मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
अर्घ्यपात्र

तृतीयपरिच्छेद - अर्घ्यपात्र

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां अर्घ्यपात्र सांगतो .

अथार्घ्यपात्रं पृथ्वीचंद्रोदयेमात्स्यपाद्मयोः पात्रंवनस्पतिमयंतथापर्णमयंपुनः जलजंवापि कुर्वीततथासागरसंभवं ब्राह्मे सौवर्णताम्ररौप्याश्मस्फाटिकंशंखशुक्तयः भिन्नान्यपिहियोज्यानिपात्राणिपितृकर्मणि हेमाद्रौप्रजापतिः सौवर्णंराजतंताम्रंखड्गंमणिमयंतथा यज्ञियंचमसंवापिअर्घ्यार्थंपूरयेद्बुधः अत्रविप्रैकत्वद्वित्वचतुष्ट्वादावर्घ्यपात्रेद्वेएव मानवसूत्रेतुद्वेवैश्वदेविकेत्रीणिपित्र्ये एकैकमुभयत्रवेत्युक्तम् ‍ तदेकविप्रपरं पात्रालाभपरंचेतिहेमाद्रिः मदनरत्नेतुदैवेएकपात्रमुक्तं पृथ्वीचंद्रोदयोपित्रीणिपैतृकपात्राणिद्वेद्वेवैवैश्वदेविकइतिबृहत्पराशरोक्तेर्द्वेएवेत्याह बह्वृचानांतुदैवेविप्रद्वित्वेप्येकमर्घ्यपात्रंअर्धशोदद्यादित्युक्तंपरिशिष्टेप्रयोगपारिजातेच कलिकायांहारीतः दत्तमक्षय्यतांयातिखड्गेनार्घ्यंतुयत्कृतम् ‍ वृद्धमनुः मृन्मयंदारुजंपात्रमयः पात्रंचयद्भवेत् ‍ राजतंदैविकेकार्येशिलापात्रंचवर्जयेत् ‍ पुराणसमुच्चये मृत्स्नाभवंतथाकांस्यमारक्तंजंतुसंभवम् ‍ त्रपुसीसलोहभवंसदापात्रंविवर्जयेत् ‍ तत्रैव अष्टांगुलंभवेत्पात्रंपितृणांराजतंशुभं दशांगुलंतुदेवानांसौवर्णंशक्तितः कृतं स्थापयेदर्घ्यपात्रेद्वेन्युब्जेतत्रकुशोपरि द्वेद्वेपवित्रेविधिवत्पात्रयोश्चोपरिक्षिपेत् ‍ यज्ञपार्श्वः पवित्रेस्थेतिमंत्रेणपवित्रेछेदयेत्तुते ओषधीमंतरेकृत्वाअंगुष्ठांगुलिपर्वणोः स्फ्येनकाष्ठेनलोहेननमृन्मयनखादिभिः वसिष्ठः तूष्णींप्रोक्ष्यांभसापात्रेकुर्यादूर्ध्वबिलेततः पूरयेत्पात्रयुग्मंतुकृत्वो परिपवित्रके ।

पृथ्वीचंद्रोदयांत मात्स्यांत व पाद्मांत - " अर्घ्यपात्र वनस्पतीचें तसेंच पानाचें किंवा समुद्रांत उत्पन्न शंख शिंपा इत्यादिकांचें करावें . " ब्राह्मांत - " सुवर्ण , ताम्र , रौप्य , पाषाण , स्फटिक , शंख , शुक्ति यांचीं पात्रें फुटलेलीं असलीं तरी तीं पितृकर्माविषयीं योजावीं . " हेमाद्रींत प्रजापति - " सौवर्ण , राजत , ताम्र , खड्गपात्र , मणिमय , किंवा यज्ञांतील चमसपात्र यांतून कोणतेंही पात्र अर्घ्यासाठीं पाण्यानें भरावें . " येथें ब्राह्मण एक , दोन किंवा चारही असले तरी अर्घ्यपात्रें दोनच असावीं . मानवसूत्रांत तर - " विश्वेदेवांकडे दोन , पितरांकडे तीन , किंवा दोहींकडे एक एक पात्र असावें " असें सांगितलें तें एक विप्र असतां व पात्राचा अभाव असतां समजावें , असें हेमाद्रि सांगतो . मदनरत्नांत तर - देवाविषयीं एक पात्र सांगितलें आहे . पृथ्वीचंद्रोदयही " पितृपात्रें तीन आणि देवपात्रें दोन दोन असावीं " असें बृहत्पराशरवचन आहे म्हणून देवांकडे दोनच पात्रें असें सांगतो . बह्वृचांना तर - देवांकडे दोन ब्राह्मण असले तरी एक अर्घ्यपात्र अर्धै अर्धै द्यावें , असें परिशिष्टांत प्रयोगपारिजातांत सांगितलें आहे . कलिकेंत हारीत - " खड्गपात्रानें अर्घ्य करुन तें दिलें असतां अक्षय होतें . " वृद्धमनु - " देवकार्याविषयीं मातीचें , काष्ठाचें , लोखंडाचें , रुप्याचें व पाषाणाचें पात्र वर्ज्य करावें . " पुराणसमुच्चयांत - " मृत्तिकापात्र , कांस्यपात्र , आरक्तपात्र , जंतूपासून उत्पन्न पात्र , कथिलाचें , शिशाचें व लोहाचें पात्र सदा वर्ज्य करावें . " तेथेंच - " पितरांस रजताचें पात्र अष्टांगुलपरिमित करावें . देवांना सुवर्णाचें पात्र आपल्या शक्तीप्रमाणें दशांगुलपरिमित करावें . ब्राह्मणाच्या पुरोभागीं कुशांवर दोन पात्रें उपडीं ठेवावीं . त्या पात्रांवर यथाविधि दोन दोन पवित्रें ठेवावीं . " यज्ञपार्श्व - " अंगुष्ठ व अंगुलि यांच्या पेरांत ओषधी मध्यें करुन त्या पवित्रांचा छेद ‘ पवित्रेस्थ० ’ या मंत्रानें स्फ्य म्हणजे यज्ञांतील शस्त्रविशेष त्यानें , काष्ठानें किंवा लोहानें करावा . मृन्मयानें किंवा नखादिकांनीं करुं नये . " वसिष्ठ - " मंत्रावांचून उदकानें त्या पात्रांचें प्रोक्षण करुन नंतर तीं उताणीं करावीं , त्यांच्यावर पवित्रें ठेऊन तीं दोन्ही पात्रें उदकानें भरावीं . "

वृद्धपराशरः पात्रद्वयमथार्घ्यार्थंतैजसंचैकवस्तुनः प्राड्मुखोमरतीर्थेनशन्नोदेव्योदकंक्षिपेत् ‍ यवोसीतियवांस्तत्रतूष्णींपुष्पाणिचंदनं मानवसूत्रेसुमनसः प्रक्षिप्योत्पूययवान् ‍ प्रक्षिप्येति यवोसीतिमंत्रः पाद्मे यवोसिधान्यराजोवावारुणोमधुमिश्रितः निर्णोदः सर्वपापानांपवित्रमृषिभिः स्मृतः राजोवावारुणोमधुसंयुत इतिपरिशिष्टपाठः गोभिलेनतु यवोसिसोमदेवत्यइतितिलमंत्रोत्रस्वाहायुक्तउत्कः हेमाद्रौयमः यवहस्तस्ततोदेवान् ‍ विज्ञाप्यावाहनंप्रति आवाहयेदनुज्ञातोविश्वेदेवासइत्यृचा वृद्धपराशरः ततः सव्यकरंन्यस्य विप्रदक्षिणजानुनि देवानावाहयिष्येहमितिवाचमुदीरयेत् ‍ आवाहयेत्यनुज्ञातोविश्वेदेवासआगत विश्वेदेवाः शृणुतेममितिमंत्रद्वयंपठेत् ‍ श्राद्धविशेषेविश्वेदेवानामज्ञानेहेमाद्रौबृहस्पतिः उत्पत्तिंनामचैतेषांनविदुर्येद्विजातयः अयमुच्चारणीयस्तैर्मंत्रः श्रद्धासमन्वितैः आगच्छंतुमहाभागाविश्वेदेवामहाबलाः येअत्रविहिताः श्राद्धे सावधानाभवंतुते इदंचावाहनमर्घ्यपात्रासादनात् ‍ प्राक् ‍ हेमाद्रिणोक्तम् ‍ तत्रकातीयैः प्राक्कार्येतथैवतत्सूत्रात् ‍ अन्यैस्तदुत्तरं पृथ्वीचंद्रोदयेशंखः सयवंपुष्पमादायचरणादिशिरोंतकं अर्चतेत्यर्चनंकुर्यादंतरेचोदकंतथा पित्र्येतुमूर्धादिपादांतं पादप्रभृतिमूर्धांतंदैविकेपूजनंभवेत् ‍ शिरः प्रभृतिपादांतंनमोवइतिपैतृके इतिमदनरत्नेप्रचेतसोक्तेः कलिकायांसंग्रहे तिष्ठन् ‍ कृतांजलिर्भूत्वापठेन्मंत्रौसमाहितः विश्वेदेवाः शृणुत इत्यागच्छंत्वपरंततः हेमाद्रौजातूकर्ण्यः ततोर्घ्यपात्रसंपत्तिंवाचयित्वाद्विजोत्तमान् ‍ तदग्रेचार्घ्यपात्रंतु स्वाहार्घ्याइतिविन्यसेत् ‍ गार्ग्यः दत्वाहस्तेपवित्रंचकृत्वापूजांचपादतः यादिव्याइतिमंत्रेणहस्तेष्वर्घ्यंविनिक्षिपेत् ‍ संग्रहे विश्वेदेवाइदंवोर्घ्यमितिदानंसमादिशेत् ‍ तदंतेस्वाहानमइतिवाच्यम् ‍ यादिव्याइतिमंत्रेणस्वाहाकारंनमोंतकमितिहेमाद्रौनागरखंडात् ‍ अथर्वणसूत्रेतु पाद्यमर्घ्यमाचमनीयमितिद्विजकरेनिनयेदित्यस्यैवत्रयमुक्तं गभस्तिः अर्घ्यंचपिंडदानंचस्वस्त्यक्षय्येतथैवच गंधपुष्पादिकंसर्वंहस्तेनैवतुदापयेत् ‍ प्रतिविप्रंयादिव्येत्यावृत्तिः बह्वृचानांत्वनेनदत्तार्घ्यानुमंत्रणं ततः पात्रंदेवेभ्यः स्थानमसीतिन्युब्जमुत्तानंवाकार्यमितिगारुडेउक्तम् ‍ एतदापस्तंबानांनियतमन्येषानं ।

वृद्धपराशर - " अर्घ्यासाठीं एका वस्तूचीं दोन पात्रें असावीं , त्यांत ‘ शंनोदेवी० ’ या मंत्रानें देवतीर्थानें प्राड्मुख होऊन उदक घालावें . ‘ यवोसि० ’ या मंत्रानें यव आणि मंत्ररहितपुष्पें व चंदन घालावें . " मानवसूत्रांत - " पुष्पें टाकून उत्पवन करुन यव टाकावे " असें आहे . ‘ यवोसि० ’ हा मंत्र पाद्मांत सांगतो तो असा - ‘ यवोसि धान्यराजो वा वारुणो मधुमिश्रितः । निर्णोदः सर्वपापानां पवित्रमृषिभिः स्मृतः ’ या मंत्रांत ‘ वारुणो मधुसंयुतः ’ असा परिशिष्टाचा पाठ आहे . गोभिलानें तर " यवोसि सोमदेवत्यो० " हा तिलमंत्र येथें ‘ स्वाहा ’ शब्दानें म्हणावा , असें सांगितलें आहे . हेमाद्रींत यम - " तदनंतर हातांत यव घेऊन आवाहनाविषयीं देवांची अनुज्ञा मागून त्यांनीं अनुज्ञा दिल्यावर ‘ विश्वेदेवास० ’ या ऋचेनें आवाहन करावें . " वृद्धपराशर - " तदनंतर ब्राह्मणाच्या उजव्या जानूवर आपला डावा हस्त ठेऊन ‘ देवान् ‍ आवाहयिष्येहम् ‍ ’ असें वाक्य उच्चारावें . ब्राह्मणानें ‘ आवाहय ’ अशी अनुज्ञा दिल्यावर ‘ विश्वेदेवास आगत० ’ ‘ विश्वेदेवाः शृणुतेमं० ’ हे दोन मंत्र म्हणावे . " कोणत्या श्राद्धांत कोणते विश्वेदेव याचें ज्ञान नसेल तर सांगतो हेमाद्रींत बृहस्पति - " जे ब्राह्मण विश्वेदेवांची उत्पत्ति व त्यांचें नांव जाणत नाहींत त्यांनीं श्रद्धायुक्त होऊन हा पुढील मंत्र म्हणावा , तो असा - ‘ आगच्छंतु० ’ - " हें आवाहन अर्घ्यपात्रासादनाच्या पूर्वीं हेमाद्रीनें सांगितलें . तें कात्यायनांनीं पूर्वी करावें . कारण , तसेंच त्यांचें सूत्र आहे . इतरांनीं अर्घ्यपात्रासादनानंतर करावें . पृथ्वीचंद्रोदयांत शंख - " यवसहित पुष्प घेऊन पायांपासून मस्तकापर्यंत ‘ अर्चत० ’ या मंत्रानें पूजन करावें , मध्यें उदक द्यावें . " पितरांकडे मस्तकापासून पादांपर्यंत करावें . कारण , " देवांचें पूजन पायांपासून मस्तकापर्यंत करावें , आणि पितरांचें पूजन मस्तकापासून पायांपर्यंत ‘ नमोवः० ’ या मंत्रानें करावें " असें मदनरत्नांत प्रचेतसाचें वचन आहे . कलिकेंत संग्रहांत - " उभें राहून हात जोडून समाहितपणानें दोन मंत्र म्हणावे , ते असे - ‘ विश्वेदेवाः शृणुते० ’ हा एक व ‘ आगच्छंतु० ’ हा दुसरा . " हेमाद्रींत जातूकर्ण्य - " तदनंतर अर्घ्यपात्र संपन्न झालें असें ब्राह्मणांकडून म्हणवून त्यांच्या पुढें ‘ स्वाहाऽर्घ्याः ’ असें म्हणून अर्घ्यपात्र ठेवावें . " गार्ग्य - " पायांपासून मस्तकापर्यंत पूजा करुन ब्राह्मणाच्या हातांत पवित्र देऊन ‘ या दिव्या० ’ ह्या मंत्रानें ब्राह्मणाच्या हातांवर अर्घ्य द्यावें . " संग्रहांत - " - ‘ विश्वेदेवा इदं वोऽर्घ्यं ’ असें म्हणून द्यावें . " त्याच्या अंतीं ‘ स्वाहानमः ’ असें म्हणावें . कारण , " यादिव्या० ’ ह्या मंत्राच्या अंतीं ‘ स्वाहानमः ’ असें म्हणून द्यावें " असें हेमाद्रींत नागरखंडांत आहे . अथर्वणसूत्रांत तर " पाद्य , अर्घ्य , आचमनीय हें ब्राह्मणाच्या हातांत द्यावें " अशीं ह्या मंत्रालाच तीन सांगितली आहेत . गभस्ति - " अर्घ्य , पिंडदान , स्वस्ति , अक्षय्योदक , गंधपुष्पादिक हें सारें हस्तानेंच द्यावें . " प्रतिब्राह्मणाला ‘ यादिव्या० ’ ह्या मंत्राची आवृत्ति करावी . बह्वृचांनीं तर - दिलेल्या अर्घ्याचें ह्या मंत्रानें अनुमंत्रण करावें . तदनंतर तें पात्र ‘ देवेभ्यः स्थानमसि० ’ ह्या मंत्रानें दक्षिणेस उपडें किंवा उताणें करावें असें गरुडपुराणांत सांगितलें आहे . हें आपस्तंबांना नियत आहे , इतरांस नियत नाहीं .

हेमाद्रौविष्णुधर्मे गंधैः पुष्पैश्चधूपैश्चवस्त्रैश्चाप्यथभूषणैः अर्चयेद्ब्राह्मणान् ‍ शक्त्याश्रद्दधानः समाहितः पृथ्वीचंद्रोदयेमार्कंडेयः चंदनागरुकर्पूरकुंकुमानिप्रदापयेत् ‍ विष्णुः चंदनकुंकुमकर्पूरागरुपद्मकान्यनुलेपनायेति व्यासः अपवित्रकरोगंधैर्गंधद्वारेतिपूजयेत् ‍ कलिकायांस्मृतिः गंधद्वारेतिवैगंधमायनेतेचपुष्पकं धूरसीत्यमुनाधूपमुद्दीप्यस्वेतिदीपकं युवंवस्त्राणिमंत्रेणवस्त्रंदद्यात् ‍ प्रयत्नतः आसनेस्वासनंब्रूयादर्घ्येस्त्वर्घ्यंद्विजोत्तमः सुगंधिश्चसुपुष्पाणिसुमाल्यानिसुधूपकः सुज्योतिश्चैवदीपेतुस्वाच्छादनमितिक्रमः विप्राणांगंधेनवर्तुलंत्रिपुंड्रंवानकार्यं हेमाद्रौदेवलः ललाटेपुंड्रकंदृष्ट्वास्कंधेमालांतथैवच निराशाः पितरोयांतिदृष्ट्वाचवृषलीपतिम् ‍ पुंड्रकंवर्तुलमित्यपरार्केमदनरत्नेच पुंड्रंत्रिपुंड्रंवर्तुलमर्धचंद्रंच ऊर्ध्वंचतिलकंकुर्यान्नकुर्याद्वैत्रिपुंड्रकं ऊर्ध्वंचतिलकंकुर्याद्दैवेपित्र्येचकर्मणि निराशाः पितरोयांतिदृष्ट्वाचैवत्रिपुंड्रकमितिवृद्धपराशरोक्तेः तिर्यग्लेपोभवत्येव वर्जयेत्तिलकंभालेश्राद्धकालेचसर्वदा तिर्यगप्यूर्ध्वपुंड्रंवाधारयेत्तुप्रयत्नतइतिव्यासोक्तेरितिपृथ्वीचंद्रः यत्तुनारदीये ऊर्ध्वपुंड्रंचतुलसींश्राद्धेनेच्छंतिकेचनेतितत् ‍ कर्तृपरम् ‍ हेमाद्रौब्राह्मे पूतिकंमृगनाभिंचरोचनंरक्तचंदनं कालेयकंतूग्रगंधंतुरुष्कंचापिवर्जयेत् ‍ कस्तूर्यांविकल्पइतिहेमाद्रिः वृद्धशातातपः पवित्रंतुकरेकृत्वायः समालभतेद्विजान् ‍ राक्षसानांभवेच्छ्राद्धंनिराशैः पितृभिर्गतैः पुष्पंतुब्राह्मे जातीचंपकलोध्राश्चमल्लिकाबाणबर्बरी चूताशोकाटरुषंचतुलसीशतपत्रकं कुब्जकंतगरंचैवभृंगमारण्यकेतकी यूथिकामतिमुक्तंचश्राद्धेयोग्यानिभोद्विजाः कमलंकुमुदंपद्मंपुंडरीकंचयत्नतः इंदीवरंकोकनदंकल्हारंचनिवेदयेत् ‍ हेमाद्रौवायुभविष्ययोः सुकुमारैः किसलयैर्यवदूर्वांकुरैरपि संपूजनीयाः पितरः श्रेयस्कामेनसर्वदा स्कांदे जातिश्चसर्वादातव्यामल्लिकाश्वेतयूथिका जलोद्भवानिसर्वाणिकुसुमानिचचंपकं तत्रैववृद्धमनुः ननियुक्तः शिखावर्ज्यंमाल्यंशिरसिधारयेत् ‍ ।

हेमाद्रींत विष्णुधर्मांत - " समाहित व श्रद्धायुक्त होऊन गंध , पुष्प , धूप , वस्त्रें , भूषणें , यांनीं यथाशक्ति ब्राह्मणांची पूजा करावी . " पृथ्वीचंद्रोदयांत मार्केंडेय - " चंदन , अगरु , कर्पूर , केशर हीं द्यावीं . " विष्णु - " चंदन , केशर , कापूर , अगरु , पद्मक हीं अंगास लावण्यास द्यावीं . " व्यास - " हातांतील पवित्र काढून ‘ गंधद्वारां० ’ या मंत्रानें गंधांनीं पूजा करावी . " कलिकेंत स्मृति - " गंधद्वारां० ’ या मंत्रानें गंध ‘ आयनेते० ’ या मंत्रानें पुष्प , ‘ धूरसि० ’ यानें धूप , ‘ उद्दीप्यस्व० ’ यानें दीप , ‘ युवंवस्त्राणि० ’ या मंत्रानें वस्त्र , याप्रमाणें द्यावें . आसन दिलें असतां ब्राह्मणानें ‘ स्वासनं ’ असें म्हणावें . अर्घ्य दिलें असतां अस्त्वर्घ्यं ’ असें म्हणावें . गंध दिला असतां ‘ सुगंधि ’ पुष्पें दिलीं असतां ‘ सुपुष्पाणि सुमाल्यानि ’ धूप दिला असतां ‘ सुधूपः ’ दीप दिला असतां ‘ सुज्योतिः ’ आच्छादन दिलें असतां ‘ स्वाच्छादनं ’ याप्रमाणें क्रम समजावा . " विप्रांना गंधानें ललाटावर वर्तुल किंवा त्रिपुंड्र करुं नये . कारण , हेमाद्रींत देवल सांगतो - " ललाटावर पुंड्रक आणि स्कंधावर माला व वृषलीपति यांना पाहून पितर निराश होऊन जातात . " या वचनांत पुंड्रक म्हणजे वर्तुल , असें अपरार्कांत मदनरत्नांत सांगितलें आहे . पुंड्र म्हणजे वर्तुल , त्रिपुंड्र व अर्धचंद्राकार समजावा . कारण , " ऊर्ध्वतिलक करावा , त्रिपुंड्र करुं नये . दैवपित्र्यकर्मांविषयीं ऊर्ध्वतिलक करावा , त्रिपुंड्रक पाहून पितर निराश होऊन जातात . " असें वृद्धपराशरवचन आहे . गंधाचा आडवा लेप होतच आहे . कारण , श्राद्धकालीं सर्वदा ललाटावर तिलक वर्ज्य करावा , आडवा लेप किंवा ऊर्ध्वपुंड्र प्रयत्नानें धारण कारावा " असें व्यासवचन आहे , असें पृथ्वीचंद्र सांगतो . आतां जें नारदीयांत - " श्राद्धांत कोणी ऊर्ध्वपुंड्र व तुलसी इच्छीत नाहींत . " तें सांगणें कर्तृविषयक आहे . हेमाद्रींत ब्राह्मांत - " पूतिक ( घाणेरा करंज ), कस्तूरी , गोरोचन , रक्तचंदन , कालेयक ( पीतचंदन ), उग्रगंध , तुरुष्क ( ऊद ) हे वर्ज्य करावे . " कस्तूरीविषयीं विकल्प असें हेमाद्रि सांगतो . वृद्धशातातप - " जो मनुष्य हातांत पत्रिव धरुन ब्राह्मणाला [ गंध लावण्याकरितां ] स्पर्श करितो त्याचें श्राद्ध राक्षसांस प्राप्त होतें व पितर निराश होऊन जातात . " श्राद्धास पुष्पें सांगतो ब्राह्मांत - " जाई , सोनचांफा , लोध्र , मल्लिका ( मोगरी ), बाण ( नीलवर्णकोरांटा ), बर्बरी ( तिळवण ), आम्र , अशोक , अडुळसा , तुलसी , कमल , कुब्जक , तगर , माका , अरण्यकेतकी , यूथिका ( जुई ), अतिमुक्त ( कुसरी , मधुमाधवी ), हीं पुष्पें श्राद्धाला योग्य आहेत . कमल , शुभ्रकमल , पुंडरीक , निळेंकमळ , रक्तकमळ , आणि कल्हार ( संध्याविकासी कमळ ), हीं श्राद्धांत द्यावीं . " हेमाद्रींत वायु भविष्यपुराणांत - " कल्याणेच्छु पुरुषानें कोमल पल्लव , जव , दूर्वांकुर यांनीं देखील पितरांची सर्वदा पूजा करावी . " स्कांदांत - " सर्व प्रकारची जाई , मोगरी , श्वेतजुई , उदकापासून उत्पन्न सर्व पुष्पें , चंपक हीं पितरांस द्यावीं . " तेथेंच वृद्धमनु - " ब्राह्माणानें शिखेवांचून मस्तकावर माला धारण करुं नये . "

वर्ज्यानिपृथ्वीचंद्रोदयेभविष्ये केतकींतुलसीपत्रंबिल्वपत्रंचवर्जयेत् ‍ द्रोणंचकरवीरंचधत्तूरंकिंशुकंतथा माधवीयेस्मृत्यर्थसारेचतुलसीनिषिद्धा तुलसीनिषेधोनिर्मूलइतिहेमाद्रिः समूलत्वेपिपिंडपरः तुलसीगंधमाघ्रायपितरस्तुष्टमानसाः प्रयांतिगरुडारुढास्तत्पदंचक्रपाणिनइतिप्रयोगपारिजातेपाद्मोक्तेरितिबोपदेवः वृद्धपराशरः नजातीकुसुमैर्विद्वान् ‍ बिल्वपत्रैश्चनार्चयेत् ‍ जपादिकुसुमंझिंटीरुपिकासकुरंटिका पुष्पाणिवर्जनीयानिश्राद्धकर्मणिनित्यशः हेमाद्रौशंखः उग्रगंधीन्यगंधीनिचैत्यवृक्षोद्भवानिच पुष्पाणिवर्जनीयानिरक्तवर्णानियानिच जलोद्भवानिदेयानिरक्तान्यपिविशेषतः अंगिराः नजातीकुसुमानिदद्यान्नकदलीपत्रमिति जात्यांविकल्पइतिहेमाद्रिः निषेधः पिंडविषयः कुंदंशंभौचनोदद्यान्नोन्मत्तंगरुडध्वजे पिंडेजातींचनोदद्याद्देवीमर्केणनार्चयेदितिवृद्धयाज्ञवल्क्योक्तेरितिबोपदेवः स्मृतिसारे अगस्त्यंभृंगराजंचतुलसीशतपत्रिका चंपकंतिलपुष्पंचषडेतेपितृवल्लभाः केतकींकरवीरंचबकुलंकुंदकंतथा पाटलांचैवजातींचश्राद्धेयत्नेनवर्जयेत् ‍ केचित्पिंडेतुलसीमाहुः पितृपिंडार्चनंश्राद्धेयैः कृतंतुलसीदलैः प्रीणिताः पितरस्तैस्तुयावच्चंद्रार्कमेदिनीतिमार्कंडेयोक्तेः ।

वर्ज्य पुष्पें सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत भविष्यांत - " केतकी , तुलसीपत्र , बिल्वपत्र , द्रोणपुष्प , कण्हेर , धोतरा , पळस , हीं वर्ज्य करावीं . " माधवीयांत आणि स्मृत्यर्थसारांत तुलसी निषिद्ध आहे . तुलसीचा निषेध निर्मूल असें हेमाद्रि सांगतो . तुलसीनिषेध समूल ( ऋषिप्रणीत ) असला तरी तो पिंडाविषयीं समजावा . कारण , " तुलसीगंध ग्रहण करुन पितर संतुष्ट होऊन गरुडावर बसून विष्णूच्या पदास जातात . " असें प्रयोगपारिजातांत पाद्मवचन आहे , असें बोपदेव सांगतो . वृद्धपराशर - " श्राद्धांत जाईच्या फुलांनीं व बिल्वपत्रांनीं पूजन करुं नये . जास्वंदीचीं वगैरे पुष्पें , पिंवळा कोर्‍हांटा व इतर कोर्‍हांटा हीं पुष्पें श्राद्धकर्मांत नित्य वर्ज्य करावीं . " हेमाद्रींत शंख - " उग्र गंध असलेलीं पुष्पें , गंधरहित पुष्पें , समंद , ब्रह्मराक्षस वगैरे असलेल्या वृक्षांचीं पुष्पें , आणि रक्तवर्ण पुष्पें हीं वर्ज्य करावीं . पाण्यांत उत्पन्न झालेलीं रक्तवर्ण असलीं तरी तीं विशेषतः द्यावीं . " अंगिरा - " जाईचीं पुष्पें व केळीचें पान हीं देऊं नयेत " जाईविषयीं विकल्प असें हेमाद्रि सांगतो . निषेध पिंडाविषयीं आहे . कारण , " शंभूला कुंद , विष्णूला धोतरा , आणि पिंडास जाई देऊं नये . देवीची पूजा रुईच्या फुलांनीं करुं नये " असें वृद्धयाज्ञवल्क्यवचन आहे , असें बोपदेव सांगतो . स्मृतिसारांत - " अगस्त्य , भृंगराज , तुलसी , शतपत्रिका ( कमल ), चंपक , तिलपुष्प हीं सहा प्रकारचीं पुष्पें पितरांस प्रिय आहेत . केतकी , कण्हेर , बकुल , कुंद , पाडळ , आणि जाई हीं श्राद्धाविषयीं यत्नानें वर्ज्य करावीं . " केचित् ‍ ग्रंथकार पिंडाविषयीं तुलसी द्यावी , असें सांगतात . कारण , " ज्यांनीं श्राद्धांत तुलसीपत्रांनीं पितरांच्या पिंडांचें पूजन केलें त्यांनीं चंद्र , सूर्य व पृथ्वी आहे तोंपर्यंत पितर संतुष्ट केले . " असें मार्केंडेयवचन आहे .

धूपस्तत्रैवविष्णुधर्मे धूपस्तुगुग्गुलुर्देयस्तथाचंदनसारजः अगरुश्चसकर्पूरस्तुरुष्कत्वक् ‍ तथैवच विष्णुः घृतमधुयुक्तंगुग्गुलंश्रीखंडदेवदारुसरलादिदद्यादिति तत्रैवदेवलः येहिप्राण्यंगजाधूपाहस्तवाताहताश्चये नतेश्राद्धेनियोक्तव्यायेचकेचोग्रगंधयः घृतंनकेवलंदद्याद्दुष्टंवातृणगुग्गुलुं दीपमाहविष्णुः घृतेनदीपोदातव्यस्तिलतैलेनवापुनः वसामेदोद्भवंदीपंप्रयत्नेन विवर्जयेत् ‍ वस्त्रंब्राह्मे कौशेयंक्षौमकार्पासंदुकुलमहतंतथा श्राद्धेष्वेतानियोदद्यात्कामानाप्नोतिचोत्तमान् ‍ हेमाद्रौब्रह्मवैवर्ते यज्ञोपवीतंदातव्यंवस्त्राभावेविजानता पितृभ्योवस्त्रदानस्यफलंतेनाश्नुतेखिलम् ‍ तत्रैवपाद्मे निष्क्रयोवायथाशक्तिवस्त्राभावेप्रदीयते अन्यान्यपिचदेयानि तत्रैवकालिकापुराणे धात्वादिनिर्मितारम्यादीपिकाः श्राद्धकर्मणि पितृनुद्दिश्ययोदद्यात्सभवेद्भाजनंश्रियः योधूपदानपात्रंतुपात्रमारार्तिकस्यच दद्यात्पितृभ्यः प्रयतस्तस्यस्वर्गेक्षयागतिः विष्णुधर्मे यः कंचुकंतथोष्णीषंपितृभ्यः प्रतिपादयेत् ‍ ज्वरोद्भवानिदुः खानिसकदाचिन्नपश्यति स्त्रीणांश्राद्धेतुसिंदुरंदद्युश्चंडातकानिच निमंत्रिताभ्यः स्त्रीभ्योयेतेस्तुः सौभाग्यसंयुताः हेमाद्रावादित्यपुराणे नकृष्णवर्णंदातव्यंनापिकार्पाससंभवं पितृभ्योनापिमलिनंनोपभुक्तंकदाचन नच्छिद्रितंनापदशंनधौतंकारुणापिच कार्पासनिषेधोन्यसंभवे तत्रैव पितृन् ‍ सत्कृत्यवासोभिर्दद्याद्यज्ञोपवीतकं यज्ञोपवीतदानेनविनाश्राद्धंतुनिष्फलं एतद्यतिशूद्रस्त्रीश्राद्धेपिदेयमितिहेमाद्रिः ।

धूप तेथेंच सांगतो विष्णुधर्मांत - " गुग्गुळ , चंदनाचा साड , अगरु , कापूर , ऊदवृक्षाची साल यांचा धूप द्यावा . " विष्णु - घृतमधुयुक्त असा गुग्गुळ , पांढरा चंदन , तेल्या देवदार , सरल इत्यादिकांचा धूप द्यावा . " तेथेंच देवल - " प्राण्याच्या अंगापासून उत्पना झालेले , हातानें वारा घातलेले , आणि उग्रगंधि ते सारे धूप श्राद्धांत देऊं नयेत . धूपांत केवळ घृत देऊं नये , कचर्‍यानें दुष्ट असलेल्या गुग्गुळाचा धूप देऊं नये . " दीप सांगतो विष्णु - " घृताचा दीप द्यावा , अथवा तिळांच्या तेलाचा द्यावा . चर्बी व मेद यांचा दीप प्रयत्नानें वर्ज्य करावा . " वस्त्र सांगतो ब्राह्मांत - " रेशमी वस्त्र , पाटाव , कापसाचें वस्त्र , आणि दुकूल हीं नवीं वस्त्रें श्राद्धांत जो देतो त्याचे उत्तम मनोरथ पूर्ण होतात . " हेमाद्रींत ब्रह्मवैवर्तांत - " पितरांना वस्त्राच्या अभावीं यज्ञोपवीत द्यावें , त्या योगानें वस्त्रदानाचें सारें फळ मिळतें . " तेथेंच पाद्मांत - " वस्त्राच्या अभावीं यथाशक्ति वस्त्राचा निष्क्रय ( द्रव्य ) द्यावें . " अन्यही देयपदार्थ सांगतो . तेथेंच कालिकापुराणांत - " चांदी , पितळ इत्यादि धातूंच्या सुंदर लावलेल्या समया श्राद्धकर्मांत जो पितरांच्या उद्देशानें देतो तो संपत्तीला पात्र होतो . जो धूपपात्र आणि आरातिक्य दीपपात्र पितरांस देईल त्याची स्वर्गांत अक्षय गति होईल . " विष्णुधर्मांत - " जो मनुष्य पितरांस कंचुक ( बंडी ) व पागोटें देईल त्याला संतापजन्य दुःखें कधींही होणार नाहींत . स्त्रियांच्या श्राद्धांत निमंत्रण केलेल्या सुवासिनी स्त्रियांना जे सिंदूर आणि चंडातर्के ( परकर वगैरे वस्त्रें ) देतील ते सौभाग्ययुक्त होतील . " हेमाद्रींत आदित्यपुराणांत - " पितरांना काळें वस्त्र देऊं नये . कापसाचें देऊं नये . मलिन , पूर्वीं उपभोग केलेलें , छिद्र पडलेलें दशारहित आणि कोष्ठ्यानें सुद्धां धुतलेलें कधींही देऊं नये . " इतर वस्त्रांचा संभव असतां कार्पासवस्त्राचा निषेध समजावा . तेथेंच - " पितरांना वस्त्रांनीं सत्कार करुन यज्ञोपवीत द्यावें , यज्ञोपवीत दिल्यावांचून श्राद्ध केलेलें निष्फळ होतें , " हें यज्ञोपवीत यति ( संन्याशी ), शूद्र , स्त्रिया यांच्या श्राद्धांतही द्यावें , असें हेमाद्रि सांगतो .

तत्रैवनृसिंहपुराणे कमंडलुंताम्रमयंश्राद्धेषुप्रददातियः काष्ठेननिर्मितंवापिनारिकेलमथापिवा दद्यात् ‍ कमंडलुंश्राद्धेसश्रीमानभिजायते योमृत्तिकाविरचितान् ‍ श्राद्धेषुचघटान् ‍ शुभान् ‍ प्रदद्यात्करकान्वापिसोऽक्षयंविंदतेसुखं तत्रैव उपानच्छत्रवस्त्राणिभुक्तिपात्रंकमंडलुं शयनासनयानानिदर्पणव्यजनानिच अन्नंसुसंस्कृतंगंधांस्तांबूलंदीपचामरे पितृभ्योयः प्रयच्छेत्तुविष्णुलोकंसगच्छति सौरपुराणे चामरंतालवृंतंचश्वेतच्छत्रंचदर्पणं दत्वापितृणामेतानिभूमिपालोभवेदिह तत्रैवनंदिपुराणे अलंकाराः प्रदातव्यायथाशक्तिहिरण्मयाः केयूरहारकटकमुद्रिकाकुंडलादयः तथा स्त्रीश्राद्धेषुप्रदेयाः स्युरलंकारास्तुयोषिताम् ‍ मंजीरमेखलादामकर्णिकाकंकणादयः आदर्शव्यजनश्चत्रशयनासनपादुकाः मनोज्ञाः पट्टवासाश्चसुगंधाश्चूर्णमुष्टयः अंगारधानिकाः शीतेयोगपट्टाश्चयष्टयः कटिसूत्राणिरौप्याणिमेखलाश्चैवकंबलाः कर्पूरादेश्चभांडानितांबूलायतनंतथा भोजनाधारयंत्राणिपतद्ग्राहांस्तथैवच तथांजनशलाकाश्चकेशानांचप्रसाधनं एतान् ‍ दद्यात्तुयः सम्यक् ‍ सोश्वमेधफलंलभेत् ‍ स्कांदे सौवर्णंराजतंवापिकांस्येनाप्यथनिर्मितं दत्वाभोजनपात्रंतुसम्राट् ‍ भवतिभूतले वामनपुराणे बंदीकृतास्तुयेकेचित्स्वयंवायदिवापरैः येनकेनाप्युपायेनयस्तान्मोचयतेनरः पितरस्तस्यगच्छंतिशाश्वतंपदमव्यर्य पराशरः वाचयेत्परिपूर्णत्वंवासोदत्वाविधानतः ।

तेथेंच नृसिंहपुराणांत - " जो मनुष्य श्राद्धाचे ठायीं तांब्याचा कमंडलु , अथवा लांकडाचा , किंवा नारळाचा कमंडलु देतो तो मनुष्य श्रीमान् ‍ होतो . जो मनुष्य मातीचे सुंदर घट किंवा कमंडलु श्राद्धांत देतो त्याला अक्षय सुख प्राप्त होतें . " तेथेंच - " जोडा , छत्री , वस्त्रें , भोजनपात्र , कमंडलु , शयन , आसन , वाहन , दर्पण , पंखा , उत्तम अन्न , गंध , तांबूल , दीप , चामर , हीं जो पितरांस देईल त्यास विष्णुलोक प्राप्त होईल . " सौरपुराणांत - ‘‘ चामर , पंखा , श्वेत छत्री , दर्पण , हीं पितरांस देईल तो येथें राजा होईल . " तेथेंच नंदिपुराणांत - " केयूर ( बाहुभूषणें ), हार , कडीं , आंगठ्या , कुंडलें इत्यादि अलंकार यथाशक्ति सुवर्णाचे करुन द्यावे . " तसेंच सांगतो - " स्त्रियांच्या श्राद्धांत स्त्रियांना अलंकार द्यावे , ते येणेंप्रमाणें नूपुरें , मेखला , सरी , कर्णिका ( तानवडें ), कंकण इत्यादि ; आरसा , पंखा , छत्र , शयन , आसन , जोडा , सुंदर पट्टवस्त्रें , सुगंध चूर्णै , शीतकालीं शेगड्या , योगपट्ट , यष्टी ( काठी ), रुप्याचीं कटिसूत्रें , मेखला ( कमरपट्टा ), शाल , कर्पूरादिकांचीं पात्रें , पानसुपारीचें तबक , भोजनपात्रें ( ताटें ), पतद्ग्राह ( पिकदाणी ), डोळ्यांस अंजनाच्या शलाका , फणी , हीं जो उत्तम प्रकारें देईल त्याला अश्वमेधाचें फल प्राप्त होईल . " स्कांदांत - " सुवर्णाचें किंवा रुप्याचें अथवा कांस्याचें केलेलें भोजनाचें ताट जो देतो तो भूमीवर सम्राट् ‍ ( राजा ) होतो . " वामनपुराणांत - " जे कोणी मनुष्य आपण किंवा दुसर्‍यांनीं बंदींत घातले असतील त्यांना कोणत्याही उपायानें जो मनुष्य सोडवितो त्याचे पितर शाश्वत अक्षयपदास जातात . " पराशर - " यथाविधि वस्त्र देऊन त्यांच्याकडून परिपूर्ण आहे असें म्हणवावें . "

नारदीये देवैश्चसमनुज्ञातोयजेत्पितृगणंत्वथ तत्रपित्र्येआसनाद्यशेषमर्चनकांडंवैश्वदेविकंज्ञेयं विशेषस्तूच्यते तत्रासनेद्विगुणभुग्नाः कुशाः अत्रावाहनमासनात्पूर्वंवार्घ्यपूरणोत्तरंवाग्नौकरणोत्तरंवेतिस्मृतिषुपक्षाउक्ताः तेषांशाखाभेदेनव्यवस्था द्वितीयपक्षएवबहुसंमतः तत्रार्घ्यमाहाश्वलायनः तैजसाश्ममयमृन्मयेषुत्रिषुपात्रेष्वेकद्रव्येषुवादर्भांतर्हितेष्वपआसिच्य शंनोदेवीरभिष्ट्य इत्यनुमंत्रितासुतिलानावपति तिलोसिसोमदेवत्योगोसवेदेवनिर्मितः प्रत्नवद्भिः प्रत्तः स्वधयापितृनिमाल्लोकान् ‍ प्रीणयाहिनः स्वधानमइति अश्ममयंस्फाटिकादि मृन्मयं हस्तकृतमेव कुलालचक्रनिष्पन्नमासुरंदैविकंनतत् ‍ तदेवहस्तघटितंदैविकंकेवलंतथेतिछंदोगपरिशिष्टात् ‍ अन्यान्यपिपात्राणिपूर्वमुक्तानि मनुः अन्नाभावेद्विजाभावेयद्येकोब्राह्मणोभवेत् ‍ पात्राण्यासादयेत्रीणिनतुब्राह्मणसंख्यया दत्तकादेः कर्तुर्द्विपितृत्वादावपिवचनात् ‍ त्रीण्येवपात्राणीतिहरिहरः माधवीयेबैजवापः अर्घ्येपितृणांत्रीण्येवकुर्यात्पात्राणिधर्मवित् ‍ एकस्मिन्वाबहुषुवाब्राह्मणेषुयथाविधि हेमाद्रावप्येवं अत्रानुमंत्रणंसकृत् ‍ तिलोसीत्यस्यप्रतिपात्रमावृत्तिः पितृशब्दस्यानूहश्चेतिवृत्तिकृत् ‍ दर्भश्चत्रिगुणंपवित्रं तिस्त्रस्तिस्त्रः शलाकास्तुपितृपात्रेषुपार्वणे एकोद्दिष्टेशलाकैकांनिधायोदकमाहरेदितिहेमाद्रौचतुर्विंशतिमतात् ‍ तत्रैवविष्णुः दक्षिणाग्रदर्भेषुदक्षिणापवर्गचमसेषुपवित्रांतर्हितेष्वपआसिंचेच्छंनोदेवीतिमंत्रेणजलसेचनंबह्वृचभिन्नविषयं अत्रास्मिन् ‍ पक्षेप्रतिपात्रंमंत्रावृत्तिः ।

नारदीयांत - " देवांची आज्ञा घेऊन नंतर पितरांची पूजा करावी . ’’ पितरांकडे आसनादिक सारे पूजोपचार विश्वेदेवांकडे सांगितले ते समजावे , त्यांमध्यें विशेष आहे तो सांगतों - पितरांकडे आसनांचे ठायीं द्विगुण भुग्न ( मोडून ) कुश द्यावे . पितरांकडे आवाहन आसनाच्या पूर्वीं करावें , किंवा अर्घ्यपात्रपूरणोत्तर करावें , अथवा अग्नौकरणोत्तर करावें , असे आवाहनाचे तीन पक्ष स्मृतींत सांगितले आहेत , त्यांची शाखाभेदानें व्यवस्था समजावी . त्यांत दुसरा पक्षच ( अर्घ्यपात्रपूरणोत्तर करणें हाच ) बहुतांना संमत आहे . पितरांकडे अर्घ्य सांगतो आश्वलायन - " तैजस ( सुवर्ण , रौप्य इत्यादि धातुनिर्मित ), अश्ममय ( स्फटिकादिकृत ), आणि मृन्मय अशीं तीन द्रव्यांचीं तीन अर्घ्यपात्रें करावीं ; अथवा एका द्रव्याचीं ( पदार्थाचीं ) तीन पात्रें करावीं ; त्या पात्रांत उदक घालून ‘ शंनो देवी० ’ या मंत्रानें अनुमंत्रण करावें . नंतर त्या पात्रांत ‘ तिलोसि सोमदेवत्यो० ’ या मंत्रानें तिल टाकावे . " येथें सांगितलेलें मृन्मयपात्र हातानें केलेलेंच असावें ; कारण , " कुंभाराचे चाकावर निष्पन्न झालेलें पात्र आसुर होतें तें दैविक होत नाहीं ; तेंच केवळ हातानें घडलेलें दैविक होतें " असें छंदोगपरिशिष्ट वचन आहे . इतरही पात्रें पूर्वीं ( वैश्वदेवप्रकरणीं ) सांगितलीं आहेत तीं घ्यावीं . मनु - " अन्नाच्या अभावीं ( अशक्ति असतां ) किंवा इतर ब्राह्मणांच्या अभावीं जरी एक ब्राह्मण असेल तरी अर्घ्यपात्रें तीन करावीं , ब्राह्मणांच्या संख्येइतकी पात्रसंख्या करुं नये . " दत्तकादिक श्राद्धकर्ता असतां त्याचे दोन दोन पित्रादिक असले तरी स्मृतिवचनावरुन तीनच पात्रें असावीं , असें हरिहर सांगतो . माधवीयांत बैजवाप - " एक ब्राह्मण किंवा बहुत ब्राह्मण असले तरी धर्मवेत्त्यानें पितरांच्या अर्घ्याविषयीं तीनच पात्रें यथाविधि करावीं . " हेमाद्रींतही असेंच आहे . येथें ‘ शंनोदेवी० ’ या मंत्रानें अनुमंत्रण सांगितलें तें एकवार करावें . ‘ तिलोसि० ’ या मंत्राची प्रत्येक पात्राला आवृत्ति करावी , त्या मंत्रांतील पितृशब्दाचा ऊह करावयाचा नाहीं , असें वृत्तिकार सांगतो . पात्रांत दर्भ सांगितले ते त्रिगुण पवित्र असावे ; कारण , " पार्वणश्राद्धांत पितृपात्रांचे ठायीं तीन तीन दर्भ आणि एकोद्दिष्टांत एकेक दर्भ ठेवून उदक घालावें " असें हेमाद्रींत चतुर्विंशतिस्मृतिवचन आहे . तेथेंच विष्णु - " ब्राह्मणांच्या पुढें दक्षिणाग्र दर्भांवर दक्षिणापवर्गानें स्थापित पात्रांवर पवित्रें ठेऊन ‘ शंनोदेवी० ’ या मंत्रानें उदक घालावें . " मंत्रानें उदक घालणें तें बह्वृचभिन्नविषयक आहे . मंत्रानें उदक घालणें या पक्षीं प्रतिपात्राला मंत्राची आवृत्ति करावी .

कारिकायाम् ‍ गंधपुष्पाणिचैतेषुपात्रेषुप्रक्षिपेदथ ब्राह्मे जलंक्षीरंदधिघृतंतिलतंडुलसर्षपान् ‍ कुशाग्रमधुपुष्पाणिदत्वाचामेत्ततः स्वयम् ‍ जातूकर्ण्यः ततोर्घ्यपात्रसंपत्तिंवाचयित्वाद्विजोत्तमान् ‍ तदग्रेचार्घ्य पात्राणिस्वधार्घ्याइतिविन्यसेत् ‍ ततस्तिलहस्तोविप्रसव्यजानौदक्षिणकरंन्यस्यावाहनंपृच्छेत् ‍ अत्रगोत्रसंबंधनामानिद्वितीयांतत्वंचप्रागुक्तम् ‍ बैजवापगृह्ये तिष्ठन् ‍ पितृनावाहयिष्यामीत्यामंत्र्य कौर्मे अपसव्यंततः कृत्वापितृणांदक्षिणामुखः आवाहनंततः कुर्यादुशंतस्त्वेत्यृचाबुधः आवाह्यतदनुज्ञातोजपेदायंतुनस्ततः अत्रसव्यस्यापिप्रागुक्तेर्विकल्पः अत्राद्यमंत्रावृत्त्याऽस्मत्पितरममुकशर्माणममुकगोत्रंवसुरुपमावाहयामीत्युक्त्वामूर्धादिपादांतंतिलान्विकीर्यायंतुनइतिसर्वांतेसकृज्जपेदितिनिबंधाः अत्रोपवेशनसंवेशनपाद्यार्घ्याचमनीयान्यपिहेमाद्रिणोक्तानितान्यथर्ववेदिनांनियतानिनान्येषां तेषांचप्रपितामहादिपित्रंतंप्रातिलोम्येनसर्वः प्रयोगः ।

कारिकेंत - " उदक घातल्यानंतर पात्रांत गंधपुष्पें घालावीं . " ब्राह्मांत - " जल , दूध , दधि , घृत , तिल , तंडुल , सर्षप , कुशाग्रें , मध , पुष्पें हीं पात्रांत देऊन नंतर स्वतः आचमन करावें . " जातूकर्ण्य - " तदनंतर ‘ अर्घ्यपात्रं सुसंपन्नं ’ असें ब्राह्मणांकडून म्हणवून ब्राह्मणांच्या अग्रभागीं ‘ स्वधार्घ्याः ’ असें म्हणून अर्घ्यपात्रें ठेवावीं . " तदनंतर हातांत तिल घेऊन ब्राह्मणाच्या डाव्या जानूवर आपला दक्षिणहस्त ठेऊन आवाहनप्रश्न करावा . येथें आवाहनप्रश्नवाक्यांत गोत्र , संबंध , नांव यांचा उच्चार द्वितीयाविभक्तीनें करावा , असें पूर्वीं ( देवावाहनप्रकरणीं ) सांगितलें आहे . बैजवापगृह्यांत - " उभें राहून ‘ पितृन् ‍ आवाहयिष्यामि ’ असें आमंत्रण करुन " कौर्मांत - " तदनंतर अपसव्य करुन दक्षिणेकडे मुख करुन ‘ उशंतस्त्वा० ’ या ऋचेनें पितरांचें आवाहन करावें . त्यांची अनुज्ञा घेऊन आवाहन करुन तदनंतर ‘ आयंतुनः० ’ या मंत्राचा जप करावा . " आवाहनाविषयीं पूर्वीं सव्य सांगितलें आणि येथें अपसव्य सांगितलें म्हणून विकल्प समजावा . येथें पहिल्या ( उशंत० ) मंत्रावृत्तीनें ‘ अस्मत् ‍ पितरं ’ अमुकशर्माणममुकगोत्रं वसुरुपमावाहयामि ’ असें ह्मणून मस्तकापासून पादापर्यंत तिल टाकून सर्व पितरांचें आवाहन झाल्यावर शेवटीं ‘ आयंतुनः० ’ हा मंत्र एकवार जपावा , असें निबंधग्रंथकार सांगतात . येथें उपवेशन , संवेशन , पाद्य , अर्घ्य , आचमनीय हीं देखील हेमाद्रीनें सांगितलीं आहेत , तीं अथर्ववेद्यांना नियत आहेत , इतरांस नाहींत . त्या अथर्ववेद्यांचा प्रपितामहापासून पित्यापर्यंत उलट उच्चार करुन सर्व प्रयोग आहे .

वाराहे गंधपुष्पार्चनंकृत्वादद्याद्धस्तेतिलोदकं गार्ग्यः शिरस्तः पादतोवापिसम्यगभ्यर्चयेत्ततः ततः स्वधार्घ्याइतिपितृपितामहादिविप्राग्रेप्रत्येकंनिवेदयेदितिकारिकायांवृत्तौच आश्वलायनः प्रसव्येनेतरपाण्यंगुष्ठांतरेणोपवीतित्वाद्दक्षिणेनवासव्योपगृहीतेन पितरिदंतेअर्घ्यंपितामहेदंतेअर्घ्यंप्रपितामहेदंतेअर्घ्यमित्यप् ‍ पूर्वंताः प्रतिग्राहयिष्यन् ‍ सकृत्सकृत्स्वधाअर्घ्याइतिप्रसृष्टाअनुमंत्रयीत यादिव्याआपः पृथिविसंबभूवुर्या अंतरिक्ष्याउतपार्थिवीर्याः हिरण्यवर्णायज्ञियास्तानआपः शंस्योनाभवंतु अर्घ्यादिप्राग्गंधादेर्यज्ञोपवीतमेव अर्घ्यदानात् ‍ प्रागन्याअपोदद्यात् ‍ यद्यप्यत्रसव्येनदक्षिणेनवार्घ्यंदद्यादित्युक्तंतथापिदक्षिणेनेत्यभिमतोर्थः कारिकायांवृत्तौचैवम् ‍ पित्रादेस्त्रिभिः पात्रैर्दद्यात् ‍ पितुः स्थानेविप्रत्रयंचेदेकार्घ्यंविभज्यदद्यात् ‍ त्रयाणांस्वधाअर्घ्याइतिसकृत् ‍ प्रश्नः एवंपैतामहादावपि अन्यजलदानमर्घ्यमंत्राश्चप्रतिविप्रमावर्तंते तेषुगंधादौचप्रतिविप्रंपदार्थानुसमयः कांडानुसमयोवा पित्रादित्रयाणामेकविप्रपक्षेत्रिभिः पात्रैरेकस्यैवार्घ्यंदद्यादितिवृत्तिः कारिकापि स्वधार्घ्याइत्यपोर्घ्यास्ताउपवीतीनिवेदयेत् ‍ निवेदनात् ‍ प्राक् ‍ प्राचीनावीतमेवेत्यर्थः अर्घ्यंसशेषमादायदक्षिणेनतुपाणिना सव्यहस्तगृहीतेननिनयेत् ‍ पितृतीर्थतः दत्वादत्वानिनीतास्तायादिव्यार्चानुमंत्रयेत् ‍ यत्तु यादिव्याइतिमंत्रेणहस्तेष्वर्घ्यंविनिक्षिपेदिति यच्चवाराहे तिलांबुनाचापसव्यंदद्यादर्घ्यादिकंद्विजइति यच्चव्यासः गोत्रसंबंधनामानिपितृणामनुकीर्तयन् ‍ एकैकस्यतुविप्रस्यअर्घ्यपात्रंविनिक्षिपेदितितद्वह्वृचातिरिक्तविषयं ततआचामेत् ‍ एवंमातामहेष्वपि ।

वाराहांत " गंधपुष्पार्चन करुन हातावर तिलोदक द्यावें . " गार्ग्य - " मस्तकापासून किंवा पायांपासून उत्तम पूजन करावें . " तदनंतर ‘ स्वधाऽर्घ्याः ’ असें म्हणून पिता , पितामह इत्यादि ब्राह्मणांच्या अग्रभागीं प्रत्येकाला निवेदन करावें , असें कारिकेंत व वृतींतही आहे . आश्वलायनसूत्र - " सारें पित्र्यकर्म अप्रदक्षिण करावें . पित्र्यकर्माविषयीं प्राचीनावीती असावी , कर्ता उपवीती आहे - ज्या हातानें कर्म करितो ( दक्षिणहस्तानें करो किंवा वामहस्तानें करो ) त्या स्कंधावर यज्ञोपवीत असतां प्राचीनावीती होतो ; इतर स्कंधावर यज्ञोपवीत असतां उपवीती होतो असें आहे - येथें उपवीती असल्यामुळें कर्म प्राचीनावीतीनें होण्यासाठीं वामहस्ताच्या अंगुष्ठांगुलींच्या मध्यानें ( पितृतीर्थानें ) अर्घ्य द्यावें , हा इत्यर्थ आहे . अथवा वामहस्त शिष्टांनीं निंदित आहे म्हणून त्यानें प्रत्यक्ष देऊं नये , तर वामहस्तानें दक्षिणहस्त धरुन त्या दक्षिणहस्तानें अर्घ्य द्यावें , तें असें - ‘ पितरिदं ते अर्घ्यं , पितामहेदं ते अर्घ्यं , प्रपितामहेदं ते अर्घ्यं ’ ह्या तीन मंत्रांनीं पित्रादित्रयांना अनुक्रमानें अर्घ्य द्यावें . अर्घ्यदानाच्या पूर्वीं दुसरें उदक द्यावें . अर्घ्यदानाच्या पूर्वीं ‘ स्वधा अर्घ्याः ’ ह्या मंत्रानें पितृस्थानीं जे ब्राह्मण असतील त्या सर्वांना एकवार अर्घ्यं निवेदन करावें . इतर उदकदान व अर्घ्यमंत्र यांची मात्र प्रत्येक ब्राह्मणाला आवृत्ति आहे ; निवेदनाची आवृत्ति नाहीं . निवेदन , इतर उदकदान व अर्घ्यदान यांविषयीं पदार्थानुसमय किंवा कांडानुसमय समजावा . तसाच गंधपुष्पादि दानाविषयींही होय . हा प्रकार एक एक पितराला अनेक ब्राह्मण असतां समजावा . एक एक पितराला एक एक ब्राह्मण असेल तर एकेक पात्र एकेकाला निवेदन करुन इतर उदक एकेकाला देऊन अर्घ्योदकही एकेकाला द्यावें . सर्वांना एक ब्राह्मण असेल तर तीन्ही पात्रें त्यालाच निवेदन करुन पुनः पुनः इतर उदक देऊन त्यालाच तीन मंत्रांनीं तीन अर्घ्यै द्यावीं . ब्राह्मणांनीं हातांत घेऊन सोडलेलीं जीं अर्घ्योदकें त्यांचें ‘ या दिव्या आपः० ’ ह्या मंत्रानें अनुमंत्रण करावें . " अर्घ्यदानाच्या पूर्वीं पात्रांत गंधपुष्पदिदान यज्ञोपवीतीनेंच करावें . येथें जरी वामहस्तानें किंवा दक्षिणहस्तानें अर्घ्य द्यावें , म्हणून सांगितलें तरी दक्षिणहस्तानें द्यावें हा अर्थ आचार्यांस मान्य आहे . कारिकेंत वृत्तींतही असेंच आहे . पितृस्थानीं तीन ब्राह्मण असतील तर एका अर्घ्याचा विभाग करुन तिघांना द्यावें . तिघांना ‘ स्वधाअर्घ्याः ’ हा एकवार प्रश्न करावा . याप्रमाणें पितामहादिकांविषयींही समजावें . अन्य उदकदान व अर्घ्यमंत्र यांची प्रतिब्राह्मणाला आवृत्ति होते . याविषयीं व गंधादिदानाविषयीं प्रतिब्राह्मणाला पदार्थानुसमय किंवा कांडानुसमय समजावा . पित्रादित्रयस्थानीं एक ब्राह्मणपक्षीं तीन पात्रांनीं एकालाच अर्घ्य द्यावें , असें वृत्तिकार सांगतो . कारिकाही - " उपवीती करुन ‘ स्वधा अर्घ्याः ’ या मंत्रानें तीं अर्घ्योदकें ब्राह्मणाला निवेदन करावीं , निवेदनाच्या पूर्वीं प्राचीनावीतीच असावी , हें तात्पर्य . वामहस्तानें गृहीत अशा दक्षिणहस्तानें सशेष अर्घ्य घेऊन पितृतीर्थानें ब्राह्मणाला द्यावें , देऊन स्त्रवूं लागलेल्या उदकांचें ‘ या दिव्या० ’ या ऋचेनें अनुमंत्रण करावें . " आतां जें " - ‘ या दिव्या० ’ या मंत्रानें हातांवर अर्घ्य द्यावें . " आणि जें वाराहांत - " ब्राह्मणानें तिलोदक देऊन अपसव्यानें अर्घ्यादिक द्यावें . " आणि जें व्यास सांगतो - ‘‘ पितरांचे गोत्र , संबंध , नांव यांचें अनुकीर्तन करुन एकेक ब्राह्मणाला अर्घ्यपात्र द्यावें . " तें सारें बह्वृचातिरिक्तविषयक आहे . तदनंतर आचमन करावें . याचप्रमाणें मातामहांना देखील अर्घ्यै वगैरे द्यावीं .

आश्वलायनः संस्रवान् ‍ समवनीयताभिरद्भिः पुत्रकामोमुखमनक्ति संस्रवः शेषः संस्रवोहिपरिशिष्टोभवतीतिशतपथश्रुतेः केचित्तुहस्तगलितांबुवदंति समवनीयांत्येद्वेपात्रेपितृपात्रेआसिच्येतिवृत्तिः प्रथमेपात्रेसंस्रवान् ‍ समवनीयेतिकातीयसूत्राच्च ब्राह्मेतुप्रतिबिंबावलोकनमुक्तं स्कांदेत्वायुः कामस्यनेत्रासेचनमुक्तं पित्र्यविप्रैः प्राड्मुखस्यकर्तुरभिषेकः कार्यइतिकेचित् ‍ आश्वलायनः नोद्धरेत्प्रथमंपात्रंपितृणामर्घ्यपातितंआवृतास्तत्रतिष्ठंतिपितरः शौनकोब्रवीत् ‍ यावद्विप्रविसर्जनमितितुर्यपादेयमीयः पाठः अत्रवृत्तिः पितृपात्रंसमवनयनदेशान्नचालयेदाश्राद्धसमाप्तेः यस्मात्तत्रतृतीयपात्रेणावृताइति यद्वा प्रथमपात्रमेवन्यग्बिलंकुर्यादिति कामाभावेपीदमेवशेषप्रतिपादनं हेमाद्रौकौर्मे संस्रवांश्चततः सर्वान् ‍ पात्रेकुर्यात्समाहितः पितृभ्यः स्थानमसीतिन्युब्जंपात्रंनिधापयेत् ‍ शूलपाणौयमस्तु पैतृकंप्रथमंपात्रंतस्मिन्पैतामहंन्यसेत् ‍ प्रपितामहंततोन्यस्यनोद्धरेन्नचचालयेदित्याह अथसंस्रवानानीयतृतीयेनाच्छाद्यन्युब्जीकुर्यादितिसर्वैकवाक्यतयार्थइतिकेचित् ‍ अत्रिः गंधादिभिस्तदभ्यर्च्यतृतीयेनापिधापयेत् ‍ पितृभ्यः स्थानमसीतिशुचौदेशेर्चितेर्चयेत् ‍ अर्चनंन्युब्जीकृतेपितुल्यं न्युब्जमुत्तरतोन्यसेदितिप्रचेतसोक्तेः सर्वविप्रोत्तरतोन्यसेदितिहेमाद्रिकल्पतरु विप्रवामेइतिहलायुधः कर्तुर्वामेइतिशूलपाणिः उत्तानंविवृतंवापिपितृपात्रंनतद्भवेदित्युशनसोक्तेर्न्युब्जतैवसाधुः मातामहादिसंस्रवानपिपितृपात्रएवगृहीत्वाप्रयाजवत्तंत्रेणन्युब्जीकुर्यादितिशूलपाणिः एकोद्दिष्टेतूहेनन्युब्जतेतिपितृभक्तौश्रीदत्तः यमोपि स्पृष्टमुत्तानमन्यत्रनीतमुद्धाटितंतथापात्रंदृष्ट्वाव्रजंत्याशुपितरस्तंशपंतिच वैश्वदेवेउत्तानमितिमदनपारिजातः ।

आश्वलायन - " संस्रव उदकें एकत्र करुन त्या उदकांनीं पुत्रकाम असेल त्यानें मुखलेप करावा . " संस्त्रव म्हणजे उर्वरित उदक . कारण , " संस्त्रव हा परिशेष असेल तो होतो " अशी शतपथश्रुति आहे . कोणी हातापासून गळालेलें उदक संस्त्रव म्हणतात . सूत्रांतील ‘ समवनीय ’ शब्दाचा अर्थ - पुढच्या दोन पात्रांतील उदक पितृपात्रांत घालून , असा वृत्तिकार सांगतो . " पहिल्या पात्रांत संस्रव मिळवून " असें कातीयसूत्रही आहे . ब्राह्मांत तर - प्रतिबिंबाचें अवलोकन सांगितलें आहे . स्कांदांत तर - आयुष्यकामाला नेत्रासेचन सांगितलें आहे . पित्रांकडील ब्राह्मणांनीं प्राड्मुख अशा श्राद्धकर्त्याला अभिषेक करावा , असें केचित् ‍ म्हणतात . आश्वलायन - पितरांना अर्घ्य पाडलेलें प्रथम पात्र उचलूं नये ; कारण , त्या पात्राचे ठायीं आवृत होऊन पितर राहतात , असें शौनक सांगता झाला . " ‘ नोद्धरेत् ‍ ० ’ श्लोकाच्या चवथ्या चरणीं ‘ यावद्विप्रविसर्जनम् ‍ ’ असा यमवचनीं पाठ आहे . येथें वृत्तिकार सांगतो - पितृपात्र समवनयन ( एकीकरण ) देशाहून श्राद्ध समाप्त होईपर्यंत चाळवूं नये . कारण , त्या ठिकाणीं तिसर्‍या पात्रानें आवृत पितर राहतात . अथवा प्रथम पात्रच उपडें करावें . कोणती कामना नसतांही शेष उदकाची ही व्यवस्था समजावी . हेमाद्रींत कौर्मांत - ‘‘ समाधानपूर्वक सर्व संस्रव एक पात्रांत करावें , ‘ पितृभ्यः स्थानमसि ’ या मंत्रानें पात्र उपडें घालावें . " शूलपाणींत यम तर - " पित्याचें पहिलें पात्र त्यांत पितामहपात्र ठेवावें , नंतर प्रपितामहपात्र त्याजवर ठेऊन नंतर उचलूं नये व चाळवूंही नये . " असें सांगतो . आतां सर्वांची एकवाक्यता करुन असा अर्थ झाला कीं , सारे संस्रव एकत्र मिळवून तिसर्‍या पात्रानें आच्छादन करुन उपडें करावें , असें केचित् ‍ म्हणतात . अत्रि - गंधादिकानें त्याचें पूजन करुन तिसर्‍या पात्रानें आच्छादन करावें , नंतर पूजित शुद्ध देशावर ‘ पितृभ्यः स्थानमसि ’ या मंत्रानें त्या पात्राची पूजा करावी . " उपडें केलें तरी पूजन समानच आहे . " उपडें करुन उत्तरेकडे ठेवावें " असें प्रचेतसाचें वचन आहे म्हणून सर्व ब्राह्मणांच्या उत्तरेकडे ठेवावें , असें हेमाद्रि कल्पतरु सांगतात . ब्राह्मणांच्या वामभागीं ठेवावें , असें हलायुध सांगतो . कर्त्याच्या वामभागीं असें शूलपाणि सांगतो . " उताणें किंवा विवृत ( उघडें ) असें पितृपात्र होऊं नये " असें उशनसाचें वचन आहे म्हणून उपडें करणें हेंच चांगलें . मातामहादिपात्रांतीलही संस्रव पितृपात्रांतच घेऊन प्रयाज यागांच्या तंत्राप्रमाणें एकतंत्रानेंच उपडें करावें , असें शूलपाणि सांगतो . एकोद्दिष्टांत तर ‘ पित्रुभ्यः० ’ या मंत्रांत ऊह करुन उपडें करावें , असें पितृभक्तिग्रंथांत श्रीदत्त सांगतो . यमही - " स्पर्श केलेलें , उताणें केलेलें , दुसर्‍या ठिकाणीं नेलेलें , उघडलेलें , असें पात्र पाहून पितर शीघ्र जातात व शाप देतात . " विश्वेदेवांचें पात्र उताणें ठेवावें , असें मदनपारिजात सांगतो .

बैजवापः तस्योपरिकुशान् ‍ दत्वाप्रदद्याद्देवपूर्वकं गंधपुष्पाणिधूपंचदीपंवस्त्रोपवीतके अत्रगंधादेर्दैवेपित्र्येचपदार्थानुसमयस्य याज्ञवल्क्योक्तकांडानुसमयेनविकल्पोज्ञेयः बह्वृचानांतुसूत्रेदैवानुक्तेः कांडानुसमयएव अत्रप्राचीनावीतीनामगोत्रसंबुद्ध्याद्युक्तंप्रागन्यदैववत् ‍ तदंतेआचमनंच हेमाद्रौकालिकापुराणे निर्वर्त्यब्राह्मणादेशात्क्रियामेवंयथाविधि भाजनानिततोदद्याद्धस्तशौचंपुनः क्रमात् ‍ आदेशात्पात्राणिदद्यादित्यन्वयः तेनतत्रापिप्रश्नानुज्ञेज्ञेये तत्रैवब्राह्मे मंडलानिचकार्याणिनैवारैश्चूर्णकैः शुभैः गौरमृत्तिकयावापिभस्मनागोमयेनवा भृगुः भस्मनावारिणावापिकारयेन्मंडलंततः चतुः कोणंद्विजाग्र्यस्यत्रिकोणंक्षत्रियस्यतु मंडलाकृति वैश्यस्यशूद्रस्याभ्युक्षणंस्मृतं बह्वृचपरिशिष्टेतु दैवेचतुरस्त्रंपित्र्येवृत्तंमंडलंकृत्वाक्रमेणसयवान् ‍ सतिलांश्चदर्भान् ‍ दद्यादित्युक्तं मार्कंडेयः यातुधानाः पिशाचाश्चक्रूरायेचैवराक्षसाः हरंतिरसमन्नस्यमंडलेनविवर्जितं ।

बैजवाप - " त्या पात्रावर कुश देऊन नंतर देवपूर्वक ब्राह्मणांना गंध , पुष्प , धूप , दीप , वस्त्र , यज्ञोपवीत हीं द्यावीं . " या ठिकाणीं देवांकडे व पितरांकडे गंधादिकांचा पदार्थानुसमय सांगितला आणि याज्ञवल्क्यानें कांडानुसमय सांगितला म्हणून त्याचा विकल्प समजावा . बह्वृचांच्या सूत्रांत तर देव सांगितले नाहींत म्हणून त्यांना कांडानुसमयच आहे , असें समजावें . येथें गंधादिपूजेविषयीं प्राचीनावीती व नामगोत्रादिकांचा संबुद्धीनें उच्चार इत्यादिक पूर्वीं सांगितलें आहे . इतर सारा विधि देवांप्रमाणें समजावा . पूजेच्या अंतीं आचमनही सांगितलें आहे . हेमाद्रींत कालिकापुराणांत - " याप्रमाणें यथाविधि पूजनक्रिया करुन ब्राह्मणांची आज्ञा घेऊन भोजनपात्रें मांडावीं , नंतर क्रमानें पुनः हातावर शुद्ध्यर्थं पाणी घालावें . " वचनांत आज्ञा घेऊन पात्रें द्यावीं , असें सांगितल्यावरुन येथेंही प्रश्न व अनुज्ञा पाहिजे असें होतें . तेथेंच ब्राह्मांत - " नीवारां ( तृणधान्यां ) चीं बारीक चूर्णै करुन त्यांनीं , किंवा गौरवर्ण मृत्तिकेनें अथवा भस्मानें किंवा गोमयानें मंडलें करावीं . " भृगु - " भस्मानें किंवा उदकानें मंडल करावें . ब्राह्मणाचें मंडल चतुष्कोण , क्षत्रियाचें त्रिकोण , वैश्याचें मंडलाकृति आणि शूद्राचें अभ्युक्षण समजावें . " बह्वृचपरिशिष्टांत तर - देवांकडे चतुरस्त्र आणि पितरांकडे वर्तुल असें मंडल करुन क्रमानें यवसहित आणि तिलसहित दर्भ मंडलांवर द्यावे , असें सांगितलें आहे . मार्केंडेय - " मंडलरहित पात्र असेल तर यातुधान , पिशाच आणि क्रूर राक्षस हे अन्नाचा रस हरण करितात . "

हेमाद्रौहारीतः भूमावेवनिदध्यान्नोपरिपात्राणीति तानिचहेमाद्रावत्रिराह भोजनेहैमरौप्याणि दैवेपित्र्येयथाक्रमं हारीतः राजतपार्णताम्रकांस्यपात्राणिभोजनेइति तत्रैववाराहे सौवर्णानीहरौप्याणि कांस्यानितदसंभवे अन्यान्यपिहिकार्याणिदारुजान्यपिजानता नायसान्यपिकार्याणिपैत्तलानिनतुक्कचित् ‍ नच सीसमयानीहशस्यंतेत्रपुजान्यपि अत्रिः पंचाशत्पलिकंकांस्यंद्ध्यधिकंभोजनायवै गृहस्थैस्तुसदाकार्यमभावे हेमरौप्ययोः पालाशेभ्योविनानस्युः पर्णपात्राणिभोजने पृथ्वीचंद्रस्तु कांस्यपात्रेहविर्दृष्ट्वानिराशाः पितरोगताइतिब्राह्मोक्तेः कांस्यपात्रनिषेधमाह बोपदेवस्तुस्मृतिसंग्रहमुदाजहार श्राद्धेपलाशपात्राणिमधुकोदुंबराणिच पारिकाकुटजप्लक्षक्रकचानिक्रमाज्जगुः कदलीचूतपनसजंबुपुन्नागचंपकाः अलाभेमुख्यपात्राणांग्राह्याः स्युः पितृकर्मणीति हेमाद्रौतुकदलीपात्रनिषेधमाहांगिराः नजातीकुसुमानिदद्यान्नकदलीपत्रमिति क्रतुः असुराणांकुलेजातारंभापूर्वपरिग्रहे तस्यादर्शनमात्रेणनिराशाः पितरोगताः एवंपात्राण्यासाद्यभस्ममर्यादांकृत्वाविप्रहस्तशोधनंकुर्यात् ‍ तत्रपिशंगरक्षाणोइतिमंत्रद्वयंकेचित्पठंति मात्स्ये अकृत्वाभस्ममर्यादांयः कुर्यात्पाणिशोधनं आसुरंतद्भवेच्छ्राद्धंपितृणांनोपतिष्ठते तत्रैवब्रह्मांडे प्रक्षाल्यहस्तपात्रादिपश्चादद्भिर्विधानवत् ‍ प्रक्षालनजलंदर्भैस्तिलैर्मिश्रंक्षिपेच्छुचौ मंडलोपरीतिहेमाद्रिः ।

हेमाद्रींत हारीत - " भोजनपात्रें भूमीवरच ठेवावीं , मध्यंतरीं ठेऊं नयेत . " तीं पात्रें हेमाद्रींत अत्रि सांगतो - " भोजनाविषयीं देवांकडे व पितरांकडे अनुक्रमानें सोन्याचीं व रुप्याचीं पात्रें असावीं . " हारीत - " भोजनाविषयीं रुपें , पानें , तांबें , कांस्य यांचीं पात्रें असावीं . " तेथेंच वाराहांत - " श्राद्धांत सोन्याचीं , रुप्याचीं , कांशाचीं पात्रें असावीं , त्यांच्या अभावीं इतरही काष्ठाचीं करावीं . लोहाचीं व पितळेचीं कधींही करुं नयेत . तशींच शिशाचीं व कथलाचीं पात्रें प्रशस्त नाहींत . " अत्रि - " गृहस्थांनीं सुवर्ण , रुपें यांच्या अभावीं बावन्न पल ( शास्त्रीय चार तोळ्यांचें एक पल या मानानें ) परिमित कांस्याचें पात्र सर्वदा भोजनाला करावें . पळसाच्या पानांवांचून इतर पानांचीं पात्रें भोजनास सांगितलीं नाहींत . " पृथ्वीचंद्र तर - " कांस्यपात्रांवर हवि ( अन्न ) पाहून पितर निराश होऊन जातात " असें ब्राह्मवचन आहे म्हणून कांस्यपात्राचा निषेध सांगतो . बोपदेव तर स्मृतिसंग्रह सांगता झाला , तो असा - " पळस , मोह , उंबर , पारिका , कुडा , पाईर , क्रकच , यांचीं पात्रें श्राद्धाविषयीं सांगतात . पितृकर्माविषयीं मुख्यपात्रांच्या अभावीं केळ , आंबा , फणस , जांभूळ , नागचांफा , सोनचांफा यांचीं पात्रें घ्यावीं . " हेमाद्रींत केळीचे पानाचा निषेध सांगतो . अंगिरा - " जाईचीं फुलें व केळीचें पान देऊं नये . " क्रतु - " पूर्वीं ज्या वेळीं केळ उत्पन्न झाली त्या वेळीं ती असुरांच्या कुळांत उत्पन्न झालेली आहे , तिच्या दर्शनमात्रानें पितर निराश होऊन जातात . " याप्रमाणें पात्रें मांडून भस्माची मर्यादा करुन ब्राह्मणाच्या हस्ताचें शोधन करावें . भस्ममर्यादेविषयीं ‘ पिशंग० ’ ‘ रक्षाणो० ’ हे दोन मंत्र केचित् ‍ म्हणतात . मात्स्यांत - " भस्ममर्यादा केल्यावांचून जो हस्तशोधन करितो त्याचें तें श्राद्ध आसुर होतें , पितरांना प्राप्त होत नाहीं . " तेथेंच ब्रह्मांडपुराणांत - " यथाविधि उदकांनीं हस्तपात्रादिकांचें प्रक्षालन करुन तें प्रक्षालनोदक दर्भतिलांनीं मिश्र असें शुद्ध भूमीवर टाकावें . " मंडलावर टाकावें , असें हेमाद्रि सांगतो .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP