मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
एकादशाहकृत्याचा निर्णय

तृतीय परिच्छेद - एकादशाहकृत्याचा निर्णय

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां एकादशाहकृत्याचा निर्णय सांगतो -

अथैकादशाहः मनुः विप्रः शुद्ध्यत्यपः स्पृष्ट्वाक्षत्रियोवाहनायुधे वैश्यः प्रतोदंरश्मीन्वायष्टिंशूद्रः कृतक्रियः शुद्धितत्त्वेदेवलः अघाहः सुनिवृत्तेषुसुस्नाताः कृतमंगलाः आशौचाद्विप्रमुच्यंतेब्राह्मणान्स्वस्तिवाच्यच याज्ञवल्क्यः मृतेहनितुकर्तव्यंप्रतिमासंतुवत्सरं प्रतिसंवत्सरंचैवआद्यमेकादशेहनि क्षत्रियाद्यैराशौचेप्येकादशेह्निश्राद्धंकार्यम् आद्यंश्राद्धमशुद्धोपिकुर्यादेकादशेहनि कर्तुस्तात्कालिकीशुद्धिरशुद्धः पुनरेवसइतिहेमाद्रौशंखोक्तेः पैठीनसिः एकादशेह्नियच्छ्राद्धंतत्सामान्यमुदाह्रतं चतुर्णामपिवर्णानांसूतकंतुपृथक् पृथक् यत्तुमरीचिः आशौचांतेततः सम्यक् पिंडदानंसमाप्यते ततः श्राद्धंप्रदातव्यंसर्ववर्णेष्वयंविधिरिति तत्सर्ववर्णानांदशाहाशौचपरं यत्तुविष्णुः अथाशौचापगमइति यच्चगौडग्रंथेहारीतः श्वोभूतेएकोद्दिष्टंकुर्यात् यच्चबैजवापः ऊर्ध्वंदशम्याअपरेद्युरिति तद्विप्रविषयं एतेनदशमपिंडोत्कर्षपक्षेअवयवपिंडासमाप्तौकथमेकादशाहेश्राद्धमितिमूर्खोक्तिः परास्ता वचनादाशौचमध्यइवतत्राप्यविरोधात् ।

मनु - " ब्राह्मण स्नानादि केल्यावर उदकाला स्पर्श करुन शुद्ध होतो . क्षत्रिय वाहनाला व आयुधाला स्पर्श करुन शुद्ध होतो . वैश्य चाबूक किंवा पशु बांधण्याची वगैरे दोरी यांना स्पर्श करुन शुद्ध होतो . आणि शूद्र काठीला स्पर्श करुन शुद्ध होतो . " शुद्धितत्त्वांत देवल - " आशौचाचे दिवस गेले असतां मंगल ( अंभ्यगादि ) करुन स्वच्छ स्नान करुन आणि ब्राह्मणाकडून स्वस्तिवाचन करवून आशौचापासून मुक्त होतात . " याज्ञवल्क्य - " वर्षपर्यंत प्रतिमासीं मृत दिवशीं श्राद्ध करावें . तदनंतर प्रतिवर्षीं मृत दिवशीं करावें . आद्यमासिक अकराव्या दिवशीं करावें . " क्षत्रियादिकांनीं आशौच असतांही अकराव्या दिवशीं श्राद्ध करावें . कारण , " पहिलें श्राद्ध अशुद्ध असला तरी त्यानें अकराव्या दिवशीं करावें . कर्त्याची तात्कालिक ( त्या श्राद्धापुरती ) शुद्धि होते . पुनः तो अशुद्धच आहे . " असें हेमाद्रींत शंखवचन आहे . पैठीनसि - " अकराव्या दिवशीं जें श्राद्ध तें चारही वर्णांना सामान्य सांगितलें आहे . आशौच तर चार वर्णाला वेगवेगळें आहे . " आतां जें मरीचि - " आशौचाचे शेवटच्या दिवशीं पिंडदान उत्तम रीतीनें समाप्त करावें . तदनंतर श्राद्ध करावें . सर्व वर्णांविषयीं हा विधि आहे . " असें सांगतो तें सर्व वर्णांला दहा दिवस आशौच अशा पक्षीं आहे . आतां जें विष्णु - " नंतर आशौच दूर झालें असतां श्राद्ध करावें " असें सांगतो . आणि जें गौडग्रंथांत हारीत - " अकराव्या दिवशीं एकोद्दिष्ट करावें " असें सांगतो . आणि जें बैजवाप - " दहाव्या रात्रीच्या नंतर दुसर्‍या दिवशीं शुद्ध झाल्यावर करावें . " ह्या वचनांनीं आशौच समाप्तीनंतर श्राद्ध सांगितलें तें ब्राह्मणविषयक आहे . क्षत्रियादिकांचें आशौचांतही होतें , यावरुन क्षत्रियादिकांचा दहावा पिंड आशौचसमाप्तीच्या दिवशीं म्हणजे क्षत्रियाचा बाराव्या दिवशीं , वैश्याचा पंधराव्या , आणि शूद्राचा तिसाव्या दिवशीं द्यावा , या पक्षीं अवयवपिंडांची समाप्ती झाल्याशिवाय अकराव्या दिवशीं श्राद्ध कसें करावें , असें मूर्खानें सांगितलेलें खंडित झालें . वचनावरुन आशौचांत जसें करावयाचें तसें अवयवपिंडांची समाप्ती नसतांही करण्याविषयीं विरोध नाहीं .

भविष्ये एकादशभ्योविप्रेभ्योदद्यादेकादशेहनि भोजनंतत्रवैकस्मैब्राह्मणायमहात्मने यत्तुमात्स्ये एकादशेहनितथाविप्रानेकादशैवतु क्षत्रादिः सूतकांतेतुभोजयेदयुजोद्विजानिति तद्रुद्रगणश्राद्धपरमितिमदनपारिजातः गौडास्त्वस्माद्वचनात् क्षत्रियादीनामाशौचांतएवेत्याहुः रामायणेपि समतीतेदशाहेतुकृतशौचोयथाविधि चक्रेद्वादशिकंश्राद्धंत्रयोदशिकमेवच द्वादशिकंद्वादशाहेननिर्वर्त्यंत्रयोदशाहश्राद्धं त्रयोदशिकंचतुर्दशाहविधेयंसपिंडनपाथेयादि क्षत्रियाणांद्वादशाहाशौचेत्रयोदशेमहैकोद्दिष्टंचतुर्दशेसपिंडनम् द्विविधवाक्यादेकादशाहाशौचांतयोर्विकल्पइत्येके सद्यः शौचादौयुद्धहतादेरेकादशाहे अन्येषामाशौचांतइति वयं कौर्मे एकादशेह्निकुर्वीतप्रेतमुद्दिश्यभावतः द्वादशेवाह्निकर्तव्यमनिंद्येप्यथवाहनि निंद्यंप्रेतक्रियाकालयुक्तं एकादशेतुननिषेधइत्युक्तंप्राक् बृहस्पतिः वस्त्रालंकारशय्यादितितुर्यद्वाहनादिकं गंधमाल्यैः समभ्यर्च्यश्राद्धभोक्रेतदर्पयेत् श्रोत्रियाभोजनीयास्तुनवसप्तत्रयोदश जातयोबांधवानिः स्वास्तथाचातिथयोपरे देवयाज्ञिकनिबंधे एकादशसुविप्रेषुप्रेतमावाह्यभोजयेत् तत्राद्यायचशय्यादिदद्यादाद्यमितिस्मृतं विष्णुः एकवन्मंत्रानूहेतैकोद्दिष्टे बहुवचनांतानेकवचनांतान्वदेदित्यर्थः एतद्दृष्टार्थत्वे ।

भविष्यांत - " अकराव्या दिवशीं अकरा ब्राह्मणांना भोजन द्यावें . अथवा एका महात्म्या ब्राह्मणाला भोजन द्यावें . " आतां जें मात्स्यांत " अकराव्या दिवशीं अकराच ब्राह्मणांना भोजन घालावें . क्षत्रियादिकांनीं सूतकांतीं अयुग्म ब्राह्मणांना भोजन घालावें . " असें सांगितलें तें रुद्रगणश्राद्धविषयक आहे , असें मदनपारिजात सांगतो . गौड तर - ह्या वचनावरुन क्षत्रियादिकांनीं आशौचांतींच आद्य मासिक करावें , असें सांगतात . रामायणांतही - " दहावा दिवस गेला असतां यथाविधि शुद्धि करुन द्वादशिक आणि त्रयोदशिक श्राद्ध करिता झाला . " द्वादशिक म्हणजे बारा दिवसांनीं करावयाचें तें , अर्थात् बारा दिवस होऊन गेल्यावर तेराव्या दिवशीं सांगितलेलें समजावें . त्रयोदशिक म्हणजे तेरा दिवस होऊन गेल्यावर चवदाव्या दिवशीं करावयाचें सपिंडन , पाथेय इत्यादिक समजावें . क्षत्रियांना बारा दिवस आशौच असतां तेराव्या दिवशीं महैकोद्दिष्ट आणि चवदाव्या दिवशीं सपिंडीकरण सांगितलें आहे . हें रामायणवचन व वरील मात्स्यवचन अशा दोनीं प्रकारच्या वचनांवरुन अकराव्या दिवशीं व आशौचांतीं करण्याचा विकल्प आहे , असें कितीएक विद्वान् सांगतात . युद्धांत मृत इत्यादिकांचें सद्यः शौच वगैरे असतां अकराव्या दिवशीं करावें . इतरांचें आशौचांतीं करावें , असें आम्हीं ( कमलाकरभट्ट ) सांगतों . कौर्मांत - ‘‘ अकराव्या दिवशीं प्रेताचा उद्देश्य करुन श्राद्ध करावें . अथवा बाराव्या दिवशीं करावें . किंवा निंद्य नसेल अशा दिवशीं करावें . " निंद्य म्हणजे प्रेताच्या क्रियेचा काल जो असेल त्या दिवशीं करुं नये . अकराव्या दिवशीं हा निषेध नाहीं , असें पूर्वीं ( शंखवचनावरुन ) सांगितलें आहे . बृहस्पति - " पित्याचीं वस्त्रें , अलंकार , शय्या , वाहन इत्यादिक जें असेल तें गंधपुष्पादिकांनीं पूजित करुन श्राद्धभोक्त्या ब्राह्मणाला अर्पण करावें . नऊ , सात किंवा तेरा श्रोत्रिय ब्राह्मणांना भोजन घालावें . ज्ञाति , बांधव , दरिद्री व अतिथि यांनाही भोजन घालावें . " देवयाज्ञिकनिबंधांत - " अकरा ब्राह्मणांवर प्रेताचें आवाहन करुन त्यांना भोजन घालावें . त्यांत पहिल्या ब्राह्मणाला शय्या इत्यादि द्यावें . तें आद्य श्राद्ध म्हटलें आहे . " विष्णु - " एकोद्दिष्टांत बहुवचनांत मंत्रांचा एकवचनांत ऊह करावा . जसा - ( प्रत्नवद्भिः प्रत्तः प्रेतमिमान् लोकान् प्रीणयाहिनः ) असा ऊह अर्घ्यपात्राच्या मंत्रांत करावा . हा ऊह बहुवचनाचा अर्थ प्रेताविषयीं अनन्वित असेल त्या ठिकाणीं समजावा .

अस्यविघ्नेगौणकालमाहहेमाद्रौबौधायनः एकोद्दिष्टंश्वएवस्याद्दादशेहनिवापुनः अतऊर्ध्वमयुग्मेषुकुर्वीताहः स्वशक्तितः अर्धमासेथवामासिऋतौसंवत्सरेपिवेति तत्रैवलघुहारीतः एकोद्दिष्टंतुकुर्वीतपाकेनैवसदास्वयं अभावेपाकपात्राणांतदहः समुपोषणम् गोभिलः ब्राह्मणंभोजयेदाद्येहोतव्यमनलेथवा पुनश्चभोजयेदेकंद्विरावृत्तिर्भवेदिति एतदाद्यमासिकाद्याब्दिकयोः सिद्ध्यर्थमितिभट्टाः तेनमहैकोद्दिष्टंषोडशश्राद्धाद्भिन्नमेव अतएवाद्यंसर्वैकोद्दिष्टप्रकृतिभूतमेकादशइतिविज्ञानेश्वरः अन्येत्वाद्यमासिकाब्दिकयोराद्यमेकादशे हनीतिनियमादभेदमाहुः द्वयोस्तंत्रत्वबाधार्थंगोभिलीयमित्यन्ये युद्धहतादौतुहेमाद्रौपृथ्वीचंद्रोदयेपैठीनसिः सद्यः शौचेपिदातव्यंप्रेतस्यैकादशेहनि सएवदिवसस्तस्यश्राद्धशय्यासनादिषु एवमेकाहादौ अतोत्रद्वितीयेह्न्येकादशाहंवदन् ढौढुः शूलपाणिः स्मार्तगौडश्चपरास्तः एतेनाद्यमेकादशेहनीत्याशौचानंतरदिनपरमितिविष्णूक्तेः प्रागुक्तशंखादिवचनानांचानाकरत्वादितिवदंतः कल्पतरुवाचस्पतिप्रमुखाः सर्वमहानिबंधविरोधादुपेक्ष्याः उशनाः त्र्यहाशौचेपिकर्तव्यमाद्यमेकादशेहनि अतीतविषयेसद्यस्त्र्यहोर्ध्वंवातदिष्यते ।

ह्या एकोद्दिष्टाला विघ्न असतां गौणकाल सांगतो हेमाद्रींत बौधायन - " एकोद्दिष्ट अकराव्या दिवशींच होतें . अथवा बाराव्या दिवशीं होतें . त्या वेळीं न होईल तर याच्या पुढें विषम दिवशीं आपल्या शक्तीप्रमाणें करावें . अथवा पंधराव्या दिवशीं अथवा महिन्याच्या दिवशीं किंवा ऋतूच्या दिवशीं किंवा संवत्सरदिवशीं करावें . " तेथेंच लघुहारीत - " स्वतः पाक करुनच सर्वदा एकोद्दिष्ट करावें . पाकाच्या पात्रांचा अभाव असेल तर त्या दिवशीं उपोषण करावें . " गोभिल - " पहिल्या एकोद्दिष्ट श्राद्धांत ब्राह्मणाला भोजन घालावें . अथवा अग्नींत होम करावा . पुनः एका ब्राह्मणाला सांगून श्राद्ध करुन भोजन घालावें . या ठिकाणीं श्राद्धाची द्विवार आवृत्ति होते . " या वचनानें सांगितलेली दुसरी आवृत्ति आद्य मासिक आणि आद्याब्दिक यांच्या सिद्धीकरितां आहे , असें भट्ट सांगतात . त्यावरुन महैकोद्दिष्ट हें षोडशमासिकांहून वेगळेंच आहे . म्हणूनच पहिलें एकोद्दिष्ट हें सर्व एकोद्दिष्टांचें प्रकृतिभूत आहे , असें विज्ञानेश्वर सांगतो . इतर ग्रंथकार तर - " आद्यमेकादशेऽहनि " या वरील याज्ञवल्क्यवचनानें अकराव्या दिवशीं , असा नियम केल्यावरुन आद्य मासिक व आद्याब्दिक यांचा अभेद ( एकरुपत्व ) सांगतात . दुसरे ग्रंथकार - ह्या दोघांचें तंत्र होईल त्याचा बाध करण्यासाठीं वरील गोभिलाचें वचन आहे , असें सांगतात . युद्धांत वगैरे मृत असेल तर सांगतो हेमाद्रींत पृथ्वीचंद्रोदयांत पैठीनसि - " सद्यः शौच असलें तरी प्रेताला अकराव्या दिवशीं श्राद्ध द्यावें . कारण , त्याच्या श्राद्ध , शय्या , आसन इत्यादिकांविषयीं तोच दिवस आहे . " याचप्रमाणें एक दिवसाच्या वगैरे आशौचांत समजावें . असें आहे म्हणून सद्यः शौचादिकांत दुसर्‍या दिवशीं एकादशाहकृत्य , असें सांगणारा ढौढू , शूलपाणि व स्मार्तगौड खंडित झाला . यावरुन ( सद्यः शौच , एकाहाशौच इत्यादिकांतही अकराव्या दिवशीं एकादशाहकृत्य सांगितल्यावरुन ) ‘ आद्यमेकादशेऽहनि ’ हें वरील याज्ञवल्क्यवचन आशौचानंतरच्या दिवसाविषयीं आहे . कारण , ‘ अथाशौचापगमे ’ असें विष्णुवचन आहे . आणि वर सांगितलेलीं शंखादिकांचीं वचनें आकरांत नाहींत , असें सांगणारे कल्पतरु - वाचस्पति - प्रमुख ग्रंथकार सर्व महानिबंधग्रंथांचा विरोध असल्यामुळें उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहेत , उशना - " तीनदिवसांचे आशौचांतही आद्यश्राद्ध अकराव्या दिवशीं करावें . अतिक्रांताशौचाविषयीं सद्यः करावें किंवा तीन दिवसांनंतर करावें . "

याज्ञवल्क्यः एकोद्दिष्टंदैवहीनमेकार्घ्यैकपवित्रकं आवाहनाग्नौकरणरहितंत्वपसव्यवत् उपतिष्ठतामित्यक्षय्यस्थानेविप्रविसर्जने अभिरम्यतामितिवदेयुस्तेभिरतास्महेइति अग्नौकरणनिषेधोन्यपरः बह्वृचानांसर्वैकोद्दिष्टेषुतद्भवत्येवेत्युक्तंप्राक् स्वदितमितितृप्तिप्रश्नइतिकात्यायनः प्रथमेपात्रेसंस्रवानित्यस्यतृतीयेनापिधानस्यचबाधान्नपात्रन्युब्जतेतिशूलपाणिः प्रचेताः नात्रपात्रालंभोनाशिषः प्रार्थयेत् अत्रविशेषोहेमाद्रौ वाराहे श्मश्रुकर्मतुकर्तव्यंनखच्छेदस्तथैवच स्नपनाभ्यंजनेदद्याद्विप्रायविधिपूर्वकं तथ्हा उपवेश्यासने भद्रछत्रंतत्रप्रकल्पयेत् पश्चादुपानहौदद्यात्सर्वाण्याभरणानिच विष्णुः दक्षिणांतंश्राद्धमुक्त्वादत्ताक्षय्योदकेषुच चतुरंगुलपृथ्वीस्तावदंतरालास्तावदधः खातावितस्त्यायतास्तिस्त्रः कर्षूः कुर्यात् कर्षूणांसमीपेग्निमाधायपरिस्तीर्यैकैकस्मिनाहुतित्रयंजुहुयात् सोमायपितृमतेस्वधानमोग्नयेकव्यवाहनाययमायांगिरस्वतेइतिस्थानत्रयेप्राग्वत्पिंडनिर्वपणंदधिमधुघृतमांसैः कर्षूत्रयंपूरयित्वैतत्तइतिजपेत् शेषंनवश्राद्धवत् अत्रसाग्नेरप्यंतेवैश्वदेवइत्युक्तंप्राक् इदंदशाहकर्त्रापुत्रेणवाकार्यमित्युक्तं क्रियानिबंधेगृह्यकारिकायां तिलोसिप्रेतदेवत्यः प्रेतंलोकान्हिनोंतकं मंत्रमुक्त्वातिलानेवंप्रक्षिपेदर्घ्यपात्रतः दक्षिणामुदकुंभंचसान्नंदत्वातथैवगां तस्मैदद्याद्भुक्तशेषंतद्भांडान्यपिभाजनं विप्राभावेग्नावेकोद्दिष्टं अग्नौपायसंश्रपयित्वाज्यभागांतेतदग्रेश्राद्धप्रयोगंकृत्वाग्नौप्तेतमावाह्यगंधाद्यैः संपूज्यपृथिवीतेपात्रमित्यादिनान्नंसंकल्प्योदीरतामवरइत्यष्टाभिश्चतुरावृत्ताभिर्द्वात्रिंशदाहुतीर्हुत्वापिंडदानादिश्राद्धंसमापयेदिति याज्ञवल्क्यः एतत्सपिंडीकरणमेकोद्दिष्टंस्त्रियाअपि ।

याज्ञवल्क्य - " एकोद्दिष्ट देवरहित असतें . एक अर्घ्य व एक पवित्रकानें करावें . आवाहन व अग्नौकरण करुं नये . तें देवरहित असल्यामुळें सर्व एकोद्दिष्टकृत्य अपसव्यानें करावें . अक्षय्योदकस्थानीं ‘ अक्षय्योदकमुपतिष्ठतां ’ असें म्हणावें . ब्राह्मणविसर्जनाविषयीं ‘ अभिरम्यतां ’ असें म्हणावें . ‘ अभिरताः स्मः ’ असें ब्राह्मणाचें प्रतिवचन आहे . " अग्नौकरणाचा निषेध इतर शाखांविषयीं आहे . बह्वृचांना सर्व एकोद्दिष्टांत अग्नौकरण होतें , असें पूर्वीं सांगितलें आहे . ‘ स्वदितं ’ असा तृप्तिप्रश्न करावा , असें कात्यायन सांगतो . एकोद्दिष्टांत अर्घ्यपात्र एक असल्यामुळें इतर पात्रांतील प्रथम पात्रांत संस्रव सांगितले , त्यांचा व तिसर्‍या पात्रानें आच्छादन सांगितलें त्याचा बाध होत असल्यामुळें , पात्र उपडें घालूं नये , असें शूलपाणि सांगतो . प्रचेता - " अन्ननिवेदनसमयीं पात्र धरणें नाहीं , व आशीर्वादांची प्रार्थना करुं नये . " एकोद्दिष्टांत विशेष सांगतो हेमाद्रींत वाराहांत - " ब्राह्मणाचें श्मश्रुकर्म व नखच्छेद करावा . आणि त्याला यथाविधि स्नान व अभ्यंग द्यावा . " तसेंच - " ब्राह्मणाला चांगल्या आसनावर बसवावें , छत्री द्यावी , पश्चात् जोडा द्यावा . आणि सर्व आभरणें ( अलंकार वगैरे ) द्यावीं . " विष्णु - दक्षिणांत श्राद्ध सांगून " अक्षय्योदक दिल्यावर चार अंगुळें रुंद व तितकेच खोल एक वीत लांब असे तीन कर्षू म्हणजे खळगे करावे . कर्षूंच्या समीप अग्निस्थापन करुन परिस्तरण करुन एक एकावर तीन तीन आहुतींचा होम करावा . ‘ सोमाय पितृमते स्वधानमः , अग्नये कव्यवाहनाय स्वधानमः , यमाय अंगिरस्वते स्वधानमः ’ या मंत्रांनीं होम करावा . तीन स्थानीं पूर्वीं सांगितल्याप्रमाणें पिंड द्यावे . दधि , मधु , घृत व मांस यांनीं ते तीन कर्षू पूर्ण भरुन ‘ एतत्ते० ’ या मंत्राचा जप करावा . " अवशेष सर्व प्रयोग नवश्राद्धाप्रमाणें करावा . येथें साग्निकाचाही अंतीं वैश्वदेव , असें पूर्वीं ( श्राद्धवैश्वदेवप्रकरणीं ) सांगितलें आहे . हें श्राद्ध दशाहकृत्य कर्त्यानें किंवा पुत्रानें करावें , असें सांगितलें आहे . क्रियानिबंधांत गृह्यकारिकेंत - " तिलोसि प्रेतदेवत्यः ’ असा ऊह करावा . आणि ‘ प्रत्नवद्भिः प्रत्तः प्रेतमिमान् लोकान् प्रीणयाहिनः ’ असा मंत्र म्हणून अर्घ्यपात्रांत तिल टाकावे . दक्षिणा , अन्नसहित उदकुंभ आणि गाई ब्राह्मणाला देऊन , भुक्तशेष अन्न , त्याचीं भांडीं , व इतर पात्र हीं द्यावीं . " ब्राह्मणाच्या अभावीं अग्नीवर एकोद्दिष्ट करावें , तें असें - अग्नीवर पायस शिजवून आज्यभागांच्या अंतीं अग्नीच्या अग्रभागीं श्राद्धप्रयोग करुन अग्नीवर प्रेताचें आवाहन करुन गंधादिकांनीं पूजा करुन ‘ पृथिवी ते पात्रं० ’ या मंत्रानें अन्नाचा संकल्प करुन ‘ उदीरतां० ’ ह्या आठ ऋचांच्या चार आवृत्तींनीं बत्तीस आहुतींचा होम करुन पिंडदानादिक श्राद्ध समाप्त करावें . याज्ञवल्क्य - " हें सपिंडीकरण व एकोद्दिष्ट स्त्रियेचेंही करावें . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP