मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
उदकदान

तृतीय परिच्छेद - उदकदान

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां उदकदान सांगतो -

अथोदकदानंवसिष्ठः शरीरमग्नौसंयोज्यानवेक्षमाणाअपोभ्यवयंतिसव्योत्तराभ्यांपाणिभ्यामुदक क्रियांकुर्वंत्ययुग्मं आपस्तंबः मातुश्चयोनिसंबंधेभ्यः पितुश्चासप्तमात्पुरुषाद्यावतांवासंबंधोज्ञायतेतेषांप्रेतेषूदकक्रियेति याज्ञवल्क्यः सप्तमाद्दशमाद्वापिज्ञातयोभ्युपयंत्यपः अपनः शोशुचदघमनेनपितृदिड्मुखाः सकृत्प्रसिंचंत्युदकंनामगोत्रेणवाग्यताः सप्तमाद्दशमाद्वादिवसादर्वागितिविज्ञानेश्वरः कातीयास्तुसप्तमाद्दशमाद्वापुरुषादित्याहुः सप्तमाद्दशमाद्वापुरुषात्समानग्रामवासेयावत्संबंधमनुस्मरेयुरितिपारस्करोक्तेः मंत्रस्नानांगमेवेतिहेमाद्रिः प्रचेताः प्रेतस्यबांधवायथावृद्धमुदकमवतीर्यनोद्धर्षयेयुरुदकांतेप्रसिंचेयुरपसव्ययज्ञोपवीतवाससोदक्षिणामुखाब्राह्मणस्योदड्मुखाः प्राड्मुखाश्चराजन्यवैश्ययोः सएव नदीकूलंततोगत्वेत्युक्त्वा सचैलस्तुततः स्नात्वाशुचिः प्रयतमानसः पाषाणंततआदायविप्रेदद्याद्दशांजलीन् द्वादशक्षत्रियेदद्याद्वैश्येपंचदशस्मृताः त्रिंशच्छूद्रायदातव्यास्ततस्तुप्रविशेद्गृहं ततः स्नानंपुनः कार्यंगृहशौचंचकारयेत् प्रेतस्नानेविशेषः शुद्धितत्त्वे आदित्यपुराणे आदौवस्त्रंचप्रक्षाल्यतेनैवाच्छादितस्ततः कर्तव्यंतैः सचैलंतुस्नानंसर्वमलापहं पूर्वपरिहितंवस्त्रंप्रक्षाल्यपुनः परिधायस्नायादित्यर्थः अपनइतिमंत्रेणवामहस्तानामिकयाजलालोडनं अवतरणेवृद्धपुरः सरत्वोक्तेर्यथाबालंपुरस्कृत्येतिबौधायनीयंजलादुत्थानपरमितिहारलतादयः आश्वलायनः सव्यावृतोव्रजंत्यनीक्षमाणायत्रोदकमवहद्भवतितत्प्राप्यसकृदुन्मज्ज्यैकांजलिमुत्सृज्यतस्यगोत्रंनामगृहीत्वेति प्रचेतसान्वहमंजलित्रयमप्युक्तं त्रिः प्रसेकंकुर्युः प्रेतस्तृप्यत्विति तथा दिनेदिनेंऽजलीन्पूर्णान्प्रदद्यात्प्रेतकारणात् तावद्वृद्धिश्चकर्तव्यायावत्पिंडः समाप्यते एकवृद्धिस्त्रिकवृद्धिर्वेत्यर्थः मदनरत्नेभरद्वाजगृह्येतुद्विकवृद्धिरप्युक्ता आशौचांतंप्रदद्यात्तुप्रेतपुत्रस्तिलांजलीन् प्रथमेह्निसकृद्दद्यात्पिंडयज्ञावृतादिवा त्रींश्चदद्याद्दितीयेह्नितृतीयेपंचएवच चतुर्थेसप्तसंख्यांस्तुपंचमेनवचोत्सृजेत् षष्ठेह्निचैकादशकाः सप्तमेतुत्रयोदश अष्टमेपंचदशकानवमेदशसप्तच एकोनविंशतिंचाग्रेशतांजलिमतंस्मृतं केचिद्दशांजलीन्प्रोचुः केचिदाहुः शतांजलीन् पंचपंचाशतंचान्येस्वशाखोक्तव्यवस्थया ।

वसिष्ठ - " प्रेताला अग्नि देऊन त्याजकडे न पाहतां उदकाजवळ जातात , आणि डाव्या व उजव्या दोन हातांनीं उदकांजलि विषम देतात . " आपस्तंब - " मातेचे योनिसंबंधीं व पित्याचे सात पुरुषांचे आंतील सपिंड अथवा मातेचा व पित्याचा संबंध ज्यांचा माहीत असेल ते मृत असतां त्यांना उदकदान करावें . " याज्ञवल्क्य - " सातव्या किंवा दहाव्या दिवसाचे आंत ज्ञाति दक्षिणदिशेस मुख करुन ‘ अपनः शोशुचदघं० ’ या मंत्रानें उदकाजवळ जातात व नामगोत्राचा उच्चार करुन एकवार उदक देतात . " याज्ञवल्क्यवचनांत ‘ सप्तमात् दशमात् वा ’ याचा अर्थ - सातव्या किंवा दहाव्या दिवसाचे आंत , असा विज्ञानेश्वर सांगतो . कातीय तर - सातव्या किंवा दहाव्या पुरुषाचे आंतील जे मृत असतील त्यांना , असा अर्थ करितात . कारण , " सातव्या किंवा दहाव्या पुरुषापर्यंत एका गांवांत वास असतां जोंपर्यंत संबंधाचें स्मरण असेल तोंपर्यंत मृतांना उदक द्यावें . " असें पारस्करवचन आहे . उदकदान हें मंत्रस्नानाचें अंगच आहे , असें हेमाद्रि सांगतो . प्रचेता - " प्रेताचे बांधवांनीं वृद्धांना पुढें करुन सर्वांनीं उदकांत उतरुन त्या ठिकाणीं उदक उडवूं नये ; उदकाचे कडेस येऊन यज्ञोपवीत व वस्त्रें अपसव्य ( उजव्या खांद्यावर ) करुन दक्षिणदिशेस मुख करुन ब्राह्मणाला उदक सेचन करावें . उत्तरेस मुख करुन क्षत्रियाला व पूर्वेस मुख करुन वैश्याला उदक सेचन करावें . " तोच प्रचेता - तदनंतर नदीच्या तीरीं जाऊन असें बोलून सांगतो - " तदनंतर वस्त्रसहित स्नान करुन शुद्ध होऊन अंतः करण स्वस्थ करुन त्या ठिकाणांतून पाषाण ( दगड ) घेऊन त्याजवर ब्राह्मणाला दहा अंजलि द्यावे . क्षत्रियाला बारा द्यावे . वैश्याला पंधरा द्यावे . शूद्राला तीस द्यावे . तदनंतर घरांत प्रवेश करावा . तदनंतर पुनः स्नान करुन गृहशुद्धि करावी . " प्रेतस्नानाविषयीं विशेष सांगतो - शुद्धितत्त्वांत आदित्यपुराणांत - " पूर्वीं परिधान केलेलें वस्त्र धुवून तें परिधान करुन पुत्रादिकांनीं सर्व मलनाशक सचैल स्नान करावें . " ‘ अपनः शोशुचदघं० ’ या मंत्रानें डाव्या हाताच्या अनामिका अंगुलीनें उदकाचें आलोडन करावें . वरील प्रचेताचे वचनांत ‘ वृद्धपूर्वक उदकांत उतरावें ’ असें सांगितल्यावरुन , बौधायनवचनांत ‘ बालकाला पुढें करुन ’ असें सांगितलें तें उदकांतून वर येण्याविषयीं समजावें , असें हारलता इत्यादि ग्रंथकार सांगतात . आश्वलायन - " प्रेताला अग्नि देऊन त्याला डावीकडे करुन त्याजकडे न पाहतां ज्या ठिकाणीं उदक स्थिर आहे त्या ठिकाणीं जाऊन एकदां बुडी मारुन त्या प्रेताचे नामगोत्राचा उच्चार करुन एक अंजलि द्यावा . " प्रचेतानें दररोज तीन अंजलिही सांगितले आहेत - प्रेतस्तृप्यतु , असें म्हणून तीन वेळा पाणी द्यावें . तसेंच " दररोज प्रेताकरितां पूर्ण अंजलि द्यावे . जोंपर्यंत पिंड ( दहावा ) समाप्त होई तोंपर्यंत दररोज एक एक किंवा तीन तीन अंजलि वाढवावे . " मदनरत्नांत भरद्वाजगृह्यांत तर - दोन दोन अंजलिही वाढवावे , असें सांगितलें आहे - " आशौच समाप्त होईपर्यंत प्रेतपुत्रानें तिलांजलि द्यावे . प्रथम दिवशीं एक अंजलि द्यावा . दुसर्‍या दिवशीं तीन अंजलि द्यावे . तिसर्‍या दिवशीं पांच द्यावे . चवथ्या दिवशीं सात द्यावे . पांचव्या दिवशीं नऊ द्यावे . सहाव्या दिवशीं अकरा द्यावे . सातव्या दिवशीं तेरा द्यावे . आठव्या दिवशीं पंधरा द्यावे . नवव्या दिवशीं सतरा द्यावे . दहाव्या दिवशीं एकोणीस द्यावे . याप्रमाणें शंभर अंजलि द्यावे असें मत आहे . कितीएक पंडित दहा अंजलि सांगतात . कितीएक शंभर अंजलि सांगतात . इतर पंडित पंचावन्न अंजलि सांगतात . हे आपापल्या शाखेंत उक्त व्यवस्थेनें सांगतात . "

छंदोगपरिशिष्टे अथानवेक्षयन्पापः सर्वेचैवशवस्पृशः गोत्रनामपदांतेतुतर्पयामीत्यनंतरं दक्षिणाग्रान्कुशान्कृत्वासतिलंतुपृथक् ‍ पृथक् विष्णुपुराणे सपिंडीकरणंयावदृजुदर्भैः पितृक्रिया सपिंडीकरणादूर्ध्वंद्विगुणैर्विधिवद्भवेत् रामायणे इदंपुरुषशार्दूलविमलंद्वियमक्षयं पितृलोकेषुपानीयंमद्दत्तमुपतिष्ठतां दानवाक्येविकल्पः याज्ञवल्क्यः कामोदकंसखिप्रत्तास्वस्त्रीयश्वशुरर्त्विजां कामइच्छा प्रेततृप्तीच्छायांदेयमन्यथानेत्यर्थः शंखपारस्करौ आचार्येचैवंमातामहयोश्चस्त्रीणांचाप्रत्तानांकुर्वीरंस्ताश्चतेषामितिद्विवचनात् मातामह्याअपि शंखलिखितौ उदकक्रियाकामंश्वशुरमातुलयोः शिष्येसहाध्यायिनिराजनिचेति वृद्धमनुः क्लीबाद्यानोदकंकुर्युस्तेनाव्रात्याविधर्मिणः गर्भभर्तृद्रुहश्चैवसुराप्यश्चैवयोषितः याज्ञवल्क्यः नब्रह्मचारिणः कुर्युरुदकंपतितास्तथा षडशीतौ स्वीयाचारादपिभ्रष्टाः पतितायेचदूषिताः नकुर्युरुदकंतेवैतेभ्योप्यन्येनचैवहि मदनरत्नेहारीतः पतितानामवृद्धानांचरंतीनांचकामतः प्रत्तानांचैवकन्यानांनिवर्त्यासलिलक्रिया अपरार्केशंखलिखितौ अपपात्रितस्यरिक्थपिंडोदकानिव्यावर्तंते अपपात्रितः कृतघटस्फोटः तस्यापिसंग्रहविधौकृतेआशौचोदकादिकुर्यादेवेत्याशौचप्रकाशः ।

छंदोगपरिशिष्टांत - " प्रेताला अग्नि दिल्यानंतर प्रेतपुत्रानें व प्रेताला स्पर्श करणार्‍या सर्वांनीं प्रेताच्या गोत्रनांवाच्या उच्चारांतीं ‘ तर्पयामि ’ असें म्हणून कुशांचीं अग्रें दक्षिणदिशेस करुन तिलसहित वेगवेगळें तर्पण करावें . " विष्णुपुराणांत - " सपिंडीकरणापर्यंतची पितृक्रिया सरळ दर्भांनीं करावी . सपिंडीकरणानंतरची पितृक्रिया द्विगुणभुग्न दर्भांनीं करावी , ती यथाशास्त्र होते . " रामायणांत - " हे पुरुषश्रेष्ठ ! इदं विमलं दिव्यं अक्षयं पानीयं मद्दतं पितृलोकेषु उपतिष्ठतां " असें उदकदानाचें वाक्य सांगितलें आहे , व वरील वचनांत उदकदानाचें वाक्य नाहीं , म्हणून दानवाक्याविषयीं विकल्प आहे . याज्ञवल्क्य - " मित्र , विवाहित कन्या वगैरे , भगिनीपुत्र , श्वश्रुर , ऋत्विज हे मृत असतां त्यांची तृप्ति व्हावी अशी इच्छा असेल तर त्यांना उदक द्यावें . इच्छा नसेल तर देऊं नये . " शंख पारस्कर - " आचार्य , मातामह व मातामही यांनाही मातापितरांप्रमाणें उदक द्यावें . अविवाहित स्त्रियांनाही उदक द्यावें . अविवाहित स्त्रियांनींही त्यांना द्यावें . " या वचनांत ‘ मातामहयोः ’ असें द्विवचन असल्यामुळें मातामहीलाही द्यावें . शंख लिखित - " श्वशुर , मातुल , शिष्य , सहाध्यायी , व राजा यांना उदकदान देणाराचे इच्छेवर आहे . " वृद्धमनु - " नपुंसक इत्यादिकांनीं उदक देऊं नये . तसेंच चोर , उपनयनसंस्काररहित , विरुद्धधर्मी यांनीं आणि गर्भहत्या करणार्‍या , भर्तृहत्या करणार्‍या , मद्यपी अशा स्त्रियांनीं उदकदान करुं नये . " याज्ञवल्क्य - " ब्रह्मचारी आणि पतित यांनीं उदकदान करुं नये . " षडशीतींत - " आपल्या आचारापासून भ्रष्ट झालेले , पतित व जे इतर दोषानें दुष्ट झालेले त्यांनीं उदक देऊं नये ; आणि त्यांनाही इतरांनीं उदक देऊं नये . " मदनरत्नांत - हारीत - ‘‘ पतित झालेल्या स्त्रिया , व तरुण असून यथेच्छ आचरण करणार्‍या अशा स्त्रिया आणि विवाहित कन्या यांना उदकदान करुं नये . " अपरार्कांत शंख व लिखित - " ज्याचा घटस्फोट केला असेल त्याला जिंदगीचा विभाग , पिंडदान , व उदकदान हीं निवृत्त होतात म्हणजे हीं देऊं नयेत . " अपपात्रित म्हणजे घटस्फोट केलेला होय . त्याचा संग्रहविधि केला असतां त्याचेंही आशौचादिक करावेंच , असें आशौचप्रकाश सांगतो .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP