TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
कृच्छ्रचांद्रायणांची इतिकर्तव्यता

तृतीय परिच्छेद - कृच्छ्रचांद्रायणांची इतिकर्तव्यता

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


कृच्छ्रचांद्रायणांची इतिकर्तव्यता

आतां कृच्छ्रचांद्रायणांची इतिकर्तव्यता सांगतो .

अथकृच्छ्रचांद्रायणेतिकर्तव्यता याज्ञवल्क्यः कुर्यात्र्त्रिषवणस्नायीकृच्छ्रंचांद्रायणंतथा । पवित्राणिजपेत् पिंडान् गायत्र्याचाभिमंत्रयेत् । त्रिषवणस्नानंचतप्तकृच्छ्रव्यतिरेकेण । तप्तकृच्छ्रेतुमनुनासकृत्स्नायीसमाहितइतिविशेषाभिधानात् । पवित्राणिसूक्तानिचाघमर्षणंदेवकृतशुद्धवत्यस्तरत्समंदीत्यादिवसिष्ठादिप्रदर्शितानिऋग्यजुः सामसुव्यवस्थितानियथाशाखंजपेत् अविरुद्धेषुकालेषु पिंडान् ग्रासान् प्रत्येकंगायत्र्याचाभिमंत्रयेत् ग्रासानुमंत्रणेगौतमोक्तैरोंभूरित्यादिमंत्रैः सहगायत्र्याविकल्पः एवंजपादिष्वप्येककार्याणांमंत्राणांविकल्पः भिन्नकार्याणांतुसमुच्चयइतिविवेकः । मनुः महाव्याह्रतिभिर्होमः कर्तव्यः स्वयमन्वहम् । अहिंसासत्यमक्रोधमार्जवंचसमाचरेत् । त्रिरह्नस्त्रिर्निशायांतुसवासाजलमाविशेत् । स्त्रीशूद्रपतितांश्चैवनाभिभाषेतकर्हिचित् । स्थानासनाभ्यांविहरन्नशक्तोधः शयीतवा । ब्रह्मचारीव्रतीचस्याद्गुरुदेवद्विजार्चकः । सावित्रींचजपेन्नित्यंपवित्राणिचशक्तितः । सर्वेष्वेवव्रतेष्वेवंप्रायश्चित्तार्थमादृतइति । त्रिरह्नइत्यादि दिवात्रिः रात्रौत्रिरितियदत्रषट् सुसवनेषुस्नानंतच्छक्तविषयं । एवंन्यूनाधिकस्नानान्यन्यान्यपिशक्ताशक्तापेक्षयातानि ।

याज्ञवल्क्य - " कृच्छ्र व चांद्रायण करीत असतां त्रिकाळ स्नान करावें , पवित्र सूक्तांचा जप करावा , आणि भक्षण करावयाचे ग्रास गायत्रीमंत्रानें अभिमंत्रित करावे . " त्रिकाल स्नान सांगितलें तें तप्तकृच्छ्र व्यतिरिक्त करुन समजावें . कारण , तप्तकृच्छ्राचे ठिकाणीं तर मनूनें एकवार स्नान करावें , असा विशेष सांगितला आहे . पवित्र सूक्तें सांगितलीं तीं - अघमर्षण , देवकृत , शुद्धवतीऋचा , तरत्समंदी इत्यादिक वसिष्ठादि ऋषींनीं दाखविलेलीं ऋग्वेदांतील , यजुर्वेदांतील , सामवेदांतील आपल्या शाखेप्रमाणें त्यांचा जप करावा . यांचा जप कोणत्या वेळीं करावा असें म्हणाल तर नित्यकर्म होऊन अवशेष राहिलेल्या काळीं करावा . येथें याज्ञवल्क्यानें ग्रासांचें अभिमंत्रण गायत्रीनें सांगितलें , आणि पूर्वीं गौतमानें ‘ ॐ भूः ’ इत्यादि मंत्रांनीं सांगितलें यावरुन गायत्रीचा व त्या मंत्रांचा विकल्प समजावा . याप्रमाणें एककार्यमंत्रांच्या जपादिकांविषयीं विकल्प होय . आणि भिन्नकार्यमंत्रांचा समुच्चय होय . मनु - " सर्वव्रतांचे ठायीं आदरपूर्वक करावयाचें सांगतो - महाव्याह्रतिमंत्रांनीं दररोज स्वतः होम करावा ; हिंसा वर्ज्य करावी ; सत्य भाषण करावें ; क्रोध वर्ज्य करावा ; आर्जव ( सरळपणा ) ठेवावें ; दिवसा तीन वेळां आणि रात्रीं तीन वेळां उदकांत प्रवेश करुन स्नान करावें ; स्त्रिया , शूद्र आणि पतित यांच्याशीं कधींही भाषण करुं नये ; सर्व काळ उभें राहून किंवा बसून असावें ; अशक्त असेल त्यानें भूमीवर पडावें ; ब्रह्मचर्य व्रत धारण करावें ; नित्य गुरु , देव आणि ब्राह्मण यांची पूजा करावी ; यथाशक्ति गायत्रीचा जप आणि पवित्रसूक्तांचा जप करावा ; हे नियम सर्व व्रतांचे ठायीं पापनिरसनाकरितां आदरपूर्वक करावे . " या मनुवचनांत दिवसा तीन वेळां आणि रात्रीं तीन वेळां जें स्नान सांगितलें तें सशक्ताला समजावें . याप्रमाणें कमी किंवा अधिक जीं स्नानें इतर ठिकाणीं सांगितलीं आहेत तीं अशक्ताला व सशक्ताला समजावीं .

जाबालः आरंभेसर्वकृच्छ्राणांसमाप्तौचविशेषतः । आज्येनैवहिशालाग्नौजुहुयाद्व्याह्रतीः पृथक् । श्राद्धं कुर्याद्व्रतांतेचगोहिरण्यादिदक्षिणा । स्त्रीणांहोमोनदातव्यः पंचगव्यंतथैवच । पराशरः स्त्रीशूद्रस्यतुशुद्ध्यर्थं प्राजापत्यंसमाचरेत् पंचगव्यंतुकुर्वीतस्नात्वापीत्वाशुचिर्भवेत् । स्त्रीशूद्रयोः पंचगव्यस्यविहितप्रतिषिद्धत्वा द्विकल्पः । जाबालेनशालाग्नौहोमंविधायस्त्रीणांहोमोनदातव्यइतिनिषेधात् गृह्याग्नावेवहोमनिषेधः अतश्चस्त्रीशूद्रयोरपिब्राह्मणद्वारालौकिकाग्नौभवत्येव । अयंचहोमोंगहोमः नतुकृच्छ्रप्रत्याम्नायभूतप्रधानहोमः । आरंभेसर्वकृच्छ्राणांसमाप्तौचविशेषतः । आज्येनैवहिशालाग्नौजुहुयाद्व्याह्रतीः पृथक् इतिजाबालेनविशेषाभिधानात् । कृच्छ्रप्रत्याम्नायभूतयोस्तुप्रधानयोर्जपहोमयोः स्त्रीशूद्रयोर्नाधिकारः । तथाचांगिराः तस्माच्छूद्रंसमासाद्यसदाधर्मपथेस्थितम् । प्रायश्चित्तंप्रदातव्यंजपहोमविवर्जितम् । अत्रशूद्रशब्दस्त्र्युपलक्षणार्थः तयोः समानधर्मत्वात् । वैशंपायनः स्नानंद्विकालमेवस्यात्र्त्रिकालंवाद्विजन्मनः । शंखः एकवासाआर्द्रवासालघ्वाशीस्थंडिलेशयइति । हारीतः अवरंशुद्धवतीभिः स्नात्वाघमर्षणमंतर्जलेजपित्वाधौतमहतंवासः परिधायसाम्नासौम्येनादित्यमुपतिष्ठेतेति ।

जाबाल - " सर्व कृच्छ्रांच्या आरंभीं व समाप्त झाल्यावर शालाग्नीवर ( गृह्याग्नीवर ) वेगवेगळ्या व्याह्रतिमंत्रांनीं आज्याचाच होम करावा ; व्रताच्या शेवटीं श्राद्ध करावें ; गाई , सुवर्ण इत्यादि दक्षिणा द्यावी . स्त्रियांना होम सांगूं नये , आणि तसेंच पंचगव्य देऊं नये . " पराशर - " स्त्रिया व शूद्र यांच्या शुद्धीसाठीं त्यांनीं प्राजापत्य कृच्छ्र करावें ; आणि पंचगव्य करुन स्नान करुन तें पिऊन त्यांनीं शुद्ध व्हावें . " स्त्रिया व शूद्र यांस या पराशरवचनानें पंचगव्य विहित असल्यामुळें आणि वरील जाबालानें प्रतिषिद्ध असल्यामुळें पंचगव्याचा त्यांना विकल्प समजावा . स्त्रिया व शूद्र यांस जाबालानें जो होमनिषेध सांगितला तो गृह्याग्नीवर होमनिषेध समजावा . लौकिकाग्नीवर ब्राह्मणाकडून स्त्रिया व शूद्र यांचा होम होतच आहे . हा स्त्रिया व शूद्र यांस सांगितलेला होम कृच्छ्रांगहोम समजावा . कृच्छ्रप्रतिनिधि जो प्रधानहोम तो समजूं नये . कारण , वरील जाबालवचनानें विशेष अंगहोम सांगितला आहे . कृच्छ्राचे प्रतिनिधिभूत जे जप व होम त्यांविषयीं त्यांना अधिकार नाहीं . तें सांगतो . अंगिरा - " धर्ममार्गीं राहाणारा शूद्र आला असतां त्याला जप होम वर्ज्य करुन कृच्छ्रादि प्रायश्चित्त सांगावें . " या ठिकाणीं शूद्रशब्द आहे तो स्त्रीचें उपलक्षण असल्यामुळें स्त्रियेलाही असेंच समजावें . कारण स्त्रिया , व शूद्र यांचे धर्म समान आहेत . वैशंपायन - कृच्छ्रादि व्रत करीत असतां दोन्ही कालीं ( प्रातः कालीं व सायंकाळीं ) स्नान करावें . अथवा तीन्ही कालीं करावें . " शंख - " व्रती यानें एक वस्त्र धारण करावें , ओलें वस्त्र धारण करावें . लघु अन्नाचा अल्प आहार करावा , स्थंडिलाचे ठिकाणीं शयन करावें . " हारीत - शुद्धवती ऋचांनीं स्नान करुन उदकांत राहून अघमर्षणसूक्ताचा जप करुन नवें धुतलेलें वस्त्र परिधान करुन सौम्य सामानें आदित्याचें उपस्थान करावें .

षट् त्रिंशन्मतांत जपहोमादियत्किंचित् कृच्छ्रोक्तंसंभवेन्नचेत् । सर्वंव्याह्रतिभिः कुर्याद्गायत्र्याप्रणवेनचेति । शंखः एकवासाश्चरेद्भिक्षांस्नात्वावासोनपीडयेत् । गायत्र्यादशसाहस्रमाह्निकंजपउच्यते । बौधायनः अहतंवासोवसीतसावित्रीव्याह्रतीश्चजपेदष्टसहस्रकृत्वः । ॐ कारमादितः कृत्वारुपेरुपेतथांततः । भूमौ वीरासनेयुक्तः कुर्याज्जप्यंसुसंयतः । आसीनः शल्यविद्धोवापिबेद्गव्यंपयः सकृत् । गव्यस्यपयसोलाभेगव्यमेव भवेद्दधि दध्नोलाभेभवेत्तक्रंतक्राभावेतुयावकं । एषामन्यतमंयत्तुउत्पद्येतचतत्पिबेत् । शल्यविद्धोवेति वाशब्द उपमार्थे । शल्यविद्धइवनिश्चलः सन्नासीनः पयः पिबेदित्यर्थः यमः अंगुल्यग्रेस्थितंपिंडंगायत्र्याचाभिमंत्रितम् । प्राश्याचम्यपुनः कुर्यादन्यस्याप्यभिमंत्रणम् । येतुप्राणाग्निहोत्राधिकारिणस्तेषामापोशनकर्मानंतरंप्राणाहुतयोपिपंचभिर्ग्रासैर्भवंति । तत्रचपूर्वोक्तप्रणवगायत्र्याद्यन्यतमैर्मंत्रैर्ग्रासानभिमंत्र्यप्राणायस्वाहेत्यादिभिर्मंत्रैः प्राणाग्नौहोमः कार्यः यदात्वेकदात्रिचतुरोवाग्रासास्तत्रबौधायनोक्तोविशेषोग्राह्यः तद्यथा अश्नीयात्प्राणायेतिप्रथममपानायेतिद्वितीयंव्यानायेतितृतीयमुदानायेतिचतुर्थंसमानायेतिपंचमम् । यदाचत्वारस्तदाद्वाभ्यांप्रथमं । यदात्रयस्तदाद्वाभ्यांद्वाभ्यांपूर्वौ । यदाद्वौतदाद्वाभ्यामेवोत्तरमेकंसर्वैरिति । अस्यार्थः यदाचत्वारोग्रासाभक्ष्यंतेतदाद्य द्वितीयाभ्यांमंत्राभ्यांप्रथमंग्रासंग्रसेत तृतीयेनद्वितीयंचतुर्थेनतृतीयंपंचमेनचतुर्थं । यदात्रयस्तदाद्यद्वितीयाभ्यां प्रथमंतृतीयचतुर्थाभ्यांद्वितीयंपंचमेनतृतीयं । यदाद्वौतदाप्रथमतआरभ्यत्रिभिः प्रथममत्ति । द्वाभ्यांद्वितीयं । यदात्वेकस्तदासर्वैरेवतंग्रसेदिति । हारीतः चांद्रमसंचरुंश्रपयित्वानवोनवइतिहुत्वा ज्योत्स्नायांचरुशेषान् पिंडान् सावित्र्याभिमंत्रितान् प्राश्नीयादिति । ज्योत्स्नाशब्देनचचंद्रोदयोलक्ष्यते तेनार्धरात्रावपिभोजने दोषोनास्ति । शंखः आर्द्रामलकमात्रास्तुग्रासाइंदुव्रतेस्मृताः । तथैवाहुतयस्तत्रशौचार्थंचैवमृत्तिकाः ॥ इतिकृच्छ्रचांद्रायणसाधारणेकर्तव्यता ॥

षट् त्रिंशन्मतांत - " कृच्छ्राचे ठिकाणीं जें कांहीं जप होमादि कृत्य सांगितलें आहे तें त्या मंत्रांनीं तसें करण्यास अशक्त असेल तर तें सारें व्याह्रतिमंत्रांनीं , गायत्रीमंत्रानें आणि प्रणवानें करावें . " शंख - " एक वस्त्र धारण करुन भिक्षेस जावें , स्नान केल्यावर वस्त्र पिळूं नये , गायत्रीमंत्राचा दहा हजार जप हें त्याचें आम्हिक ( दिवसाचें कर्म ) सांगितलें आहे . " बौधायन - " नवें धुतलेलें वस्त्र परिधान करावें , गायत्री आणि व्याह्रति यांचा आठ हजार जप करावा ; भूमीवर वीरासन घालून बसावें आणि प्रत्येक मंत्राच्या आदीं व अंती ॐकार लावून त्या गायत्रीचा जप करावा ; एकादे शल्यानें विद्ध जसा असतो तसा झाला असतां बसून एक वेळां गाईचें दूध प्यावें ; गाईचें दूध न मिळेल तर गाईचेंच दहीं प्यावें ; दहीं न मिळेल तर गाईचें ताक प्यावें ; ताक न मिळेल तर जवांचें पीठ प्यावें . यांपैकीं जें मिळेल तें प्यावें . " यम - " अंगुलीवर ग्रास घेऊन गायत्रीमंत्रानें त्याचें अभिमंत्रण करुन त्याचें प्राशन करुन आचमन करुन पुनः दुसर्‍या ग्रासाचें अभिमंत्रण करावें . " जे प्राणाहुतीचे अधिकारी ( ब्राह्मणादिक ) असतील त्यांचें आपोशन झाल्यानंतर प्राणाहुति देखील पांच ग्रासांनीं होतात . त्या ठिकाणीं पूर्वीं सांगितलेल्या गायत्र्यादिकांपैकीं कोणत्याही मंत्रांनीं ग्रासांचें अभिमंत्रण करुन ‘ प्राणाय स्वाहा ’ इत्यादि मंत्रांनीं पांच ग्रासांच्याच प्राणाहुति घ्याव्या . जेव्हां एकवेळीं तीन किंवा चार ग्रास घ्यावयाचे असतील त्या वेळीं बौधायनानें सांगितलेला विशेष घ्यावा , तो असा - ‘ प्राणायस्वाहा ’ या मंत्रानें प्रथम ग्रास भक्षण करावा , ‘ अपानाय स्वाहा ’ या मंत्रानें दुसरा , ‘ व्यानाय स्वाहा ’ या मंत्रानें तिसरा , ‘ उदानाय स्वाहा ’ या मंत्रानें चवथा , ‘ समानाय स्वाहा ’ या मंत्रानें पांचवा ग्रास भक्षण करावा . जेव्हां चार ग्रास असतील तेव्हां ‘ प्राणाय , अपानाय ’ या दोन मंत्रांनीं प्रथम ग्रास भक्षण करावा . तिसर्‍या मंत्रानें दुसरा ग्रास , चवथ्या मंत्रानें तिसरा ग्रास , पांचव्या मंत्रानें चवथा ग्रास भक्षावा . जेव्हां तीन ग्रास असतील तेव्हां पहिल्या व दुसर्‍या मंत्रानें पहिला ग्रास , तिसर्‍या व चवथ्या मंत्रानें दुसरा ग्रास , आणि पांचव्या मंत्रानें तिसरा ग्रास भक्षावा . " जेव्हां दोन ग्रास असतील तेव्हां पहिल्या तीन मंत्रांनीं पहिला ग्रास भक्षावा . आणि पुढच्या दोन मंत्रांनीं दुसरा भक्षावा . जेव्हां एक ग्रास भक्षावयाचा असेल तेव्हां पांचही मंत्रांनीं तो भक्षावा . " हारीत - " चंद्रदेवताक चरु शिजवून ‘ नवो नवो० ’ ह्या मंत्रानें त्याचा होम करुन अवशेष राहिलेल्या चरुचे पिंड ( ग्रास ) करुन ज्योत्स्नेंत ( चंद्रिकेंत ) गायत्रीमंत्रानें त्यांचें अभिमंत्रण करुन ते प्राशन करावे . " या वचनांत ज्योत्स्नाशब्दानें चंद्रोदय घ्यावा , म्हणजे चंद्रोदयवेळीं भोजन करावें , असें झालें . या योगानें अर्धरात्रीं देखील भोजन केलें तरी दोष नाहीं . शंख - " चांद्रायणाचे ठायीं ग्रास करावयाचे ते ओल्या आंवळ्याएवढे करावे . त्या ठिकाणीं होमाहुतीचें प्रमाण तेवढेंच समजावें . आणि शौचासाठीं मृत्तिकेचे गोळे करावयाचे तेही तेवढेच करावे . "

इति कृच्छ्रचांद्रायणांची साधारण इतिकर्तव्यता समाप्त .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:27.1470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बाकाबाकी

  • स्त्री. भांडण ; तंटा ; बोलाचाल . 
RANDOM WORD

Did you know?

कापूर जाळण्यामागची संकल्पना काय? कांही फायदे आहेत काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.