TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
जीवंताचेंही अंत्यकर्म

तृतीय परिच्छेद - जीवंताचेंही अंत्यकर्म

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


जीवंताचेंही अंत्यकर्म

क्वचित्तुजीवतोप्यंत्यकर्माशौचंचकार्यं यथा प्रायश्चित्तानिच्छोः पतितस्यघटस्फोटे पतितस्योदकंकार्यंसपिंडैर्बांधवैः सह निंदितेहनिसायाह्नेज्ञात्यृत्विग्गुरुसन्निधौ दासीघटमपांपूर्णंपर्यस्येत्प्रेतवत्तदा अहोरात्रमुपासीरन्नाशौचंबांधवैः सहेतिमनूक्तेः निंदितेरिक्तादौ अपरार्केवसिष्ठोपि वेदविप्लावकशूद्रयाजकोत्तमवर्णवर्गपतितास्तेषांपात्रनिनयनमपात्रसंस्कारादकृत्स्नंपात्रमादायदासो‍ऽसवर्णपुत्रोवाबंधुरसदृशोवागुणहीनः सव्यनपादेनप्रवृत्ताग्रान्दर्भान्लोहितान्वोपस्तीर्यापः पूर्णपात्रमस्मैनिनयेन्निनेतारंचास्यप्रकीर्णकेशाज्ञातयोन्वालभेरन्नपसव्यंकृत्वागृहेषुस्वैरमापद्येरन्नतऊर्ध्वंतेनतंधर्मयेयुस्तद्धर्माणस्तंधर्मयंतइति उत्तमवर्णाब्राह्मणादयः तेषांवर्गः समूहस्तस्मात्पतिताब्रह्महादयः अपात्रसंस्कारः कुत्सितपात्रसमूहः प्रवृत्ताग्राः छिन्नाग्राः स्वैरंयथेच्छंधर्मादिकार्यंकुर्युः अस्माद्वचनसामर्थ्यात्पात्रनिनयनात्प्राक्पतितज्ञातीनांधर्मकार्येष्वधिकारोनास्तीत्यपरार्कः तस्य विद्यागुरुयोनिसंबंधांश्चसनिइपात्यसर्वाण्युदकादिप्रेतकार्याणिकुर्युः पात्रंचास्यविपर्यस्येयुर्दासः कर्मकरोवावकरादमेध्यंपात्रमानीयदासीघटात्पूरयित्वादक्षिणामुखः पदाविपर्यस्येदमुमनुदकंकरोमीतिनामग्राहंसर्वेन्वालभेरन् ‍ प्राचीनावीतिनोमुक्तशिखाअपउपस्पृश्यग्रामंप्रविशेयुरितिगौतमोक्तेश्च उदकादीत्युक्तेर्दाहनिवृत्तिः प्रेतकार्याण्येकादशाहश्राद्धांतानि दास्यह्रतोंबुघटोदासीघटः तेनोदकेनामेध्यपात्रंपूरयित्वादासादिर्न्युब्जंवामपादेनकुर्यादितिहरदत्तः अत्रनामग्राहवचनमुदकादिप्रेतकार्येतद्वर्जनत्वार्थं तेनतत्तूष्णींभवति एतच्चप्रायश्चित्तानिच्छोः तस्यगुरोर्बांधवानांराज्ञश्चसमक्षंदोषानभिख्याप्यतमनुभाष्यपुनः पुनराचारंलभस्वेतिसयद्येवमप्यनवस्थितमतिः स्यात्ततोस्यपात्रंविपर्यस्येदितिशंखोक्तेः जीवंतमेवोद्दिश्यपिंडोदकश्राद्धानिनाम्नादद्यादित्यपरार्कः ।

 

 

क्वचित् स्थलीं जीवंताचेंही अंत्यकर्म व आशौच करावें , तें असें - प्रायश्चित्त न इच्छिणारा जो पतित त्याचा घटस्फोट केला असतां जीवंत असतांही त्याचें अंत्यकर्म व आशौच करावें . कारण , " निंदित अशा रिक्तादि तिथीचे दिवशीं सायंकाळीं ज्ञाति , ऋत्विक् , गुरु यांच्या संनिध पतिताच्या सपिंडांनीं बांधवांसह पतिताला उदकदान करावें . तें असें - उदकानें भरलेला घट दासीकडून आणवून लवंडवावा , आणि त्या वेळी बांधवांसह सपिंडांनीं प्रेताप्रमाणें एक अहोरात्र त्याचें आशौच करावें . " असें मनुवचन आहे . अपरार्कांत वसिष्ठही - " वेद बुडविणारे , बहुत शूद्राचा याग करणारे , ब्रह्महत्यादि महापातक करणारे असे जे पतित त्यांचें पात्रनिनयन करावें , तें असें - दास किंवा संकर जातीचा मनुष्य , अथवा गुणरहित अयोग्य असा बांधव यानें निंदित अशा पात्रसमूहांतून एक पात्र घेऊन तें उदकानें पूर्ण भरुन अग्रें तोडलेले दर्भ किंवा लोहित ( तृणविशेष ) पसरुन त्यांजवर तें पात्र वामपादानें पतिताच्या उद्देशेंकरुन लवंडवावें . पतिताच्या ज्ञातींनीं केश सोडून अपसव्य करुन पात्र लवंडणाराला स्पर्श करावा . हें पात्रनिनयन होय . पात्रनिनयनानंतर सर्व ज्ञातींनीं आपल्या घरीं धर्मादिकार्य यथेच्छ आचरण करावें . " पात्रनिनयनानंतर धर्मादि कार्य करावें , असें सांगितल्यावरुन पात्रनिनयनाच्या पूर्वीं पतिताच्या ज्ञातींला धर्मकार्यांविषयीं अधिकार नाहीं , असें अपरार्क सांगतो . " पतिताच्या ज्ञातींनीं पतिताचे विद्यासंबंधी , गुरुसंबंधी , आणि योनिसंबंधी यांना जमवून उदकदानादिक सारीं प्रेतकार्यै करावीं . व त्यांनीं त्याजकरितां पात्र उलथें करावें . तें असें - दासानें किंवा चाकरानें उकीरड्यावरुन अपवित्र पात्र आणून , दासीनें मातीच्या घागरींतून आणलेल्या उदकानें तें पात्र पूर्ण भरुन दक्षिणेकडे मुख करुन तें पात्र डाव्या पायानें उलथें करावें . आणि पतिताचें नांव घेऊन ‘ अमुं अनुदकं करोमि ’ असें म्हणावें . सारे ज्ञातींनीं प्राचीनावीती करुन शिखा सोडून त्याला ( उलथें पात्र करणार्‍या दासादिकाला ) स्पर्श्ह करावा . नंतर सर्व ज्ञातींनीं स्नान करुन गांवांत जावें " असें गौतमाचेंही वचन आहे . उदकदानादिक करावीं , असें सांगितल्यानें दाहाची निवृत्ति झाली प्रेतकार्यै म्हणजे एकादशाहश्राद्धांत समजावीं . दासीनें आणलेल्या घागरींतील उदकानें अशुद्ध पात्र भरुन दासादिकानें तें पात्र डाव्या पायानें पालथें करावें , असें हरदत्त सांगतो या वचनांत ‘ नामग्रहण करुन ’ असें सांगितलें तें उदकादिक प्रेतकार्याविषयीं नाम वर्ज्य करण्याकरितां आहे म्हणून उदकादिक प्रेतकार्य नांव घेतल्यावांचून होतें . हा घटस्फोटविधि प्रायश्चित्त न इच्छिणाराचा आहे , असें समजावें . कारण , " त्या पतिताचा गुरु , बांधव व राजा यांच्या समक्ष त्याचे दोष प्रख्यात करुन त्याला ‘ आचार ग्रहण कर ’ असें वारंवार सांगितलें असतांही त्याची बुद्धि जर स्थितीवर येत नसेल तर त्याला पात्र उलथें करावें " असें शंखवचन आहे . म्हणजे जीवंताचा उद्देश करुन पिंड , उदक , आणि श्राद्ध हीं त्याच्या नांवानें द्यावीं , असें अपरार्क सांगतो .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:24.5670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हृदयवान्

  • That has a heart; kind, humane, pitiful, tender, sympathizing &c. 
  • a  Kind, humane. 
RANDOM WORD

Did you know?

तेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.