मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
आशौच नाहीं तो प्रकार

तृतीय परिच्छेद - आशौच नाहीं तो प्रकार

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

आतां विधानेंकरुन आशौच नाहीं , तो प्रकार सांगतो -

अथविधानादाशौचाभावः यथा यतियुद्धमृतादिषु त्रयाणामाश्रमाणांचकुर्याद्दाहादिकाः क्रियाः यतेः किंचिन्नकर्तव्यंनचान्येषांकरोतिसइतिब्राह्मात् ‍ उशनाः एकोद्दिष्टंनकुर्वीतयतीनांचैवसर्वदा अहन्येकादशेप्राप्तेपार्वणंतुविधीयते सपिंडीकरणंतेषांनकर्तव्यंसुतादिभिः त्रिदंडग्रहणादेवप्रेतत्वंनैवजायते तत्संस्कारंवक्ष्यामः दत्तात्रेयः एकोद्दिष्टंजलंपिंडमाशौचंप्रेतसत्क्रियां नकुर्याद्वार्षिकादन्यद्ब्रह्मीभूतायभिक्षवे वार्षिकादितिपूर्वभाविमासिकादिनिषेधोनतुदर्शादेः संन्यासिनोप्याब्दिकादिपुत्रः कुर्याद्यथाविधीतिवायवीयोक्तेः पृथ्वीचंद्रोदयेप्रजापतिः अहन्येकादशेप्राप्तेपार्वणंतुविधीयते सपिंडीकरणंतस्यनकर्तव्यं सुतादिभिः एषुसपिंडनादिनिषेधानुवादेनपार्वणोक्तेस्तत्स्थानापन्नत्वंपार्वणस्यगम्यते नगिरागिरेतिब्रूयादैरं कृत्वोद्गेयमितिवत् ‍ इदंवार्षिकादिविधानंचंत्रिदंडिनामेव एकदंडिपरमहंसादीनांतुनकिमपिकार्यं पूर्वोक्तोशनोवाक्येत्रिदंडिग्रहणादितिशूलपाण्यादयोगौडाः त्रिदंडिशब्देनमनोदंडादिदंडत्रयोक्तेः यस्यैतेनियतादंडाः सत्रिदंडीतिचोच्यतइतिस्मृतेः ।

तो असा - संन्याशी मृत , युद्धांत मृत इत्यादिकांचें आशौच नाहीं . कारण , " तीन आश्रमांच्या ( ब्रह्मचारी , गृहस्थ , वानप्रस्थ यांच्या ) दाहादिक क्रिया कराव्या . संन्याशाचें कांहीं करुं नये , व तो संन्याशी इतरांचें कांहीं कर्म करीत नाहीं . ’’ असें ब्राह्मवचन आहे . उशना - " यतींचें सर्वकाळीं एकोद्दिष्ट करुं नये . अकराव्या दिवशीं पार्वण करावें . पुत्रादिकांनीं संन्याशांचें सपिंडीकरण करुं नये . त्रिदंड ग्रहण केल्यानेंच त्याला प्रेतत्व येतच नाहीं . " त्याचा संस्कार पुढें सांगूं . दत्तात्रेय - " ब्रह्मरुपी झालेल्या संन्याशाला वार्षिकावांचून इतर एकोद्दिष्ट , उदक , पिंड , आशौच आणि प्रेतक्रिया हीं कांहीं करुं नयेत . " या वचनानें वर्षाच्या आंत होणार्‍या मासिकादिकांचा निषेध केला आहे ; दर्शादिकांचा निषेध नाहीं . कारण , " संन्याशाचेंही आब्दिकादि श्राद्ध पुत्रानें यथाविधि करावें " असें वायुपुराणांतील वचन आहे . पृथ्वीचंद्रोदयांत प्रजापति - " संन्याशाचें पुत्रादिकांनीं सपिंडीकरण करुं नये . अकरावा दिवस प्राप्त असतां पार्वणश्राद्ध करावें . " या वरील वचनांत सपिंडीकरण - एकोद्दिष्ट यांच्या निषेधाचा अनुवाद ( कथन ) करुन पार्वण सांगितल्यावरुन त्यांच्या ( सपिंडनादिकांच्या ) स्थानीं पार्वण आहे , असें समजण्यांत येतें . जसें - ज्योतिष्टोमयज्ञांत असें सांगितलें आहे कीं , ‘ यज्ञायज्ञावो अग्नये गिरागिरा च दक्षसे ’ ह्या ऋचेच्या सामाचें गान करावें . त्या गानाविषयीं ब्राह्मणांत असें सांगितलें आहे कीं , ‘ न गिरागिरेति ब्रूयात् ‍, ऐरंकृत्वोद्गेयं ’ म्हणजे वरील ऋचेंत ‘ गिरागिरा ’ असें गान करुं नये , तर गकाररहित ‘ इरा ’ असें करुन गान करावें . मग गातेवेळीं ‘ इरा ’ याच्यापूर्वीं " आ , य् ‍, इ ’ हे तीन वर्ण लावून ‘ आयीरायीरा ’ असें गान करावें , असें आहे . तें जसें - ‘ गिरागिरा ’ याच्या स्थानीं ‘ आयीरायीरा ’ हें गान तसें येथें सपिंडीकरणादि स्थानीं पार्वण आहे , असें समजावें . हें एकादशाहीं पार्वण व वरील वचनानें सांगितलेलें वार्षिकादि विधान त्रिदंडीसंन्याशांसच समजावें . एकदंडी - परमहंस इत्यादिकांचें तर कांहींही करुं नये . कारण , पूर्वीं वर सांगितलेल्या उशना वाक्यांत त्रिदंडग्रहण , असें पद आहे , असें शूलपाणि इत्यादि गौड सांगतात . कारण , ‘ त्रिदंड ’ या शब्दानें मनोदंड , देहदंड , वाग्दंड , हे तीन दंड सांगितले आहेत . कारण , " ज्याला हे तीन दंड नियत आहेत तो त्रिदंडी , असा म्हटला आहे . " अशी स्मृति आहे .

बौधायनः नारायणबलिश्चास्यकर्तव्योद्वादशेहनि अस्यपार्वणेनसमुच्चयोज्ञेयः तंचसएवाह कृत्वाविष्णोर्महापूजांपायसंविनिवेदयेत् ‍ अग्नौकृत्वातुतच्छेषंव्याह्रतीभिः समाहितः यतीन्गृहस्थान्साधून्वानिमंत्र्यद्वादशावरान् ‍ अभ्यर्च्यगंधपुष्पाद्यैर्मंत्रैर्द्वादशनामभिः संभोज्यहव्येनान्येनदक्षिणांचनिवेदयेत् ‍ त्रयोदशंद्विजश्रेष्ठ मात्मज्ञंसंयतेंद्रियं विष्णुंयथातथाभ्यर्च्यपाद्याद्यैश्चविधानतः दद्यात्पुरुषसूक्तेनगंधपुष्पादिकंक्रमात् ‍ वस्त्रालंकरणादीनियथाशक्तिप्रदापयेत् ‍ उच्छिष्टसन्निधौतस्यदर्भानास्तीर्यभूतले भूर्भुवः स्वः स्वधायुक्तैस्तस्मैदद्याद्बलित्रयं अश्वमेधसहस्त्रस्यवाजपेयशतस्यच तत्फलंलभतेदेवयः करोतियतिक्रियाम् ‍ ।

