मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
तीर्थश्राद्ध

तृतीय परिच्छेद - तीर्थश्राद्ध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां तीर्थश्राद्ध सांगतो -

अथतीर्थश्राद्धं तत्रयद्यप्यस्मत्पितामहकृतत्रिस्थलीसेतुरेवजागर्तितथापिकिंचिदुच्यते तत्रयात्रायां सहाग्निर्वासपत्नीकोगच्छेत्तीर्थानिसंयतः प्रायश्चित्तीव्रजेत्तीर्थंपत्नीविरहितोपिवा यज्ञेष्वनधिकारीवायश्चवामंत्र साधकइतिकौर्मादिवचनात्साग्नेः सपत्नीकस्यैवाधिकारः भारते ब्राह्मणः क्षत्रियोवैश्यः शूद्रोवाराजसत्तम नवियोनिंव्रजंत्येतेस्नानात्तीर्थेमहात्मनः स्कांदे विधवाधर्मेषु स्नानंदानंतीर्थयात्रांविष्णुनामग्रहंमुहुः एतत्पुत्राद्यनुमत्यैव सधवायाः पत्यासहैवेतिप्रागुक्तं काशीखंडे मातुः पितुः क्षेप्तुमनास्तथास्थिसुतस्तुकुर्यात्खलुतीर्थयात्रां तद्विधिः स्कांदे तीर्थयात्रांचिकीर्षुः प्राग्विधायोपोषणंगृहे गणेशंचपितृन्विप्रान्साधून्शक्त्याप्रपूज्यच कृतपारणकोह्रष्टोगच्छेन्नियमधृक्पुनः आगत्याभ्यर्च्यचपितृन् यथोक्तफलभाग्भवेत् उपवासात्प्राग्मुंडनंचकार्यं प्रयागेतीर्थयात्रायांपितृमातृवियोगतः कचानांवपनंकुर्याद्यथानविकचोभवेदितिविष्णूक्तेः प्रायश्चित्तार्थयात्रायांगंगायांचैतदित्येके केचित्तुहेमाद्रौभारते केशश्मश्रुनखादीनांवपनंनचशस्यते अतोनकार्यंवपनंगयाश्राद्धार्थिनासदा येभारतेस्मिन् पितृकर्मतत्पराः संधार्यकेशानतिभक्तिभाविताः ऋणक्षयार्थंपितृतीर्थमागतास्तेषामृणंसंक्षयमेष्यतिध्रुवमितिनिषेधात् गयायात्रांगंवपनंनकार्यमित्याहुः वस्तुतस्तु गयाधिकरणकस्यैवायंनिषेधः नतुयात्रांगस्य श्राद्धार्थिनेत्युक्तेः विशालंविरजंगयामित्यनेनैकवाक्यत्वाच्च श्राद्धंचषटनवद्वादशदैवतंवाघृतेनकार्यं गच्छेद्देशांतरंयस्तुश्राद्धंकुर्यात्ससर्पिषेतिविष्णुपुराणात् यात्रांगवृद्धिश्राद्धोक्तेश्च ।

