मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
मृताशौच

तृतीय परिच्छेद - मृताशौच

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

आतां मृताशौच सांगतो -

अथमृताशौचंहारीतः जातमृतेमृतजातेवासपिंडानांदशाहमितिस्वाशौचपरं जातमृतेनालच्छेदोर्ध्वं यावन्नछिद्यतेनालंतावन्नाप्नोतिसूतकं छिन्नेनालेततः पश्चात्सूतकंतुविधीयतइतिजैमिन्युक्तेः नाड्यांछिन्नायामाशौचमितिहारीतोक्तेश्च एतन्मृताशौचपरमेव जननाशौचंतु नालच्छेदोत्कर्षेपिजननाद्येव मृतजातेनालच्छेदाभावात् षष्ठीपूजाद्युत्कर्षापत्तेश्च तेननाडीछेदात्प्राड्मातुः स्पर्शेपिनदोषइतिशुद्धितत्त्वोक्तिः परास्ता नाभिच्छेदात्प्राड्मृतौतुबृहन्मनुः जीवन्जातोयदिततोमृतः सूतकएवतु सूतकंसकलंमातुः पित्रादीनांत्रिरात्रकं इदंचप्रसवाशौचमेव शावनिमित्तंस्नानमात्रं प्राड्नामकरणात्सद्यः शौचमितिशंखोक्तेः ।

हारीत - " मूल उपजून मेलें अथवा मरुन उपजलें असतां दहा दिवस आशौच " हें वचन आपल्या आशौचाविषयीं आहे . मुलाच्या निमित्तानें आशौचाविषयीं मूल उपजून मृत असतां नालच्छेदानंतर आशौच . कारण , " जोंपर्यंत नालच्छेद झाला नाहीं तोंपर्यंत सूतक प्राप्त होत नाहीं . नालच्छेद झाल्यानंतर सूतक सांगितलें आहे " असें जैमिनिवचन आहे . आणि " नाडीच्छेद झाला असतां आशौच " असें हारीतवचनही आहे . नालच्छेदानंतर आशौच सांगितलें हें मृताशौचविषयकच आहे . जननाशौच तर नालच्छेद पुढें होणारा असला तरी उत्पन्न झाल्यापासून आहे . नालच्छेदाच्या पूर्वीं जननाशौच नाहीं , असें म्हटलें तर मरुन उपजलेल्या मुलाचें नालच्छेदन नसल्यामुळें जननाशौच प्राप्त होणार नाहीं . आणि नालच्छेदाच्या पूर्वीं जातकर्मादि करावयाचें म्हणून आशौच नाहीं , असें म्हटलें तर षष्ठीपूजनादिकालापर्यंतही आशौच प्राप्त होणार नाहीं . जननापासून आशौच आहे , असें सांगितल्यानें ‘ नाडीच्छेदाच्या पूर्वीं मातेला स्पर्श केला असतांही दोष नाहीं ’ अशी शुद्धितत्त्वाची उक्ति खंडित झाली . नाभिच्छेदाच्या पूर्वीं मृत असेल तर सांगतो बृहन्मनु - " जर जीवंत उत्पन्न होऊन नंतर जननाशौचांतच मेला तर मातेला संपूर्ण आशौच . आणि पिता इत्यादिकांना त्रिरात्र आशौच " हें जननाशौचच समजावें . मरणनिमित्तक स्नानमात्र आहे . कारण , " नामकरणाच्या पूर्वीं सद्यः शौच ( स्नान ) " असें शंखवचन आहे .

अत्रकश्चिदाह नामकरणमाशौचांतकालोपलक्षणं आशौचव्यपगमेनामधेयमितिविष्णूक्तेः आशौचेचव्यतिक्रांतेनामकर्मविधीयते इतिमनूक्तेश्चनाम्नोनियतकालत्वात् नचनामधेयंदशम्यांतुद्वादश्यांवापिकारयेत् पुण्येतिथौमुहूर्तेवानक्षत्रेवागुणान्वितइतिमनूक्तेरनियतकालत्वम् दशम्यामतीतायांविप्रः द्वादश्यामतीतायांक्षत्रियः वैश्यः षोडशे शूद्रएकत्रिंशेइत्यपिज्ञेयं पुण्यइत्याद्यनुकल्पः तेननाम्नः कालोपलक्षणं एवंदंतजननेपिदंतजन्मसप्तमेमासीत्युपनिषदिनियतकालत्वात् चौलेतुनकालोपलक्षणम् प्रथमेब्देतृतीयेवाकर्तव्यंश्रुतिचोदनादितिमनूक्तेः ततः संवत्सरेपूर्णेचूडाकर्मविधीयते द्वितीयेवातृतीयेवाकर्तव्यंस्मृतिदर्शनादितियमोक्तेश्च तस्यानियतकालत्वादिति तन्मंदं चौलवन्नामदंतजननयोरपिस्वरुपेणनिमित्तत्वोपपत्तेस्तद्विशिष्टकालानुवादेवाक्यभेदात् सप्तममासादर्वाग्दंतजननेतदभावप्रसंगाच्च यस्तूपनिषद्दर्शनेननिर्णयंकुर्यात् सनूनंशतायुः पुरुषइतिश्रुतेरर्वाक्पितृमरणेतदंत्यकर्मापित्यजेत् ननुकालानुपलक्षणेनामोत्कर्षेतदभावेवास्नानमात्राच्छुद्धिः स्यात् ततः किम् अस्तु अतएवोक्तं आदंतजन्मनः सद्यइति साचविष्णुवचनाद्दाहाभावविषयेतिवक्ष्यामः त्रिवर्षादावपिस्यादितिचेत् न दाहदंतादिनिमित्तैर्विशेषाशौचैः पूर्वस्यबाधात् तदुक्तं पूर्वाबाधेननोत्पत्तिरुत्तरस्यहिसिध्यतीति जननाद्दशरात्रेव्युष्टेशतरात्रेसंवत्सरेचेतिपरिशिष्टे द्वादश्यामपरेरात्र्यांमासेपूर्णेतथापरे अष्टादशेहनितथावदंत्यन्येमनीषिणइति भविष्येच नाम्नः कालानियमाच्च नचप्राथम्याद्दशरात्रेतीतेइतिमुख्यः कालः अन्यस्त्वनुकल्पइतिवाच्यम् चौलेपितथापत्तेः नचदंतजननकालानुपलक्षणेसदंतजातमृतस्यदाहैकाहप्रसंगः दशाहेनबाधात् नामकरणोत्तरमेवदाहप्रवृत्तेः दशाहाभ्यंतरेबालेप्रमीतेतस्यबांधवैः शावाशौचंनकर्तव्यंसूत्याशौचंविधीयतेइतिबृहन्मनूक्तेश्च आशौचंदाहोपलक्षणं सूतकवदितिपारस्करोक्तेः यत्तुविष्णुः अनिवृत्तेदशाहेतुपंचत्वंयदिगच्छति सद्यएवविशुद्धिः स्यान्नप्रेतंनोदकक्रियेति तदपिप्रेताशौचनिषेधार्थंनतुसद्यस्त्वपरं वाक्यभेदात् किंचनामकालात्प्राड्मृतस्यस्नानम् तदुत्तरंत्वेकाहादि नामकालेत्वेकादशाहेमृतस्यनकिमपिस्यात् अथशंखवचनेल्यब्लोपेपंचमीतदाप्रागितिनोपपद्येत नाम्निवापिकृतेसतीतिमन्वादिविरोधात् कृतनाम्नइतिमाधवमिताक्षरादिविरोधाच्चनकालोपलक्षणंक्कापीतिदिक् ‍ ।

येथें कश्चित् ( कोणी एक ) असें सांगतो कीं , नामकरण या पदानें उपलक्षणेंकरुन आशौचसमाप्तीचा काल समजावा . कारण , " आशौच समाप्त झालें असतां नामकरण करावें " ह्या विष्णुवचनावरुन आणि " आशौच गेलें असतां नामकरण करावें " ह्या मनूच्या वचनावरुनही नामकरणाचा नियमित काल आहे . आतां असें म्हणूं कीं , " नामकरण दहाव्या किंवा बाराव्या रात्रीं करावें , अथवा पुण्यतिथि व मुहूर्तावर किंवा गुणयुक्त नक्षत्रावर करावें " या मनुवचनावरुन नामकरणाचा काल अनियमित आहे . तर असें नाहीं ; कारण , त्या मनुवचनाचा अर्थ असा कीं , दहावी रात्र गेली असतां ब्राह्मणानें करावें . बारावी गेली असतां क्षत्रियानें करावें . याचप्रमाणें सोळाव्या दिवशीं वैश्यानें व एकतिसाव्या दिवशीं शूद्रानें असेंही आपापल्या आशौचोत्तर जाणावें . पुण्यतिथि मुहूर्तावर इत्यादि सांगितलें तो अनुकल्प आहे . यावरुन आशौचोत्तर काल झाला . अनियत नाहीं , म्हणून नामकरण हें नामकरणकालाचें उपलक्षण झालें . याचप्रमाणें दंतजननही दंतोत्पत्तीच्या कालाचें उपलक्षण ( बोधक ) आहे . म्हणजे दंतजननशब्दानें दंतोत्पत्तीचा काल घ्यावा . कारण , " दंतांची उत्पत्ति सातव्या मासीं होते " या उपनिषदांत दंतजन्माचा काल नियमित सांगितला आहे . याप्रमाणें चौलाविषयीं कालाचें उपलक्षण नाहीं . कारण , " पहिल्या वर्षीं किंवा तिसर्‍या वर्षीं श्रुतीनें सांगितल्यावरुन चौल करावें " ह्या मनुवचनावरुन , आणि " संवत्सर पूर्ण झालें असतां चूडाकर्म सांगितलें आहे . अथवा दुसर्‍या किंवा तिसर्‍या वर्षीं करावें , कारण , अशी स्मृति आहे " ह्या यमवचनावरुनही चौलाचा काल अनियमित आहे . हें कश्चित् ( कोणी एकाचें ) मत मंद ( असार , पोकळ ) आहे . कारण , चौल जसें आशौचाविषयीं स्वरुपानें ( स्वतः ) निमित्त आहे तसेंच नामकरण व दंतजनन यांना देखील स्वरुपानें निमित्तत्व उपपन्न ( युक्त ) असतां तद्युक्त कालाचा अनुवाद ( कथन ) केला तर वाक्यभेदरुप दोष प्राप्त होईल . तो असा - वरील शंखवचनांत - " नामकरणात्प्राक् ‍ सद्यः शौचं , तच्च आशौचोत्तरं ’ अशीं दोन वाक्यें करावयास लागतील . याप्रमाणें दंतजननाविषयीं समजावें . आणि सातव्या महिन्याच्या आंत दंत उत्पन्न असतां दंतोत्पत्तिनिमित्तक सांगितलेलें आशौच प्राप्त होणार नाहीं . ‘ सातव्या मासीं दंतोत्पत्ति होते ’ ह्या उपनिषदावरुन जो आशौचाचा निर्णय करील तो " पुरुष शतायु आहे " ह्या श्रुतीवरुन शंभरवर्षांच्या आंत बाप मेला असतां त्याचें अंत्यकर्म करणार नाहीं . शंका - नामकरणानें कालाचें उपलक्षण केलें नाहीं , आणि नामकरण पुष्कळ दिवसांनीं केलें किंवा मुळींच केलें नाहीं ; म्हणजे नामकरण नसल्यामुळें पुष्कळ दिवसांचा मृत झाला तरी स्नानमात्रानें शुद्धि होईल . समाधान . स्नानमात्रानें शुद्धि झाली तर काय होईल . असो . म्हणूनच सांगितलें आहे कीं , ‘ दंतोत्पत्तीपर्यंत सद्यः शुद्धि आहे . ’ ती सद्यः शुद्धि विष्णुवचनावरुन दाहाच्या अभावीं आहे , असें पुढें सांगूं . आतां ती स्नानमात्रानें शुद्धि तीन वर्षांचा वगैरे मृत असेल त्या ठिकाणीं देखील होईल , असें म्हणाल तर त्या ठिकाणीं दाह , दंतजनन इत्यादि निमित्तक विशेष आशौचांनीं पूर्वींच्या अल्प आशौचाचा ( सद्यः शौचादिकांचा ) बाध होईल . तेंच सांगितलें आहे - " पूर्वीच्याचा बाध केल्यावांचून पुढच्याची सिद्धि होत नाहीं . " आणि पूर्वीं कश्चिन्मतवाल्यानें सांगितलें कीं , नामकरणाचा काल नियमित आहे , तोही नाहीं . कारण , " उत्पन्न झाल्यापासून दहा दिवस , शंभर दिवस किंवा एक वर्ष गेल्यावर नामकरण करावें . " असें परिशिष्टांत आहे . आणि " बाराव्या रात्रीं ( दिवशीं ) करावें , असें कोणी सांगतात ; मास पूर्ण झाल्यावर करावें , असें इतर सांगतात . अठराव्या दिवशीं करावें , असें अन्य विद्वान् ‍ सांगतात " असें भविष्यपुराणांतही आहे , म्हणून नामकरणाच्या कालाचा नियमही नाहीं . आतां असें म्हणूं कीं , प्रथम सांगितल्यामुळें दहावा दिवस गेल्यावर जो काळ तो नामकरणाचा मुख्य काळ आहे . इतर काळ अनुकल्प आहे . असें म्हणतां कामा नये ; कारण , चौलाविषयीं देखील तसेंच प्राप्त होईल . आतां कश्चिन्मताप्रमाणें दंतजनन शब्दानें कालाचें उपलक्षण केलें नाहीं तर दंतसहित उत्पन्न होऊन तो मेला असतां त्याचा दाह व एकाह आशौच प्राप्त होईल ! असें म्हणूं नये . कारण , मृताशौचारंभीं हारीतानें दशाह आशौच सांगितलें त्यानें एकाहाचा बाध होईल . नामकरणोत्तरच दाहाची प्रवृत्ति आहे , पूर्वीं नाहीं . कारण , " दहा दिवसांच्या आंत बालक मृत असतां त्याचें बांधवांनीं मृताशौच करुं नये , जननाशौच करावें " असें बृहन्मनूचें वचनही आहे . ह्या वचनांत मृताचें आशौच म्हणजे उपलक्षणेंकरुन दाह समजावा . कारण , ‘ सूतकाप्रमाणें करावें " असें पारस्कराचें वचन आहे . आतां जें विष्णु - " दहा दिवसांच्या आंत जर मूल मरेल तर सद्यः शुद्धि होते ; प्रेतसंस्कार व उदकदान क्रिया होत नाहीं " असें सद्यः शौच सांगितलें तें देखील मृताशौचाच्या निषेधासाठीं सांगितलें . सद्यः शुद्धि होते असा याचा अभिप्राय नाहीं . कारण , वाक्यभेद होईल . तो असा - ‘ दशाहाभ्यंतरे मृतं न संस्कुर्यात् , तस्य च सद्यः शुद्धि ’ अशीं भिन्न वाक्यें होतील . आणि नामकरणदिवसाच्या पूर्वीं मृताचें स्नान , नामकरणदिवसोत्तर एकाह इत्यादि आशौच , व नामकरणाच्या अकराव्या दिवशीं कांहींच आशौच प्राप्त होणार नाहीं . आतां ‘ प्राक् ‍ नामकरणात् " ह्या पूर्वोक्त शंखवचनांत ल्यबंत अव्ययाचा लोप करुन पंचमी झाली आहे . ती अशी ‘ नामकरणं व्याप्य ’ म्हणजे नामकरणदिवस व्यापून , असा अर्थ केला असतां ‘ प्राक् ‍ ’ हें पद सयुक्तिक लागत नाहीं . आणि " नामकरण केलें असतां " अशा मनु इत्यादि वचनाशीं विरोध येतो म्हणून व " नाम केलेल्याचें आशौच ’ असें माधव , मिताक्षरा इत्यादि ग्रंथांत सांगितलें आहे त्याच्याशींही विरोध येत असल्यामुळें कोठेंही कालाचें उपलक्षण नाहीं . ही दिशा दाखविली आहे .

नामोत्तरंदंतोत्पत्तेः प्राग्दाहेसत्यहः अदंतजातेतनयेशिशौगर्भच्युतेतथा सपिंडानांतुसर्वेषामहोरात्रमशौचकमितियमोक्तेः दाहाभावेतुस्नानमात्रं अदंतजातेप्रेतेसद्यएवनास्याग्निसंस्कारइतिविष्णुनादाहाभावेतदुक्तेः आदंतजन्मनः सद्यइतियाज्ञवल्कीयाच्च दाहविकल्पंचाहलौगाक्षिः तूष्णीमेवोदकंकुर्यात्तूष्णींसंस्कारमेवच सर्वेषांकृतचूडानामन्यत्रापीच्छयाद्वयं अन्यत्राकृतचूडे अत्रचूडाकरणंतृतीयवर्षरुपकालोपलक्षणार्थमितिमेधातिथिहरदत्तौ मनुरपि नात्रिवर्षस्यकर्तव्याबांधवैरुदकक्रिया जातदंतस्यवाकुर्युर्नाम्निवापिकृतेसतीति उदकंदाहोपलक्षणं दंतोत्पत्त्यनंतरंप्राक्त्रिवर्षांतान्मृतेहः दंतजातेप्यकृतचूडेत्वहोरात्रेणशुद्धिरिति विष्णूक्तेः त्रिवर्षोर्ध्वंकृतचूडेऽकृतचूडेवाप्रागुपनयनात्र्यहः यद्यप्यकृतचूडोवैजातदंतस्तुसंस्थितः तथापिदाहयित्वैनमाशौचंत्र्यहमाचरेदितिअंगिरसोक्तेः ( अकृतायामपिचूडायांत्रिवर्षोर्ध्वंदाहादिनियतं नात्रिवर्षस्येतिवचनात् कृतायांवर्षत्रयात्प्रापितंतूष्णीमेव ) अत्रजातदंतत्वमुद्देश्यविशेषणत्वादविवक्षितं दाहयित्वेत्यप्यनुवादः उभयविधौवाक्यभेदात् त्रिवर्षात्प्राक्चूडाभावेग्निदानेत्र्यहस्तदभावेविष्णूक्तेरेकाहइतिमाधवः यत्तु कश्चिदाह अत्रत्रिवर्षविषयादस्मादेवार्थात्र्त्रिवर्षोर्ध्वमपितत्सिद्धिः विज्ञानेश्वरोक्तंचत्रिवर्षोर्ध्वमकृतचूडाविषयत्वंचिंत्यम् जातदंतपदवैयर्थ्यादिति तत्तुच्छं दाहस्याविधेयत्वात् नृणामकृतचूडानामशुद्धिर्नैशिकीस्मृतेतिमनूक्तेस्त्रिवर्षोर्ध्वमेकाहापत्तेरर्थात्र्यहासिद्धेः त्वयाप्यग्रेतथांगीकारात्पदवैयर्थ्यस्यसाम्याद्वाक्यार्थाज्ञानाच्चेत्यलंमिताक्षरार्थानभिज्ञदूषणेन प्रथमवर्षादौकृतचूडस्यसदात्र्यहः निवृत्तचूडकानांतुत्रिरात्राच्छुद्धिरिष्यतइतिमनूक्तेः एतत्सर्वंप्रागुक्तंसपिंडानां ।

नामकरणोत्तर दंतोत्पत्तीच्या पूर्वीं दाह केला असतां एक दिवस आशौच . कारण , " दंत उत्पन्न होण्याच्या पूर्वीं पुत्र मेला असतां तसाच गर्भापासून बाहेर आलेला बालक मृत असतां सर्व सपिंडांना अहोरात्र आशौच " असें यमवचन आहे . दाह नसेल तर स्नानमात्र आहे . कारण , " दंत उत्पन्न होण्याच्यापूर्वीं बालक मृत असतां सद्यः च शुद्धि होते , त्याचा अग्निसंस्कार नाहीं " ह्या विष्णुवचनानें दाहाच्या अभावीं सद्यः शौच ( स्नान मात्र ) सांगितलें आहे . आणि " दंतजन्मापर्यंत सद्यः शौच " असें याज्ञवल्क्याचेंही वचन आहे . दाहाविषयीं विकल्प सांगतो लौगाक्षि - " चूडाकर्म ( चौल ) केलेल्या सर्व बालकांना उदक अमंत्रक द्यावें आणि संस्कारही अमंत्रकच करावा . चूडाकर्म न केलेल्यांना हीं दोन्ही ( उदकदान व संस्कार ) इच्छेस वाटलीं तर करावीं , किंवा न करावीं . " येथें चूडाकर्म म्हणजे उपलक्षणानें तृतीयवर्षरुप काल समजावा , असें मेधातिथि हरदत्त सांगतात . मनुही - " तीन वर्षैं ज्याला झालीं नाहींत त्याची बांधवांनीं उदकक्रिया करुं नये . अथवा ज्याला दांत आले आहेत त्याची , नामकरण केलें असतां उदकक्रिया करावी . " येथें उदक म्हणजे उपलक्षणानें दाह समजावा . दंतोत्पत्तीनंतर तीन वर्षांच्या आंत मृत असतां एक दिवस आशौच . कारण , " दांत उत्पन्न असून चूडाकर्म केलें नसतां एका दिवसानें शुद्धि होते " असें विष्णुवचन आहे . तीन वर्षानंतर चूडाकर्म केलेलें असो किंवा नसो मुंज होण्याच्या पूर्वीं मृत असतां तीन दिवस आशौच . कारण , " दांत उत्पन्न झालेला असून जरी चूडाकर्म केलेलें नसतां मृत झाला असेल तरी त्याचा दाह करुन तीन दिवस आशौच करावें " असें अंगिरसाचें वचन आहे . ( चूडाकर्म केलेलें नसलें तरी तीन वर्षांनंतर दाहादिकर्म निश्चित आहे . कारण , ‘ नात्रिवर्षस्य० ’ असें मनुवचन आहे . चूडाकर्म केलें असतां लौगाक्षिवचनानें प्राप्त झालेलें अमंत्रकच आहे . ) ह्या अंगिरसाचे वचनांत ‘ जातदंत ’ हें उद्देश्याचें ( मृताचें ) विशेषण असल्यामुळें अविवक्षित आहे . आणि ‘ दाहयित्वा ’ म्हणजें दाह करुन , हा अनुवाद आहे . कारण , दाह आणि त्र्यह आशौच या दोघांचें विधान केलें तर वाक्यभेद होईल , तो असा ‘ मृतं दहेत् , आशौचं च त्र्यहं चरेत् ’ अशीं भिन्न दोन वाक्यें होतील . या वचनानें तात्पर्य - तीन वर्षांच्या पूर्वी दाह केला तर तीन दिवस आशौच . दाह न केला तर पूर्वोक्त विष्णुवचनावरुन एकाह आशौच , असें माधव सांगतो . आतां जें कश्चित् ( कोणी एक ) सांगतो कीं , ‘ त्रिवर्षविषयक असें जें हें अंगिरसाचें वचन त्यावरुनच त्रिवर्षानंतरही अर्थात् त्याची ( दाहाची व त्र्यहआशौचाची ) सिद्धि होते . विज्ञानेश्वरानें सांगितलेलें जें त्रिवर्षानंतर चूडाकर्म झालेलें नसेल तद्विषयक हें वचन आहे , तें चिंत्य ( अयुक्त ) आहे . कारण , त्रिवर्षोर्ध्वविषयक हें वचन मानलें तर ‘ जातदंत ’ हें पद व्यर्थ होईल . ’ असें कश्चित् सांगतो तें तुच्छ आहे . कारण , या वचनांत दाहाचें विधान नसल्यामुळें " चूडाकर्म न झालेल्या मनुष्यांचें आशौच एक दिवस सांगितलें आहे " ह्या मनुवचनावरुन त्रिवर्षानंतरचें एक दिवस आशौच प्राप्त असल्यामुळें , या वचनानें वर तूं सांगितलेली ‘ अर्थात् तीन दिवस आशौचाची सिद्धि होत नाहीं . तूं ( कश्चिन्मतकारानें ) देखील पुढें तसेंच स्वीकारिलेलें आहेस . पद व्यर्थ होईल म्हणून सांगितलेंस तें तुलाही सारखेंच आहे . वाक्यार्थाचें ज्ञानही तुला नाहीं , विज्ञानेश्वरानें केलेल्या मिताक्षरेचा अर्थ न समजून दूषण दिलेंस इतकें सांगणें पुरे आहे . प्रथम वर्षादिकांत चूडाकर्म झालें असतां सर्वदा तीन दिवस आशौच . कारण , " ज्यांचें चूडाकर्म झालें असेल त्यांचें आशौच तीन दिवस इष्ट आहे " असें मनुवचन आहे . हें सारें पूर्वीं सांगितलेलें आशौच सपिंडांना समजावें .

मातापित्रोस्तुदशाहोर्ध्वंमृतेसर्वत्रत्रिरात्रं बालानामजातदंतानांत्रिरात्रेणशुद्धिरितिकश्यपोक्तेः बैजिकादभिसंबंधादनुरुंध्यादघंत्र्यहमितिमनूक्तेश्च शुद्धितत्त्वादयोगौडास्तु अजातदंतमरणेपित्रोरेकाहमिष्यते दंतजातेत्रिरात्रंस्याद्यदिस्यातांतुनिर्गुणावितिकौर्मात्काश्यपंशूद्रपरं अनूढानांतुकन्यानांतथावैशूद्रजन्मनामितित्र्यहानुवृत्तौशंखोक्तेः त्रिरात्रंतुभवेच्छूद्रेषण्मासेपिशिशौमृतइतिमत्स्यसूक्ताच्च दंतजातेशूद्रेतुपंचाहः यथाहांगिराः शूद्रेत्रिवर्षान्न्यूनेतुमृतेशुद्धिस्तुपंचभिः अतऊर्ध्वंमृतेशूद्रेद्वादशाहोविधीयते षडवर्षांतमतीतोयः शूद्रः संम्रियतेयदि मासिकंतुभवेच्छौचमित्यांगिरसभाषितमिति यत्तुअनूढभार्यः शूद्रस्त्वितिशंखोक्तंमासाशौचंतत्सगुणशूद्रपरम् निर्गुणेत्वनूढभार्येशूद्रेत्रिवर्षोर्ध्वंद्वादशाहः षडब्दोर्ध्वंमासः षडब्दात्प्रागपिकृतोद्वाहेमासइत्याहुः एतत्तुल्यंवयसिसर्वेषामितिविरोधाच्छिष्टविगानान्नादर्तव्यमितिविज्ञानेश्वरादयः दाक्षिणात्यानांतथैव अन्यदेशेप्रागुक्तमितिगौडाः एवंकन्यास्वपि तास्वप्यजातदंतासुपित्रोरेकरात्रमितिमाधवः यत्तुविज्ञानेश्वरेणोक्तं ऊनद्विवर्षउभयोः सूतकंमातुरेवहीतियाज्ञवल्क्योक्तेः गर्भस्थेप्रेतेमातुर्दशाहंजातउभयोः कृतेनाम्निसोदराणांचेतिपैंग्योक्तेश्च पित्रोः सोदराणांचदशाहमस्पृश्यत्वमितितन्नेदानींप्रचरति अतएवस्मृत्यर्थसारेतन्नादृतं कन्यासुचौलात्प्राड्मृतौस्नानं अचूडायांतुकन्यायांसद्यः शौचंविधीयतइत्यापस्तंबोक्तेः इदंत्रिपुरुषमध्ये अप्रत्तानांतुस्त्रीणांत्रिपुरुषीविज्ञायतइतिवसिष्ठोक्तेः इदंवाग्दानोत्तरमितिगौडाः अप्रत्तानांतथास्त्रीणांसापिंड्यंसाप्तपौरुषमितिवचनात् ।

दहा दिवसांनंतर मृत असतां आईबापांना तर सर्वत्र तीन दिवस आशौच . कारण , " दांत उत्पन्न न झालेल्या बालकाचें तीन दिवस आशौच " असें कश्यपाचें वचन आहे . आणि " बीजाचा संबंध असल्यामुळें तीन दिवस अशुद्धि होते " असें मनुवचनही आहे . शुद्धितत्त्व इत्यादि गौडग्रंथकार तर - " दंत उत्पन्न होण्याच्या पूर्वीं मृत असतां आईबापांना एक दिवस आशौच . दांत उत्पन्न झाले असतां जर आई बाप निर्गुण असतील तर त्यांना तीन दिवस आशौच . " ह्या कौर्मवचनावरुनच पूर्वोक्त कश्यपवचन शूद्राविषयीं आहे . कारण , " अविवाहित ज्या कन्या तसेच शूद्र यांचें तीन दिवस आशौच " असें शंखवचन आहे . आणि " सहा महिन्यांचें मूल मृत असलें तरी शूद्राला तीन दिवस आशौच होतें " असें मत्स्यसूक्तवचनही आहे . दंत उत्पन्न झालेला मृत असतां शूद्राला तर पांच दिवस आशौच , असें अंगिरा सांगतो - " तीन वर्षांच्या आंतील शूद्र मृत असतां पांच दिवसांनीं शुद्धि होते . तीन वर्षानंतरचा शुद्र मृत असतां बारा दिवस आशौच . सहा वर्षांच्या पुढचा शूद्र मरेल तर एक महिना त्याचें आशौच होते , असें अंगिरसाचें सांगणें आहे . " आतां जें अविवाहित शूद्राचें एक महिना आशौच शंखानें सांगितलें तें गुणवंतशूद्रविषयक आहे . निर्गुण असून अविवाहित शूद्र मृत असेल तर तीन वर्षानंतर बारा दिवस . सहा वर्षांनंतर एक महिना . सहा वर्षांच्या पूर्वीं देखील विवाह केलेला असेल तर एक महिना आशौच असें सांगतात . हें गौडमत " वयाच्या निमित्तानें उक्त आशौच सर्वांना ( ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र यांना ) समान आहे " या वचनाशीं विरोध येत असल्यामुळें आणि शिष्टांनीं निंदित असल्यामुळें ग्रहण करण्यास योग्य नाहीं , असें विज्ञानेश्वर इत्यादि ग्रंथकार सांगतात . दाक्षिणात्य शूद्रांना तसेंच ( वयोनिमित्तक सर्वांना समानच ) आहे . इतर देशांतील शूद्रांना पूर्वोक्त समजावें , असें गौड सांगतात . वर सांगितलेलें दशाहानंतर मृत असतां मातापितरांना तीन दिवस आशौच तें तसेंच कन्याविषयीं देखील समजावें . कन्या दांत उत्पन्न होण्याच्या पूर्वीं मृत असतील तर आईबापाला एक दिवस आशौच , असें माधव सांगतो . आतां जें विज्ञानेश्वरानें सांगितलें कीं , " दोन वर्षांच्या आंतील मृत असतां आईबाप या दोघांना आशौच , आणि प्रसूतिनिमित्तक मातेलाच आशौच " ह्या याज्ञवल्क्यवचनावरुन आणि " गर्भस्य मृत असतां मातेला दशाह आशौच , उत्पन्न झालेला मृत असतां आईबाप या दोघांना दहा दिवस , आणि नामकरण केलेला मृत असतां मातापितरांना आणि सहोदर भ्रात्यांनाही दहा दिवस आशौच " ह्या पैंगीच्या वचनावरुनही आईबापांना आणि सहोदर भ्रात्यांनाही दहा दिवस अस्पृश्यत्वरुप आशौच , असें सांगितलें तें सांप्रतकालीं प्रचारांत नाहीं . म्हणूनच स्मृत्यर्थसारांत तें स्वीकारिलेलें नाहीं . चौलाच्या पूर्वीं कन्या मृत असतां स्नान . कारण , " चूडाकर्म न केलेली कन्या मृत असतां सद्यः शौच सांगितलें आहे " असें आपस्तंबवचन आहे . हें आशौच तीन पुरुषांमध्यें समजावें . कारण , " अविवाहित कन्यांचें त्रिपुरुष सापिंड्य सांगितलें आहे " असें वसिष्ठ वचन आहे . हें सापिंड्य वाग्दानोत्तर समजावें , असें गौड सांगतात . कारण , " अविवाहित स्त्रियांचें सात पुरुष सापिंड्य आहे " असें वचन आहे .

चौलोत्तरंवाग्दानात्पूर्वंतास्वेकाहः अविशेषेणवर्णानामर्वाक्संस्कारकर्मणः त्रिरात्रात्तुभवेच्छुद्धिः कन्यास्वह्नाविधीयतइत्यंगिरसा त्रिरात्रविषयेहोविधानात् अतः शूद्रस्योपनयनस्थानीयविवाहात्पूर्वंत्रिरात्रं विवाहोत्कर्षेतुषोडशाब्दमध्येत्रिरात्रमेवेत्यपरार्काद्याः शूद्रेतुनिर्गुणेत्र्यब्दोर्ध्वंपंचाहः षडब्दोर्ध्वंविवाहाभावेपिद्वादशाहइतिगौडाः सगुणानांषोडशाब्दोर्ध्वंतुविवाहाभावेपिपूर्णाशौचंवक्ष्यते तदुत्तरंप्राग्विवाहाद्भर्तृकुलेपितृकुलेचसप्तपुरुषाविधित्रिरात्रं अवारिपूर्वंप्रत्तातुयानैवप्रतिपादिता असंस्कृतातुसाज्ञेयात्रिरात्रमुभयोः स्मृतमितिमरीच्युक्तेः रत्नाकरेशुद्धितत्त्वेचशंखः पितृवेश्मनियानारीरजः पश्यत्यसंस्कृता तस्यांमृतायांनाशौचंकदाचिदपिशाम्यति यावज्जीवमाशौचमितिवाचस्पतिमिश्राः ।

चौलानंतर वाग्दानाच्या पूर्वीं कन्यांविषयीं एक दिवस आशौच . कारण , " सर्व वर्णांची , संस्कार करण्याच्या पूर्वीं मृत असतां तीन दिवसांनीं शुद्धि आणि कन्या मृत असतां एका दिवसानें शुद्धि होते . " या अंगिरसाच्या वचनानें त्रिरात्राविषयीं एका दिवसाचें विधान आहे . या वचनावरुन , शूद्राचा उपनयनस्थानीं विवाह असल्यामुळें त्याचें विवाहाच्या पूर्वीं त्रिरात्र आशौच . विवाह लांबला असतां सोळा वर्षांच्या आंत मृत असतां त्रिरात्रच आशौच , असें अपरार्कादिक ग्रंथकार सांगतात . निर्गुण शूद्र असेल तर तीन वर्षांनंतर पांच दिवस आशौच . सहा वर्षांनंतर विवाह नसेल तर बारा दिवस आशौच , असें गौड सांगतात . शूद्र गुणवंत असतील तर सोळा वर्षांनंतरही विवाह नसला तरी संपूर्ण आशौच पुढें सांगूं . स्त्रियांचें वाग्दानोत्तर विवाहाच्या पूर्वीं पितृकुलांत आणि पतिकुलांतही सात पुरुषांपर्यंत त्रिरात्र आशौच . कारण , " जीचें दान वाणीनें केलेलें असून उदकपूर्वक झालेलें नाहीं ती कन्या असंस्कृत ( संस्काररहित ) म्हणून समजावी . ती मृत असतां दोन्ही कुलांत त्रिरात्र आशौच सांगितलें आहे " असें मरीचिवचन आहे . रत्नाकरांत शुद्धितत्त्वांत शंख - " जी स्त्री बापाच्या घरीं अविवाहित असून रजस्वला होईल ती मृत असतां तिचें आशौच कधींही शांत होत नाहीं . " मातापिता जीवंत आहेत तोंपर्यंत आशौच , असें वाचस्पतिमिश्र सांगतात .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP