TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
सांतपन

तृतीय परिच्छेद - सांतपन

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


सांतपन

आतां सांतपन सांगतो -

अथसांतपनम् याज्ञवल्क्यः कुशोदकंतुगोः क्षीरंदधिमूत्रंशकृद् घृतम् । प्राश्यापरेह्न्यपवसेत्कृच्छ्रं सांतपनंचरन्नित्यपरार्कपाठः मिताक्षरापाठस्तु गोमूत्रंगोमयंक्षीरंदधिसर्पिः कुशोदकमिति गोमूत्रादीनिषडप्येकीकृत्यपीत्वाऽऽहारांतररहितः संस्तिष्ठेत् परेद्युरुपवसेदितिदिनद्वयसाध्यः कृच्छ्रः याज्ञवल्क्येनोत्तरश्लोकेगोमयादीनांपृथक् पृथक् षट् सुदिनेषुप्राशनविधानादत्रमिलितानामेकदिनएवप्राशनंगम्यते पराशरः गोमूत्रंगोमयंक्षीरंदधिसर्पिः कुशोदकं । निर्दिष्टंपंचगव्यंतुपवित्रंकायशोधनमिति । गोमूत्रंताम्रवर्णायाः श्वेतायाश्चापि गोमयम् । पयः कांचनवर्णायानीलायाश्चतथादधि । घृतंचकृष्णवर्णायाः सर्वंकापिलमेववा । अलाभेसर्ववर्णानांपंचगव्येष्वयंविधिः । गोमूत्रेमाषकास्त्वष्टौगोमयस्यतुषोडश । क्षीरस्यद्वादशप्रोक्तादध्नस्तुदशकीर्तिताः । गोमूत्रवद् घृतस्येष्टास्तदर्धंतुकुशोदकम् । गायत्र्यादायगोमूत्रंगंधद्वारेतिगोमयम् ‍ । आप्यायस्वेतिचक्षीरंदधिक्राव्णेतिवैदधि । तेजोसिशुक्रमित्याज्यंदेवस्यत्वाकुशोदकम् । पंचगव्यमृचापूतंहोमयेदग्निसंनिधौ । सप्तपत्रास्तुयेदर्भाअच्छिन्नाग्राः शुकत्विषः । एतैरुद्धृत्यहोतव्यंपंचगव्यंयथाविधि । इरावतीइदंविष्णुर्मानस्तोकेचशंवती । एताभिश्चैवहोतव्यंहुतशेषंपिबेद्दिजः । प्रणवेनसमालोड्यप्रणवेनाभिमंत्र्यच । प्रणवेनसमुद्धृत्यतत्पिबेत्प्रणवेनतु । मध्यमेनपलाशस्यपद्मपत्रेणवापिबेत् स्वर्णपात्रेणताम्रेणब्रह्मतीर्थेनवापुनः । यत्त्वगस्थिगतं पापंदेहेतिष्ठतिमानवे । ब्रह्मकूर्चोपवासस्तुदहत्यग्निरिवेंधनमिति । याज्ञवल्क्योक्तदिनद्वयसाध्यसांतपनमेवब्रह्मकूर्चइतिब्रह्मकूर्चोपवासइतिचाभिधीयते । विज्ञानेश्वरस्तुपूर्वेद्युरुपोष्यापरेद्युरुक्तरीत्यापंचगव्यप्राशनं ब्रह्मकूर्चइतिमन्यते ।

याज्ञवल्क्य - " कुशोदक , गाईचें दूध , गोदधि , गोमूत्र , गोमय , गोघृत हीं प्राशन करुन दुसर्‍या दिवशीं उपवास करावा , म्हणजे सांतपन कृच्छ्र होतो . " असा अपरार्कग्रंथांत पाठ आहे . मिताक्षरेचा पाठ तर गोमूत्र , गोमय , क्षीर , दधि , घृत , आणि कुशोदक " असा आहे . एक दिवशीं गोमूत्रादिक सहाही द्रव्यें एकत्र करुन प्यावीं , आणि दुसरा कोणताही आहार केल्यावांचून त्या दिवशीं राहावें . दुसर्‍या दिवशीं उपवास करावा . याप्रमाणें दोन दिवसांनीं साध्य होणारा हा कृच्छ्र आहे . याज्ञवल्क्यानें पुढच्या श्लोकांत ( महासांतपनलक्षणांत ) गोमयादिक सहा द्रव्यें वेगवेगळीं सहा दिवस प्राशन करण्यास सांगितल्यामुळें या ठिकाणीं एकत्र मिळवून एक दिवसच प्राशन करावीं , असें सुचविल्यासारखें होतें . पराशर - " गोमूत्र , गोमय , क्षीर , दधि , घृत , कुशोदक हें पंचगव्य म्हटलें आहे . हें पवित्र असून शरीर शुद्ध करणारें आहे . ताम्रवर्ण गाईचें गोमूत्र , पांढर्‍या गाईचें गोमय , पिंवळ्या गाईचें दूध , निळ्या गाईचें दहीं , काळ्या गाईचें घृत घ्यावें . अशा वर्णाच्या गाईचें हे पदार्थ न मिळतील तर सारे पदार्थ कपिल गाईचे घ्यावे . गोमूत्र आठ मासे घ्यावें , गोमय १६ मासे घ्यावें , दूध १२ मासे घ्यावें , दहीं १० मासे घ्यावें , घृत ८ मासे घ्यावें , सर्वांच्या निम्मे कुशोदक घ्यावें . गायत्रीमंत्रानें गोमूत्र घ्यावें , ‘ गंधद्वारां० ’ मंत्रानें गोमय घ्यावें . ‘ आप्यायस्व० ’ मंत्रानें दूध घ्यावें . ‘ दधिक्राव्णो० ’ या मंत्रानें दहीं घ्यावें . ‘ तेजोसिशुक्रं० ’ या मंत्रानें घृत घ्यावें . ‘ देवस्यत्वा० ’ या मंत्रानें कुशोदक घ्यावें . या मंत्रांनीं पवित्र केलेल्या पंचगव्याचा अग्नींत होम करावा . सात पानांचे अच्छिन्नाग्र पोपटाच्या वर्णाचे असे दर्भ घेऊन त्या दर्भांनीं पंचगव्याचा अग्नींत यथाविधि ‘ इरावती० ’ ‘ इदं विष्णु० ’ ‘ मानस्तोके० ’ ‘ शंवती० ’ या ऋचांनीं होम करावा . आणि होम करुन शेष असलेलें पंचगव्य ब्राह्मणानें प्राशन करावें . प्रणवानें आलोडन करुन प्रणवानें अभिमंत्रण करुन प्रणवानें उद्धृत करुन तें प्रणवानें प्राशन करावें . पळसाच्या मधल्या पानानें किंवा कमलपत्रानें प्यावें . अथवा सुवर्णाच्या किंवा तांब्याच्या पात्रानें अथवा ब्रह्मतीर्थानें प्यावें . प्राशनाचा मंत्र - ‘ यत्त्वगस्थिगतं पापं देहि तिष्ठति मानवे । ब्रह्मकूर्चोपवासस्तु दहत्यग्निरिवेन्धनम् . ’ याज्ञवल्क्यानें सांगितलेलें दोन दिवसांनीं साध्य होणारें सांतपन , त्यालाच ब्रह्मकूर्च आणि ब्रह्मकूर्चोपवास म्हणतात . विज्ञानेश्वर तर - पूर्वदिवशीं उपवास करुन दुसर्‍या दिवशीं , सांगितलेल्या रीतीनें पंचगव्य प्राशन करणें , याला ब्रह्मकूर्च असें मानितो .

मरीचिः देवताः संप्रवक्ष्यामिआनुपूर्व्येणयस्ययाः । वरुणोदेवतामूत्रेगोमयेहव्यवाहनः सोमः क्षीरेदध्निवायुर्घृतेरविरुदाह्रतः । गोमूत्रंताम्रवर्णायाः श्वेतायास्त्वथगोमयम् । पयः कांचनवर्णायानीलायास्त्वथवादधि । घृतंवैकृष्णवर्णायाविभक्तंवर्णगोचरम् । उदकंसर्ववर्णंतुतस्यवर्णोनगृह्यते । गोमूत्रस्यपलंग्राह्यमंगुष्ठार्धंतुगोमयम् । क्षीरस्यत्रिपलंग्राह्यंपलमेकंकुशोदकम् । आपोहिष्ठेतिवालोड्य उद्यम्यप्रणवेनतु । अग्नयेस्वाहासोमायस्वाहेंद्रायेदंविष्णुर्मानस्तोकेगायत्र्याप्रजापतेनत्वदेतानित्यगनुजुहुयात् । नदीप्रस्रवणेतीरेरहस्येनिऋतेतथा । शुक्लवासाः पवित्रात्माअहोरात्रोषितः पिबेत् । पालाशेनचपत्रेणबिल्वपत्रेणवापिबेत् । तृतीयंताम्रपात्रंवाब्रह्मपात्राणितानिवै । प्रतिमासंपौर्णमास्याममावास्यांचवापिबेत् । ब्रह्महापरदारीचयेचान्येस्थिगतामलाः । ब्रह्मकूर्चोदहेत्सर्वंयथाग्निस्तृणमेवतु । जाबालः गोमूत्रंगोमयंक्षीरंदधिसर्पिः कुशोदकम् । एकैकं प्रत्यहंपीत्वात्वहोरात्रमभोजनम् । कृच्छ्रः सांतपनोनामसर्वपापप्रणाशन इति । एतज्जाबालोक्तंसप्ताहसाध्यं सांतपनम् । इति सांतपनलक्षणम् । अथयतिसांतपनम् शंखः एतदेवत्र्यहाभ्यस्तंयतिसांतपनं स्मृतम् । एतदेवेत्यनेनमिश्रितंपंचगव्यंपरामृश्यते तत्पंचगव्यंदिनत्रयमाहारांतरनिरपेक्षेणपिबेदित्यर्थः इतियतिसांपतनलक्षणम् ।

मरीचि - " ज्याच्या ज्या देवता आहेत त्या अनुक्रमानें सांगतो - गोमूत्रांत देवता वरुण , गोमयांत हव्यवाहन , दुधांत सोम , दह्यांत वायु , घृतांत रवि होय . ताम्र गाईचें गोमूत्र , शुभ्र गाईचें गोमय , पिंवळ्या गाईचें दूध , निळ्या गाईचें दहीं , काळ्या गाईचें घृत , या प्रत्येकाचे वेगवेगळे वर्ण असावे . उदक सर्व वर्णाचें आहे . कारण , त्याचा वर्ण कोणताही समजत नाहीं . गोमूत्र पलपरिमित ( ४ कर्ष ) घ्यावें , गोमय अर्ध्या अंगुष्ठाइतकें घ्यावें , दूध तीन पलें ( १२ कर्ष ) घ्यावें , कुशोदक एक पल ( ४ कर्ष ) घ्यावें , ‘ आपोहिष्ठा० ’ ह्या मंत्रानें आलोडन करुन प्रणवानें उद्धृत करुन ‘ अग्नयेस्वाहा ’ ‘ सोमाय० ’ ‘ इंद्राय० ’ ‘ इदंविष्णु० ’ ‘ मानस्तोके० ’ गायत्री , ‘ प्रजापतेनत्वदेता० ’ ह्या मंत्रांनीं त्या पंचगव्याचा अग्नींत होम करावा . नदीच्या प्रवाहाजवळ तीरावर एकांत स्थलीं अहोरात्र उपवास करुन शुक्लवस्त्र परिधान करुन पवित्र होऊन तें पंचगव्यप्राशन करावें . पळसाच्या पानानें किंवा बेलाच्या पानानें अथवा ताम्रपात्रानें तें प्राशन करावें . तीं ब्रह्मपात्रें म्हटलीं आहेत . प्रत्येक मासाच्या पौर्णिमेस किंवा अमावास्येस तें पंचगव्य प्राशन करावें . ब्रह्महत्या करणारा , परस्त्रीगमन करणारा यांचीं पापें ; व दुसरीं जीं अस्थिगत पापें त्या सर्वांना हा ब्रह्मकूर्च ( उपोषणपूर्वक पंचगव्यप्राशन ) जाळून टाकितो , जसा अग्नि तृणास जाळितो तद्वत् . " जाबाल - " गोमूत्र , गोमय , क्षीर , दधि , घृत , कुशोदक हीं एकेक प्रत्यहीं प्राशन करुन अहोरात्र उपवास करावा , म्हणजे सांतपन कृच्छ्र होतो ; हा कृच्छ्र सर्व पापांचा नाश्ह करणारा आहे . " हें जाबालानें सांगितलेलें सात दिवसांनीं साध्य होणारें सांतपन समजावें . इति सांतपनलक्षण . आतां यतिसांतपन . शंख - " मिश्रित पंचगव्य तीन दिवस प्राशन करुन राहावें . दुसरा कोणताही आहार करुं नये , म्हणजे तें यतिसांतपन होय . "

आतां महासांतपन सांगतो .

अथमहासांतपनम् याज्ञवल्क्यः - पृथक् सांतपनद्रव्यैः षडहः सोपवासकः । सप्ताहेनतुकृच्छ्रोयं महासांतपनः स्मृतः गोमूत्रगोमयक्षीरदधिघृतकुशोदकानिसांतपनद्रव्याणिएकैकस्मिन् दिनेएकैकंपिबेत् । सप्तमदिनउपवासः । एतानिकुशोदकादिप्राशनादीनिआहारांतरनिवर्तकानि एवमन्यत्रापि । यमः त्र्यहंपिबेत्तुगोमूत्रंत्र्यहंवैगोमयंपिबेत् । त्र्यहंदधित्र्यहंसर्पिस्त्र्यहंक्षीरंततः शुचिः । महासांतपनंह्येतत्सर्वपापप्रणाशनम् । एतत्पंचदशाहसाध्यम् जाबालः षण्णामेकैकमेतेषांत्रिरात्रमुपयोजयेत् । त्र्यहंचोपवसेदंत्यंमहासांतपनंविदुरिति । षण्णांपूर्वोक्तगोमूत्रादीनां अयमेकविंशतिरात्रसाध्योमहासांतपनकृच्छ्रः । इतिमहासांतपनलक्षणम् ।

याज्ञवल्क्य - " गोमूत्र , गोमय , दूध , दहीं घृत , आणि कृशोदक हीं सांतपन द्रव्यें होत . यांपैकीं एकएक एकएका दिवशीं प्यावें , दुसरें कांहीं खाऊं नये , आणि सातव्या दिवशीं उपवास करावा , म्हणजे महासांतपन होतें . " याज्ञवल्क्यानें ‘ कुशोदक , गोक्षीर , गोदधि , गोमूत्र , गोमय , गोघृत असा क्रम धरला आहे . हें कुशोदकादिकांचें प्राशन सांगितलें तें इतर आहाराचें निवर्तक आहे . असेंच दुसर्‍या ठिकाणीं कोठें सांगेल तेथेंही आहार वर्ज्य समजावा . यम - " तीन दिवस गोमूत्र प्यावें , तीन दिवस गोमय , तीन दिवस दहीं , तीन दिवस घृत , आणि तीन दिवस दूध प्यावें म्हणजे शुद्ध होतो . हें महासांतपन कृच्छ्र सर्व पापांचा नाश करणारें आहे . " हें कृच्छ्र पंधरा दिवसांनीं साध्य आहे . जाबाल - " गोमूत्र , गोमय , गोदूध , गोदधि , गोघृत , आणि कुशोदक ह्या सहा द्रव्यांपैकीं एकएक तीनतीन दिवस प्राशन करुन राहावें , आणि पुढें तीन दिवस उपवास करावा , म्हणजे तो महासांतपन होतो . " हा एकवीस दिवसांनीं साध्य होणारा महासांतपन कृच्छ्र आहे . इति महासांतपनम् .

अथपराकः याज्ञवल्क्यः द्वादशाहोपवासेनपराकः परिकीर्तितः । इतिपराकलक्षणम् ।

आतां पराक सांगतो याज्ञवल्क्य - " बारा दिवस उपवास केल्यानें पराक होतो . " इति पराकः

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:26.9900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

centrifugal radial drainage

  • अपकेंद्री अरीय निस्सार 
RANDOM WORD

Did you know?

अतिथी व अतिथिसत्कार याचे विशेष महत्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.