मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्धाविषयीं वर्ज्य

तृतीयपरिच्छेद - श्राद्धाविषयीं वर्ज्य

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां श्राद्धाविषयीं वर्ज्य सांगतो -

अथवर्ज्यं मार्कंडेयपुराणे यच्चोत्कोचादिनाप्राप्तंपतिताद्यदुपार्जितम् ‍ अन्यायकन्याशुल्कार्थंद्रव्यंचात्रविगर्हितं पित्रर्थंमेप्रयच्छस्वेत्युक्त्वायच्चाप्युपाह्रतं चंद्रोदयेशंखः भूस्तृणंसुरसाशिग्रुपालंकीमृचुकंतथा कूष्मांडालाबुवार्ताककोविदारांश्चवर्जयेत् ‍ पिप्पलींमरिचंचैवतथावैपिंडमूलकम् ‍ कृतंचलवणंसर्वंवंशाग्रंचविवर्ज येत् ‍ राजमाषान् ‍ मसूरांश्चकोद्रवान् ‍ कोरदूषकान् ‍ लोहितान् ‍ वृक्षनिर्यासान् ‍ श्राद्धकर्मणिवर्जयेत् ‍ भूस्तृणंकाश्मीरदेशेप्रसिद्धं सुरसानिर्गुंडीतिमाधवः तुलसीतिपृथ्वीचंद्रोदयः साचभक्ष्यत्वेननिषिद्धा नपुष्पत्वेनेतिगौडाः पालंकीपालकइतिप्रसिद्धा मृचुकंजलजः शाकः ससुकमितिपाठेखदिरशाकइतिहेमाद्रिः मरीचान्यार्द्राणीतिहेमाद्रिः कृतलवणंसांभरभिन्नं सैंधवंलवणंचैवतथामानससंभवम् ‍ यच्चसामुद्रिकंभवेदिति शूलपाणौपाठः पवित्रेपरमेह्येतेप्रत्यक्षेअपिनित्यशइतिवायवीयोक्तेः मानसंसांभरम् ‍ यत्तुभविष्यम् ‍ तर्ज्यन्यादंतकाष्ठंचप्रत्यक्षंलवणंतथेति तत्रक्षारलवणंखारीतिप्रसिद्धंनिषिद्धं भुक्त्वातुक्षारलवणंत्रिरात्रंतुवनेवसेदितिब्राह्मोक्तेरितिशूलपाणिः क्षीरलवणमितिपाठात् ‍ क्षीरमिश्रंलवणंनिषिद्धमितिवाचस्पतिः राजमाषाः रतराइतिप्रसिद्धाः कोरदूषकः वनकोद्रवः चंद्रिकायांशंखः पिंडालकंचतुंडीरंकरमर्दंचनालिकं कूष्मांडंबहुबीजानिश्राद्धेदत्वाव्रजत्यधः पिंडालकंमहाराष्ट्रेषुपेंडरमितिप्रसिद्धम् ‍ तुंडीरंबिंबीफलमितिकैकैदेवः करमर्दंकरवंदमितिप्रसिद्धं तत्रैव बिडालोच्छिष्टमाघ्रातंश्राद्धेयत्नेनवर्जयेत् ‍ कूष्मांडंमहिषीक्षीरमाढक्यो राजसर्षपाः चणकाराजमाषाश्चघ्नंतिश्राद्धंनसंशयः ।

मार्कंडेयपुराणांत - " भेट - नजराणा इत्यादि प्राप्त झालेलें , पतितापासून संपादन केलेलें , अन्यायानें मिळविलेलें , कन्येचें मूल्यरुप अशा प्रकारचें द्रव्य श्राद्धकर्माविषयीं निंद्य आहे . पितरांच्या श्राद्धाकरितां म्हणून मागून आणलेलें जें द्रव्य तेंही निंद्य आहे . " चंद्रोदयांत शंख " भूस्तृण , सुरसा , शेकटा , पालंकी , मृचुक , कोंहाळा , भोपळा , वांगें , कोविदार हीं वर्ज्य करावीं . पिंपळी , मिर्‍यें , पिंडमूलक , कृत्रिम लवण , वेळूचे कोंब , राजमाष , मसुरा , कोद्रव ( हरीक ), कोरदूषक , आणि लोहित असे वृक्षाचे चीक हे सारे श्राद्धकर्माविषयीं वर्ज्य करावे . " वरील कठीण पदांचा अर्थ - भूस्तृण काश्मीर देशांत प्रसिद्ध . सुरसा म्हणजे निर्गुंडी असें माधव म्हणतो , तुलसी असें पृथ्वीचंद्रोदय सांगतो . ती भक्ष्यत्वेंकरुन निषिद्ध , पुष्पत्वेंकरुन निषिद्ध नाहीं असें गौड सांगतात . पालंकी म्हणजे पालक म्हणून प्रसिद्ध आहे . मृचुक म्हणजे जलजशाक आहे . ‘ मृचुक ’ या ठिकाणीं ‘ ससुक ’ असा पाठ आहे , त्यापक्षीं खदिरशाक असें हेमाद्रि सांगतो . मिर्‍यें ओलीं निषिद्ध असें हेमाद्रि सांगतो . कृत्रिम लवण म्हणजे सांभर मिठाहून भिन्न समजावें ; कारण , ‘‘ सेंधेलोण , आणि सांभरमीठ हीं प्रत्यक्ष ( पदार्थांत मिश्र केल्यावांचून ) असलीं तरी नित्य परमपवित्र आहेत " असें वायुपुराणवचन आहे . ह्या वचनाच्या दुसर्‍या चरणीं ‘ यच्च सामुद्रिकं भवेत् ‍ ’ असा शूलपाणिग्रंथांत पाठ आहे त्यापक्षीं समुद्रमीठही पवित्र आहे . आतां जें भविष्यवचन - " तर्जनी , दंतधावनकाष्ठ आणि प्रत्यक्ष लवण हीं निषिद्ध " असें आहे , तेथें प्रत्यक्ष लवण म्हणजे क्षारलवण खारी म्हणून प्रसिद्ध तें निषिद्ध होय ; कारण , " क्षारलवण भक्षण केलें असतां त्रिरात्र अरण्यांत वास करावा " असें ब्राह्मवचन आहे असें शूलपाणि सांगतो . ह्या ब्राह्मवचनांत ‘ क्षीरलवणं ’ असा पाठ आहे म्हणून क्षीरमिश्रलवण निषिद्ध आहे , असें वाचस्पति सांगतो . राजमाष म्हणजे ‘ रतरा ’ म्हणून प्रसिद्ध आहेत . कोरदूषक म्हणजे वनांतील कोद्रु ( हरीक ). चंद्रिकेंत शंख - " पिंडालक , तुंडीर , करमर्द , नालिका , कूष्मांड , आणि बहुबीजफलें हीं श्राद्धांत दिलीं असतां अधोगतीस जातो . " पिंडालक म्हणजे महाराष्ट्रांत पेंडूर म्हणून प्रसिद्ध . तुंडीर म्हणजे बिंबीफळ ( तोंडलें ) असें कैदेव सांगतो . करमर्द म्हणजे करवंद म्हणून प्रसिद्ध आहे . तेथेंच - " श्राद्धांत मांजरानें उष्टावलेला पदार्थ , हुंगलेला पदार्थ हा प्रयत्नानें वर्ज्य करावा . कोहाळा , महिषीदुग्ध , तुरी , राजसर्षप , चणे , आणि राजमाष हे श्राद्धाचा घात करितात , यांत संशय नाहीं . "

