TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
आशौचसंपात

तृतीय परिच्छेद - आशौचसंपात

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आशौचसंपात

आतां आशौचसंपाताविषयीं सांगतो -

अथाशौचसंपातेउच्यते तत्रशावेशावंसूतकेसूतकं शावेसूतकंसूतकेशावंवा तत्राप्युत्तरंकालतः पूर्वेणसमंन्यूनमधिकंचेतिद्वादशभेदाः यदैकदिनेसमंन्यूनमधिकंवाशौचद्वयंतत्रतंत्रेणान्यसिद्धिः द्वयोरेककालत्वात् ‍ यदातुद्वितीयादिदिनेषूत्तरंसजातीयंशावेजननंवासमकालंन्यूनकालंवापरंस्यात्तदाषट्‍सुपक्षेषुपूर्वशेषेण शुद्धिः अंतराजन्ममरणेशेषाहोभिर्विशुध्यतीतियाज्ञवल्क्योक्तेः अंतराज्ञातेइत्यर्थः ज्ञातस्यैवजननादेर्निमित्तत्वात् ‍ पूर्वाशौचोत्तरंतन्मध्योत्पन्नेज्ञातेतूत्तरमेवकार्यम् ‍ शुद्धितत्त्वेप्युक्तं पूर्वाशौचांतरुत्पन्नंसमानं लघुवानिमित्तंतत्कालादुपरिश्रुतंस्वाशौचहेतुरेव अज्ञातंतुन अविज्ञातेनदोषः स्याच्छ्राद्धादिषुकथंचनेत्यस्याशौचसांकर्यैपिप्रवृत्तेः तेनाज्ञानाद्वृषोत्सर्गादौकृतेपश्चाज्ज्ञातेपिनावृत्तिरिति माधवीयेयमोपि जननेजननंचेत्स्यान्मरणेमरणंतथा पूर्वशेषेणशुद्धिः स्यादुत्तराशौचवर्जनं अत्रकेचिदंतर्दशाहेस्यातांचेत्पुनर्मरणजन्मनी तावत्स्यादशुचिर्विप्रोयावत्तत्स्यादनिर्दशमितिमनुपराशराद्यैर्दशाहग्रहणात् ‍ पूर्णाशौचएवपूर्वशेषेणशुद्धिः त्र्यहाद्यल्पाशौचसंपातेतूत्तरेणैवशुद्धिरित्याहुः हरदत्तोप्येवमाह गौडाअप्येवं तन्न याज्ञवल्क्यादिवशेनदशाहस्यतुल्यकालाशौचोपलक्षणत्वात् ‍ समानाशौचसंपातेप्रथमेनसमापयेत् ‍ असमानंद्वितीयेनधर्मराजवचोयथेतिमाधवीयेशंखोक्तेः अपरार्कमिताक्षरादिविरोधाच्च ।

आशौचसंपाताचे भेद बारा होतात , ते असे - १ मृताशौचांत सममृताशौच , २ मृताशौचांत न्यूनमृताशौच , ३ मृताशौचांत अधिकमृताशौच , ४ जननाशौचांत समजननाशौच , ५ जननाशौचांत न्यूनजननाशौच , ६ जननाशौचांत अधिकजननाशौच , ७ मृताशौचांत समजननाशौच , ८ मृताशौचांत न्यूनजननाशौच , ९ मृताशौचांत अधिकजननाशौच , १० जननाशौचांत सममृताशौच , ११ जननाशौचांत न्यूनमृताशौच , १२ जननाशौचांत अधिकमृताशौच . याप्रमाणें बारा भेद समजावे . ज्या वेळीं एका दिवश्हीं दोन आशौचें समान दिवसांचीं उत्पन्न होतील किंवा एक कमी व एक अधिक अशीं दोन उत्पन्न होतील त्या वेळीं एक आशौच धरल्यानें तंत्रेंकरुन इतराची सिद्धि होते . कारण , दोन्ही आशौचांचा काल एक आहे . ज्या वेळीं पूर्वीं एक आशौच असतां दुसर्‍या - तिसर्‍या इत्यादि दिवशीं त्याच जातीचें ( पूर्वींचें मृताशौच असेल तर मृताशौच , जननाशौच असेल तर जननाशौच ) उत्पन्न होईल अथवा मृताशौचांत जननाशौच उत्पन्न होईल , व तें नंतर उत्पन्न झालेलें आशौच पहिल्या आशौचाशीं समान कालाचें किंवा न्यूनकालाचें असेल तर सहा भेदांमध्यें ( मृताशौचांत सममृताशौच , मृताशौचांत न्यूनमृताशौच , जननाशौचांत समजननाशौच , जननाशौचांत न्यूनजननाशौच , मृताशौचांत समजननाशौच , मृताशौचांत न्यूनजननाशौच या पक्षांमध्यें ) पहिल्या आशौच समाप्तीनें दुसर्‍या आशौचाची शुद्धि होते . कारण , आशौचामध्यें जनन किंवा मरण होईल तर पहिल्या आशौचाच्या शेषदिवसांनीं शुद्धि होते " असें याज्ञवल्क्यवचन आहे . पहिल्या आशौचामध्यें दुसर्‍या आशौचाचें ज्ञान झालें असतां पूर्वीच्यानें दुसर्‍याची शुद्धि असा अर्थ त्या वचनाचा आहे . कारण , जाणलेलें जनन व मरण हेंच आशौचाविषयीं निमित्त आहे . पहिल्या आशौचांत उत्पन्न झालेलें आशौच , पहिलें आशौच संपल्यावर समजेल तर दुसरें केलेंच पाहिजे . शुद्धितत्त्वांतही सांगितलें आहे - पहिल्या आशौचामध्यें समान किंवा अल्प आशौच उत्पन्न झालें असून पहिल्या आशौचाचे समाप्तीनंतर समजेल तर तें आपल्या आशौचाला कारण आहेच ; म्हणजे निवृत्ति होत नाहीं . त्याचें ज्ञान नसेल तर आशौच नाहीं . कारण , " आशौच अज्ञात असेल तर श्राद्धादिकर्माविषयीं दोष नाहीं " हें वचन ह्या आशौचसंपातांतही प्रवृत्त होतें . तेणेंकरुन ( ज्ञानापूर्वीं दोष नसल्यामुळें ) आशौचज्ञान नसतांना वृषोत्सर्गादिक कर्म केलें , नंतर आशौचाचें ज्ञान झालें तरी पूर्वींच्या कर्माची ( वृषोत्सर्गादिकाची ) आवृत्ति ( पुनः करण ) होत नाहीं . माधवीयांत यमही - ‘‘ जननाशौचांत जननाशौच , मरणाशौचांत मरणाशौच प्राप्त असतां पूर्वींच्या आशौचाच्या शेषानें शुद्धि होते , दुसरें आशौच वर्ज्य करावें . " येथें केचित् ‍ विद्वान् ‍ - " दशाह आशौचामध्यें दुसरें जनन किंवा मरण उत्पन्न होईल तर जोंपर्यंत तें पहिलें दशाह आशौच आहे तोंपर्यंत ब्राह्मण अशुचि होतो . " अशा वचनामध्यें मनु - पराशर इत्यादिकांनीं ‘ दशाह ’ या पदाचें ग्रहण केल्यामुळें पूर्ण आशौचांतच पहिल्या शेषानें शुद्धि होते . तीन दिवसांच्या वगैरे अल्प आशौचांचा संपात असेल तर दुसर्‍या आशौचानेंच शुद्धि होते , असें सांगतात . हरदत्त असेंच सांगतो . गौडही असेंच सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , याज्ञवल्क्यादिवचनानुरोधानें मनु - पराशरादिवचनांतील ‘ दशाह ’ हें पद तुल्यकालीन आशौचाचें उपलक्षण ( बोधक ) आहे . म्हणजे समान कालाच्या पहिल्या आशौचानें समान कालाचें दुसरें आशौच निवृत्त होतें , असा भाव . " समान आशौचांचा संपात असतां पहिल्या आशौचानें दुसरें आशौच समाप्त करावें , असमान आशौचांचा संपात असतां दुसर्‍या आशौचानें समाप्त करावें , असें यमधर्माचें वचन आहे " असें माधवीयांत शंखवचन आहे . आणि अपरार्क , मिताक्षरा इत्यादिकांचा विरोधही येतो .

यदातुसूतकेशावंसमंन्यूनमधिकंवातदानपूर्वशेषाच्छुद्धिः तदाहांगिराः सूतकेमृतकंचेत्स्यान्मृतकेत्वथसूतकं तत्राधिकृत्यमृतकंशौचंकुर्यान्नसूतकं षटत्रिंशन्मते शावाशौचेसमुत्पन्नेसूतकंतुयदाभवेत् ‍ शावेनशुध्यतेसूतिर्नसूतिः शावशोधनी चतुर्विंशतिमतेपि मृतेनशुध्यतेजातंनमृतंजातकेनतु अतोयदादशाहजननमध्येतदंतेवात्र्यहादिशावंतदापूर्णेणशुद्धावपितन्निमित्तमस्पृश्यत्वंभवत्येव मरणोत्पत्तियोगेतुगरीयोमरणंभवेदितिकौर्माच्च गौतमव्याख्यायांवृद्धात्रिरपि सूतकादिगुणंशावंशावाद्दिगुणमार्तवं आर्तवाद्दिगुणासूतिस्ततोपिशवदाहकः अत्रपूर्वपूर्वेणनोत्तरोत्तरनिवृत्तिरस्पृश्यत्वाधिक्यादित्यर्थः षडशीतावपि स्वभावबहुसूतिस्तुन्यूनशावविशोधनीति रात्रिशेषादौवर्धितद्वित्रिदिनैरागंतुकैः सूतेर्बहुत्वंनस्वभावेन अतस्तत्रन्यूनशावस्यापिनपूर्वेणशुद्धिरितिवक्तुंस्वभावेत्युक्तं ब्राह्मेपि नागंतुकैरथाहोभिराशौचमपनुद्यते नचपातनिमित्तेनशावस्यान्यस्यशोधनमिति एवंनवपक्षाः यदातुत्र्यहाद्यल्पाशौचमध्येसजातीयंविजातीयंवादीर्घकालमुत्तरंतदाप्युत्तरंपूर्णंकार्यं नपूर्वेणशुद्धिः स्वल्पाशौचस्यमध्येतुदीर्घाशौचंभवेद्यदि नचपूर्वेणशुद्धिः स्यात्स्वकालेनैवशुध्यतीत्युशनसोक्तेः तेनत्र्यहादिशावमध्येदशहादिसूतकेपिनपूर्वेणशुद्धिरित्यपरार्कः शावनिमित्तमस्पृश्यत्वंचभवत्येव शुद्धिविवेकेतु शावेनशुध्यतेसूतिरितिप्रागुक्तेः तत्राप्युत्तराशौचनिवृत्तिरुक्ता तन्न उत्तरस्यकालाधिक्येनबलवत्त्वात् ‍ माधवीयेयमोपि अघवृद्धिमदाशौचंपश्चिमेनसमापयेत् ‍ यथात्रिरात्रे प्रक्रांतेदशाहंप्रविशेद्यदि आशौचंपुनरागच्छेत्तत्समाप्यविशुध्यति हारीतोपि गुरुणालघुशुध्येत्तुलघुनानैवतद्गुर्विति गुरुत्वंलघुत्वंचकालकृतमेव पूर्वानुरोधात् ‍ एतच्चहरदत्तेनस्पष्टमुक्तं मिताक्षरायामप्येवं यत्तु अघानांयौगपद्येतुज्ञेयाशुद्धिर्गरीयसा मरणोत्पत्तियोगेतुगरीयोमरणंभवेदिति हारीतकौर्मादि तत्रास्पृश्यत्वाभिप्रायंशावस्यगुरुत्वंज्ञेयम् ‍ ।

ज्या वेळीं जननाशौचांत मृताशौच समकालीन किंवा न्यूनकालीन अथवा अधिककालीन प्राप्त होईल त्या वेळीं पूर्वींच्या जननाशौचाच्या शेषानें उत्तराशौचाची शुद्धि होत नाहीं . तें सांगतो अंगिरा - " जर जननाशौचांत मृतक उत्पन्न झालें अथवा मृतकांत जनन उत्पन्न झालें तर त्या ठिकाणीं मृतक धरुन शुद्धि करावी . जननाशौच धरुन शुद्धि करुं नये . " षटत्रिंशन्मतांत - " ज्या वेळीं मृताशौचांत जननाशौच उत्पन्न होईल त्या वेळीं मृताशौचानें जननशौच जातें . जननाशौचानें मृताशौच जात नाहीं . " चतुर्विंशतिमतांतही - " मृताशौचानें जननाशौच शुद्ध होतें . जननाशौचानें मृताशौच शुद्ध होत नाहीं . म्हणून ज्या वेळीं दहा दिवसांचे जननाशौचामध्यें किंवा त्याच्या अंतीं तीन दिवसांचे वगैरे मृताशौच प्राप्त होईल तेव्हां पूर्वींच्या जननाशौचानें शुद्धि झाली तरी मृताशौचनिमित्तानें अस्पृश्यत्व आहेच . आणि " मरण व उत्पत्ति यांचा योग असतां त्यांमध्यें मरण गुरु ( अधिक ) आहे " असें कूर्मपुराणाचें वचनही आहे . गौतमव्याख्येंत वृद्धात्रिही सांगतो - " जननाशौचाहून मृताशौच दुप्पट दोषी आहे . मृताशौचाहून दुप्पट स्त्रियांचें आर्तव दोषी आहे . आर्तवाहून दुप्पट सूतिका दोषी आहे . सूतिकेहून प्रेतदाहक अधिक दोषी आहे . " यांत पहिल्या पहिल्यानें पुढच्या पुढच्याची निवृत्ति होत नाहीं . कारण , पुढच्या पुढच्याला अस्पृश्यत्व दोष अधिक आहे , असा भाव . षडशीतींतही - " स्वभावानें बहुत असलेलें सूतिकेचें आशौच न्यून असलेल्या मृताशौचाचें शोधन करितें . " या वचनांत ‘ स्वभावानें बहुत असलेलें सूतिकेचें आशौच ’ असें म्हणण्याचें कारण , आशौचाच्या दहाव्या रात्रीं दुसरें आशौच प्राप्त असतां पहिल्या आशौचाचे दोन किंवा तीन दिवस वाढवून तितक्या दिवसांनीं दुसर्‍या आशौचाची निवृत्ति होते असें पुढें सांगावयाचें आहे , त्याप्रमाणें ज्या ठिकाणीं सूतिकेच्या आशौचाचे दिवस वाढवून सूतिकाशौच बहुत झालें असेल त्या ठिकाणीं वाढविलेल्या बहुत अशा पहिल्या सूतिकाशौचानें अल्प अशाही मृताशौचाची निवृत्ति होत नाहीं , असें सांगण्याकरितां स्वभावानेंच बहुत असलेलें सूतिकाशौच अल्प मृताशौचाचें शोधक म्हणून सांगितलें , असें समजावें . ब्राह्मांतही - " आगंतुक ( वाढविलेल्या ) दिवसांनीं - अर्थात् ‍ तिसरें - आशौच जात नाहीं . गर्भपातनिमित्तक आशौचानें इतर मृताशौचाची शुद्धि होत नाहीं . " याप्रमाणें पहिले सहा पक्ष आणि जननाशौचांत सम , न्यून , व अधिक मृताशौचाचे हे तीन पक्ष मिळून नऊ पक्षांची व्यवस्था सांगितली . ज्या वेळीं तीन दिवस , पक्षिणी इत्यादि अल्प आशौचामध्यें त्याच जातीचें ( मृताशौचांत मृताशौच इत्यादि ) किंवा भिन्न जातीचें दुसरें आशौच अधिक दिवसांचें प्राप्त होईल त्या वेळींही दुसरें आशौच संपूर्ण करावें . पहिल्या आशौचानें दुसर्‍याची शुद्धि होत नाहीं . कारण , " जर स्वल्प आशौचामध्यें दीर्घ आशौच उत्पन्न होईल तर पूर्व अल्प आशौचानें दुसर्‍या दीर्घ आशौचाची शुद्धि होत नाहीं . तर आपल्या कालानेंच त्या दीर्घाशौचाची शुद्धि होते " असें उशनसाचें वचन आहे . तेणेंकरुन तीन दिवसांचे वगैरे मृताशौचांत दशाहादिक जननाशौच उत्पन्न झालें तरी पहिल्या आशौचानें शुद्धि होत नाहीं , असें अपरार्क सांगतो . मृताशौचनिमित्तक अस्पृश्यत्व होतच आहे . शुद्धिविवेकांत तर - " मृताशौचानें जननाशौच शुद्ध होतें , असें पूर्वीं उक्त षटत्रिंशन्मताच्या वचनावरुन अल्प मृताशौचांतही अधिक जननाशौचाची निवृत्ति सांगितली आहे , तें बरोबर नाहीं . कारण , दुसर्‍या आशौचाचा काल अधिक असल्यामुळें तें प्रबळ आहे . माधवीयांत यमही - " अधिक दिवसांचें आशौच पूर्वींच्या आशौचांत समाप्त करुं नये . जसें - तीन दिवसांचें आशौच प्राप्त असतां त्यांत जर दहा दिवसांचें आशौच उत्पन्न झालें तर तें आशौच प्राप्त होतें , तें समाप्त झाल्यावर शुद्ध होतो . " हारीतही - " गुरु आशौचानें लघु आशौचाची शुद्धि होते . लघु आशौचानें गुरुची शुद्धि होत नाहीं . " या वचनांत पूर्वींच्या अनुरोधानें गुरु व लघु हें कालानें केलेलेंच समजावें . हा प्रकार हरदत्तानें स्पष्ट सांगितला आहे . मिताक्षरेंतही असेंच आहे . आतां जें " अनेक आशौचें एक कालीं प्राप्त होतील तर गुरु आशौचानें लघु आशौचाची शुद्धि जाणावी . मृताशौच व जननाशौच यांचा योग झाला असेल तर त्यांमध्यें मृताशौच गुरु आहे " असें हारीतकौर्मादिवचन आहे , त्यांत अस्पृश्यत्वामुळें मृताशौचाला गुरुत्व सांगितलें आहे , असें समजावें .

क्वचिदल्पकालेनापिदीर्घकालाशौचनिवृत्तिमाहदेवलः परतः परतोशुद्धिरघवृद्धौविधीयते स्याच्चेत्पंचतमादह्नः पूर्वेणैवात्रशिष्यते अस्यार्थः अघवृद्धौदीर्घाशौचे परतोशुद्धिः परमाशौचं यदिपूर्वाशौचमुत्तरस्यपंचमदिनात्परतोनुवर्ततेतदापूर्वेणैवशुद्धिः पूर्वस्योत्तराशौचार्धाधिककालव्यापित्वेपूर्वशेषाच्छुद्धिरित्यर्थः यथाषष्ठमासेगर्भपातनिमित्तषडहाशौचमध्येदशाहपातेपूर्वेणोत्तरनिवृत्तिः यथावा त्र्यहमध्येस्त्रावपातनिमित्तचतुरहपंचाहयोरितिकश्चित् ‍ तन्न दशाहावधिपूर्वशेषशुध्यावेदकवाक्यविरोधात् ‍ षष्ठादिदिनेपूर्णाशौचमंत्यरात्रौतुव्द्यहइत्यनौचित्याच्च अस्मद्गुरवस्तुपंचतमादह्नआशौचंततोन्यूनंत्र्यहादिचेत्स्यादस्मिन्विषयेपूर्वेणैवाशुद्धिः शिष्यते दशाहादिरात्रिशेषेत्र्यहादिपातेत्र्यहाद्यल्पाशौचानांपरस्परंरात्रिशेषेसंपातेचनद्व्यहादिवृद्धिरित्यर्थमाहुः क्वचित्पूर्वशेषेणशुद्धेरपवादमाहगौतमः रात्रिशेषेसतिद्वाभ्यांप्रभातेतिसृभिरिति प्रभातेंत्ययामेरात्रिशेषेद्वयहाच्छुद्धिर्यामशेषेशुचिस्त्र्यहादितिशातातपोक्तेः इदंशावांतेसूतकपातेसजातीयेवातुल्यं अत्र केचित् ‍ रात्रिशब्दः अहोरात्रपरः अहः शेषेद्वाभ्यांप्रभातेतिसृभिरितिशंखलिखोतोक्तेः अथयदिदशरात्राः सन्निपतेयुराद्यंदशरात्रमाशौचमानवमाद्दिवसादतऊर्ध्वंद्विरात्रेण व्युष्टायांत्रिरात्रेणेतिबौधायनोक्तेः पुनः पातेदशाहात्प्राक्पूर्वेणसहगच्छति दशमेह्निपतेद्यस्याहर्द्वयात्सविशुध्यतीति प्रभातेतुत्रिरात्रेणदशरात्रेष्वयंविधिरितिदेवलोक्तेश्च नवमदशमशब्दौचोपांत्यांत्यदिनपरौ तेनक्षत्रियादावपितथेत्याहुः माधवीयेप्येवम् ‍ ।

क्वचित् ‍ स्थलीं अल्पकालीन आशौचानेंही दीर्घकाल आशौचाची निवृत्ति सांगतो . देवल - " पहिल्या आशौचांत दुसरें दीर्घ आशौच प्राप्त असतां पहिल्यानें दुसरें जात नाहीं . जर पहिलें आशौच दुसर्‍या आशौचाच्या पांचव्या दिवसाच्या पुढें अनुवृत्त असेल तर पहिल्या आशौचानेंच त्या दीर्घ आशौचाची शुद्धि होते . " म्हणजे पहिलें आशौच दुसर्‍या आशौचाच्या निम्मेपेक्षां पुढें गेलें असेल तर पहिल्या आशौचाच्या शेषानें शुद्धि होते , हा इत्यर्थ होय . जसें - सहाव्या महिन्यांत गर्भपात होऊन तन्निमित्तक सहा दिवसांच्या आशौचामध्यें दुसरें दहा दिवसांचें आशौच प्राप्त असेल तर पहिल्या आशौचानें दुसर्‍याची निवृत्ति होते . अथवा तीन दिवसांच्या आशौचामध्यें स्त्राव - पातनिमित्तक चार - पांच दिवसांचें आशौच प्राप्त असतां त्या तीन दिवसांच्या आशौचानें त्या चार - पांच दिवसांच्या आशौचाची निवृत्ति होते ; असें कोणीएक सांगतो . तें हें कोणीएकानें सांगितलेलें देवलमत बरोबर नाहीं . कारण , या अर्थानें असें झालें कीं , पहिलें आशौच दुसर्‍या आशौचाला अर्धापेक्षां अधिक व्यापील तर म्हणजे पहिल्या दहा दिवसांच्या आशौचांत पांचव्या दिवसाचे आंत दुसरें दहा दिवसांचें प्राप्त होईल , तर पहिल्यानें दुसर्‍याची निवृत्ति होईल असें झालें . म्हणून पूर्वीं सांगितलेल्या " दहा दिवसांचे आंत दुसरें आशौच प्राप्त असतां पहिल्यानें दुसर्‍याची निवृत्ति होते " या मनु इत्यादिकांच्या वचनाशीं विरोध येतो . आणि या देवलवचनानें , सहाव्या - सातव्या इत्यादि दिवशीं दुसरें आशौच प्राप्त असतां निवृत्ति होत नाहीं , तर दुसरें पूर्ण आशौच धरावें , असें झालें . व पुढें सांगावयाच्या शातातप - देवल - इत्यादि वचनांनीं पहिल्या आशौचाच्या शेवटच्या रात्रीं दुसरें प्राप्त असतां दोन दिवस आशौच , असें झालें तें अनुचितही आहे . आमचे गुरु तर - वरील देवलवचनाचा अर्थ - पांचव्या दिवसाचे आंतील म्हणजे तीन दिवसांचें वगैरे आशौच दहा दिवसांच्या आशौचांत पडलें तर पहिल्या आशौचानें अशुद्धि राहते , आणि दशाहादि आशौचाच्या शेवटच्या रात्रीं तीन दिवसांचें आशौच पडलें तर आणि दोन्ही तीन दिवसांच्या वगैरे अल्प आशौचांचा संपात शेवटच्या रात्रीं पडला तर दोन - तीन दिवसांची वृद्धि होत नाहीं , असा अर्थ करितात . क्वचित्स्थलीं पूर्वशेषानें शुद्धीचा अपवाद सांगतो गौतम - " पहिल्या आशौचाची रात्रि शेष असतां दुसरें आशौच समजलें तर दोन दिवसांनीं शुद्धि होते . आणि प्रभातकालीं म्हणजे रात्रीच्या शेवटच्या प्रहरीं समजलें तर तीन दिवसांनीं शुद्धि होते . " या वचनांत प्रभात म्हणजे शेवटचा प्रहर समजावा ; कारण , " रात्रिशेष असेल तर दोन दिवसांनीं शुद्धि आणि रात्रीचा एक प्रहर शेष असतां समजेल तर तीन दिवसांनीं शुद्धि होते " असें शातातपवचन आहे . हें सांगणें मृताशौचाच्या अंतीं जननाशौच समजलें असतां किंवा मृताशौचाच्या अंतीं मृताशौच व जननाशौचाच्या अंतीं जननाशौच समजलें असतां समान आहे . येथें केचित् ‍ ग्रंथकार - या गौतमवचनांतील ‘ रात्रि ’ शब्द दिवसरात्रीचा बोधक आहे . कारण , पहिलें आशौच एक दिवस शेष असून दुसरें समजेल तर दोन दिवसांनीं शुद्धि व प्रभातकालीं समजेल तर तीन दिवसांनीं शुद्धि " असें शंखलिखितवचन आहे . " पहिलें आशौच दहा दिवसांचें असून त्यामध्यें नऊ दिवसांचे आंत दुसरें दहा दिवसांचें आशौच पडलें तर तें संपतें . नऊ दिवसांच्या पुढें दहाव्या दिवशीं दुसरें दहा दिवसांचें आशौच पडलें तर दोन दिवसांनीं शुद्धि होते . पहांटेस पडेल तर तीन दिवसांनीं शुद्धि होते . " असें बौधायनवचन आहे . " दहाव्या दिवसाचे आंत पुनः दुसरें आशौच पडेल तर पहिल्या आशौचाच्या बरोबर दुसरें जातें . ज्याला दुसरें आशौच पहिल्याच्या दहाव्या दिवशीं पडेल तो दोन दिवसांनीं शुद्ध होतो . प्रभातकालीं पडेल तर तीन दिवसांनीं शुद्ध होतो . दहा दिवसांच्या आशौचांविषयीं हा विधि समजावा " असें देवलवचनही आहे . वरील वचनांत ‘ नवम ’ या शब्दानें आशौचाचे शेवटच्या दिवसाजवळचा दिवस समजावा . आणि ‘ दशम ’ या शब्दानें आशौचाचा शेवटचा दिवस समजावा . तेणेंकरुन क्षत्रिय - वैश्य इत्यादिकांच्या बारा व पंधरा दिवसांच्या आह्सौचांतही तसेंच समजावें , असें ( केचित् ‍ ) सांगतात . माधवाच्या ग्रंथांतही असेंच आहे .

अन्येत्वाहुः अंतर्दशाहेस्यातांचेत्पुनर्मरणजन्मनी तावत्स्यादशुचिर्विप्रोयावत्तत्स्यादनिर्दशमितिमनुपराशराद्यैर्दशमदिनेनोत्तरस्यशुद्धेरुक्तत्वात् ‍ विरोधः स्पष्टएव विरोधेच यद्वैकिंचनमनुरवदत्तद्भेषजं कलौपाराशरस्मृतिरित्यनेनपूर्ववचसांबाधः अतएववाचस्पतिनातेषामनाकरत्वमुक्तं साकरत्वेपिजातिमात्रविप्रादिविषयं देशांतरविषयंवा युगांतरविषयंवास्तु तेनगौतमीये रात्रिशब्दो नाहोरात्रपरः रात्रिमात्रावशिष्टेइतिमिताक्षरोक्तेश्च नकुकविकृतेरिवान्यथाव्याख्यायुक्ता माधवस्तु अनिर्गतदशाहमिति पूर्वस्वग्रंथविरोधादुपेक्ष्यइति अस्मत् ‍ पितृचरणास्तुबौधायनीये आनवमाद्दिवसादिति द्वितीयाशौचस्यनवमंदिनंप्रथमस्यदशममेवाह व्द्यहादिवृद्धेः पूर्वशेषापवादत्वात्तस्यचन्यायतोद्वितीयदिनादेवप्रवृत्तेः अतऊर्ध्वमितिदशमरात्रिपरं शंखलिखितोक्तौदेवलोक्तौचाह शेषेदशमेह्निचातीतेरात्रौपतेदित्यर्थः दशम्यांपितानामकुर्यादितिवत् ‍ तेननमन्वाद्यैर्विरोधोनापिमिताक्षराद्यैरित्याहुः अपरार्केनिर्णयामृतस्वरसोप्येवं यत्तुतत्रैवब्राह्मे आद्यंभागद्वयंयावत्सूतकस्यतुसूतकं द्वितीयंपततित्वाद्यात्सूतकाच्छुद्धिरिष्यते

अतऊर्ध्वंद्वितीयात्तुसूतकांताच्छुचिः स्मृतः एवमेवविचार्यंस्यान्मृतकेमृतकांतरं मृतकस्यांतरेयत्रसूतकंप्रतिपद्यते सूतकस्यांतरेवाथमृतकंयत्रविद्यते मृतकांतेभवेत्तत्रशुद्धिर्वर्णेषुसर्वशइति अस्यार्थस्तत्रैवोक्तः पूर्वाशौचचरमाहोरात्रस्यदिनरुपेआद्यभागद्वयेन्याशौचपातेपूर्वेणशुद्धिः भागद्वयोर्ध्वंरात्रौ सूतकांतरेद्वितीयात्पूर्वभिन्नात्सूतकांताद्दयूहादिरुपाच्छुद्धिरिति अपरार्केत्वाशौचकालंत्रेधाविभज्यनिर्गुणविषयत्वेनेदमुक्तं

अस्यवचनस्यनिर्मूलत्वोक्तिरज्ञोक्तिरेव अतः पूर्वाशौचांत्यरात्रावन्याशौचेहोरात्रद्वयमधिकंरात्रेरंत्ययामेतुदिनत्रयमितिभट्टचरणोपदिष्टः पंथाः एतत्संपूर्णाशौचसंपातेएव रात्रिशेषेत्रिरात्रादिसंपातेतुपूर्वशेषेणैवशुद्धिः द्विरात्रादिवृद्धेः पूर्ववाक्यैर्दशाहविषयत्वादपवादाभावेशेषशुद्धेरेवसामान्यतः प्रवृत्तेः षडशीतौतुदशाहांतेत्र्यहपातेपिद्वित्रिदिनवृद्धिरुक्ता रात्रिशेषेयदाशौचंपूर्वानधिकमापतेत् ‍ ऊर्ध्वंदिनद्वयंपूर्वाद्यामशेषेदिनत्रयमिति अनधिकंसमंन्यूनंवा तत्तुच्छं निर्मूलत्वादंतेपक्षिण्यादिपातेपिद्विरात्रादिवृद्ध्यापत्तेश्च पूर्वाशौचांतर्वर्धितद्वित्रिदिनमध्येधिकाशौचांतरपातेतुवर्धितस्याल्पत्वादधिकेनैवशुद्धिः नचवर्धितस्यपूर्वशेषत्वंशंकनीयं रात्रिशेषपूर्वशेषशुद्ध्यपवादेनैमित्तिकावृत्तिन्यायोज्जीवनात् ‍ अपवादाभावेउत्सर्गस्यप्राप्तेः ।

इतर ग्रंथकार तर असें सांगतात कीं , " दहा दिवसांचे आंत पुनः मरण किंवा जनन उत्पन्न झालें तर जोंपर्यंत पहिल्याचे दहा दिवस संपले नाहींत तोंपर्यंत ब्राह्मण अशुद्ध होतो " ह्या मनु - पराशर - इत्यादिकांच्या वचनांनीं दहाव्या दिवशीं समजेल तर दुसर्‍या आशौचाची शुद्धि सांगितल्यामुळें पूर्ववचनांचा व यांचा विरोध स्पष्टच आहे . विरोध आला असतां " जें कांहीं मनु सांगता झाला तें मेषज ( हित ) आहे , " " कलियुगांत पराशरस्मृति प्रमाण आहे " या वाक्यांनीं पूर्वींच्या शंखलिखितादिवचनांचा बाध होतो . म्हणूनच वाचस्पतीनें तीं वचनें आकरांत ( निबंधांत ) नाहींत असें सांगितलें . आकरांत असलीं तरी जातीचेच केवळ ब्राह्मणादिक असतील त्यांविषयीं , किंवा देशांतराविषयीं अथवा इतर युगांविषयीं असोत . तेणेंकरुन वरील गौतमाच्या वचनांतील ‘ रात्रि ’ शब्द दिवसरात्रीचा बोधक नाहीं . आणि शेवटची रात्र केवळ अवशेष असेल तर , असें मिताक्षरेंतही सांगितलें आहे . कुत्सित कवीच्या कृतीप्रमाणें अन्यथा ( इतर रीतीची ) व्याख्या युक्त नाहीं . माधव तर - दहा दिवस गेले नाहींत तों समजेल तर , ह्या पूर्वींच्या त्याच्याच ग्रंथाशीं विरोध असल्यामुळें तो उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे . आमचे वडील ( रामकृष्णभट्ट ) तर - वरील बौधायनवचनात ‘ आनवमाद्दिवसात् ‍ ’ म्हणजे दुसर्‍या आशौचाचा नववा दिवस तोच पहिल्या आशौचाचा दहावा दिवस सांगितला आहे . कारण , दहाव्या दिवसानंतर दोन वगैरे दिवसांची वृद्धि सांगितली ती पूर्वीं सांगितलेल्या पहिल्या शेषानें निवृत्तीचा अपवाद आहे . तें दुसरें आशौच पहिल्या आशौचाच्या दुसर्‍या दिवसापासूनच प्रवृत्त झालें आहे . म्हणून त्याचें तात्पर्य असें कीं , पहिल्या आशौचाच्या दहाव्या दिवशीं दुसर्‍या आशौचाचे नऊ दिवसांपर्यंत कोणताही दिवस पडेल तर पहिल्यानें दुसर्‍याची निवृत्ति होते . त्याच्या पुढें म्हणजे पहिल्याच्या दहाव्या रात्रीं पडेल तर दोन दिवसांनीं शुद्धि असें समजावें . शंखलिखितवचनांतील ‘ शेष ’ शब्द आणि देवलवचनांतील ‘ दशमेह्नि ’ यांचा अर्थ - दहावा दिवस जाऊन रात्रीं दुसरें आशौच पडेल तर दोन दिवसांची वृद्धि होते , असा समजावा . जसें दहाव्या रात्रीं पित्यानें मुलाचें नांव ठेवावें , या वाक्यांत दहावी रात्र गेली असतां अकराव्या दिवशीं असा अर्थ करितात तसा येथें करावा . असा अर्थ केल्यानें मनु - पराशर - इत्यादि वचनांशीं विरोध येत नाहीं . आणि मिताक्षरा इत्यादि ग्रंथांशींही विरोध येत नाहीं , असें सांगतात . अपरार्कांत निर्णयामृताचें स्वारस्यही असेंच आहे . आतां जें तेथेंच ब्राह्मांत सांगतो - " जननाशौचाच्या पहिल्या दोन भागांत दुसरें जननाशौच पडलें असतां पहिल्या जननाशौचानें शुद्धि होते . दोन भागांच्या पुढें दुसरें पडलें तर दुसरें समाप्त झाल्यावर शुद्धि होते . मृताशौचांत मृताशौच पडेल तर असेंच समजावें . ज्या ठिकाणीं मृताशौचांत जननाशौच किंवा जननाशौचांत मृताशौच पडेल त्या ठिकाणीं मृताशौच समाप्त झाल्यावर सर्ववर्णांची शुद्धि होते " या वचनांचा अर्थ तेथेंच असा केला आहे कीं , ‘ पहिल्या आशौचाच्या शेवटच्या रात्रिदिवसाचे दिवसरुपी पहिल्या दोन भागांत इतर आशौच पडलें असतां पहिल्या आशौचानें शुद्धि होते . दोन भाग गेल्यावर रात्रीं इतर सूतक पडलें असतां प्रथमसूतकव्यतिरिक्त असें जें दोन - तीन दिवस वाढविलेलें सूतक तें समाप्त झाल्यावर शुद्धि होते . ’ अपरार्कांत तर - आशौचकालाचे तीन भाग करुन निर्गुणाला हें सांगितलें , असें सांगितलें आहे . हें वचन निर्मूल म्हणणारे अज्ञच समजले पाहिजेत . या कारणास्तव वर केलेल्या अर्थावरुन पहिल्या आशौचाच्या शेवटच्या रात्रीं इतर आशौच पडलें असतां दोन अहोरात्र अधिक आशौच करावें . शेवटच्या रात्रीच्या शेवटच्या प्रहरीं पडेल तर तीन दिवस अधिक आशौच करावें , हा भट्टांनीं सांगितलेला मार्ग आहे . दोन , तीन दिवस वाढवून आशौच सांगितलें हें संपूर्ण ( दहा दिवसांचें ) आशौच पडेल तरच आहे . शेवटच्या रात्रीं तीन दिवसांचें वगैरे अल्प आशौच पडेल तर पहिल्या शेषानेंच शुद्धि होते . कारण , दोन - तीन दिवसांची वृद्धि सांगितली ती पूर्वींच्या ( देवलादिकांच्या ) वचनांवरुन दहा दिवसांच्या आशौचाविषयीं आहे . म्हणून पडलेल्या तीन दिवसांच्या आशौचाविषयीं दोन दिवस वाढवावे इत्यादिक अपवादवाक्य नसतां पूर्वींच्या याज्ञवल्क्यादिवचनांनीं सांगितलेली शेषानें शुद्धि तीच सामान्यतः प्रवृत्त होते . षडशीतींत तर - दहा दिवसांच्या आशौचाच्या अंतीं तीन दिवसांचें आशौच पडलें तरी दोन - तीन दिवसांची वृद्धि ( अधिक आशौच ) सांगितली आहे . कारण , " पहिल्या आशौचाची रात्रि शेष असतां पहिल्या आशौचाच्या समान किंवा न्यून आशौच पडेल तर पहिल्या आशौचापेक्षां अधिक दोन दिवस आशौच . आणि एक प्रहर रात्र शेष असतां पडेल तर तीन दिवस आशौच करावें . " हें षडशीतिमत तुच्छ आहे . कारण , हें सांगणें मूलवचनरहित आहे . आणि या रीतीनें म्हटलें म्हणजे पक्षिणी इत्यादि आशौच पडलें तरी दोन - तीन दिवसांची वृद्धि ( अधिक ) प्राप्तही होईल . पहिल्या दहा दिवसांच्या आशौचाच्या अंतीं इतर आशौच पडल्यामुळें वाढविलेले जे दोन - तीन दिवस त्यांमध्यें अधिक ( दहा दिवासांचें वगैरे ) आशौच तिसरें प्राप्त झालें असेल तर वाढविलेलें आशौच अल्प असल्यामुळें अधिक प्राप्त झालेल्या आशौचानेंच शुद्धि होते . आतां वाढविलेलें आशौच पहिल्या आशौचाचा शेष आहे , म्हणून त्यानें तिसर्‍याची निवृत्ति होईल , अशी शंका करुं नये . कारण , रात्रिशेष असतां दोन दिवस आशौचवृद्धि करावी , हें वचन पूर्वशेषशुद्धीचा अपवाद असल्यामुळें वाढविलेल्या आशौचास पूर्वशेषत्व नाहीं , म्हणून निमित्ताची ( मरणादिकाची ) आवृत्ति असतां नैमित्तिक जें आशौच त्याची आवृत्ति होते ह्या न्यायाचें येथें उज्जीवन झालें . वर्धित आशौचानें इतराचे शुद्धीविषयीं अपवाद नसल्यामुळें उत्सर्ग ( पूर्वीं सांगितलेल्या आशौचविधि ) वाक्याचीच प्रवृत्ति होते .

अपवादांतरमाहशंखः मातर्यग्रेप्रमीतायामशुद्धौम्रियतेपिता पितुः शेषेणशुद्धिः स्यान्मातुः कार्यातुपक्षिणी पादत्रयंस्पष्टम् ‍ तुर्यस्यत्वयमर्थः पित्राशौचमध्येमातृमृतौपित्राशौचांतेमातुः पक्षिणीमधिकांकुर्यादिति अत्राशुद्धावित्युक्तेरात्महादेः पितुराशौचाभावान्मातृमरणेनपक्षिणी किंतुपूर्णमेवाशौचं इयंचपक्षिणीतृतीयादिदिनपरानाद्यदिनद्वये प्रतिनिमित्तनैमित्तिकावृत्तिन्यायापवादत्वादितिपितृचरणाः सपिंडाद्याशौचेनमातापित्रोराशौचापगमोनास्त्येव एवंभर्तुरपि इयंचपक्षिणीदशमदिनात्पूर्वंमातृमरणेज्ञेया दशम्यांरात्रौतत्प्रभातेवामातृमरणेद्व्यहत्र्यहसमुच्चितापक्षिणीतिकश्चित् ‍ तन्न संख्यांतरोपजननापत्त्यात्र्यहादिश्रुतिबाधापत्तेः अतएवैकादेयाषट्‍देयाइत्यादौश्रुतसंख्याबाधापत्तेः समुच्चयोनिरस्तोद्वादशे गुरुणिलघोरंतर्गतेः गुरुणालघुशुध्येदित्युक्तेश्च ।

दुसरा अपवाद सांगतो शंख - " माता प्रथम मृत असतां आशौचामध्यें पिता मृत होईल तर मातेच्या शेष आशौचानें पित्याच्या आशौचाची शुद्धि होते . आणि पित्याच्या आशौचामध्यें माता मृत असेल तर पित्याच्या आशौचाचे अंतीं मातेचें पक्षिणी आशौच अधिक करावें . " या वचनांत ‘ अशुद्धींत मृत असेल ’ असें म्हटलें आहे म्हणून आत्महत्या वगैरे करणारा जो पिता त्याचें आशौच नसल्यामुळें माता मृत असेल तर पक्षिणीच अधिक नाहीं , तर मातेचें पूर्ण आशौच करावें . ही मातेची अधिक पक्षिणी सांगितली ती पित्याच्या तिसर्‍या दिवसापासून पुढें मृत असेल तर समजावी . पहिल्या दोन दिवशीं मृत असेल तर अधिक पक्षिणी नाहीं . कारण , प्रत्येक निमित्ताला नैमित्तिकाची ( आशौचाची ) आवृत्ति करावी , असा जो न्याय त्याचा अपवाद आशौच संपात वचनें आहेत , असें पितृचरण सांगतात . सपिंडादिकांच्या आशौचानें मातापितरांचें आशौच जात नाहींच . याप्रमाणें पतीचेंही आशौच इतराशौचानें जात नाहींच . अधिक पक्षिणी सांगितली ही दहा दिवसांचे आंत माता मृत असतां समजावी . पित्याच्या आशौचाचे दहाव्या रात्रीं किंवा पहांटेस माता मृत असतां दोन दिवस किंवा तीन दिवस अधिक धरुन आणि पक्षिणी धरावी , असें कोणी एक सांगतो . तें बरोबर नाहीं . कारण , आशौचाचे दिवसांस इतर संख्येची ( साडेतीन किंवा साडेचार दिवसांची ) उत्पत्ति प्राप्त झाल्यामुळें वचनांत तीन दिवस इत्यादि श्रुतसंख्येचा बाध होईल , तो होतां कामा नये ; म्हणूनच आधानप्रकरणीं ‘ एका देया , षट् ‍ देयाः , द्वादश देयाः ’ असें वाक्य आहे त्या ठिकाणीं एक देऊन सहा दिल्या तर वाक्यांत श्रुत जी एकत्व , षटत्व इत्यादि संख्या तिचा बाध होईल म्हणून समुच्चयाचा ( एक देऊन सहा देणें इत्यादिकांचा ) निरास ( निषेध ) जैमिनिसूत्रांच्या बाराव्या अध्यायांत केला आहे . आणि गुरु आशौचांत लघु आशौच अंतर्गत झाल्यानें गुरु आशौचानें लघूची शुद्धि होते , असें पूर्वीं सांगितलेंही आहे .

यदानारीविशेदग्निंप्रियस्यप्रियवांछया तदाशौचंविधातव्यंभर्त्राशौचक्रमेणहीतिपृथ्वीचंद्रोदयेलघुहारीतोक्तेः तत्रैवषडशीतिमतेपि मृतंपतिमनुव्रज्यपत्नीचेदनलंगता नतत्रपक्षिणीकार्यापैतृकादेवशुध्यति पुत्रोन्योवाग्निदस्तस्यास्तावदेवाशुचिस्तयोः नवश्राद्धंसपिंडंचयुगपत्तुसमापयेत् ‍ गृहीताशौचानांपुत्राणांपितुः संस्कारेमातुः सपिंडस्यवामरणेनायंनिर्णयः अतिक्रांतकालाद्विद्यमाननिमित्तस्यबलवत्त्वात् ‍ द्वादशवर्षोत्तरसंस्काराशौचमध्येसपिंडमरणेप्येवं यत्तु अपरार्केब्राह्मे ऋग्वेदवादात्साध्वीस्त्रीनभवेदात्मघातिनी त्र्यहाशौचेतुनिर्वृत्तेश्राद्धंप्राप्नोतिशास्त्रवदिति तद्भर्तुराशौचोत्तरमन्वारोहणेत्रिरात्राशौचपरमितिपृथ्वीचंद्रः ब्राह्मणादेः क्षत्रियाद्यनुगमनेल्पाशौचपरमित्यपरार्कः शुद्धितत्त्वादयोगौडास्तु भर्तुराशौचोत्तरमन्वारोहणेत्रिरात्रं सहगमनेतुसंपूर्णम् ‍ युद्धहतस्यसद्यः शौचेन्वारोहणेब्राह्मोक्तेस्त्रिरात्रत्वात् ‍ भर्तुरपित्र्यहेणपिंडदानं एकचितौतुसद्यः शौचमित्याहुः अन्यत् ‍ प्रागुक्तम् ‍ ।

मातेचें अन्वारोहण ( सतीगमन ) असेल तर पक्षिणी नाहीं . कारण , " पतीचें प्रिय करावें , अशा इच्छेनें ज्या वेळीं पत्नीं अग्नींत प्रवेश करील त्या वेळीं पतीच्या आशौचक्रमानें पत्नीचें आशौच करावें " असें पृथ्वीचंद्रोदयांत लघुहारीतवचन आहे . तेथेंच षडशीतिमतांतही - " मृत झालेल्या पतीच्या मागाहून जाऊन पत्नी जर अग्नींत प्रवेश करील तर त्या ठिकाणीं पुत्रानें मातेचें पक्षिणी आशौच अधिक करुं नये . तो पित्याचे आशौचानेंच शुद्ध होतो . तिला अग्नि देणारा पुत्र किंवा दुसरा कोणी असेल तो पित्याच्या आशौचापर्यंतच अशुचि होतो . त्या दोघांचें नवश्राद्ध व सपिंडीकरण एकदम समाप्त करावें . " पूर्वीं पुत्रांनीं पित्याचें आशौच धरलें असून पित्याचा संस्कार करतेवेळीं आशौच धरावयाचें त्या वेळीं माता किंवा सपिंड मृत असेल तर त्याविषयीं हा ( पित्याच्या आशौचांत इतरांचें संपतें हा ) निर्णय नाहीं . कारण , अतिक्रांत आशौचनिमित्तापेक्षां विद्यमान आशौचनिमित्त बलिष्ठ आहे . बारावर्षानंतर संस्काराच्या आशौचामध्यें सपिंड मरण असतांही असेंच समजावें . आतां जें अपरार्कांत ब्राह्मांत - " ऋग्वेदाच्या वादावरुन ( इमानारीरविधवा० इत्यादिकावरुन ) अन्वारोहण ( सतीगमन ) करणारी साध्वी स्त्री आत्मघातकी होत नाहीं . तीन दिवसांचें आशौच समाप्त झाल्यावर यथाशास्त्र तिला श्राद्ध प्राप्त होतें " असें तीन दिवस आशौच सांगितलें , तें भर्त्याचें आशौच संपल्यावर स्त्रियेनें अन्वारोहण केलें असतां त्रिरात्र आशौचविषयक आहे , असें पृथ्वीचंद्र सांगतो . ब्राह्मणादिपतीला क्षत्रियादिक स्त्रियेनें अनुगमन केलें असतां अल्प आशौचाविषयीं हें वचन आहे , असें अपरार्क सांगतो . शुद्धितत्त्व इत्यादिक गौड तर - पतीचें आशौच संपल्यावर स्त्रियेचें अन्वारोहण असतां तीन दिवस आशौच . सहगमन असतां संपूर्ण आशौच . पति युद्धांत मृत असतां त्याचें सद्यः शौच असून पत्नीनें अन्वारोहण केलें असतां वरील ब्राह्मवचनानें तीन दिवस आशौच सांगितल्यामुळें भर्त्याला देखील तीन दिवसांनंतर पिंडदान करावें , दोघांची एक चिति असेल तर सद्यः शौच करावें , असें सांगतात . अन्वारोहण केलेलीचा इतर विषय ( श्राद्धादि प्रकार ) पूर्वीं श्राद्धप्रकरणीं सांगितला आहे .

पूर्वशेषेणशुद्धेरपवादांतरमुक्तंषडशीत्यां पूर्वाशौचेनयाशुद्धिः सूतकेमृतकेचसा सूतिकामग्निदंहित्वा प्रेतस्यचसुतानपि निर्णयामृते स्मृतिसंग्रहेपि इयंविशुद्धिरुदितासूतिकामग्निदंविना इदंमूल्येनदाहकरणे मातुलादिसंबंधेनदाहमात्रकरणेतुत्रिरात्रमेवेत्युक्तंप्राक् ‍ वृद्धात्रिः सूतकाद्दिगुणंशावंशावाद्दिगुणमार्तवं आर्तवाद्दिगुणासूतिस्ततोपिशवदाहकः तथाशौचसंपाते नशावजनननिमित्तकार्यप्रतिबंधः आशौचेतुसमुत्पन्नेपुत्रजन्मयदाभवेत् ‍ कर्तुस्तात्कालिकीशुद्धिः पूर्वाशौचेनशुध्यतीतिप्रजापतिस्मृतेः आशौचेतुद्विविधेपिशातातपः अंतर्दशाहेजननात् ‍ पश्चात्स्यान्मरणंयदि प्रेतमुद्दिश्यकर्तव्यंपिंडदानंयथाविधि प्रारब्धेप्रेतपिंडेतुमध्येचेज्जननंभवेत् ‍ तथैवाशौचपिंडांस्तुशेषान्दद्याद्यथाविधि मातुः पक्षिणीमध्येपितुरेकादशाहंकुर्यात् ‍ आद्यंश्राद्धमशुद्धोपिकुर्यादेकादशेहनिइतिस्मृतेः केचित्त्विदंक्षत्रियादिपरम् ‍ विप्रादेस्त्वाशौचंतरएकादशाहश्राद्धंनेत्याहुः अतएवविज्ञानेश्वरेण दशमंपिंडमुत्सृज्यरात्रिशेषेशुचिर्भवेदिति शुचित्वंमहैकोद्दिष्टांगविप्रनिमंत्रणपरमितिवदतातत्रशुद्धेरंगत्वंदर्शितं एवंवृषोत्सर्गशय्यादानादावपि देवयाज्ञिकेनत्वाशौचांतरेपिभवत्येवेत्युक्तम् ‍ ।

पहिल्या आशौचशेषानें शुद्धि सांगितली तिचा दुसरा अपवाद सांगतो षडशीतींत - " जननाशौचाविषयीं व मृताशौचाविषयीं पहिल्या आशौचाच्या शेषानें शुद्धि सांगितली ती सूतिका , प्रेताला अग्नि देणारा व मृताचे पुत्र यांना वर्ज्य करुन इतराविषयीं समजावी . " निर्णयामृतांत स्मृतिसंग्रहांतही - " ही शुद्धि सूतिका व अग्नि देणारा यांवांचून इतरांची सांगितली आहे . " अग्नि देणाराला पूर्ण आशौच सांगितलें हें मूल्य घेऊन दाह करणाराविषयीं आहे . मातुलादि संबंध असल्यामुळें दाह मात्र केला असेल तर तीन दिवसच आशौच , असें पूर्वीं सांगितलें आहे . वृद्धात्रि - " जननाशौचाहून मृताशौच द्विगुणित दोषी आहे . मृताशौचाहून स्त्रियांचें आर्तव द्विगुणित आहे . आर्तवाहून सूतिका द्विगुणित आहे . आणि सूतिकेहून शवदाहक अधिक दोषी आहे " तसेंच आशौचांचा संपात असतां जनन व मरण यांच्या निमित्तानें होणार्‍या कार्यांचा प्रतिबंध होत नाहीं . कारण , " आशौच उत्पन्न असतां जेव्हां पुत्रजन्म होईल तेव्हां जातकर्मादि कर्त्याची तात्कालिक शुद्धि होते , म्हणजे तो कर्ता पहिल्या आशौचानें शुद्ध होतो " अशी प्रजापतिस्मृतिक आहे . दोन्ही प्रकारच्या आशौचांत तर शातातप सांगतो - " जननानंतर दहा दिवसांच्या आंत मरण होईल तर प्रेताचा उद्देश करुन यथाविधि पिंडदान करावें . प्रेतपिंडाला आरंभ केला असतां मध्यें जर जनन होईल तर तसेच शेष राहिलेले प्रेतपिंड यथाविधि द्यावे . " मातेचें अधिक पक्षिणी आशौच म्हणून सांगितलें , त्या ठिकाणीं मध्यें पित्याचें एकादशाह श्राद्ध करावें . कारण , " पहिलें श्राद्ध अकराव्या दिवशीं अशुद्ध असेल तरी त्यानें करावें " अशी स्मृति आहे . केचित् ‍ विद्वान् ‍ तर - हें स्मृतिवचन क्षत्रियादिविषयक आहे . ब्राह्मणादिकांचे तर दुसर्‍या आशौचांत एकादशाह श्राद्ध होत नाहीं , असें सांगतात म्हणूनच विज्ञानेश्वरानें " कर्ता दहावा पिंड देऊन शेवटच्या रात्रीं शुद्ध होतो " या वचनानें सांगितलेलें शुचित्व हें अकराव्या दिवशीं महैकोद्दिष्टाला ब्राह्मणाचे निमंत्रणाविषयीं आहे , असें सांगितल्यानें त्या श्राद्धाविषयीं शुद्धि हें अंग आहे , असें दर्शविलें आहे . याप्रमाणें वृषोत्सर्ग , शय्यादान इत्यादिकाविषयीं शुद्धि असली पाहिजे असें झालें . देवयाज्ञिकानें तर - अकराव्या दिवशीं इतर आशौच असलें तरी एकादशाह श्राद्ध होतच आहे , असें सांगितलें आहे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:24.3030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

supplier-consumer

  • आपूर्तिकारसंभरक-उपभोक्ता 
RANDOM WORD

Did you know?

How I do save the text on my computer?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.