मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धाला सूतकादि विघ्न

तृतीय परिच्छेद - श्राद्धाला सूतकादि विघ्न

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां श्राद्धाला सूतकादि विघ्न प्राप्त असतां निर्णय सांगतो -

अथश्राद्धविघ्नेनिर्णयः तत्रविप्रस्यनिमंत्रणोत्तरंसूतकेमृतकेचाशौचाभावः निमंत्रितेषुविप्रेषुप्रारब्धे श्राद्धकर्मणि निमंत्रणाद्धिविप्रस्यस्वाध्यायाद्विरतस्यच देहेपितृषुतिष्ठत्सुनाशौचंविद्यतेक्कचिदितिब्राह्मोक्तेः कर्तुस्तुविष्णुराह व्रतयज्ञविवाहेषुश्राद्धेहोमेर्चनेजपे आरब्धेसूतकंनस्यादनारब्धेतुसूतकं श्राद्धेप्रारंभस्तेनैवोक्तः प्रारंभोवरणंयज्ञेसंकल्पोव्रतसत्रयोः नांदीमुखंविवाहादौश्राद्धेपाकपरिक्रियेति माधवीयेब्राह्मेपि श्राद्धादौपितृयज्ञेचकन्यादानेचनोभवेत् ‍ मिताक्षरायांस्मृत्यंतरेसद्यः शौचंप्रकृत्य यज्ञेसंभृतसंभारेविवाहेश्राद्धकर्मणीति तिथितत्त्वादिगौडग्रंथास्तुनिमंत्रणोत्तरंकर्तुर्भोक्तुश्चनाशौचं निमंत्रणोत्तरंश्राद्धेप्रारंभः स्यादितिस्मृतिरितिविष्णूक्तेः यत्तुश्राद्धेपाकपरिक्रियेति तद्दर्शश्राद्धविषयमित्याहुः दातृगृहेमरणादौ ब्राह्मेउक्तं भोजनार्धेतुसंभुक्तेविप्रैर्दातुर्विपद्यते गृहेइतिशेषः यदाकश्चित्तदोच्छिष्टंशेषंत्यक्त्वासमाहिताः आचम्यपरकीयेनजलेनशुचयोद्विजाइति अस्यश्राद्धविषयत्वंहेमाद्रिणोक्तं पृथ्वीचंद्रोदयेप्येवं ममतुप्रतिभाति इदंविवाहादिविषयं नतुश्राद्धविषयं तत्पदाभावात् ‍ विवाहोत्सवयज्ञेष्वित्युपक्रम्य भुंजानेषुतुविप्रेषुत्वंतरामृतसूतके अन्यगेहोदकाचांताः सर्वेतेशुचयः स्मृताइति षटत्रिंशन्मतैकवाक्यात् ‍ निमंत्रितेषुविप्रेषुप्रारब्धेश्राद्धकर्मणीतिपूर्वोक्तविरोधाच्च श्राद्धेतुयद्यपिविष्णुनापाकोत्तरमशौचाभावउक्तस्तथापिकर्तुरेवसः भोक्तुर्दोषोस्त्येव अपिदातृगृहीत्रोश्चसूतकेमृतकेतथा अविज्ञातेनदोषः स्याच्छ्राद्धादिषुकथंचन विज्ञातेभोक्तुरेवस्यात्प्रायश्चित्तादिकंक्रमात् ‍ इतिमाधवीयेब्राह्मोक्तेः आदिशब्देनाशौचमुच्यते तच्चाहविष्णुः ब्राह्मणादीनामशौचे यः सकृदेवान्नमश्नातितस्यतावदाशौचंयावत्तेषामाशौचव्यपगमेप्रायश्चितंकुर्यादिति यत्तु देहेपितृषुतिष्ठत्सुनाशौचंविद्यतेक्कचिदितिब्राह्मंतच्छ्राद्धकालीनस्यनिषेधकंनतदुत्तरकालीनस्य शुद्धिदीपस्तुनिमंत्रितेष्वित्यामश्राद्धपरं भोजनार्धेष्वित्यादित्वन्नश्राद्धपरमित्याह ।

ब्राह्मणांना निमंत्रण दिल्यावर त्याच्या सपिंडांत जनन किंवा मरण झालें तरी त्यास आशौच नाहीं . कारण , " ब्राह्मणांना निमंत्रण देऊन श्राद्धकर्माला आरंभ झाला असतां निमंत्रणाच्या योगानें वेदाध्ययन बंद करणार्‍या ब्राह्मणाच्या अंगावर पितर येऊन राहिले असतां त्या ब्राह्मणाला कोणतेंही आशौच नाहीं " असें ब्राह्मवचन आहे . श्राद्धकर्त्याला तर विष्णु सांगतो - " व्रत , यज्ञ , विवाह , श्राद्ध , होम , पूजा , जप , यांचा आरंभ केला असतां सूतक नाहीं . आरंभ केला नसेल तर सूतक प्राप्त होतें . " श्राद्धाचा प्रारंभ कोणता तो त्यानेंच ( विष्णूनें ) सांगितला आहे , तो असा - " यज्ञाचा प्रारंभ ऋत्विग्वरण समजावा . व्रत आणि सत्र यांचा प्रारंभ संकल्प होय . विवाहादि मंगलकर्माचा प्रारंभ नांदीश्राद्ध होय . आणि श्राद्धाचा प्रारंभ पाकक्रिया होय . माधवीयांत ब्राह्मांतही - " श्राद्धादिकर्मांत , पित्याच्या और्ध्वदेहिकांत व कन्याविवाहांत आशौच होत नाहीं . " मिताक्षरेंत इतर स्मृतींत - सद्यः शौच प्रकरण चाललें असतां सांगतो - " सर्व सामग्री संपादन केलेल्या अशा यज्ञांत , विवाहांत आणि श्राद्धकर्मांत आशौच प्राप्त असतां सद्यः शौच ( तात्काल शुद्धि ) होते . " तिथितत्त्वादि गौडग्रंथ तर - ब्राह्मणांना निमंत्रण दिल्यानंतर कर्त्याला व भोक्त्याला आशौच नाहीं . कारण , " ब्राह्मणनिमंत्रण झाल्यावर श्राद्धाला प्रारंभ होतो , अशी स्मृति आहे . " असें विष्णुवचन आहे . आतां जें श्राद्धाचे ठायीं पाकक्रिया हा प्रारंभ , असें पूर्वीं सांगितलें तें दर्शश्राद्धविषयक आहे , असें सांगतात . श्राद्धकर्त्याच्या घरीं कोणी मृत वगैरे असतां ब्राह्मांत सांगितलें आहे तें असें - " ब्राह्मणांनीं अर्धै भोजन केलें असतां जेव्हां दात्याच्या ( यजमानाच्या ) घरांत कोणी मरेल तर त्या वेळीं ब्राह्मणांनीं शेष उच्छिष्ट टाकून पात्रावरुन उठून दुसर्‍या उदकानें आचमन केलें असतां ते ब्राह्मण शुद्ध होतात . " हें वचन श्राद्धविषयक आहे , असें हेमाद्रीनें सांगितलें आहे . पृथ्वीचंद्रोदयांतही असेंच आहे . मला तर असें वाटतें कीं , हें वचन विवाहादिविषयक आहे . श्राद्ध विषयक नाहीं ; कारण , या वचनांत श्राद्धपद नाहीं . असें मानलें असतां , विवाहोत्सव , यज्ञ यांचा उपक्रम करुन " ब्राह्मण भोजन करीत असतां मध्यंतरीं मृताशौच व जननाशौच प्राप्त असतां ब्राह्मणांनीं उठून दुसर्‍या घरांतील उदकानें आचमन करावें , म्हणजे ते सारे शुद्ध होतात . " या षटत्रिंशन्मताशीं एकवाक्यता ( समान अर्थ ) होते . आणि वरील वचन श्राद्धविषयक मानलें तर ब्राह्मणाला निमंत्रण दिलें व श्राद्धकर्माला आरंभ केला असतां आशौचाचा अभाव " म्हणून सांगितलें त्याच्याशीं विरोधही येतो . श्राद्धाचे ठायीं जरी विष्णूनें पाक झाल्यानंतर आशौच नाहीं म्हणून सांगितलें तरी तें कर्त्यालाच समजावें . भोक्त्याला दोष आहेच . कारण , " श्राद्धादिकर्मामध्यें कर्ता व भोक्ता यांना सूतकाचें व मृतकाचें ज्ञान नसतां मुळींच दोष नाहीं , ज्ञान असेल तर भोक्त्यालाच दोष आहे , म्हणून त्यानें अनुक्रमानें प्रायश्चित्तादिक करावें " असें माधवीयांत ब्राह्मवचन आहे . या वचनांत ‘ प्रायश्चित्तादिकं ’ यांत ‘ आदि ’ शब्द आहे त्यानें आशौच समजावें . तेंच आशौच विष्णु सांगतो - " ब्राह्मणादिकांच्या आशौचांत जो एकवारच अन्न भक्षण करितो त्याला , जितकें त्या ब्राह्मणादिकांस आशौच तितकें समजावें . आशौच गेल्यानंतर प्रायश्चित्त करावें . " आतां जें " अंगावर पितर आले असतां कोणतेंही आशौच नाहीं " असें पूर्वीं ब्राह्मवचन सांगितलें तें श्राद्धकालीं आशौचाचा निषेध करणारें आहे . श्राद्धोत्तर आशौचाचा निषेध करणारें नव्हे . शुद्धिदीप तर ‘ निमंत्रितेषु० ’ हें ब्राह्मवचन आमश्राद्धविषयक आहे . ‘ भोजनार्धे तु० ’ हें ब्राह्मवचन सिद्धान्नश्राद्धविषयक आहे , असें सांगतो .

प्रायश्चित्तंत्वाहमार्कंडेयः भुक्त्वातुब्राह्मणाशौचेचरेत्सांतपनंद्विजः एतत्कामतः अभ्यासेशंखः ब्राह्मणस्यतथाभुक्त्वामासमेकंव्रतीभवेदिति अज्ञानात्तुछागलेयः एकाहंचत्र्यहंपंचसप्तरात्रमभोजनम् ‍ ततः शुचिर्भवेद्विप्रः पंचगव्यंपिबेन्नरइति वर्णक्रमेणेदम् ‍ अभ्यासेतुद्वैगुण्यमित्यादिमिताक्षरामाधवीयादौज्ञेयं मिताक्षरामाधवादौतुश्राद्धेकर्तुर्भोक्तुश्चसर्वथादोषाभावउक्तः आशौचमध्येश्राद्धदिनप्राप्तौतुमाधवीयेकालादर्शेचऋष्यश्रृंगः देयेपितृणांश्राद्धेतुआशौचंजायतेयदा आशौचेतुव्यतिक्रांतेतेभ्यः श्राद्धंप्रदीयते श्राद्धचिंतामणौज्योतिषे प्रतिसांवत्सरंश्राद्धमाशौचात्पतितंचयत् ‍ मलमासेपितत्कार्यमितिभागुरिभाषितं आशौचांत्यदिनत्वेननिमित्तत्वादित्यर्थः एतन्मासिकादिपरं नदार्शिकादौ अतएवसुदर्शनभाष्ये अपरपक्षेपित्र्याणीतिनियमात् ‍ कृष्णपक्षश्राद्धलोपेप्रायश्चित्तमेव नतुगौणकालेकरणं तच्चोपवासः वेदोदितानांनित्यानांकर्मणांसमतिक्रमे स्नातकव्रतलोपेचप्रायश्चित्तमभोजनमितिमनूक्तेरित्युक्तं आशौचेतुप्रायश्चित्तमपिनमुख्यकालेअनधिकारात् ‍ ।

वरील वचनांत सांगितलेलें प्रायश्चित्त तें सांगतो मार्केंडेय - " ब्राह्मणाच्या आशौचांत ब्राह्मणानें आपल्या इच्छेनें भोजन केलें असतां सांतपन कृच्छ्र करावें . " आशौचांत वारंवार भोजन केलें असतां शंख सांगतो - " ब्राह्मणाच्या आशौचांत पुनः पुनः भोजन केलें असतां एक मास व्रत ( कृच्छ्र ) करावें . " अज्ञानानें भोजन केलें असतां सांगतो छागलेय - " ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र यांच्या आशौचांत ब्राह्मणानें न जाणून भोजन केलें असतां अनुक्रमानें एक दिवस , तीन दिवस , पांच दिवस , आणि सात दिवस उपवास करुन पंचगव्य प्राशन करावें , म्हणजे तो शुद्ध होतो . " याप्रमाणें वारंवार भोजन केलें असतां द्विगुणित प्रायश्चित्त करावें , इत्यादिप्रकार मिताक्षरा , माधवीय इत्यादि ग्रंथांतून जाणावा . मिताक्षरा , माधव इत्यादि ग्रंथांत तर श्राद्धाचे ठायीं कर्त्याला व भोक्त्याला सर्वथा दोष नाहीं , असें सांगितलें आहे . आशौचामध्यें श्राद्धदिवस प्राप्त असेल तर माधवीयांत व कालादर्शांत ऋष्यश्रृंग सांगतो - " पितरांचें श्राद्ध कर्तव्य असतां जेव्हां आशौच प्राप्त होईल तेव्हां आशौच समाप्त झाल्यानंतर पितरांना श्राद्ध द्यावें . " श्राद्धचिंतामणींत ज्योतिषांत - " मलमासांत पडलेलें सांवत्सरिक आणि पूर्वमासांतील श्राद्ध आशौचामुळें मलमासांत प्राप्त झालेलें तें मलमासांतही करावें , असें भागुरिमुनीचें सांगणें आहे . " आशौचसमाप्ति मलमासांत असल्यामुळें तो दिवस श्राद्धाला निमित्त आहे असा भाव . हें वचन मासिक , वार्षिक यांविषयीं आहे . दर्शादिविषयीं नाहीं . म्हणूनच सुदर्शनभाष्यांत - " कृष्णपक्षांत पितृकर्मै करावीं . " अशा नियमावरुन कृष्णपक्षांतील श्राद्धाचा लोप असतां प्रायश्चित्तच करावें ; गौणकालीं करणें नाहीं . तें प्रायश्चित्त उपवास होय . कारण , " वेदविहित अशा नित्यकर्मांचा अतिक्रम ( लोप ) झाला असतां आणि स्नातकाच्या व्रतांचा लोप असतां त्याला प्रायश्चित्त उपवास होय " असें मनूचें वचन आहे , असें सांगितलें आहे . अमावास्येस आशौच असेल तर प्रायश्चित्तही नाहीं . कारण , मुख्यकालीं श्राद्धाचा अधिकार नाहीं .

आशौचांते‍ऽसंभवेतुव्यासः श्राद्धविघ्नेसमुत्पन्नेत्वंतरामृतसूतके अमावास्यांप्रकुर्याद्वैशुद्धावेकेमनीषिणः हेमाद्रौषटत्रिंशन्मतेपि मासिकेचाब्दिकेत्वह्निसंप्राप्तेमृतसूतके वदंतिशुद्धौतत्कार्यंदर्शेचापिविचक्षणाः गोभिलः देयेप्रत्याब्दिकेश्राद्धेअंतरामृतसूतके आशौचानंतरंकुर्यात्तन्मासेंदुक्षयेतथा मरीचिः श्राद्धविघ्नेसमुत्पन्नेप्यविज्ञातेमृतेहनि एकादश्यांतुकर्तव्यंकृष्णपक्षेविशेषतः विशेषतइत्युक्तेः शुक्लैकादश्यामपि आशौचेतरविघ्नेएतदितिमाधवपृथ्वीचंद्रौ यत्त्वत्रिः तदहश्चेत्प्रदुष्येतकेनचित्सूतकादिना सूतकानंतरंकुर्यात्पुनस्तदहरेवचेतितत्पूर्वकालाभावेज्ञेयं एतदाब्दिकेतरश्राद्धपरं यच्चदेवलः एकोद्दिष्टेतुसंप्राप्तेयदिविघ्नः प्रजायते मासेन्यस्मिंस्तिथौतस्मिन्श्राद्धंकुर्यात्प्रयत्नतइतितदपिमासिकपरमितिमदनरत्नेहेमाद्रौच इदमपिपूर्वकालासंभवे व्याध्यादौविस्मरणेचैवंज्ञेयं ।

सांवत्सरिकादिकांचा आशौचांतीं असंभव असेल तर व्यास सांगतो - " श्राद्धामध्यें आशौच प्राप्त होऊन श्राद्धाला विघ्न उत्पन्न झालें असतां तें श्राद्ध अमावास्येस करावें . कोणी विद्वान् ‍ शुद्धी झाल्यावर करावें असें सांगतात . " हेमाद्रींत षटत्रिंशन्मतांतही - " मासिक व वार्षिक यांच्या दिवशीं आशौच प्राप्त असतां शुद्धि झाल्यावर तें श्राद्ध करावें , असें सांगतात . दर्शासही करावें , असें विद्वान् ‍ सांगतात . " गोभिल - " प्रतिवार्षिक श्राद्ध कर्तव्य असतां मध्यें आशौच प्राप्त होईल तर आशौचानंतर करावें . तसेंच त्या महिन्याच्या दर्शास करावें . मरीचि - " श्राद्धाला विघ्न प्राप्त असतां आणि मृतदिवसाचें ज्ञान नसतां एकादशीस करावें . कृष्णपक्षांत विशेषेंकरुन करावें . " विशेषतः असें सांगितल्यावरुन शुक्ल एकादशीसही करावें . आशौचावांचून इतर विघ्न असतां हें वचन आहे , असें माधव आणि पृथ्वीचंद्र हे सांगतात . आतां जें अत्रि - " कोणत्याही सूतकादिकारणामुळें तो श्राद्ध दिवस जर दुष्ट होईल तर सूतकानंतर पुनः तो दिवस ( तिथि ) येईल तेव्हांच करावें . " असें सांगतो , तें पूर्वीं सांगितलेल्या कालाचा ( आशौचांत्य दिवस व दर्श यांच्या ) अभावीं समजावें . हें वचन वार्षिकव्यतिरिक्त ( मासिकादि ) श्राद्धविषयक आहे . आतां जें देवल - " एकोद्दिष्ट प्राप्त असतां जर विघ्न उत्पन्न होईल तर दुसर्‍या मासांत त्या तिथीस श्राद्ध करावें . " हें वचनही मासिकविषयक आहे , असें मदनरत्नांत आणि हेमाद्रींत आहे . हेंही वचन पूर्वोक्तकालाच्या असंभवीं समजावें . व्याधि वगैरे उत्पन्न होऊन श्राद्ध राहिलें असतां व विस्मरण झालें असतां असेंच जाणावें .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP