TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
अतिकृच्छ्रलक्षण

तृतीय परिच्छेद - अतिकृच्छ्रलक्षण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अतिकृच्छ्रलक्षण

अथातिकृच्छ्रलक्षणम् -

मनुः एकैकग्रासमश्नीयात् त्र्यहानित्रीणिपूर्ववत् । त्र्यहंचोपवसेदित्थमतिकृच्छ्रंचरन् द्विजः । त्रीणित्र्यहानिनवदिनानि पूर्ववत् एकभक्तादिकाले तन्नियमयुक्तः सन्नित्यर्थः याज्ञवल्क्यः अयमेवातिकृच्छ्रः स्यात्पाणिपूरान्नभोजनः । अयमेवपूर्वोक्तप्राजापत्यधर्मकएव अयंतुविशेषः एकभक्तनक्तायाचितदिनेषुपाणिपूरणमात्रंप्रसृतिपूरणमात्रमन्नंभुंजीत नतुपूर्वोक्तद्वाविंशत्यादिग्रासानिति अत्रच पाणिपूरणान्नमात्रमेवविधेयं नतुभोजनम् अतोयेषुदिनेषुप्राजापत्येभोजनंप्राप्तंतदनुवादेनपाणिपूरणताविधीयतेइति नोपवासदिनेषु पाणिपूरान्नभोजनप्राप्तिः । मनुयाज्ञवल्क्योक्तग्रासपाणिपूरान्नमात्रभोजनयोः शक्त्यपेक्षोविकल्पः पापापेक्षोवा अतिकृच्छ्रपादादिव्यवस्थाप्राजापत्यवदेवद्रष्टव्या इत्यतिकृच्छ्रलक्षणम् ।

आतां अतिकृच्छ्रलक्षण सांगतों .

मनु - " पूर्वीं प्राजापत्यकृच्छ्रास सांगितल्याप्रमाणें नियमयुक्त होऊन एकभक्त , नक्त , अयाचित यांच्या भोजनसमयीं नऊ दिवस एक एक ग्रास भक्षण करावा , आणि पुढचे तीन दिवस उपवास करावा , म्हणजे हा अतिकृच्छ्र होतो . " याज्ञवल्क्य - " प्राजापत्यकृच्छ्रास ज्या दिवशीं ज्या धर्मानें जसें भोजन सांगितलें आहे त्या दिवशीं त्या धर्मानें तसें भोजन , हातांत राहील तितक्या अन्नाचें भोजन करणें हा अतिकृच्छ्र होतो . " या कृच्छ्रांत सारे धर्म प्राजापत्याचे आहेत ; विशेष काय तो इतकाच कीं , एकभक्त , नक्त , अयाचित या दिवशीं पसाभर अन्न खावें , प्राजापत्यांत सांगितलेले ग्रास खाऊं नयेत . यावरुन उपवासाच्या दिवशीं पसाभर देखील अन्न खाव्याचें नाहीं . यांत मनूनें सांगितलेलें एकग्रासमात्र भोजन आणि याज्ञवल्क्यानें सांगितलेलें पसाभर अन्नाचें भोजन याची व्यवस्था शक्ति पाहून किंवा पाप पाहून करावी . अतिकृच्छ्राचे पादादिकांची व्यवस्था प्राजापत्याप्रमाणेंच समजावी .

आतां कृच्छ्रातिकृच्छ्र सांगतो .

अथकृच्छ्रातिकृच्छ्रः तत्रगौतमः अब्भक्षस्तृतीयः सकृच्छ्रातिकृच्छ्रइति । द्वादशरात्रमित्यनुवर्तते अतोद्वादशरात्रमुदकेनैववर्तनम् नान्नेनेत्युक्तंभवति । यमः एकैकंपिंडमश्नीयात् त्र्यहंकल्येत्र्यहंनिशि । अयाचितंत्र्यहंपिंडंवायुभक्षस्त्र्यहंपरम् । अतिकृच्छ्रंचरेदेतत्पवित्रंपापनाशनम् । चतुर्विंशतिरात्रंतुनियतात्माजितेंद्रियः । कृच्छ्रातिकृच्छ्रंकुर्वीतएकस्थानेद्विजोत्तमः । कल्येप्रातः एकभक्तकालेइतियावत् । एकस्थाने इति एकयत्नेनपूर्वोक्तद्वादशाहसाध्यातिकृच्छ्रयोरेकः कृच्छ्रातिकृच्छ्रोभवतीत्यर्थः । याज्ञवल्क्यः कृच्छ्रातिकृच्छ्रः पयसादिवसानेकविंशतिं । यमेनतुचतुर्विंशतिरात्रसाध्येकृच्छ्रातिकृच्छ्रेभोजनदिनेष्वेकैकग्रासमात्रविधानाद्दुग्धभोजनेपिपत्रपुटिकादिभिर्ग्रासपरिमाणंकृत्वैकग्रासपर्याप्तंदुग्धमश्नीयात् । एवंकर्तुमशक्तश्चेत्कृच्छ्रप्रकृतिभूतप्राजापत्योक्तरीत्यासायंतुद्वादशग्रासाइत्यादिग्राससंख्ययातावद्दुग्धंपातव्यं भोजनदिनेषुगौतमाद्युक्तकृच्छ्रातिकृच्छ्रपक्षेषुशक्त्यपेक्षयाविकल्पः इतिकृच्छ्रातिकृच्छ्रलक्षणम् ।

गौतम - " बारा दिवस केवळ उदक भक्षण करुन राहणें ; अन्न खावयाचें नाहीं , तो कृच्छ्रातिकृच्छ्र होय . " यम - " अतिकृच्छ्र करणारानें दोनप्रहरीं एकभक्तकालीं एक एक ग्रास तीन दिवस भक्षण करावा . रात्रीं नक्तकालीं एक एक ग्रास तीन दिवस भक्षण करावा . तीन दिवस अयाचिताचा एक एक ग्रास भक्षण करावा . आणि तीन दिवस वायुभक्षण करुन राहावें . हा अतिकृच्छ्र पवित्र करणारा व पापनाश करणारा आहे . याच नियमानें जितेंद्रिय होऊन चोवीस दिवस राहावें , म्हणजे दोन अतिकृच्छ्र एकापुढें एक असे करावे म्हणजे तो एक कृच्छ्रातिकृच्छ्र होतो , असा फलितार्थ . " याज्ञवल्क्य - " एकवीस दिवस दूध भक्षण करुन राहणें तो कृच्छ्रातिकृच्छ्र होतो . " ह्या याज्ञवल्क्यानें सांगितलेल्या कृच्छ्रातिकृच्छ्रांत दूध किती भक्षण करावें ? व तें कोणत्या दिवशीं ? असें कोणी म्हणेल तर सांगतो - यमानें सांगितलेल्या कृच्छ्रातिकृच्छ्रांत चोवीस दिवसांमध्यें भोजनदिवसांत एक एक ग्रासच सांगितल्यामुळें या ठिकाणीं दुग्धभक्षण सांगितलें तरी ग्रासपरिमित दुग्धाचें प्रमाण करुन एक एक ग्रासप्रमाणानें दुग्ध भक्षण करावें . असें करण्याविषयीं अशक्त असेल तर सर्व कृच्छ्रांची प्रकृति जो प्राजापत्य कृच्छ्र त्याच्या रीतीनें नक्त भोजनाचे बारा ग्रास इत्यादि जी ग्राससंख्या असेल तितकें दूध भोजनदिवसांचे ठायीं प्यावें . ह्या कृच्छ्रातिकृच्छ्रांत गौतमानें एक पक्ष ( केवळ उदकावर वर्तन ) सांगितला . यमानें चोवीस दिवसांचा सांगितला . आणि याज्ञवल्क्यानें एकवीस दिवसांचा सांगितला . ह्या तीन पक्षांतून ज्याची जशी शक्ति असेल त्यानें तो पक्ष घ्यावा .

इति कृच्छ्रातिकृच्छ्रः

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:26.8800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जुळणें

  • v t  Lay regularly over, put in order. Put together in harmonious connection or orderly disposition, lit. fig. Make to meet and harmonize; bring into unison or consistency. 
  • उ.क्रि. १ नियमितपणें एकावर एक ठेवणें ( घडी , वस्तु ); बाजूला जोडणें ( कापड मोठें करण्यासाठीं त्यास तुकडा ); एकापुढें एक लांबवर जोडणें किंवा ठेवणें . जी कळाशी सारखी जुळत नाहीं . २ ( शब्दश : आणि ल० ) मेळांत एकत्र ठेवणें ; व्यवस्थित जुळविणें ( यंत्राचे भाग , कवितांचे चरण , धंद्याचीं खातीं , पुस्तकें , कागद , पानें , ठसे इ० ). कागद पसरले आहेत ते नीट जुळून ठेव . मेळ बसविणें ; एक जुळणी करणें ; एकत्र आणणें , ठेवणें ( अनेक हिशेब , मजकूर , नानाविध स्वभाव ). तुम्ही गोष्ट बोलतां पण हिचा पूर्वापर संबंध जुळत नाहीं . [ सं . युज - युगलित ; प्रा . जुगलिय ] 
  • $v. i$. Agree. 
  • . Note. Of this verb, as of many others marked as c or i, the use will, in certain variations of the signification given, be preferably active, and in certain others preferably neuter; but the evil, as it is an evil more in appearance than in reality, and as the remedy, viz. increase of voluminousness, is clearly inadvisable, is suffered to remain. 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.