मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
स्त्रियांचें अन्वारोहण

तृतीय परिच्छेद - स्त्रियांचें अन्वारोहण

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां स्त्रियांचें अन्वारोहण ( सहगमन ) सांगतो -

अथान्वारोहणंस्त्रीणामात्मनोभर्तुरेवच सर्वपापक्षयकरंनिरयोत्तारणायच अनेकस्वर्गफलदंमुक्तिदंचतथैवच जन्मांतरेचसौभाग्यधनपुत्रादिवृद्धिदं देशकालौस्मृत्वाऽरुंधतीसमाचरत्वस्वर्गलोकमहीयमानत्वमनुष्य लोमसंख्याब्दावच्छिन्नस्वर्गवासभर्तृसहितचतुर्दशेंद्रावच्छिन्नकालिकक्रीडमानत्वमातृपितृश्वशुरकुलत्रयपूतत्वब्रह्मघ्नमित्रघ्नकृतघ्नपतिपूतत्वपत्यवियोगकामाभर्तृज्वलच्चितारोहणंकरिष्ये अनुगमनेतुफलमुल्लिख्योन्वारोहणंकरिष्यइत्युक्त्वा हरिद्राकुंकुमांजनादियुतशूर्पाणिसुवासिनीभ्योदद्यात् मंत्रस्तु लक्ष्मीनारायणोदेवोबलसत्त्वगुणाश्रयः गाढंसत्त्वंचमेदेयाद्वाणकैः परितोषितः सोपस्कराणिशूर्पाणिवाणकैः संयुतानिच लक्ष्मीनारायणप्रीत्यैसत्त्वकामाददाम्यहं अग्नेः समीपमागत्यपंचरत्नानिपल्लवे नीलांजनंतथाबध्वामुखेमुक्ताफलंन्यसेत् ततोग्निप्रार्थनंकृत्वामंत्रेणानेनमिश्रितं स्वाहासंश्लेषनिर्विण्णसर्वगोत्रहुताशन सत्त्वमार्गप्रदानेननयमांभर्तुरंतिकं ततोग्नावाज्येनाग्नयेतेजोधिपतयेविष्णवेसत्त्वाधिपतये कालायधर्माधिपतये पृथिव्यैलोकाधिष्ठात्र्यैअद्भ्योरसाधिष्ठात्रीभ्यः वायवेबलाधिपतयेआकाशायसर्वाधिपतयेकालायधर्माधिष्ठात्रे अभ्द्यः सर्वसाक्षिणीभ्यः ब्रह्मणेवेदाधिपतये रुद्रायस्मशानाधिपतयेचहुत्वाग्निंप्रदक्षिणीकृत्य दृषदमुपलांचसंपूज्यपुष्पांजलिंगृहीत्वाग्निंप्रार्थयेत् त्वमग्नेसर्वभूतानामंतश्चरसिसाक्षिवत् त्वमेवदेवजानीषेनविदुर्यानिमानुषाः अनुगच्छामिभर्तारंवैधव्यभयपीडिता सत्त्वमार्गप्रदानेननयमांभर्तुरंतिकं मंत्रमुच्चार्यशनकैः प्रविशेच्चहुताशनं गौडास्तु इमानारीरविधवाइति ॐ इमाः पतिव्रताः पुण्याः स्त्रियोयायाः सुशोभनाः सहभर्तुः शरीरेणसंविंशंतुविभावसुं इतिचविप्रः पठेदित्याहुः कातरांतु प्रेतोत्तरेसुप्तांदेवरः शिष्योवाउदीर्ष्वेतिद्वाभ्यामुत्थापयेत् एतन्महिमा मिताक्षरादौज्ञेयः ।

" स्त्रियांचें अन्वारोहण आपल्या व पतीच्या सर्व पापाचा नाश करणारें आणि नरकापासून तारणारें आहे . अनेक स्वर्गांतील फलें व मुक्ति देणारें , जन्मांतरीं ( पुढील जन्मांत ) सौभाग्य , धन , पुत्र इत्यादि वृद्धि करणारें असें आहे . " देशकालांचें संकीर्तन करुन ‘ अरुंधतीसमाचरत्व० करिष्ये ’ असा संकल्प करावा . अनुगमन असेल तर वरील सर्व संकल्पाचा उच्चार करुन ‘ अन्वारोहणं करिष्ये ’ असा संकल्प उच्चारावा . नंतर हळद , कुंकूं , अंजन इत्यादियुक्त शूर्पै सुवासिनींना द्यावीं . दानमंत्र - " लक्ष्मीनारायणो देवो० सत्त्वकामाददाम्यहं ’’ हे दोन मंत्र सुवासिनींना वायनें देण्याचे होत . " नंतर अग्नीच्या जवळ येऊन पंचरत्नें व नील अंजन वस्त्राचे पदरास बांधून तोंडांत मोतीं घालावें . " स्वाहासंश्लेषनिर्विण्णसर्वगोत्रहुताशन । सत्त्वमार्गप्रदानेन नय मां भर्तुरंतिकम् ’ ह्या मंत्रानें अग्नीची प्रार्थना करुन तदनंतर अग्नींत मंत्रांनीं आज्याचा होम करावा . ते मंत्र - ‘ अग्नये तेजोधिपतये स्वाहा , विष्णवे सत्त्वाधिपतये स्वाहा , कालाय धर्माधिपतये स्वाहा , पृथिव्यै लोकाधिष्ठात्र्यै स्वाहा , अभ्द्यो रसाधिष्ठात्रीभ्यः स्वाहा , वायवे बलाधिपतये स्वाहा , आकाशाय सर्वाधिपतये स्वाहा , कालाय धर्माधिष्ठात्रे स्वाहा , अभ्द्यः सर्वसाक्षिणीभ्यः स्वाहा , ब्रह्मणे वेदाधिपतये स्वाधा , रुद्राय श्मशानाधिपतये स्वाहा ’ या मंत्रानीं अज्याचा होम करुन अग्नीला प्रदक्षिणा करुन पाषाण व उपला यांची पूजा करुन हातांत पुष्पांजलि घेऊन अग्नीची प्रार्थना करावी . प्रार्थनेचे मंत्र - ‘ त्वमग्ने सर्वभूतानां० भर्तुरंतिकं ह्या दोन मंत्रांचा उच्चार करुन हळू हळू अग्नींत प्रवेश करावा . ’ गौड तर - ‘ इमानारीरविधवा . ’ हा मंत्र आणि ‘ इमाः पतिव्रताः पुण्याः स्त्रियो यायाः सुशोभनाः । सहभर्तुः शरीरेण संविशंतु विभावसुं ’ हा मंत्र ब्राह्मणानें म्हणावा , असें सांगतात . भित्री असेल तिला प्रेताचे उत्तरेस निजलेलीस दिरानें किंवा शिष्यानें ‘ उदीर्ष्वातः० ’ ह्या दोन मंत्रांनीं उठवावी . ह्या अन्वारोहणाचा ( सहगमनाचा ) महिमा मिताक्षरादि ग्रंथांतून जाणावा .

पृथ्वीचंद्रोदयेस्कांदे अनुव्रजतिभर्तारंगृहात्पितृवनंमुदा पदेपदेश्वमेधस्यफलंप्राप्नोत्यनुत्तमं यत्त्वंगिराः यास्त्रीब्राह्मणजातीयामृतंपतिमनुव्रजेत् सास्वर्गमात्मघातेननात्मानंनपतिंनयेदिति यच्चव्याघ्रपात् नम्रियेतस्वयंभर्त्राब्राह्मणीशोककर्शिता नब्रह्मगतिमाप्नोतिमरणादात्मघातिनीतितत् पृथक् चितिपरं पृथक्चितिंसमारुह्यनविप्रागंतुमर्हति अन्यासांचैवनारीणांस्त्रीधर्मोयंपरः स्मृतइत्युशनसोक्तेः ।

पृथ्वीचंद्रोदयांत स्कांदांत - " घरापासून श्मशानांत मोठ्या हर्षानें पतीच्या मागाहून जाणारी स्त्री पावलापावलाला अश्वमेधयज्ञाचें उत्तम फल पावते . " आतां जें अंगिरा - " जी ब्राह्मणजातीची स्त्री मृत झालेल्या पतीला अनुगमन करिते ती आत्मघातानें आपल्याला व पतीला स्वर्गास नेत नाहीं . " आणि जें व्याघ्रपाद - " शोकानें कृश झालेल्या ब्राह्मणी स्त्रियेनें भर्त्यासह स्वतः मरुं नये . कारण , मरणानें आत्मघातकी होऊन ब्रह्मगति पावत नाहीं . " असें निषेधक वचन तें पृथक् चितेविषयक आहे . कारण , " ब्राह्मणी स्त्री पृथक् चितेवर आरोहण करुन जाण्यास योग्य होत नाहीं . ब्राह्मणीवांचून इतर स्त्रियांना पृथक् चितीवर आरोहण करणें हा उत्तम स्त्रीधर्म सांगितला आहे . " असें उशनसाचें वचन आहे .

पृथक्चितिस्तुक्षत्रियादिपरा ताद्वेधिर्ब्राह्मे देशांतरेमृतेपत्यौसाध्वीतत्पादुकाद्वयं निधायोरसिसंशुद्धाप्रविशेज्जातवेदसं ऋग्वेदवादात्साध्वीस्त्रीनभवेदात्मघातिनी त्र्यहाशौचेनिवृत्तेतुश्राद्धंप्राप्नोतिशास्त्रवत् इमानारीरविधवाइतिऋग्वेदवादः त्र्यहाशौचमन्वारोहणपरमितिस्मार्ताः निषेधवाक्यानिप्रायश्चित्तार्थंमृतेनपतितेनवासहमरणनिषेधपराणीत्यप्याहुः अस्थिदाहेपलाशदाहेवानपृथक्चितिदोषः अंगत्वेनस्थानापत्त्यावाशरीरतुल्यत्वात् यत्तु ब्रह्मघ्नोवाकृतघ्नोवामित्रघ्नोवाभवेत्पतिः पुनात्यविधवानारीतमादायमृतातुयेतिहारीतीयं तत्पतितदाहादिनिषेधेनसहगमनस्यदूरतोपास्तत्वादर्थवादमात्रमितिपृथ्वीचंद्रः जन्मांतरीयपापवतासहमरणेनोद्धारइतिस्मार्तगौडाः शुद्धितत्त्वेव्यासः दिनैकगम्यदेशस्थासाध्वीचेत्कृतनिश्चया नदहेत्स्वामिनंतस्यायावदागमनंभवेत् तत्रैवभविष्ये तृतीयेह्निउदक्यायामृतेभर्तरिवैद्विजाः तस्यानुमरणार्थायस्थापयेदेकरात्रकं एकांचितांसमासाद्यभर्तारंयानुगच्छति तद्भर्तुर्यः क्रियाकर्तासतस्याश्चक्रियांचरेत् एतद्दशाहांतरम् यश्चाग्निदाताप्रेतस्यपिंडंदद्यात्सएवहीतिवायवीयोक्तेः आपस्तंबः चितिभ्रष्टातुयानारीमोहाद्विचलिताभवेत् प्राजापत्येनशुध्येततस्माद्वैपापकर्मणः तथा अन्वारोहेतुनारीणांपत्युश्चैकोदकक्रियां पिंडदानक्रियांतद्वच्छ्राद्धंप्रत्याब्दिकंतथा अन्वारोहेकृतेपत्न्यापृथक् पिंडांस्तिलांजलीन् पृथक्शिलेनकुर्वीतदद्यादेकशिलेतथा अन्यत्प्रागुक्तं ।

पृथक् चिती तर क्षत्रियादिविषयक आहे . त्या पृथक् चितीचा विधि सांगतो ब्राह्मांत - " पति देशांतरीं मृत असतां शुद्ध पतिव्रता स्त्रियेनें त्याच्या दोन पादुका उरावर घेऊन अग्नींत प्रवेश करावा . ऋग्वेदाच्या वादानें अग्नींत प्रवेश करणारी साध्वी स्त्री आत्मघातकी होत नाहीं . तीन दिवस आशौच झाल्यावर ती शास्त्रानें सांगितलेलें श्राद्ध पावते . " ऋग्वेदवाद म्हणजे ‘ इमानारीरविधवा० ’ हा समजावा . तीन दिवस आशौच सांगितलें हें अन्वारोहणविषयक आहे , असें स्मार्त सांगतात . अंगिरादिकांचीं निषेधक वचनें तीं प्रायश्चित्तार्थ मृत झालेल्या किंवा पतित मृत झालेल्या पतीसह मरणाचीं निषेधक आहेत , असेंही सांगतात . पतीच्या अस्थींचा दाह किंवा पर्णशराचा दाह असतां पृथक् चितीचा दोष नाहीं . कारण , अस्थींचा दाह असेल तर अस्थि ह्या पतीचें अंग आहे . पर्णशरदाह असेल तर पर्णशर हा शरीरस्थानीं आहे म्हणून ते दोन्ही दाह पतिशरीरसमान आहेत . आतां जें " ब्रह्मघातक किंवा कृतघ्न अथवा मित्रदोही असा पति असेल तरी जी सुवासिनी स्त्री त्या पतीला घेऊन मरते ती त्याला पवित्र करिते . " असें हारीताचें वचन तें सहगमन करणार्‍या स्त्रियांच्या स्तुतीविषयीं मात्र आहे . कारण , ब्रह्मघ्नादिकांच्या दाहादि कर्मांचा निषेध असल्यामुळें सहगमन तर दूरच राहिलें आहे , असें पृथ्वीचंद्र सांगतो . जन्मांतरीं पाप केलेल्या पतीसह मरण केलें असतां त्या पापापासून पतीचा उद्धार करिते , असा वरील हारीतवचनाचा भावार्थ , असें स्मार्तगौड सांगतात . शुद्धितत्त्वांत व्यास - " एक दिवसानें जाण्यास योग्य इतक्या लांबीवर स्त्री असेल व तिचा सहगमनाविषयीं निश्चय झालेला असेल तर ती जोंपर्यंत येईल तोंपर्यंत तिच्या पतीचा दाह करुं नये . " तेथेंच भविष्यांत - " रजस्वलेच्या तिसर्‍या दिवशीं तिचा भर्ता मृत होईल तर तिच्या सहगमनाकरितां एक रात्र प्रेत ठेवावें . जी स्त्री एकचितीवर आरोहण करुन पतीबरोबर जाते तिच्या पतीची क्रिया करणारानें तिचीही क्रिया करावी . " हा प्रकार दशाहांतील आहे . कारण , " जो प्रेताला अग्नि देतो त्यानेंच त्याला पिंड द्यावा " असें वायवीय वचन आहे . आपस्तंब - " जी स्त्री अविचारानें चंचलचित्त होऊन चितीपासून बाहेर येईल ती त्या पापकर्मापासून प्राजापत्य कृच्छ्रानें शुद्ध होईल . " तसेंच - " अव्नारोहण असतां स्त्रियांची व पतीची उदकदानक्रिया एक होते . तशीच पिंडदानक्रिया एक आणि प्रतिसांवत्सरिक श्राद्धही एकच होतें . पत्नीनें अन्वारोहण केलें असतां पृथक् पिंड व पृथक् शिलेवर तिलांजलि देऊं नयेत . एका शिलेवर ( दगडावर ) द्यावे . " इतर निर्णय पूर्वीं सांगितला आहे .

इदंगर्भिणीबालापत्यासूतिकारजस्वलाव्यभिचारिणीभिर्नकार्य स्वैरिणीनांगर्भिणीनांपतितानांचयोषितां नास्तिपत्याग्निसंवेशः पतितौहितथाउभावितिमदनरत्नेस्मृतिसंग्रहोक्तेः मदनरत्नेबृहस्पतिः बालसंवर्धनंमुक्त्वाबालापत्यानगच्छति व्रतोपवासनियतारक्षेद्गर्भंचगर्भिणी तृतीयपादेरजस्वलासूतिकाचेति पृथ्वीचंद्रोदयेगौडीयशुद्धितत्त्वेचपाठः तत्रैवबृहन्नारदीयेपि बालापत्याचगर्भिण्योह्यदृष्टऋतवस्तथा रजस्वलाराजसुतेनारोह्हंतिचितांतुताः अत्र पतिव्रतासासंदीप्तंप्रविशेद्याहुताशनमितिभारतादृग्वेदवादात्साध्वीस्त्रीतिब्राह्माच्चपतिव्रतानामेवाधिकारोनदुर्वृत्तानां यत्तु अवमत्यचयाः पूर्वंपतिंदुष्टेनचेतसा वर्तंतेयाश्चसततंभर्तृणांप्रतिकूलतः तत्रानुमरणंकालेयाः कुर्वंतितथाविधाः कामात्क्रोधाद्भयान्मोहात्सर्वाः पूताभवंत्युतेतिभारतं तत्कैमुतिकन्यायेनस्तावकमितिपृथ्वीचंद्रः ब्राह्मण्याएकचितिरेवनपृथक् चितिः क्षत्रियादीनांपृथगेकावेति कल्पतरुरत्नाकरमदनपारिजातादयः शुद्धिंचिंतामणौचैवं तत्रान्वारोहणेभर्तुः शौचमध्येतदूर्ध्वंवाकृते त्रिरात्रमध्येएवदशपिंडाः सहगमनेतुभर्तुः शौचतुल्यमाशौचंपिंडदानंच अन्वितायाः प्रदातव्यादशपिंडास्त्र्यहेणतु स्वाम्याशौचेव्यतीतेतुतस्याः श्राद्धंप्रदीयते इति शुद्धितत्त्वेशूलपाणौचपैठीनसिस्मृतेः संस्थितंपतिमालिंग्यप्रविशेद्याहुताशनं तस्याः पिंडादिकंदेयंक्रमश पतिपिंडवदिति शूलपाणिशुद्धितत्त्वधृतव्यासोक्तेः अन्यत्प्रागुक्तं यदातुरजस्वलापिपत्नीमृतेपत्यौदेशकालवशात्तदैवानुगच्छति नशुद्धिंप्रतीक्षते तत्रविधिः देवयाज्ञिकनिबंधे यदास्त्रियामुदक्यायांपतिः प्राणान्समुत्सृजेत् द्रोणमेकंतंडुलानामवहन्याद्विशुद्धये मुसलाघातैस्तदसृक् स्रवतेयोनिमंडलात् विरजस्कामन्यमानास्वेचित्तेतदसृक् क्षयं दृष्ट्वाशौचंप्रकुर्वीतपंचमृत्तिकयापृथक् त्रिंशद्विंशतिर्दशचगवांदत्वात्वहः क्रमात् विप्राणांवचनाच्छुद्धासमारोहेद्धुताशनं नारीणांसरजस्कानामियंशुद्धिरुदाह्रता अत्रश्राद्धादौनिर्णयः पूर्वमुक्तः इतिश्रीभट्टकमलाकरकृतेनिर्णयसिंधावंत्यकर्मनिर्णयः ।

हें अन्वारोहण गर्भिणी , जिचें मूल लहान असेल ती , बाळंतीण , रजस्वला , व्यभिचार करणारी ह्या स्त्रियांनीं करुं नये . कारण , " व्यभिचारिणी , गर्भिणी आणि पतित अशा स्त्रियांना पतीसह अग्निप्रवेश नाहीं . कारण , ह्या स्त्रिया जर पतीसह अग्निप्रवेश करतील तर दोन्ही पतित होतील " असें मदनरत्नांत स्मृतिसंग्रहवचन आहे . मदनरत्नांत बृहस्पति - " जिचें मूल लहान असेल ती मुलांचे पालनपोषण टाकून जात नाहीं . तिणें व्रत व उपवास यांविषयीं तत्पर असावें . गर्भिणीनें गर्भाचें संरक्षण करावें . " ‘ व्रतोपवासनियता ’ या स्थानीं ‘ रजस्वला सूतिकाच ’ असा पृथ्वीचंद्रोदयांत गौडांचे शुद्धितत्त्वांत पाठ आहे . तेथेंच बृहन्नारदीयांतही - " जिचें मूल लहान आहे ती , गर्भिणी , ऋतु प्राप्त न झालेली , रजस्वला , राजकन्या ह्या पतीच्या चितीप्रत आरोहण करीत नाहींत . " अन्वारोहण व सहगमन यांविषयीं " जी स्त्री पतिव्रता असेल तिनें अग्नींत प्रवेश करावा . " ह्या भारतवचनावरुन आणि ऋग्वेदवादानें " पतिव्रता स्त्री आत्मघातकी होत नाहीं . " या ब्राह्मवचनावरुनही पतिव्रतांनाच अधिकार आहे . दुष्टवर्तनाच्या स्त्रियांना अधिकार नाहीं . आतां जें " ज्या स्त्रिया पूर्वीं दुष्ट चित्तानें पतीचा अपमान करुन सतत पतीच्या प्रतिकूल वर्तन करितात , तशा प्रकारच्या ज्या स्त्रिया पतीच्या मरणकालीं अनुगमन करितात , मग त्या कामानें करोत किंवा क्रोधानें अथवा भयानें किंवा अविचारानें करोत त्या सर्व पवित्र होतात . " असें भारतांतील वचन तें कैमुतिकन्यायेंकरुन ( प्रतिकूल वर्तन करणार्‍यादेखील पवित्र होतात , मग अनुकूल वर्तन करणार्‍या सुशील पवित्र होतील हें काय सांगावें , या न्यायानें ) सहगमनाची स्तुति करणारें आहे असें पृथ्वीचंद्र सांगतो . ब्राह्मणी स्त्रियेची एकचितीच होते . पृथक् चिति नाहीं . क्षत्रियादिस्त्रियांची पृथक् चिति किंवा एकचिति होते , असें कल्पतरु , रत्नाकर , मदनपारिजात इत्यादि ग्रंथकार सांगतात . शुद्धिचिंतामणींतही असेंच आहे . त्यांत भर्त्याच्या आशौचामध्यें किंवा आशौचोत्तर अन्वारोहण ( अस्थि किंवा पर्णशराबरोबर गमन ) केलें असतां तीन दिवसांमध्येंच दहा पिंड द्यावे . सहगमन केलें असतां भर्त्याच्या आशौचाइतकेंच आशौच व पिंडदानही समजावें . कारण , " अनुगमन ( अस्थादिबरोबर गमन ) करणार्‍या स्त्रियेला तीन दिवसांत दहा पिंड द्यावे . पतीचें आशौच संपल्यावर तिला श्राद्ध द्यावें . " अशी शुद्धितत्त्वांत व शूलपाणींत पैठीनसि स्मृति आहे . मृत झालेल्या पतीला आलिंगन करुन जी स्त्री अग्निप्रवेश करील तिला पतिपिंडाप्रमाणें अनुक्रमानें पिंडादिक द्यावें . " असें शूलपाणि शुद्धितत्त्व यांनीं धरलेलें व्यासवचन आहे . इतर निर्णय पूर्वीं सांगितला आहे . ज्या वेळीं पत्नी रजस्वला असूनही पति मृत झाला असतां देशकालानुरोधानें त्या वेळींच जाण्याविषयीं इच्छिते , आपल्या शुद्धीपर्यंत राहत नाहीं , त्याठिकाणीं विधि सांगतो देवयाज्ञिकनिबंधांत - " ज्या वेळीं स्त्री रजस्वला असतां पति मृत होईल त्या वेळीं तिणें एक द्रोण ( अदमण ) परिमित तांदूळ मुसळानें सडावे . मुसळाच्या आघातांनीं तिच्या योनिद्वारांतून रक्ताचा स्त्राव होतो . तो रक्तस्त्राव पाहून आपल्या चित्तांत रजोरहित आपण झालों असें मानून पंचमृत्तिकांनीं वेगवेगळी शुद्धि करुन पहिला दिवस असेल तर तीस गाई , दुसरा दिवस असेल तर वीस गाई , तिसरा दिवस असेल तर दहा गाई ब्राह्मणांस देऊन ब्राह्मणाकडून शुद्ध असें म्हणवून अग्नींत प्रवेश करावा . रजस्वला स्त्रियांची ही शुद्धि सांगितली आहे . " याविषयीं श्राद्धादिकांचा निर्णय पूर्वीं सांगितला आहे .

इति श्रीनिर्णयसिंधौ अंत्यकर्मनिर्णयाची महाराष्ट्रटीका समाप्ता .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP