TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धांचे भेद

तृतीयपरिच्छेद - श्राद्धांचे भेद

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


श्राद्धांचे भेद

आतां श्राद्धांचे भेद सांगतो -

तद्भेदानाहविश्वामित्रः नित्यंनैमित्तिकंकाम्यंवृद्धिश्राद्धंसपिंडनम् ‍ पार्वणंचेतिविज्ञेयंगोष्ठ्यांशुद्ध्यर्थमष्टमं कर्मांगंनवमंप्रोक्तंदैविकंदशमंस्मृतम् ‍ यात्रास्वेकादशंप्रोक्तंपुष्ट्यर्थंद्वादशंस्मृतमिति एषांलक्षणानिभविष्ये अहन्यहनियच्छ्राद्धंतन्नित्यमितिकीर्तितम् ‍ वैश्वदेवविहीनंतदशक्तावुदकेनतु एकोद्दिष्टंतुयच्छ्राद्धंतन्नैमित्तिकमुच्यते तदप्यदैवंकर्तव्यमयुग्मान् ‍ भोजयेद्दिजान् ‍ कामायविहितंकाम्यमभिप्रेतार्थसिद्धये वृद्धौयत् ‍ क्रियतेश्राद्धंवृद्धिश्राद्धंतदुच्यते गंधोदकतिलैर्मिश्रंकुर्यात् ‍ पात्रचतुष्टयं अर्घ्यार्थंपितृपात्रेषुप्रेतपात्रंप्रसेचयेत् ‍ येसमानाइतिद्वाभ्यामेतज्ज्ञेयंसपिंडनं नित्येनतुल्यशेषंस्यादेकोद्दिष्टंस्त्रियाअपि एतदुभयमेवस्त्रियाः तेनस्त्रीकर्तृकंस्त्रीसंप्रदानकंचेत्युभयनियमइतिकल्पतरुः अमावास्यायांयत् ‍ क्रियतेतत् ‍ पार्वणमितिस्मृतम् ‍ क्रियतेवापर्वणियत्तत् ‍ पार्वणमितिस्थितिः अत्रपर्व चतुर्दश्यमष्टमीचैवअमावास्याचपौर्णिमा पर्वाण्येतानिराजेंद्ररविसंक्रमणंतथेति विष्णुपुराणोक्तंसंक्रांत्यादि गोष्ठ्यांयत् ‍ क्रियतेश्राद्धंगोष्ठीश्राद्धंतदुच्यते बहूनांविदुषांसंपत्सुखार्थंपितृतृप्तये क्रियते शुद्धयेयत्तुब्राह्मणानांतुभोजनम् ‍ शुद्ध्यर्थमितितत् ‍ प्रोक्तंवैनतेयमनीषिभिः निषेककालेसोमेचसीमंतोन्नयनेतथा ज्ञेयंपुंसवनेचैवश्राद्धंकर्मांगमेवच देवानुद्दिश्ययच्छ्राद्धंतत्तुदैविकमुच्यते गच्छन् ‍ देशांतरंयस्तुश्राद्धंकुर्यात्तुसर्पिषा यात्रार्थमितितत् ‍ प्रोक्तंप्रवेशेचनसंशयः शरीरोपचयेश्राद्धमर्थोपचयएवच पुष्ट्यर्थमेतद्विज्ञेयमौपचायिकमुच्यते गोष्ठ्यांश्राद्धकर्तृसमुदायेसंभूयसामग्रीसंपादनेनश्राद्धमित्यर्थः युगपत्तीर्थादिप्राप्तौविदुषांश्राद्धसंपदासुखार्थंभिन्नपाकाशक्तौबहुपितृकश्राद्धमेकः कुर्यादितिकल्पतरुः शंखधरश्च शुद्धिश्राद्धंप्रायश्चित्तांगमितिमैथिलाः अत्र पार्वणैकोद्दिष्टवृद्धिसपिंडीकरणात्मकंचतुर्विधमेवमुख्यम् ‍ तस्यैवायंप्रपंचः ॥

विश्वामित्र - " नित्यश्राद्ध १ नैमित्तिकश्राद्ध २ , काम्यश्राद्ध ३ , वृद्धिश्राद्ध ४ , सपिंडनश्राद्ध ५ , पार्वणश्राद्ध ६ , गोष्ठीश्राद्ध ७ , शुद्धिश्राद्ध ८ , कर्मांगश्राद्ध ९ , दैविकश्राद्ध १० , यात्राश्राद्ध ११ , आणि पुष्टिश्राद्ध १२ बारावें असे श्राद्धाचे भेद बारा आहेत . " ह्या बारा श्राद्धांचीं लक्षणें सांगतो भविष्यांत - " प्रतिदिवशीं ( दररोज ) जें श्राद्ध करावयाचें म्हणून सांगितलें तें नित्यश्राद्ध म्हटलें आहे . तें श्राद्ध विश्वेदेवरहित होतें . तितकेंही ( एका ब्राह्मणानें देखील ) करावयास सामर्थ्य नसेल तर केवळ उदकानें देखील तें नित्यश्राद्ध होतें . जें श्राद्ध एकोद्दिष्ट ( सपिंडनाच्यापूर्वीं ) म्हणून सांगितलें आहे , तें नैमित्तिक श्राद्ध होय . तेंही विश्वेदेवरहित करावें . या श्राद्धांत अयुग्म ( तीन , किंवा एक ) ब्राह्मणांना भोजन घालावें . कामनेला विहित श्राद्ध म्ह० आपली मनकामना सिद्ध होण्यासाठीं जें करावयाचें तें श्राद्ध काम्य होय . वृद्धिकर्माचेठायीं जें श्राद्ध करितात , तें वृद्धिश्राद्ध म्हटलें आहे . ज्या श्राद्धामध्यें अर्घ्याकरितां गंध , उदक , तीळ यांनीं युक्त अशीं चार पात्रें करुन ‘‘ येसमाना० " इत्यादि दोन मंत्रांनीं त्यांतील एका प्रेतपात्रांतील उदक तीन्ही पितृपात्रांमध्यें प्रसेचन करावें म्हणजे मिळवावें , म्हणून सांगितलें आहे , तें सपिंडनश्राद्ध होय . सपिंडनश्राद्धाच्या प्रसंगानें एकोद्दिष्टाचें लक्षण सागतो - तें असें कीं , एकाच्या उद्देशानें करावयाचें श्राद्ध तें एकोद्दिष्ट होय . या एकोद्दिष्टाचीं अंगें नित्यश्राद्धासारखीं असतात . हें एकोद्दिष्ट दोन प्रकारचेंच स्त्रियेला श्राद्ध होय ; म्हणजे श्राद्धकर्त्री स्त्री असेल तर एकोद्दिष्टच करावें , हा एक नियम आणि श्राद्धभोक्री स्त्री असेल तर एकोद्दिष्टच करावें , असा दुसरा नियम , असा दोन प्रकारचा नियम आहे असें कल्पतरु सांगतो . जें श्राद्ध अमावास्येला करावयाचें म्हणून सांगितलें तें पार्वणश्राद्ध म्हटलें आहे ; अथवा पर्वाचेठिकाणीं करावयाचें तें पार्वण ; अशी शास्त्रमर्यादा आहे . श्राद्धाला पर्वै सांगतो - ‘ चतुर्दशी , अष्टमी , अमावास्या , पौर्णिमा , आणि तशीच संक्रांति हीं पर्वै आहेत , अशीं विष्णुपुराणांत सांगितलेलीं संक्रांति वगैरे पर्वै श्राद्धप्रकरणीं घ्यावीं . गोष्टी म्हणजे बहुत ब्राह्मणसमुदाय बहुत विद्वान् ‍ एकत्र मिळून पितरांची तृप्ति होऊन आपणांस संपत्ति व सुख प्राप्त व्हावें ; म्हणून श्राद्ध करितात तें गोष्ठीश्राद्ध म्हटलें आहे . आपली शुद्धि होण्यासाठीं जें ब्राह्मणभोजन करितात , तें शुद्ध्यर्थश्राद्ध होय , असें विद्वानांनीं सांगितलें आहे . गर्भाधान , सोमयाग , मंतोन्नयनसंस्कार , आणि पुंसवनसंस्कार , इतक्या ठिकाणीं जें नांदीश्राद्ध करितात , तें कर्मोगश्राद्ध होय . देवांच्या उद्देशानें जें श्राद्ध करितात तें दैविकश्राद्ध म्हटलें आहे . देशांतरीं जाण्यासाठीं घरांतून निघतेवेळीं घृतानें श्राद्ध करावयाचें तें यात्रार्थश्राद्ध म्हटलें आहे . तसेंच देशांतराहून घरीं आल्यावरही घृतश्राद्ध करावें म्हणून सांगितलें तेंही यात्रार्थश्राद्धच होय याविषयीं संशय नाहीं . शरीरवृद्धि होण्याविषयीं तसेंच अर्थाची ( द्रव्यादिसंपत्तीची ) वृद्धि होण्याविषयीं जें श्राद्ध सांगितलें आहे तें पुष्ट्यर्थश्राद्ध होय . हेंच औपचायिक श्राद्ध म्हटलें आहे . " वरील गोष्ठीश्राद्ध लक्षणवचनाचा इत्यर्थ - अनेक ब्राह्मणांच्या समुदायामध्यें श्राद्धकर्ते बहुत ब्राह्मण एकत्र सामग्री संपादन करुन श्राद्ध करितात , तें होय असा समजावा . कल्पतरु आणि शंख हे ग्रंथकार , अनेक विद्वान् ‍ ब्राह्मणांना एकदम तीर्थादिक प्राप्त झालें असतां अनेकांना भिन्न भिन्न पाक होणें अशक्य असल्यामुळें , फार आयासावांचून यथास्थित श्राद्ध संपादन व्हावें , म्हणून सर्वांच्या पितरांचें श्राद्ध एकानें करावें : असें सांगतात . शुद्धिश्राद्ध हें प्रायश्चित्तांग आहे , असें मैथिल सांगतात . ह्या वरील द्वादशश्राद्धांमध्यें पार्वण , एकोद्दिष्ट , वृद्धि आणि सपिंडीकरण हें चार प्रकारचेंच श्राद्ध मुख्य आहे , त्याचाच हा प्रपंच म्हणजे वर सांगितलेले बारा प्रकार होत .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:20.6470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रोळा

 • रोंवळणे , रोवळा - ळी पहा . 
 • पु. वृष्टि ; समुदाय . दिव्य सुमनांचा रोळा । कृष्ण चौपाशी विखुरला । - एभा ३१ . ३७ . [ तुल० इं . रोल ] 
RANDOM WORD

Did you know?

Are the advertisements necessary on your pages?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.