मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
नांदीश्राद्धाचा क्रम

तृतीय परिच्छेद - नांदीश्राद्धाचा क्रम

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


नांदीश्राद्धाचा क्रम असा -

अत्रायंक्रमः नांदीश्राद्धेदैवेक्षणः क्रियतामितिद्वौयुगपन्निमंत्र्य ओंतथेतिविप्राभ्यांयुगपदुक्ते प्राप्नुतां भवंतौप्राप्नुवावइतिवैश्वदेववत्पित्र्येचद्विवचनांतेनविप्रद्वयेप्रयोगंकुर्यात् आहिताग्निस्तु हेमाद्रौब्राह्मे योग्नोतुविद्यमानेपिवृद्धौपिंडान्ननिर्वपेत् पतंतिपितरस्तस्यनरकेसचपच्यते बह्वृचपरिशिष्टे द्वौदर्भोपवित्राणिचत्वारि शंनोदेवीत्यनुमंत्रितासुयवानावपति यवोसिसोमदेवत्योगोसवेदेवनिर्मितः प्रत्नवद्भिः प्रत्तः पुष्ट्यानांदीमुखान्पितृनिमांल्लोकान्प्रीणयाहिनः स्वाहेति स्वाहार्घ्याइतिपृच्छति विश्वेदेवाइदंवोअर्घ्यंनांदीमुखाः पितरइति यथालिंगमर्घ्यदानंगंधादिदानंद्विर्द्विः पाणौहोमोग्नयेकव्यवाहनायस्वाहासोमायपितृमतेस्वाहेत्यतोदेवाअवंतुन इत्यंगुष्ठग्रहणं पावमानीः शंवतीरैंद्रीरप्रतिरथंचश्रावयेन्मधुवाताऋचः स्थानेउपास्मैगायतेतिपंचमधुमतीः श्रावयेदक्षन्नमीमदंतेतिचषष्ठींभुक्तशेषेणैकैकस्यद्वौद्वौपिंडौदद्यादिति चंद्रिकायांवृद्धवसिष्ठः पितृप्रश्नेतुसंपन्नंदैवेरुचितमित्यपि दधिकर्कंधुमिश्राश्चपिंडाः कार्यायथाक्रमं कात्यायनः त्यमूषुवाजिनमितिविप्रांश्चविसर्जयेत् नांदीमुखाः पितरः प्रीयंतामित्यक्षय्यस्थानेस्वधांवाचयिष्यइत्यस्यस्थानेनांदीमुखान्पितृन्वाचयिष्येइतिनस्वधांप्रयुंजीतेति अत्रसाग्निरनग्निर्वादौवैश्वदेवंकुर्यात् आदौवृद्धौक्षयेचांतेदर्शेमध्येमहालये एकोद्दिष्टेनिवृत्तेतुवैश्वदेवोविधीयतइत्याशार्केशांखायनपरिशिष्टात् हेमाद्रौतु शेषमन्नमनुज्ञाप्यवैश्वदेवक्रियांततः श्राद्धान्हिश्राद्धशेषेणवैश्वदेवंसमाचरेदितिचतुर्विंशतिमतान्नादीश्राद्धेप्यंतेवैश्वदेवउक्तः बह्वृचानामपिवृत्त्यालोचनात्तथैवपूर्वोक्तंतुयेषांपरिशिष्टंतद्विषयमन्यविषयंवाज्ञेयं अत्रश्राद्धांगतर्पणंनेत्युक्तंप्राक् इतिश्रीजगद्गुरुनारायणभट्टात्मजरामकृष्णभट्टसूनुकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौवृद्धिश्राद्धम् ।

‘ नांदीश्राद्धे दैवेक्षणः क्रियतां ’ असें म्हणून दोन ब्राह्मणांना एकदम क्षण देऊन ‘ ओं तथा ’ असें दोन्ही ब्राह्मणांनीं एकदम म्हटलें असतां कर्त्यानें ‘ प्राप्नुतां भवंतौ ’ असें म्हणावें . नंतर ब्राह्मणांनीं ‘ प्राप्नुवाव ’ असें म्हणावें . विश्वेदेवप्रयोगाप्रमाणें पितरांकडे दोन ब्राह्मणांचे ठायीं द्विवचनानें प्रयोग करावा . अग्निहोत्र्याला सांगतो - हेमाद्रींत ब्रह्मपुराणांत - " अग्नि विद्यमान असतांही जो वृद्धिश्राद्धांत पिंडदान करीत नाहीं त्याचे पितर नरकांत पडतात , व तो नरकांत पक्क होतो . " बह्वृचपरिशिष्टांत - " दोन दर्भांचीं पवित्रें चार असावीं . ‘ शंनोदेवी ’ या मंत्रानें अर्घ्यपात्रांतील उदक अनुमंत्रण करुन ‘ यवोसि सोमदेवत्यो गोसवेदेवनिर्मितः । प्रत्नवद्भिः प्रत्तः पुष्ट्या नांदीमुखान् पितृनिमांल्लोकान् प्राणयाहि नः स्वाहा ’ या मंत्रानें अर्घ्यपात्रांत यव टाकावे . ‘ स्वाहाऽर्घ्याः ’ असा प्रश्न करावा . ‘ विश्वेदेवा इदंवोर्घ्यं ’ , ‘ नांदीमुखाः पितर इदंवोर्घ्यं ’ याप्रमाणें जसे पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग असेल त्याप्रमाणें ऊह करुन अर्घ्यदान करावें . गंध पुष्पें इत्यादिकांचें दान दोन दोन वेळां करावें . ‘ अग्नये कव्यवाहनाय स्वाहा ’ , ‘ सोमाय पितृमते स्वाहा ’ या मंत्रांनीं ब्राह्मणाच्या हातावर होम करावा . ‘ अतो देवा अवंतुनो ’ या मंत्रानें अन्ननिवेदनसमयीं अंगुष्ठ धरावा . पावमानी ऋचा , शंवती , ऐंद्री व अप्रतिरथ हीं सूक्तें ब्राह्मणांकडून ऐकवावीं . ‘ मधुवाता० ’ ह्या ऋचांच्या स्थानीं ‘ उपास्मै गायता० ’ ह्या पांच ऋचा व सहावी ‘ अक्षन्नमीमदंत० ’ ह्या सहा ऋचा ऐकवाव्या . ब्राह्मणांनीं भोजन करुन शेष उरलेल्या अन्नाचे पिंड करुन एकएकाला दोन दोन पिंड द्यावे . " चंद्रिकेंत वृद्धवसिष्ठ - " तृप्तिप्रश्नाचे ठायीं ‘ संपन्नं ’ असा प्रश्न करावा . देवांकडे ‘ रुचितं ’ असाही करावा . दहीं व बोरें यांनीं मिश्रित अन्नाचे पिंड करुन अनुक्रमानें द्यावे . " कात्यायन - " त्यमूषुवाजिनं० " या मंत्रानें ब्राह्मणांचें विसर्जन करावें . अक्षय्योदकस्थानीं ‘ नांदीमुखाः पितरः प्रीयंतां ’ असें म्हणून उदक द्यावें . ‘ स्वधां वाचयिष्ये ’ याच्या स्थानीं ‘ नांदीमुखान् पितृन् वाचयिष्ये ’ असें म्हणावें . स्वधाशब्दाचा उच्चार करुं नये . " नांदीश्राद्धदिवशीं साग्निक असो किंवा निरग्निक असो आधीं वैश्वदेव करावा . कारण , " वृद्धिश्राद्धांत आधीं , वार्षिकांत अंतीं , दर्शांत व महालयांत मध्यें , एकोद्दिष्टांत श्राद्ध झाल्यावर वैश्वदेव सांगितला आहे . " असें आशार्कोंत शांखायनपरिशिष्ट आहे . हेमाद्रींत तर - " शेष उरलेल्या अन्नाची अनुज्ञा घेऊन नंतर वैश्वदेव करावा . श्राद्धदिवशीं श्राद्धशेषानें वैश्वदेव करावा " असें चतुर्विंशतिमतांत - वचन आहे . म्हणून नांदीश्राद्धांतही अंतीं वैश्वदेव सांगितला आहे . बह्वृचांना देखील सूत्रवृत्ति पाहिल्यावरुन तसेंच ( अंतीं वैश्वदेव ) आहे . पूर्वीं सांगितलेलें आधीं वैश्वदेव करावा तें तर ज्यांचें परिशिष्ट तसें आहे त्यांच्याविषयीं किंवा इतरांच्या विषयीं समजावें . येथें ( नांदीश्राद्धांत ) श्राद्धांगतर्पण नाहीं , असें पूर्वीं ( तर्पणप्रकरणीं ) सांगितलें आहे .

इति निर्णयसिंधौ वृद्धिश्राद्धे महाराष्ट्रटीका समाप्ता .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP