TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
तप्तकृच्छ्र

तृतीय परिच्छेद - तप्तकृच्छ्र

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


तप्तकृच्छ्र

आतां तप्तकृच्छ्र सांगतो.
अथतप्तकृच्छ्रः याज्ञवल्क्यः तप्तक्षीरघृतांबूनामेकैकंप्रत्यहंपिबेत् । एकरात्रोपवासश्चतप्तकृच्छ्र उदाह्रतः अयंचदिनचतुष्टयसाध्यः कृच्छ्रः मिताक्षरायांतु अयंमहातप्तकृच्छ्रइत्युक्तम् । तप्तकृच्छ्रस्तुद्विरात्रसाध्यइत्यप्युदीरितम् । तप्तक्षीरघृतांबुभिः समस्तैरेकदिनंवर्तेतएकाहउपवासइतिव्द्यहसाध्यत्वंतप्तकृच्छ्रस्येति । तप्तकृच्छ्रंचरन् विप्रोजलक्षीरघृतानिलान् । प्रतित्र्यहंपिबेदुष्णान्सकृत्स्नायीसमाहितः । प्रतित्र्यहंपिबेदितिजलादीन् प्रत्येकंत्र्यहंत्र्यहंपिबेदित्यर्थः अयंचद्वादशरात्रसाध्यः कृच्छ्रः । जलादिपरिमाणमाहपराशरः अपांपिबेत्तुत्रिपलंद्विपलंतुपयः पिबेत् । पलमेकंपिबेत्सर्पिस्त्रिरात्रंचोष्णमारुतमिति । त्रिरात्रमुष्णोदकस्यबाष्पंपिबेदित्यर्थः त्रिरात्रमितिपूर्वत्राप्यन्वेति अतः अपांत्रिपलंत्रिरात्रंपिबेदित्येवंयोज्यम् । प्रकारांतरेणाप्याहतप्तकृच्छ्रंपराशरः षट् पलंतुपिबेदंभस्त्रिपलंतुपयः पिबेत् । पलमेकंपिबेत्सर्पिस्तप्तकृच्छ्रंविधीयते । अत्रजलादिकमुष्णमेवग्राह्यम् ।

याज्ञवल्क्य - “ कढत दूध एक दिवस, कढत तूप एक दिवस, कढत पाणी एक दिवस प्यावें आणि एक दिवस उपवास करावा. याप्रमाणें हें चार दिवस केलें असतां हा तप्तकृच्छ्र होतो. ” मिताक्षरेंत तर हा महातप्तकृच्छ्र म्हणून सांगितलें आहे. आणि तप्तकृच्छ्र तर दोन दिवसांनीं होतो, असेंही मिताक्षरेंत सांगितलें आहे. त्याचा प्रकार असा - दूध, तूप, पाणी हे तीनही पदार्थ तापवून एक दिवस प्राशन करुन राहावें. आणि एक दिवस उपवास करावा. म्हणजे हा तप्तकृच्छ्र दोन दिवसांनीं साध्य होतो. अन्य प्रकारानें सांगतो - “ तप्तकृच्छ्र करणार्‍या ब्राह्मणानें एकवार स्नान करुन समाधान अंतः करणानें तीन दिवस उष्णोदक प्यावें. तीन दिवस उष्ण दूध प्यावें. तीन दिवस उष्ण तूप प्यावें. तीन दिवस उष्णवायु प्यावा. ” हा कृच्छ्र बारा दिवसांनीं साध्य होतो. या ठिकाणीं उदकादिकांचें प्रमाण सांगतो पराशर - “ तीन पलें ( १२ कर्ष ) उदक प्यावें दूध दोन पलेंक ( ८ कर्ष ) प्यावें. तूप एक पल ( ४ कर्ष ) प्यावें. आणि तीन दिवस उष्णवायु ( उष्णोदकाची वाफ ) प्यावा. वरती सांगितलेले पदार्थ तीन तीन दिवस प्यावे. तप्तकृच्छ्राचा दुसरा प्रकार सांगतो पराशर - “ उदक सहा पलें ( २४ कर्ष ), दूध तीन पलें ( १२ कर्ष ), तूप एक पल ( ४ कर्ष ), याप्रमाणें प्यावें म्हणजे तप्तकृच्छ्र होतो. ” हे उदकादिक पदार्थ उष्णच घ्यावे. 

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:26.9430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

hydration

  • न. सजलीकरण 
  • न. सजलन 
  • न. सजलीकरण 
  • न. सजलीभवन 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.