बौधायन - " ह्या ( संन्याशाच्या ) बाराव्या दिवशीं नारायणबलि करावा . " नारायणबलि व पार्वण दोनीं करावीं . तो नारायणबलि तोच ( बौधायन ) सांगतो - " विष्णूची महापूजा करुन पायस नैवेद्य अर्पण करावा . त्या पायसांतील शेषाचा अग्नींत व्याह्रतींनीं होम करावा . बारांपेक्षां अधिक यति , गृहस्थ अथवा साधू यांना निमंत्रण द्यावें . आणि त्यांची विष्णूच्या द्वादश नांवांनीं व मंत्रांनीं गंधपुष्पादिकेंकरुन पूजा करावी . दुसर्‍या उत्तम अन्नानें त्या ब्राह्मणांना भोजन घालून दक्षिणा द्यावी . आत्मवेत्ता जितेंद्रिय असा तेरावा श्रेष्ठ ब्राह्मण सांगून विष्णूप्रमाणें त्याची पाद्यादिकांनीं यथाविधि पूजा करुन पुरुषसूक्तानें अनुक्रमेंकरुन गंधपुष्पादिक द्यावें . त्याला वस्त्रें , अलंकार यथाशक्ति द्यावे . त्याच्या उच्छिष्टाजवळ भूमीवर दर्भ पसरुन व्याह्रतींनीं व स्वधाशब्दानें त्याला तीन बलि ( पिंड ) द्यावे . जो पुरुष याप्रमाणें संन्याशाची क्रिया करितो त्याला सहस्त्र अश्वमेधांचें व शंभर वाजपेयांचें फल प्राप्त होतें . "

शौनकस्तु शौनकोहंप्रवक्ष्यामिनारायणबलिंपरं चंडालादुदकात्सर्पाद्ब्राह्मणाद्वैद्युतादपि दंष्ट्रिभ्यश्चपशुभ्यश्चरज्जुशस्त्रविषाश्मभिः देशांतरमृतानांचमृतानांवान्यसाधनैः जीवच्छ्राद्धमृतानांचकनिष्ठानांतथैवच यतीनांयोगिनांपुंसामन्येषांमोक्षकांक्षिणां पुण्यायाघक्षयार्थायद्वादशेहनिकारयेत् ‍ द्वादश्यांश्रवणेब्दांतेपंचम्यांपर्वणोस्तुवेत्युक्त्वा पूर्वोक्तंसर्वंविधिमुक्त्वातोदेवेतिषड्भिः पुरुषसूक्तेनप्रत्यृचंपायसंहुत्वाकेशवादिद्वादशनामभिस्तद्रूपिणेपित्रेद्वादशविप्रान् ‍ संभोज्यतैरेवद्वादशपिंडान्दद्यादित्यधिकमाह युद्धमृतेतुप्रागुक्तं कृतजीवच्छ्राद्धमृतेसपिंडैराशौचादिकार्यंनवा तदुक्तंहेमाद्रौलैंगे मृतेकुर्यान्नकुर्याद्वाजीवन्मुक्तोयतः स्वयं कालंगतेद्विजेभूमौखनेद्वापिदहेतवा पुत्रकृत्यमशेषंचकृत्वादोषोनविद्यते जीवत्यपिविशेषस्तत्रैवोक्तः नित्यंनैमित्तिकंयत्तुकुर्याद्वासंत्यजेतवा बांधवेपिमृतेतस्यनैवाशौचंविधीयते सूतकंचनसंदेहः स्नानमात्रेणशुध्यति एतद्योगिविषयम् ‍ योगमार्गरतोपिचेतितस्याप्युक्तेः तथाहिताग्नौप्रोषितमृतेतदस्थिदाहात्पूर्वंपुत्रादीनामाशौचंसंध्यादिकर्मलोपश्चनास्ति अनग्निमतउत्क्रांतेराशौचादिद्विजातिषु दाहादग्निमतोविद्याद्विदेशस्थेमृतेसतीतिस्मृतेः आहिताग्नेर्दाहात्प्रागपिदशाहः संस्कारांगंचभिन्नोदशाहइतिधूर्तस्वामीरामांडारश्च तच्चिंत्यं मूलैक्याद्वचोविरोधाच्च एतत्प्रागुक्तम् ‍ ।

शौनक तर - " मी शौनक दुसरा नारायणबलि सांगतों - चंडाल , उदक , सर्प , ब्राह्मण , वीज , दाढांचे पशु , रज्जु , शस्त्र , विष , पाषाण यांनीं मृत ; देशांतरीं मृत ; इतर साधनांनीं मृत ; जीवंतश्राद्ध करुन मृत ; कनिष्ठ मृत ; संन्याशी मृत ; योगी मृत ; व इतर मोक्षेच्छु मृत ; यांचे पुण्योत्पत्तीकरितां व पातकनाशाकरितां बाराव्या दिवशीं नारायणबलि करावा . अथवा वर्षांतीं द्वादशीस , श्रवण नक्षत्रावर , पंचमीस किंवा पर्वावर नारायणबलि करावा . " असें सांगून पूर्वीं सांगितलेला सर्व विधि सांगून ‘ अतोदेवा० १ ’ ह्या सहा ऋचांनीं व पुरुषसूक्तानें प्रत्येक ऋचेनें पायसाचा होम करुन केशवादिक बारा नांवांनीं तद्रूपी पित्याच्या उद्देशानें बारा ब्राह्मणांना भोजन घालून त्याच नांवांनीं बारा पिंड द्यावे . इतकें वरच्याहून अधिक सांगतो . युद्धमृताचें पूर्वीं सांगितलें आहे . जीवंतश्राद्ध केलेला मेला असतां त्याचें आशौचादिक सपिंडांनीं करावें , किंवा न करावें . तें सांगितलें आहे - हेमाद्रींत लिंगपुराणांत - " जीवच्छ्राद्ध केलेला मृत असतां त्याचें अंत्यकर्म करावें अथवा न करावें . कारण , तो स्वतः जीवन्मुक्त आहे . असा ब्राह्मण मृत्यूप्रत गेला असतां भूमींत पुरावा किंवा दहन करावा . पुत्रानें कर्तव्य सारें त्याचें कृत्य केलें असतां दोष नाहीं . " तो जीवंत असतांही विशेष तेथेंच सांगितला आहे - " जें त्याचें नित्यनैमित्तिक कर्म तें त्यानें करावें किंवा टाकावें . त्याचा बांधव मृत असतांही त्याला त्याचें आशौच नाहींच , व जननाशौचही नाहीं , यात संशय नाहीं . तो स्नानानेंच शुद्ध होतो . " हें लिंगपुराणवचन योग्याविषयीं आहे . कारण , " योगमार्गरतानेंही आशौचादिक करुं नयेत " या वचनानें त्यालाही आशौचाभाव सांगितला आहे . तसाच आहिताग्नि ( अग्निहोत्री ) प्रवासांत मृत असतां त्याच्या अस्थिदाहाच्या पूर्वीं पुत्रादिकांना आशौच व संध्यादिकर्मलोप नाहीं . कारण , " अग्निरहित ब्राह्मण परदेशांत मृत असतां मृत दिवसापासून आशौचादि करावें . आणि आहिताग्नि परदेशांत मृत असतां त्याच्या समंत्रक दाह दिवसापासून आशौचादि करावें . " अशी पैठीनसि स्मृति पूर्वीं सांगितली आहे . आहिताग्नीचें दाहाच्या पूर्वीं देखील दशाह . आणि संस्कारांग दशाह , तें निराळें , असें धूर्तस्वामी रामांडार सांगतात , तें चिंत्य ( अप्रमाण ) आहे . कारण , दोनीं आशौचांचें मूल एक आहे . आणि ब्राह्मादिवचनविरोधही येतो . हा प्रकार पूर्वीं अतिक्रांताशौचाजवळ सांगितला आहे .

अत्रदेहस्यैवसभवेदाहः आहिताग्नौविदेशस्थेमृतेसतिकलेवरं निधेयंनाग्निभिर्यावत्तदीयैरपिदह्यतइति ब्राह्मोक्तेः तदभावेछंदोगपरिशिष्टे विदेशमरणेस्थीनिआह्रत्याभ्यज्यसर्पिषा दाहयेद्वर्हिषाच्छाद्यपात्र न्यासादिपूर्ववत् ‍ अस्थामलाभेपर्णानिशकलान्युक्तयावृता दाहयेदस्थिसंख्यानिततः प्रभृतिसूतकं हेमाद्रौ षटत्रिंशन्मते कुर्याद्दर्भमयंप्रेतंदर्भैस्त्रिशतषष्टिभिः पालाशीभिः समिद्भिर्वासंख्याचैवंप्रकीर्तिता भविष्ये चत्वारिंशच्छिरस्थानेग्रीवायांचदशैवतु बाह्वोश्चैवशतंदद्याद्विंशतिंचतथोरसि उदरेविंशतिंदद्यात्र्त्रिंशतंकटिदेशयोः ऊर्वोश्चैवशतंदद्यात्र्त्रिशतंजानुजंघयोः पादांगुलीषुदशवैएषाचप्रेतकल्पना मदनरत्नेयज्ञपार्श्वः शिरस्यशीत्यर्धंदद्याद्ग्रीवायांचदशैवतु बाह्वोश्चैकशतंदद्याद्दशचैवांगुलीषुच उरसित्रिंशतंदद्याद्विंशतिंजठरोदरे द्वादशार्धंवृषणयोरष्टार्धंशिश्नएवतु ऊर्वोश्चैकशतंदद्यात्र्त्रिशतंजंघयोर्द्वयोः पादांगुलीषुद्वेदद्यादेतत्प्रेतस्यकल्पनम् ‍ मस्तकेनारिकेलंतुअलाबुंतालुकेतथा पंचरत्नंमुखेन्यस्यजिह्वायांकदलीफलं चक्षुषोस्तुकपर्दौद्वौनासिकायांतुकालकं कर्णयोर्ब्रह्मपत्राणिकेशेवटप्ररोहकाः नालकंकमलानांतुअन्नस्थानेविनिक्षिपेत् ‍ मृत्तिकातुवसाधातुर्हरितालकगंधकौ शुक्रेतुपारदंदद्यात्पुरीषेपित्तलंतथा संधीषुतिलपिष्टंतुमांसंस्याद्यवपिष्टकं मधुस्याल्लोहितस्थाने त्वचास्थानेमृगत्वचा स्तनयोर्जंबीरेदेयेनासायांशतपत्रकं कमलंनाभिदेशेस्याद्वृंताकेवृषणाश्रिते लिंगेचरक्तमूलंतुपरिधानंदुकूलकं गोमूत्रंगोमयंगंधंसर्वौषध्यादिसर्वतइति ।

परदेशांत मृत आहिताग्नीचें शरीर राहील तर ठेऊन त्याच्याच श्रौताग्नीनें दाह करावा . कारण , " आहिताग्नि परदेशांत मृत असतां त्याचें शरीर जोंपर्यंत त्याचे अग्नींनीं दाह होईल तोंपर्यंतही ठेवावें " असें ब्राह्मवचन आहे . शरीराच्या अभावीं सांगतो छंदोगपरिशिष्टांत - " परदेशांत मृत असतां त्याच्या अस्थि आणून त्यांना घृताचा अभ्यंग करुन दर्भांनीं आच्छादित करुन त्याच्या सभोंवतीं पात्रें वगैरे ठेऊन शरीराप्रमाणें दाह करावा . अस्थि मिळत नसतील तर अस्थींचे संख्येइतकीं पर्णशकलें उक्त रीतीनें ठेऊन दाह करावा , आणि त्या दिवसापासून सूतक धरावें . " हेमाद्रींत षटत्रिंशन्मतांत - " तीनशें साठ दर्भ घेऊन त्या दर्भांचा प्रेत करावा . अथवा पळसाच्या समिधा ( पानाचे देंठ ) तीनशें साठ घेऊन त्यांचा प्रेत करावा . ही संख्या सांगितली आहे . " भविष्यांत " मस्तकस्थानीं ४० , मानेस १० , दोन बाहूंना १०० , उरः स्थानीं २० , उदरस्थानीं २० , कटिप्रदेशीं ३० , मांड्यांचेठायीं १०० , जानु व जंघा यांच्या स्थानीं ३० पादांगुलींत १० अशा पळसाच्या समिधा ठेऊन प्रेतकल्पना करावी . " मदनरत्नांत यज्ञपार्श्व - " मस्तकावर ४० , मानेस १० , दोन बाहूंना १०० , अंगुलींत १० , उराचेठायीं ३० , उदरावर २० , वृषणास ६ , शिश्नावर ४ , मांड्यांस १०० , जंघांला ३० , पायांच्या अंगुलींस २ , ही प्रेताची कल्पना समजावी . मस्तकस्थानीं नारळ , टाळूचे ठायीं भोपळा , मुखांत पंचरत्नें , जिव्हास्थानीं केळें , नेत्रस्थानीं दोन कवडे , नाकांत तिलपत्र , कर्णस्थानीं ब्रह्मपत्रें ( पळसपत्रें ), केशस्थानीं वडाच्या पारंब्या , अंत्रस्थानीं कमलांचें नाल योजावें . चवींच्या स्थानीं माती , धातुस्थानीं हर्ताळ व गंधक , शुक्रस्थानीं पारा द्यावा . विष्ठास्थानीं गोमय , संधिस्थानीं तिलपिष्ट , मांसस्थानीं यवांचें पीठ , रक्तस्थानीं मध , त्वचास्थानीं मृगचर्म , स्तनस्थानीं लिंबू , नासास्थानीं शतपत्र ( कमलविशेष ), नाभिस्थानीं कमल , वृषणस्थानीं वांगीं , शिश्नस्थानीं रक्तमुळा , अंगावर रेशमीवस्त्र , गोमूत्र , गोमय , गंध आणि सर्व ओषधि सर्वत्र देऊन प्रेत कल्पना करावी . "

इदंनिरग्नेरपि तत्रैववृद्धमनुः प्रोषितस्यतथाकालोगतश्चेद्दादशाब्दिकः प्राप्तेत्रयोदशेवर्षेप्रेतकार्याणिकारयेत् ‍ बृहस्पतिः यस्यनश्रूयतेवार्तायावद्दादशवत्सरात् ‍ कुशपत्रकदाहेनतस्यस्यादवधारणा भविष्ये पितरिप्रोषितेयस्यनवार्तानैवचागमः ऊर्ध्वंपंचदशाद्वर्षात्कृत्वातत्प्रतिरुपकं कुर्यात्तस्यतुसंस्कारंयथोक्तविधिनाततः तदादीन्येवसर्वाणिप्रेतकर्माणिकारयेत् ‍ द्वादशाब्दप्रतीक्षापितृभिन्नविषयेतिमदनरत्नेउक्तं गृह्यकारिकायांतु तस्यपूर्ववयस्कस्यविंशत्यब्दोर्ध्वतः क्रिया ऊर्ध्वंपंचदशाब्दात्तुमध्यमेवयसिस्मृता द्वादशाद्व त्सरादूर्ध्वमुत्तरेवयसिस्मृता चांद्रायणत्रयंकृत्वात्रिंशत्कृच्छ्राणिवासुतैः कुशैः प्रतिकृतिंदग्ध्वाकार्याशौचादिकाक्रिया इत्युक्तं पराशरः देशांतरगतोनष्टस्तिथिर्नज्ञायतेयदि कृष्णाष्टमीह्ममावास्याकृष्णाचैकादशीचया उदकंपिंडदानंचतत्रश्राद्धंचकारयेत् ‍ इदंमासज्ञाने ।

वर सांगितलेला हा प्रकार निरग्निकाला ही तेथेंच सांगतो वृद्धमनु - " प्रवासास गेल्यावर वार्ता न समजल्यावांचून बारा वर्षै जाऊन तेरावें वर्ष प्राप्त असतां प्रेतकार्यै करावीं . " बृहस्पति - " बारावर्षै पर्यंत ज्याची वार्ता श्रुत होत नाहीं त्याची कुशपलाश प्रतिकृति करुन दाह करावा , हा निश्चय आहे . " भविष्यांत - " पिता प्रवासाला गेला असतां त्याची वार्ता किंवा त्याचें आगमन पंधरावर्षांपर्यंत नसेल तर पंधरावर्षांनंतर त्याचें प्रतिरुपक करुन त्याचा यथाविधि संस्कार करावा . त्या संस्कारदिवसापासूनच त्याचीं सारीं प्रेतकर्मै करावीं . " बारावर्षै प्रतीक्षा सांगितली ती पित्याहून इतरांविषयीं समजावी , असें मदनरत्नांत सांगितलें आहे . गृह्यकारिकेंत तर - " पूर्ववयाचा प्रवासांत जाऊन वार्ता न समजेल तर वीस वर्षांनंतर त्याची क्रिया करावी . मध्यमवयाचा असेल तर पंधरावर्षानंतर क्रिया करावी . उत्तरवयाचा गेला असेल तर बारावर्षानंतर क्रिया करावी . पुत्रांनीं तीन चांद्रायणें किंवा तीस कृच्छ्र प्रायश्चित्त करुन कुशांनीं प्रतिकृति करुन त्याचा दाह करुन आशौचादिक क्रिया करावी . " असें सांगितलें आहे . पराशर - " देशांतरीं जाऊन नष्ट झाला असेल व त्याची तिथि कोणती ती समजली नसेल तर कृष्ण अष्टमी , अमावास्या , कृष्णएकादशी यांतील घ्यावी . आणि त्या तिथीस उदक , पिंडदान व श्राद्ध करावें " हें मृत झालेल्या महिन्याचें ज्ञान असतां समजावें .

तत्राहिताग्नेः पूर्णाशौचं अनाहिताग्नेस्तुत्रिरात्रं अनाहिताग्नेर्देहस्तुदाह्योगृह्याग्निनास्वयं तदभावेपलाशानांवृंतैः कार्यः पुमानपि वेष्टितव्यस्तथायत्नात्कृष्णसारस्यचर्मणा ऊर्णासूत्रेणबध्वातुप्रलेप्तव्योयवैस्तथा सुपिष्टैर्जलसंमिश्रैर्दग्धव्यश्चतथाग्निना असौस्वर्गायलोकायस्वाहेत्युक्त्वासबांधवैः एवंपर्णशरंदग्ध्वात्रिरात्रमशुचिर्भवेदितिब्राह्मोक्तेः इदंत्रिरात्रंनदशाहमध्येदाहे तत्र प्रोषितेकालशेषः स्यादित्युक्तेः किंतुतदूर्ध्वं तत्रपत्नीपुत्रयोः पूर्वमगृहीताशौचयोर्दशाहाद्येव गृहीताशौचयोस्तुत्रिरात्रं पत्नीमृतौभर्तुश्चैवं सपत्न्योश्चैवमितिस्मृत्यर्थसारे अन्यसपिंडानांतुसर्वत्रपर्णशरदाहेत्रिरात्रं तदाहांगिराः देशांतरमृतंश्रुत्वानाशौचंचेत्कथंचन गृहीतमितिशेषः कालात्ययेपिकुर्वीतदाहकालेदिनत्रयमिति स्मृत्यर्थसारेतु गृहीताशौचानांस्नानमात्रमुक्तं बह्वृच परिशिष्टेपि अथातीतसंस्कारः सचेदंतर्दशाहंस्यात्तत्रैवसर्वंसमापयेदूर्ध्वमाहिताग्नेर्दाहात्सर्वमाशौचंकुर्यादन्येषुपत्नीपुत्रयोः पूर्वमगृहीताशौचयोः सर्वमाशौचं गृहीताशौचयोः कर्मांगंत्रिरात्रमिति षडशीतावप्येवं विश्वादर्शेतुप्रतिकृतिदहनेत्वग्निदेस्यात्र्त्रिरात्रमित्युक्तं द्वादशवर्षादिप्रतीक्षोत्तरंदाहेतुपुत्रादीनांसर्वेषां त्रिरात्रमितिकल्पतरुदिवोदासादयः ।

या ठिकाणीं आहिताग्नीचें पूर्ण आशौच करावें , अनाहिताग्नि असेल तर त्याचें आशौच तीन दिवस करावें . कारण , " अनाहिताग्नीचा

देह गृह्याग्नीनें दग्ध करावा . देह मिळाला नसेल तर पळसाच्या पानांच्या देंठांनीं पुरुषाची आकृति करावी . त्याच्या सभोंवतीं कृष्णसारमृगाचें कातडें गुंडाळावें . ऊर्णासूत्रानें बांधून पाण्यामध्यें जव बारीक वाटून त्याजवर लेप करावा . नंतर गृह्याग्नींनें प्रेताप्रमाणें त्याच्या बांधवांनीं ‘ असौ स्वर्गाय लोकाय स्वाहा ’ असें म्हणून त्याचा दाह करावा . याप्रमाणें पर्णशरदाह करुन तीन दिवस आशौच करावें " असें ब्राह्मवचन आहे . हें तीन दिवस आशौच दहा दिवसांचे आंत दाह असतां समजूं नये . कारण , प्रवासांत मृत झालेला दहा दिवसांचे आंत समजलें असतां शेष ( उरलेले ) दिवस आशौच " असें सांगितलें आहे . तर दहादिवसांनंतर असेल तर तीन दिवस समजावें . त्यांमध्यें पत्नी व पुत्र यांनीं पूर्वीं आशौच धरलें नसेल तर त्यांना दशाहादिच आशौच . पूर्वीं आशौच धरलेलें असेल तर तीन दिवस समजावें . पत्नी मृत असतां भर्त्यालाही असेंच समजावें . सवतीलाही असेंच समजावें असें स्मृत्यर्थसारांत सांगितलें आहे . इतर सपिंडांना तर पर्णशर दाह केला असतां सर्व ठिकाणीं त्रिरात्र आशौच . तें सांगतो अंगिरा - " देशांतरीं मृत झालेला श्रवण करुन आशौच कसेंतरी धरलें नसेल तर कालांतरीं देखील दाहकालीं तीन दिवस आशौच करावें . " स्मृत्यर्थसारांत तर - पूर्वीं आशौच धरलें असेल त्यांना स्नान मात्र सांगितलें आहे . बह्वृचपरिशिष्टांतही - " आतां अतीत संस्कार सांगतों - तो जर दहा दिवसांचे आंत असेल तर दहा दिवसांतच सर्व कृत्य समाप्त करावें . दहा दिवसांच्या पुढें आहिताग्नीचा दाह असेल तर दाहदिवसापासून पुढें सारें पूर्ण आशौच करावें . आहिताग्नि व्यतिरिक्तांचा दहा दिवसांचे पुढें दाह असेल तर पत्नीपुत्रांनीं पूर्वीं आशौच धरलें नसल्यास सारें ( पूर्ण ) आशौच . पूर्वीं धरलेलें असल्यास कर्मांग त्रिरात्र आशौच . " षडशीतींतही असेंच आहे . विश्वादर्शांत तर - प्रतिकृतीच्या ( पर्णशराचा ) दाह असतां दाह करणाराला त्रिरात्र आशौच , असें सांगितलें आहे . प्रवासांत गेलेल्याचीं बारा वर्षै वगैरे प्रतीक्षा पूर्वीं सांगितली आहे , ती केल्यावर दाह केला असतां पुत्रादिकांना व इतर सर्वांना त्रिरात्र आशौच , असें कल्पतरु , दिवोदास इत्यादिक सांगतात .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP