मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
ब्राह्मणांचें निमंत्रण

तृतीयपरिच्छेद - ब्राह्मणांचें निमंत्रण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां ब्राह्मणांचें निमंत्रण सांगतो -

अथविप्रनिमंत्रणम् ‍ चंद्रिकायांवाराहे वस्त्रशौचादिकर्तव्यंश्वः कर्तास्मीतिजानता स्थानोपलेपनंकृत्वाततोविप्रान्निमंत्रयेत् ‍ दंतकाष्ठंचविसृजेद्ब्रह्मचारीशुचिर्भवेत् ‍ तत्रैवप्रचेताः दक्षिणंचरणंविप्रः सव्यंवैक्षत्रियस्तथा पादावादायवैश्योद्वौशूद्रः प्रणतिपूर्वकम् ‍ बृहस्पतिः उपवीतीततोभूत्वादेवार्थंतुद्विजोत्तमान् ‍ अपसव्येनपित्र्येथस्वयंशिष्योथवासुतः प्रचेताः सवर्णंप्रेषयेदाप्तंद्विजानांतुनिमंत्रणे पृथ्वीचंद्रोदयेस्कांदे राजकार्येनियुक्तस्यबंधनिग्रहवर्तिनः व्यसनेषुचसर्वेषुश्राद्धंविप्रेणकारयेत् ‍ चंद्रिकायांयम्ह अभोज्यंब्राह्मणस्यान्नंवृषलेननिमंत्रितम् ‍ तथैववृषलस्यान्नंब्राह्मणेननिमंत्रितम् ‍ तत्रैवपैठीनसिः सप्तपंचद्वौवाश्रोत्रियान्निमंत्रयेत् ‍ आश्वलायनसूत्रे एकैकमेकैकस्यद्वौद्वौत्रींस्त्रीन्वावृद्धौफलभूयस्त्वं द्वावितिवृद्धिश्राद्धे गौतमः नवावरान् ‍ भोजयेदयुजोबायथोत्साहम् ‍ याज्ञवल्क्यः द्वौदैवेप्राक् ‍ त्रयः पित्र्येउदगेकैकमेववा मातामहानामप्येवंतंत्रंवावैश्वदेविकम् ‍ दीपकलिकायांपराशरः संपत्तावर्थपात्राणामेकैकस्यत्रयस्त्रयः पित्रादेर्ब्राह्मणाः प्रोक्ताश्चत्वारोवैश्वदेविके वृद्धयाज्ञवल्क्यः दशैकंपंचवाविप्रान् ‍ पार्वणेविनियोजयेत् ‍ अत्रवैश्वदेवेद्वौचतुरोवोपवेश्यपित्रादीनामेकैकस्यस्थानेएकंत्रीन् ‍ पंचसप्तनववोपवेशयेदितिनिक्षुण्णोर्थः मनुः द्वौदैवेपितृकृत्येत्रीनेकैकमुभयत्रवा भोजयेत्सुसमृद्धोपिनप्रसज्येतविस्तरे सत् ‍ क्रियांदेशकालौचशौचंब्राह्मणसंपदः पंचैतान्विस्तरोहंतितस्मान्नेहेतविस्तरम् ‍ पृथ्वीचंद्रोदयेशातातपः द्वौदैवेथर्वणौविप्रौप्राड्मुखावुपवेशयेत् ‍ पित्र्येतूदड्मुखांस्त्रींश्चबह्वृचाध्वर्युसामगान् ‍ अत्यशक्तौहेमाद्रौदेवलः एकेनापिहिविप्रेणषट्‍पिंडंश्राद्धमाचरेत् ‍ षडर्घ्यान् ‍ दापयेत्तत्रषडभ्योदद्यात्तथाहविः गोभिलः यद्येकंभोजयेच्छ्राद्धेछंदोगंतत्रभोजयेत् ‍ ऋचोयजूंषिसामानित्रितयंतत्रविद्यते ।

चंद्रिकेंत वाराहांत - " उद्यां श्राद्ध करावयाचें असलें म्हणजे पूर्वदिवशीं वस्त्रें वगैरे धुवून वाळत घालावीं , घर सारवून स्वच्छ करावें , नंतर ब्राह्मणांस निमंत्रण द्यावें . दंतधावन काष्ठानें करुं नये . ब्रह्मचर्य धारण करुन शुद्ध असावें . " तेथेंच प्रचेता - " ब्राह्मणानें ब्राह्मणाच्या दक्षिणपादाला स्पर्श करुन निमंत्रण सांगावें , क्षत्रियानें डाव्या पादाला स्पर्श करुन सांगावें , वैश्यानें दोन्ही पादांना स्पर्श करुन सांगावें आणि शूद्रानें नमस्कारपूर्वक निमंत्रण करावें . " बृहस्पति - " स्वतः श्राद्धकर्त्यानें अथवा शिष्यानें किंवा पुत्रानें उपवीती करुन देवांचे ब्राह्मण सांगावे , प्राचीनावीती करुन पितरांचे ब्राह्मण सांगावे . " प्रचेता - " ब्राह्मणांच्या निमंत्रणाविषयीं आपल्या जातीचा आप्त मनुष्य पाठवावा . " पृथ्वीचंद्रोदयांतस्कांदांत - " राजकार्याविषयीं आज्ञा केलेला , बंदी अटकाव इत्यादिकांत राहिलेला , व इतर संकटांत असलेला त्यानें ब्राह्मणाकडून श्राद्ध करवावें . " चंद्रिकेंत यम - " शूद्रानें निमंत्रण केलें असतां तें ब्राह्मणाचें अन्न अभोज्य ( भोजनाला अयोग्य ) होतें , तसेंच शूद्राचें अन्न ब्राह्मणानें निमंत्रण केलें असतां अभोज्य होतें . " तेथेंच पैठीनसि - " सात , पांच किंवा दोन श्रोत्रिय ( वैदिक ) ब्राह्मण सांगावे . " आश्वलायनसूत्रांत - " एकेक पितराला एकएक , दोनदोन , किंवा तीनतीन सांगावे . जितके अधिक सांगावे तितकें फल अधिक मिळतें . " दोनदोन सांगितले ते वृद्धिश्राद्धांत समजावे . गौतम - " नवांपेक्षां अधिक सांगावे , अथवा जसा आपणास उत्साह असेल त्याप्रमाणें विषम सांगावे . " याज्ञवल्क्य - " देवांविषयीं दोन ब्राह्मण प्राड्मुख बसवावे , आणि पितरांविषयीं तीन ब्राह्मण उदड्मुख बसवावे , अथवा देवांना एक व पितरांना एक असे बसवावे , मातामहपार्वणाला देखील असेच बसवावे . अथवा मातामहपार्वणाविषयीं पृथक् ‍ विश्वेदेव नकोत . तर तंत्रानें विश्वेदेवांची सिद्धि होते . " दीपकलिकेंत पराशर - " द्रव्यें , पात्रें यांची संपत्ति असेल तर एकएक पितराला तीनतीन ब्राह्मण सांगावे , आनि विश्वेदेवांना चार सांगावे . " वृद्ध याज्ञवल्क्य - " पार्वणश्राद्धाचेठायीं अकरा अथवा पांच ब्राह्मण सांगावे . " ह्या सर्व वचनांची कुटाकूट करुन निष्पन्न झालेला अर्थ - वैश्वदेवस्थानीं दोन किंवा चार बसवून पित्रादिकांच्या एकेकाच्या स्थानीं एक , किंवा तीन , अथवा पांच , किंवा सात , अथवा नऊ बसवावे असा आहे . मनु - " सुसंपन्न असला तरी त्यानें देवांच्या स्थानीं दोन व पितरांच्या स्थानीं तीन असे ब्राह्मण सांगावे , अथवा दोहींकडे एक एक सांगावा , विस्ताराच्या प्रसंगांत पडूं नये ; कारण , विस्तार केला असतां उत्तम कर्म होणें , योग्यभूमि , अपराण्हादिकाल , शुद्धता आणि गुणी ब्राह्मण मिळणें ह्या पांचांचा विघात होतो , तस्मात् ‍ विस्तार करुं नये . " पृथ्वीचंद्रोदयांत शातातप - " देवांकडे अथर्वणवेदी दोन ब्राह्मण प्राड्मुख बसवावे . पितरांकडे ऋग्वेदी , यजुर्वेदी व सामवेदी हे तीन ब्राह्मण उदड्मुख बसवावे . " अत्यंत अशक्ति असतां हेमाद्रींत देवल - " एका ब्राह्मणावरही सहा पिंडांचें श्राद्ध करावें , तेथें सहा पितरांना सहा अर्घ्य द्यावे , तसेंच सहा पितरांस अन्ननिवेदन करावें . " गोभिल - " जर श्राद्धाविषयीं एक ब्राह्मण सांगावयाचा असेल तर तेथें छंदोग ब्राह्मण सांगावा ; कारण , ऋचा , यजु आणि सामें हीं तीन त्या छंदोगाचे ठिकाणीं आहेत . "

अत्रवैश्वदेवेविशेषमाहतत्रैववसिष्ठः यद्येकंभोजयेच्छ्राद्धेदैवंतत्रकथंभवेत् ‍ अन्नंपात्रेसमुद्धृत्यसर्वस्यप्रकृतस्यच देवतायतनेकृत्वाततः श्राद्धंसमाचरेत् ‍ प्रास्येदग्नौतदन्नंतुदद्याद्वाब्रह्मचारिणे एतच्चसपिंडीकरणवर्ज्यंज्ञेयम् ‍ नत्वेवैकंसर्वेषांकाममनाद्येइत्याश्वलायनोक्तेः अस्यार्थउक्तोनारायणवृत्तौ आद्यंसपिंडीकरणंतद्वर्ज्येषुश्राद्धेषुकामंत्रयाणामेकंभोजयेत् ‍ सपिंडीकरणेतुनियतंत्रिभिर्भवितव्यमिति अनाद्येपार्वणवर्जितेवा अभोजनेआमहेमश्राद्धादौवा अन्नाभावेइतिव्याख्यांतरंतत्रैवज्ञेयम् ‍ कारिकापि दैवेपित्र्येथवैकैकंसपिंडीकरणंविनेति अत्रैकविप्रेसाग्नेर्विशेषमाहपृथ्वीचंद्रोदयेप्रचेताः एकस्मिन् ‍ ब्राह्मणेदैवेसाग्नेरग्निर्भवेत्सदा अनग्नेः कुशमुष्टिः स्याच्छ्राद्धकर्मणिसर्वतः सर्वथाविप्रालाभेतत्रैवहेमाद्रौचसत्यव्रतः निधायदर्भनिचयमासनेषुसमाहितः प्रैषानुप्रेषसंयुक्तंसर्वंश्राद्धंप्रकल्पयेत् ‍ अत्रानन्यभावात्सत्रेइवऋत्विक्कार्येयजमानविधौनदक्षिणेतिकेचित् ‍ तन्न अदृष्टार्थायादक्षिणायाः प्राप्तेः सर्वंतत्र्त्रिजटेतुभ्यंयच्चश्राद्धमदक्षिणमितिपाद्मात् ‍ विदध्याद्वौत्रमन्यश्चेद्दक्षिणार्धहरोभवेत् ‍ स्वयंचेदुभयंकुर्यादन्यस्मैप्रतिपादयेदितिछंदोगपरिशिष्टाच्च एवंयतिश्राद्धेपि कात्यायनः यज्ञवस्तुनिमुष्टौचस्तंभेदर्भबटौतथा दर्भसंख्यानविहिताविष्टरास्तरणेषुच मातृश्राद्धेतुविप्रालाभे सुवासिन्योपिभोजनीयाइत्याहापरार्केवृद्धवसिष्ठः मातृश्राद्धेतुविप्राणामलाभेपूजयेदपि पतिपुत्रान्विताभव्यायोषितोष्टौकुलोद्भवाइति अष्टावितिवृद्धिश्राद्धविषयं ।

ह्या एकब्राह्मणाच्या श्राद्धांत विश्वेदेवांविषयीं विशेष सांगतो तेथेंच वसिष्ठ - " जर श्राद्धाचेठायीं एक ब्राह्मण सांगावयाचा तर तेथें दैवकर्म कसें होईल ? तें सांगतो - श्राद्धाविषयीं तयार केलेलें जें अन्न असेल त्यांतून सर्वप्रकारचें अन्न एका पात्रावर वाढून देवाच्यापुढें नेऊन ठेवावें , नंतर श्राद्ध यथाविधि करावें , नंतर देवापुढचें तें अन्न अग्नींत टाकावें अथवा ब्रह्मचार्‍याला द्यावें . " हा एका ब्राह्मणावर श्राद्धाचा प्रकार सपिंडीकरणव्यतिरिक्त श्राद्धाविषयीं समजावा . कारण , ‘ नत्वेवैकं सर्वेषां काममनाद्ये ’ असें आश्वलायनसूत्र आहे . ह्या सूत्राचा अर्थ नारायणवृत्तींत सांगितला आहे तो असा - आद्य म्हणजे सपिंडीकरण वांचून इतर श्राद्धांचेठायीं यथेच्छ ( इच्छेप्रमाणें ) तीन पितरांना एक ब्राह्मण सांगावा , सपिंडीकरणांत तर अवश्य तीन ब्राह्मण सांगावे . हा अनाद्यशब्दाचा अर्थ झाला . अथवा अनाद्य म्हणजे पार्वणवर्जित श्राद्ध त्या ठिकाणीं एकही सांगावा . किंवा अनाद्य म्हणजे भोजनरहित अशा आमश्राद्ध - हिरण्यश्राद्धादिकांत एकही सांगावा . अथवा अनाद्य म्हणजे अन्नाभाव असतां एक सांगावा ही अनाद्य शब्दाची इतर व्याख्या तेथें पहावी . कारिकाही " अथवा सपिंडीकरणावांचून इतर श्राद्धांत दैवाविषयीं व पित्र्यकर्माविषयीं एकएक ब्राह्मण सांगावा . " एका ब्राह्मणावर श्राद्ध कर्तव्य असतां साग्निकाला विशेष सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत प्रचेता - " सर्वत्र श्राद्धकर्माचेठायीं एक ब्राह्मण सांगितला असतां साग्निकानें वैश्वदेवस्थानीं अग्नि योजावा आणि निराग्निकानें कुशमुष्टि योजावा . " सर्वथा ब्राह्मण मिळाला नसतां तेथेंच ( पृथ्वीचंद्रोदयांत ) व हेमाद्रींत सत्यव्रत - " समाधान अंतःकरण करुन आसनांचेठायीं दर्भनिचय ( काहीं दर्भ ) ठेवून प्रेष अनुप्रेष ( वचन प्रतिवचन ) यांनीं युक्त असें सर्व श्राद्ध करावें . " हेंच चटश्राद्ध होय . जसें - सत्रयागामध्यें ऋत्विजांचें कार्य यजमानांनीं करावयाचें आहे , व इतर ब्राह्मणांचा अभाव आहे म्हणून त्या ठिकाणीं दक्षिणा नाहीं , त्याप्रमाणें ह्या चटश्राद्धामध्यें इतर ब्राह्मणांचा अभाव असल्यामुळें दक्षिणा नाहीं , असें केचित् ‍ म्हणतात . त्यांचें तें म्हणणें बरोबर नाहीं . कारण , अदृष्ट ( न दिसणार्‍या ) फलासाठीं दक्षिणा पाहिजे असें आहे . " हे त्रिजटे राक्षसि , ज्या श्राद्धांत दक्षिणा नाहीं तें सर्व श्राद्ध तुला प्राप्त होवो . " या पद्मपुराणवचनावरुन दक्षिणारहित श्राद्ध राक्षसीला प्राप्त होतें , असें आहे . आणि " होत्याचें कर्म दुसरा करील तर त्याला अर्धी दक्षिणा मिळेल , आणि स्वतःच यजमान आपलें व होत्याचें अशीं दोन्ही कर्मै करील तर दक्षिणा दुसर्‍या ब्राह्मणाला द्यावी " असें छंदोगपरिशिष्टवचनही आहे . याचप्रमाणें यतींना बसवून श्राद्ध करावयाचे ठिकाणींही समजावें . कात्यायन - " यज्ञाच्या वस्तु , दर्भमुष्टि , कुशस्तंब , दर्भबटु ( चट ), दर्भविष्टर आणि दर्भासन यांचेठिकाणीं दर्भ किती असावे त्यांची संख्या विहित नाहीं . " मातेच्या श्राद्धांत तर ब्राह्मण मिळाले नसतां सुवासिनींनाही भोजन घालावें , असें सांगतो अपरार्कांत वृद्धवसिष्ठ - " मातृश्राद्धांत ब्राह्मण मिळाले नाहींत तर कुलीन पतिपुत्रयुक्त प्रौढ अशा आठ स्त्रियांचीही पूजा करावी . " आठ सांगितल्या ह्या वृद्धिश्राद्धाविषयीं आहेत .

पाद्मेउत्तरखंडे सकृदभ्यर्चितंलिगंशालग्रामशिलांचयः पीठेसंस्थापयित्वातुश्राद्धंचकुरुतेनरः पितरस्तस्यतिष्ठंतिकल्पकोटिशतंदिवि चंद्रिकायांमात्स्ये पठन्निमंत्र्यनियमान् ‍ श्रावयेत् ‍ पैतृकान् ‍ बुधः अक्रोधनैः शौचपरैः सततंब्रह्मचारिभिः भवितव्यंभवद्भिश्चमयाचश्राद्धकारिणा यत्तु मनुः सर्वायासविनिर्मुक्तैः कामक्रोधविवर्जितैः भवितव्यंभवद्भिर्नः श्वोभूतेश्राद्धकर्मणीति तत्पूर्वेद्युर्निमंत्रणपरं नतदहः तत्रैव देवलः असंभवेपरेद्युर्वाब्राह्मणांस्तान्निमंत्रयेत् ‍ अज्ञातीनसमानार्षानयुग्मानात्मशक्तितः कात्यायनः अनिंद्येनामंत्रितोनापक्रामेत्केतनंगृह्यशक्तः ।

पाद्मांत उत्तरखंडांत - " पूजा केलेलें लिंग तसाच शालिग्राम आसनावर ठेवून जो मनुष्य एकवार श्राद्ध करितो त्याचे पितर शेंकडों कल्पकोटीपर्यंत स्वर्गाचेठायीं राहतात . " चंद्रिकेंत मात्स्यांत - " ब्राह्मणांस निमंत्रण करुन पितृसंबंधि नियम स्वतः पठण करुन ब्राह्मणांकडून ऐकवावे " ते नियम - " क्रोधरहित शौचपर सतत ब्रह्मचर्य धारण करणारे असे तुम्हीं व्हा व मी श्राद्धकर्ताही तसाच होतों . " आतां जें मनु सांगतो - " आमच्या उदयीक श्राद्धकर्माचेठायीं तुम्हीं सर्व आयासरहित व कामक्रोधविवर्जित असे व्हा . " तें पूर्वदिवशीं निमंत्रणविषयक आहे , श्राद्धदिवशीं नव्हे . तेथेंच देवल - " पूर्वदिवशीं असंभव असतां श्राद्धदिवशीं ज्ञातिभिन्न समानप्रवररहित अयुग्म ( विषम ) अशा - आपल्या शक्तीप्रमाणें - ब्राह्मणांना निमंत्रण द्यावें . " कात्यायन - " निर्दोष यजमानानें आमंत्रण दिलें व तें घेतल्यावर श्राद्धीं जाण्यास सशक्त असून त्या आमंत्रणाचा त्याग करुं नये . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP