मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
अंत्यकर्म

तृतीय परिच्छेद - अंत्यकर्म

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां अंत्यकर्म सांगतो -

एवंसापवादेआशौचेउक्तेप्रतिशाखंभिन्नेप्यंत्यकर्मणिसाधारणंकिंचिदुच्यते तत्राधिकारिणः प्रागुक्ताः सर्वाभावेधर्मपुत्रोवाकार्यः अपुत्रेणसुतः कार्योयादृक्तादृक्प्रयत्नतः पिंडोदकक्रियाहेतोर्नामसंकीर्तनायचेति व्यासवचनात् गृह्यपरिशिष्टे असगोत्रः सगोत्रोवायदिस्त्रींयदिवापुमान् प्रथमेहनियोदद्यात्सदशाहंसमापयेत् दद्यात्पिंडमितिशेषः भविष्ये यत्राद्योदीयतेपिंडस्तत्रसर्वंसमापयेत् ब्राह्मेपि प्रथमेहनियोदद्यात्प्रेतायान्नंसमाहितः अन्नंनवसुचान्येषुसएवप्रददात्यपि विज्ञानेश्वरादयस्तु केचित्तु अग्निंदद्यादितिव्याचक्षते सगोत्रोवासगोत्रोवायोग्निंदद्यात्सखेनरः सोपिकुर्यान्नवश्राद्धंशुध्येत्तुदशमेहनीतिदिवोदासीये वचनाच्च ।

याप्रमाणें आशौच व आशौचाचा अपवाद सांगितला . अंत्यकर्म प्रत्येक शाखेचें वेगवेगळें आहे तरी त्याविषयीं सर्वसाधारण कर्म किंचित् सांगतों - त्या अंत्यकर्माविषयीं अधिकारी पूर्वीं श्राद्धप्रकरणीं सांगितले आहेत . अथवा सर्वांच्या अभावीं धर्मपुत्र करावा . कारण , " निपुत्रिकानें पिंड - उदकदान इत्यादि क्रियेसाठीं व आपलें नांव सांगण्यासाठीं प्रयत्नानें जसा मिळेल तसा पुत्र करावा " असें व्यासवचन आहे . गृह्यपरिशिष्टांत - " असगोत्री किंवा सगोत्री , स्त्री किंवा पुरुष जो प्रथम दिवशीं पिंड देईल त्यानें दहा दिवस पिंड द्यावे . " भविष्यांत - " ज्या ठिकाणीं पहिला पिंड दिला असेल त्या ठिकाणीं सारे पिंड समाप्त करावे . " ब्राह्मांतही - " प्रेताला पहिल्या दिवशीं जो अन्न देईल तोच इतर नऊ दिवसही अन्न देतो . " विज्ञानेश्वर इत्यादिक तर - केचित् तर वरील गृह्यपरिशिष्टवचनांत ‘ जो अग्नि देईल त्यानें दशाह कर्म समाप्त करावें ’ असें व्याख्यान करितात . आणि " सगोत्र किंवा भिन्नगोत्री जो मनुष्य अग्नि देईल त्यानेंच नवश्राद्ध करावें , व तो दहाव्या दिवशीं शुद्ध होईल " असें दिवोदास ग्रंथांत वचनही आहे .

तत्रैव दृष्ट्वास्थानस्थमासन्नधर्मोन्मीलितलोचनं भूमिष्ठंपितरंपुत्रोयदिदानंप्रदापयेत् तद्विशिष्टंगयाश्राद्धादश्वमेधशतादपि तानियथा मोक्षंदेहिह्रषीकेशमोक्षंदेहिजनार्दन मोक्षधेनुप्रदानेनमुकुंदः प्रीयतांममेति मोक्षधेनुमंत्रः ऐहिकामुष्मिकंयच्चसप्तजन्मार्जितंऋणं तत्सर्वंशुद्धिमायातुगामेतांददतोममेति ऋणधेनोः आजन्मोपार्जितंपापंमनोवाक्कायकर्मभिः तत्सर्वंनाशमायातुगोप्रदानेनकेशवेति पापधेनोः भारते शुक्लपक्षे दिवाभूमौगंगायांचोत्तरायणे धन्यास्तातमरिष्यंतिह्रदयस्थेजनार्दने हेमाद्रौवाराहे व्यतीपातोथसंक्रांतिस्तथैवग्रहणंरवेः पुण्यकालास्तदासर्वेयदामृत्युरुपस्थितः व्यासः आसन्नमृत्युनादेयागौः सवत्सातुपूर्ववत् तदभावेतुगौरेवनरकोत्तारणायवै तदायदिनशक्नोतिदातुंवैतरिणींतुगां शक्तोन्यउक्तगांदत्वादद्याच्छ्रेयोमृतस्यतु ।

तेथेंच सांगतो - " आसन्न मरण झालेला , अर्धे डोळे उघडणारा , भूमीवर असलेला अशा पित्याला पाहून जर त्याचा पुत्र दान देईल तर तें दान गयाश्राद्धाहून व शंभर अश्वमेधांहूनही अधिक आहे . " तीं दानें अशीं - ‘ मोक्षं देहि ह्रषीकेश मोक्षं देहि जनार्दन । मोक्षधेनुप्रदानेन मुकुंदः प्रीयतां मम ’ या मंत्रानें मोक्षधेनुदान . ‘ ऐहिकामुष्मिकं यच्च सप्तजन्मार्जितं ऋणम् । तत्सर्वं शुद्धिमायातु गामेतां ददतो मम ’ या मंत्रानें ऋणघेनुदान . ‘ आजन्मोपार्जितं पापं मनोवाक्कायकर्मभिः । तत्सर्वं नाशमायातु गोप्रदानेन केशव ’ या मंत्रानें पापधेनुदान . भारतांत " शुक्लपक्षांत दिवसा भूमीवर गंगातीरीं उत्तरायणांत भगवान् जनार्दन ह्रदयांत ध्यान केलेला असतां जे मरतात ते धन्य ( पुण्यवंत ) होत . " हेमाद्रींत वाराहांत - " ज्या वेळीं मृत्यु प्राप्त होईल त्या वेळीं व्यतीपात , संक्रांति , चंद्रसूर्यांचें ग्रहण इत्यादि जे पुण्यकाल ते सारे आहेत , असें समजावें . " व्यास - " ज्याला मृत्यु समीप आला असेल त्यानें सवत्सगाईचें दान पूर्वींप्रमाणें ( चांगल्या प्रकृतींत करावयाचें तसें ) करावें . सवत्सगाईच्या अभावीं नरकापासून तरण्याकरितां वैतरणीगाईच द्यावी . त्या वेळीं जर वैतरणीगाई देण्याविषयीं तो असमर्थ असेल तर दुसर्‍यानें उक्त गाई देऊन त्याचें श्रेय मृताला द्यावें . "

मदनरत्नेजातूकर्ण्यः उत्क्रांत्यादीनिदानानिदशदद्यान्मृतस्यतु गोभूतिलहिरण्याज्यवासोधान्यगुडानिच रौप्यंलवणमित्याहुर्दशदानान्यनुक्रमात् एतानिदशदानानिनराणांमृत्युजन्मनोः कुर्यादभ्युदयार्थंतुप्रेतेपिहिपरत्रवै ब्राह्मे ताम्रपात्रंतिलैः पूर्णंप्रस्थमात्रैर्द्विजायतु सहिरण्य़ंचयोदद्यात् श्रद्धावित्तानुसारतः सर्वपापविशुद्धात्मालभतेगतिमुत्तमां उत्क्रांतिवैतरिण्यौचदशदानानिचैवहि प्रेतेपिकृत्वातंप्रेतंशवधर्मेणदाहयेत् तत्रैवपरिशिष्टे म्रियमाणस्यकर्णेतुपुण्यमंत्रान्जपेत्ततः क्रियानिबंधेगारुडेत्वष्टौदानान्युक्तानि तुलसीसन्निधौकृत्वाशालग्रामशिलांतथा तिलालोहंहिरण्यंचकार्पासंलवणंतथा सप्तधान्यंक्षितिर्गावएकैकंपावनंस्मृतमिति दशदानवैतरिणीधेनूत्क्रांतिधेनुदानादिभट्टकृतांत्येष्टिपद्धतौज्ञेयं कर्तांत्यकर्माधिकारार्थंत्रीन्कृच्छ्रान्कुर्यादितितत्रैवोक्तं अत्रदेवयज्ञिकेनमुमूर्षोर्मधुपर्कदानमुक्तं तदुक्तंवाराहे दृष्ट्वासुविह्वलंह्येनंयममार्गानुसारिणं प्रयाणकालेतुनरोमंत्रेणविधिपूर्वकं मधुपर्कंत्वरन्गृह्य इमंमंत्रमुदाहरेत् ॐगृहाणचेमंमधुपर्कमाद्यंसंसारनाशनकरंह्यमृतेनतुल्यं नारायणेनरचितंभगवत्प्रियाणांदाहेचशांतिकरणंसुरलोकपूज्यं अनेनैवतुमंत्रेणदद्याच्चमधुपर्ककम् नरस्यमृत्युकालेतुपरलोकसुखावहम् ।

मदनरत्नांत जातूकर्ण्य - " मृताचीं उत्क्रांतिधेनु इत्यादिक दशदानें करावीं . तीं अशीं - गाई , भूमि , तिल , हिरण्य , आज्य , वस्त्र , धान्य , गुळ , रौप्य , लवण , हीं अनुक्रमें दशदानें , असें सांगतात . हीं दशदानें मनुष्यांच्या मरणसमयीं व जन्मसमयीं करावीं . आणि मृत झाला असतां ही परलोकीं अभ्युदयाकरितां करावीं . " ब्राह्मांत - " जो मनुष्य श्रद्धेनें द्रव्यानुसारेंकरुन ताम्रपात्र घेऊन तें प्रस्थपरिमित तिलांनीं पूर्ण भरुन सुवर्णसहित ब्राह्मणाला देईल तो सर्व पातकांनीं रहित ( शुद्ध ) होऊन उत्तम गतीस जातो . उत्क्रांतिधेनु , वैतरणी आणि दश दानें मृत झाल्यावर देखील करुन नंतर त्या प्रेताचा शवधर्मानें यथाविधि दाह करावा . " तेथेंच परिशिष्टांत - " मरणाराचे कानामध्यें पुण्यकारक मंत्रांचा जप करावा . " क्रियानिबंधांत गारुडांत तर आठ दानें सांगितलीं आहेत . तुलसीसंनिध शालग्राम शिला करुन तिळ , लोह , हिरण्य , कापूस , लवण , सप्त धान्यें , भूमि , गाई हें एक एक दान पावन करणारें आहे . " दशदानें , वैतरणीधेनुदान , उत्क्रांतिधेनुदान इत्यादि भट्टांनीं केलेल्या अंत्येष्टिपद्धतींतून जाणावीं . कर्त्यानें अंत्यकर्माधिकारासाठीं तीन कृच्छ्र करावे , असें तेथेंच ( अंत्येष्टिपद्धतींत ) सांगितलें आहे . एथें मुमूर्षूला ( मरणाराला ) देवयाज्ञिकानें मधुपर्कदान सांगितलें आहे , तें वाराहांत सांगतो - " यममार्गास अनुसरणारा विव्हल झालेला असा मनुष्य पाहून त्याच्या मनुष्यानें प्रयाणकालीं मंत्रानें यथाविधि त्वरेनें मधुपर्क घेऊन पुढें सांगावयाचा मंत्र म्हणावा . ‘ गृहाण चेमं मधुपर्कमाद्यं० सुरलोकपूज्यं ’ ह्या मंत्रानें मनुष्याच्या मृत्युकालीं परलोकीं सुखकर असा मधुपर्क द्यावा . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP