TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
अविभक्तांना विशेष

तृतीयपरिच्छेद - अविभक्तांना विशेष

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अविभक्तांना विशेष

अविभक्तांना विशेष सांगतो -
अविभक्तानांविशेषमाहपृथ्वीचंद्रोदयेमरीचिः बहवः स्युर्यदापुत्राः पितुरेकत्रवासिनः सर्वेषांतु मतंकृत्वाज्येष्ठेनैवतुयत्कृतं द्रव्येणचाविभक्तेनसर्वैरेवकृतंभवेत् ज्येष्ठस्यकर्तृत्वेपिसर्वेफलभागिनइत्यर्थः तेनयेब्रह्मचर्यपरान्नवर्जनादयः फलसंस्कारास्तेसर्वेषांभवंतीतिसिद्धम् संसृष्टिनामप्येवम् तुल्यत्वात् विभक्तानां विशेषमाहोशनाः नवश्राद्धंसपिंडत्वंश्राद्धान्यपिचषोडश एकेनैवतुकार्याणिसविभक्तधनेष्वपि लघुहारीतः सपिंडीकरणांतानियानिश्राद्धानिषोडश पृथड्नैवसुताः कुर्युः पृथग्द्रव्याअपिक्कचित् ऊर्ध्वंसपिंडीकरणात्सर्वेकुर्युः पृथक् पृथक् मदनरत्ने विभक्तास्तुपृथक्कुर्युः प्रतिसंवत्सरादिकं एकेनैवाविभक्तेषुकृतेसर्वैस्तुतत्कृतम् एतेनाब्दिकादिष्वविभक्तानामनियमइतिवदन्‍शूलपाणिः परास्तः ।

पृथ्वीचंद्रोदयांत मरीचि - “ जेव्हां बापाचे बहुत पुत्र असून ते एकत्र रहात असतील तेव्हां त्या सर्वांचें मत घेऊन ज्येष्ठ पुत्रानेंच समायिक द्रव्यानें जें और्ध्वदेहिक कर्म केलें तें सर्वांनींच केल्यासारखें होतें. ” म्हणजे ज्येष्ठानें केलें असलें तरी त्याचें फळ सर्वांना मिळतें, असा इत्यर्थ आहे, त्यामुळें ब्रह्मचर्य परान्नवर्जन इत्यादिक होणारे संस्कार ते सर्वांना होतात, असें सिद्ध झालें. संसृष्टि ( पूर्वीं विभक्त असून नंतर एकत्र झालेले ) जे त्यांना देखील असेंच समजावें. कारण, ते यांच्यासारखेच आहेत. विभक्तांना विशेष सांगतो उशना - “ भ्राते विभक्त असले तरी नवश्राद्ध ( दशाहांत होणारें ), सपिंडीकरण आणि षोडशश्राद्धें हीं एकानेंच करावीं. ” लघुहारीत - “ पुत्र वेगवेगळे द्रव्य घेऊन राहणारे असले तरी त्यांनीं सपिंडीकरणापर्यंत होणारीं षोडश श्राद्धें कधींही वेगवेगळीं करुं नयेत. सपिंडीकरणानंतरचीं श्राद्धें सर्वांनीं वेगवेगळीं करावीं. ” मदनरत्नांत सांगतो - “ विभक्त असतील त्यांनीं प्रतिसांवत्सरादिक श्राद्ध वेगवेगळें करावें. आणि अविभक्त असतील तर एकानेंच केलें असतां तें सर्वांनीं केल्यासारखें होतें ” असें सांगितल्यामुळें ‘ आब्दिकादिश्राद्धाविषयीं अविभक्तांस - एकानेंच करावें असा नियम नाहीं. असें सांगणारा शूलपाणि परास्त ( खंडित ) झाला.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:20.8630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हुंडारणें

 • न. पाण्याची थडक सोसण्याकरिता घातलेला गडगा , बाघ . - उक्रि . १ पशूने आपल्या डोक्याने पलीकडे लोटणें , झुगारणें , दूर करणें ; हुंदाडणे . २ ( सामान्यतः ) ढकलून देणें , झिडकारणें ; धिक्कारणें . ३ लाथाडणें ; भिरकावणें ; हुंदडा मारणें . [ हिं . हंडाना ] 
RANDOM WORD

Did you know?

Request for Anagha Ashtami Puja vrat Sagrasangit Puja
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.