त्या तीर्थश्राद्धाविषयीं जरी आमच्या आजोबांनीं ( नारायणभट्टांनीं ) केलेला त्रिस्थलीसेतु ग्रंथ जागृत आहे तरी येथें अल्प सांगतों , तीर्थाच्या यात्रेविषयीं अधिकार " साग्निक असेल तर पत्नीसह तीर्थास जावें . अथवा पत्नीविरहितानें प्रायश्चित्तासाठीं तीर्थास जावें . अथवा यज्ञाविषयीं अनधिकारी असेल त्यानें किंवा मंत्र साध्य करावयाचा असेल त्यानें तीर्थास जावें " ह्या कूर्मपुराणादिवचनावरुन साग्निकाला पत्नीसहच आहे . भारतांत - " ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , अथवा शूद्र यांनीं तीर्थांत स्नान केलें असतां ते वाईट योनींत जात नाहींत . " स्कांदांत विधवाधर्मांत - " स्नान , दान , तीर्थयात्रा आणि वारंवार विष्णुनामग्रहण विधवेनें करावें . " हें पुत्रादिकांच्या अनुमतीनेंच करावें . सुवासिनीला पतीसहच अधिकार , असें पूर्वीं सांगितलें आहे . काशीखंडांत - माता व पिता यांच्या अस्थि तीर्थांत टाकण्याकरितां पुत्रानें तीर्थयात्रा करावी . " त्या तीर्थयात्रेचा विधि सांगतो स्कांदांत - " तीर्थयात्रा करावयाची म्हणजे पूर्वीं घरीं उपवास करुन गणपति , पितर , ब्राह्मण , साधु यांची यथाशक्ति पूजा करुन नंतर पारणा करुन नियम धारण करुन मोठ्या हर्षानें तीर्थास जावें . नंतर परत आल्यावर पितरांची पूजा करावी , म्हणजे तीर्थयात्रेचें संपूर्ण फल प्राप्त होतें . " उपवासाच्या पूर्वीं मुंडनही करावें . कारण , " प्रयागाचे ठायीं तीर्थयात्रेचे ठायीं , पिता व माता मृत असतां केशांचें वपन करावें , परंतु मस्तकावरील सर्वकेशरहित होऊं नये . " असें विष्णुवचन आहे . प्रायश्चित्तार्थ यात्रेचे ठायीं आणि गंगेचे ठायीं हें वपन , असें कितीएक ग्रंथकार सांगतात . केचित् ग्रंथकार तर - हेमाद्रींत भारतांत - " केश , श्मश्रु , नखें इत्यादिकांचें वपन करणें प्रशस्त नाहीं ; म्हणून गयाश्राद्ध करणारानें वपन सदा करुं नये . या भरतखंडांत जे पितृकर्माविषयीं तत्पर अतिभक्तीनें युक्त असे असून पितृऋणापासून मुक्त होण्यासाठीं केश धारण करुन पितृतीर्थास येतील ते पितृऋणापासून निश्चयानें मुक्त होतील . " या वचनानें वपनाचा निषेध असल्यामुळें गयायात्रेचें अंगभूत वपन करुं नये , असें सांगतात . वास्तविक म्हटलें तर हा वपनाचा निषेध गयेचे ठायींच आहे . यात्रेच्या अंगभूत वपनाचा निषेध नाहीं . कारण वरील वचनांत गयाश्राद्धार्थी असेल त्यानें करुं नये , असें सांगितलें आहे . आणि ‘ विशालं विरजं गयां ’ या क्षेत्रांत वपन करुं नये , ह्याची ह्याच प्रकरणीं पुढें सांगावयाच्या वचनाशीं एकवाक्यताही होते . निघण्याच्या वेळीं श्राद्ध सांगितलें तें सहा , नऊ किंवा बारा देवतांचें घृतानें करावें . कारण , " जो देशांतरीं जाण्याविषयीं निघेल त्यानें घृतानें श्राद्ध करावें " असें विष्णुपुराणवचन आहे . आणि यात्रेचें अंगभूत वृद्धिश्राद्धही सांगितलें आहे .

श्राद्धंचपारणादिनएव उपोष्यरजनीमेकांप्रातः श्राद्धंविधायच गणेशंब्राह्मणान्नत्वाभुक्त्वाप्रस्थितवान्सुधीरितिस्कांदलिंगात् गौडनिबंधेगौतमः तीर्थयात्रासमारंभेतीर्थात्प्रत्यागमेपिच वृद्धिश्राद्धंप्रकुर्वीतबहुसर्पिः समन्वितं वृद्धिपदंतद्धर्मार्थं श्राद्धोत्तरंयात्रासंकल्पइतिभट्टाः वायवीये उद्यतस्तुगयांगंतुंश्राद्धंकृत्वाविधानतः विधायकार्पटीवेषंग्रामंगत्वाप्रदक्षिणम् ततोग्रामांतरंगत्वाश्राद्धशेषस्यभोजनं घृतस्यभोजनं तच्च क्रोशमध्ये श्राद्धोत्तरंक्रोशगमननिषेधात् ततः प्रतिदिनंगच्छेत्प्रतिग्रहविवर्जितः गयायामेवतन्नान्यत्रेतिकेचित् हेमाद्रिस्तु गयायांश्राद्धदिनेएवप्रस्थानं तीर्थांतरेतुश्राद्धोत्तरदिनइत्याह प्रभासखंडे यश्चान्यंकारयेच्छक्त्यातीर्थयात्रांनरेश्वरः स्वकीयद्रव्ययानाभ्यांतस्यपुण्यंचतुर्गुणं यात्रामध्येआशौचेरजसिवाशुद्धिपर्यंतस्थित्वा तदंतेगच्छेत् मार्गवैषम्येत्वदोषः यात्रामध्येतीर्थांतरप्राप्तौश्राद्धादिकार्यमेव वाणिज्याद्यर्थंगतेनतु मुंडनोपवासादिनकार्यमितिप्रयागसेतौभट्टाः वस्तुतस्तुतत्रापिमुंडनोपवासश्राद्धादिकार्यं अर्धंतीर्थफलंतस्ययः प्रसंगेनगच्छतीतिब्राह्मोक्तेः स्कांदे द्विर्भोजनंतृतीयांशंहरेत्तीर्थफलस्यच वाणिज्यंत्रींस्तथाभागान्हंतिसर्वंप्रतिग्रहः यानंधर्मचतुर्थांशंछत्रोपानहमेवचेत्युत्तरार्धपाठांतरम् ।

श्राद्ध करणें तें पारणादिवशींच करावें . कारण , " एक दिवस उपोषण करुन प्रातःकालीं श्राद्ध करुन गणेश , ब्राह्मण यांना नमस्कार करुन भोजन करुन तो विद्वान् प्रस्थान करिता झाला " असें स्कांदांत पारणादिवशीं श्राद्ध केल्याचें बोधक वचन आहे . गौडनिबंधांत गौतम - " तीर्थयात्रेच्या आरंभीं आणि तीर्थाहून आल्यावर बहुत घृतानें युक्त असें वृद्धिश्राद्ध करावें . " येथें वृद्धिश्राद्ध असें म्हटलें आहे . तें या श्राद्धांत वृद्धिश्राद्धाचे धर्म यावे म्हणून आहे . श्राद्ध झाल्यानंतर यात्रेचा संकल्प करावा , असें नारायणभट्ट सांगतात . वायवीयांत - " गयेस जाण्याविषयीं उद्युक्त झाला असेल त्यानें यथाविधि श्राद्ध करुन कापडी लोकांचा वेष करुन ग्रामाला प्रदक्षिणा करुन नंतर दुसर्‍या गांवास जाऊन तदनंतर श्राद्धशेष घृताचें भोजन करावें . " येथें श्राद्धशेषघृताचें भोजन सांगितलें तें एका कोशाच्या आंत समजावें ; कारण , श्राद्ध केल्यानंतर एक कोश जाण्याचा निषेध आहे . " तदनंतर कोणाचाही प्रतिग्रह वर्ज्य करुन प्रतिदिवशीं गमन करावें . " हें सर्व गयेच्या यात्रेविषयींच आहे , इतरांविषयीं नाहीं , असें केचित् म्हणतात . हेमाद्रि तर - गयेच्या यात्रेविषयीं श्राद्धदिवशींच प्रस्थान करावें . इतर तीर्थांविषयीं तर श्राद्धाच्या दुसर्‍या दिवशीं करावें , असें सांगतो . प्रभासखंडांत - " जो राजा आपलें द्रव्य आणि वाहन दुसर्‍यास देऊन त्याच्या कडून तीर्थयात्रा यथाशक्ति करवील त्याला त्या यात्रेचें पुण्य चौपट प्राप्त होईल . " यात्रेमध्यें आशौच किंवा स्त्री रजस्वला होईल तर शुद्धीपर्यंत राहून शुद्धी झाल्यावर पुढें जावें . मार्ग बिकट असेल ( राहण्यासारखा नसेल ) तर नाहीं राहिलें तरी दोष नाहीं . यात्रेमध्यें अन्यतीर्थ प्राप्त असतां श्राद्धादिक करावेंच . व्यापार वगैरे करण्यासाठीं जाणारानें तर मुंडन उपवास वगैरे करुं नये , असें प्रयोगसेतूंत भट्ट सांगतात . वास्तविक म्हटलें तर व्यापारादिकासाठीं जाणारानें देखील मुंडन , उपवास , श्राद्ध इत्यादि करावें . कारण , " जो इतर कार्याच्या प्रसंगानें तीर्थास जातो त्याला तीर्थाचें पुण्य अर्धै प्राप्त होतें " असें ब्राह्मवचन आहे . स्कन्दपुराणांत - " यात्रेंत दररोज द्विवार भोजन केलें असतां तीर्थफलाचा तिसरा हिस्सा कमी होतो . व्यापार केला असतां तीर्थफलाचे तीन भाग कमी होतात . आणि प्रतिग्रह केला असतां तीर्थाचें फल सारें नष्ट होतें . " या वचनाच्या उत्तरार्धांत ‘ यानं धर्मचतुर्थांशं छत्रोपानहमेव च ’ असें पाठांतर आहे . त्याचा अर्थ - वाहन , छत्र , जोडा हें घेतलें असतां धर्माचा ( पुण्याच्या ) चतुर्थांश कमी होतो .

अत्रनदीषुविशेषः मार्गेंतरानदीप्राप्तौस्नानादिपरपारतः अर्वागेवसरस्वत्याएषमार्गगतोविधिः यत्तु पितृनतर्पयित्वातुनदीस्तरतियोनरः तस्यासृक्पानकामास्तेभवंतिभृशदुः खिताइतितत्सरस्वतीपरम् शंखः तीर्थंप्राप्यानुषंगेणस्नानंतीर्थेसमाचरेत् स्नानजंफलमाप्नोतितीर्थयात्राकृतंनतु सएव नस्रवंतीमतिक्रामेदनवसिच्य तीर्थप्राप्तौतुप्रभासखंडे यानानितुपरित्यज्यभाव्यंपादचरैर्नरैः लुठित्वालोठनींतत्रकृत्वाकार्पाटिकाकृतिं कृत्वेतिगृहान्निर्गमसमयेकरणेइदं प्रथमंचालयेत्तीर्थंप्रणवेनजलंशुचि अवगाह्यततः स्नायाद्यथावन्मंत्रयोगतः मंत्रश्चप्रभासखंडे नमोस्तुदेवदेवायशितिकंठायदंडिने रुद्रायचापहस्तायचक्रिणेवेधसेनमः सरस्वतीचसावित्रीवेदमातागरीयसी सन्निधात्रीभवत्वत्रतीर्थेपापप्रणाशिनीति मंत्रवत्स्नानंचवपनोत्तरंकार्यं पूर्वमावाहनंतीर्थेमुंडनंतदनंतरं ततः स्नानादिकंकुर्यात्पश्चाच्छ्राद्धंसमाचरेदित्युक्तेः यत्तु गत्वास्नानंप्रकुर्वीतवपनंतदनंतरमितितन्मुशलस्नानपरं काशीखंडे तीर्थोपवासः कर्तव्यः शिरसोमुंडनंतथा उपवासेतत्रैवोक्तं यदह्नितीर्थप्रप्तिः स्यात्तदह्नः पूर्ववासरे उपवासः प्रकर्तव्यः प्राप्तेह्निश्राद्धदोभवेत् अत्र उपवासंततः कुर्यात्तस्मिन्नहनिसुव्रतइति प्राप्तिदिनेषूपवासोक्तेर्विकल्पः मुंडनेतुस्कांददेवलौ मुंडनंचोपवासश्चसर्वतीर्थेष्वयंविधिः वर्जयित्वाकुरुक्षेत्रंविशालंविरजंगयां विरजंलोणारइतिप्रसिद्धम ‍ महातीर्थपरः सर्वतीर्थशब्दः ।

यात्रेंत नद्यांच्या ठिकाणीं विशेष सांगतो - " मार्गामध्यें नदी प्राप्त असतां स्नान - संध्या वगैरे कर्म परतीरास करावें . आणि सरस्वतीनदीच्या पूर्वतीरासच करावें , हा मार्गगमनाचा विधि समजावा . " आतां जें " जो मनुष्य अलीकडे पितरांचें तर्पण केल्यावांचून नदी उतरुन पलीकडे जातो , त्याचे पितर अत्यंत दुःखी होऊन त्याच्या रक्तपानाची इच्छा करितात . " असें वचन तें सरस्वतीविषयक आहे . शंख - " इतर कार्याच्या अनुषंगानें तीर्थ प्राप्त असतां तीर्थाचें ठायीं स्नान करावें , म्हणजे स्नानाचें फल त्याला प्राप्त होतें . तीर्थयात्रेचें फल त्याला प्राप्त होत नाहीं . " तोच शंख - " वाहाणार्‍या नदींत स्नान केल्यावांचून पुढें जाऊं नये . " तीर्थ प्राप्त झालें असतां सांगतो प्रभासखंडांत - " तीर्थ जवळ आलें असतां त्या ठिकाणीं वाहनांतून खालीं उतरुन जमिनीवर लोळून पायांनीं चालूं लागावें . आणि कापडी लोकांचा वेष ग्रहण करावा . " कर्पटीवेष ग्रहण करणें हें घरांतून निघते वेळीं करावें . " प्रथमतः तीर्थाचें शुद्ध उदक प्रणवाचा उच्चार करुन हातानें चाळवावें . नंतर बुडी मारुन यथाविधि मंत्र म्हणून स्नान करावें . " मंत्र सांगतो प्रभासखंडांत - " नमोस्तु देवदेवाय शितिकंठाय दंडिने । रुद्राय चापहस्ताय चक्रिणे वेधसे नमः । सरस्वती च सावित्री वेदमाता गरीयसी । संनिधात्री भवत्वत्र तीर्थे पापप्रणाशिनी " हें समंत्रक स्नान वपन केल्यानंतर करावें . कारण , " तीर्थाचे ठायीं पूर्वीं आवाहन तदनंतर मुंडन व मुंडन केल्यावर स्नानादिक करावें , पश्चात् श्राद्ध करावें " असें सांगितलें आहे . आतां जें " तीर्थास जाऊन स्नान करुन नंतर वपन करावें " असें स्नानानंतर वपन सांगितलें तें मुसलस्नानविषयक आहे . काशीखंडांत - " तीर्थोपवास करावा आणि तसेंच मस्तकाचें मुंडन करावें . " उपवासाविषयीं तेथेंच सांगतो - " ज्या दिवशीं तीर्थ प्राप्त होईल त्याच्या पूर्व दिवशीं उपवास करावा , आणि तीर्थ प्राप्त झालेल्या दिवशीं श्राद्ध करावें " या वचनानें पूर्व दिवशीं उपवास सांगितला आणि एथें ( काशीखंडांत ) " तदनंतर त्यादिवशीं व्रती होऊन उपवास करावा . " या वचनानें तीर्थप्राप्तिदिवशीं उपवास सांगितल्यावरुन विकल्प समजावा . मुंडनाविषयीं तर स्कान्द देवल सांगतात - " कुरुक्षेत्र , विशाल , विरज ( लोणार ) आणि गया हीं वर्ज्य करुन इतर सर्वतीर्थांचे ठायीं ( प्रसिद्ध महातीर्थांचे ठायीं ) मुंडन आणि उपवास हा विधि आहे . "

अत्रविशेषः स्मृत्यंतरे ऊर्ध्वमब्दाद्दिमासोनात्पुनस्तीर्थंव्रजेद्यदि मुंडनंचोपवासंचततोयत्नेनकारयेत् तदातद्वपनंशस्तंप्रायश्चित्तमृतेद्विजेतिपाठः प्रयागेप्रतियात्रंतुयोजनत्रयइष्यते क्षौरंकृत्वातुविधिवत्ततः स्नायात्सितासिते तथाचबृहस्पतिः क्षौरंनैमित्तिकंकार्यंनिषेधेसत्यपिध्रुवं पित्रादिमृतिदीक्षासुप्रायश्चित्तेथतीर्थके अपरार्केस्कांदे उदड्मुखः प्राड्मुखोवावपनंकारयेत्सुधीः केशश्मश्रुलोमनखान्युदक्संस्थानिवापयेत् इदंप्रयागेसधवानामपिसमूलंभवतीतिभट्टाः युक्तंतु सर्वान्केशान्समुद्धृत्यछेदयेदंगुलद्वयं एवमेवहिनारीणांशस्यतेवपनक्रियेति तच्चाकृतचूडानांनकार्यमितिकेचित् तत्त्वंतुनैमित्तिकत्वात् पित्रादिमृतवत्कार्यमेवेति तदपिप्रयागेनित्यं नान्यत्र तच्चयतिभिस्तीर्थेपिऋतुसंधिष्वेवकार्यंनान्यदा कक्षोपस्थशिखावर्जमृतुसंधिषुवापयेदितिस्मृतेः इदंजीवत्पितृकेणापितीर्थेकार्यं नच मुंडनंपिंडदानंचेतिदक्षवचनेननिषेधः विनातीर्थंविनायज्ञंमातापित्रोर्मृतिंविना योवापयतिलोमानिसपुत्रः पितृघातकइतिस्मृत्यातत्संकोचात् तदपिप्रयागेप्रतियात्रमन्यतीर्थेआद्ययात्रायामेवेतिशिष्टाः ततः स्नानम् ।

मुंडन व उपवासाविषयीं विशेष सांगतो स्मृत्यंतरांत - " एकवार तीर्थास जाऊन सर्व विधि करुन पुनः दहा महिन्यांनंतर जर त्यास तीर्थास जाईल तर मुंडन आणि उपवास प्रयत्नानें करावे . " याचा उत्तरार्धांत ‘ तदा तद्वपनं शस्तं प्रायश्चित्तमृते द्विजः ’ असा पाठ आहे ; त्याचा अर्थ - " तेव्हां प्रायश्चित्तावांचून वपन करणें प्रशस्त आहे . " , " प्रयागाचे ठायीं तीन योजनांत प्रत्येक यात्रेला यथाविधि क्षौर करुन नंतर गंगायमुनेच्या संगमातं स्नान करावें " तेंच बृहस्पति सांगतो - " माता व पिता यांचें मरण , दीक्षा , प्रायश्चित्त आणि तीर्थ हीं निमित्तें प्राप्त झालीं असतां इतर कारणांनीं क्षौराचा निषेध असला तरी नैमित्तिक क्षौर करावें . " अपरार्कांत स्कांदांत - " उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे मुख करुन बसून वपन करवावें . केश , श्मश्रु , लोम , नखें हीं दक्षिणेकडून उत्तरेकडे कापवीत आणवावीं . " हें वपन प्रयागांत सुवासिनीला देखील मूळापासून होतें , असें नारायणभट्ट सांगतात . युक्त म्हटलें म्हणजे " सारे केश वर एके ठिकाणीं धरुन दोन अंगुळें कापावे , असेंच स्त्रियांचें वपन करणें प्रशस्त आहे . " तें वपन ज्यांचें चूडाकर्म झालें नसेल त्यांचें करुं नये , असें केचित् म्हणतात . खरा प्रकार म्हटला तर हें वपन नैमित्तिक असल्यामुळें पिता वगैरे मृत असतां जसें करावयाचें तसें करावेंच . तेंही प्रयागांत नित्य आहे , इतर ठिकाणीं नाहीं . तें वपन संन्याश्यांनीं तीर्थाचे ठायीं देखील ऋतूंच्या संधीचे ठायींच करावें , अन्यकालीं करुं नये . कारण , " कांखा , उपस्थ आणि शिखा वर्ज्य करुन ऋतुसंधीचे ठायीं वपन करावें " अशी स्मृति आहे . हें वपन जीवत्पितृकानें देखील तीर्थाचे ठायीं करावें . आतां " मुंडन , पिंडदान , आणि सर्व प्रेतकर्म हीं जीवत्पितृकानें करुं नये " या दक्षवचनानें वपनाचा ( मुंडनाचा ) निषेध प्राप्त झाला , असें कोणी म्हणेल तर तसें नाहीं ; कारण , " तीर्थावांचून , यज्ञावांचून , आईबापांच्या मरणावांचून जो केशांचें वपन करितो तो पितृघातक होतो " या स्मृतीनें त्या वरील वचनाचा संकोच ( तीर्थादिकांविषयीं अप्रवृत्ति ) होतो . तें वपनही प्रयागाचे ठायीं प्रत्येक यात्रेला करावें , इतर तीर्थाचे ठायीं पहिल्या यात्रेलाच करावें . असें शिष्ट सांगतात . वपन झाल्यानंतर स्नान करावें .

परार्थेतुमार्कंडेयपुराणे मातरंपितरंजायांभ्रातरंसुह्रदंगुरुं यमुद्दिश्यनिमज्जेतअष्टमांशंलभेत्ततः पैठीनसिः प्रतिकृतिंकुशमयींतीर्थवारिणिमज्जयेत् मज्जयेच्चयमुद्दिश्यसोष्टभागफलंलभेत् ततस्तर्पणश्राद्धे पृथ्वीचंद्रोदयेब्रह्मदेवीपुराणकाशीखंडादिषु अकालेप्यथवाकालेतीर्थेश्राद्धंचतर्पणं अविलंबेनकर्तव्यं नैवविघ्नंसमाचरेत् मात्स्येपितृणांचैवतर्पणमितितुर्यपादः तत्रदेवताः महालयेप्रागुक्ताः शंखदेवलौ तीर्थद्रव्योपपत्तौचनकालमवधारयेत् पात्रंचब्राह्मणंप्राप्यसद्यः श्राद्धंसमाचरेत् हारीतः दिवावायदिवारात्रौभुक्तोवोपोषितोपिवा नकालनियमस्तत्रगंगांप्राप्यसरिद्वरां भारते भुक्तोवाप्यथवाभुक्तोरात्रौवायदिवादिवा पर्वकालेथवाकालेशुचिर्वाप्यथवाशुचिः यदैवदृश्यतेतत्रनदीचत्रिपथाप्रिय प्रमाणंदर्शनंतस्मान्नकालस्तत्रकारणं आशौचेपिकार्यं विवाहदुर्गयज्ञेषुयात्रायांतीर्थकर्मणि नतत्रसूतकंतद्वत्कर्मयज्ञादिकारयेदितिपैठिनसिस्मृतेः तदानीमकरणेत्वाशौचांतेएवकुर्यात् प्रभासखंडे नवारंनचनक्षत्रंनकालस्तत्रकारणं यदैवदृश्यतेतीर्थंतदापर्वसहस्त्रकं मलमासेपिकार्यं नित्यनैमित्तिकेकुर्यात्प्रयतः सन्मलिम्लुचे तीर्थश्राद्धंगजच्छायांप्रेतश्राद्धंतथैवचेतिबृहस्पतिस्मृतेः ।

दुसर्‍याकरितां स्नान करावयाचें असतां सांगतो मार्केंडेयपुराणांत - " माता , पिता , पत्नी , भ्राता , मित्र , गुरु यांमध्यें ज्याच्या उद्देशानें स्नान करील त्याला त्या स्नानाचें अष्टमांश फल प्राप्त होतें . " पैठीनसि - " ज्याची कुशमय प्रतिमा करुन तीर्थोदकांत बुडवील आणि ज्याच्या उद्देशानें बुडी मारील त्याला अष्टमांश फल प्राप्त होतें . " स्नान केल्यानंतर तर्पण व श्राद्ध सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत ब्रह्मपुराण , देवीपुराण , काशीखंड इत्यादिकांत - " तीर्थ प्राप्त असतां श्राद्धाचा व तर्पणाचा काल असो किंवा नसो श्राद्ध व तर्पण लवकर करावें , त्याविषयीं विघ्न ( अवकाश ) करुं नये . " या वचनाच्या चवथ्या पादीं ‘ पितृणां चैव तर्पण ’ म्हणजे पितरांचें तर्पण लवकर करावें , असा मत्स्यपुराणांत पाठ आहे . त्याविषयीं देवता पूर्वीं महालयप्रकरणीं सांगितल्या आहेत . शंखदेवल - " तीर्थ व द्रव्यांची उपपत्ति असली म्हणजे काल पाहूं नये . पात्रभूत ब्राह्मण प्राप्त असतां तत्काल श्राद्ध करावें . " हारीत - " सर्व नद्यांमध्यें श्रेष्ठ अशी गंगा प्राप्त झाली असतां दिवस असो किंवा रात्र असो , भोजन केलेला असो अथवा उपोषित असो , त्या ठिकाणीं कालाचा नियम नाहीं . " भारतांत - " भोजन केलेला असो किंवा उपोषित असो , दिवस असो किंवा रात्र असो , पर्वकाल असो किंवा नसो , शुचि असो किंवा अशुचि असो , ज्या वेळीं भागीरथीचें दर्शन होईल तो काल सर्व कर्माचा होय . कारण , त्या ठिकाणीं भागीरथीचें दर्शन हेंच प्रमाण म्हणजे स्नानादिकाला कारण आहे . काल कारण नाहीं . " आशौचांतही करावें . कारण , " विवाह , किल्ला , यज्ञ , यात्रा , तीर्थांतील कर्म , इतक्या ठिकाणीं सूतक नाहीं . त्याचप्रमाणें यज्ञादिकर्मांमध्यें सूतक नसल्यामुळें तें यज्ञादिकर्म करावें " अशी पैठनसिस्मृति आहे . आशौच असतां तीर्थदर्शनकालीं स्नानश्राद्धादि कर्म केलें नसेल तर आशौच समाप्तीनंतरच करावें . प्रभासखंडांत - " वार नक्षत्र , काल हे तीर्थाचे ठायीं स्नान - श्राद्धादिकांला कारण नाहींत . ज्या वेळीं तीर्थाचें दर्शन होतें त्या वेळीं हजार पर्वै आहेत . " मलमासांतही करावें . कारण , " नित्य , नैमित्तिक , तीर्थश्राद्ध , गजच्छाया , आणि प्रेतश्राद्ध हीं मलमासांतही करावीं . " अशी बृहस्पतिस्मृति आहे .

एतच्चाशौचेकृतभोजनस्यरात्रौवास्नानश्राद्धादिकमाकस्मिकतीर्थप्राप्तावामहेमश्राद्धविषयंग्रहणादिवत् नतुबुद्धिपूर्वमाशौचादौतीर्थप्राप्तिः कार्या मलमासेतुमासद्वयेतीर्थश्राद्धंकार्यमितिचंद्रिकायां देवीपुराणे श्राद्धंचतत्रकर्तव्यमर्घ्यावाहनवर्जितं हेमाद्रौ अर्घ्यमावाहनंचैवद्विजांगुष्ठनिवेशनं तृप्तिप्रश्नंचविकिरंतीर्थश्राद्धेविवर्जयेत् भविष्ये आवाहनंविसृष्टिश्चतत्रतेषांनविद्यते आवाहनंनतीर्थेस्यान्नार्घ्यदानंतथाभवेत् आहूताः पितरस्तीर्थेकृतार्घ्याः संतिवैयतः अग्नौकरणंचनेतिरत्नावल्यां अत्रषटदैवतेश्राद्धेपिमात्रादीनांपिंडमात्रंदेयं हविः शेषंततोमुष्टिमादायैकैकमादृतः क्रमशः पितृपत्नीनांपिंडनिर्वपणंचरेदितितीर्थोपक्रमेदेवलोक्तेरितिपृथ्वीचंद्रः ततः सामान्यपिंडंदद्यात् ततः पिंडमुपादायहविषः संस्कृतस्यच ज्ञातिवर्गस्यसर्वस्यसामान्यंपिंडमुत्सृजेदितितेनैवोक्तेः पाद्मे तीर्थश्राद्धंप्रकुर्वीतपक्कान्नेनविशेषतः आमान्नेनहिरण्येनकंदमूलफलैरपि ।

आशौचांत स्नान - श्राद्धादिक सांगितलें हें आणि भोजन केल्यावर रात्रीं स्नान - श्राद्धादिक सांगितलें हें अकस्मात् एकाएकीं तीर्थ प्राप्त असतां आमश्राद्ध - हिरण्यश्राद्धाविषयीं समजावें . जसें ग्रहणांत आमहिरण्यश्राद्ध सांगितलें तद्वत् . आशौचादिक असतां बुद्धिपूर्वक तीर्थास जाऊं नये . मलमासांत सांगितलें तें तर - मलमास असतां मलमास व शुद्धमास या दोहोंत तीर्थश्राद्ध करावें , असें चंद्रिकेंत सांगितलें आहे . देवीपुराणांत - " तीर्थाचे ठायीं अर्घ्य आणि आवाहनरहित श्राद्ध करावें . " हेमाद्रींत - " अर्घ्य , आवाहन , अन्नांत ब्राह्मणाच्या अंगुष्ठाचें निवेशन , तृप्तिप्रश्न आणि विकिर हे तीर्थश्राद्धांत वर्ज्य करावे . " भविष्यपुराणांत - " पितरांचें आवाहन आणि विसर्जन हें तीर्थश्राद्धांत नाहीं . तीर्थांत आवाहन आणि अर्घ्यदान होत नाहीं ; कारण , तीर्थाचे ठायीं आवाहन केलेले व अर्घ्य दिलेले असे पितर असतात " अग्नौकरणही नाहीं , असें रत्नावलीग्रंथांत आहे . एथें ( तीर्थाचे ठायीं ) सहा देवतांच्या श्राद्धांतही माता इत्यादिकांला पिंड मात्र द्यावा . कारण , " पिता इत्यादिकांस पिंड दिल्यावर शेष अन्नांतील एक एक मुष्टि घेऊन आदरपूर्वक अनुक्रमानें पितृपत्नींला पिंडदान करावें " असें तीर्थाच्या उपक्रमांत देवलाचें वचन आहे , असें पृथ्वीचंद्र सांगतो . तदनंतर सामान्य पिंड द्यावा . कारण , " तदनंतर त्या संस्कार केलेल्या शेष अन्नाचा पिंड करुन सार्‍या ज्ञातिवर्गाला सामान्य़ पिंड द्यावा . " असें त्यानें ( देवलानें ) सांगितलें आहे . पद्मपुराणांत - ‘‘ तीर्थश्राद्ध विशेषेंकरुन पक्कान्नानें करावें . आमान्नानें , हिरण्यानें , अथवा कंद - मूल - फलें यांनीं देखील करावें . "

पिंडद्रव्याणिदेवीपुराणेहेमाद्रौब्राह्मेच सक्तुभिः पिंडदानंचसंयावैः पायसेनवा कर्तव्यमृषिभिः प्रोक्तंपिण्याकेनगुडेनवा पिंडानांतीर्थप्रक्षेपएवनान्याप्रतिपत्तिरित्युक्तंप्राक् एतच्चविधवयाऽपुत्रयाकार्यं नसपुत्रयेत्युक्तंप्राक् सपुत्रयानकर्तव्यंभर्तुः श्राद्धंकदाचनेतिस्मृतेश्च अनुपनीतेनापिकार्यं एतच्चानुपनीतोपिकुर्यात्सर्वेषुपर्वस्वितिपाद्मेतीर्थश्राद्धमुपक्रम्योक्तेः एतच्चजीवत्पितृकेणापिकार्यमित्युक्तंप्राक् यतिनातुनकार्यं नकुर्यात्सूतकंभिक्षुः श्राद्धपिंडोदकक्रियां त्यक्तंसंन्यासयोगेनगृहधर्मादिकंव्रतं गोत्रादिचरणंसर्वंपितृमातृकुलंधनमितिस्मृतेः गयायांतूक्तंवायवीये दंडंप्रदर्शयेद्भिक्षुर्गयांगत्वानपिंडदः दंडंस्पृष्ट्वाविष्णुपदेपितृभिः सहमुच्यते गयायांधर्मपृष्ठेचकूपेयूपेवटेतथा दंडंप्रदर्शयन्भिक्षुः पितृभिः सहमुच्यते कृत्यरत्नेप्रभासखंडे तीर्थेचेत्प्रतिगृह्णातिब्राह्मणोवृत्तिदुर्लभः दशांशमर्जितंदद्यादेवंकुर्वन्नहीयते इति विशेषांतराणिभट्टकृतत्रिस्थलीसेतौज्ञेयानीतिदिक् इतिकमलाकरभट्टकृतेनिर्णयसिंधौतीर्थश्राद्धविधिः समाप्तः ॥

पिंडांचीं द्रव्यें सांगतो - देवीपुराणांत आणि हेमाद्रींत ब्रह्मपुराणांत - " सातूचें पीठ , अथवा गव्हांचा शिरा , किंवा पायस ( दुधाचे विकार ), अथवा तिळकूट , किंवा गूळ यांचे पिंड करुन ते द्यावे , असें ऋषींनीं सांगितलें आहे . " पिंड तीर्थांतच टाकावे , दुसरीकडे टाकूं नयेत , असें पूर्वीं ( पार्वणश्राद्धप्रकरणीं ) सांगितलें आहे . हें तीर्थश्राद्ध निपुत्रिक विधवेनें करावें . सपुत्रिक विधवेनें करुं नये , असें पूर्वीं सांगितलें आहे . आणि जिला पुत्र असेल तिनें भर्त्याचें श्राद्ध कधींही करुं नये " अशी स्मृतिही आहे . ज्याचें मौंजीबंधन झालें नाहीं त्यानेंही करावें ; कारण , " हें अनुपनीतानें देखील सर्व पर्वांचे ठायीं करावें " असें पद्मपुराणांत तीर्थश्राद्धाचा उपक्रम ( आरंभ ) करुन सांगितलें आहे . हें तीर्थश्राद्ध जीवत्पितृकानें देखील करावें . असें पूर्वीं सांगितलें आहे . तीर्थश्राद्ध संन्याश्यानें तर करुं नये ; कारण , " संन्याश्यानें सूतक ( आशौच ), श्राद्ध , पिंडदान , उदकदान , हीं करुं नयेत . कारण , संन्यास ग्रहण केल्यानें गृहस्थाश्रमाचे धर्म इत्यादिक , व्रत , गोत्रप्रवर , पितृकुल , मातृकुल व द्रव्य या सर्वांचा त्यानें त्याग केला आहे . " अशी स्मृति आहे . गयेचे ठायीं तर वायवीयांत सांगितलें आहे , तें असें - " संन्याश्यानें गयेंत जाऊन दंड दाखवावा ; पिंड देऊं नयेत . विष्णुपदाचे ठायीं दंडाचा स्पर्श करुन तो पितरांसह मुक्त होतो . गया , धर्मपृष्ठ , कूप , यूप आणि अक्षयवट यांचे ठायीं दंड दाखवून संन्याशी पितरांसह मुक्त होतो . " कृत्यरत्नांत प्रभासखंडांत - " ब्राह्मण उपजीविका चालत नसल्यामुळें तीर्थाचे ठायीं जर प्रतिग्रह करील तर त्यानें मिळविलेल्या द्रव्यांतून दहावा अंश इतरांस द्यावा , असें करणारा स्वधर्मापासून च्युत होत नाहीं . " तीर्थासंबंधीं इतर विशेष नारायणभट्टांनीं केलेल्या त्रिस्थलीसेतुग्रंथांत पाहावे अशी ही दिशा दाखविली आहे . इति श्रीनिर्णयसिंधौ तीर्थश्राद्धविधीची महाराष्ट्रटीका समाप्त झाली .

इति श्रीनिर्णयसिंधौ तृतीयपरिच्छेदे श्राद्धप्रकरणं समाप्तम ‍ ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP