TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
वृद्धिश्राद्ध

तृतीय परिच्छेद - वृद्धिश्राद्ध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


वृद्धिश्राद्ध

आतां वृद्धिश्राद्ध सांगतो -

अथवृद्धिश्राद्धं तन्निमित्तंपृथ्वीचंद्रोदयेब्राह्मे जन्मन्यथोपनयनेविवाहेपुत्रकस्यच पितृन्नांदीमुखान्नामतर्पयेद्विधिपूर्वकं देवव्रतेषुचाधानयज्ञपुंसवनेषुच नवान्नभोजनेस्नानेऊढायाः प्रथमार्तवे देवारामतडागादिप्रतिष्ठासूत्सवेषुच राजाभिषेकेबालान्नभोजनेवृद्धिसंज्ञकान् वनस्थाद्याश्रमंगच्छन्पूर्वेद्युः सद्यएववा पितृन्पूर्वोक्तविधिनातर्पयेत्कर्मसिद्धये विष्णुपुराणे यज्ञोद्वाहप्रतिष्ठासुमेखलाबंधमोक्षयोः पुत्रजन्मवृषोत्सर्गेवृद्धिश्राद्धंसमाचरेत् तत्रैव नामकर्मणिबालानांचूडाकर्मादिकेतथेत्युक्तेर्निष्क्रमान्नप्राशनयोर्नश्राद्धमितिमैथिलाः तन्न पूर्वोक्तविरोधात् नानिष्ट्वेतिनिषेधात् सुतोत्पत्तौतथाश्राद्धेअन्नप्राशनिकेतथेतिराजमार्तंडाच्च यत्तुछंदोगपरिशिष्टं सूर्येद्वोः कर्मणीयेचतयोः श्राद्धंनविद्यतेइति तत्तेषामेवेतिकल्पतरुः बह्वृचकारिकायां स्यादाभ्युदयिकंश्राद्धंवृद्धिपूर्तेषुकर्मसु पुंसः सवनसीमंतचौलोपनयनेष्विह विवाहेचानलाधेयप्रभृतिश्रौतकर्मणि इदंश्राद्धंप्रकुर्वंतिद्विजावृद्धिनिमित्तकं अन्यैः षोडशसंस्कारश्रावण्यादिष्वपीष्यते वाप्याद्युद्यापनादौतुकुर्युः पूर्तनिमित्तकं बोपदेवकालादर्शौ सीमंतव्रतचौलनामकरणान्नप्राशनोपनयनस्नानाधानविवाहयज्ञतनयोत्पत्तिप्रतिष्ठासुच पुंसूत्यावसथप्रवेशनसुताद्यास्यावलोकाश्रमस्वीकारक्षितिपाभिषेकदयिताद्यर्तौचनांदीमुखं यत्तुकामधेनौ जलाशयप्रतिष्ठायांवृषोत्सर्गादिकर्मसु वत्सराभ्यंतरेपित्रोर्वृषस्योत्सर्गकर्मणि वृद्धिश्राद्धंनकुर्वीततदन्यत्रसमाचरेदिति तत्रजलाशयेवृद्धिश्राद्धस्यनिषेधोनतुकर्मांगस्येतिकेचित् अन्येत्वस्यनिर्मूलतामाहुः श्राद्धकौमुद्यांनिर्णयामृतेचमात्स्ये अन्नप्राशेचसीमंतेपुत्रोत्पत्तिनिमित्तके पुंसवेचनिषेकेचनवेवेश्मप्रवेशने देववृक्षजलादीनांप्रतिष्ठायांविशेषतः तीर्थयात्रावृषोत्सर्गेवृद्धिश्राद्धंप्रकीर्तितं इदंचावश्यकं वृद्धौनतर्पितायेवैपितरोगृहमेधिभिः तद्धीनमफलंज्ञेयमासुरोविधिरेवसइतिशातातपोक्तेः अत्रश्राद्धत्रयंसएवाह मातृश्राद्धंतुपूर्वंस्यात्पितृणांतदनंतरं ततोमातामहानांचवृद्धौश्राद्धत्रयंस्मृतम् ।

वृद्धिश्राद्धाचें निमित्त पृथ्वीचंद्रोदयांत ब्राह्मांत - " पुत्राचें जन्म , उपनयन आणि विवाह यांचे ठिकाणीं नांदीमुख पितरांचें विधिपूर्वक तर्पण ( श्राद्ध ) करावें . देवांचीं व्रतें , अग्नीचें आधान , यज्ञ , पुंसवनसंस्कार , नवान्नभोजन , समावर्तनसंस्कार , स्त्रियेला प्रथम रजोदर्शन , देव - आराम - तलाव इत्यादिकांची प्रतिष्ठा , उत्सव , राजाभिषेक , बालांचें अन्नप्राशन यांचे ठायीं वृद्धिसंज्ञक पितरांचें श्राद्ध करावें . वानप्रस्थादिक आश्रम घेणारानें पूर्व दिवशीं किंवा त्याच दिवशीं पितरांचें पूर्वोक्त विधीनें श्राद्ध करावें . " विष्णुपुराणांत - " यज्ञ , विवाह , देवादिकांची प्रतिष्ठा मौंजीबंधन , सोडमुंज , पुत्रजन्म , आणि वृषोत्सर्ग यांचे ठायीं वृद्धिश्राद्ध करावें . " तेथेंच - " बालांच्या नामकर्माचे ठायीं चूडाकर्मादिकांत श्राद्ध करावें " असें सांगितल्यावरुन निष्क्रमण व अन्नप्राशन यांचे ठायीं श्राद्ध करुं नये , असें मैथिल सांगतात , तें बरोबर नाहीं . कारण पूर्वीं सांगितलेल्या ब्राह्मवचनाशीं विरोध येतो . व " पितरांचें यजन केल्यावांचून कोणतेंही कर्म करुं नये " असा शातातपानें निषेध केला आहे . आणि पुत्रोत्पत्तीच्या ठिकाणीं तसेंच अन्नप्राशनांत जें श्राद्ध " असें राजमार्तंडवचनही आहे . आतां जें छंदोगपरिशिष्ट - " सूर्यचंद्रांचीं जीं कर्मै त्यांचेठायीं वृद्धिश्राद्ध नाहीं . " तें त्या छंदोगांनाच समजावें , असें कल्पतरु सांगतो . बह्वृचकारिकेंत - " वृद्धिकर्म आणि पूर्त ( तलावादि ) कर्म यांचे ठायीं आभ्युदयिक श्राद्ध होतें . तें असें - पुंसवन , सीमंत , चौल , उपनयन , विवाह , अग्न्याधान इत्यादि श्रौतकर्मै , यांचे ठायीं हें श्राद्ध वृद्धिनिमित्तक करितात . इतर ब्राह्मण षोडशसंस्कार , श्रावणी इत्यादिकर्म यांचे ठायीं देखील करितात . वापी , कूप , तडाग इत्यादिकांच्या उद्यापनादि कर्मामध्यें पूर्तनिमित्तक करितात . " बोपदेव कालादर्श - " सीमंत , व्रत , चौल , नामकरण , अन्नप्राशन , उपनयन , समावर्तन , आधान , विवाह , यज्ञ , पुत्रोत्पत्ति , देवादिप्रतिष्ठा , पुंसवन , गृहप्रवेश , पुत्रादिकांचें मुखावलोकन , वानप्रस्थादि आश्रम ग्रहण करणें , राजाभिषेक , स्त्रियेला प्रथम रजोदर्शन , इतक्या ठिकाणीं नांदीमुख श्राद्ध करावें . " आतां जें कामधेनुग्रंथांत - " जलाशयाची ( तलावादिकांची ) प्रतिष्ठा , वृषोत्सर्गादि कर्मै , आणि मातापितरांचें प्रथमवर्षाचे आंत वृषोत्सर्गकर्म यांचे ठायीं वृद्धिश्राद्ध करुं नये , इतर ठिकाणीं करावें . " त्यांत जलाशयाचे ठायीं वृद्धिश्राद्धाचा निषेध , कर्मांगश्राद्धाचा निषेध नाहीं , असें केचित् ग्रंथकार म्हणतात . इतरग्रंथकार तर हें वचन निर्मूल म्हणतात . श्राद्धकौमुदींत आणि निर्णयामृतांत मात्स्यांत - " अन्नप्राशन , सीमंत , पुत्रोत्पत्ति , पुंसवन , गर्भाधान , नवीनगृहप्रवेश , देव - वृक्ष - जलाशय - इत्यादिकांचीं प्रतिष्ठा , तीर्थयात्रा आणि वृषोत्सर्ग यांचे ठायीं विशेषेंकरुन वृद्धिश्राद्ध सांगितलें आहे . " हें वृद्धिश्राद्ध आवश्यक आहे . कारण , वृद्धिकर्माचे ठायीं ज्यांनीं पितरांची तृप्ति केली नाहीं , त्यांचें तें कर्म पितृतृप्तिहीन झाल्यामुळें निष्फल जाणावें . श्राद्धरहित तो आसुर विधि होय " असें शातातपवचन आहे . ह्या वृद्धिश्राद्धांत तीन श्राद्धें तोच सांगतो - " मातृत्रयीचें श्राद्ध पूर्वीं , नंतर पितृत्रयीचें , तदनंतर मातामहत्रयीचें श्राद्ध . याप्रमाणें वृद्धिकर्माचे ठायीं तीन श्राद्धें सांगितलीं आहेत .

तत्कालमाहपृथ्वीचंद्रोदयेगार्ग्यः मातृश्राद्धंतुपूर्वेद्युः कर्माहनितुपैतृकम् मातामहंचोत्तरेद्युर्वृद्धौ श्राद्धत्रयंस्मृतं अत्राप्यशक्तौसएव पृथक् दिनेष्वशक्तश्चेदेकस्मिन्पूर्ववासरे श्राद्धत्रयंप्रकुर्वीतवैश्वदेवंतुतांत्रिकमिति वृद्धमनुरपि अलाभेभिन्नकालानांनांदीश्राद्धत्रयंबुधः पूर्वेद्युर्वैप्रकुर्वीतपूर्वाह्णेमातृपूर्वकं अत्रमहत्सुपूर्वेद्युस्तदहरल्पेष्वितिगृह्यपरिशिष्टाव्द्यवस्थाज्ञेया तच्चप्रातरेव पार्वणंचापराह्णेतुप्रातर्वृद्धिनिमित्तकमिति शातातपोक्तेः अत्रप्रातः शब्दः सार्धप्रहरपरः प्रहरोप्यर्धसंयुक्तः प्रातरित्यभिधीयतइतिगार्ग्योक्तेरितिपृथ्वीचंद्रः इदंचपुत्रजन्मातिरिक्तविषयं तदाहात्रिः पूर्वाह्णेवैभवेद्वृद्धिर्विनाजन्मनिमित्तकं पुत्रजन्मनि कुर्वीतश्राद्धंतात्कालिकंबुधइति एतदनियतनिमित्तपरं नियतेषुनिमित्तेषुप्रातर्वृद्धिनिमित्तकं तेषामनियतत्वेतुतदानंतर्यमिष्यतइतिलौगाक्षिस्मृतेः आधानांगंनांदीश्राद्धंत्वपराह्णएव आमश्राद्धंतुपूर्वाह्णेसिद्धान्नेनतुमध्यतः पार्वणंचापराह्णेतुवृद्धिश्राद्धंतथाग्निकमितिनिर्णयामृतेगालवोक्तेः नांदीमुखाह्वयंप्रातराग्निकंत्वपराह्णत इतिविष्णूक्तेश्च ।

त्या तीन श्राद्धांचे काल सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत गार्ग्य - " वृद्धिकर्माच्या पूर्व दिवशीं मातृश्राद्ध करावें . वृद्धिकर्माचे दिवशीं पितृश्राद्ध करावें . कर्माच्या उत्तर दिवशीं मातामहांचें श्राद्ध . याप्रमाणें वृद्धिकर्मांत तीन श्राद्धें सांगितलीं आहेत . " ह्या तीन श्राद्धांविषयीं देखील अशक्ति असतां तोच सांगतो - " वेगवेगळ्या तीन दिवशीं श्राद्धाविषयीं शक्ति नसेल तर वृद्धिकर्माच्या पहिल्या एका दिवशीं तीन श्राद्धें करावीं . त्या ठिकाणीं विश्वदेवांचें तंत्र करावें . " वृद्धमनुही - " वेगवेगळे काल सांपडत नसतील तर तीन्ही नांदीश्राद्धें वृद्धिकर्माच्या पूर्वदिवशीं मातृश्राद्धपूर्वक पूर्वाह्णीं करावीं . " मोठ्या कर्मांमध्यें पूर्वदिवशीं व अल्प कर्मांमध्यें त्याच दिवशीं वृद्धिश्राद्ध करावें " ह्या गृह्यपरिशिष्टाच्या वचनावरुन येथें व्यवस्था जाणावी . तें वृद्धिश्राद्ध प्रातः कालींच करावें . कारण , " पार्वणश्राद्ध अपराह्णीं आणि वृद्धिनिमित्तक श्राद्ध प्रातः कालीं " असें शातातपवचन आहे . ह्या वचनांतील ‘ प्रातः ’ हा शब्द दीड प्रहर कालाचा बोधक आहे . कारण , " दीड प्रहराला प्रातः असें म्हटलें आहे " असें गार्ग्यवचन आहे , म्हणून पृथ्वीचंद्र सांगतो . वृद्धिनिमित्तक प्रातः करावें , हें सांगणें पुत्रजन्मातिरिक्तविषयक आहे . तेंच अत्रि सांगतो - " जन्मनिमित्तावांचून इतर वृद्धिश्राद्ध पूर्वाह्णीं होतें . पुत्र जन्म असतां तत्कालीं वृद्धिश्राद्ध करावें . " वृद्धिश्राद्धाचीं निमित्तें नियत ( ठरींव उत्पन्न ) नसतील तद्विषयक हें वचन आहे . कारण , " नियमित निमित्तांचे ठायीं वृद्धिश्राद्ध प्रातः कालीं करावें . आणि निमित्तें नियमित नसतील तर निमित्तोत्पत्तीच्या नंतर वृद्धिश्राद्ध करावें " असें लौगाक्षि स्मृतिवचन आहे . आधानाचें अंगभूत जें वृद्धिश्राद्ध तें अपराह्णींच करावें . कारण , " आमश्राद्ध पूर्वाह्णीं , सिद्धान्नानें मध्याह्नीं , पार्वणश्राद्ध अपराह्णीं , आणि अग्निनिमित्तक वृद्धिश्राद्ध तेंही अपराह्णीं करावें " असें निर्णयामृतांत गालववचन आहे . " नांदीमुखसंज्ञक श्राद्ध प्रातः कालीं करावें . आणि अग्निनिमित्तक अपराह्णीं करावें " असें विष्णुवचनही आहे .

इदंचमातृपितृमातामहादिक्रमेणनवदैवत्यंकार्यं तत्रमातामहाः सपत्नीकाः वृद्धप्रमातामहप्रमातामहमातामहानांसपत्नीकानामितिपृथ्वीचंद्रोदयेगारुडेगद्यरुपेणपाठात् हेमाद्रौशंखः नांदीमुखेसत्यवसूसंकीर्त्यौवैश्वदेविके वृद्धपराशरः नांदीमुखेभ्योदेवेभ्यः प्रदक्षिणकुशासनं पितृभ्यस्तन्मुखेभ्यश्चप्रदक्षिणमिति स्मृतिः यत्तुवृद्धवसिष्ठः नांदीमुखेविवाहेचप्रपितामहपूर्वकं नामसंकीर्तयेद्विद्वानन्यत्रपितृपूर्वकं यच्च स्मृत्यर्थसारे वृद्धमुख्यास्तुपितरोवृद्धिश्राद्धेषुभुंजतइति यच्चगारुडेव्युत्क्रमप्रतिपादनं तच्चशाखांतरविषयं पितृभ्यः पितामहेभ्यः प्रपितामहेभ्यइतिबह्वृचपरिशिष्टे कात्यायनेनचानुलोम्याम्नानात् पृथ्वीचंद्रोदयेप्येवं यत्तुकेचिद्वृद्धपदंपित्रादिषुप्रयुंजते तन्न अनस्मद्धृद्धशब्दानामरुपाणामगोत्रिणाम् अनाम्नामतिलाद्यैश्चनांदीश्राद्धंतुसव्यवदितिपृथ्वीचंद्रोदयेसंग्रहोक्तेः नचनिषेधादेवविधिः कल्प्यतइतिवाच्यम् प्रौष्ठपदीश्राद्धेप्रपितामहात्परेषांवृद्धपित्रादीनांदेवतात्वान्नांदीश्राद्धत्वसाम्येनेहापितत्प्राप्तौनिषेधात् गोत्रनामादिनिषेधस्तु शुभार्थीप्रथमांतेनवृद्धौसंकल्पमाचरेदित्युपक्रम्यानस्मद्वृद्धशब्दानामित्युक्तेः संकल्पश्राद्धपरः सपिंडकेतुसर्वंभवतीतिप्रयोगपारिजातात् गोत्रनामभिरामंत्र्यपितृभ्योर्घ्यंप्रदापयेदितिछंदोगपरिशिष्टेतद्विधानात् यत्तुब्राह्मे पितापितामहश्चैवतथैवप्रपितामहः त्रयोह्यश्रुमुखाह्येतेपितरः परिकीर्तिताः तेभ्यः पूर्वतरायेचप्रजावंतः सुखैधिताः तेतुनांदीमुखानांदीसमृद्धिरितिकथ्यतइति यच्चमार्कंडेयपुराणे येस्युः पितामहादूर्ध्वंतेतुनांदीमुखाः स्मृताइतितज्जीवत्पित्रादित्रिककर्तृकवृद्धिश्राद्धविषयं तेनतस्येदमावश्यकं यत्तुविष्णुः पितरिपितामहेप्रपितामहेचजीवतिनैवकुर्यादिति तद्दर्शादिविषयमितिकल्पतरुः मदनपारिजातेप्येवं हेमाद्रिस्तुनांदीमुखानांश्राद्धंतुकन्याराशिगतेरवौ पौर्णमास्यांतुकर्तव्यंवराहवचनंयथेति प्रौष्ठपदीश्राद्धैकवाक्यत्वात् तत्रैवपूर्वेषांदेवतात्वमित्याह अत्रसत्यवसूविश्वेदेवावित्युक्तंप्राक् यत्तुशातातपः मातुः श्राद्धंतुयुग्मैः स्याददैवंप्राड्मुखैः पृथगिति तद्भिन्नप्रयोगमातृश्राद्धपरं यच्चमार्कंडेयपुराणे विश्वेदेवविहीनंतुकेचिदिच्छंतिमानवाइति तद्भिन्नप्रयोगमातृश्राद्धभिन्नश्राद्धद्वयेविश्वेदेवविकल्पार्थं प्रयोगैक्येतुदेवनियमइति हेमाद्रिः ।

हें वृद्धिश्राद्ध मातृत्रय , पितृत्रय आणि मातामहत्रय अशा क्रमानें नऊ देवतांचें करावें . त्यांत मातामह सपत्नीक घ्यावे . कारण , " वृद्धप्रमातामह , प्रमातामह , मातामह यांचें सपत्नीकांचें करावें " असें पृथ्वीचंद्रोदयांत गारुडांत गद्य ( फक्किका ) रुपानें सांगितलें आहे . हेमाद्रींत शंख - " नांदीमुखश्राद्धांत विश्वेदेव सत्यवसू म्हणावे . " वृद्धपराशर - " नांदीमुख देवांना कुशासन प्रदक्षिण द्यावें . आणि नांदीमुख पितरांनाही प्रदक्षिणच द्यावें , अशी स्मृति आहे . " आतां जें वृद्धवसिष्ठ - " नांदीमुखांत व विवाहांत प्रपितामहपूर्वक त्रयीच्या नांवाचा उच्चार करावा . इतर ठिकाणीं पितृपूर्वक त्रयीच्या नांवाचा उच्चार करावा . " आणि जें स्मृत्यर्थसारांत - " वृद्धिश्राद्धाचे ठायीं प्रपितामहाच्या पुढचे वृद्धप्रपितामहादिक पितर श्राद्ध सेवन करितात . " आणि जें गरुडपुराणांत - उलट क्रमानें ( प्रपितामह , पितामह , पिता अशा क्रमानें ) पितर घेतले आहेत तें सारें इतरशाखाविषयक आहे . कारण , " पितृभ्यः पितामहेभ्यः प्रपितामहेभ्यः " असें बह्वृचपरिशिष्टांत कात्यायनानेंही अनुलोम ( सरळ ) क्रमानें वृद्धिश्राद्धाच्या देवता सांगितल्या आहेत . पृथ्वीचंद्रोदयांतही असेंच आहे . आतां जें केचित् ग्रंथकार - पिता इत्यादिकांचे ठिकाणीं ‘ वृद्ध ’ या पदाचा प्रयोग करितात तें बरोबर नाहीं . कारण , " अस्मच्छब्द , वृद्धशब्द , वस्वादिरुप , गोत्र , आणि नांव यांनीं विवर्जित अशा पितरांचें तिलादिवर्जित द्रव्यांनीं सव्यानें नांदीश्राद्ध करावें " असें पृथ्वीचंद्रोदयांत संग्रहवचन आहे . आतां या वचनानें नांदीश्राद्धांत ‘ वृद्ध ’ शब्दाचा निषेध केलेला आहे त्यावरुन ‘ वृद्ध ’ या शब्दाचा उच्चार करावा , अशा विधीची कल्पना करुं ; कारण , विधीवांचून निषेध संभवत नाहीं ; असें कोणी म्हणेल तर तसें म्हणूं नये . प्रौष्ठपदीश्राद्धांत प्रपितामहाच्या पूर्वींचे वृद्धप्रपितामहादिक देवता असल्यामुळें नांदीश्राद्धाच्या साम्यानें येथेंही वृद्धशब्दाची प्राप्ति असतां त्याचा निषेध केला आहे . आतां गोत्र , नांव इत्यादिकांचा निषेध केला त्याची प्राप्ति कोठें आहे ? असें म्हणाल तर - " कल्याणार्थी असेल त्यानें वृद्धीच्या ठिकाणीं सांकल्पिक श्राद्ध करावें " याचा उपक्रम करुन ‘ अनस्मद्धृद्धशब्दानां ’ हें वरील निषेधक वचन सांगितल्यामुळें तो गोत्र , नांव इत्यादिनिषेध सांकल्पिकश्राद्धविषयक आहे . सपिंडक वृद्धिश्राद्धांत सर्व ( गोत्रनामादिक ) होतें , असें प्रयोगपारिजातांत सांगितलें आहे . " गोत्र , नांव यांनीं आमंत्रण ( उच्चार ) करुन पितरांना अर्घ्य द्यावें " ह्या छंदोगपरिशिष्टवचनांत गोत्रनांवाचें विधान आहे . आतां जें ब्राह्मांत - " पिता , पितामह , आणि प्रपितामह हे तीन पितर अश्रुमुख आहेत . त्यांच्या पूर्वींचे जे प्रजावंत सुखानें वाढलेले ते नांदीमुख होत . कारण , नांदी म्हणजे समृद्धि म्हटली आहे . " आणि जें मार्कंडेयपुराणांत - " जे पितामहाच्या पूर्वींचे ते नांदीमुख म्हटले आहेत . " अशीं तीं दोन्ही वचनें ज्याची पितृत्रयी जीवंत असेल त्यानें करावयाच्या नांदीश्राद्धविषयक आहेत . तेणेंकरुन त्या जीवत्पित्रादित्रिकाला हें नांदीश्राद्ध ( वृद्धप्रपितामहादिकांचें श्राद्ध ) आवश्यक आहे . आतां जें विष्णु - " पिता , पितामह , व प्रपितामह हे जीवंत असतां श्राद्ध करुं नये " तें दर्शादिक श्राद्धविषयक आहे , असें कल्पतरु सांगतो . मदनपारिजातांतही असेंच आहे . हेमाद्री तर - " सूर्य कन्याराशीस गेला असतां पौर्णमासीस ( प्रौष्ठपदीस ) नांदीमुखपितरांचें श्राद्ध करावें , असें वराहवचन आहे . " या वचनाने सांगितलेल्या प्रौष्ठपदी श्राद्धाशीं वरील ब्राह्मादि वचनाची एकवाक्यता ( एक अन्वय ) केल्यावरुन त्या प्रौष्ठपदी श्राद्धांतच वृद्धप्रपितामहादिक देवता आहेत , असें सांगतो . नांदीश्राद्धांत सत्यवसू विश्वेदेव , असें पूर्वीं श्राद्धदेवताप्रकरणीं सांगितलें आहे . आतां जें शातातप - " मातेचें श्राद्ध तर प्राड्मुख दोन ब्राह्मणांनीं देवरहित पृथक् होतें . " या वचनांत देव नाहींत असें सांगितलें तें वेगळ्या प्रयोगानें मातेचें श्राद्ध करावयाचें त्या पक्षीम समजावें . आणि जें माकडेयपुराणांत - " केचित् मनुष्य वृद्धिश्राद्ध विश्वेदेवरहित इच्छितात " असें सांगितलें तें , तीन्ही पार्वणांचीं तीन श्राद्धें भिन्नभिन्न प्रयोगानें करावयाच्या पक्षीं मातृपार्वणावांचून इतर पार्वणाच्या दोन श्राद्धांत विश्वेदेवांचा विकल्प होण्याकरितां समजावें . एक प्रयोगानें तिघांचें श्राद्ध असतां विश्वेदेव आहेतच , असें हेमाद्रि सांगतो .

एतच्चमातृपूजापूर्वकंकार्यं अकृत्वामातृयागंतुयः श्राद्धंपरिवेषयेत् तस्यक्रोधसमाविष्टाहिंसामिच्छंतिमातरइतिशातातपोक्तेः कौर्मेपि पुष्पैर्धूपैः सनैवेद्यैर्गंधाद्यैर्भूषणैरपि पूजयित्वामातृगणंकुर्याच्छ्राद्धत्रयंबुधइतिछंदोगपरिशिष्टे कर्मादिषुतुसर्वेषुमातरः सगणाधिपाः पूजनीयाः प्रयत्नेनपूजिताः पूजयंतिताः प्रतिमासुचशुद्धासुलिखितावापटादिषु अपिवाक्षतपुंजेषुनैवेद्यैश्चपृथग्विधैः कुड्यलग्नांवसोर्धारांसप्तधारांघृतेनतु कारयेत्पंचधारांवानातिनीचांनचोच्छ्रितां आयुष्याणिचशांत्यर्थंजप्त्वातत्रसमाहितः षडभ्यः पितृभ्यस्तदनुश्राद्धदानमुपक्रमेत् अत्रसर्वेष्वितिग्रहणाद्ग्रहयज्ञतद्विकारेष्वपिनित्यंश्राद्धं नानिष्ट्वातुपितृन्श्राद्धेकर्मकिंचित्समाचरेदिति शातातपोक्तेश्च इयंचवसोर्धारातच्छाखीयानांनियताऽन्येषांत्वनियता बह्वल्पंवास्वगृह्योक्तमित्युक्तेः करणेत्वभ्युदयः यन्नाम्नातंस्वशाखायामित्युक्तेः आयुष्याणिआनोभद्राइत्यदीनि षडभ्यइतिमात्रादित्रिकोपलक्षणमितिपृथ्वीचंद्रोदयः छंदोगानांषडदैवत्यमन्येषांनवदैवत्यमित्याशार्कः ममतुमतं कोकिलमतानुसारिणांमातृमातामहप्रमातामहाइतिमात्रासहैवमातामहश्राद्धकरणात् तद्विषयमिदंषडभ्यइति ।

हें नांदीश्राद्ध पूर्वीं मातांची पूजा करुन नंतर करावें . कारण , " मातांची पूजा केल्यावांचून जो श्राद्ध करील त्याजवर माता क्रोधाविष्ट होऊन त्याचा नाश इच्छितात " असें शातातपवचन आहे . कौर्मांतही - " पुष्पें , धूप , नैवेद्य , गंधादिक उपचार , भूषणें , यांनीं मातृगणाची पूजा करुन नंतर तीन श्राद्धें करावीं . " छंदोगपरिशिष्टांत - " सर्वकर्मांमध्यें गणाधिपसहित मातांची पूजा करावी . कारण , त्यांची पूजा केली असतां त्या आपली पूजा ( उत्कर्ष ) करितात . सुवर्णादिधातूंच्या शुद्ध प्रतिमा , किंवा वस्त्रादिकांवर काढलेल्या आकृति अथवा अक्षतांचे पुंज ( राशि ) यांजवर नानाविध नैवेद्यादिकांनीं मातांची पूजा करावी . भिंतीवर वसोर्धारा करावी , ती अशी - तुपानें सात किंवा पांच धारा फार उंच किंवा फार नीच न होतील अशा कराव्या . मातृगणाच्या पूजासमयीं शांतीसाठीं आयुष्यसूक्तें ( आनोभद्रा इत्यादिक ) जपून नंतर सहा पितरांचें श्राद्ध करण्यास आरंभ करावा . " या छंदोगपरिशिष्टवचनांत ‘ सर्वेषु ’ असें पद आहे , त्यावरुन ग्रहयज्ञ व ग्रहयज्ञाच्या विकृति यांचे ठायीं देखील श्राद्ध नित्य आहे . आणि " श्राद्धाचे ठायीं पितरांची पूजा केल्यावांचून कोणतेंही कर्म करुं नये " असें शातातपवचनही आहे . ही वर सांगितलेली वसोर्धारा छंदोगशाखीयांना नित्य आहे , इतरांना नित्य नाहीं . कारण , " बहुत किंवा अल्प आपल्या गृह्यांत उक्त असेल तें केल्यानें सर्व केल्यासारखें होतें " असें सांगितलें आहे . केलें तर अभ्युदय ( उत्कर्ष ) आहे . कारण " आपल्या शाखेंत उक्त नसून अविरुद्ध असेल तें परशाखीय घ्यावें " असें आहे . वचनांत ‘ सहा पितरांचें श्राद्ध ’ असें म्हटलें तें मात्रादि तीनत्रयींचें उपलक्षण ( बोधक ) आहे , असें पृथ्वीचंद्रोदय सांगतो . छंदोगांचें श्राद्ध सहा देवतांचें , इतरांचें नऊ देवतांचें , असें आशार्क सांगतो . माझें ( कमलाकरभट्टाचें ) तर मत असें आहे कीं , कोकिलमतानुसार्‍यांना ‘ मातृमातामहप्रमातामहाः ’ या प्रकारें मातेसहच मातामहश्राद्ध सांगितलें आहे , तद्विषयक हें सहा पितरांचें श्राद्ध सांगितलें आहे .

मातरस्तत्रैवोक्ताः गौरीपद्माशचीमेधासावित्रीविजयाजया देवसेनास्वधास्वाहामातरोलोकमातरः धृतिः पुष्टिस्तथातुष्टिरात्मदेवतयासह गणेशेनाधिकाह्येतावृद्धौपूज्याश्चतुर्दश मातरोलोकमातरइति सर्वविशेषणं तेनचतुर्दशत्वं यदाषोडशेतिपाठस्तदादेवतांतरं चंद्रिकायांचतुर्विंशतिमतेत्वन्याउक्ताः तिस्रः पूज्याः पितुः पक्षेतिस्रोमातामहेतथा इत्येतामातरः प्रोक्ताः पितुर्मातुः स्वसाष्टमी आसांजीवनेप्रत्यक्षपूजनं मृतानांत्वक्षतपुंजेष्वितिहेमाद्रिः ब्रह्माण्याद्यास्तथासप्तदुर्गाक्षेत्रगणाधिपान् वृद्ध्यादौपूजयित्वातुपश्चान्नांदीमुखान्पितृन् मातृपूर्वान्पितृन्पूज्यततोमातामहानपि मतामहीस्ततः केचिद्युग्माभोज्याद्विजातयइति अत्रद्वादशदैवतस्यदेशाचाराव्द्यवस्था ब्रह्माण्याद्याः ब्राह्मीमाहेश्वरीचैवकौमारीवैष्णवीतथा वाराहीचतथेंद्राणीचामुंडासप्तमातरइत्यपरार्केउक्ताः अत्रचौलादीनांयौगपद्येतंत्रतोक्ताछंदोगपरिशिष्टे गणशः क्रियमाणानांमातृभ्यः पूजनंसकृत् सकृदेवभवेच्छ्राद्धमादौनपृथगादिषु मातृभ्यइतिषष्ठ्यर्थेचतुर्थी गणशः एकानेकपुत्राणांसंस्कारेष्वेकदिनेदेशकालकर्त्रैक्यादित्यर्थः तथा असकृद्यानिकर्माणिक्रियेरन्कर्मकारिभिः प्रतिप्रयोगंनैवस्युर्मातरः सगणाधिपाः कर्मावृत्तावपिकुत्रश्राद्धंकार्यंक्कचनेत्युक्तंतत्रैव आधानेहोमयोश्चैववैश्वदेवेतथैवच बलिकर्मणिदर्शेचपूर्णमासेतथैवच नवयज्ञेचयज्ञज्ञावदंत्येवंमनीषिणः एकमेवभवेच्छ्राद्धमेतेषुनपृथक् पृथक् एतेषुप्रतिप्रयोगंनावर्ततेकिंत्वादौ एतद्भिन्नेसोमयागादौप्रतिप्रयोगमावर्ततेएवश्राद्धमित्यर्थः ।

सर्व कर्मांत मातांची पूजा सांगितली , त्या माता तेथेंच सांगितल्या आहेत . त्या अशा - " गौरी , पद्मा , शची , मेधा , सावित्री , विजया , जया , देवसेना , स्वधा , स्वाहा , धृति , पुष्टि , तुष्टि , आणि आत्मदेवता ह्या चवदा माता म्हणजे लोकमाता यांची गणेशासह वृद्धिकर्मांत पूजा करावी . " श्लोकांत ‘ मातरो लोकमातरः ’ हें पद सर्वांचें विशेषण आहे म्हणून चवदा होतात . जेव्हां ‘ चतुर्दश ’ येथें ‘ षोडश ’ असा पाठ असेल तेव्हां ‘ मातरः लोकमातरः ’ ह्या दोन निराळ्या देवता समजाव्या . चंद्रिकेंत चतुर्विंशतिमतांत तर दुसर्‍या माता सांगितल्या आहेत त्या अशा - " पित्याकडच्या तीन , मातामहाकडच्या तीन , आत्या आणि आठवी मावशी ह्या जीवंत असतां ह्यांची प्रत्यक्ष पूजा करावी . मृत असतां अक्षतपुंजांवर करावी , असें हेमाद्रि सांगतो . अशाच ब्राह्मी इत्यादिक सात माता , दुर्गा , क्षेत्रपाल , गणाधिप ह्यांची वृद्ध्यादिकर्मांत पूजा करुन नंतर नांदीमुख पितरांची पूजा करावी . ती अशी - पूर्वीं मातृत्रयी नंतर पितृत्रयी तदनंतर मातामहत्रयी यांची पूजा करावी . तदनंतर मातामहीत्रयीचीही पूजा करावी . असें केचित् म्हणतात . प्रत्येक त्रयीला दोन दोन ब्राह्मणांना भोजन घालावें . " येथें श्राद्धांत बारा देवता सांगितल्या त्यांची देशाचारावरुन व्यवस्था जाणावी . ब्राह्मी इत्यादिक माता येणेंप्रमाणें - ब्राह्मी , माहेश्वरी , कौमारी , वैष्णवी , वाराही , इंद्राणी , व चामुंडा ह्या सात माता अपरार्कांत उक्त आहेत . चौल इत्यादिक संस्कार एककालीं करावयाचे असतां मातृपूजनाचें व वृद्धिश्राद्धाचें तंत्र ( एकवार अनुष्ठानानें सर्वोपयोगी होणें ) छंदोगपरिशिष्टांत सांगतो - " एक पुत्राचे अनेक संस्कार किंवा अनेक पुत्रांचे अनेक संस्कार एक दिवशीं एक देशीं एक कालीं एककर्त्यानें करावयाचे असतां मातांचें पूजन एकवार आधीं करावें . वृद्धिश्राद्धही एकवार आधीं करावें . प्रत्येक कर्माच्या आधीं नाहीं . " तसेंच " कर्मं करणारे वारंवार जीं कर्मैं करितात त्या ठिकाणीं प्रत्येक प्रयोगाला गणाधिपसहित मातांची पूजा नाहीं . " कर्माची आवृत्ति असतांही कोठें श्राद्ध करावें व कोठें करुं नये , तें तेथेंच सांगितलें आहे , तें असें - " आधान , सायंप्रातर्होम , वैश्वदेव , बलिकर्म , दर्शयाग , पूर्णमासयाग , नवयज्ञ , यांचे ठिकाणीं विद्वान् असें सांगतात कीं , आधीं एकच श्राद्ध होतें , प्रत्येक प्रयोगाला श्राद्धाची आवृत्ति नाहीं . " यावांचून इतर सोमयागादिकांत प्रत्येक प्रयोगाला वृद्धिश्राद्धाची आवृत्ति होतेच असा भाव .

क्कचिदादावपिनिषेधमाहसएव नाष्टकासुभवेच्छ्राद्धंनश्राद्धेश्राद्धमिष्यते नसोष्यंतीजातकर्मप्रोषितागतकर्मसु विवाहादिः कर्मगणोयउक्तोगर्भाधानंशुश्रुमोयस्यचांते विवाहादावेकमेवात्रकुर्याच्छ्राद्धंनादौकर्मणः कर्मणः स्यात् सोष्यंत्याआसन्नप्रसवायाः सोष्यंतीमभ्युक्ष्येत्युक्तंकर्म कात्यायनोक्तस्यश्राद्धस्यपाकप्राधान्यात्तस्यच जातश्राद्धेनदद्यात्तुपक्कान्नंब्राह्मणेष्वपीतिनिषेधान्नजातकर्मणिनांदीश्राद्धमित्याशार्कः आमान्नेनवाकार्यमित्यपितेनैवोक्तं गौडास्तु जातकर्मण्येवनिषेधः पुत्रजन्मनिमित्तकंतुकार्यमेव जन्मन्यथोपनयनेइत्युक्तेः नैमित्तिकमथोवक्ष्येश्राद्धमभ्युदयात्मकं पुत्रजन्मनितत्कार्यंजातकर्मसमंनरैरितिमार्कंडेयपुराणाच्चेत्याहुः हारलतायांश्राद्धविवेकेचैवं एतेनजातकर्मणिकालांतरेश्राद्धनिषेधोनपुत्रजन्मदिनेइतिवाचस्पतिमतंपरास्तं अत्रनिषेककालेइतिवचनात् गर्भाधानेननिषेधः निषेककालेसोमेचसीमंतोन्नयनेतथा ज्ञेयंपुंसवनेश्राद्धंकर्मांगंविधिवत्कृतमिति पारस्करः प्रोषितेति प्रोष्यैत्यगृहानुपतिष्ठतेपुत्रंदृष्ट्वाजपतीतिविहितंकर्म विवाहादिः गर्भाधानांतोयोगृहप्रवेशचतुर्थीकर्मादिकर्मसमूहउक्तः सूत्रकारेण तत्रापिप्रतिकर्मनेत्यर्थः अन्येपिहलाभियोगादयोपवादविषयास्तत्रैवज्ञेयाः अप्रचारान्नोच्यंते ।

क्कचित्स्थलीं आधीं देखील निषेध तोच सांगतो - " अष्टकाश्राद्धांचे ठायीं श्राद्ध होत नाहीं . कारण , श्राद्धाचे ठायीं श्राद्ध इष्ट नाहीं . प्रसूतिकाल जवळ आलेल्या गरोदर स्त्रियेचें कर्म , जातकर्म , प्रवासास जाऊन आल्यावर करावयाचें कर्म इतक्या ठिकाणीं वृद्धिश्राद्ध नाहीं . विवाह आदिकरुन गर्भाधानपर्यंत जीं कर्मै सांगितलीं , त्या कर्मांत विवाहाच्या आधीं एकच श्राद्ध करावें . प्रत्येक कमाच्या आधीं श्राद्ध करुं नये . " सोष्यंती म्हणजे प्रसूतिकाल जवळ असलेली स्त्री , तिचें कर्म तिला अभ्युक्षण करुन वगैरे सांगितलेलें आहे तें समजावें . कात्यायनानें सांगितलेलें श्राद्ध पाकप्रधान असल्यामुळें त्याचा जातकर्माचे ठायीं ब्राह्मणाला देखील पक्कान्न देऊं नये " या वचनाचें निषेध केला असल्यामुळें जातकर्मांत नांदीश्राद्ध नाहीं , असें आशार्क सांगतो . अथवा आमान्नानें करावें , असेंही त्यानेंच ( आशार्कानेंच ) सांगितलें आहे . गौड तर - वरील वचनानें जातकर्माचे ठायींच नांदीश्राद्धाचा निषेध . पुत्रजन्मनिमित्तक करावेंच . कारण , " पुत्रजन्मकालीं , व उपनयनांत श्राद्ध करावें . " असें वचन आहे . आणि " आतां नैमित्तिक आभ्युदयिक श्राद्ध सांगतो , तें श्राद्ध मनुष्यांनीं जातकर्माप्रमाणें पुत्रजन्मसमयीं करावें " असें मार्केंडेयपुराणवचन आहे , असें सांगतात . हारलतेंतश्राद्धविवेकांतही असेंच आहे . येणेंकरुन ( जातकर्मांत श्राद्धनिषेध केल्यानें ) ‘ कालांतरीं जातकर्म करावयाचें असतां तेथें श्राद्धाचा निषेध , पुत्रजन्मदिवशीं श्राद्धनिषेध नाहीं . असें वाचस्पतीचें मत खंडित झालें . " गर्भाधान , सोमयाग , सीमंतोन्नयन , पुंसवन , यांचे ठायीं कर्मांगश्राद्ध यथाविधि करावें " या पारस्करवचनावरुन गर्भाधानांत श्राद्धाचा निषेध नाहीं . वरील वचनांत ‘ प्रोषितागतकर्म ’ याचा अर्थ - ‘ प्रवासांतून घरीं येऊन पुत्राला पाहून जप करावा ’ इत्यादि विहित कर्म समजावें . अन्यही हलाभियोग इत्यादिक श्राद्धाच्या अपवादाचे विषय आहेत , ते तेथेंच पहावे , त्यांचा प्रचार नसल्यामुळें ते येथें सांगत नाहीं .

आतां वृद्धिश्राद्धाविषयीं अधिकारी सांगतों -
अत्राधिकारिणः विष्णुपुराणे जातस्यजातकर्मादिक्रियाकांडमशेषतः पितापुत्रस्यकुर्वीतश्राद्धंचाभ्युदयात्मकं अत्रकेचित् जीवत्पितुः साग्नेरेववृद्धिश्राद्धेधिकारः नतुनिरग्नेः नजीवत्पितृकः कुर्याच्छ्राद्धमग्निमृतेद्विजः येभ्यएवपितादद्यात्तेभ्यः कुर्वीतसाग्निकः पितामहेप्येवमेवकुर्याज्जीवतिसाग्निकः साग्निकोपिन कुर्वीतजीवतिप्रपितामहे इतिचंद्रिकायांसुमंतूक्तेरित्याहुः प्रयोगपारिजातेप्यनाहिताग्निर्नकुर्यादितीदंव्याख्यातं तन्न अनग्निकोपिकुर्वीतजन्मादौवृद्धिकर्मणि येभ्यएवपितादद्यात्तानेवोद्दिश्यतर्पयेदितिहारीतोक्तेः सौमंतवंतुवृद्धिश्राद्धभिन्नश्राद्धपरमित्युक्तंमदनरत्ने श्राद्धपदंपिंडपितृयज्ञपरमितिपृथ्वीचंद्रोदयः निर्णयामृतेतुहारीतीयेऽनग्निकोनाहिताग्निरभिप्रेतः पूर्ववचनेतुसाग्निकः श्रौताग्निः स्मार्ताग्निश्चोच्यते तेनोभयाग्निहीनस्यनेत्युक्तं तन्न पूर्वोक्तदिशागतिसंभवेनग्निपदस्यस्मार्ताग्निपरत्वेमानाभावात् वक्ष्यमाणनित्यानित्यसंयोगविरोधात् पितरोजनकस्येज्यायावद्व्रतमनाहितं समाहितव्रतः पश्चात्स्वान्यजेतपितामहानिति पृथ्वीचंद्रोदयेयमवचोविरोधाच्च अपरार्कोपि समावर्तनेब्रह्मचारीस्वयमेवनांदीश्राद्धंकुर्यादित्याह अतः पूर्वमेवसाधु बोपदेवोप्येवमाह यत्तुमतं जीवत्पितुः पुत्रनामकर्मादौनवृद्धिश्राद्धं हारीतीये जन्मादावित्यादिशब्देनतत्प्राप्तावपि उद्वाहेपुत्रजननेपित्र्येष्ट्यांसौमिकेमखे तीर्थेब्राह्मणआयातेषडेतेजीवतः पितुरितिमैत्रायणीयपरिशिष्टेउद्वाहएवतस्योपसंहारात् एवंयत्रतुसंस्कारादिपदंतदप्युद्वाहादिपरमेवेति तन्न उद्वाहपदस्यस्वविवाहपरत्वस्यापिसंभवात् पुत्रविवाहपरत्वेमानाभावात् नामकर्मणिबालानांचूडाकर्मादिकेतथेत्यादिभिर्नित्यश्राद्धस्यचौलाद्यंगत्वावगतौनित्यानित्यसंयोगविरोधाच्च अतोजन्मादावितिसर्वसंस्कारसंग्रहः तथाकात्यायनः स्वपितृभ्यः पितादद्यात्सुतसंस्कारकर्मसु पिंडानोद्वाहनात्तेषांतस्याभावेतुतत्क्रमात् सुतानांचौलादिसंस्कारेषुपितास्वपितृभ्यः पिंडान्श्राद्धं पिंडदोंऽशहरश्चैषामितिदर्शनात् ओद्वहनाद्विवाहपर्यंतंदद्यात् विवाहश्चप्रथमः नांदीश्राद्धंपिताकुर्यादाद्येपाणिग्रहेबुधः अतऊर्ध्वंप्रकुर्वीतस्वयमेवतुनांदिकमितिस्मृतेः तस्यपितुरभावेतत्क्रमात् असंस्कृतास्तुसंस्कार्याभ्रातृभिः पूर्वसंस्कृतैरितियः कर्तृक्रमः तेनक्रमेणज्येष्ठभ्रात्रादिर्दद्यादिति चंद्रिकादयः हेमाद्रिस्तुतस्यपितुरभावेयः पितृव्यमातुलादिः संस्कुर्यात्सतत्क्रमात्संस्कार्यपितृक्रमाद्दद्यान्नतुस्वपितृभ्यइतिव्याचख्यौ ।विष्णुपुराणांत - " झालेल्या पुत्राचे सारे जातकर्मादि संस्कार आणि अभ्युदयात्मक श्राद्ध ( वृद्धिश्राद्ध ) हे सारे बापानें करावें . " येथें केचित् ग्रंथकार , जीवत्पिता साग्निक असेल तर त्यालाच वृद्धिश्राद्धाविषयीं अधिकार , निरग्निकाला नाहीं . कारण , " अग्नि असल्यावांचून जीवत्पितृकानें श्राद्ध करुं नये , पिता ज्याचें श्राद्ध करीत असेल त्यांचें श्राद्ध साग्निक जीवत्पितृकानें करावें . पितामह जीवंत असतां असेंच श्राद्ध साग्निकानें करावें . प्रपितामह जीवंत असतां साग्निकानें देखील श्राद्ध करुं नये "’ असें चंद्रिकेंत सुमंतुवचन आहे , असें सांगतात . प्रयोगपारिजातांतही ज्यानें अग्नीचें आधान केलें नाहीं त्यानें हें वृद्धिश्राद्ध करुं नये , असें ह्या वरील सुमंतुवचनाचें व्याख्यान केलें आहे , तें बरोबर नाहीं . कारण , " अग्निरहितानें देखील पुत्रजन्म इत्यादि वृद्धिकर्मांत श्राद्ध करावें . ज्या पितरांना बाप श्राद्ध देतो त्यांचाच उद्देश करुन पुत्रानें तृप्ति करावी " असें हारीतवचन आहे . वरील सुमंतूचें वचन तर वृद्धिश्राद्धावांचून इतरश्राद्धविषयक आहे , असें मदनरत्नांत सांगितलें आहे . वरील सुमंतुवचनांत ‘ श्राद्ध ’ या पदानें पिंडपितृयज्ञ समजावा , असें पृथ्वीचंद्रोदय सांगतो . निर्णयामृतांत तर - वरील हारीतवचनांतील ‘ अनग्निक ’ या पदानें ज्यानें अग्नीचें आधान केलें नाहीं तो समजावा . सर्वथा अग्निरहित समजूं नये , अर्थात् स्मार्ताग्निमान् होय . सुमंतूच्या वचनांतील साग्निक शब्दानें श्रौताग्नि व स्मार्ताग्नि समजावा . तेणेंकरुन दोन्ही प्रकारच्या अग्निरहिताला वृद्धिश्राद्ध नाहीं , असें सांगितलें आहे . तें बरोबर नाहीं . कारण , पूर्वोक्त रीतीनें ( सुमंतुवचन वृद्धिश्राद्धव्यतिरिक्तश्राद्धविषयक इत्यादि रीतीनें ) दोन्ही वचनांची गति ( अविरोध ) होत असतां ‘ अनग्निक ’ या पदानें स्मार्ताग्निक घेण्याविषयीं प्रमाण नाहीं . पुढें सांगावयाच्या रीतीनें नित्य व अनित्य अशा वृद्धिश्राद्धांचा एकत्र ठिकाणीं विरोध येईल . आणि निरग्निक जीवत्पितृकाला अधिकार नसेल तर " जोंपर्यंत ब्रह्मचर्यव्रत प्राप्त झालें नसेल तोंपर्यंत जनकाचे पितरांची पूजा करावी . ब्रह्मचर्यव्रत घेतल्यानंतर आपल्या पितामहांचें स्वतः पूजन करावें " असें पृथ्वीचंद्रोदयांत यमाचें वचन आहे त्याचा विरोधही येईल . अपरार्कही - " समावर्तनाचे ठायीं ब्रह्मचार्‍यानें स्वतःच नांदीश्राद्ध करावें , असें सांगतो . या कारणास्त्व पूर्वीं जें सांगितलें ( अनग्निकानेंही करावें ) तेंच चांगलें आहे . बोपदेवानेंही असेंच सांगितलें आहे . आतां जें मत असें आहे कीं , जीवत्पित्याला पुत्राच्या नामकर्मादिकांत वृद्धिश्राद्ध नाहीं . वरील हारीतवचनांत ‘ जन्मादौ ’ येथील आदिपदानें नामकर्मादिकांत तें प्राप्त झालें तरी " विवाह , पुत्रोत्पत्ति , पित्र्यइष्टि , सोमयाग , तीर्थ , आणि विद्वान् श्राद्धयोग्य ब्राह्मणाचें आगमन , हे सहा काल जीवत्पितृकाला श्राद्धाचे आहेत . " ह्या मैत्रपरिशिष्टांत , आदिपदानें प्राप्त झालेल्य संस्कारांचा संकोच करुन फक्त विवाहच घ्यावा , असें सांगितलें आहे . याप्रमाणें ज्या ठिकाणीं संस्कारादिपद आहे तें देखील विवाहादिबोधकच आहे . तें मत बरोबर नाहीं . कारण , वरील परिशिष्टांतील ‘ उद्वाह ’ या पदानें आपला ( कर्त्याचा ) ही विवाह घेतां येईल . पुत्रविवाह घेण्याविषयीं प्रमाण नाहीं , म्हणून वर सांगितलेला उपसंहार ( संकोच ) करितां येत नाहीं . आणि " बालांच्या नामकर्मांत तसेंच चूडाकर्मादिकांत वृद्धिश्राद्ध करावें " इत्यादि वचनांवरुन चौलादिक संस्कारांचें अंगभूत नित्यश्राद्ध आहे , असें बोधन झालें असतां ह्या वचनानें सांगितलेलें नित्य व वरील वचनानें सांगितलेलें अनित्य अशा नित्य व अनित्य वृद्धिश्राद्धांचा एकत्र कर्त्याचे ठायीं विरोधही प्राप्त होईल . म्हणून वरील हारीतवचनांतील ‘ जन्मादौ ’ या पदानें सार्‍या संस्कारांचें ग्रहण होतें . तसेंच कात्यायन सांगतो - " पुत्रांच्या विवाहापर्यंत संस्कारकर्मांमध्यें पित्यानें आपल्या पितरांना पिंड ( श्राद्ध ) द्यावे . पित्याच्या अभावीं त्याच क्रमानें पितरांना इतर कर्त्यानें द्यावे " या कात्यायनवचनाचा अर्थ - पुत्रांच्या चौलादिक संस्कारांत पित्यानें पिंड म्हणजे श्राद्ध द्यावें . ‘ पिंड देणारा व जिंदगी घेणारा इत्यादि मनुवचनांत ‘ पिंड ’ या शब्दाचा अर्थ ‘ श्राद्ध ’ होत आहे . ‘ ओद्वाहनात् ’ म्हणजे विवाहपर्यंत द्यावे , येथें विवाह म्हणजे प्रथम समजावा ; कारण , " पहिल्या विवाहांत नांदीश्राद्ध पित्यानें करावें . प्रथम विवाह झाल्यानंतर नांदीश्राद्ध स्वतःच करावें " अशी स्मृति आहे . ‘ तस्याभावे तु तत्क्रमात् ’ म्हणजे पित्याच्या अभावीं " ज्या भ्रात्यांचा संस्कार झाला नसेल त्यांचा संस्कार , पूर्वीं संस्कार केलेल्या भ्रात्यांनीं करावा . " असा जो कर्त्याचा क्रम त्या क्रमानें ज्येष्ठ भ्राता इत्यादिकांनीं नांदीश्राद्ध द्यावें असें चंद्रिका इत्यादि ग्रंथकार सांगतात . हेमाद्रि तर - पित्याच्या अभावीं पितृव्य , मातुल इत्यादिक जो कोणी संस्कार करील त्यानें त्या क्रमानें म्हणजे संस्कार करावयाचा जो माणवक ( मुलगा ) त्याच्या पितृक्रमानें द्यावें . कर्त्यानें आपल्या पितरांना देऊं नये . असें व्याख्यात करिता झाला .

समावर्तनस्यापिविवाहप्राचीनसुतसंस्कारत्वात्पितैवनांदीश्राद्धंकुर्यात् तदभावेज्येष्ठभ्रात्रादिः तदभावेस्वयमेवकुर्यात् उपनयनेनकर्माधिकारस्यजातत्वात् एवमाद्यविवाहेपीतिपृथ्वीचंद्रोदयचंद्रिकादयः मदनरत्नेप्येवं यदातुपितरिसंन्यस्तेप्रोषितेपतितेवाधर्मार्थंतत्पुत्रमन्यः संस्कुर्यात्तदा संस्कार्यपितुः पित्रादिभ्योदद्यात् पितरोजनकस्येज्यायावद्व्रतमनाहितं समाहितव्रतः पश्चात्स्वान्यजेतपितामहानितिपृथ्वीचंद्रोदयेयमोक्तेः जीवत्पितृकस्यविशेषमाहकात्यायनः वृद्धौतीर्थेचसंन्यस्तेतातेचपतितेसति येभ्यएवपितादद्यात्तेभ्योदद्यात्स्वयंसुतइति यत्तुबह्वृचपरिशिष्टे जीवत्पितासुतसंस्कारेषुमातृमातामहयोः कुर्यात् तस्यां जीवत्यांमातामहस्यैवेतितत्तच्छाखीयानामेवेतिदिक् स्मृतितत्त्वादिगौडग्रंथेषुतु जीवन्मातृकः पितामह्यादिभ्योवृद्धौदद्यात् जीवंतमतिदद्याद्वाप्रेतायान्नोदकेद्विजइतिकात्यायनोक्तेः जीवेतस्मिन्सुताः कुर्युः पितामह्यासहैवतु तस्यांचैवतुजीवत्यांतस्याः श्वश्वेतिनिश्चयइतिहारीतोक्तेश्चेत्युक्तं तस्मिन्भर्तरि दाक्षिणात्यास्तुपूर्वोक्तस्यसपिंडीकरणादिविषयत्वात् जीवेत्तुयदिवर्गाद्यस्तंवर्गंतुपरित्यजेदितिवचनात्तद्वर्गस्यलोपएवेत्याहुः यत्तुचंद्रिकायांपारस्करः निषेककालेसोमेचसीमंतोन्नयनेतथा ज्ञेयंपुंसवनेश्राद्धंकर्मांगंविधिवच्चतदिति तत्रगर्भाधानादौकर्मांगं जातकर्मादावुक्तंतुवृद्धिश्राद्धंपृथगेव विधिवदित्युक्तेः गौडनिबंधे मात्स्ये अन्नप्राशेचसीमंतेपुत्रोत्पत्तिनिमित्तके पुंसवेचनिषेकेचनववेश्मप्रवेशने वेदव्रतेजलादीनांप्रतिष्ठायांतथैवच तीर्थयात्रावृषोत्सर्गेवृद्धिश्राद्धंप्रकीर्तितं अत्रभूतनिमित्तानांवृद्धित्वम् भाविनिमित्तानामंगत्वं वृद्धिशब्दस्तद्धर्मातिदेशार्थइतिगौडाः अन्येतुनिषेकादौकर्मांगवृद्धिश्राद्धयोः समुच्चयमाहुः नांदीश्राद्धसंज्ञातूभयानुगता ।

समावर्तन देखील विवाहाच्या पूर्वीचा पुत्राचा संस्कार असल्यामुळें पित्यानेंच नांदीश्राद्ध करावें , त्याच्या अभावीं ज्येष्ठ भ्राता इत्यादिकानें , ज्येष्ठ भ्राता इत्यादिकांच्या अभावीं स्वतःच मुलानें नांदीश्राद्ध करावें . कारण , उपनयन झाल्यानें कर्माचा अधिकार त्यास झालेला आहे . याप्रमाणें पहिल्या विवाहांतही समजावें , असें पृथ्वीचंद्रोदय , चंद्रिका इत्यादि ग्रंथकार सांगतात . मदनरत्नांतही असेंच आहे . जेव्हां पित्यानें संन्यास घेतला असेल किंवा पिता परदेशीं गेला असेल अथवा पतित असेल तेव्हां त्याच्या पुत्राचा संस्कार धर्मार्थ इतर कोणी करील त्या वेळीं संस्कार करावयाच्या मुलाच्या पित्याचा पिता इत्यादिकांस संस्कारकर्त्यानें नांदीश्राद्ध द्यावें . कारण , " जोंपर्यंत ब्रह्मचर्यव्रत प्राप्त झालें नसेल तोंपर्यंत जनकाच्या ( पित्याच्या ) पितरांची संस्कारकर्त्यानें पूजा करावी . ब्रह्मचर्यव्रत प्राप्त झाल्यानंतर त्यानें स्वतः आपल्या पितामहादिकांचें पूजन करावें . " असें पृथ्वीचंद्रोदयांत यमवचन आहे . जिवत्पितृकाला विशेष सांगतो कात्यायन - " वृद्धिश्राद्धांत , तीर्थश्राद्धांत , बाप संन्यास घेतलेला किंवा पतित असतां ज्या पितरांना पिता श्राद्ध देईल त्या पितरांना पुत्रानें स्वतः श्राद्ध द्यावें . " आतां जें बह्वृचपरिशिष्टांत - " जिवत्पितृकानें पुत्राच्या संस्कारांत माता व मातामह यांना श्राद्ध द्यावें . माता जीवंत असतां मातामहालाच श्राद्ध द्यावें . " असें सांगितलें , तें त्या बह्वृचशाखीयांनाच समजावें . ही दिशा आहे . स्मृतितत्त्व इत्यादिक गौडग्रंथांत तर - जीवन्मातृकानें पितामही इत्यादिकांना वृद्धिश्राद्ध द्यावें . कारण , " जीवंत असलेल्यास सोडून प्रेताला अन्न व उदक द्यावें . " असें कात्यायनवचन आहे . आणि भर्ता जीवंत असतां पुत्रांनीं पितामहीसह श्राद्ध द्यावें . पितामही जीवंत असतां तिच्या सासूसह श्राद्ध द्यावें " असें हारीतवचनही आहे , असें सांगितलें आहे . दाक्षिणात्य तर - पूर्वोक्त वचन सपिंडीकरणादिविषयक असल्यामुळें " ज्या वर्गाचा ( त्रयीचा ) पहिला जीवंत असेल त्या वर्गाचा त्याग करावा " या वचनावरुन त्या वर्गाचा लोपच ( अभावच ) होतो असें सांगतात . आतां जें चंद्रिकेंत पारस्कर - गर्भाधान , सोमयोग , सीमंतोन्नयन , आणि पुंसवन यांचे ठायीं विधीप्रमाणें तें कर्मांग श्राद्ध समजावें " तें गर्भाधानादिकांत कर्मांग आणि जातकर्मादिकांत सांगितलेलें वृद्धिश्राद्ध तर वेगळेंच आहे . कारण , वचनांत ‘ विधिवत् ’ विधीप्रमाणें असें सांगितलें आहे . गौडनिबंधांत मात्स्यांत - " अन्नप्राशन , सीमंत , पुत्रोत्पत्तिनिमित्त , पुंसवन , गर्भाधान , नव्या गृहांत प्रवेश , वेदांचीं व्रतें , उदकादिकांची ( तलाव इत्यादिकांची ) प्रतिष्ठा , तीर्थयात्रा , आणि वृषोत्सर्ग इतक्या ठिकाणीं वृद्धिश्राद्ध सांगितलें आहे . " यामध्यें असें समजावें कीं , वृद्धिश्राद्धाचीं निमित्तें पूर्वीं झालेलीं असतील तेथें वृद्धिश्राद्ध , आणि निमित्तें पुढें व्हावयाचीं असतील तेथें कर्मांगश्राद्ध होय . सर्वांना वृद्धिश्राद्ध म्हटलें आहे तें त्या वृद्धिश्राद्धाच्या धर्मांचा अतिदेश करण्यासाठीं समजावें , असें गौड सांगतात . इतर ग्रंथकार तर - गर्भाधानादिकांत कर्मांगश्राद्ध आणि वृद्धिश्राद्ध हीं दोन्ही करावीं , असें सांगतात . नांदीश्राद्ध ही संज्ञा ( नांव ) तर दोघांनाही आहे .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:23.3500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

electrolytic corrosion

 • विद्युतापघटनी संक्षरण 
 • विद्युत अपघटनी संक्षरण 
RANDOM WORD

Did you know?

बांस की लकड़ी
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.