद्योजनत्रयं तथा यत्किंचित् ‍ पैतृकंकुर्यात्सपिंडंवातदंतिके विष्णुलोकंसगच्छेत्तुलभतेशाश्वतंपदम् ‍ तत्रैववाराहे म्लेच्छदेशेशुचौवापिचक्रांकोयत्रतिष्ठति । योजनानांतथात्रीणिममक्षेत्रंवसुंधरे । चक्रांकस्यतुसान्निध्येयत् ‍ कर्मक्रियतेनरैः स्नानंदानंतपः श्राद्धंसर्वमक्षयतांव्रजेत् ‍ ॥

मनु - " श्राद्धाला जागा एकांतीं , शुद्ध अशी पाहून ती गोमयानें सारवावी ; ती जागा दक्षिणेकडून उतरती अशी यत्नानें ( खणून वगैरे ) तयार करावी . " पृथ्वीचंद्रोदयांत विष्णुधर्मांत - " गोदावर्यादितीर्थाचे ठायीं अथवा गृहाचे ठिकाणीं दक्षिणेकडे उतरती असून संस्कारादिकांनीं शुद्ध केलेल्या अशा भूमीवर प्रयत्नानें श्राद्ध करावें . " तेथेंच प्रभासखंडांत - " आपल्या घरीं श्राद्ध करणाराला तीर्थाहून आठपट पुण्य प्राप्त होतें . " भारतांत " श्राद्धाचे देश म्हटले म्हणजे कुरुक्षेत्र , गया , गंगा , सरस्वतीनदी , प्रभासतीर्थ , पुष्करतीर्थ , हे होत ; यांचेठायीं श्राद्ध केलें असतां मोठें फळ मिळतें . " स्कादांत - " तुळशींच्या वनाची छाया ज्या ज्या ठिकाणीं असेल त्या त्या ठिकाणीं पितरांच्या तृप्तीसाठीं श्राद्ध करावें . " माधवीयांत श्राद्धोपक्रम असतां व्यास सांगतो - " महोदधि ( मोठा समुद्र ), प्रयाग , काशी , आणि कुरुजांगल , यांचे ठिकाणीं श्राद्ध करावें . " शंख - " गंगातीर , यमुनेचें तीर , पयोष्णीनदी , अमरकंटक , नर्मदातीर , बाहुदातीर , भृगुलिंग , हिमालयपर्वत , गंगाद्वार , प्रयाग , नैमिषक्षेत्र , पुष्करतीर्थ , संनिहति , गया , इतक्या ठिकाणीं दिलेलें अक्षय होतें . पितर आशा करितात कीं , गयाशीर्षाचे ठायीं आणि अक्षयवटाखालीं समाधानांतः करणानें आमचें श्राद्ध करणारा असा कोणी नरश्रेष्ठ आमच्या कुलांत उत्पन्न होईल काय ? बहुत पुत्र व्हावे म्हणून इच्छा करावी ; कारण , त्यांतून एकादा तरी गयेस जाईल , अर्थात् ‍ त्या ठिकाणीं श्राद्ध करील अथवा अश्वमेध याग करील , किंवा नीलवृषाचा उत्सर्ग करील . " आदित्यपुराणांत - " गयाक्षेत्र पांच कोश आहे , आणि गयाशिर एक कोश आहे . महानदीच्या पश्चिमेकडे गृध्रेश्वरगिरीपर्यंत आणि ब्रह्मयूपाच्या उत्तरेकडे दक्षिणमानसापर्यंत जें क्षेत्र तें हें गयाशिर नांवानें तीन्ही लोकांत प्रसिद्ध आहे . " शूलपाणींत बृहस्पति - " गया , धर्मपृष्ठ , ब्रह्मसरोवर , गयाशीर्ष , आणि अक्षयवट इतक्या ठिकाणीं पितरांना दिलेलें अक्षय होतें . धर्मारण्य , धर्मपृष्ठ , आणि धेनुकारण्य यांना पाहून पितरांची पूजा करणारा वीस वंशांचा उद्धार करील . " त्रिस्थलीसेतूंत वायवीयांत - " गयाशिराचे ठायीं शमीपत्रप्रमाणानें पिंड द्यावे , म्हणजे सात गोत्रांचा ह्म० एकशें एक कुलांचा उद्धार होईल . " तीं सात गोत्रें येणेंप्रमाणें - " पितृगोत्र , मातृगोत्र ( मातामहगोत्र ), भार्येचें गोत्र ( श्वशुरगोत्र ), बहिणीचें गोत्र , कन्येचें गोत्र , आत्येचें गोत्र , आणि मावशीचें गोत्र , हीं सात गोत्रें होत . ह्या सात गोत्रांचें एकशेंएक कुल म्हणजे पुरुष समजावे . " ते पुरुष त्याच ठिकाणीं सांगितले आहे ते असे - " पितृगोत्राचे २४ पुरुष , मातृगोत्राचे २० पुरुष , भार्यागोत्राचे १६ पुरुष , भगिनीगोत्राचे १२ पुरुष , कन्यागोत्राचे ११ पुरुष , आत्याचे गोत्राचे १० पुरुष , आणि मावशीचे गोत्राचे ८ पुरुष , मिळून सात गोत्रांचे एकशेंएक १०१ पुरुष होतात . हे सांगितलेले पुरुष निम्मे पूर्वींचे व निम्मे पुढचे समजावे , जसे पितृगोत्राचे २४ पुरुष म्हणून सांगितले ते बारा पूर्वींचे व बारा पुढचे म्हणून समजावे . याचप्रमाणें इतर गोत्रांचेही पुरुष समजावे . " प्रयोगपारिजातांत पाद्मांत - " शालग्रामरुपी मुद्रा ( शिला ) जेथें कोठें आहे , त्याच्या आसमंतात् ‍ तीन योजनेंपर्यंतचा प्रदेश वाराणसीहून किंचित् ‍ अधिक आहे , म्हणून समजावें . तसेंच त्या शालग्रामाच्या संनिध जो मनुष्य थोडें बहुत पैतृक ( पितरांच्या उद्देशानें ) कर्म करील अथवा सपिंडक श्राद्ध करील तो विष्णुलोकास जाईल व त्याला शाश्वतपद प्राप्त होईल . " तेथेंच वाराहांत - " म्लेच्छ देशांत अथवा दुसर्‍या अशुद्ध देशांतही चक्रांकित शिला ज्या ठिकाणीं आहे , तेथें तीन योजनेंपर्यंत [ भगवान् ‍ म्हणतात ] माझें क्षेत्र आहे . त्या चक्रांकाच्या संनिध स्नान , दान , तप , श्राद्ध इत्यादिक जें कर्म मनुष्य करितात तें सर्व कर्म अक्षय होतें . "

आतां श्राद्धाला निषिद्ध देश सांगतो . -

अथनिषिद्धदेशाः पृथ्वीचंद्रोदयेस्कांदे त्रिशंकोर्वर्जयेद्देशंसर्वंद्वादशयोजनं उत्तरेणमहानद्यादक्षिणेनतुकीकटान् ‍ देशस्त्रैशंकवोनामश्राद्धकर्मणिवर्जितः वायवीये प्रनष्टाश्रमधर्माश्चदेशावर्ज्याः प्रयत्नतः यमः रुक्षंकृमिहतंक्लिन्नंसंकीर्णानिष्टगंधिकं देशंत्वनिष्टशब्दंचवर्जयेच्छ्राद्धकर्मणि तत्रैवशंखः गोगजाश्वादिजुष्टेषुकृत्रिमायांतथाभुवि नकुर्याच्छ्राद्धमेतेषुपारक्यासुचभूमिषु यमः परकीयप्रदेशेषुपितृणांनिर्वपेत्तुयः तद्भूमिस्वामिपितृभिः श्राद्धकर्मविहन्यते ब्राह्मभारतयोरपि परकीयगृहेयस्तुस्वान् ‍ पितृंस्तर्पयेद्यदि तद्भूमिस्वामिनस्तस्यहरंतिपितरोबलात् ‍ अग्रभागंततस्तेभ्योदद्यान् ‍ मूल्यंचजीवितम् ‍ श्राद्धार्हाणामग्रभागंश्राद्धंतदनर्हाणांशूद्राणांतुमूल्यमितिकेचित् ‍ षोडशीपिंडेऽबांधवानामपिपिंडोक्तेः येऽबांधवाबांधवावेत्यादितर्पणबाधापत्तेश्च नामगोत्रपूर्वंश्राद्धनिषेधोनान्यत्रेतिगौडाः विप्रासुतस्यशूद्रापुत्रश्राद्धनिषेधोनान्यत्र अग्रदानंचान्नत्यागात्पूर्वंकार्यमितिमैथिलाः तन्न अग्रभागस्यश्राद्धपरत्वेमानाभावात् ‍ अन्नदानेचनिषेधाभावात् ‍ त्यागात्पूर्वंकरणेऽनंगेनव्यवधानापत्तेः अंगत्वेचमानाभावात् ‍ इदंचस्वाम्यनुज्ञाभावे तदुक्तंतत्रैवब्राह्मे स्वनुलिप्तेषुगेहेषुस्वेष्वनुज्ञापितेषुच श्राद्धमेतेषुदातव्यंवर्ज्यमेतेषुनोच्यते किरातेषुकलिंगेषुकौंकणेषुखसेष्वपि सिंधोरुत्तरकूलेषुनर्मदायाश्चदक्षिणे पूर्वेणकरतोयायानदेयंश्राद्धमुच्यते इदंकाम्यविषयं अन्यथातत्रत्यानां सर्वश्राद्धाकरणापत्तेः नर्मदादक्षिणेऽपवादः स्कांदे सह्यस्यचोद्भवोयत्रयत्रगोदावरीनदी पृथिव्यामपिकृत्स्नायांसप्रदेशोतिपावनः परकीयत्वापवादआदित्यपुराणे अटवीपर्वताः पुण्यानदीतीराणियानिच सर्वाण्यस्वामिकान्याहुर्नहितेषुपरिग्रहः वनानिगिरयोनद्यस्तीर्थान्यायतनानिच देवखाताश्चगर्ताश्चनस्वाम्यंतेषुविद्यते स्मृतिसारे नैकवासानचद्वीपेनांतरिक्षेकदाचन श्रुतिस्मृत्युदितंकर्मनकुर्यादशुचिः क्कचित् ‍ दिवोदासीये म्लेच्छदेशेतथारात्रौसंध्यायांविप्रवर्जिते नश्राद्धमाचरेद्विद्वान्नचाकाशेकथंचन ।

पृथ्वीचंद्रोदयांत स्कांदांत - " त्रिशंकूचा देश बारा योजनेंपर्यंत आहे , तो सर्व वर्ज्य करावा . तो असा - महानदीच्या उत्तरेस व कीकट देशाच्या दक्षिणेस दोहोंच्या मध्यभागीं असलेला देश त्रिशंकूचा म्हणून प्रसिद्ध आहे . तो श्राद्धकर्माविषयीं वर्ज्य करावा . " वायवीयांत - " ज्या देशांत आश्रमधर्म नष्ट झाले आहेत ते देश प्रयत्नानें वर्ज्य करावे . " यम - " रुक्ष , कृमींनीं व्यापलेला , चिखल असलेला , अनेकप्रकारच्या दुर्गंधींनीं व्याप्त , आणि ज्या ठिकाणीं बहुत अपशब्द ऐकूं येतात , ते सारे देश श्राद्धकर्माविषयीं वर्ज्य करावे . " तेथेंच शंख - " गुरांचा गोठा , हत्ती बांधण्याची जागा , घोड्यांची पागा , दगडांनीं वगैरे बांधलेली भूमि , आणि परकीय ( दुसर्‍याची ) भूमि इतक्या ठिकाणीं श्राद्ध करुं नये . " यम - " परकीय भूमीवर जर श्राद्ध केलें तर , त्या भूमीच्या मालकांचे पितर त्या श्राद्धकर्माचा विघात करितात . " ब्राह्मांत भारतांतही सांगतात - " दुसर्‍याच्या घरीं जर आपल्या पितरांचें श्राद्ध केलें तर त्या भूमीच्या मालकांचे पितर बलात्कारानें तें श्राद्ध हरण करुन घेतात . याकरितां त्या भूमिस्वामीच्या पितरांना अग्रभाग द्यावा , आणि जीवनसाधनमूल्य ( जागेचें भाडें ) द्यावें . " एथें असें समजा कीं , श्राद्धाला योग्य असतील त्यांना अग्रभाग श्राद्ध द्यावें ; आणि श्राद्धाला अयोग्य शूद्र असतील तर त्यांना मूल्य द्यावें , असें कोणी सांगतात . आतां हे परकीय असल्यामुळें यांना श्राद्धयोग्यता कशी येईल असें कोणी म्हणेल तर षोडशीश्राद्धांत ( काम्यवृषोत्सर्गांत ) अबांधवांनाही पिंड सांगितले आहेत यावरुन अबांधवांना म्ह० परकीयांना देखील श्राद्धयोग्यता आहे . परकीयांना श्राद्धयोग्यता मानली नाहीं तर त्याच षोडशीप्रयोगांत " येऽबांधवा बांधवा वा० " अशा मंत्रानें तर्पण सांगितलें आहे त्याचा बाध होईल . याकरितां परकीयांचें नाम व गोत्र यांचा उच्चार करुन श्राद्ध करुं नये . असा श्राद्धनिषेध आहे ; नामगोत्रोच्चारावांचून परकीयांचें श्राद्ध करण्याचा निषेध नाहीं , असें गौड सांगतात . ब्राह्मणीपुत्राला शूद्रास्त्रीपुत्राच्या श्राद्धाविषयीं निषेध आहे . अन्यश्राद्धाविषयीं ब्राह्मणीपुत्राला निषेध नाहीं . आतां त्या अग्रभाग श्राद्धांत अन्नदान करावयाचें तें अन्नत्यागाच्या ( अन्न निवेदनाच्या ) पूर्वीं करावें , असें मैथिल सांगतात ; तें बरोबर नाहीं . कारण , अग्रभाग हें श्राद्ध आहे अशाविषयीं प्रमाण नाहीं . अन्नदान करण्याविषयीं निषेध नाहीं ; अर्थात् ‍ केव्हांही करा . पण , श्राद्धामध्यें अन्ननिवेदनाच्या पूर्वीं अन्नदान करावें , असें जें मैथिल म्हणतात , तें तसें केलें असतां श्राद्धाचें अनंग ( अंग नव्हे ) जें परकीयांना अन्नदान त्यानें व्यवधान येऊं लागेल . आतां हें अन्नदान श्राद्धांगच आहे , म्हणून त्यानें व्यवधान आलें तरी दोष नाहीं , असें म्हणतां येत नाहीं ; कारण , हें अन्नदान श्राद्धांग आहे , असें म्हणण्यास प्रमाण नाहीं . हें जें अग्रभागरुप अन्नदान सांगितलें तें , भूमीच्या मालकाची अनुज्ञा नसेल तर समजावें . अनुज्ञा असेल तर श्राद्धाचा निषेधच नाहीं , असें त्याच ठिकाणीं ब्राह्मांत सांगतात - " गोमयादिकानें स्वच्छ सारवून शुद्ध केलेल्या आपल्या घरीं व परकीय असेल तर त्याची अनुज्ञा घेऊन सारवून शुद्ध केलेल्या अशा दुसर्‍याच्या घरीं देखील पितरांचें श्राद्ध करावें . अशा घरीं श्राद्ध वर्ज्य करावें असें सांगितलें नाहीं . किरातदेश , कलिंगदेश , कोंकणदेश , खसदेश , सिंधुनदीच्या उत्तरेकडचे देश , नर्मदेच्या दक्षिणेकडचे देश , आणि करतोयानदीच्या पूर्वेकडील देश इतक्या देशांत श्राद्ध करुं नये असें सांगितलें आहे . " कामनिक श्राद्धाविषयीं हा निषेध समजावा ; सर्व श्राद्धाविषयीं जर हा निषेध मानला तर त्या त्या देशांत राहणारांनीं सर्व प्रकारचीं ( नित्यनैमित्तिक देखील ) श्राद्धें करतां कामा नयेत , अशी आपत्ति प्राप्त होईल . नर्मदेच्या दक्षिणेकडील देशाचा जो निषेध त्याचा अपवाद सांगतात स्कांदांत - " ज्या ठिकाणीं सह्याद्रीचा उद्भव झालेला आहे , व ज्या ठिकाणीं गोदावरी नदी आहे , तो प्रदेश सार्‍या पृथिवीमध्यें अति पावन ( अति पवित्र ) आहे . " परकीय भूमीवर श्राद्ध करुं नये , म्हणून जें सांगितलें त्याचा अपवाद आदित्यपुराणांत - " पुण्यकारक अशीं जीं अरण्यें , पर्वत आणि नद्यांचीं तीरें तीं सारीं अस्वामिक ( स्वामिरहित ) सांगितलीं आहेत ; कारण , तीं कोणीं ग्रहण केलेलीं नाहींत . वनें , पर्वत , नदी , तीर्थै , देवालयें , देवखात , आणि गर्त ( मोठीं सरोवरें ) यांचेठिकाणीं कोणाची मालकी नाहीं . " स्मृतिसारांत - " श्रुतीनें व स्मृतीनें सांगितलेलें कर्म ; अंगावर दुसरें वस्त्र घेतल्यावांचून , तसेंच द्वीपावर ( चहूंकडून पाणी असलेल्या भूमीवर ), आणि अंतरिक्षांत ( भूमीला सोडून मध्यंतरीं कधींही ) करुं नये . आणि तें कर्म आपण अशुद्ध असतां कधींही करुं नये . " दिवोदासीयांत - " म्लेच्छदेशांत , रात्रीं , संध्याकाळीं , ब्राह्मणरहितदेशीं , आणि आकाशांत , कधींही विद्वानानें श्राद्ध करुं नये . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP