मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
अनुपनीताविषयीं

तृतीय परिच्छेद - अनुपनीताविषयीं

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां अनुपनीताविषयीं थोडें सांगतों -

अथानुपनीतेकिंचिदुच्यते नाम्नः पूर्वंखननमेव तदूर्ध्वंवर्षत्रयात्पूर्वंचौलाभावेग्न्युदकदानविकल्पः नात्रिवर्षस्यकर्तव्याबांधवैरुदकक्रिया जातदंतस्यवाकुर्युर्नाम्निवापिकृतेसतीतिमनूक्तेः उदकक्रिया साहचर्याद्दाहोपलक्षणं खननेतुनान्यदौर्ध्वदेहिकं ऊनद्विवर्षंनिखनेन्नकुर्यादुदकंततइतियाज्ञवल्क्योक्तेः उदकमंत्यकर्मपरमित्यपरार्कः यमः ऊनद्विवार्षिकंप्रेतंघृताक्तंनिखनेद्भुवि यमगाथांगायमानोयमसूक्तमनुस्मरन् ‍ माधवीयेब्राह्मेपि स्त्रीणांतुपतितोगर्भः सद्योजातोमृतोथवा अजातदंतोमासैर्वामृतः षड्भिर्गतैर्बहिः वस्त्राद्यैर्भूषितं कृत्वानिक्षिपेत्तंतुकाष्ठवत् खनित्वाशनकैर्भूमौसद्यः शौचंविधीयते अलंकरणमपिवक्ष्यते कृतचूडस्यतुत्रिवर्षात्प्रागूर्ध्वंवाग्न्युदकदानंनियतं यत्तुवसिष्ठः ऊनद्विवर्षेप्रेतेगर्भपतनेवासपिंडानांत्रिरात्रमितितत्प्रथमाब्दचूडापरं वर्षत्रयादूर्ध्वमकृतचूडस्यापिनियतम् वर्षत्रयोर्ध्वंउपनयनात्पूर्वंचतूष्णीमग्न्युदकदानम् तूष्णीमेवोदकं कुर्यात्तूष्णींसंस्कारमेवचेतिपूर्वोक्तलौगाक्षिस्मृतेः पिंडदानमपिकार्यम् असंस्कृतानांभूमौपिंडंदद्यात् संस्कृतानांकुशेष्वितिप्रचेतसोक्तेः उदकदानंसपिंडैः कृतचूडस्येतिगौतमोक्तेः उदकग्रहणमौर्ध्वदेहिकपरमिति हरदत्तः द्वादशाद्वत्सरादर्वाक्पौगंडमरणेसति सपिंडीकरणंनस्यादेकोद्दिष्टानिकारयेदिति हरदत्तधृतदेवलोक्तेश्च मरीचिरपि प्रेतपिंडंबहिर्दद्याद्दर्भमंत्रविवर्जितमिति एतदनुपनीतपरमितिविज्ञानेश्वरः अत्रचूडैवपूर्वावधिः पूर्ववाक्येषुतद्ग्रहणात् उदकग्रहणस्योपलक्षणत्वाद्दाहः पूर्वावधिरितिकेचित् द्वादशाद्वत्सरादित्यनुपनीतद्विजानूढशूद्रविषयं त्र्यहाशौचेपिंडदानविधिमाहपारस्करः प्रथमेदिवसेदेयास्त्रयः पिंडाः समाहितैः द्वितीयेचतुरोदद्यादस्थिसंचयनंतथा त्रींस्तुदद्यात्तृतीयेह्निवस्त्रादिक्षालयेत्ततइति ।

नामकरणाच्या पूर्वीं मृताचें खननच करावें ( पुरावेंच ). नामकरणानंतर तीन वर्षांच्या आतं चौल झालेलें नसतां दाह व उदकदान यांचा विकल्प आहे . कारण , " तीन वर्षांच्या आंतील मृताची उदकक्रिया ( दाहादिकक्रिया ) करुं नये . अथवा दांत उत्पन्न झालेले असून नामकरण केलेलें असेल तर करावी . " असें मनुवचन आहे . खनन केलें असेल तर दुसरें त्याचें और्ध्वदेहिक कर्म नाहीं . कारण , " दोन वर्षांचे आंत मृत असेल त्याला भूमींत पुरावें , त्याला उदक देऊं नये " असें याज्ञवल्क्याचें वचन आहे . या वचनांत ‘ उदक ’ म्हणजे अंत्यकर्म समजावें , असें अपरार्क सांगतो . यम - " दोन वर्षांच्या आंतील मृत असतां यमसूक्ताचें स्मरण करुन यमाची गाथा गायन करीत त्या प्रेतावर घृत घालून तें प्रेत भूमींत पुरावें . " माधवीयांत ब्राह्मांतही " स्त्रियांचा गर्भ पतित झाला , अथवा उत्पन्न होऊन तत्काल मृत झाला किंवा दांत उत्पन्न न झालेला सहा महिन्यांचा बालक मृत झाला तर त्याला बाहेर नेऊन वस्त्रादिकांनीं भूषित करुन काष्ठाप्रमाणें त्याला भूमींत पुरुन सद्यः शौच ( स्नान ) करावें . " त्याला अलंकारही पुढें सांगूं . चौल झालेला तीन वर्षांच्या पूर्वीचा किंवा पुढचा असला तरी त्याला दाह व उदकदान निश्चित आहे . आतां जें वसिष्ठ - " दोन वर्षांच्या आंतील बालक मृत असतां किंवा गर्भपात असतां सपिंडांना त्रिरात्र आशौच असें सांगतो तें पहिल्या वर्षीं चौल झालें असेल तद्विषयक आहे . तीन वर्षांनंतर चौल झालें नसलें तरी त्रिरात्र आशौच नियमित आहे . तीन वर्षांनंतर उपनयनाच्या पूर्वीं मंत्रवर्जित दाह व उदकदान करावें . कारण , " अमंत्रक उदक द्यावें व संस्कारही अमंत्रक करावा " अशी पूर्वीं सांगितलेली लौगाक्षिस्मृति आहे . पिंडदानही करावें . कारण " संस्कार न झालेल्यांना भूमीवर पिंड द्यावा , संस्कार झालेल्यांना कुशांवर पिंड द्यावा " असें प्रचेतसाचें वचन आहे . " चौलकर्म केलें असेल त्याला सपिंडांनीं ( बांधवांनीं ) उदकदान करावें . " असें गौतमवचन आहे . येथें उदक म्हणजे और्ध्वदेहिक कर्म , असें हरदत्त सांगतो . आणि " बाराव्या वर्षांच्या आंत पौगंडवयामध्यें बालक मृत असतां त्याचें सपिंडीकरण होत नाहीं . एकोद्दिष्टें करावीं " असें हरदत्तानें धृत देवलवचनही आहे . मरीचिही - " दर्भ व मंत्ररहित प्रेतपिंड बाहेर द्यावा " हें वचन मौंजी व झालेल्याविषयीं आहे , असें विज्ञानेश्वर सांगतो . येथें म्हणजे पिंडदानाविषयीं चूडाकर्मच पहिला अवधि म्हणजे चूडकर्मानंतर पिंडदान करावें ; कारण , पूर्वींच्या गौतमवचनांत चूडाकर्माचें ग्रहण आहे . उदकग्रहण दाहाचें उपलक्षण असल्यामुळें पिंडदानाला दाह पहिला अवधि आहे , असें केचित् म्हणतात . वरील देवलवचनांत ‘ द्वादशात् वत्सरात् ’ म्हणजे बारावर्षांच्या आंत , असें सांगितलें तें मौंजी न झालेले द्विज आणि अविवाहित शूद्र यांच्या विषयीं आहे . तीन दिवसांचें आशौच असतां पिंडदानाचा विधि सांगतो - पारस्कर - पहिल्या दिवशीं तीन पिंड द्यावे . दुसर्‍या दिवशीं चार पिंड आणि अस्थिसंचयश्राद्ध करावें . आणि तीन पिंड तिसर्‍या दिवशीं द्यावे . नंतर वस्त्रादि क्षालन करावें . "

अत्रदेवयाज्ञिकनिबंधेविशेषः शिशुरादंतजननाद्बालः स्याद्यावदाशिखः कथ्यतेसर्वशास्त्रेषुकुमारोमौंजिबंधनात् आपंचवर्षात्कौमारंपौगंडोनवहायनः तथा गर्भेनष्टेक्रियानास्तिदुग्धंदेयंशिशौमृते परंचपायसंक्षीरंदद्याद्वालविपत्तितः एकादशंद्वादशाहंवृषोत्सर्गविधिंविना तथा यत्रप्रमीयतेबालस्तत्रप्रायः प्रदीयते किंचित्समानवयसांसंस्कृत्यान्नंयथाविधि भक्ष्यंभोज्यंचदातव्यंतथाचसुखभक्षिका तद्वस्त्राणिप्रदेयानिसोपानत्कानितत्समे कुमाराणांचबालानांभोजनंवस्त्रवेष्टनं यच्चोपजीवतेबालस्तत्तद्विप्रायदीयते तथा भूमिनिक्षेपणंबालेआवर्षद्वयमाशिखं ततः परंखगश्रेष्ठदेहदाहोयथाविधि अचूडेप्यूर्ध्वंखननंनिवृत्त्यर्थमावर्षद्वयमिति प्रागपिकृतचूडस्यतन्निवृत्त्यर्थमाशिखमिति तथा चूडाकर्मणिसंजातेविपत्तिस्तुयदाभवेत् सूतकांतेप्रकर्तव्यंवृषस्योत्सर्जनंतथा तत्रदाहः प्रकर्तव्यउदकंतत्रनिश्चितं श्राद्धानिषोडशापिस्युः सपिंडीकरणंविना इदंपंचवर्षोत्तरं जन्मतः पंचवर्षाणिभुंक्तेदत्तमसंस्कृतं पंचवर्षाधिकेबालेविपत्तिर्यदिजायते वृषोत्सर्गादिकंकर्मकर्तव्यमुदकंततः अहन्यहनि संप्राप्तेकुर्याच्छ्राद्धानिषोडश पायसेनगुडेनैवपिंडंदद्याद्यथाक्रमं उदकुंभप्रदानंचपददानानियानिच दीपदानानि यत्किंचित्पंचवर्षाधिकेसदा कर्तव्यंतुखगश्रेष्ठव्रतार्वाक् ‍ प्रेततृप्तये स्वाहाकारेणैवकार्याण्येकोद्दिष्टानिषोडश ऋजुदर्भैस्तिलैः शुक्लैः प्राचीनावीतिनातथेपि तत्रैवोक्तेः अत्रमूलंचिंत्यम् वार्षिकादितुनभवत्येव सपिंडनाभावेपितृत्वायोगात् वचनाभावाच्च ।

येथें ( बालकाविषयीं ) देवयाज्ञिक निबंधांत विशेष सांगतो - ‘‘ दंतोत्पत्तीपर्यंत बालकाला शिशु म्हणतात . तदनंतर शिखा राखणेंपर्यंत बाल असें म्हणतात . त्याच्यापुढें मौंजीबंधन होईपर्यंत सर्व शास्त्रांत कुमार असें म्हटलें आहे . पांच वर्षांपर्यंत कुमार आणि नऊ वर्षांपर्यंत पौगंड असें म्हणतात . " तसेंच - गर्भ पतन झाला असतां कोणतीही क्रिया नाहीं . शिशु मृत असतां दूध द्यावें . बाल मृत असतां दूध व पायस द्यावें . एकादशाह व द्वादशाहकृत्य आणि वृषोत्सर्गविधि करुं नये . " तसेंच " ज्या ठिकाणीं बाल मृत होतो त्याठिकाणीं समानवयाच्या मुलांना किंचित् अन्न संस्कार करुन यथाविधि भक्ष्य - भोज्य आणि सुखभक्षिका हीं द्यावीं . त्याचीं वस्त्रें त्याचा जोडा हीं सारीं त्याच्या समान वयाच्या मुलास द्यावीं . कुमार व बाल यांना भोजन व त्याची बंडी वगैरे वस्त्रें सर्व द्यावीं . जें जें तो बालक वापरीत असेल तें तें ब्राह्मणाला द्यावें . " तसेंच - दोन वर्षांच्या आंतील व शिखाराखणेपर्यंत बालक मृत असतां त्याला भूमींत पुरावें . त्याच्या पुढें यथाविधि दाह करावा . " दोन वर्षांच्या नंतर चौल झालेलें नसलें तरी खनन ( भूमींत पुरणें ) करुं नये , असें होण्यासाठीं , दोन वर्षांच्या आंतील असें म्हटलें आहे . दोन वर्षांच्या आंत चौल झालें असतां मृत असेल तर खनन करुं नये , असें सुचविण्याकरितां शिखाराखणेंपर्यंत असें सांगितलें आहे . तसेंच " चौल झालेलें असतां जेव्हां बालक मृत होईल तेव्हां सूतकाच्या अंतीं वृषोत्सर्ग करावा . त्याचा दाह व उदकदान निश्चयानें करावें . सपिंडीकरणावांचून षोडशमासिकें करावीं . " हें सांगणें पांच वर्षांनंतरचें समजावें . कारण , जन्मापासून पांच वर्षांपर्यंत मृत असतां संस्काररहित दिलेलें अन्न भक्षण करितो . पांच वर्षांहून अधिक वयाचा बालक जर मृत असेल तर वृषोत्सर्गादिक कर्म करावें . उदकदान करावें . आणि मासिक श्राद्धांचे दिवस प्राप्त असतां षोडशमासिकें करावीं . पायसाचे व गुळाचे अनुक्रमानें पिंड द्यावे . उदकुंभ द्यावा . आणि जीं पददानें व दीपदानें सांगितलीं आहेत तीं सारीं , पांच वर्षांहून अधिक वयाचा उपनयन होण्याच्या पूर्वीं मृत असतां त्याच्या तृप्तीसाठीं करावीं . तसेंच प्राचीनावीती करुन ऋजु दर्भांनीं पांढर्‍या तिळांनीं स्वाहाकारमंत्रानेंच षोडश मासिकें एकोद्दिष्टें करावीं " असें तेथेंच सांगितलेलें आहे . याविषयीं मूल चिंत्य ( अनुपलब्ध ) आहे . वार्षिकादिक श्राद्ध होतच नाहीं . कारण , सपिंडीकरण नसल्यामुळें पितृत्व येत नाहीं . आणि करण्याविषयीं वचनही नाहीं .

दिवोदासीये अव्रतेनिधनंप्राप्तेविप्रादौशूद्रजातिवत् क्रियाः सर्वाः समुद्दिष्टाः सपिंडीकरणंविना उदकंपिंडदानंचकृतचूडेविधीयतइति स्त्रीणांतूद्वाहात्प्रागुदकपिंडदानविकल्पः स्त्रीणांचैकेप्रत्तानामितिगौतमोक्तेः स्त्रीशूद्राश्चसधर्माणइतिवचनाच्छूद्रेप्येवं एतद्वयोनिमित्ताशौचंसर्ववर्णसमं तुल्यंवयसिसर्वेषामतिक्रांतेतथैवचेति व्याघ्रपादोक्तेः यानितु निर्वृत्तचूडकेविप्रेत्रिरात्राच्छुद्धिरिष्यतेइति निवृत्तेक्षत्रियेषड्भिर्वैश्येनवभिरुच्यते शूद्रेत्रिवर्षन्यूनेतुमृतेशुद्धिस्तुपंचभिः अतऊर्ध्वंमृतेशूद्रेद्वादशाहोविधीयते षड्वर्षांतमतीतेतुशूद्रेमासमशौचकमित्यांगिरसादीनि तानिशिष्टविगानान्नादर्तव्यानीतिविज्ञानेश्वरमदनपारिजातादयः तेनैतद्वशाच्छूद्राणांव्यवस्थाप्रागुक्ताहेयैव तुल्यंवयसिसर्वेषामितिदाक्षिणात्यपरं अन्यदेशेकौर्मोक्ताव्यवस्थेतिशुद्धितत्त्वे ।

दिवोदासीयांत - " ब्राह्मणादिक उपनयन झालेलें नसून मृत असतां सपिंडीकरणावांचून इतर सर्व क्रिया शूद्रजातीप्रमाणें - कराव्या . चौल झालें असेल तर उदकदान व पिंडदान करावें . " स्त्रियांना तर विवाहाच्या पूर्वीं उदक व पिंडदान यांचा विकल्प आहे . कारण , " अविवाहित स्त्रियांना उदक व पिंडदान करावें असें कितीएक विद्वान् ‍ सांगतात " असें गौतमवचन आहे . " स्त्रिया व शूद्र समानधर्मी आहेत " या वचनावरुन शूद्रालाही असेंच समजावें . हें वयाच्या निमित्तानें सांगितलेलें आशौच सर्व वर्णांना ( ब्राह्मणादिकांना ) समान आहे . कारण , " वयाच्या निमित्तानें उक्त आशौच सर्वांना तुल्य आहे . तसेंच अतिक्रांत ( दशाहादि मुख्य आशौच दिवस होऊन गेल्यावर समजलेलें ) आशौचही सर्वांना समान आहे " असें व्याघ्रपादाचें वचन आहे . आतां जीं " चौल झालेल्या ब्राह्मणाच्या आशौचाची तीन दिवसांनीं शुद्धि होते . चौल झालेल्या क्षत्रियाची सहा दिवसांनीं आणि वैश्याची नऊ दिवसांनीं शुद्धि होते . तीन वर्षांहून कमी वयाचा शूद्र मृत असतां पांच दिवसांनीं शुद्धि , तीन वर्षांच्या पुढें शूद्र मृत असतां बारा दिवस आशौच करावें . सहा वर्षै होऊन गेलेला शूद्र मृत असतां एक महिना आशौच करावें " अशीं आंगिरसादिकांचीं वचनें तीं शिष्टांनीं निंदित असल्यामुळें अग्राह्य आहेत , असें विज्ञानेश्वर , मदनपारिजात इत्यादिक सांगतात . तेणेंकरुन या वचनांवरुन पूर्वीं सांगितलेली शूद्रांची व्यवस्था त्याज्यच आहे . ‘ तुल्यं वयसि सर्वेषां ’ हें वचन दाक्षिणात्यविषयक आहे . इतर देशांत कूर्मपुराणांतील व्यवस्था समजावी , असें शुद्धितत्त्वग्रंथांत आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP