TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
अन्नांचें परिवेषण

तृतीयपरिच्छेद - अन्नांचें परिवेषण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

अन्नांचें परिवेषण

आतां अन्नांचें परिवेषण सांगतो -

अथपरिवेषणं तच्चोपवीत्येवाज्येनदेवपूर्वमामासुपक्कमितिपात्राण्युपस्तीर्यकुर्यादितिहेमाद्रिः भारतेदानधर्मेपि आज्याहुतिंविनानैवयत्किंचित्परिविष्यते दुराचारैश्चयद्भुक्तंतंभागंरक्षसांविदुः तत्रैवशौनकः विधिनादेवपूर्वंतुपरिवेषणमाचरेत् तत्रैवधर्मः फलस्यानंतताप्रोक्तास्वयंचपरिवेषणे तत्रैववायुभविष्ययोः भार्ययाश्राद्धकालेतुप्रशस्तंपरिवेषणं ब्रह्मांडे नापवित्रेणनैकेनहस्तेननविनाकुशम् नायसेनायसेनैवश्राद्धेतुपरिवेषयेत् वसिष्ठः आयसेनतुपात्रेणयदन्नंसंप्रदीयते भोक्ताविष्ठासमंभुंक्तेदाताचनरकंव्रजेत् पैठीनसिः सीसकायसरीतिपात्राण्ययज्ञियानि तत्रैवहारीतः सौवर्णराजताभ्यांचखड्गेनौदुंबरेणवा दत्तमक्षय्यतांयातिफल्गुपात्रेणवापुनः कार्ष्णाजिनिः दर्व्यादेयंघृतंचान्नंसमस्तव्यंजनानिच उदकंचैवपक्कान्नंनोदर्व्यातुकदाचन यमः पंक्त्यांविषमधातुश्चनिष्कृतिर्नैवविद्यते पृथ्वीचंद्रोदयेपराशरः सर्वदाचतिलाग्राह्याः पितृकृत्येविशेषतः भोज्यपात्रेतिलान् दृष्ट्वानिराशाः पितरोगताः चंद्रिकायांवृद्धशातातपः हस्तदत्तास्तुयेस्नेहालवणव्यंजनादयः पितृणांनोपतिष्ठंतिभोक्ताभुंजीतकिल्बिषं घृतपात्रेविशेषोग्रंथांतरे ओदनेपरमान्नेचपात्रमासाद्यमुग्धधीः घृतेनपूरयेत्पात्रंतद्दृतंरुधिरंभवेत् घृतादिपात्राणिभूमौस्थापयेन्नभोजनपात्रइतिमदनरत्ने संग्रहे हस्तदत्तंतुनाश्नीयाल्लवणव्यंजनादिकम् अपक्कंतैलपक्कंचहस्तेनैवप्रदीयते ।

तें परिवेषण उपवीतीनेंच पूर्वीं ‘ आमासुपक्क० ’ या मंत्रानें देवपूर्वक सर्वपात्रांना घृत लावून नंतर करावें , असें हेमाद्रि सांगतो . भारतांत दानधर्मांतही - " पात्रांवर आज्य ( तूप ) लावल्याशिवाय जें अन्न वाढितात तें आणि दुराचारी ब्राह्मण जें भक्षण करितात तें हा सारा राक्षसांचा भाग आहे , असें सांगतात . " तेथेंच शौनक - " सांगितलेल्या विधीनें पहिल्यानें देवांच्या पात्रांवर नंतर पितरांच्या पात्रांवर अन्न वाढावें . तेथेंच धर्म - " स्वतः अन्न वाढलें असतां फल अनंत प्राप्त होतें . " तेथेंच वायु भविष्यपुराणांत - " श्राद्धकालीं भार्येनें परिवेषण करणें ( वाढणें ) प्रशस्त आहे . " ब्रह्मांडांत - " श्राद्धांत अपवित्र हस्तानें , एका हस्तानें व कुशरहित हस्तानें वाढूं नये . " लोहपात्रांत व लोहपात्रानें वाढूं नये . " वसिष्ठ - " लोहपात्रानें जें अन्न वाढतात तें अन्न भक्षण करणारा विष्ठातुल्य भक्षण करितो , आणि दाता नरकास जातो . " पैठीनसि - " शिसें , लोखंड , पितळ यांचीं पात्रें यज्ञाला अयोग्य आहेत . " तेथेंच हारीत - " सोनेंरुप्यांचीं पात्रें , खड्गपात्र , किंवा ताम्रपात्र , यांनीं वाढलेलें अथवा फल्गुपात्रानें वाढलेलें अन्न अक्षय होतें . " कार्ष्णाजिनि - " घृत , अन्न , सारीं व्यंजनें ( कोशिंबिरी वगैरे ) हीं पळीनें वाढावीं . उदक आणि पक्कान्न हें पळीनें कधींही वाढूं नये . " यम - " एका पंक्तींत विषम ( एकास एक दुसर्‍यास एक असें ) वाढणारास निष्कृति ( पापमुक्ति , प्रायश्चित्त ) सांगितली नाहीं . ’’ पृथ्वीचंद्रोदयांत पराशर - " सर्वकालीं तिल ग्राह्य आहेत , पितृकृत्यांत विशेष ग्राह्य आहेत ; परंतु भोजनाच्या पात्रांवर तिल दिसले असतां पितर निराश होऊन जातात . " चंद्रिकेंत वृद्धशातातप - " स्नेह ( घृतादिक ), लवण , व्यंजनें ( कोशिंबिरी वगैरे ) इत्यादिक पदार्थ हातानें वाढले असतां ते पितरांस प्राप्त होत नाहींत , आणि भोक्ता ब्राह्मण पाप खातो . " घृतपात्राविषयीं विशेष सांगतो ग्रंथांतरांत - " जो मूढ मनुष्य भातांत किंवा पायसांत पात्र ठेऊन तुपानें भरितो त्याचें तें तूप रुधिरतुल्य ( रक्तसदृश ) होतें . " घृतादिकांचीं पात्रें भूमीवर ठेवावीं , भोजनपात्रावर ठेऊं नयेत . असें मदनरत्नांत सांगितलें आहे . संग्रहांत - " लवण , चटण्या , कोशिंबिरी , मेतकूट वगैरे , हे पदार्थ हातानें वाढलेले ब्राह्मणांनीं भक्षण करुं नयेत ; अपक्क पदार्थ आणि तैलपक्क पदार्थ हे हातानें वाढावे . "

पात्रालंभनमुक्तंचतुर्विंशतिमते उत्तानंदक्षिणंसव्यंनीचंपात्राण्युपस्पृशेत् ‍ याज्ञवल्क्यः दत्वान्नं पृथिवीपात्रमितिपात्राभिमंत्रणम् ‍ कृत्वेदंविष्णुरित्यन्नेद्विजांगृष्ठंनिवेशयेत् ‍ बौधायनः विप्रांगुष्ठेनानखेनानु दिशति पृथिवीतेपात्रंद्यौरपिधानंब्राह्मणस्यमुखे‍ऽमृते‍ऽमृतंजुहोमि ब्राह्मणानांत्वाविद्यावतांप्राणापानयोर्जुहोम्य

क्षितमसिमामेपितृणांक्षेष्ठाअमुत्रामुष्मिंल्लोकेइति अद्यजुहोम्यग्रेस्वाहाशब्दः कातीयसूत्रेउक्तः पैत्रेस्वधाशब्दः अंगुष्ठेविशेषमाहहेमाद्रौधौम्यः परिवृत्यनचांगुष्ठंद्विजस्यान्नेनिवेशयेत् ‍ तथा उत्तानेनतुहस्तेनद्विजांगुष्ठनिवेशनं यः करोतिद्विजोमोहात्तद्वैरक्षांसिभुंजते तत्रैवयमः विष्णोहव्यंचकव्यंचब्रूयाद्रक्षस्वचक्रमात् ‍ दैवेपित्र्येचेत्यर्थः तत्रैवात्रिः संबंधनामगोत्राणिइदमन्नंततः स्वधा पितृक्रमादुदीर्येतिस्वसत्तांविनिवर्तयेत् ‍ हस्तेनामुक्तमन्नाद्यमिदमन्नमुदीरयेत् ‍ अत्रान्नदानेचतुर्थीस्यादित्यादिविशेषाः पूर्वमुक्ताः अत्रपूर्वोक्तमंत्रांतेपुरुरवार्द्रवसंज्ञकाविश्वेदेवादेवताइदमन्नंसपरिकरंहव्यंअयंब्राह्मणस्त्वाहवनीयार्थेदत्तंदास्यमानंचातृप्तेः गयेयंभूः गदाधरोभोक्ता इदमन्नंब्रह्मसौवर्णपात्रस्थमन्नमक्षय्यवटच्छायास्थंअमुकेभ्योविश्वेभ्योदेवेभ्यइदमन्नममृतरुपंपरिविष्टंपरिवेक्ष्यमाणंचातृप्तेः स्वाहानमोनममेतिबह्वृचपरिशिष्टहेमाद्याद्यनुमतः प्रयोगः एवंपित्र्येअमुकगोत्रवसुरुपादितत्तन्नामज्ञेयम् ‍ ततोयेदेवासइतिदैवेयेचेहपितरइतिपित्र्येकेचिज्जपंति ।

अन्न निवेदनाविषयीं पात्राचें आलंभन ( धरणें ) सांगतो चतुर्विंशतिमतांत - " पित्र्यपात्रें दक्षिणहस्त उताणा खालीं व वामहस्त वर ठेऊन धरावीं , आणि दैवपात्रें वामहस्त खालीं व दक्षिण हस्त वर ठेऊन धरावीं . " याज्ञवल्क्य - " अन्न वाढून ( पृथिवी ते पात्रं० ’ ह्या मंत्रानें पात्राचें अभिमंत्रण करुन ‘ इदंविष्णु० ’ या मंत्रानें ब्राह्मणाचा अंगुष्ठ ( आंगठा ) अन्नावर ठेवावा . " बौधायन - " ब्राह्मणाचा नखरहित अंगुष्ठ लावून निवेदन करावें . " निवेदनमंत्र असा - ‘ पृथिवी ते पात्रं द्यौरपिधानं ब्राह्मणस्य० अमुत्रामुष्मिंल्लोके ’ या मंत्रांत प्रथम आलेल्या ‘ जुहोमि ’ या पदाच्या पुढें कातीयसूत्रांत ‘ स्वाहा ’ शब्द उक्त आहे . पित्रांकडे ‘ स्वधा ’ शब्द उच्चारावा . अंगुष्ठाविषयीं विशेष सांगतो हेमाद्रींत धौम्य - " ब्राह्मणाचा अंगुष्ठ फिरवून अन्नांत निवेशन करुं नये . तसेंच - जो यजमान अज्ञानेंकरुन उताण्या हस्तानें अन्नांत ब्राह्मणाच्या अंगुष्ठाचें निवेशन करितो , त्याचें तें अन्न राक्षस खातात . ’’ तेथेंच यम - " देवांकडे ‘ विष्णो हव्यं रक्षस्व ’ व पित्रांकडे ‘ विष्णो कव्यं रक्षस्व ’ असें अनुक्रमानें म्हणावें . " तेथेंच अत्रि - " पिता , पितामह इत्यादि क्रमानें संबंध , नांव , गोत्र यांचा उच्चार करुन ‘ इदमन्नं० ’ इत्यादि म्हणून नंतर ‘ स्वधा ’ शब्द उच्चारावा , आणि अन्नावरची आपली सत्ता निवृत्त करावी , अन्नादिकांवरचा हात न सोडतां ‘ इदमन्नं० ’ असें म्हणावें . " या ठिकाणीं ‘ अन्नदानाविषयीं चतुर्थी करावी ’ इत्यादि विशेष पूर्वीं सांगितले आहेत . एथें वर सांगितलेल्या बौधायनमंत्राच्या अंतीं ‘ पुरुरवार्द्रवसंज्ञका विश्वेदेवा देवता० स्वाहा नमोनमम ’ असा मंत्र म्हणावा , हा प्रयोग बह्वृचपरिशिष्ट , हेमाद्रि इत्यादिकांस अनुमत आहे . याप्रमाणें पित्रांकडे अमुक नाम अमुकगोत्र अमुकरुप इत्यादि ज्याचें जें असेल त्याचें तें उच्चारावें . तदनंतर देवांकडे ‘ ये देवासो० ’ हा मंत्र , पितरांकडे ‘ येचेहपितरो० ’ हा मंत्र कोणी म्हणतात .

ततोछिद्रंवाचयेत् ‍ तत्रैवप्रचेताः आपोशनकरेविप्रेसंकल्प्याच्छिद्रभाषणात् ‍ निराशाः पितरोयांतिदेवैः सहनसंशयः पारस्करः संकल्प्यपितृदेवेभ्यः सावित्रीमधुमज्जपः श्राद्धंनिवेद्यापोशनंजुषप्रैषोथभोजनं निवेद्येतिब्रह्मार्पणंकृत्वेत्यर्थः अतएवबृहन्नारदीयेन्नत्यागमुक्त्वोक्तं दत्तंहविश्चतत्कर्मविष्णवेवैसमर्पयेदिति यत्तुकृत्यरत्नेकार्ष्णाजिनिः अपसव्येनकर्तव्यंपितृकृत्यमशेषतः अन्नदानादृतेसर्वमेवंमातामहेष्वपीति तदप्येतत्परं तच्च ब्रह्मार्पणंब्रह्महविः हरिर्दाता चतुर्भिश्चेतिकेचित्पठंति धर्मप्रदीपे ततोन्नंपितृदेवेभ्यः संकल्प्यच यथाविधि दत्तंयद्दास्यमानंचआतृप्तेर्नममेतिच तथा श्राद्धीयान्नस्यसंकल्पोभूमावेवप्रदीयते हस्तेषुदीयमानंतुपितृणांनोपतिष्ठते वैश्वदेवस्यवामेतुपितृपात्रस्यदक्षिणे संकल्पोदकदानेस्यान्नित्यश्राद्धेयथारुचि प्रचेताः आपोशनंप्रदायाथसावित्रींत्रिर्जपेदथ मधुवाताइतितृचंमध्वित्येतत्र्त्रिकंतथा मिताक्षरायांपारस्करः संकल्प्य पितृदेवेभ्यः सावित्रीमधुमज्जपः श्राद्धंनिवेद्यापोशनंजुषप्रैषोथभोजनं गायत्रींत्रिः सकृद्वापिजपेव्द्याह्रतिपूर्विकां मधुवाताइतितृचंमध्वित्येतत्र्त्रिकंतथा याज्ञवल्क्यः सव्याह्रतिंचगायत्रींमधुवाताइतितृचं जप्त्वायथासुखं वाच्यंभुंजीरंस्तेपिवाग्यताः यथासुखंजुषध्वमितिवाच्यं अत्रिः असंकल्पितमन्नाद्यंपाणिभ्यांयद्युपस्पृशेत् ‍ अभोज्यंतद्भवेदन्नंपितृणांनोपतिष्ठते अन्नंदत्तंनगृह्णीयाद्यावत्तोयंनसंपिबेत् ‍ आपोशनेविशेषमाहस्मृतिसमुच्चये आपोशनंवामभागेसुरापानसमंभवेत् ‍ दक्षभागेतुयः कुर्यात्सोमपानसमंभवेत् ‍ तथा पुनरापूर्यापोशनंसुरा पानसमंभवेत् ‍ हेमाद्रावत्रिः दत्तेवाप्यथवादत्तेभूमौयोनिक्षिपेद्बलिं तदन्नंनिष्फलंयातिनिराशैः पितृभिर्गतैः केचिदाज्येनकुर्वंति तन्न पायसेनतथाज्येनमाषान्नेनतथैवच नकुर्याद्बलिदानंतुओदनेनप्रकल्पयेदितिस्मृतिसारेनिषेधात् ‍ शंखः श्राद्धेनियुक्तान् ‍ भुंजानान्नपृच्छेल्लवणादितु उच्छिष्टाः पितरोयांतिपृच्छतोनात्रसंशयः ।

तदनंतर ब्राह्मणाकडून ‘ जायतां सर्वमच्छिद्रं ’ असें म्हणवावें . तेथेंच प्रचेता - " ब्राह्मणाच्या हातावर आपोशन असतां संकल्प केला ( उदक सोडलें ) किंवा अच्छिद्रभाषण करविलें तर देवांसह पितर निराश होऊन जातात . " म्हणून हातावर उदक देऊन संकल्पादि करुं नये . पारस्कर - " देवपितरांला अन्नाचें उदक सोडून ब्रह्मार्पण करुन गायत्री , मधुमतीऋचा यांचा जप करावा , नंतर ब्राह्मणांनीं आपोशन घ्यावें . नंतर कर्त्यानें ‘ जुषध्वं ’ असें म्हणावें . ब्राह्मणांनीं ‘ जुषामहे ’ असें म्हणून भोजन करावें . " वचनांत ‘ निवेद्य ’ असें आहे त्याचा अर्थ - ब्रह्मार्पणकरुन असा समजावा . म्हणूनच बृहन्नारदीयांत - अन्नाचें दान सांगून सांगितलें कीं , " दिलेलें हवि व तें सारें कर्म विष्णूला अर्पण करावें . " आतां जें कृत्यरत्नांत कार्ष्णाजिनि सांगतो कीं , " अन्नदानावांचून बाकीचें सारें पितृकृत्य अपसव्यानें करावें , याप्रमाणें मातामहकृत्यही अपसव्यानें करावें , अन्नदान सव्यानें करावें " तें सव्यानें अन्नदान ‘ ब्रह्मार्पणं ब्रह्महविः० ’ ‘ हरिर्दाता० ’ ‘ चतुर्भिश्च० ’ या मंत्रांनीं केचित् ‍ करितात . धर्मप्रदीपांत - " तदनंतर देवपितरांला अन्नदानाचा यथाविधि संकल्प करुन ‘ दत्तं यद्दास्यमानं चातृप्तेर्नमम ’ असें म्हणावें . तसेंच श्राद्धीय अन्नाच्या संकल्पाचें उदक भूमीवरच द्यावें , ब्राह्मणांच्या हातांवर दिलें तर पितरांला तें प्राप्त होत नाहीं . विश्वेदेवांच्या वामभागीं व पितृपात्रांच्या दक्षिणभागीं संकल्पोदकें द्यावीं . नित्यश्राद्धांत इच्छेप्रमाणें द्यावें . " प्रचेता - " आपोशन देऊन गायत्रीचा त्रिवार जप करावा , ‘ मधुवाता० ’ या तीन ऋचा आणि ‘ मधु ’ हा शब्द त्रिवार म्हणावा " याज्ञवल्क्य - " व्याह्रतींसह गायत्री व ‘ मधुवाता० ’ या तीन ऋचा जपून ‘ यथासुखं जुषध्वं ’ असें म्हणावें , ब्राह्मणांनीं वाणीचें नियमन करुन भोजन करावें . " अत्रि - " अन्नाचें संकल्पोदक सोडण्याच्या पूर्वीं ब्राह्मण जर हातानें त्या अन्नाला स्पर्श करील तर तें अन्न अभोज्य होतें , पितरांस प्राप्त होत नाहीं . ब्राह्मणांनीं जोंपर्यंत आपोशन घेतलें नाहीं तोंपर्यंत दिलेलें अन्न घेऊं नये . " आपोशनाविषयीं विशेष सांगतो स्मृतिसमुच्चयांत - " वामभागीं आपोशन सुरापानतुल्य होतें . दक्षिणभागीं आपोशन सोमपानतुल्य होतें . तसेंच हातावर उदक घेतल्यावर पुनः त्यांत उदक घालून आपोशन केलें असतां तें सुरापानतुल्य होतें . " हेमाद्रींत अत्रि - " आपोशनोदक दिलेलें असो किंवा न दिलेलें असो , भूमीवर जो बलिदान करितो त्याचें तें अन्न निष्फल होतें , व पितर निराश होऊन जातात . " कोणी आज्यानें बलिदान करितात . तें बरोबर नाहीं . कारण , " पायसानें , आज्यानें तसेंच भाषान्नानें बलिदान करुं नये . ओदनानें ( भातानें ) बलिदान करावें " असा स्मृतिसारांत आज्यानें बलिदानाचा सर्वत्र निषेध आहे . शंख - " श्राद्धाविषयीं नियुक्तब्राह्मण भोजन करीत असतां लवणादिकांविषयीं त्यांना प्रश्न करुं नये , प्रश्न केला असतां उच्छिष्ट पितर जातात , यांत संशय नाहीं . "

कात्यायनः अश्नवत्सुजपेत्सव्याह्रतिकांगायत्रींसकृत्र्त्रिर्वाराक्षोघ्नीः पौरुषंसूक्तमप्रतिरथमिति हेमाद्रौसौरपुराणे ऐंद्रंचपौरुषंसूक्तंश्रावयेद्ब्राह्मणांस्ततः मात्स्यपाद्मयोः ब्रह्मविष्ण्वर्करुद्राणांस्तोत्राणिविविधानिच इंद्रेशसोमसूक्तानिपावमानीश्चशक्तितः मंडलंब्राह्मणंतद्वत्प्रीतिकारिचयत्पुनः अभावेसर्वविद्यानां गायत्रीजपमाचरेत् ‍ पृथ्वीचंद्रोदयेब्राह्मे वीणावंशध्वनिंचाथविप्रेभ्यः संनिवेदयेत् ‍ जपेच्चपौरुषंसूक्तंना चिकेतत्रयंतथा त्रिमधुत्रिसुपर्णंचपावमानीर्यजूंषिच हेमाद्रावत्रिः हुंकारेणापियोब्रूयाद्धस्ताद्वापिवदेद्गुणान् ‍ भूतलाच्चोद्धरेत्पात्रंमुंचेद्धस्तेनवापिबेत् ‍ प्रौढपादोबहिः कच्छोबहिर्जानुकरोपिवा अंगुष्ठेनविनाश्नातिमुखशब्देनवापुनः पीतावशिष्टतोयानिपुनरुद्धृत्यवापिबेत् ‍ खादितार्धात्पुनः खादेन्मोदकानिफलानिच मुखेनवाधमेदन्नंनिष्ठीवेद्भाजनेपिवा इत्थमश्नन् ‍ द्विजः श्राद्धंहत्वागच्छत्यधोगतिं जाबालिः इष्टमुष्णंहविष्यंचदद्यादन्नंशनैः शनैः वृद्धशातातपः अपेक्षितंयाचितव्यंश्राद्धार्थमुपकल्पितं नयाचतेद्विजोमूढः सभवेत्पितृघातकः यत्तु यमः श्राद्धेद्विजोनैवदद्यान्नयाचेन्नैवदापयेदिति तदसंपादितवस्तुविषयमितिहेमाद्रिः हारीतः ऊर्ध्वपाणिश्चविहसन् ‍ सक्रोधोविस्मयान्वितः भुग्नपृष्ठश्चयद्भुंक्तेनतत्प्रीणातिवैपितृन् ‍ प्रचेताः नस्पृशेद्वामहस्तेनभुंजानोन्नंकदाचन नपादौनशिरोबस्तिनपदाभाजनंस्पृशेत् ‍ शंखः श्राद्धपंक्तौतुभुंजानोब्राह्मणोब्राह्मणंस्पृशेत् ‍ तदन्नमत्यजन् ‍ भुक्त्वागायत्र्यष्टशतंजपेत् ‍ उशनाः भोजनंतुननिः शेषंकुर्यात्प्राज्ञः कथंचन अन्यत्रदध्नः क्षीराद्वाक्षौद्रात्सक्तुभ्यएवच ब्राह्मे नचाश्रुपातयेज्जातुनशुष्कांगिरमीरयेत् ‍ नचोद्वीक्षेतभुंजानान्नचकुर्वीतमत्सरम् ‍ ।

कात्यायन - " ब्राह्मण भोजन करित असतां व्याह्रतिसहित गायत्री एकवार किंवा त्रिवार जपावी . राक्षोघ्नी ऋचा , पुरुषसूक्त , अप्रतिरथ ( आशुः शिशानसूक्त ), यांचा जप करावा . " हेमाद्रींत सौरपुराणांत - "- ‘ इंद्रासोमा० ’ हें सूक्त , पुरुषसूक्त हें ब्राह्मणाकडून ऐकवावें . " मात्स्यांत व पाद्मांत - " ब्रह्मा , विष्णु , सूर्य , रुद्र यांचीं अनेक स्तोत्रें ; इंद्र , ईश , सोम यांचीं सूक्तें ; पवमानऋचा ; ब्राह्मणमंडल ; तसेंच पितरांची प्रीति करणारें असेल तें याचा जप करावा , सर्वांच्या अभावीं गायत्रीचा जप करावा . " पृथ्वीचंद्रोदयांत ब्राह्मांत - " वीणा , वंश ( वेळूचें ) वाद्य हें ब्राह्मणाला भोजन करतेवेळीं ऐकवावें . पुरुषसूक्त , नाचिकेतत्रय , त्रिमधु , त्रिसुपर्ण , पावमानी आणि यजु यांचा जप करावा . " हेमाद्रींत अत्रि - " जो ब्राह्मण ‘ हुं ’ असें देखील बोलतो ; हातानें देखील पदार्थांचे गुण वर्णन करितो ; भूमीवरुन पात्र वर उचलून सोडतो ; हातानें पितो ; पाय सोडलेला , कच्छ बाहेर पडलेला , किंवा ढोपराचे बाहेर हात करुन , अंगुष्ठावांचून चार बोटांनीं असा भोजन करितो ; अथवा फूत्कारादि मुखशब्द करुन भोजन करितो ; पात्रांतील पाणी पिऊन उच्छिष्ट अवशिष्ट राहिलेलें पाणी पुनः घेऊन पितो ; लाडू - फळें इत्यादिक अर्धी खाऊन खालीं ठेवून तीं पुनः खातो ; अन्नावर मुखानें वारा घालतो ; अथवा पात्रावर थुंकतो ; याप्रमाणें भोजन करणारा ब्राह्मण श्राद्धाचा घात करुन अधोगतीस जातो . " जाबालि - " वाढणारानें आवडणारे उन्हून पदार्थ हळू हळू वाढावे . " वृद्धशातातप - " श्राद्धासाठीं उपकल्पित पदार्थांतून जो अपेक्षित असेल तो ब्राह्मणानें मागावा , जो मूढ ब्राह्मण मागत नाहीं , तो पितृघातक होतो . " आतां जें यम सांगतो कीं , " श्राद्धांत ब्राह्मणानें देऊं नये , मागूं नये व देववूं नये . " तें असंपादित पदार्थविषयक समजावें . असें हेमाद्रि सांगतो . हारीत - " हात वर करुन , हंसत हंसत , क्रोध , आश्चर्य यांनीं युक्त होऊन , पाठ वांकवून असा जो ब्राह्मण भोजन करितो , त्याच्या त्या भोजनानें पितर तृप्त होत नाहींत . " प्रचेता - " भोजन करीत असतां वामहस्तानें कधींही अन्नाला स्पर्श करुं नये . तसाच पाय , मस्तक , बस्ति ( नाभीच्या खालचा भाग ) याठिकाणीं वामहस्तानें स्पर्श करुं नये . पात्राला पाय लावूं नये . " शंख - " श्राद्धपंक्तींत ब्राह्मण भोजन करीत असतां दुसर्‍या ब्राह्मणाला स्पर्श करील तर तें अन्न न टाकतां भोजन करावें आणि भोजनोत्तर अष्टशत गायत्री जप करावा . " उशना - " ब्राह्मणानें दहीं , दूध , मध , सातू यांवांचून इतर अन्न निःशेष भोजन करुं नये ; तर पात्रावर शेष राखावें . " जेवीत असतां डोळ्यांतून पाणी कधींही काढूं नये , शुष्कवाणी बोलूं नये , इतर जेवणाराकडे पाहूं नये व मत्सर करुं नये . "

यमः स्वाध्यायंश्रावयेत्सम्यग्धर्मशास्त्राणिचैवहि प्रचेताः भुंजानेषुतुविप्रेषुऋग्यजुः सामलक्षणं जपेदभिमुखोभूत्वापित्र्यंचैवविशेषतः यजूंषिचैवरुद्रंचराक्षोघ्नीऋचएवच राक्षोघ्नीः कृणुष्वरक्षोहणमित्याद्याः तत्रैवनिगमः भुंजत्सुजपेत्पावमानीरुदीरतामध्वन्नवतीश्च अन्नवत्यः पितुंनुस्तोषमिति पृथ्वीचंद्रोदये भरद्वाजः भुंजानेषुतुविप्रेषुप्रमादात्स्रवतेगुदम् ‍ पादकृच्छ्रंततः कृत्वाअन्यंविप्रंनियोजयेत् ‍ क्षणपाद्यादि दत्वेत्यर्थः ।

यम - " स्वाध्याय ( वेद ) आणि धर्मशास्त्रें हीं ब्राह्मणाकडून ऐकवावीं . " प्रचेता - " ब्राह्मण भोजन करीत असतां अभिमुख होऊन ऋग् ‍, यजु , साम या वेदमंत्रांचा जप करावा , व पित्र्यसूक्तांचा विशेषेंकरुन जप करावा . यजु , रुद्र , आणि राक्षोघ्नी ऋचा ( कृणुष्व० , रक्षोहणं० इत्यादिक ) ह्या म्हणाव्या . " तेथेंच निगम - " ब्राह्मण भोजन करीत असतां पावमानी , उदीरता , मधुमती आणि अन्नवती ( पितुंनुस्तोषं० ) ह्या ऋचा म्हणाव्या . " पृथ्वीचंद्रोदयांत भरद्वाज - " ब्राह्मण भोजन करीत असतां प्रमादानें गुदस्त्राव होईल तर पादकृच्छ्र प्रायश्चित्त करुन इतर ब्राह्मणाची योजना क्षणपाद्यादि देऊन करावी . "

विप्रवमनेतत्रैवदक्षः निमंत्रितस्तुयः श्राद्धेभोजनेमुखनिः सृते तदैवहोमंकुर्वीतस्वाग्नौविप्रः समाहितः प्राणादिपंचभिर्मंत्रैर्यावद्दात्रिंशसंख्यया ब्राह्मणस्तुततः कृत्वाघृतप्राशनमाचरेत् ‍ ऋग्विधानेतु इंद्रायसामसूक्तेनश्राद्धविघ्नोयदाभवेत् ‍ अग्न्यादिभिर्भोजनेनश्राद्धंसंपूर्णमेवहीत्युक्तं अग्न्यादिभिरितिलौकिकाग्निस्थापनचरु निर्वापाज्यभागांतेनामगोत्रपूर्वमग्नौपितृनावाह्यसंपूज्यान्नत्यागंकृत्वाप्राणादिभिर्द्वात्रिंशदाहुतीर्हुनेदित्यर्थः भोजनेनपुनः श्राद्धेन तेनहोमः पुनः श्राद्धंचेतिपक्षद्वयमुक्तं सूक्तजपस्तूभयानुगतः स्मृतिसंग्रहे प्राधान्यंपिंडदान स्यभोजनस्यतदंगता अतोभुक्तिक्रियाहानौश्राद्धावृत्तिंनमन्वते पिंडदानोत्तरंवांतौहोमएवनावृत्तिः पिंडदानात् ‍ प्राग्वांतौतद्दिनेउपवासंकृत्वापरेद्युः पुनः श्राद्धंकार्यमित्यर्थः तत्रैव श्राद्धपंक्तौतुभुंजानोब्राह्मणोवमतेयदि लौकिकाग्निंप्रतिष्ठाप्यअर्चयेच्चहुताशनं तथा एकएवयदाविप्रोभोजनेछर्दितोयदि तदैवाग्निंसमाधायहोमंकुर्याद्यथाविधि द्वितीयपक्षेऋग्विधाने भोजनोपक्रमादूर्ध्वंप्रक्रमात्पूर्वतोयदि श्राद्धविघ्नेपुनः कार्यंजपहोमौनतृप्तिदौ स्मृतिसंग्रहे अकृतेपिंडदानेतुभुंजानोब्राह्मणोवमेत् ‍ पुनः पाकात्तुकर्तव्यंपिंडदानंयथाविधि पिंडदानंश्राद्धं अकृतेपिंडदानेतुपितायदिवमेत्तदा पुनः पाकंप्रकुर्वीतश्राद्धंकुर्याद्यथाविधीतितत्रैवोक्तेः तथा पित्रर्थानांत्रयाणांचप्रिताचवमतेयदि तद्दिनेचोपवासः स्यात्पुनः श्राद्धंपरेहनि वमनेवाविरेकेवातद्दिनंपरिवर्जयेत् ‍ एषुवचनेषुमूलंचिंत्यं इदंमारि काब्दिकविषयं दर्शादौतुवांतावामेनतदैवकार्यम् ‍ श्राद्धविघ्नेद्विजातीनामामश्राद्धंप्रकीर्तितं अमावास्यादिनियतंमाससंवत्सरादृतइतिमरीचिस्मृतेः श्राद्धेपिंडदानमेवप्रधानमितिकर्काचार्याः तन्मतेदक्षोक्तोहोमएवनावृत्तिः विप्रभोजनमितिमेधातिथिः भोजनपिंडदानाग्नौकरणानीतिकपर्दिधूर्तस्वामिहेमाद्यादयः तन्मतेपूर्वोक्तोनिर्णयः अन्नत्यागमात्रंप्रधानं भोजनंतुप्रतिपत्तिरुपमंगं अतोवांतौतद्धानेपिनावृत्तिरितिगौडमैथिलादयः तन्न श्राद्धस्ययागदानोभयरुपत्वात्संपूर्णदानाभावात् ‍ भोजनस्यांगत्वेपिसोमवमनेइवनैमित्तिकविधानमितियुक्तंप्रतीमः ।

ब्राह्मणाचें वमन झालें असतां तेथेंच दक्ष - " श्राद्धांत निमंत्रित ब्राह्मण भोजन करुन ओकला असतां त्या वेळींच आपल्या अग्नींत ‘ प्राणाय स्वाहा ’ या पांच मंत्रांनीं बत्तीस आहुतींचा होम करावा . ब्राह्मणानें तर घृत प्राशन करावें . " ऋग्विधानांत तर - " ज्या वेळीं श्राद्धांत विघ्न उत्पन्न होईल त्या वेळीं ‘ इंद्रायसाम० ’ सूक्त , अग्न्यादिकृत्यें आणि भोजन , यांनीं श्राद्ध संपूर्ण होतें . " वचनांत ‘ अग्न्यादिभिः ’ असें पद आहे त्याचा अर्थ - लौकिकाग्निस्थापन , चरुनिर्वाप , आज्यभाग यांच्या अंतीं नामगोत्रपूर्वक अग्नीच्या ठिकाणीं पितरांचें आवाहन करुन पूजन करुन व अन्नत्याग करुन प्राणादिमंत्रांनीं बत्तीस आहुति होम करावा , असा समजावा . ‘ भोजनेन ’ या पदाचा अर्थ - पुनः श्राद्धानें , असा आहे , तेणेंकरुन होम आणि पुनः श्राद्ध असे दोन पक्ष सांगितले . सूक्तजप तर दोन्हींपक्षीं आहे . स्मृतिसंग्रहांत - " श्राद्धांत पिंडदान प्रधान आणि भोजन हें त्याचें अंग आहे , याकरितां भोजनक्रियेची हानि झाली तरी विद्वान् ‍ श्राद्धाची आवृत्ति मानीत नाहींत . " याचें तात्पर्य - पिंडदानोत्तर वांति झाली असतां होमच , आवृत्ति नाहीं . पिंडदानाच्या पूर्वीं वांति झाली असतां त्या दिवशीं उपवास करुन दुसर्‍या दिवशीं पुनः श्राद्ध करावें . तेथेंच - श्राद्धपंक्तींत भोजन करणारा ब्राह्मण जर ओकेल तर लौकिकग्नीचें स्थापन करुन अग्नीची पूजा करावी . " तसेंच - " जर भोजन करतेवेळीं एकच ब्राह्मण ओकेल तर त्या वेळीं अग्निसंधान करुन यथाविधि होम करावा . " दुसरा पक्ष ऋग्विधानांत सांगतो - " भोजनोपक्रमानंतर प्रक्रमाच्या ( पिंडदानाच्या ) पूर्वीं जर श्राद्धविघ्न होईल तर पुनः श्राद्ध करावें ; जप व होम यांनीं पितरांची तृप्ति होत नाहीं . " स्मृतिसंग्रहांत - " पिंडदान न केलें असतां भोजन करणारा ब्राह्मण ओकेल तर पुनः पाक करुन यथाविधि पिंडदान ( श्राद्ध ) करावें . " वचनांत ‘ पिंडदान ’ असें पद आहे त्याचा अर्थ - श्राद्ध होय ; कारण , " पिंडदान न केलें असतां जर पितृस्थानाचा ब्राह्मण ओकेल तर पुनः पाक करुन यथाविधि श्राद्ध करावें , " असें तेथेंच सांगितलें आहे . तसेंच " पितरांकडच्या तीन ब्राह्मणांपैकीं जर पितृस्थानीय ब्राह्मण ओकेल तर त्या दिवशीं उपवास करुन दुसर्‍य़ा दिवशीं पुनः श्राद्ध करावें . वमन किंवा रेच ब्राह्मणांस झाले असतां तो दिवस वर्ज्य करावा . " ह्या दोन वचनांविषयीं मूल चिंत्य ( विचारणीय ) आहे . त्या दिवशीं उपवास करुन दुसर्‍या दिवशीं श्राद्ध करणें हें मासिक , आब्दिक यांविषयीं आहे . दर्शादिश्राद्धांत वांति झाली असतां त्याच दिवशीं आमश्राद्ध करावें ; कारण , " ब्राह्मणादिकांना श्राद्धविघ्न प्राप्त असतां आमश्राद्ध सांगितलें आहे . तें आमश्राद्ध मासिक किंवा सांवत्सरिक यांवांचून अमावास्यादि श्राद्धांविषयीं नियत ( निश्चित ) आहे . " असें मरीचिवचन आहे . श्राद्धांत पिंडदानच प्रधान , असें कर्काचार्य सांगतात . त्यांच्या मतीं दक्षानें वर सांगितलेला होमच करावा ; श्राद्धाची आवृत्ति ( पुनः श्राद्ध ) करुं नये . श्राद्धांत ब्राह्मणभोजन प्रधान असें मेधातिथि सांगतो . भोजन , पिंडदान , अग्नौकरण हीं तीन प्रधान , असें कपर्दि , धूर्तस्वामि , हेमाद्रि इत्यादिक सांगतात . त्यांच्या मतीं पूर्वोक्त निर्णय म्हणजे श्राद्धाची आवृत्ति समजावी . श्राद्धांत अन्नत्याग ( दान ) मात्र प्रधान . ब्राह्मणभोजन हें प्रतिपत्तिरुप अंग आहे , याकरितां वांति झाली किंवा भोजनाची हानि ( अभाव ) झाली तरी श्राद्धाची आवृत्ति नाहीं , असें गौड , मैथिल इत्यादिक सांगतात , तें बरोबर नाहीं . कारण , श्राद्ध हें याग - दान उभयरुपी आहे म्हणून मध्यें वांति झाली असतां संपूर्ण दानाचा अभाव आहे , याकरितां भोजनाला अंगत्व असलें तरी जसें - सोमवमन झालें असतां तन्निमित्तानें श्यामाकचरुचा याग सांगितला , तसें येथेंही नैमित्तिकविधान ( वमननिमित्तक होम - आवृत्ति इत्यादि ) युक्त समजतों .

अत्रेदंतत्त्वं वैश्वदेविकस्यवमनेहोमएव नावृत्तिः अंगत्वात् ‍ तच्चरक्षार्थत्वादिष्टिश्राद्धेक्रतूदक्षावित्यादिस्मृतेश्च तत्रजयान् ‍ जुहुयादितिवत् ‍ पितामहादेरपितथा पितेत्युक्तेरितिकेचित् ‍ तस्यापिप्रधानत्वात्पितृवदितितुयुक्तं सपिंडीकरणादौवार्षिकवत् ‍ सपिंडीकरणादीनियानिश्राद्धानिषोडश तत्रपिंडप्रधानत्वंप्रेतत्वविनिवर्तकमितिस्मृतेः महैकोद्दिष्टादौतूभयप्राधान्यादावृत्तिरेव एकएवद्विजोभोज्यः पिंडोप्येकोविधीयतइतिस्मृतेः वृद्धिसंकल्पनित्यश्राद्धादौतुभोजनप्राधान्याद्वांतावावृत्तिरेव वृद्धिश्राद्धेविकल्पेनपिंडदानंबुधैः स्मृतं नित्यश्राद्धमदैवंस्यात्पिंडदानविवर्जितमितिस्मृतेः भुक्तिक्रियायाः प्राधान्यंश्राद्धेसंकल्पसंज्ञके तत्रैवपित्र्यविप्रस्यतूपघातेपुनः क्रियेतिसंग्रहोक्तेश्च मघादावप्येवं तीर्थमहालयादौदर्शवदित्याशार्काद्यालोचनेनप्रतीमः ।

ब्राह्मणवमनाविषयीं खरा प्रकार म्हटला म्हणजे असा कीं , विश्वेदेव ब्राह्मणाचें वमन झालें असतां होमच करावा ; आवृत्ति नाहीं . कारण , विश्वेदेव अंग आहे . तें अंग श्राद्धरक्षणार्थ आहे ; कारण , इष्टिश्राद्धांत क्रतूदक्षौ इत्यादि स्मृतीनेंही रक्षणार्थ सांगितले आहेत . ज्या कर्मानें ऋद्धि ( समृद्धि ) प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल तेथें वैदिककर्मांत जयांचा होम सांगितला आहे , त्याप्रमाणें येथें समजावें . पितामहस्थानच्या ब्राह्मणाचें वमन झालें असतांही आवृत्ति नाहीं ; कारण , पूर्वींच्या स्मृतिसंग्रहांतील वचनांत ‘ पिता ओकतो ’ असें सांगितलें आहे , असें केचित् ‍ म्हणतात . पितामहाला देखील प्रधानत्व असल्यामुळें पित्याप्रमाणें पुनरावृत्ति करणें हें योग्य आहे . सपिंडीकरणादि श्राद्धांत पित्र्यविप्राचें पिंडदानाच्या पूर्वीं वमन झालें असतां वार्षिकाप्रमाणें दुसर्‍या दिवशीं श्राद्ध करावें . अन्यथा होम करावा . कारण , " सपिंडीकरणादिक जीं षोडश श्राद्धें त्यांत प्रेतत्वनिवृत्ति करणारे असल्यामुळें पिंड प्रधान आहेत " असें स्मृतिवचन आहे . महैकोद्दिष्टादिकांत भोजन व पिंडदान या दोघांना प्राधान्य असल्यामुळें वमन झालें असतां श्राद्धाची पुनरावृत्तीच समजावी . कारण , " महैकोद्दिष्टांत एकाच ब्राह्मणाला भोजन द्यावें , आणि पिंडही एकच करावा " या स्मृतीनें दोघांना प्राधान्य सांगितलें आहे . वृद्धिश्राद्ध , सांकल्पिकविधीनें श्राद्ध , नित्यश्राद्ध इत्यादिकांत भोजन प्रधान असल्यामुळें वांति झाली असतां आवृत्तीच करावी . कारण , " वृद्धिश्राद्धांत विकल्पानें पिंडदान सांगितलें आहे , आणि नित्यश्राद्ध देवरहित पिंडदानरहित होतें . " या स्मृतीनें वृद्ध्यादिश्राद्धांत भोजनप्राधान्य सांगितलें आहे . आणि " सांकल्पिक श्राद्धांत भोजनक्रियेला प्राधान्य आहे , त्या ठिकाणीं पित्र्यब्राह्मणाचा उपघात ( वमन ) होईल तर पुनः श्राद्ध करावें " असें संग्रहवचनही आहे . मघादिश्राद्धांतही असेंच समजावें . तीर्थश्राद्ध , महालय इत्यादिकांत दर्शाप्रमाणें , असेम आशार्कादि ग्रंथांच्या आलोचनानें समजतों .

आश्वलायनः तृप्तान् ‍ ज्ञात्वामधुमतीः श्रावयेदक्षन्नमीमदंतेतिचसंपन्नमितिपृष्ट्वायद्यदन्नमुपभुक्तंतत्तत् ‍ स्थालीपाकेनसहपिंडार्थमुद्धृत्यशेषंनिवेदयेत् ‍ अभिमतेनुमतेवेति अत्रगायत्रीमध्वितित्रिकजपोपिज्ञेयः तृप्तान् ‍ बुध्वान्नमादायसतिलंपूर्ववज्जपेदितिप्रचेतसोक्तेः व्यासः तृप्ताः स्थेतितुपृष्टास्तेब्रूयुस्तृप्ताः स्मइत्यथ अभिमतेविप्रैः स्वीकर्तुमिष्टे शौनकोपि अन्नशेषैश्चकिंकार्यमितिपृच्छेततांस्ततः तेइष्टैः सहभोक्तव्यमितिप्रत्युक्तिपूर्वकं प्रदद्युः सकलंतस्मैस्वीकुर्युर्वायथारुचि श्राद्धविशेषेप्रश्नभेदमाहहेमाद्रौविष्णुः पित्र्येस्वदितमिति गोष्ठ्यांसुश्रुतं संपन्नमित्यभ्युदये दैवेरोचतमिति आयुष्यमितिस्वैरिषु स्वैरमिच्छाश्राद्धं याज्ञवल्क्यः अन्नमादायतृप्ताः स्थशेषंचैवानुमान्यच तदन्नंप्रकिरेद्भूमौदद्यादापः सकृत्सकृत् ‍ इदंचात्रविकिरदानमन्यशाखिनां आश्वलायनानांतुपिंडांतएवसूत्रकृतोक्तम् ‍ कात्यायनस्तु विकिरोत्तरंगायत्र्यादिजपंतृप्तिप्रश्नंचाह हेमाद्रौ देवलः ततः सर्वाशनंपात्रेगृहीत्वाविविधंबुधः तेषामुच्छेषणस्थानेविकिरंभुविनिक्षिपेत् ‍ माधवीयेप्रचेताः सार्ववर्णिकमादाययेअग्नीतिभुविक्षिपेत् ‍ सचकुशेकार्यः दर्भेषुविकिरश्चयइत्युक्तेः मंत्रः कातीयः अग्निदग्धाश्चयेजीवायेप्यदग्धाः कुलेमम भूमौदत्तेनतृप्यंतुतृप्तायांतुपरांगतिमिति अन्येतु असोमपाश्चयेदेवायज्ञभागविवर्जिताः तेषामन्नंप्रदास्यामिविकिरंवैश्वदेविकमिति हेमाद्रौगोभिलोक्तेनदैवे असंस्कृतप्रमीतायेत्यागिन्योयाः कुलस्त्रियः दास्यामितेभ्योविकिरमन्नंताभ्यश्चपैतृकमित्यग्निपुराणोक्तेनपित्र्येन्नंविकीर्य येअग्निदग्धाइत्युच्छिष्टपिंडंकुशोपरिपृथग्दद्यादित्याहुः पृथ्वीचंद्रोदयेप्येवम् ‍ ब्राह्मे ततः प्रक्षाल्यहस्तौचद्विराचम्यहरिंस्मरेत् ‍ माधवीयेगौतमः विकिरमुच्छिष्टैः प्रतिपादयेत् ‍ हेमाद्रौव्यासः उच्छिष्टैरेवविकिरंसदैवप्रतिपादयेत् ‍ भृगुः पिंडवत्प्रतिपत्तिः स्याद्विकिरस्येतितौल्वलिः श्राद्धकारिकायाम् ‍ यजमानस्यदासादीनुद्दिश्यद्विजसत्तम तस्मादन्नंत्यजेद्भूमौवामभागेषुपैतृके मनुः उच्छेषणंभूमिगतमजिह्मस्याशठस्यच दासवर्गस्यतत्पित्र्येभागधेयंप्रचक्षते ।

आश्वलायन - " ब्राह्मण तृप्त झालेले जाणून मधुमती ( मधुवाता० या तीन ऋचा ) आणि ‘ अक्षन्नमीमदंत० ’ ही एक ऋचा ब्राह्मणास ऐकवाव्या . त्यांना ‘ श्राद्धं संपन्नं ’ असें विचारुन त्यांनीं ‘ सुसंपन्नं ’ असें म्हटल्यावर , जें जें अन्न ब्राह्मणांनीं भुक्त असेल त्या सर्वांतून थोडथोडें घेऊन - ज्या श्राद्धांत स्थालीपाक असेल तेथें स्थालीपाकांतील अन्न पिंडांसाठीं एकत्र करावें . जेथें स्थालीपाक नाहीं तेथें भुक्तशेष अन्नांतीलच - सर्व प्रकारचें अन्न पिंडांसाठीं घ्यावें . आणि शेष अन्न ब्राह्मणांना निवेदन करावें . ब्राह्मणांनीं स्वीकारावें किंवा ‘ इष्टैः सह भुज्यतां ’ अशी भोजनाविषयीं अनुज्ञा द्यावी . " ब्राह्मण तृप्त झाल्यावर गायत्री आणि मधुत्रिक यांचाही जप समजावा . कारण , " तृप्त झालेले जाणून सतिलअन्न ग्रहण करुन भोजनाच्या पूर्वीप्रमाणें जप करावा " असें प्रचेतसाचें वचन आहे . व्यास - " ब्राह्मणांना ‘ तृप्ताःस्थ ’ असा प्रश्न करावा , ब्राह्मणांनीं ‘ तृप्ताः स्मः ’ असें म्हणावें . " शौनकही - " ब्राह्मणांना ‘ अन्नशेषैः किं कार्यं ’ असा प्रश्न करावा , नंतर त्यांनीं ‘ इष्टैः सह भोक्तव्यं ’ असें प्रतिवचनपूर्वक सकल अन्न श्राद्धकर्त्याला द्यावें , अथवा त्यांची इच्छा असेल तर स्वीकारावें . " कांहीं श्राद्धांत वेगवेगळे प्रश्न सांगतो हेमाद्रींत विष्णु - " पित्र्यश्राद्धांत ‘ स्वदितं ’ असा प्रश्न करावा . गोष्ठीश्राद्धांत ‘ सुश्रुतं ’ असा , अभ्युदयश्राद्धांत ‘ संपन्नं ’ , दैविकश्राद्धांत ‘ रोचतं ’, ऐच्छिक श्राद्धांत ‘ आयुष्यं ’ असा प्रश्न करावा . " याज्ञवल्क्य - " अन्न घेऊन ‘ तृप्ताः स्थ ’ असा प्रश्न करुन शेषान्नाची - भोजनाविषयीं - अनुज्ञा घेऊन भूमीवर अन्नाचे विकिर द्यावे आणि विकिरांवर एक एक वेळां उदक द्यावें . " हें येथें विकिरदान इतर शाखीयांना आहे . आश्वलायनांचें तर पिंडदानाच्या अंतींच सूत्रकारानें सांगितलें आहे . कात्यायन तर - विकिर दिल्यानंतर गायत्री इत्यादि जप आणि तृप्तिप्रश्न सांगतो . हेमाद्रींत देवल - " अनेक प्रकारचें सर्व अन्न पात्रांत घेऊन ब्राह्मणांच्या उच्छिष्टांजवळ भूमीवर विकिर द्यावा . " माधवीयांत प्रचेता - " सर्व प्रकारचें अन्न घेऊन ‘ ये अग्नि० ’ या मंत्रानें भूमीवर विकिर द्यावा . " तो विकिर कुशांवर द्यावा ; कारण , " जो विकिर तो दर्भांवर देतात " असें सांगितलें आहे . याचा मंत्र कात्यायनप्रोक्त आहे तो असा - " अग्निदग्धाश्चये० परांगतिं . " अन्यग्रंथकार तर - " असोमपाश्च० वैश्वदेविकं ’ या हेमाद्रींतील गोभिलोक्त मंत्रानें देवांकडे , आणि ‘ असंस्कृतप्रमीता० पैतृकम् ‍ ’ या अग्निपुराणोक्त मंत्रानें पित्रांकडे अन्नाचा विकिर देऊन ‘ ये अग्निदग्धा० ’ या मंत्रानें उच्छिष्टपिंड कुशांवर द्यावा " असें सांगतात . पृथ्वीचंद्रोदयांतही असेंच आहे . ब्राह्मांत - " तदनंतर हस्तप्रक्षालन करुन दोन वेळां आचमन करुन हरिस्मरण करावें . " माधवीयांत गौतम - " उच्छिष्टांसह विकिर टाकावा . " हेमाद्रींत व्यास - " उच्छिष्टांसह देवांकडचा व पितरांकडचा विकिर टाकावा . " भृगु - " पिंडाप्रमाणें विकिराचें प्रतिपादन ( त्याग ) होतें , असें तौल्वलि सांगतो . " श्राद्धकारिकेंत - " पितरांच्या श्राद्धांत यजमानाच्या दासादिकांच्या उद्देशानें त्या अन्नांतून अन्न घेऊन पितरांच्या वामभागीं भूमीवर द्यावें . " मनु - " पितृकर्मांतील भूमिगत उच्छिष्ट हें निष्कपटी व सरळ मनाच्या दासवर्गाचा भाग आहे , असें ज्ञाते सांगतात . "

विष्णुः उदड्मुखेष्वाचमनमादौदद्यात्ततः प्राड्मुखेषु पित्र्येदैवेचेत्यर्थः शातातपः विश्वेदेवनिविष्टानांचरमंहस्तधावनम् ‍ हेमाद्रौवाराहे हस्तंप्रक्षाल्ययश्चापः पिबेद्भुक्त्वाद्विजः सदा तदन्नमसुरैर्भुक्तंनिराशाः पितरोगताः मरीचिः हस्तंप्रक्षाल्यगंडूषंयः पिबेदविचक्षणः आसुरंतद्भवेच्छ्राद्धंपितृणांनोपतिष्ठते तत्रैवसंग्रहे पवित्रग्रंथिमुत्सृज्यमंडलेभुविनिक्षिपेत् ‍ हस्तादीन् ‍ क्षालयेद्विद्वान् ‍ शरावादौतुकुत्रचित् ‍ व्यासः तांबूलोद्गिरणंचैवगंडूषोद्गिरणंतथा कांस्यपात्रेतथाताम्रेनकुर्वीतकदाचन उष्णोदकैर्धान्यचूर्णैः करौश्मश्रूणिशोधयेत् ‍ ।

विष्णु - " उत्तरेकडे मुख करुन बसलेल्या ( पितरांकडच्या ) ब्राह्मणांस आचमन पूर्वीं द्यावें , नंतर प्राड्मुख ( देवांकडच्या ) ब्राह्मणांस द्यावें . " शातातप - " विश्वेदेव ब्राह्मणांचें हस्तादिप्रक्षालन शेवटीं समजावें . " हेमाद्रींत वाराहांत - " जो ब्राह्मण भोजन करुन हस्तप्रक्षालन करुन उदक प्राशन करील त्या ब्राह्मणानें भुक्त अन्न तें असुरांनीं भुक्त होऊन पितर निराश होऊन गेले , असें समजावें . " मरीचि - " जो अज्ञानी ब्राह्मण हस्तप्रक्षालन करुन गंडूष प्राशन करील त्यानें भुक्त तें श्राद्ध आसुर होतें , पितरांना प्राप्त होत नाहीं . " तेथेंच संग्रहांत - " हातांतील पवित्रकाची ग्रंथि सोडून तें भूमीवर मंडलावर ठेवावें आणि कोठेंही शरावादिकांत हस्तादिकांचें क्षालन करावें . " व्यास - " कांस्यपात्रांत किंवा ताम्रपात्रांत कधींही तांबूल व गंडूष थुंकूं नये . उष्णोदकांनीं , धान्याच्या चूर्णानें हात व श्मश्रु यांचें शोधन करावें . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:22.4730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

take up a bill on its maturity

 • विनिमय पत्र को उसकी परिपक्वता पर ले लेना 
RANDOM WORD

Did you know?

why treeepad veedhee ? narrate
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.