मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
जीवत्पितृकानें करावयाचें श्राद्ध

तृतीय परिच्छेद - जीवत्पितृकानें करावयाचें श्राद्ध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां जीवत्पितृकानें करावयाचें श्राद्ध सांगतो -

अथजीवत्पितृकश्राद्धं तत्रानेकपक्षादृश्यंते जीवंतंपितरंभोजयित्वापरयोः श्राद्धंकुर्यादित्येकः होमांतमेवकुर्यादित्यन्यः होमांतः पितृयज्ञः स्याज्जीवेपितरिजानतः पितरंभोजयित्वावापिंडान्निपृणुयात्परावितियज्ञपार्श्वोक्तेः यदिजीवत्पितानदद्यादाहोमात्कृत्वाविरमेदित्यापस्तंबोक्तेश्च जीवतांपिंडानग्नौहुत्वापरेभ्योदेयमित्यपरः जुहुयाज्जीवेभ्यइत्याश्वलायनोक्तेः जीवतामजीवतांचपिंडदानमितीतरः जीवतामजीवतांवादेयमेवेतिहिरण्यकेतुरितिनिगमात् तस्माज्जीवत्पिताकुर्याद्दाभ्यामेवनसंशयइतिभविष्योक्तेर्द्वाभ्यामेवेत्यन्यः एतेपक्षाः कलौनिषिद्धाः प्रत्यक्षमर्चनंश्राद्धेनिषिद्धंमनुरब्रवीत् पिंडनिर्वपणंचापिमहापातकसंमितमितिपृथ्वीचंद्रोदयेभविष्योक्तेः चंद्रिकाप्येवं तस्मात्पितरिजीवतिश्राद्धानारंभएवेत्येकः पक्षः सपितुः पितृकृत्येषुअधिकारोनविद्यतइतिकात्यायनोक्तेः जीवेपितरिवैपुत्रः श्राद्धकालंविवर्जयेदितिहारीतोक्तेश्च पितुः पित्रादिभ्योदद्यादितिसिद्धांतः ध्रियमाणेतुपितरिपूर्वेषामेवनिर्वपेदितिमनूक्तेः पितुः पितृभ्योवादद्यात्सपितेत्यपराश्रुतिरितिकात्यायनोक्तेश्च अयंबहुसंमतः पक्षः अन्येशाखाभेदेनज्ञेयाः एवंजीवन्मातामहेनाप्यूहेनकार्यं मातामहानामप्येवंश्राद्धंकुर्याद्विचक्षणः मंत्रोहेनयथान्यायंशेषाणांमंत्रवर्जितमितिविष्णूक्तेः एवंमात्रादिकस्यापितथामातामहादिकेइतिपृथ्वीचंद्रोदयेग्निपुराणाच्च पितरिजीवतितुस्वमातरिमृतायामपिपितुरेवमातृमातामहयोः कुर्यात् येभ्यएवपितादद्यादितिवक्ष्यमाणवचनादिति पितामहचरणाः मदनरत्नेतुजीवत्पितास्वमातृमातामहयोर्दद्यादित्युक्तं कालादर्शेप्येवं मृतेतुपितरिजीवन्मातृकः पितामह्यादिभ्योवृद्धौदद्यादितिस्मृतितत्त्वादिगौडग्रंथाः दाक्षिणात्यास्तु पितृवर्गेमातृवर्गेतथा मातामहस्यच जीवेत्तुयदिवर्गाद्यस्तंवर्गंतुपरित्यजेदितिवचनात्तद्वर्गत्यागएवेत्याहुः ।

याचे अनेक पक्ष स्मृतींमध्यें दिसतात ते असे - जीवंत असलेल्या पित्याला भोजन घालून इतरांचें ( पितामह व प्रपितामह यांचें ) श्राद्ध करावें , हा एक पक्ष . होमापर्यंतच श्राद्ध करावें , हा दुसरा पक्ष . कारण , " पिता जीवंत असतां होमापर्यंत पितृयज्ञ करावा . अथवा पित्याला भोजन घालून इतरांना पिंड द्यावे " असें यज्ञपार्श्वाचें वचन आहे . आणि " जर जीवत्पितृक असेल तर पिंड देऊं नये , होमापर्यंत करुन समाप्त करावें " असें आपस्तंबवचनही आहे . जीवंतांचे पिंडांचा अग्नींत होम करुन इतरांना द्यावे , हा तिसरा पक्ष ; कारण , " जीवंतांना अग्नींत होम करावा " असें आश्वलायन वचन आहे . जीवंतांना व मृतांना पिंडदान करावें , हा चवथा पक्ष . कारण , " जीवंतांना व मृतांना द्यावेंच , असें हिरण्यकेतु सांगतो " असें निगमवचन आहे . " तस्मात् कारणात् जीवत्पित्यानें दोघांचेंच श्राद्ध करावें , यांत संशय नाहीं " असें भविष्यवचन आहे , म्हणून दोघांनाच श्राद्ध द्यावें , हा पांचवा पक्ष . हे पक्ष कलियुगांत निषिद्ध आहेत . कारण , " श्राद्धाचे ठायीं प्रत्यक्ष पिता इत्यादिकांचें पूजन निषिद्ध आहे , असें मनूनें सांगितलें आहे . तसेंच प्रत्यक्ष पिता इत्यादिकांना पिंड देणें हेंही महापातकासारखें आहे " असें पृथ्वीचंद्रोदयांत भविष्यवचन आहे . चंद्रिकाही अशीच आहे . तस्मात् पिता जीवंत असतां श्राद्धारंभच करुं नये , हा एक पक्ष आहे . कारण , " सपितृकाला पितृकृत्याविषयीं अधिकार नाहीं " असें कात्यायनवचन आहे . आणि " पिता जीवंत असतां पुत्रानें श्राद्धकाल वर्ज्य करावा " असें हारीतवचनही आहे . पित्याच्या पित्रादिकांना श्राद्ध द्यावें , हा सिद्धांत होय . कारण , " पिता जीवंत असतां पूर्व पितरांनाच श्राद्ध द्यावें " असें मनुवचन आहे . आणि " सपितृकानें पित्याच्या पितरांना द्यावें , अशी दुसरी श्रुति आहे " असें कात्यायनानेंही सांगितलें आहे . हा पक्ष बहुतांना संमत ( मान्य ) आहे . इतर पक्ष शाखाभेदानें जाणावे . याप्रमाणें ज्याचा मातामह जीवंत असेल त्यानें देखील ऊह करुन प्रमातामहादिकांचें श्राद्ध करावें . कारण , " मातामहांचें देखील असेंच मंत्राचा ऊह करुन यथाविधि श्राद्ध करावें . इतरांचें मंत्रवर्जित ( अमंत्रक ) करावें " असें विष्णुवचन आहे . आणि " याप्रमाणें मातृत्रयीचेंही करावें , तसेंच मातामहादिकांचेंही करावें " असें पृथ्वीचंद्रोदयांत अग्निपुराणवचनही आहे . पिता जीवंत असतां व कर्त्याची माता मृत असली तरी पित्याच्याच मातृत्रयीचें व मातामहांचें करावें . कारण , " ज्यांना पिता देतो त्यांना पुत्रानें स्वतः द्यावें " ह्या पुढें सांगावयाच्या वचनावरुन , असें पितामहचरण ( नारायणभट्ट ) सांगतात . मदनरत्नांत तर - जीवत्पितृकानें आपली माता व मातामह यांना द्यावें , असें सांगितलें आहे . कालादर्शांतही असेंच आहे . पिता मृत असेल व माता जीवंत असेल तर पितामही इत्यादिकांना वृद्धिश्राद्धांत द्यावें , असें स्मृतितत्त्व इत्यादिक गौडग्रंथ आहेत . दाक्षिणात्य तर - " पितृवर्गांत , मातृवर्गांत , तसेंच मातामहवर्गांत ज्या वर्गाचा आद्य ( पहिला ) जीवंत असेल तो वर्ग वर्ज्य करावा " या वचनावरुन त्या वर्गाचा त्यागच आहे , असें सांगतात .

एवंपतितसंन्यस्तपितृकादेरपिज्ञेयं वृद्धौतीर्थेचसंन्यस्तेतातेचपतितेसति येभ्यएवपितादद्यात्तेभ्योदद्यात्स्वयंसुतइतिषटत्रिंशन्मतात्संन्यस्तेजीवतीत्यर्थः मृतेतुसंन्यस्तेतदाद्येवदेयं मृतेपिपरेभ्यएवेतिगौडाः कात्यायनोपि ब्राह्मणादिहतेतातेपतितेसड्गवर्जिते व्युत्क्रमाच्चमृतेदेयंयेभ्यएवददात्यसौ अयंचसंन्यस्तपित्रादेरविशेषात्सर्वश्राद्धेधिकारः एतत्र्त्रिदंडिपरं एकादशाहपार्वणवार्षिकाद्यपितस्यैव अहन्येकादशेप्राप्तेपार्वणंतुविधीयतेइत्युक्त्वा त्रिदंडग्रहणादेवप्रेतत्वंनैवजायतेइत्युशनसाविशेषोक्तेः ब्राह्मणादिहतेइत्यादिनिषेधस्त्वेकदंडादिपरः अतः परमहंसानांवार्षिकादिकमपिनकार्यमितिशूलपाणिश्राद्धतत्त्वादयोगौडग्रंथाः इदमेवतुयुक्तं यत्तुहेमाद्रौकौंडिन्यः दर्शश्राद्धंगयाश्राद्धंश्राद्धंचापरपक्षिकं नजीवत्पितृकः कुर्यात्तिलैस्तर्पणमेवचेतितत्संन्यस्तपित्राद्यतिरिक्तविषयं मैत्रायणीयपरिशिष्टे उद्वाहेपुत्रजननेपित्र्येष्ट्यांसौमिकेमखे तीर्थेब्राह्मणआयातेषडेतेजीवतः पितुः तत्रैव महानदीषुसर्वासुतीर्थेषुचगयामृते जीवत्पितापिकुर्वीतश्राद्धंपार्वणधर्मवत् गयामृतेइतिमातृव्यतिरिक्तविषयं अन्वष्टक्यंगयाप्राप्तौसत्यांयच्चमृतेहनि मातुः श्राद्धंसुतः कुर्यात्पितर्यपिचजीवतीतितत्रैवोक्तेः गयाप्राप्तौप्रासंगिक्यां गयांप्रसंगतोगत्वामातुः श्राद्धंसमाचरेदितिवचनात् तेनमृतमातृकोगयायांतत्पार्वणमात्रंकुर्यात् तज्जीवनेतुतीर्थश्राद्धमपिनेतिकालादर्शस्मृतिदर्पणादयः अन्येतुगत्वाश्राद्धंनेतिनिषेधार्थः सामान्यतः प्राप्तंतीर्थश्राद्धंभवत्येवगयायामित्याहुः ।

याप्रमाणें ज्याचा पिता पतित किंवा संन्यास घेतलेला वगैरे असेल त्यालाही असेंच समजावें . कारण , " जीवत्पितृकानें वृद्धिश्राद्धांत व तीर्थश्राद्धांत आणि पिता संन्यास घेतलेला किंवा पतित असतां ज्या पितरांना पित्यानें श्राद्ध द्यावयाचें त्यांना स्वतः पुत्रानें द्यावें " असें षटत्रिंशत्स्मृतिवचन आहे . संन्यास घेतलेला पिता मृत असेल तर तो पहिल्यानें धरुनच श्राद्ध द्यावें . मृत असला तरी पूर्वीच्यांनाच द्यावें , त्याला नाहीं , असें गौड सांगतात . कात्यायनही - " पिता , ब्राह्मण , गाई इत्यादिकांनीं मारला गेला , पतित ( महापातकी ) झाला , त्यानें संन्यास घेतला किंवा उलट क्रमानें ( पितामह जीवंत असतां ) मृत झाला , असा असेल तर ज्या पितरांना पित्यानें श्राद्ध द्यावयाचें त्यांना पुत्रानें द्यावें . " ज्याचा पिता संन्यस्त वगैरे झाला असेल त्याला जो श्राद्धाविषयीं अधिकार सांगितला तो अमुक श्राद्धाविषयीं , असें विशेष सांगितलें नसल्यामुळें सर्व श्राद्धांविषयीं तो आहे . हें सांगणें त्रिदंडी संन्याशाविषयीं आहे . अकराव्या दिवशीं पार्वणश्राद्ध आणि वार्षिकादिक श्राद्ध हें देखील त्या त्रिदंडीलाच आहे . कारण , " अकरावा दिवस प्राप्त असतां पार्वण करावें " असें सांगून " त्रिदंडाचें ग्रहण केल्यानेंच त्याला प्रेतत्व प्राप्त होत नाहीं . " असें उशनसानें विशेष सांगितलें आहे . ‘ ब्राह्मणादिहतेताते० ’ ह्या कात्यायनानें जो निषेध केला तो एकदंडी वगैरे संन्याशी यांना आहे . म्हणूनच परमहंसांचें वार्षिकादिकही करुं नये , असें शूलपाणी , श्राद्धतत्त्व इत्यादिक गौडग्रंथ आहेत . हेंच युक्त आहे . आतां जें हेमाद्रींत कौंडिन्य - " जीवत्पितृकानें दर्शश्राद्ध , गयाश्राद्ध , महालय , हीं करुं नयेत ; व तिलांनीं तर्पणही करुं नये " असें निषेधक वचन तें ज्याचा पिता संन्याशी वगैरे नसेल त्याविषयीं आहे . संन्याशी वगैरे नसतां श्राद्धाधिकार कसा ? असें म्हणाल तर सांगतो - मैत्रायणीयपरिशिष्टांत - " विवाह , पुत्रोत्पत्ति , पितृयज्ञ , सोमयाग , तीर्थ आणि श्राद्धयोग्य ब्राह्मणाचें आगमन , हे सहा काल जीवत्पितृकाला श्राद्धाचे आहेत . तेथेंच " सर्व महानद्या , गयेवांचून इतर तीर्थे , यांचे ठायीं जीवत्पितृकानें देखील पार्वणश्राद्धाच्या धर्मानें श्राद्ध करावें . " गयेवांचून असें जें म्हटलें तें मातृव्यतिरिक्तविषयक आहे ; कारण , " पिता जीवंत असतांही अन्वष्टक्य श्राद्ध , गयातीर्थ प्राप्त असतां , आणि मृतदिवशीं ( संवत्सरदिवशीं ) मातेचें श्राद्ध पुत्रानें करावें " असें तेथेंच सांगितलें आहे . गयातीर्थप्राप्ति इतर प्रसंगानें होईल तर करावें . मुद्दाम त्याचकरितां जाऊन करुं नये . कारण , " प्रसंगानें गयेस गेला असतां तेथें मातेचें श्राद्ध करावें " असें वचन आहे . यावरुन असें सूचित होतें कीं , ज्याची माता मृत असेल त्यानें गयेचे ठायीं तिचें पार्वण मात्र करावें , ती माता जीवंत असेल तर तीर्थश्राद्धही करुं नये , असें कालादर्श , स्मृतिदर्पण इत्यादिक ग्रंथकार सांगतात . इतर ग्रंथकार तर - ‘ गयामृते ’ या निषेधाचा अर्थ - गयेंत जाऊन श्राद्ध करुं नये , असा आहे . सामान्यतः प्राप्त झालेलें तीर्थश्राद्ध गयेचे ठायीं होतच आहे , असें सांगतात .

यदातुपितुः प्रतिनिधित्वेनगयांयातितदायजमानस्यपितृपितामहप्रपितामहाइत्येवंश्राद्धं तत्रमातुः पितृपत्नीप्त्वेनैकोद्दिष्टंकृत्वामातृत्वेनपुनः पार्वणंकुर्यादितित्रिस्थलीसेतौ तच्चफल्गुविष्णुपदाक्षय्यवटेष्वेवेतिकेचित् आद्यांतेएवेत्यन्ये मध्यमांतेइत्यपरे संकोचेहेत्वभावात्तत्रत्यसर्वश्राद्धानिमातुः कार्याणीतियुक्तंप्रतिभाति यत्तु मदनपारिजाते नजीवत्पितृकः कुर्याच्छ्राद्धमग्निमृतेद्विजः येभ्यएवपितादद्यात्तेभ्यः कुर्वीतसाग्निकइति सुमंतूक्तेः साग्नेरेवजीवत्पितृकस्यतीर्थादिश्राद्धमुक्तं साग्नेरपिमैत्रायणीयशाखीयस्यैवनान्येषाम् षडेतेजीवतः पितुरितितत्परिशिष्टेएवोक्तेरितिरत्नावलीदिवोदासाद्याः तदयुक्तं सौमंतवंपिंडपितृयज्ञविषयं संन्यस्तपित्राद्यतिरिक्तविषयंवेतिपृथ्वीचंद्रोदयोक्तेः वृद्धौतीर्थेचेत्यादेः साधारण्येनास्यापितथात्वाच्च तथानिरग्नेरपिनांदीश्राद्धमुक्तंप्राक् एवंपितामहजीवनेपिज्ञेयं विशेषः पितृकृतजीवत् पितृकनिर्णयेज्ञेयः ।

जेव्हां पित्याचा प्रतिनिधि होऊन पुत्र गयेस जाईल तेव्हां ‘ यजमानस्य पितृपितामहप्रपितामहाः ’ असा उच्चार करुन श्राद्ध करावें . त्या वेळीं मृतमातृकानें मातेचें पितृपत्नीत्वेंकरुन एकोद्दिष्ट करुन मातृत्वेंकरुन पुनः पार्वण करावें , असें त्रिस्थलीसेतु ग्रंथांत आहे . तें मातृश्राद्ध फल्गुनदी , विष्णुपद आणि अक्षय्यवट यांचे ठायींच करावें , असें केचित् म्हणातात . पहिल्या श्राद्धाच्या अंतींच करावें , असें अन्य म्हणतात . मध्यम श्राद्धाच्या अंतीं करावें , असें इतर म्हणतात . श्राद्धाचा संकोच करण्याविषयीं प्रमाण नसल्यामुळें तेथील सारीं श्राद्धें मातेचीं करावीं , हें युक्त वाटतें . आतां जें मदनपारिजातांत - " जीवत्पितृकानें अग्नि नसतां श्राद्ध करुं नये . ज्या पितरांना पिता श्राद्ध देतो , त्यांनाच साग्निकानें द्यावें " या सुमंतुवचनावरुन जीवत्पितृक साग्निक असतां त्याला तीर्थादि श्राद्ध सांगितलें आहे . साग्निकाला देखील मैत्रायणीयशाखेचा असेल त्यालाच , इतरांना नाहीं . कारण , हे सहा काळ श्राद्धाचे जीवत्पितृकाला आहेत " असें त्यांच्याच परिशिष्टांत उक्त आहे , असें रत्नावली , दिवोदास इत्यादिक ग्रंथकार सांगतात . तें अयुक्त आहे . कारण , वरील सुमंतुवचनानें केलेला निषेध पिंडपितृयज्ञविषयक किंवा ज्याचा पिता संन्यस्त वगैरे नसेल तद्विषयक आहे , असें पृथ्वीचंद्रोदयानें सांगितलें आहे . आणि ‘ वृद्धिश्राद्धांत , तीर्थश्राद्धांत , पिता संन्यस्त वगैरे असतां ’ हें पूर्वोक्त वचन सर्वसाधारण असल्यामुळें हें ( महानदीषु सर्वासु० इत्यादि वर सांगितलेलें ) ही तसेंच सर्वसाधारण आहे . तसेंच निरग्निकालाही जीवत्पितृकाला वृद्धिश्राद्ध पूर्वीं सांगितलें आहे . पितामह जीवंत असतांही असेंच समजावें . विशेष निर्णय माझ्या ( कमलाकरभट्टांच्या ) पित्यानें केलेल्या जीवत्पितृकनिर्णय ग्रंथांतून जाणावा .

अथपितामहेजीवतिमृतेचपितरि यद्यपि पितामहोवातच्छ्राद्धेभुंजीतेत्यब्रवीन्मनुरितिमनुनाजीवतः पितामहस्यभोजनमुक्तं तथापिप्रत्यक्षार्चनस्यपूर्वंनिषिद्धत्वात्पितामहंविहायपितृप्रपितामहवृद्धप्रपितामहेभ्योदेयं पितायस्यनिवृत्तः स्याज्जीवेच्चापिपितामहः पितुः सनामसंकीर्त्यकीर्तयेत्प्रपितामहमितिमनूक्तेः अयमेवसर्व संमतः पक्षः यत्तुछंदोगपरिशिष्टे पितामहेध्रियमाणेपितुः प्रेतस्यनिर्वपेत् पितुस्तस्यचवृत्तस्यजीवेच्चेत्प्रपितामहइतिएकपुरुषंद्विपुरुषंवापार्वणमाहतत्तीर्थपितृयज्ञपरं वृद्धौपूर्वोक्तमेव एवंपूर्वयोर्मृतयोः प्रपितामहे जीवतिपितृमात्रेमृतेपरयोर्जीवतोश्चवृद्धप्रपितामहादिभ्योज्ञेयं जीवंतमतिदद्याद्वाप्रेतायान्नोदकेद्विजइतिकात्यायनोक्तेश्च एतत्सर्वंमनसिकृत्वाहहेमाद्रौविष्णुः पितरिजीवतियः श्राद्धंकुर्याद्येषांपिताकुर्यात्तेषां पितरिपितामहेचजीवतियेषांपितामहः पितरिपितामहेप्रपितामहेचजीवतिनैवकुर्यात् यस्यपिताप्रेतः स्यात्सपित्रेपिडंनिधायपितामहात्पराभ्यांद्वाभ्यांदद्यात् यस्यपितामहः प्रेतः स्यात्सतस्मैपिंडंनिधायप्रपितामहात्पराभ्यांदद्यात् यस्यपितापितामहश्चप्रेतोस्यातांसताभ्यांपिंडौदत्वापितामहपितामहायदद्यात् मातामहानामप्येवंश्राद्धंकुर्याद्विचक्षणः मंत्रोहेनयथान्यायंशेषाणांमंत्रवर्जितमिति अत्रपितृवन्मातामहेजीवतितत्पित्रादिभ्यः यथातत्रत्रिषुजीवत्सुनैवकुर्यात्तथात्रापीत्यादिसर्वमतिदेश्यम् एवंमातृजीवनेपीतिशूलपाणिकालादर्शौ तन्न येभ्य एवेत्यादौयच्छब्दादेर्व्यक्तिविशेषवाचित्वेनतदप्रसंगादितिदिक् उत्तरार्धंव्याख्यातंप्राक् यत्त्वत्रविज्ञानेश्वरेणोक्तं पित्रेपिंडंनिधायेतिपितुरेकोद्दिष्टविधिनाश्राद्धंकृत्वाप्रपितामहादिभ्यः पार्वणंकुर्यात् तद्व्युत्क्रममृतसपिंडीकरणाभावपक्षेसपिंडीकरणस्थानापन्नंज्ञेयं व्युत्क्रमात्तुप्रमीतानांनैवकार्यासपिंडतेतिवचनात् दर्शादौतुपितुरेकोद्दिष्टमेवकार्यम् नजीवंतमतिददातीतिश्रुतेः जीवेत्पितामहोयस्यपिताचांतरितोभवेत् पितुरेकस्यदातव्यमेवमाहुर्मनीषिणइतियज्ञपार्श्वोक्तेः पितामहेजीवतिवैपितर्येवसमापयेदितिहारीतोक्तेश्च शिष्टास्तु व्युत्क्रमात्तुप्रमीतानांनैवकार्यासपिंडता यदिमातायदिपिताभर्तानैषविधिः स्मृत इतिमाधवीयेस्कांदोक्तेर्व्युत्क्रममृतसपिंडीकरणाभावः पितृव्यादिविषयइत्याहुः एषविधिर्निषेधरुपः ।

आतां पितामह जीवंत असून पिता मृत झाला असतां जरी " त्या श्राद्धांत पितामहाला भोजन घालावें " ह्या मनुवचनानें जीवंत पितामहाला भोजन सांगितलें आहे तरी प्रत्यक्ष वडिलांचें पूजन पूर्वीं निषिद्ध म्हणून सांगितलें असल्यामुळें पितामह वर्ज्य करुन पिता , प्रपितामह व वृद्धप्रपितामह यांना श्राद्ध द्यावें ; कारण , ज्याचा पिता मृत असेल आणि पितामह जीवंत असेल त्यानें पित्याचें नांव घेऊन प्रपितामहाचें नांव घ्यावें " असें मनूचें वचन आहे . हाच पक्ष सर्वांना मान्य आहे . आतां जें छंदोगपरिशिष्टांत - " पितामह जीवंत असतां मृत झालेल्या पित्याचें श्राद्ध करावें . प्रपितामह जीवंत असेल आणि पिता व पितामह मृत असतील तर त्या दोघांचें श्राद्ध करावें असें एक पुरुषाचें व दोन पुरुषांचें पार्वण सांगितलें आहे , तें तीर्थश्राद्ध - पिंडपितृयज्ञविषयक आहे . वृद्धिश्राद्धांत पूर्वीं सांगितलें तेंच समजावें . याप्रमाणें पिता व पितामह मृत असून प्रपितामह जीवंत असेल अथवा पिता मात्र मृत असून पितामह व प्रपितामाह जीवंत असतील तर वृद्धप्रपितामहादिकांना श्राद्ध द्यावें , असें समजावें . कारण , " जीवंत असेल त्याला सोडून प्रेताला अन्न व उदक द्विजानें द्यावें " असें कात्यायनवचनही आहे . हा वर सांगितलेला सर्व प्रकार मनांत धरुन सांगतो हेमाद्रींत विष्णु - ‘‘ पिता जीवंत असतां जो श्राद्ध करील त्यानें ज्यांचें पिता श्राद्ध करितो त्यांचें करावें . पिता व पितामह जीवंत असतां ज्याचें पितामह करितो त्यांचें करावें . पिता , पितामह व प्रपितामह तिघे जीवंत असतील तर त्यानें श्राद्धच करुं नये . ज्याचा पिता मृत असेल त्यानें पित्याला पिंड देऊन पितामहाच्या पूर्वीच्या दोघांना द्यावें . ज्याचा पितामह मृत असेल त्यानें त्या पितामहाला पिंड देऊन प्रपितामहाच्या पूर्वींच्यांना द्यावे . ज्याचा पिता व पितामह दोघे मृत असतील त्यानें त्या दोघांना पिंड देऊन पितामहाच्या प्रपितामहाला द्यावा . ज्याचा पितामह मृत असेल त्यानें त्याला पिंड देऊन प्रपितामहाच्या पूर्वींच्या दोघांना द्यावें . मातामहांचें देखील असेंच मंत्राचा ऊह करुन यथाविधि श्राद्ध करावें . इतरांचें अमंत्रक करावें . " येथें ( मातामहश्राद्धांत ) पित्याप्रमाणें मातामह जीवंत असतां त्याच्या पित्रादिकांना द्यावें . जसें ते पिता इत्यादिक तिघे जीवंत असतां श्राद्ध करुं नये तसें येथेंही ( मातामहत्रयींतही ) करुं नये , इत्यादिक सर्वाचा अतिदेश ( हवाला ) जाणावा . माता जीवंत असतांही असेंच समजावें , असें शूलपाणि कालादर्श सांगतात , तें बरोबर नाहीं . कारण , " येभ्य एव पिता दद्यात्तेभ्यो दद्यात्स्वयं सुतः " इत्यादि वाक्यांतील ‘ येभ्यः ’ इत्यादि शब्द विशेष व्यक्तींचे ( पुरुषांचे ) वाचक असल्यामुळें त्या वचनाची माता - पितामही इत्यादिकांवर प्रसक्तीच येत नाहीं . उत्तरार्धाची ( मंत्रोहेन यथान्यायं ) ह्या अर्ध श्लोकाची व्याख्या पूर्वीं ( पार्वणश्राद्धप्रकरणीं ) केली आहे . आतां जें येथें ( जीवत्पितृकादिश्राद्धप्रकरणीं ) विज्ञानेश्वरानें सांगितलें आहे कीं , " पित्याला पिंड देऊन ’ म्हणजे पितामह जीवंत असतां पित्याचें एकोद्दिष्टविधीनें श्राद्ध करुन प्रपितामहादिकांचें पार्वण करावें " असें , तें उलट क्रमानें ( वडील जीवंत असून पुत्र मरणें अशा क्रमानें ) मृतांचें सपिंडीकरण करावयाचें नाहीं , या पक्षीं सपिंडीकरणाच्या स्थानीं समजावें . कारण , " उलट क्रमानें मृतांचें सपिंडीकरण करुं नये . " असें वचन आहे . दर्शादिश्राद्धांत तर पित्याचें एकोद्दिष्टच करावें . कारण , " जीवंत असेल त्याचें उल्लंघन करुन पूर्वीच्यास देऊं नये " अशी श्रुति आहे . ज्याचा पितामह जीवंत असून पिता मृत असेल त्यानें एकट्या पित्याला श्राद्ध द्यावें , असें विद्वान् सांगतात . " असें यज्ञपार्श्वाचें वचन आहे . आणि " पितामह जीवंत असतां पित्याच्या ठिकाणीं श्राद्ध समाप्त करावें " असें हारीताचें वचनही आहे . शिष्ट तर - " उलट क्रमानें मृत झाले असतील त्याचें सपिंडीकरण करुं नये . जर माता , किंवा पिता , अथवा भर्ता मृत असेल तर त्यांचे ठायीं हा सपिंडीकरण निषेध नाहीं " असें माधवीयांत स्कंदवचन असल्यामुळें उलट क्रमानें मृत झालेल्यांचें सपिंडीकरण नाहीं म्हणणें हें पितृव्य - ज्येष्ठ भ्राता इत्यादिविषयक समजावें , असें सांगतात .

त्रिषुजीवत्सुविष्णुराह त्रिषुजीवत्सुनैवकुर्यादितितद्दर्शादिविषयं नांदीश्राद्धंतुपरेभ्यस्त्रिभ्योभवत्येवेतिकल्पतरुः पृथ्वीचंद्रोदयस्तु दद्यात्र्त्रिभ्यः परेभ्यस्तुजीवेच्चेत्र्त्रितयंयदीतिमनूक्तेः सर्वत्रविकल्पः सचदेशाचाराव्द्यवतिष्ठतइत्याह सुदर्शनभाष्येतुमासिकश्राद्धंजीवत्पित्रादिनाव्युत्क्रममृतपित्रादिनाचकार्यमेवेत्युक्तं मदनरत्नेक्रतुः अष्टकादिषुसंक्रांतौमन्वादिषुयुगादिषु चंद्रसूर्यग्रहेपातेस्वेच्छयालभ्ययोगतः जीवत्पितानैवकुर्याच्छ्राद्धंकाम्यंतथाखिलं अन्येविशेषाः श्रीपितृकृतजीवत्पितृकनिर्णयेभट्टकृतत्रिस्थलीसेतौचज्ञेयाः इतिश्रीभट्टकमलाकरकृतेनिर्णयसिंधौजीवत्पितृकादिश्राद्धम् ।

आतां तिघे जीवंत असतां विष्णु सांगतो - ‘‘ पिता इत्यादिक जीवंत तिघे असतां श्राद्ध करुं नये . " असें तें दर्शश्राद्ध विषयक समजावें . नांदीश्राद्ध तर पूर्वीच्या तिघांना ( वृद्धप्रपितामहादिकांना ) द्यावें , असें कल्पतरु सांगतो . पृथ्वीचंद्रोदय तर - " पिता इत्यादिक त्रयी जीवंत असेल तर पूर्वींच्या तिघांना द्यावें " असें मनुवचन असल्यामुळें सर्व श्राद्धांचे ठायीं विकल्प समजावा . त्याची ( विकल्पाची ) देशाचारावरुन व्यवस्था समजावी , असें सांगतो . सुदर्शनभाष्यांत तर - ज्याचे पिता इत्यादिक जीवंत असतील व उलट क्रमानें मृत असतील त्यानें मासिक श्राद्ध करावेंच , असें सांगितलें आहे . मदनरत्नांत क्रतु - " अष्टका इत्यादिक श्राद्धें , संक्रांति , मन्वादि तिथि , युगादि तिथि , चंद्रसूर्यग्रहण , व्यतीपात , अलभ्ययोग इतक्या ठिकाणीं जीवत्पितृकानें आपल्या इच्छेप्रमाणें करावें . सारें काम्यश्राद्ध जीवत्पितृकानें करुं नयेच . " इतर विशेष , पित्यानें केलेल्या जीवत्पितृकनिर्णयांत व नारायणभट्टांनीं केलेल्या त्रिस्थलीसेतूंत जाणावे .

इति जीवत्पितृकादिश्राद्धाची महाराष्ट्रटीका समाप्त झाली .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP