TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
दहा दिवसांमध्यें दर्श

तृतीय परिच्छेद - दहा दिवसांमध्यें दर्श

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


दहा दिवसांमध्यें दर्श

आतां दहा दिवसांमध्यें दर्श प्राप्त असतां निर्णय सांगतो -
अथदशाहमध्येदर्शपातेनिर्णयः भविष्ये प्रवृत्ताशौचतंत्रस्तुयदिदर्शंप्रपद्यते समाप्यचोदकंपिंडान्स्नानमात्रंसमाचरेत् ऋष्यशृंगः आशौचमंतरादर्शोयदिस्यात्सर्ववर्णिनां समाप्तिंप्रेततंत्रस्यकुर्यादित्याहगौतमः पैठीनसिः आद्येंदावेवकर्तव्याप्रेतपिंडोदकक्रिया द्विरैंदवेतुकुर्वाणः पुनः शावंसमश्नुते मातापित्रोस्तुश्लोकगौतमः अंतर्दशाहेदर्शश्चेत्तत्रसर्वंसमापयेत् पित्रोस्तुयावदाशौचंदद्यात्पिंडाञ्जलाञ्जलीन् इदमपित्र्यहमध्येदर्शपाते तदूर्ध्वंदर्शेतुपित्रोरपितंत्रंसमाप्यमेव पित्रोराशौचमध्येतुयदिदर्शः समापतेत् तावदेवोत्तरंतंत्रंपर्यवस्त्रेत्र्यहात्परमितिगालवोक्तेः अन्येषांतुत्र्यहमध्येपिसमाप्तिरितिपराशरमाधवीयेनिर्णयामृतेचोक्तं कालादर्शेपि दर्शोदशाहमध्येस्यादूर्ध्वंतंत्रंसमापयेत् त्रिरात्रादुत्तरंपित्रोर्मृतावितिविनिश्चयः मदनपारिजातेतुगालवीयमापदनौरसपुत्रादिविषयं त्र्यहोर्ध्वमपिपित्रोर्नतंत्रसमाप्तिरित्युक्तं मदनरत्नेप्येवं ममतुदेशाचाराद्व्यवस्थेतिप्रतिभाति ।

भविष्यांत - “ आशौचांतील कर्माला आरंभ केला असून जर मध्यें दर्श प्राप्त होईल तर दहा दिवसांचें उदक व पिंड यांची समाप्ति करुन स्नान मात्र दहाव्या दिवसानंतर करावें. ” ऋष्यशृंग - “ ब्राह्मणादि सर्व वर्णांना आशौचामध्यें जर दर्श प्राप्त होईल तर प्रेतकृत्याची समाप्ति करावी, असें गौतम सांगतो. ” पैठीनसि - “ पहिल्या चंद्रांतच ( मृत झाल्यावेळीं जो चंद्र होता तो आहे तोंपर्यंतच ) प्रेताची पिंड - उदकदान क्रिया करावी. दोन चंद्रांत जो प्रेतक्रिया करितो त्याला पुनः मृताशौच प्राप्त होतें. ” मातापित्याविषयीं तर सांगतो श्लोकगौतम - “ आशौचाचे दहा दिवसांचे आंत जर दर्श प्राप्त होईल तर त्या दिवशीं सर्व प्रेतकृत्य समाप्त करावें. मातापितरांचें तर जोंपर्यंत आशौच असेल तोंपर्यंत पिंड आणि उदकांजलि द्यावे. ” या वचनांत दर्शानंतरही पिंड सांगितले. हेंही तीन दिवसांचे आंत दर्श पडला असतां समजावें. तीन दिवसांनंतर दर्श पडेल तर मातापितरांचेंही प्रेततंत्र समाप्त करावेंच. कारण, “ मातापितरांच्या आशौचामध्यें जर दर्श पडेल व तीन दिवस होऊन गेले असतील तर तितक्यांतच पुढची क्रिया समाप्त करावी. ” असें गालववचन आहे. माता व पिता यांवांचून इतरांची क्रिया तर तीन दिवसांमध्येंही समाप्त करावी, असें पराशरमाधवीयांत आणि निर्णयामृतांत सांगितलें आहे. कालादर्शांतही - “ दहा दिवसांमध्यें दर्श असेल तर पुढचें तंत्र समाप्त करावें. मातापितरांचे मरणाविषयीं तीन दिवसांनंतर दर्श पडेल तर पुढच्या तंत्राची समाप्ति करावी, असा शास्त्रनिश्चय आहे. ” मदनपारिजातांत तर - तीन दिवसांपुढें दर्श पडेल तर मातापितरांचे तंत्राची समाप्ति करावी, असें जें गालवानें सांगितलें तें आपत्काल - औरसव्यतिरिक्त पुत्र इत्यादिविषयक आहे. तर तीन दिवसांपुढेंही दर्श पडला तरी मातापितरांचे तंत्राची समाप्ति होत नाहीं, असें सांगितलें आहे. मदनरत्नांतही असेंच आहे. मला तर देशाचाराप्रमाणें व्यवस्था करावी, असें वाटतें.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:25.0200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अमेज

  • स्त्री. मिश्रण ; गायनांतील राग वगैरेंचा मिश्र सूर . - वि . मिसळलेलें ; मिश्रित . [ फा . आमेज = मिसळणें ] 
  • वि. न मोजलेलें ; न मापलेलें ; न मोजतां येण्यासारखें ; अगणित ; पुष्कळ ; रगड . अमोज पहा . ( सं . अ + मा = मोजणें .) 
RANDOM WORD

Did you know?

shatshastra konati?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.