वृद्धपराशरः करीरफलपुष्पाणिविडंगमरिचानिच जंभारिकासजंबीरासुपक्कंबीजपूरकम् ‍ जंब्वलाबूनिपिप्पल्यः पटोलंपिंडमूलकम् ‍ मसूरांजनपुष्पंचश्राद्धेदत्वापतत्यधः जंबूः सूक्ष्मं माधवीयेचतुर्विंशतिमते यावनालान् ‍ कुलित्थांश्चवर्जयंतिविपश्चितः यावनालाजोंधळा अत्रयानिचणकादीनिविहितनिषिद्धानि तेषांविकल्पः अन्यथा श्यामाकैश्चणकैः शाकैर्नीवारैश्चप्रियंगुभिः गोधूमैश्चतिलैर्मुद्गैर्मासंप्रीणयतेपितृनिति गोधूमैरिक्षुभिर्मुद्गैः सतीनैश्चणकैरपीतिहेमाद्रौकौर्मविष्णुधर्मादिविरोधः स्यात् ‍ पिप्पलीमरीचादेस्तुप्रत्यक्षस्यनिषेधोनत्वन्यद्रव्यमिश्रस्य सौवीरतिक्तैर्लवणादिभिस्तुपाकस्यसिद्धिर्महतीहयैस्तु तद्बीजपूरान् ‍ मरिचादियोगात्सिद्धंप्रदेयंनतुदुष्यतीहेतिपृथ्वीचंद्रोदयेवृद्धपराशरोक्तेः तत्रैव दातुश्चयस्मिन्मनसोभिलाषः श्रद्धाभवेद्यत्रचदीयमाने श्राद्धेषुदेयंविधिवत्तदेवतद्दत्तमक्षय्यमितिब्रुवंति एतन्निषिद्धेतरविषयम् ‍ चंद्रिकायां कृष्णधान्यानिसर्वाणिवर्जयेच्छ्राद्धकर्मणि नवर्जयेत्तिलांश्चैवमुद्गमाषांस्तथैवच मात्स्ये मसूरशणनिष्पावराजमाषकुसुंभिकाः पद्मबिल्वार्कधत्तूरपारिभद्राटरुषकाः नदेयाः पितृकार्येषुपयश्चाजाविकंतथा कोद्रवोद्दारवरककपित्थमधुकातसी एतान्यपिनदेयानिपितृभ्यः श्राद्धमिच्छता निष्पावाः वल्लाः यत्तुमार्कंडेयः प्रियंगवः कोविदारानिष्पावाश्चात्रशोभनाइति तत्रनिष्पावः श्वेतशिंबीतिदानसागरे श्राद्धप्रकाशेचोक्तम् ‍ बिल्वंचरक्तंनिषिद्धं जंबीरंरक्तबिल्वंचशालस्यापिफलंत्यजेदितिब्राह्मोक्तेः पारिभद्रेनिंबतरुरित्यमरः रक्तमंदारइतिहेमाद्रिः आटरुषोवासातत्पुष्पं उद्दारः कांचनारः मधुकंज्येष्ठीमध्वितिचंद्रिका वरकावनमुद्गाः ।

वृद्धपराशर - " करीरवृक्षाचीं फलें व पुष्पें , वावडिंगें , मिर्‍यें , जंभारिका , जांभरें लिंबूं , पक्क झालेलें महाळुंग , सूक्ष्म जांभूळ , भोंपळा , पिंपळी , पडवळ , पिंडमूलक , मसुरा , अंजन , पुष्प , हीं श्राद्धांत दिलीं असतां अधोगतीस जातो . " माधवीयांत चतुर्विंशतिमतांत - " यावनाल ( जोंधळे ), आणि कुलित्थ हे विद्वान् ‍ वर्ज्य करितात . " येथें श्राद्धप्रकरणांत जीं चणकादिक ( आदि शब्दानें अलावू , पटोल इत्यादि ) विहित असून पुनः निषिद्ध आहेत त्यांचा विकल्प समजावा . विकल्प न मानला तर " श्यामाक , चणकशाक , नीवार , राळे , गोधूम , तिल , मुग यांनीं एक महिना पितर तृप्त होतात आणि गोधूम , इक्षु , मूग , वाटाणा , चणे यांनींही मासपर्यंत तृप्ति होते " अशा हेमाद्रींतील कूर्मपुराण विष्णुधर्म इत्यादि वचनांचा विरोध येईल . पिंपळी , मिर्‍यें इत्यादिक प्रत्यक्ष निषिद्ध आहेत , अन्यद्रव्यमिश्रित निषिद्ध नाहींत . कारण , " ज्या ठिकाणीं आंबट बोर , तिखट , लवण इत्यादिकांनीं उत्तम पाकसिद्धि होते ; तेथें महाळुंग , मिर्‍यें इत्यादियोगानें सिद्ध केलेले पदार्थ द्यावे , ते दुष्ट होत नाहींत " असें पृथ्वीचंद्रोदयांत वृद्धपराशरवचन आहे . तेथेंच - " ज्या पदार्थावर दात्याच्या मनाचा अभिलाष ( आवड ) असेल , व जो पदार्थ देण्याविषयीं श्रद्धा होईल तोच पदार्थ श्राद्धाचे ठायीं द्यावा , तें दान अक्षय्य होतें असें विद्वान् ‍ बोलतात . " हें वचन निषिद्धपदार्थव्यतिरिक्त विषयक आहे . चंद्रिकेंत - " श्राद्धकर्मांत सारीं काळीं धान्यें वर्ज्य करावीं . तिल , मूग , उडीद हे कृष्ण असले तरी वर्ज्य करुं नयेत . " मात्स्यांत - " मसुरा , तागाचें बीज , निष्पाव , राजमाष , कुसुंभिका , कमल , बेलफळ , रुई , धोतरा , पारिभद्र , आटरुषक हे पितृकार्यांत देऊं नयेत . तसेंच बकरीचें व मेढीचें दूध देऊं नये . कोद्रव , उद्दार , वरक , कपित्थ , मधुक , जवस , श्राद्ध इच्छिणारानें हीं देखील पितरांना देऊं नयेत . " कठिण शब्दांचा अर्थ १ निष्पाव म्हणजे वाल . आतां जे मार्केंडेय सांगतो कीं " प्रियंगु ( राळे ), कोविदार , आणि निष्पाव हे श्राद्धांत प्रशस्त " तेथें ( मार्कंडेयवचनांत ) निष्पाव म्हणजे श्वेतशिंबी असें दानसागरांत व श्राद्धप्रकाशांत उक्त आहे . २ रक्तबेलफळ निषिद्ध . कारण , " जंबीर , रक्तबेलफळ आणि शालाचें फळ हें टाकावें " असें ब्राह्मवचन आहे . ३ पारिभद्र म्हणजे कडूनिंब , असें अमरांत आहे . रक्तमंदार असें हेमाद्रि सांगतो . ४ आटरुषक म्हणजे अडुळसा त्याचें फूल . ५ उद्दार म्हणजे कांचनार . ६ वरक म्हणजे वनमूग . ७ मधुक म्हणजे ज्येष्ठीमध असें चंद्रिकाकार सांगतो .

हेमाद्रौब्रह्मांडे आसनारुढमन्नाद्यंपादोपहतमेवच अमेध्यैर्जंगमैः स्पृष्टंशुष्कंपर्युषितंचयत् ‍ द्विः स्विन्नं परिदग्धंचतथैवाग्रावलेहितम् ‍ शर्कराकीटपाषाणैः केशैर्यच्चाप्युपद्रुतम् ‍ पिण्याकंमथितंचैवतथातिलवणंचयत् ‍ सिद्धाः कृताश्चयेभक्ष्याः प्रत्यक्षलवणीकृताः वाससाचावधूतानिवर्ज्यानिश्राद्धकर्मणि द्विः स्विन्नंयत्सकृत्पाकेन भक्ष्यमपिहिंगुजीरकादिसंस्कारार्थंपुनः पच्यतेतद्वर्ज्यम् ‍ यत्तुतिक्तशाकान्नविकारादिद्विः पाकेनैवभक्षणार्हंतन्न निषिद्धं अग्रावलेहितमास्वादितपूर्वं पर्युषितस्यसदानिषेधेपिपुनर्वचनं अपूपाश्चरकंभाश्चधानावटकसक्तवः शाकंमांसमपूपंचसूपंकृसरमेवच यवागूः पायसंचैवयच्चान्यत्स्नेहसंयुतं सर्वंपर्युषितंभोज्यंभुक्तंचेत्परिवर्जयेदिति माधवीयेयमोक्तवटकादेरपिपर्युषितस्यनिषेधार्थमितिचंद्रिकादयः वर्ज्येषुविश्वामित्रः कपित्थंकुसुमंचैवनालिकेलंचपैनिकम् ‍ जंबूफलादिपक्कंचपिण्याकंतंदुलीयकम् ‍ हेमाद्रौषट्‍ त्रिंशन्मते वर्ज्यामर्कटकाः श्राद्धेराजमाषास्तथैवच मर्कटकाः लांकाइतिप्रसिद्धाः पैठीनसिः वृंताकंनलिकापोतकुसुंभाश्मंतकानिच शाकानामभक्ष्याइति पोतंपोईइतिप्रसिद्धम् ‍ मार्कंडेयः वर्ज्याश्चाभिषवानित्यंशतपुष्पागवेधुकाः जंबीरकंफलंवर्ज्यंकोविदारश्चनित्यशः अभिषवः सूक्तमितिचंद्रिका संधानकमितिपृथ्वीचंद्रः शतपुष्पा ओंवाइतिप्रसिद्धम् ‍ शाठ्यायनः मारिषंनालिकाचैवरक्तायाचकलंबिका असुरान्नमिदंसर्वंपितृणांनोपतिष्ठते मारिषं मध्यदेशेमरुसाइतिमहाराष्ट्रेषुराजगिराइतिप्रसिद्धं कलंबिकावेण्वाकृतिपत्रा तत्रैव गांधारिकापटोलानिश्राद्धकर्मणिवर्जयेत् ‍ गांधारिकातंदुलीयमितिचंद्रिका जवासाख्यादुरालभेतिकैदेवः भारते हिंगुद्रव्येषुशाकेषुअलाबुंलशुनंतथा कुकुंडकान्यलाबूनिकृष्णंलवणमेवच पुनरलाबुग्रहणमुभयालाबुनिषेधार्थमिति पृथ्वीचंद्रः कुकुंडकंवर्तुलंछत्राकम् ‍ तत्रैव कुस्तुंबुरुंकलिंगोत्थंवर्जयेदाम्लवेतसम् ‍ ।

हेमाद्रींत ब्रह्मांडपुराणांत - " जें अन्नादिक आसनावर पडलेलें , पाय लागलेलें , अपवित्र अशा मार्जारादिकांनीं स्पृष्ट झालेलें , शुष्क , पर्युषित ( शिळें ), ‘ द्विः स्विन्न ’ ( दोन वेळां पक्क केलेलें ), करपलेलें , पूर्वीं चाखून पाहिलेलें , वाळू , कीटक , पाषाण व केश यांनीं मिश्रित , पिण्याक ( पेंड ), घुसळलेलें , अतिखारट , जे तयार केलेले भक्ष्य प्रत्यक्ष लवणासारखे झाले ते , वस्त्रानें गाळलेले पदार्थ हे सारे श्राद्धकर्मांत वर्ज्य आहेत . " द्विः स्विन्न म्हणजे जें एक वेळां पक्क केल्यानें भक्षणास योग्य असतांही हिंग , जिरें इत्यादि संस्काराकरितां पुनः पक्क करितात तें वर्ज्य होय . जें कडुशाक , अन्नविकृति इत्यादिक द्विवार पक्क केल्यानेंच भक्षणास योग्य होतें तें निषिद्ध नाहीं . पर्युषित सदा निषिद्ध असतां पुनः या वचनांत पर्युषित निषिद्ध सांगितलें याचा हेतु असा आहे कीं , " अपूप , करंभ , धाना ( भ्रष्टयव ), वटक , सातु , शाक , मांस , अपूप , सूप ( वरण ), खिचडी , यवागू , पायस आणि जें दुसरें स्नेहयुक्त असेल तें सारें पर्युषित भोज्य आहे ; त्यांतील भक्षण केलेलें असेल तर वर्ज्य करावें . " ह्या माधवीय ग्रंथांतील यमवचनानें पर्युषित वटकादि भोज्य सांगितलें त्याचाही निषेध करण्यासाठीं पुनः पर्युषित ग्रहण आहे , असें चंद्रिकाकारादिक म्हणतात . वर्ज्यांचे ठायीं विश्वामित्र सांगतो - कपित्थ , नारळाचें पुष्प , पैनिक , पिकलेलें जांभूळ वगैरे , पिण्याक ( तिळकूट ), तांदूळजा हीं वर्ज्य होत . " हेमाद्रींत षटत्रिंशन्मतांत - " श्राद्धांत मर्कटक ( लांक ), तसेंच राजमाष हे वर्ज्य होत . " पैठीनसि - " वांगे , नलिका , पोत ( पोई ), कुसुंभ , अश्मंतक ( आपटा ) हीं शाकांमध्यें अभक्ष्य आहेत . " मार्केंडेय - " अभिषव ( सूक्त किंवा संधानक ), शतपुष्पा ( ओंवा ), गवेधुका ( कसईचें बीं , कसाड ) हीं नित्यवर्ज्य आहेत . जंबीरफल आणि कोविदार ( कांचन ) हीं नित्य वर्ज्य होत . " शाठ्यायन - " मारिष , नालिका , ( कमलाचा दंड ), लालकलंबिका ( वेळूसारख्या पत्राची थोर मयाळ ) हें सारें असुरांचें अन्न आहे , पितरांना प्राप्त होत नाहीं . " १ मारिष म्हणजे मध्यदेशांत मरुसा म्हणतात . महाराष्ट्रांत राजगिरा म्हणून प्रसिद्ध . तेथेंच - " गांधारिका आणि पटोलें ( पडवळ ) हीं श्राद्धकर्मांत वर्ज्य करावीं . " २ गांधारिका म्हणजे तांदुळजा असें चंद्रिकाकार म्हणतो . जवासा ( धमासा ) असें कैदेव म्हणतो . भारतांत - " पदार्थांत व शाकांत हिंग वर्ज्य करावा ; तसाच अलाबु ( भोंपळा ), लसूण , कुकुंडक ( वर्तुलछत्राक ), अलाबु , आणि काळें मीठ हीं वर्ज्य करावीं " दोन वेळां ‘ अलाबु ’ याचें ग्रहण केलें आहे तें दोन प्रकारच्या अलाबूंचा ( भोंपळ्यांचा ) निषेध करण्यासाठीं आहे , असें पृथ्वीचंद्र म्हणतो . तेथेंच - " कालिंग देशांतील कुस्तुंबुरु ( कोथिंबीर ) आणि अम्लवेतस वर्ज्य करावें . "

हेमाद्रौबाह्मे वार्ताकंपंचशिंबंचलोमशानिफलानिच कलिंगंरक्तचारंचवीणाकंधृतचारकम् ‍ कपालं काचमारीचकरंजंपिंडमूलकम् ‍ गृंजनंचुक्रिकांचैवगाजरंजीवकंतथा वृंताकंश्वेतं कंडूरांश्वेतवृंताकंकुंभांडंचवि वर्जयेदितिदेवलोक्तेः तेनकृष्णस्यानिषेधइतिचंद्रिकामाधवौ वस्तुतस्तुसदाश्वेतनिषेधात् ‍ पुनः श्राद्धेनि षेधोव्यर्थः तेनभक्ष्यस्यकृष्णवृंताकस्यापिनिषेधार्थमिदमितिवयम् ‍ कंडूराकपिकच्छूः कुंभांडंवृत्तालाबुः पंचशिंबंवल्लमसूरराजमाषमठकुलित्थाः लोमशानिकपित्थानि रक्तचारंलोहितचारफलम् ‍ वीणाकंकृष्णदीर्घकर्कटी घृतचारकंचिरस्थितचारफलम् ‍ चारोलीतिप्रसिद्धं कपालंनारिकेलं काचंकचुवृक्षफलं मारीचंआर्द्रमरीचानि गृंजनंपलांडुभेदः पश्चिमदिशिप्रसिद्धः नतुगाजरम् ‍ तस्यपृथगुक्तेः हेमाद्रिणातुगृंजनंगाजरमेवोक्तम् ‍ गौडश्राद्धकौमुद्यामप्येवं तच्चिंत्यम् ‍ चुक्रिकाचिरकालशुक्तंपानकम् ‍ चंद्रिकायांहारीतः नवटप्ल क्षोदुंबरशेलुदधित्थनीपमातुलिंगानिभक्षयेत् ‍ शेलुः श्लेष्मातकः भोकरसंज्ञः दधित्थंकपित्थं स्मृतिसारे क्षीरेतुलवणंदत्वाउच्छिष्टेपिचयद्वृतम् ‍ स्नानंरजकतीर्थेषुताम्रेगव्यंसुरासमम् ‍ गौडनिबंधसागरेस्मृतिः नारिकेरोदकंकांस्येताम्रपात्रेस्थितंमधु गव्यंचताम्रपात्रस्थंमद्यतुल्यंघृतंविना ताम्रपात्रेधृतंमांसंयच्चगव्यंघृतेतरत् ‍ आमिषंतुगवांमांसंदधिमद्यंपयोरजः द्रव्यांतरयुतंमांसंपयसासंयुतंदधि पयोनुद्धृतसारंचताम्रपात्रेनदुष्यति ।

हेमाद्रींत ब्राह्मांत - " वृंताक ( वांगें ), पंचशिंब , लोमश ( कंवठ ), कलिंगड , रक्तचार ( लोहितचारफल ), वीणाक ( लांबट काळी कांकडी ), धृतचारक ( चारोळी ), कपाल ( नारळ ), काच ( कचुकवृक्षफल ), मारीच ( ओलीं मिर्‍यें ), करंज , पिंडमूलक , गृंजन , चुक्रिका , गाजर , जीवक हीं वर्ज्य होत . " वृंताक श्वेत निषिद्ध . कारण , " कंडूरा ( कुहिली ), श्वेतवृंताक आणि कुंभांड ( वर्तुल भोंपळा ) वर्ज्य करावें . " असें देवलवचन आहे . तेणेंकरुन कृष्णवृंताकाचा निषेध नाहीं जसें चंद्रिका आणि माधव सांगतो . वास्तविक म्हटलें तर श्वेतवृंताकाचा सदा निषेध असल्यामुळें पुनः श्राद्धांत निषेध करण्याचें कारण नसून ज्यापेक्षां श्राद्धांत निषेध केला , त्यापेक्षां भक्ष्य असें जें कृष्णवृंताक त्याचाही श्राद्धांत निषेध आहे , असें आम्हीं ( कमलाकरभट्ट ) म्हणतों . पंचशिंब म्हणजे वाल , मसुरा , राजमाष , मठ , आणि कुलित्थ होत . गृंजन म्हणजे पलांडूची एक जात पश्चिमदेशांत प्रसिद्ध आहे . गाजर नव्हे . कारण , तें वेगळें सांगितलें आहे . हेमाद्रीनें गृंजन म्हणजे गाजरच सांगितलें . गौडश्राद्धकौमुदींतही असेंच आहे . तें चिंत्य ( प्रमाणशून्य होय ). चुक्रिका म्हणजे मधुर द्रव पदार्थ चिरकाल राहून आंबट झालेला होय . चंद्रिकेंत हारीत - " वट , प्लक्ष ( पायरी ), उंबर , शेलु ( भोंकर ), कंवठ , नीप , महाळुंग हीं भक्षण करुं नयेत . " स्मृतिसारांत - " दुधांत मीठ , उच्छिष्ट पदार्थांत घृत , रजकांच्या तीर्थांत स्नान , आणि ताम्रपात्रांत गोरस हें सुरातुल्य होतें . " गौडनिबंधसागरांत स्मृति - कांस्यपात्रांत नारळाचें पाणी , ताम्रपात्रांत मध , आणि ताम्रपात्रांत घृतावांचून इतर गोरस हीं मद्यतुल्य होतात . ताम्रपात्रांत घृतावांचून इतर गोरस ठेवले असतां मांस , तुल्य होतात . ताम्रपात्रांत आमिष गोमांस होतें , दहीं मद्य होतें , आणि दूध रज होतें . अन्यद्रव्यानें युक्त मांस , दुधानें युक्त दहीं , आणि लोणी काढल्यावांचून दूध हीं ताम्रपात्रांत दुष्ट होत नाहींत . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP