TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
यावकव्रत

तृतीय परिच्छेद - यावकव्रत

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


यावकव्रत

आतां यावकव्रत सांगतो.
अथयावकव्रतम् शंखः गोपुरीषाद्यवान्नंचमासंनित्यंसमाहितः । व्रतंतुयावकंकुर्यात्सर्वपापापनुत्तये । गोर्भक्षणार्थंयवान्
दत्वातदनंतरंगोमयमध्यनिः सृतान् यवान्गृहीत्वातैर्यवैश्चरुवत्पक्त्वातेनान्नेनैकभक्तनक्तानिकुर्वन् मासंनयेत् । एतद्यावकव्रतमित्युच्यते पूर्ववदेवयवानादायगोमूत्रेपाकंविधायपूर्ववदेवमासवर्तनेनगोमूत्रयावकव्रतमित्युच्यते अतएवाहयोगियाज्ञवल्क्यः आतृप्तेश्चारयित्वागांगोधूमान् यवमिश्रितान् । गोमयोत्थांश्चसंगृह्यपचेद्गोमूत्रयावकमिति । इतियावकव्रतलक्षणंगोमूत्रयावकव्रतलक्षणंच ।

शंख - गाईला यव चारावे, नंतर गाईच्या शेणांतून यव निघतील ते घेऊन ते शिजवून त्या अन्नानें एकभक्त, नक्त इत्यादि करुन एक महिना काढावा, म्हणजे त्याला यावकव्रत म्हणतात. ” याचप्रमाणें गाईच्या शेणांतून यव घेऊन ते गोमूत्रांत शिजवून पूर्वीप्रमाणें त्याजवर निर्वाह करुन एक मास घालविला म्हणजे त्याला गोमूत्रयावक व्रत म्हणतात. म्हणूनच सांगतो योगियाज्ञवल्क्य - “ यवमिश्रित गोधूम गाईला तृप्त होईपर्यंत चारावे, नंतर त्या गाईच्या गोमयांतून ते ग्रहण करुन गोमूत्रांत पचवून खावे, म्हणजे तें गोमूत्रयावक होतें. ” इति यावकव्रतं गोमूत्रयावकव्रतं च.

अथपयोव्रतम् तत्र कृच्छ्रातिकृच्छ्रः पयसादिवसानेकविंशतिमितियाज्ञवल्क्योक्तप्रकारेणमासमेकग्रासमात्रपरिपूर्णपयसावर्तनंपयोव्रतमित्युच्यते यस्मिन् व्रतेयेनद्रव्येणशरीरवर्तनंक्रियतेतद्ब्रतंतेनव्यपदिश्यते अतएवमार्कंडेयः पत्रैर्मतः पत्रकृच्छ्रः पुष्पैस्तत्कृच्छ्रउच्यते । मूलकृच्छ्रः स्मृतोमूलैस्तोयकृच्छ्रोजलेनत्विति । इतिपयोव्रतम् ।

आतां पयोव्रत सांगतो - “ केवळ दुधानें एकवीस दिवस वर्तन केलें असतां तो कृच्छ्रातिकृच्छ्र होतो. ” ह्या याज्ञवल्क्योक्त प्रकारानें एक मासपर्यंत अन्नाच्या एक ग्रास परिमित दुग्धानें वर्तन करणें हें पयोव्रत म्हटलें आहे. ज्या व्रतांत ज्या द्रव्यानें शरीराचें वर्तन ( निर्वाह ) केलें जातें त्या व्रतास तें नांव मिळतें. म्हणूनच मार्केंडेय सांगतो - “ पत्रांनीं ( पर्णांनीं ) जो होतो तो पत्रकृच्छ्र. पुष्पांनीं ( पुष्पभक्षणानें ) जो होतो तो पुष्पकृच्छ्र. मूळांनीं जो होतो तो मूलकृच्छ्र. आणि उदकानें केला जातो तो उदककृच्छ्र होय. ” इति पयोव्रतम्.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:27.0370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

chinoiserie

  • न. चिनी पद्धतीचे शिल्प 
RANDOM WORD

Did you know?

पितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात? उपाय काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.