TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धाची परिभाषा

तृतीयपरिच्छेद - श्राद्धाची परिभाषा

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


श्राद्धाची परिभाषा

आतां श्राद्धाची परिभाषा सांगतो -

अथश्राद्धपरिभाषा चंद्रिकायांकात्यायनः दक्षिणंपातयेज्जानुंदेवान् ‍ परिचरन् ‍ सदा पातयेदितरंजानुंपितृन् ‍ परिचरन् ‍ सदा बौधायनः प्रदक्षिणंतुदेवानांपितृणामप्रदक्षिणं देवानामृजवोदर्भाः पितृणां द्विगुणास्तथा पृथ्वीचंद्रोदयेशंखः आवाहनार्घ्यसंकल्पेपिंडदानान्नदानयोः पिंडाभ्यंजनकालेतुतथैवांजनकर्मणि अक्षय्यासनयोः पाद्येगोत्रंनामप्रकाशयेत् ‍ तत्रैव परिशिष्टे दक्षिणापिंडदानेचगंधधूपाक्षयेतथा संकल्पेचासनेदीपेअंजनाभ्यंजनेतथा अन्नार्घ्यदानाद्यंतेषुगोत्रंनामचकीर्तयेत् ‍ कलिकायांसंग्रहे आसनावाहनेपाद्येअन्नदानेतथैवच अक्षय्येपिंडदानेचषट्‍सुनामानिकीर्तयेत् ‍ मात्स्ये संबंधंप्रथमंब्रूयाद्गोत्रंनामतथैवच पश्चाद्रूपंविजानीयात्क्रमएषसनातनः तत्रैव सकारेणतुवक्तव्यंगोत्रंसर्वत्रधीमता सकारः कुतपोज्ञेयस्तस्माद्यत्नेनतंवदेत् ‍ यथाकाश्यपसगोत्रेति पराशरसगोत्रस्यवृद्धस्यतुमहात्मनः भिक्षोः पंचशिखस्याहंशिष्यः परमधार्मिकइतिमोक्षधर्मेषुप्रयोगाच्च तेनगोत्रसगोत्रयोः पर्यायत्वाच्छाखाभेदाव्द्यवस्थेतिशूलपाणिः एतद्येषामाम्नातंतेषामेव हेमाद्रौबृहत्प्रचेताः गोत्रंस्वरांतंसर्वगोत्रस्याक्षय्यकर्मणि गोत्रस्तुतर्पणेप्रोक्तएवंदातानमुह्यति सर्वत्रैवपितः प्रोक्तः पितातर्पणकर्मणि पितुरक्षय्यकालेतुपित्र्येसंकल्पनेतथा शर्मन्नर्घ्यादिकेकार्यं शर्मातर्पणकर्मणि शर्मणोक्षय्यकालेतुपितृणांदत्तमक्षयं स्वरांतंसंबुद्ध्यंतमितिहेमाद्रिः तत्रैवचंद्रिकायां चस्मृत्यंतरे गोत्रस्यत्वपरिज्ञानेकाश्यपंगोत्रमुच्यते यस्मादाहश्रुतिः सर्वाः प्रजाः कश्यपसंभवाः यत्तुसत्याषाढः अथाज्ञातबंधोः पुरोहितगोत्रेणाचार्यगोत्रेणवेति तद्विवाहपरम् ‍ नामोच्चारणेविशेषमाहहेमाद्रौबौधायनः शर्मांतंब्राह्मणस्योक्तंवर्मांतंक्षत्रियस्यतु गुप्तांतंचैववैश्यस्यदासांतंशूद्रजन्मनः पित्रादिनामाज्ञानेतत्रैव पृथिवीषत् ‍ पितावाच्यस्तत्पिताचांतरिक्षसत् ‍ अभिधानापरिज्ञानेदिविषत्प्रपितामहः पित्रादीनांनामयदापुत्रैर्नज्ञायतेतदा आपस्तंबसूत्रेप्येवम् ‍ एतदन्यशाखापरम् ‍ आश्वलायनानांतूक्तं तत्सूत्रे यदिनामान्यविद्वांस्ततपितामहप्रपितामहेतिब्रूयात् ‍ तत् ‍ कारिकापि नामानिचेन्नजानीयात्ततेत्यादिवदेत् ‍ क्रमात् ‍ ततेतिसंबंधमात्रपरम् ‍ तेनपितृव्यादावपितथेतिगौडाः स्त्रीणांदांतंनामज्ञेयम् ‍ दांतंनामस्त्रीणामितिपृथ्वीचंद्रोदयेगोभिलोक्तेः केचिद्देवीशब्दांतमाहुः अन्येतुदेवीदाइतिद्वयोः समुच्चयमाहुः ।

चंद्रिकेंत कात्यायन - " देवांची परिचर्या ( पूजा ) करीत असतां सर्वदा उजव्या पायाचा जानु ( गुडघा ) भूमीवर टेंकावा . आणि पितरांची परिचर्या करणारानें वाम पायाचा गुडघा भूमीवर सर्वदा टेंकावा . " बौधायन - " देवांचें कर्म प्रदक्षिण करावें , आणि पितरांचें कर्म अप्रदक्षिण करावें . देवांना दर्भ ऋजु असावे आणि पितरांना दर्भ द्विगुणभुग्न असावे . " पृथ्वीचंद्रोदयांत शंख - " आवाहन , अर्घ्यदान , संकल्प , पिंडदान , अन्नदान , पिंडांचें अभ्यंजन व अंजन , अक्षय्योदक , आसन , आणि पाद्य इतक्या ठिकाणीं पितरांचें गोत्र नाम यांचा उच्चार करावा . " तेथेंच परिशिष्टांत - " दक्षिणा , पिंडदान , गंध , धूप , अक्षय्योदक , संकल्प , आसन , दीप , अंजन , अभ्यंजन , अन्नदान , अर्घ्यदान यांचेठायीं गोत्र व नांव यांचा उच्चार करावा . " कलिकेंत संग्रहांत - " आसन , आवाहन , पाद्य , अन्नदान , अक्षय्योदक , आणि पिंडदान या सहा ठिकाणीं नांवांचा उच्चार करावा . " मात्स्यांत - " पूर्वीं संबंध बोलावा , नंतर गोत्र व नांव बोलावें , नंतर रुप जाणावें , हा अनादि क्रम आहे . " तेथेंच - " विद्वानानें सर्वत्र ठिकाणीं सकारयुक्त गोत्राचा उच्चार करावा , सकार हा कुपत ( पापनाशक ) आहे म्हणून यत्नानें त्याचा उच्चार करावा . " जसें - ‘ कश्यपसगोत्र ’ आणि ‘‘ पराशरसगोत्र वृद्ध महात्मा पंचशिखा जो भिक्षु त्याचा मी परम धार्मिक शिष्य आहें . " असा मोक्षधर्मांत प्रयोगही आहे . यावरुन गोत्र व सगोत्र हे दोन शब्द पर्याय ( एकाचीं नांवें ) झाल्यामुळें शाखाभेदानें व्यवस्था करावी असें शूलपाणि सांगतो . हें सकारोच्चारण ज्यांना सांगितलें आहे त्यांनाच समजावें . हेमाद्रींत बृहत्प्रचेता - " सर्वत्र ठिकाणीं गोत्राचा उच्चार अकारांत ‘ काश्यपगोत्र ’ असा करावा . अक्षय्योदकाविषयीं ‘ अमुकगोत्रस्य ’ असा करावा . आणि तर्पणाविषयीं ‘ अमुकगोत्रः ’ असा करावा असें करुन श्राद्धकर्ता अविवेकी होत नाहीं . सर्वत्र ठिकाणीं ‘ पितः ’ असा उच्चार करावा . तर्पणाविषयीं ‘ पिता ’ असा करावा . अक्षय्य उदककालीं व संकल्पकालीं ‘ पितुः ’ असा उच्चार करावा . अर्घ्यादिकांविषयीं ‘ शर्मन् ‍ ’ असा उच्चार करावा . तर्पण कर्माविषयीं ‘ शर्मा ’ असा करावा . अक्षय्य उदककालीं ‘ शर्मणः ’ असा करावा . याप्रमाणें पितरांस दिलेलें दान अक्षय होतें . " वरील वचनांत ‘ स्वरांतं ’ असें पद आहे त्याचा अर्थ - संबुध्यंत होय , असें हेमाद्रि सांगतो . तेथेंच व चंद्रिकेंतही अन्यस्मृतींत सांगतो - " गोत्राचें ज्ञान नसेल तर काश्यपगोत्र सांगितलें आहे . कारण , सर्व प्रजा कश्यपापासून उत्पन्न आहेत असें श्रुति सांगते . " आतां जें सत्याषाढ सांगतो कीं , " ज्याचें गोत्र अज्ञात आहे त्याचें कृत्य पुरोहितगोत्रानें किंवा आचार्यगोत्रानें करावें . " तें विवाहविषयक आहे . नामोच्चारणाविषयीं विशेष सांगतो हेमाद्रींत बौधायन - " ब्राह्मणाच्या नांवाच्या अंतीं - ‘ शर्मन् ‍ ’ असें लावावें ; क्षत्रियाच्या नांवाच्या अंतीं ‘ वर्मन् ‍ ’ असें लावावें ; वैश्याच्या नांवाच्या अंतीं ‘ गुप्त ’ असें लावावें ; आणि शूद्राच्या नांवाच्या अंतीं ‘ दास ’ असें लावावें . " पिता इत्यादिकांच्या नांवाचें ज्ञान नसेल तर तेथेंच सांगतो - " पिता इत्यादिकांचीं नांवें पुत्रादिकांना माहीत नसतील तेव्हां पित्याचें नांव ‘ पृथिवीषत् ‍ ’ घ्यावें ; पितामहाचें नांव ‘ अंतरिक्षसत् ‍ ’ आणि प्रपितामहाचें नांव ‘ दिविषत् ‍ ’ असें समजावें . " आपस्तंबसूत्रांतही असेंच आहे , हें अन्यशाखाविषयक आहे . आश्वलायनांस तर त्याच्या सूत्रांत सांगतो - " जर नांवें जाणत नाहीं तर ‘ तत ’ ‘ पितामह ’ ‘ प्रपितामह ’ असें बोलावें . " आश्वलायन कारिकादि - " जर नांवें जाणत नाहीं तर ‘ तत ’ इत्यादि अनुक्रमानें म्हणावें . " ‘ तत ’ याचा अर्थ ‘ तात ’ आहे . हें पद सर्वसंबंधबोधक आहे , म्हणून ज्याचा संबंध असेल त्याचा उच्चार करावा ; जसें - चुलत्याचें नांव माहीत नसतां उच्चार करतेवेळीं ‘ पितृव्य ’ असा उच्चार करावा . याचप्रमाणें इतरांविषयीं देखील समजावें , असें गौड सांगतात . स्त्रियांच्या नांवाच्या अंतीं ‘ दा ’ असें लावावें . कारण , " स्त्रियांचें नांव दांत आहे " असें पृथ्वीचंद्रोदयांत गोभिलवचन आहे . केचित् ‍ ग्रंथकार स्त्रियांच्या नांवाचे अंतीं ‘ देवी ’ शब्द लावावा , असें सांगतात . अन्य ग्रंथकार तर ‘ देवी दा ’ हे दोन्ही शब्द स्त्रियांच्या नांवाचे अंतीं लावावे , असें सांगतात .

हेमाद्रौनारायणः विभक्तिभिस्तुयत्किंचिद्दीयतेपितृदैवते तत्सर्वंसफलंज्ञेयंविपरीतंनिरर्थकम् ‍ चंद्रिकास्मृत्यर्थसारयोश्चनारदीये अक्षय्यासनयोः षष्ठीद्वितीयावाहनेतथा अन्नदानेचतुर्थीस्याच्छेषाः संबुद्ध्यः स्मृताः यत्तु व्यासः चतुर्थीचासनेनित्यंसंकल्पेचविधीयते प्रथमातर्पणेप्रोक्तासंबुद्धिमपरेजगुरिति अत्रशाखाभेदाव्द्यवस्थेतिहेमाद्रिः हेमाद्रौभृगुः अर्घ्यावनेजनंपिंडमन्नंप्रत्यवनेजनम् ‍ संबुद्धिंतत्रकुर्वीतशेषेषष्ठीविधीयते तत्रैवमातुर्विशेषोनागरखंडे मातर्मात्रेतथामातुरासनेकल्पनेक्षये गोत्रेगोत्रायैगोत्रायाः प्रथमाद्याविभक्तयः ।

हेमाद्रींत नारायण - " देवपितरांना श्राद्धाचेठायीं नांवाच्या अंतीं विभक्ति लावून जें कांहीं देतात तें सफल होतें ; विभक्ति लावल्याशिवाय जें देतात तें निरर्थक होतें . " चंद्रिका स्मृत्यर्थसार यांत नारदपुराणांत - " अक्षय्योदक , आसन यांजविषयीं षष्ठी विभक्ति लावावी . आवाहनाविषयीं द्वितीया विभक्ति . अन्नादानाविषयीं चतुर्थी . बाकी सर्वत्र ठिकाणीं संबुद्धि विभक्ति समजावी . " आतां जें व्यास सांगतो कीं , " आसन व संकल्प यांचे ठायीं नित्य चतुर्थी सांगितली आहे . तर्पणाविषयीं प्रथमा ; इतर ठिकाणीं संबुद्धि सांगतात . " या मतभेदाविषयीं शाखाभेदानें व्यवस्था , असें हेमाद्रि सांगतो . हेमाद्रींत भृगु - " अर्घ्य , पाद्य , पिंड , अन्नदान , प्रत्यवनेजन इतक्या ठिकाणीं संबुद्धि करावी . इतर ठिकाणीं षष्ठी सांगितली आहे . "

हेमाद्रौप्रभासखंडे यज्ञोपवीतिनाकार्यंदैवंकर्मप्रदक्षिणं प्राचीनावीतिनाकार्यंपितृकर्माप्रदक्षिणं अनुपनीतस्त्रीशूद्रादेस्तूत्तरीयेणैवसव्यापसव्येज्ञेये तस्योपवीतस्थानीयत्वात् ‍ अपसव्यंक्रमाद्वस्त्रंकृत्वाकश्चित्सगोत्रजइतिब्राह्माच्चेतिवाचस्पतिः यत्तुकेचित् ‍ सदोपवीतिनाभाव्यमित्यस्यपुरुषार्थत्वात् ‍ प्राचीनावीतकालेप्युपवीतांतरेणतत्कार्यमेवेति तन्न विशेषबाधात् ‍ जमदग्निः सूक्तंस्तोत्रजपंत्यक्त्वापिंडाघ्राणंचदक्षिणाम् ‍ आह्वानंस्वागतंचार्घ्यंविनाचपरिवेषणं विसर्जनंसौमनस्यमाशिषांप्रार्थनंतथा विप्रप्रदक्षिणांचैवस्वस्तिवाचनकंविना पितृनुद्दिश्यकर्तव्यंप्राचीनावीतिनासदा हेमाद्रौसंग्रहे आदौविप्रांघ्रिशौचांतेभ्यर्चनेविकिरेकृते पिंडान्न्युप्यार्चयित्वाचविसर्ज्यब्राह्मणांस्तथा आचामेच्छ्राद्धकर्ताचस्थानेष्वेतेषुसप्तसु आद्यंतयोर्द्विराचामेच्छेषेषुतुसकृत्सकृत् ‍ तत्रैव श्राद्धारंभेवसानेनपादशौचार्चनांतयोः विकिरेपिंडदानेचषट् ‍ स्वाचमनमिष्यते आश्वलायनः दानाध्ययनदेवार्चाजपहोमव्रतादिकान् ‍ नकुर्याच्छ्राद्धदिवसेप्राग्विप्राणांविसर्जनात् ‍ एतन्नित्यवर्ज्यमितिबोपदेवः इदंविष्णुभिन्नदेवपरम् ‍ विष्णोर्निवेदितान्नेनयष्टव्यंदेवतांतरम् ‍ पितृभ्यश्चापितद्देयंतदानंत्यायकल्पते पितृशेषंतुयोदद्याद्धरयेपरमात्मने रेतोधाः पितरस्तस्यभवंतिक्लेशभागिन इतिस्कांदात् ‍ पितरः सर्वमनुष्या विष्णुनाशितमश्नंतीतिश्रुतेः यः श्राद्धकालेहरिभुक्तशेषंददातिभक्त्यापितृदेवतानाम् ‍ तेनैवपिंडांस्तुलसीविमिश्रानाकल्पकोटिंपितरस्तुतृप्ता इतिब्राह्मोक्तेश्चेतिश्रीधरस्वामिनृसिंहपरिचर्यादयः एतत्सर्वंनिबंधविरोधान्निर्मूलं ।

हेमाद्रींत प्रभासखंडांत - " दैवकर्म यज्ञोपवीती करुन प्रदक्षिण करावें ; पितृकर्म प्राचीनावीती करुन अप्रदक्षिण करावें . " अनुपनीताला ( मौंजी न झालेल्यास ), व स्त्रिया शुद्र इत्यादिकांस उत्तरीय वस्त्रानेंच सव्य आणि अपसव्य जाणावें ; कारण , तें उत्तरीय वस्त्र यज्ञोपवीतस्थानीं आहे . आणि " कोणी सगोत्रज क्रमानें वस्त्र अपसव्य करुन " असें ब्राह्मवचनही आहे , असें वाचस्पति सांगतो . आतां जें केचित् ‍ म्हणतात कीं , " सर्वदा उपवीती असावी " हें सांगणें पुरुषार्थ आहे म्हणून प्राचीनावीतीकालीं देखील इतर यज्ञोपवीतानें उपवीती करावीच . तें बरोबर नाहीं . कारण , विशेषानें प्राचीनावीतीविधानानें सामान्य उपवीतीचा बाध होतो . जमदग्नि - " सूक्त म्हणणें , स्तोत्रजप , पिंडांचें आघ्राण , दक्षिणा , आवाहन , स्वागत , अर्घ्यदान , परिवेषण ( अन्न वाढणें ), विसर्जन , सौमनस्य , आशिषः प्रार्थना , ब्राह्मणप्रदक्षिणा , स्वस्तिशब्दाचा उच्चार इतक्या कर्मावांचून इतर कर्मै पितरांच्या उद्देशानें करावयाचीं तीं सर्वदा प्राचीनावीतीनें करावीं . " हेमाद्रींत संग्रहांत - " श्राद्धाच्या आरंभीं , ब्राह्मणपादप्रक्षालनानंतर , ब्राह्मणपूजेच्या अंतीं , विकिरदान केल्यावर , पिंडदानाचे अंतीं , पिंडपूजा केल्यावर , आणि ब्राह्मणविसर्जनाच्या अंतीं , ह्या सात स्थानीं श्राद्धकर्त्यानें आचमन करावें . आदीं व अंतीं द्विवार आचमन करावें , इतर ठिकाणीं एकवारच करावें . " तेथेंच - " श्राद्धाच्या आरंभीं , व शेवटीं , पादक्षालनाच्या अंतीं , ब्राह्मणपूजेच्या अंतीं , विकिराचे अंतीं , आणि पिंडदानाच्या अंतीं ह्या सहा स्थानीं आचमन करावें . " आश्वलायन - " श्राद्धाच्या दिवशीं ब्राह्मणविसर्जनाच्या पूर्वीं दान , अध्ययन , देवपूजा , जप , होम , आणि व्रतादिक हीं करुं नयेत . " हें नित्य वर्ज्य आहे , असें बोपदेव सांगतो . हें वचन विष्णुव्यतिरिक्त देवविषयक आहे . कारण , " विष्णूला निवेदन केलेल्या अन्नानें इतर देवतांचा याग ( पूजा ) करावा . पितरांनाही तेंच द्यावें , तें दान अनंत होतें . जो मनुष्य परमात्म्या हरीला पितृशेष देईल त्याचे पितर रेतभक्षण करणारे क्लेशभागी होतील . " असें स्कांदवचन आहे . " पितर व सर्व मनुष्य विष्णूनें भक्षण केलेलें अन्न भक्षण करितात " अशी श्रुति आहे . " जो मनुष्य श्राद्धकालीं विष्णूचें भुक्तशेष अन्न पितर व देवता यांना मोठ्या भक्तीनें देतो , व त्याच अन्नांत तुलसी मिश्र करुन पिंडदान करितो त्याचे पितर कल्पकोटीपर्यंत तृप्त होतात " असें ब्राह्मवचनही आहे , असें श्रीधरस्वामी , नृसिंहपरिचर्यादिक सांगतात . हें सारें निबंधांचा ( हेमाद्यादिकांचा ) विरोध असल्यामुळें निर्मूल आहे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:21.7230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

sporocyst

 • स्त्री. Bot., Zool. बीजाणुपुटी 
 • बीजाणुपुट 
 • बीजकोष्ठ 
RANDOM WORD

Did you know?

Wife disgracing, defaming her husband, what is the solution ?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.